> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ३१ मार्च, २०१२

'दिव्य मराठी'च्या सोलापूर आवृत्तीचे लोकार्पण

सोलापूर - अवघ्या वर्षभराच्या आत मराठी मनाचा ठाव घेणाऱया दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या साथीने आणि असंख्य सोलापूरकरांच्या साक्षीने शनिवारी संपन्न झाला. आपल्या मर्जीचे वृत्तपत्र शहरातून प्रसिद्ध होणार असल्याने त्याच्या स्वागतासाठी येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात असंख्य सोलापूरकर जमले होते.

प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुमित्रा महाजन, राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री लक्ष्मण ढोबळे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दैनिक भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र आगरवाल हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्य मराठीच्या स्वागतासाठी शहरातील विविध चौकांमध्ये सुरेख रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या.

दिशा देण्याचे आणि प्रबोधनाचे काम भास्कर समूह करतोय - सुशीलकुमार शिंदे

लोकांना दिशा देण्याचे आणि त्यांचे प्रबोधन करण्याचे काम दैनिक भास्कर समूह करीत आहे. हे वृत्तपत्र जनतेचे असल्याचे समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र आगरवाल यांनी सांगितले, हे खरंच खूप चांगले आहे. गेल्या १८-२० वर्षांपासून मी या समूहाला ओळखतो आहे. त्यांचे वृत्तपत्र खरोखरच निःपक्ष आहे. गेल्या दहा महिन्यांत या समूहाने मराठीमध्ये पाच आवृत्त्या काढल्या आणि आणखी पाच आवृत्त्या काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. देशाच्या ऊर्जानिर्मितीमध्येसुद्धा हा समूह उतरला आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत ५५ हजार मेगावॉटची निर्मिती केंद्र सरकारने केली आहे. ही विक्रमी वीजनिर्मिती आहे. सोलापूर-पंढरपूर-अक्कलकोट-तुळजापूर या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने निधीची तरतूद केली आहे. रस्त्याच्याबाबतीत आम्ही परिपूर्ण आहोत. विद्यापीठ स्थापन करून आता शैक्षणिक बाबतीतही आम्ही परिपूर्ण झालो आहोत. उजनी धरणातून पाईपलाईन सोलापूर शहरात आणण्यावरून माझ्यावर त्यावेळी मोठी टीका करण्यात आली. पण आज त्याचे फळ सोलापूरकरांना मिळते आहे.

दिव्य मराठी जनतेचा आवाज उठविणार - सुमित्रा महाजन

दिव्य मराठी हे कोणाचेही मुखपत्र नाही. हा पेपर जनतेचा आवाज उठविणारे वृत्तपत्र आहे. अशाच वृत्तपत्राची आपण अपेक्षा करतो. जनतेच्या भावना या कोठेतरी मांडता आल्या पाहिजेत. जनतेची लढाई लढण्यासाठी हे वृत्तपत्र मराठीत आले आहे. मराठीतील प्रथितयश लोकांना बरोबर घेऊन या समूहाने मराठीमध्ये काम सुरू केले आहे. सोलापूरकरांच्या विकासाची लढाई या वृत्तपत्राने सुरु केली आहे. सोलापूर म्हटले की येथील चादरींचा विषय निघतो. याच परंपरा आता या शहराच्या समस्या बनल्या आहेत. इंदूरमध्येही अशाच समस्या होत्या परंतु, आज त्यावर मात करून तेथे औद्योगिक विकास साध्य करण्यात आला आहे. हे सोलापूरमध्येही होऊ शकते. दिव्य मराठी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.  

उपेक्षित वर्गाचा हुंकार मांडण्याचे काम दिव्य मराठीने करावे - लक्ष्मणराव ढोबळे

सध्याच्या इंटरनेटच्या युगात वृत्तपत्राची परंपरा खंडीत होणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना चॅनेल्सच्या भाऊगर्दीतही वृत्तपत्रांची पाने वाढताहेत, ही निश्चितच चांगली बाब आहे. ध्येयवादी वृत्तपत्रांचा समाजावर पूर्वी मोठा दबदबा होता. अशी वृत्तपत्रे आजही मोठ्या दिमाखात काम करताहेत. न्यूयॉर्क टाईम्स, लंडनमधील टाईम्स यासारख्या वृत्तपत्रासारखे दिव्य मराठी हे एक वृत्तपत्र असेल, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्याची उर्मी आणि पत्रकारीतेतील नवा अंकुर जपण्याचे काम दिव्य मराठीने करावे. समाजातील उपेक्षित वर्गाचा हुंकार मांडण्याचे काम या वृत्तपत्राने केले पाहिजे. 

विविध राज्यांना दैनिक भास्करने प्रगतीपथावर नेले - विजयसिंह मोहिते-पाटील

देशातील विविध राज्यांना अप्रत्यक्षरित्या प्रगतीपथावर नेण्याचे काम दैनिक भास्कर समूहाने केले आले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. सोलापूरमध्ये नवीन उद्योगधंदे आणायचे असल्यास उजनी धरणात पाणी आणले पाहिजे. सध्या उजनी धरणामध्ये दहा टीएमसी सांडपाणी येते. त्यामुळे सोलापूरकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ येते. उजनी धरणातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी कोल्हापूरमधून पाणी आणले पाहिजे. शहरातील रस्ते सुधारले पाहिजेत आणि बंद पडलेली विमानसेवा सुरू केली पाहिजे. त्यासाठी मनापासून सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे.

येत्या सहा महिन्यांत सोलापूरात विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट दिव्य मराठीने ठेवले आहे. यासाठी दैनिक भास्कर समूह स्वतः विविध विमान कंपन्यांशी चर्चा करेल, असे मनोगत रमेशचंद्र आगरवाल यांनी व्यक्त केले. जनतेची मते सरकारपर्यंत पोचवून सोलापूरला पुढे आणायचे आहे. वृत्तपत्राचे काम सूचना आणि लेख देणे हे तर आहेत. पण त्याचबरोबर त्यांचे सामाजिक उत्तरदायित्वही आहे. हे काम दिव्य मराठी करणार आहे. येत्या पाच वर्षांत सोलापूर मोठे महानगर बनावे, ही भास्कर समूहाची कल्पना आहे, असेही आगरवाल यांनी स्पष्ट केले.

इतर माध्यमे वाढताहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्रांची पानेही वाढताहेत. स्वस्तामध्ये साईस्करपणे सुसंस्कृत करणारे हे माध्यम आहे. मराठी भाषा विकसित करायची असेल तर वृत्तपत्राची गरज आहे, असे मत दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी व्यक्त केले. केवळ नाउमेद करणारया बातम्या न देता चांगले आहे ते प्रकर्षाने दाखवणे, हेच दिव्य मराठीचे मुख्य सूत्र असेल, असेही केतकर यांनी सांगितले.

दैनिक भास्कर समूहाचे देशभरात १.९१ कोटी वाचक आहेत. त्यामध्ये आता सोलापूरकरची भर पडणार आहे. दैनिक भास्कर समूहाची ही देशातील ६५ वी आवृत्ती आहे. गेल्यावर्षी २९ मे रोजी दैनिक दिव्य मराठीची पहिली आवृत्ती औरंगाबादमध्ये सुरू झाली. औरंगाबादमधील मराठी वाचकांनी या वृत्तपत्राला भरभरून प्रतिसाद दिला आणि पहिल्या दिवसापासूनच दिव्य मराठी शहरातील नंबर एकचे वृत्तपत्र बनले. त्यानंतर तीन जुलै रोजी नाशिक येथे दुसरी आवृत्ती सुरु करण्यात आली. ११ सप्टेंबरला जळगावला तिसरी तर १६ ऑक्टोबरला अहमदनगरला चौथी आवृत्ती सुरु करण्यात आली. दिव्य मराठीने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केल्यानंतर आता सोलापूरच्या रुपाने पश्चिम महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. एक एप्रिलपासून सोलापूरकरांना दिव्य मराठीचा अंक मिळणार आहे.

शुक्रवार, ३० मार्च, २०१२

आय.बी.एन.-लोकमतचा अखेर फुगा फुटला, एका झटक्यात ७० कर्मचा-यांना घरी पाठविले

मुंबई - आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळे आय.बी.एन.लोकमतने एका झटक्यात ७० कर्मचा-यांना कमी केले आहे.सहा महिन्यापुर्वी २० जणांना कमी करण्यात आले होते.केवळ सहा महिन्यात ९० जणांना घरी पाठविणारे आय.बी.एन.लोकमत म्हणजे बडा घर - पोकळवासा ठरले आहे.काही दिवसांपुर्वी राज्यातील महानगर पालिका निवडणुकीच्या वेळी नं.१ चॅनल असा दावा करणारे आय.बी.एन.लोकमत आता कर्मचारी काढण्यात नं.१ ठरले आहे, हेही नसे थोडके.
नेटवर्क १८ शी सलग्ल असलेल्या या चॅनलमध्ये आय.बी.एन.चे ५१ टक्के तर लोकमतवाल्या दर्डांचे ४९ शेअर्स आहेत.गेल्या चार वर्षापुर्वी या चॅनलची सुरूवात अत्यंत धुमधडाक्यात झाली होती. परंतु काही दिवसांतच या चॅनलचा फुगा फुटला. गतवर्षी राज्यातील काही ब्युरो ऑफीस बंद करण्यात आले.सहा महिन्यापुर्वी २० कर्मचा-यांना काढण्यात आले तर आता एका झटक्यात एकूण ७० कर्मच-यांना काढण्यात आले आहे.त्यात प्रॉडक्शन विभागाचे ४, आऊटपूटचे ५, इनपूटचे ५, कॅमेरामन १० असा समावेश आहे.संपादकीय विभागाचे १४ जण काढण्यात आले असून, त्यात अमृता दुर्वे, उदय जाधव, शशी मराठे, अजय वांडरे यांचा समावेश आहे. चॅनलची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. आता आय.बी.एन.- लोकमतमध्ये कर्मचारी गेले, साहेब उरले असे चित्र निर्माण झाले आहे.गेलेले सुटले आणि राहिलेले वाघाच्या जबड्यात अडकल्याचे एका कर्मचा-याचे म्हणणे आहे.

ताजा कलम : कर्मचा-यांच्या हिताच्या बेंबीच्या देठापासून पोकळ गप्पा मारणारे संपादक निखील वागळे चक्क आठ दिवसापासून रजेवर आहेत. कर्मचा-यांच्या  या प्रश्नांला कोण उत्तरे द्यावीत म्हणून ते तोंड लपवून घरी बसले आहेत.


जाता - जाता : चला जग जिंकूया .....असं म्हणत ..सहा एप्रिल २००८ ला सुरु झालेलं आय बी एन लोकमत ....सहा एप्रिल २०१२ लाच बंद होतं कि काय अशी अवस्था झालीये ........कारण आहे कोणत्याही चॅनल चा ''कणा''असलेल्या स्ट्रीजरस कडे वर्ष भरातच या चॅनल ने नंबर वन झाल्यावर पाठ फिरविली .......चॅनल मध्ये असलेले अंतर्गत राजकारण .......स्री लंपट पणा.......काही बडव्यांचे वरिष्ठांकडे असलेले लाळ घोटे संबंध ( ...एक ब्युरो कोस्ट कटींग मुळे बंद होतो ....त्यातील सर्व लोकं बेरोजगार होतात ....आणि त्याच ब्युरोतील एका विशिष्ठ माणसाला पदोन्नती मिळते ).....महाराष्ट् भरातील ब्युरो ऑफिस मधून काही मंडळींनी जमवलेली माया ...आणि चॅनल ला करून दिलेली कमाई .....हे सर्व या अधोगती चे मुख्य कारण आहे.........आगामी काळात जर चॅनल बंद झाले तर शेवटी एवढंच म्हणावं लागेल .....''दैव देते अन कर्म नेते''.......

बुधवार, २८ मार्च, २०१२

'विलासी' पत्रकारीतेला अ'विनाशी' लगाम?

अमरावतीच्या दैनिक 'हिंदुस्थान'चे प्रबंध संपादक विलास मराठे यांची बदनामी करणारे 'ई-मेल्स' पाठविण्याच्या आरोपावरून 'लोकमत' चे माजी जिल्हा प्रतिनिधी अविनाश दुधे यांना पोलीसांनी काल-परवा अटक केली. विलास मराठे इंडिया बुल्सचे दलाल असून दैनिक हिंदुस्थान आणि अंबा फेस्टिवलसाठी त्यांनी पैसा घेतला, असा प्रमुख आरोप सदर 'ई-मेल्स' मध्ये करण्यात आला आहे. 'मराठेंच्या परंपरेला जप' असा सल्लाही त्या वादग्रस्त 'ई-मेल्स' मध्ये देण्यात आला आहे.
पत्रकारांना खरंच प्रतिष्ठा, इज्जत, इभ्रत असते? अशा सामाजिक साशंकतेच्या पार्श्वभूमीवर विलास मराठे यांनी या साशंकतेलाच आव्हान दिल्याबद्दल आम्ही प्रथमत: त्याचे आभार मानून अभिनंदन करतो. विलास मराठे यांचेवर करण्यात आलेले गंभीर आरोप खरे की खोटे? याचा निर्णय न्यायालयात लागणार असला तरी एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकारावर असा 'वार' करण्याचे मुळ कशात असावे? विलास मराठे विरूध्द अविनाश दुधे असं वरकरणी दिसणारं हे 'वॉर' दोन पत्रकारांच्या वैयक्तिक भांडणापुरतेच मर्यादित आहे ? की आजच्या युगातील 'विलासी' पत्रकारीतेला अ'विनाशी' लगाम घालण्याचा हा प्रयत्न म्हणावा? असे प्रश्न या निमित्याने दत्त म्हण्ाून आहेत. अविनाश दुधे यांनी विलास मराठेंवर केलेले किती आरोप खरे किती खोटे? याचा निवाडा न्यायालय करेलच परंतू 'मराठेंच्या परंपरेला जप' असा सल्ला देतांना अविनाश दुधे मात्र साफ विसरलेत की मराठेंच्या काही परंपरा आजही हिंदुस्थानने जपल्या आहेत. अमरावतीचे पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे यांच्या काळात हिंदुस्थान मट्नयांचे आकडे छापत होता. त्यानंतर डॉ. अरूण मराठेंच्या काळातही हिंदुस्थान मटक्याचे आकडे छापत होता आणि आजही हिंदुस्थानने ती परंपरा जपलेली आहे.
 पत्रकारीता हे सतीचं वाण असतं, असं आपण नेहमी ऐकतो. हे सतीचं वाण काय असतं? कशाशी खायचं असतं? कशा बरोबर खायचं असतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याआधी ते नेमकं काय असतं? पूर्वी सती प्रथा होती. पती निधनानंतर पतीव्रतेने स्वत:ला जिवंत जाळून मरण पत्करण्याची ती अघोरी प्रथा होती. सती जाणारी स्त्री सती जाण्यापूर्वी सुवासिनींना वाण द्यायची. ज्यांनी ज्यांनी ते वाण घेतलेलं असायचं त्यांना नंतर सती जावं लागायचं. आता सती प्रथा बंद झालीय आता सतीचं वाण जर एखादी महिला देत असेल तर प्रथम तिला अटक होईल आणि दुसरी अटक ते वाण घेणाऱ्या महिलेला होईल. या प्रथेतील ते 'वाण' देणं घेणं आता कालबाह्य, नियमबाह्य आणि कायद्याचा भंग ठरलं आहे. असं असलं तरी सतीच्या त्या 'वाणा'चा अर्थ त्या शब्दाची, त्या कृतीची बांधिलकी इमानाशी, 'घेतला वसा न उतता न मातता' खाली न टाकण्याशी संबंधीत होता. सती प्रथा बेकायदेशीर ठरल्यानंतर सतीचं वाणही बेकायदेशीरच ठरतं तथापी त्यामागची जी भावना होती त्या भावनेला वेगळा अर्थ होता. त्यातूनच पत्रकारीतेला सतीचं वाण म्हटल्या जात असे. ही परिस्थिती आता राहिली का?
बदलल्या काळात पत्रकारीता बदलली. पत्रकार बदलले. तत्व बदलले. समग्र परिवर्तन झाले. अत्याधुनिकतेसह व्यावसायिकता आली, व्यवसायीकता धंदा पांघरून वावरती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या डाव्या-उजव्या विचारांच्या पायावरील गर्भश्रीमंत वैचारिक पत्रकारीता कधीच लुप्त झाली. बाजार बसव्यांचे थवे पत्रकारीतेच्या आसमंतात 'साखळी' करून आपआपल्या डोळ्यात मावेल तेव्हढे आकाश आपल्या नावे करते झाले. बापजन्मात बापालाही 'पत्र' न लिहीणारे 'पत्रकार' झाले. 'पत्रावळी'साठी 'पोट' पत्रकारीता करणाऱ्या 'पत्रावळी'कारांच्या पिलावळी निर्माण झाल्या. भांडवलाच्या भरवशावर पत्रकारीतेचे इमले चढू लागले. लिहीणाऱ्यांच्या लेखण्या सोन्याच्या तराजूत तोलल्या जाऊ लागल्या. लिहीणाऱ्याच्या थप्प्या भांडवलदाराच्या भांडारात विसावू लागल्या. पत्रकारीता विकावू झाली 'शेटजी आणि भटजी' च्या विश्वात 'शेटजी' श्रेष्ठ ठरला 'भटजी' 'शेटजी'च्या ओसरीपुरता मर्यादित झाला. पत्रकारीता समुळ संपुर्ण बदलली. दोन चार तुकडे टाकले की लिहीणाऱ्यांचा 'प्रबंध' होतो. पाच दहा तुकडे टाकले की लिहीलेलं खपविणाऱ्यांचा 'प्रबंध' होतो. दहा वीस तुकडे टाकले की, खपलेलं प्रतिष्ठीत होतं. या प्रबंधा प्रबंधातूनच प्रबंध संपादक नावाची संकल्पना अस्तित्वात आली. वृत्तपत्रास जे जे हवं त्याचा प्रबंध करणारी प्रबंध संपादकाची नवीन जात तयार झाली. लिहीणारे, लिहीलेलं खपविणारे दुय्यम ठरले. दोन दिडकीवर आयुष्य खेचण्याची हतबलता डो्नयावर लादून जगणारे दुसरं काय करणार? भांडवलदाराचे भांडवल, कामगारांच्या श्रमापुढे फिके पडते याला कशाला हवाय पुरावा? पत्रकारीतेचे असे हसे झाल्यावर मग कशाचं तत्व अन कुठलं सत्व?
   'पत्रकार' म्हणजे आपल्या लेखणीच्या आणि ज्यांना लिहीता येत नाही अशांनी आपल्या भाडोत्री लेखणीकांकडून आपल्या वृत्तपत्राच्या जोरावर कुणालाही बदनाम करण्याची सुपारी घेतलेला तथाकथीत प्रतिष्ठीत इसम असा सर्वसाधारण समज समाजात नांदत आहे त्याला जबाबदार पत्रकारच होत. पत्रकार स्वत:ला सर्वेसर्वा समजतात. कधी ते वकीलाची भूमिका पार पाडतात तर कधी न्यायाधीश बनतात. आमच्याशिवाय कुणाला काही कळतच नाही. हा पत्रकारांचा आवडता सिध्दांत. सर्वज्ञ असल्यासारखे वागत असतांना आपली स्वार्थ सिध्दी होण्याची संधी दिसताच अचानक पलटी मारणे तर पत्रकारांची खास लकब. डंख मारल्यानंतर साप जसा त्वरेने पलटतो तसा हा चवथा स्तंभ कधी कधी काल काय लिहीलं हे विसरून वागतो आणि त्यामुळेच आज पत्रकारांची प्रतिष्ठा लोप पावत आहे. पोलीसांच्या अवैध धंद्यावर आसुड ओढणाऱ्या बातमीच्या बाजुलाच मट्नयाचे आकडे छापण्याचे 'पुण्य'कर्म आज महाराष्ट्नात किती वृत्तपत्र करीत आहेत? वाचक वर्ग वाढावा म्हण्ाून मट्नयाचे आकडे छापण्याची 'प्रतिष्ठीत' सवय वाचकांना लावणाऱ्या जिल्हा वृत्तपत्राचे जाऊ द्या परंतू खाऊन पिऊन सुखी असलेल्या जाधवांच्या 'पुढारी'ने आजही मट्नयाचा आकडा छापावा ही पत्रकारीतेची अधोगती नव्हे का? हे सर्व झालं पत्रकारीतेच्या एकूण स्वरूपाबाबत. सर्वच पत्र आणि पत्रकार असे पत्रकारीतेला न जाणणारे आहेत. असं मुळीच नाही. अनेक संस्कारीत वृत्तपत्र आणि पत्रकार याला अपवाद आहेत. म्हण्ाूनच अमरावतीत जे घडलं ते का घडलं? त्यांच मूळ काय? याचा मागोवा घेत असतांना एकूणच पत्रकारीता ज्या विलासीतेकडे वळत आहे त्या वळणावर तर आपण जात नाही ना? याचा पत्रकारांनी प्रकर्षाने विचार करण्याची गरज आहे असे म्हटल्यास काही वावगे ठरेल का?
 विलास मराठे प्रतिष्ठीत प्रबंध संपादक आणि अविनाश दुधे, प्रथितयश पत्रकार आहेत. यात 'वाद'च नाही असं असतांना अचानक हा 'वाद' का? इंडिया बुल्सने दैनिक हिंदुस्थान व अंबा फेस्टिवलला पैसा दिला असा अविनाश दुधेंचा आरोप आहे. इंडिया बुल्सने अंबा फेस्टिवलला 10 लाख रूपये दिल्याची कबुली सुध्दा दिली आहे. याचाच अर्थ या दोन पत्रकारांमधील या वादाचे मूळ इंडिया बुल्स असून त्याचा केंद्रबिंदू नांदगाव पेठ येथे होवू घातलेला वीज प्रकल्प आहे. इंडिया बुल्स आपल्या देशातील प्रमुख उद्योजक असून उद्योगाच्या माध्यमातून स्वत:चा अन् झालाच तर देशाचा विकास करणे, स्वार्थासह जमल्यास परमार्थ असा त्यांचा अजेंडा आहे. इंडिया बुल्सने नांदगाव पेठ परिसरात सहा हजार कोटीचा वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेताच त्याला परिसरातील सर्वसामान्यांनी जबरदस्त विरोध केल्याचे सर्वश्रृत आहेच. काही महामानवांनी प्रथम जिवाच्या आकांताने वीज प्रकल्पास विरोध केला मात्र नंतर त्यांचा विरोध मावळला. प्रथम विरोध करणे आणि नंतर शेपुट घालणे या 'अर्थ' पुर्ण कृतीचा अर्थ न समजण्या एव्हढी आता जनताही दुधखुळी राहीलेली नाही. इंडिया बुल्स उद्योजक आहेत. साधू संन्यासी नव्हेत. भांडवल गंुंतवून त्यावर नफा कमावणे हा मूळ उद्देश उराशी बाळग्ाुनच कोणताही उद्योजक मैदानात उतरत असतो. इंडिया बुल्सने 'साम आणि दाम' याचा वापर करून आपल्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुर्ण केला आहे. उद्योग उभारणे त्याचा ह्नकच आहे. त्यांच्या उद्योगामुळे या परिसराचा विकास होणार आहे, हे काही अंशी खरे असले तरी सिंचनाचं हजारो हे्नटर जमीनीचं पाणी पळवून छटाकभर केलेला विकास स्विकारणे मतीमंदाच्या शाळेत प्रवेशासाठी अर्ज करण्यासारखे नव्हे का? येथे इंडिया बुल्सला दोष देता येणारच नाही. त्यांचा तो व्यवसायच आहे. परंतू शेतीचं पाणी पळविणाऱ्या इंडिया बुल्स विरूध्द आधी आगपाखड करणारे नेते अचानक तोंडात मुगाची शेतं कोंबतात तेव्हा त्यांच्या श्रीमुखातील मुगाला इंडिया बुल्सने सोन्याचा मुलामा दिल्याचे स्पष्ट होते. हे नाकारून काही अर्थ आहे का? ज्या लोक प्रतिनिधींना इंडिया बुल्सने सोन्याचे जोडे हाणले ते मुकाट बसले. हे खरे नाही का? जर शेतीचे पाणी, अमरावतीचे पिण्याचे पाणी या प्रकल्पामुळे कमी होणार असेल तर आमचा त्याला विरोध राहील अशी 'जर, तरं'ची 'जरतरी' भाषा वापरून इंडिया बुल्सला मदत करणारे आमदार, खासदार आज इंडिया बुल्सच्या पगारपत्रकावरील कामगारापेक्षा जास्त किमतीचे नाहीत अशी जनभावना आहे.
 अमरावतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी इंडिया बुल्सचा वीज प्रकल्प स्विकारून आपली बांधिलकी जनतेशी नसून इंडिया बुल्सशी असल्याचं सिध्द केलं आहे. आजमितीस सारे नेते मुकाट आहेत आणि जेथे नेते मौन राखतात तेथे वृत्तपत्रानीच भोकाड पसरायचे असते. हिंदुस्थान येथे चुकला का? कोणत्याही चळवळीत वृत्तपत्रांची भूूमिका महत्वाची ठरते. जेथे नेते पैसा खावून गप्पगार होतात तेथे वृत्तपत्रांनी रान पेटवणं अपेक्षित असतं जेथे नेते षंढ ठरतात तेथे वृत्तपत्रांनी मर्दानगी दाखवायची असते. परंतू अमरावतीत दुदैवाने तसे घडले नाही काही मोजकी वृत्तपत्रं वगळता इंडिया बुल्सच्या पठाणी वीज प्रकल्पा विरूध्द कुणी लिहीत नाही, बोलत नाही. साऱ्यांच्या लेखण्या थिजल्या आहेत. लिहीण्यांन काही होणार नाही. कुणी आंदोलनच करत नाही मग लिहीणार काय अन् कसं? असा प्रश्न पडला असेल अनेकांना मग छापा इंडिया बुल्सने वाटलेल्या सौर कंदीलाची बातमी अन त्यांनी घेतलेल्या आरोग्य शिबीराची छायाचित्र. वृत्तपत्रांची ही 'बोटचेपी' भूमिका नेत्यांच्या 'चुप्पी'लाही लाजवणारी ठरावी. अविनाश दुधेंनी साऱ्यांचा राग हिंदुस्थानवर काढला का? संयु्नत महाराष्ट्नाच्या चळवळीत दिड वर्ष तुरूंगवास भोगलेल्या बाळासाहेब मराठेंचा हाच काय तो हिंदुस्थान? अशी तर अविनाश दुधेंच्या संतप्त इ-मेल्सची प्रतिक्रिया नव्हती ना?
खरं म्हणजे सर्वच वृत्तपत्र या बोटचेपेपणाबद्दल निश्चितपणे जबाबदार आहेत. पत्रकार म्हणजे केवळ पत्रपपरिषदेच्या बातम्या छापणारा हमाल नसतोच. नेतृत्व जेव्हा 'खुजे' होते तेव्हा पत्रकारांना 'खोजे' होण्याचा अधिकार नसतो. हिंदुस्थान एक प्रतिष्ठीत दैनिक आहे. सर्व वृत्तपत्रांचे नेतृत्व करणारा वरिष्ठ हिंदुस्थान स्वातंत्र्यपूर्व काळापासून अपप्रवृतीशी लढत आला आहे. विलास मराठे एक उत्साही, खेळकर सदा हसतमुख पत्रकार या वृत्तपत्राचा एक घटक आहे. केंद्रीय ह्कश्राव्य विभागात मानाचं पद त्यांच्याकडे आहे, अंबा फेस्टिवलचे ते कोषाध्यक्ष आहेत आणि म्हण्ाून त्यांच्याकडून निर्भिड, निपक्ष, निर्भीकतेसह सर्वांना सोबत घेऊन अन्याया विरूध्द लढण्याची अपेक्षाही आहेत. त्या अपेक्षाभंगातून झालेले आरोप एव्हढे मनाला लावून घ्यायचे असतात का? आपली प्रतिष्ठा तोलण्याचे काम माणसाने किमान कायद्याच्या सुपूर्द करावयाचे नसते. आपणच आपले मोजमाप करावयास हवे. अविनाश दुधेचेही चुकलेच की स्वत:च्या नावाने मेल करून सुचवायचे होते ना सारे काही ...! असो विलासभाऊ उद्यापासून मट्नयाचा आकडा न छापण्याचा 'प्रबंध' करता ना...? बरं दिसत नाही ते हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला.
- दिलीप एडतकर
अमरावती.  मो. 9422855493

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2011 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

     मुंबई राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2011 या  वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 30 एप्रिल 2012 असा राहील.
     2011 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळांवरही उपलब्ध आहेत. पुरस्कारांची माहिती पुढीलप्रमाणे.
     राज्यस्तर (मराठी) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र, राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा. व ज.) 41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
विभागीय पुरस्कार
     नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये 10 हजार, दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत); औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोकण विभाग: शि.म.परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोल्हापूर विभाग : ग.गो.जाधव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; नागपूर विभाग: ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
                                                                           
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ...... नियम व अटी
     पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल.
     मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल.
     या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत.
     पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
     पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
     पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
     अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
     मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.
ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई (कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येईल.        
     गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील.
                                                         
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ......            
शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.
2011 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेवर राज्यस्तर/विभागीयस्तर तसेच प्रवेशिका कोणत्या भाषेकरिता आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. आपण पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल.
प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.

इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो.
ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.
पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत.
वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
     प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी, कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6 आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
                                                                                                                                                         

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ......   छायाचित्रकार पुरस्कार
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे.
केकी मूस  उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे.
2011 च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2011 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो  प्रत नसावी.
पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.
एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जांचे नमुने माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या http://dgipr.maharashtra.gov.in तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावती संचालक, औरंगाबाद, महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त विभाग, माहिती जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालयमुंबई-32 येथे उपलब्ध आहेत.
     या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.


सोमवार, २६ मार्च, २०१२

दिव्य मराठीने केली म.टा.ची कॉपी

औरंगाबाद - म.टा.च्या पतंग महोत्सवाची कॉपी करून, उताणे पडलेल्या दिव्य मराठीने पुन्हा एकदा म.टा.च्या एका सदराची कॉपी केली आहे.
म.टा.च्या रविवारच्या संवाद पुरवणीत गेल्या दोन वर्षापासून राहून गेलेल्या गोष्टी हे सदर चालू होते.वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या आयुष्यात राहून गेलेल्या गोष्टी त्या येत होत्या.
या सदराचे दिव्य मराठीने अनुकरण केले आहे.सदराचे नाव दिले आहे-रूखरूख....हे सदर काल दि.२६ मार्च रोजी दिव्य मराठीच्या दिव्य सिटीत पान एक वर प्रसिध्द झाले.त्यात रा.रं.बोराडे यांची रूखरूख वाचायला मिळाली.
म.टा.च्या सदराची कॉपी करून दिव्य मराठीने यातून वेगळे काय साधले?

रविवार, २५ मार्च, २०१२

चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर

औरंगाबाद - यंदाचे राज्यस्तरीय चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्कच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.
अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्क, ओम ह्युमन रिसोर्स डे व्हलपमेंट अकादमीच्या वतीने दरवर्षी बिट जर्ना लिझममध्ये विशेष कामगिरी करणाèयांना चौथास्तंभ पु रस्कार देऊन गौरविण्यात येते. अप्रतिम मीडिया व एमजीएम जर्नालिझम कॉलेजच्या सहकार्याने पुणे येथे वितरण सोहळा होणार आहे. पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे - योगेश त्रिवेदी, सामना, मुंबई (मंत्रालय), खंडूराज गायकवाड, मुक्त पत्रकार, मुंबई (विधीमंडळ), संजय जाधव, लोकमत, पै ठण (पर्यावरण), विशालqसग करकोटक, दैनिक भास्कर, पैठण (गुन्हेगारी), अविशांत कुमकर, लोकमत, आष्टी (सामाजिक), विलास देशमुख, लोकमत, अकोला (पर्यावरण), दीपक नागरे , देशदूत, रावेर (आरोग्य), प्रशां त गौतम, सामना, औरंगाबाद (साहित्य), सचिन गोर्ड े पाटील, लोकमत, पुणे (शिक्षण), अद्वैत मे हता, आयबीएन-लोकमत, पुणे (राजकीय स्टोरी), धनंजय जाधव, महाराष्ट्र टाईम्स, पुणे (सामाजिक), राम शेवडीकर, उद्याचा मराठवाडा, नांदेड (दिवाळी अंक), राजू निकम, महाराष्ट्र मीडिया, पुणे (जनसंपर्क), सूर्यकांत नेटके, सकाळ, नगर (सामाजिक), अभिजीत सोनावणे , स्टार माझा, शिर्डी (कला-संस्कृती स्टोरी), हरिहर धूतमल, लोकसत्ता, कंधार (मानवी), निलेश पोटे , लोकमत, अकोट (शिक्षण), शंकर बावस्कर, माहिती अधिकारी, औरंगाबाद
(शासकीय कार्यक्रम वृत्त), रवि गाडेकर, लोकमत, औरंगाबाद (स्त्री भ्रूण हत्या), संजय नलावडे , सकाळ, सातारा (मनोरंजन), हेमंत पवार, सकाळ, कराड (कृषी), बालाजी मारगुडे , लोकमत, बीड (सहकार), मनिषा इंगळे , नगर (रेडिओ जॉकी
,redio dhamaal ), प्रीती सोमपुरा, टिव्ही९, मुंबई(स्पेशल स्टो रीज), अनिल भापकर, लोकमत, औरंगाबाद (तंत्र), आनंद कसंबे, दूरदर्शन, यवतमाळ (स्पेशल स्टोरीज), राजकुमार जोंधळे, सोलापूर तरुण भारत (धार्मिक-सामाजिक), अनिल पांडे , मुक्त पत्रकार, श्रीरामपूर (सामाजिक), राजेश शर्मा, दिव्य मराठी, औरंगाबाद(क्रीडा), अभय निकाळजे, सकाळ, औरंगाबाद(राजकीय), प्रविण ब्रह्मपुरीकर, ई टिव्ही, औरंगाबाद (शैक्षणिक स्टोरी), डॉ. आनंद कुलकर्णी, मासिक आरोग्यतंत्र, सातारा (सातारा), दिलीप वळसे, पुढारी, सणसवाडी, पुणे (कामगार वृत्त), अतुल पांडे , सकाळ, नागपूर (राजकीय), चंदुलाल शहा, संपादक- भ्रमर, नाशिक, रफिक पठाण, शिरूर-कासार (छायाचित्रकार), फईम खान, लोकमत समाचार, गडचिरोली (गुन्हेगारी).

शनिवार, २४ मार्च, २०१२

शेठजी-भटजींनी घेतला अविनाश दुधेंचा बळी ...

थोरले दर्डा शेठजी आणि अमरावतीतील काही ब्राह्मण पत्रकारांनी एकत्र येऊन सुनियोजितपणे अविनाश दुधे यांचा बळी घेतल्याची बाब आता समोर आली आहे. बहुजन समाजातील ताकदीने लिखाण करणारया पत्रकारांना याअगोदरही अशाच प्रकारे संपविण्यात आले आहे. 'चित्रलेखा' सारख्या महाराष्ट्रातील क्रमांक एकाच्या साप्ताहिकाचे विदर्भ ब्युरो चीफ असलेल्या आणि तिथे कायमस्वरूपी नोकरीत असलेल्या  अविनाश दुधेंना स्वत: विजय दर्डा यांनी 'लोकमत' मध्ये आणले होते. तेव्हा चित्रलेखाचा राजीनामा  दुधेंनी पाठविला तेव्हा चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महारावांनी  त्यांना सावध केले होते ' लोकमत मध्ये जाता खरे, पण एक दिवस तुम्हाला याचा पश्चाताप होईल.' महारावांचे तेव्हाचे शब्द आज खरे ठरले. २००१ मध्ये अविनाश दुधे लोकमतला रुजू झाले तेव्हापासून यवतमाळ, अमरावती, अकोला  येथे काम करताना दुधे यांनी अनेक वेगवेगळे विषय हाताळून विदर्भाच्या पत्रकारितेत स्वतःचे असे एक स्थान तयार केले . पुरोगामी विचार, वेगवेगळ्या चळवळीना  ताकद देण्याची त्यांची भूमिका, अतिशय परखड लिखाण आणि सोप्या लेखनशैलीमुळे विदर्भात त्यांनी स्वतःचा वाचकवर्ग तयार केला. अमरावतीतील त्यांची कारकीर्द विशेष गाजली . येथे त्यांचे 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वाच' ही पुस्तक प्रकाशित झाली . 'मीडिया वाच' नावाचा दर रविवारी प्रकाशित होणारा त्यांचा कालम अतिशय वाचकप्रिय होता. दुधेंच्या या लिखाणाचा लोकमत ला भरपूर फायदा झाला . कधी नव्हे ती विश्वासाहर्ता त्यांनी मिळाली. अनेक चळवळीतील कार्यकर्ते दुधेंमुळे  लोकमतला आपल दैनिक मानायला लागले . मात्र दर्डा शेठ च पोट इथेच दुखायला लागलं' आपला माणूस एवढा लोकप्रिय होतो म्हणजे  काय, लोकमत च्या प्रथेप्रमाणे त्यांनी दुधेंचे पंख छाटण्याची  तयारी सुरु केली .  त्यांना अकोला येथे बढती देऊन संपादकीय प्रमुख म्हणून पाठविण्यात आले. म्हणायला बढती होती पण खर कारण वेगळंच होत. इंडिया बुल या कंपनीच्या अमरावतीत होऊ घातलेल्या वीज प्रकल्पाविरुद्ध दुधे यांनी अतिशय ताकतीने जनजागरण चालविले होते, बी टी देशमुख, बच्चू कडू, प्रभाकरराव देशमुख या सारख्या सचोटीच्या माणसांना दुधे ताकद देत होते. हेच दर्डा सेठला नको होते . त्यामुळे बढती दिल्याच कारण समोर करून त्यंना अमरावतीतून हलविल . यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षि मारले. अविनाश दुधे ला तिथे पाठविताना गजानन जानभोर या बहुजन समाजातील दुसऱ्या पत्रकाराला हतोत्साहित करण्यात आले होते . 
     दुधेविरुद्ध आता दाखल झालेला सायबर गुन्हा  हा  इंडिया बुल कंपनीविरुद्ध त्यांनी जो लढा दिला त्याच्याशी निगडीत आहे. जेव्हा दुधे अमरावतीतील वीज प्रकल्पाविरुद्ध जोरकसपणे लिखाण करत होते तेव्हा विजय दर्डा यांचे अमरावतीतील खासमखास मानले जाणारे हिंदुस्तान या दैनिकाचे प्रबंध संपादक विलास मराठे यांनी दुधे यांच्याशी संपर्क करून तुमचे लेख मला द्या. मला पुस्तिका काढायची आहे . कंपनीविरुद्ध जनजागरण करायचे आहे, असे सांगितले .दुधेंनी त्यांना लेख दिले. मराठे आणि त्यांचा मित्र पप्पू पाटील यांनी इंडिया बुल विरुद्ध विदिओ रथ ही काढला . कालांतराने या दोघांची ही धडपड पैशे खाण्यासाठी होती हे संपूर्ण अमरावती च्या लक्षात आले. मराठेंनी 'अंबा महोत्सव'  या नवरात्रीतील उत्सवासाठी  इंडिया बुल कडून १० लाख रुपये  घेतल्याचे आता कंपनी ही सांगत आहे आणि ते स्वतः ही कबुली देत आहे. या प्रकाराने अविनाश दुधे संतापले . या प्रकरणात आपला वापर झाला आहे असे त्यांना वाटले त्यामुळे त्यांनी मराठेंना खालील मजकुराचे दोन मेल पाठविले 
 1.Priy Bhave Saheb


Tumi jya Vilas Marathe chya karyakramala yeun tyach koutuk kel to
India Bull aani Sophia Company cha Dalal aahe. Tyane Hindustan sathi
tasech Amba Festival sathi Sophia walyankadun paise ghetale. ha
aani yacha param mitra Pappu patil yanni aadhi India Bull viruddha
mohim ughadali. nantar tyanchyakadunach paise khawun mokale zale.
Delhi, Mumbait ha Dalaliche Dhande karatho.  Balasaheb Marathe

 Arun Marathechya nawala ha batta aahe. asha charitryhin manasala
takad dewu naka. tumala sawistar patra pathwun yache khare swarup aami
kalawu.
Activist

2.Ka re India Bull ke Dalal? tuze karname Arvind Inamdar aani Kiranaani
Thakur paryant hi Pohachale. Bhavenni aaj Mail pahala asel. Marathe
chya paramparela jap .bhadavegiri band kar.

Activist

हे मेल पाठवितांना दुधेंची चूक एवढीच झाली कि त्यांनी दुसऱ्या ई- मेल अड्द्रेस वरून हे  मेल पाठविले . मराठे हे दर्डा चे खास असल्याने त्यांनी हा प्रकार केला . मराठेंना आपली चूक कळावी एवढाच हेतू त्यात होता. मात्र या शुल्लक चुकीसाठी अविनाश दुधेंना आता आयुष्यातून उठविण्याची तयारी सुरु आहे. आपल्या मुलाच्या तब्यतीची काळजी घेता यावी यासाठी दुधेंनी पुन्हा अमरावती येथे बदली मिळावी अशी विनंती लोकमत व्यावास्थ्पानाला केली होती. याची माहिती मिळताच मराठेंनी विजय दर्डा यांची भेट घेवून या प्रकारची माहिती त्यांना दिली . सोबतच भरपूर खोटीनाटी माहिती त्यांच्या डोक्यात भरण्यात आली. काही महिन्यापूर्वी विदर्भातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे याचा सत्कार सोहळा अविनाश दुधेंनी पुढाकार घेवून आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात  आयुष्यभर समाजासाठी झिजलेल्या वानखडे ना विदर्भातील कार्यकर्त्यांनी ११ लाख रुपयाची थैली दिली होती. मात्र समाजाकडून केवळ घेणाऱ्या दर्डा शेठला  अविनाश दुधेंनी लोकमत चा वापर करून या कार्यक्रमासाठी पैशे जमविले असे सांगण्यात आले. हलक्या कानाच्या शेठजींनी त्यावर विश्वास टाकला. त्यानंतर सुरु झाले सूड सत्र . दर्डा शेठनी  मेल प्रकरणी एक महिन्यानंतर  पोलिसात तक्रार करायला सांगितले. त्यानंतर अविनाश दुधेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर भरपूर दबाब आणण्यात आला. त्यासाठी लोकमत चे समूह संपादक दिनकर रायकर यांना कमी लावण्यात आले. शेवटी दर्डांच्या दबाबामुळे काहीही दम नसलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सायबर कायद्यांतर्गत दुधेविरूध गुन्हे नोंदविले. 
  हे प्रकरण इथेच थांबले नाही. अविनाश दुधे यांच्या बद्दल असूया बाळगून असलेले अमरावतीचे ब्राह्मण पत्रकार प्रदीप देशपांडे आणि शिवराय कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या स्थानिक वर्तमानपत्रात दुधे यांच्या विरुद्ध  बातम्या छापून आणल्या. हे करताना दुधेंनी मेल काय पाठविले होते हे मात्र सोयीने लपविले. दिलीप एडतकर आणि अनिल अग्रवाल या संपादकांनी खरा प्रकार उघडकीस आणल्याने विलास मराठे आता तोंड लपवित  फिरत आहे.  या सगळ्या प्रकरणात ब्राह्मण पत्रकार लाबी करून कसे बहुजन समाजातील माणसाची बदनामी करतात हे विदर्भाला पहावयास मिळाले. देशपांडे आणि कुलकर्णी हे खुलेआमपणे इंडिया बुल ला विकले गेलेले पत्रकार आहेत. त्यांनी या प्रकरणात अतिशय खालचा स्तर गाठला . दुधेंना पत्रकारितेतील  योगदानाबद्दल काही दिवान्सापुर्वीच  चिंतामणराव मारपकवार पुरस्कार जाहीर झाला . या जळकुट्या पत्रकारांनी प्रफुल मारपकवार यांना संपर्क करून दुधे यांना दिलेला पुरस्कार मागे घ्या अशी मागणी केली. या दोघांनी सर्व वर्तमानपत्रांच्या  संपादकांनाही बातम्याची कात्रण पाठवली. दुधे अमरावतीत राहले तर आपले दुकान बंद होतात शिवाय आपल्याला कोणी विचारात नाही या पोटदुखीतून दुधे ला आता अमरावतीत उभेच होऊ द्यायचे नाही असे त्यांनी ठरविले आहे. या प्रकरणात विलास मराठे ने मात्र आपल्या 'हिंदुस्तान' मध्ये एकही  ओळ छापली नाही याची जोरात चर्चा आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा उबग येवून अविनाश दुधे यांनी मंगळवारी लोकमत ला सोड चिट्ठी दिली . या प्रकरणातून सर्व बहुजन पत्रकार  विशेषता जे भूमिका घेवून पत्रकारिता  करतात अशांनी सावध होण्याची गरज आहे. शेठजी - भटजी युती दुधे यांच्या प्रमाणे तुम्हालाही आयुष्यातून उठवू शकते. तेव्हा सावधान व्हा . आणि वेळीच आपला मार्ग ठरवा...


ताजा कलम : सगळेच ब्राम्हण तसे नाहीत...त्यामुळे अन्य ब्राम्हणांनी स्वत:ला वाईट वाटून घेवू नये...संत ज्ञानेश्वर ब्राम्हण असताना, ब्राम्हणाकडूनच त्यांना त्रास झाला.दुधे तर बहुजन समाजाचे आहेत...त्यांना काही ब्राम्हणाकडून त्रास झाला, म्हणून जे घडले,ते सडेतोड दिले...

जिस गांव में उगता हैं; वहां बेचते नही...

एक गंमत पाहा ... इशू सिंधू हा जळगावातील जबरदस्त पोलीस अधिकारी .. त्याने सुरेश जैन यांच्या मुसक्या आवळल्या. जळगाव शहरातील त्यांची दादागिरी संपुष्टात आणली. टाईम्स ऑफ इंडियानेही लेख लिहून या कामगिरीला सलाम केला. या अधिकारयाला खरे बळ दिले ते 'दिव्य मराठी'ने. इशू सिंधू, घरकुल घोटाळा  पावल्याने जळगावात 'दिव्य' घडले; 10 हजाराने सर्क्युलेशन वाढून पेपरचा खप ५० हजारावर पोहोचला. मात्र, गुढीपाडव्याला गंमत झाली. इशू सिंधू यांची संघर्षातून विजयाची कथा औरंगाबाद 'दिव्य मराठी'त पहिल्या पानावर ठळकपणे छापून आली. जळगावात मात्र त्याचा पत्ताच नाही. कोण कुणाला MANAGE  झाले ते देवालाच ठावूक; पण हा चमत्कार झालाय. ज्या शहराची बातमी त्या शहरालाच नाही. शिवाय गेला आठवडाभरात तीन वेळा संपादक आणखी एका ज्येष्ठ पत्रकाराला घेउन जैन हिल्सची पायरी चढून आले. नंबर एक पेपरचा संपादक कशाला जैनांच्या पायरया झिजवतोय? इथे काही 'पुण्यनगरी'सारखी पेड न्यूज, जाहिराती गोळा करण्याची सक्ती नाही. दिमतीला  इतके वार्ताहर आहेत, त्यांना पाठवावे फिल्डवर; स्वत: का उंबरे झिझवावेत?  असेही कळतेय की, भंवरलाल आणि अशोक जैन वैगेरे १२-१५ जणांविरुद्ध कोर्टाने बळजबरीने जमीन बळकावल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. हीही बातमी 'दिव्य मराठी' ने दाबली. एमजे कॉलेजने विनापरवानगी मजले चढविले. ज्या इमारतीला महापालिकेने परवानगी दिलेली नाही, बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला दिलेला नाही; अशा बेकायदेशीर इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती करताहेत. हीही बातमी 'दिव्य'च्या एका वार्ताहराने दिली होती. तीही दाबली गेली. आश्चर्य म्हणजे ही बातमी दाबणारया चीफ रिपोर्टरच्या मुलाला एमजे कॉलेजच्याच नर्सरीत फुकटात, डोनेशन न घेता प्रवेश दिला गेला. तोही नेमका याच काळात. बातमी आलीच नाही; मुलाचा फुकटात प्रवेश झाला. किती अजब योगायोग? बरे एव्हढे सारे करून पूर्ण पान जाहिरात एमजेवाल्यांनी दिली ती 'लोकमत'ला! सांगा ही कुठली नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारिता? ही तर 'पुण्यनगरी'छाप पत्रकारिता सुरु आहे. त्यामुळेच पुण्याहून, मुंबईहून आलेल्या अनेक चांगल्या माणसांचा 'दिव्य जळगाव'मध्ये दम घुटतोय. हे जे सारे काही 'पुण्यनगरी'छाप चाललेय त्या चीप गोष्टींना या मंडळीचा विरोध आहे; पण त्यांना मोजतोय कोण?  जळगावात सारे काही 'दिव्य'सुरु आहे हेच खरे!

फेसबुक वर शेअर करा

Facebook