> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २६ एप्रिल, २०१२

पुण्यातील पत्रकारांनी खायचे कुठे? घ्यायचे किती?

पुणे महानगर पालिका शिक्षण मंडळाच्या सदस्य निवडणुकांमुळे पुण्यातील खादाड पत्रकारांची गोची झाली आहे. जुने सदस्य मंडळातील एकही सदस्य यात नसण्याची श्यक्यता निर्माण झाल्याने पाकिटे बंद होण्याच्या भीतीने जुन्या सदस्यांना घेऊन बसण्याची वेळ या पत्रकारांवर आली आहे.
शिक्षण मंडळ बजेट आणि टेंडर यांमुळे गाजत असते. त्यात अध्यक्ष्य पदाच्या वादा वरून  भरपूर गाजले होते. अर्थात याची ठिणगीही पत्रकारांनीच लावली होती. दोन वर्ष्या पूर्वी अध्याक्ष्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला होता. पोलिसांनी संशयाचे बोट या अध्याक्ष्यांकडे दाखवले होती तशी  चौकशीही झाली होती. ह्या बातम्या येऊ नये म्हणून सदस्यांनी रीतसर  पत्रकारांना शांत केले होते. यात सकाळ आणि लोकमतचे पत्रकार अग्रभागी होते. टेंडर प्रकरणात देखील सदस्यांबरोबरच पत्रकारांचा देखील वाट दरवर्षी ठरलेला असतो. हा वाटा कसा कुठे पत्रकारांना  पोहोचवायचा याचा ठेका हे दोन पत्रकार घेत असतात. दिवाळीत टेंडर घेणारे पत्रकारांना कपडे , सोन्याची अंगठी देत असतात. पण पत्रकारांची भूक यामध्ये भागत नाही. यंदा नवीनच सदस्य निमणूक होणार आल्याने आणि आपली मंडळी नसल्याने पत्रकारांवर शिक्षण मंडळातून नारळ मिळणार असल्याचे स्पष्ठ झाले आहे. त्यासाठी हे पत्रकार  महाशय जुन्या सदस्यांना घेऊन आठवड्यातून एकदा बसत आहेत. नुकत्याच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या यात मंडळात  सदस्य असलेल्या अनेकांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांची प्रसद्धि देण्याचे काम पुण्यातील सर्वच पत्रकारांनी केले. त्याआधी शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना  टाब वाटले सगळे चायना मेड होते. या पत्रकारांनी यातही आपला हात धुवून घेतला. माजी अतिरिक्त आयुक्त देवणीकर यांना बदनामी नको असल्यास ५ लाख द्या अशी मागणीही या पत्रकारांनी केली होती. शिक्षण मंडळाच्या कामात देवानिका हे लक्ष घालत असत. त्यांची बदली झाल्यावर सकाळचे पत्रकार त्यांच्याकडे गेले तुम्ही किती टक्केवारी घेतलीत हे विजय खराडे याने सांगितले आहे. तुम्ही १५ लाख द्या अशी मागणी केली. देवणीकर यांनी हे ५ लाखात मिटवले.  सध्या हे सगळे बंद होणार असल्यान हे पत्रकार आपली शिफारस नव्या सदस्यांना करून द्या म्हणून त्यांना पार्ट्या देत आहेत. पार्ट्यांची ठिकाण तरंग बार, बांबू हाउस या ठिकाणी हे सदस्य आणि खादाड पत्रकार दिसतात.

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

अमित पवारची फेसबुकवरची अस्वस्थ करणारी पोस्ट....

(बाळासाहेबांच्या 'सामना'त किती खदखद आहे, कर्मचारी असुरक्षित आहे; चांगल्या माणसांचा कसा गेम होतो त्याचे अनेक किस्से आहेत..  आई-बापाविना पोरक्या, अनाथ असलेल्या, मुंबापुरीत एकट्याच राहणारया अमित पवारसारख्या संवेदनशील माणसाचेही या निर्ढावलेल्या मंडळीनी अतोनात मानसिक छळ केला. तिथली सारी व्यवस्था ही सरकारी कार्यालयात जशी दलालांच्या ताब्यात असते तशी काही बाटग्यांच्या ताब्यात आहे. हे बाटगे शिवसेनेच्याच कार्यकर्ते, पदाधिकारयांकडून फोटो लावण्याचे 500 -500 रुपये वसूल करतात. खासदार संपादकांचेही या बाटग्यांना आता भय उरलेले नाही. किंवा मग खासदार संपादक हे सारे माहिती असूनही खपवून घेत आहेत. का? कशासाठी? एका अनाथ पोरालाही त्यांनी न्याय देवू नये, त्याचा खुश्शाल गेम होवू द्यावा? दुसरीकडे मराठी कुटुंबांना घर मिळवून देण्याच्या नावाखाली १५-२० लाखांना फसविणारा एखादा निर्ढावलेला म्हाडातील दलाल गांडीवर लाथ मारून हाकलून दिल्यानंतर पुन्हा मागल्या दाराने संस्थेच्या सेवेत घेतला जातो. का? त्याच्या दुकानदारीतून या बाटग्यांना मलिदा लातायाचाय म्हणून? अरे मग कशाला मराठी माणसाच्या नावावर राजकारण करतात? मराठी माणसांना फसविणारा एकदा हाकलून दिल्यावर 'सामना'ची पायरी पुन्हा चढण्याची हिम्मत कशी करू शकतो? बरे त्याला जर खासदार संपादकांनी हाकलून दिले आहेत तर खालचा हिंदीतील संपादक पुन्हा अशा लफडेबाजाला कसा सेवेत घेतो? याचा अर्थ तो वरच्या खासदार संपादकाला जुमानत नाही, कोलतो... 'सामना'मधील वरच्या मजल्याचा दबदबा तर संपला नाही ना? खालचे यूपी-बिहारवाले भय्या वरचढ होवू लागलेत का? बाळासाहेब आता तुम्हीच बघा... )

अमित पवारची फेसबुकवरची अस्वस्थ करणारी पोस्ट....

एका 'सामना'वीराचे पत्र ....

समस्त सामनावीरांना,
साष्टांग नमस्कार!

हिंदू पंचांग शास्त्रानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडवा हे नववर्ष वृत्तवाहिन्यांनी जल्लोषात साजरे केले. आणि माझ्यासमोर ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांच्या एका वृत्तपत्रातील साडेतीन वर्षांचा धगधगता इतिहास नजरेसमोरून तरारून गेला. आणि माझ्यातील रिकामटेकडा साहित्यिक जागा झाला (साहित्यिक रिकामटेकडेच असतात असे त्या वृत्तपत्रातील एका सहृदयी आणि आदरणीय सह-संपादकांनीच मला सांगितले) त्या कालावधीत वृत्तपत्रातील अनेक स्थित्यांतरे पाहण्याचे भाग्य मला लाभले. या वृत्तपत्रातील मुख्य-उपसंपादकांच्या खुर्चीचा महिमा अगाध आहे. देशाच्या राजकारणात उत्तरप्रदेशच्या सत्ताकारणाला जेवढे महत्व नसेल तेवढे या खुर्चीला आहे.

सध्या या तख्तावर नागोठण्यातील एका 'प्रवाळा'ची नाईलाजास्तव (किंवा चलाख राजकीय खेळी म्हणून )प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अधिक सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा प्रवाळ म्हणजे कीटकजन्य तांबूस रंगाचा 'खडक' (मंगळ हादेखील तांबूस रंगाचाच असतो). तर सांगायचे तात्पर्य असे कि या महाशयांना आपल्या कर्तुत्त्वाचा प्रचंड अभिमान.

प्रतिकूल परिस्थितीचा 'सामना' करीत सागरापासून सुरु झालेल्या आपल्या खडतर प्रवासाचे रसभरीत किस्से (वाचकांनी स्वा. सावरकरांना अंदामानास नेतेवेळी घडलेला सागर प्रवास हा संदर्भ जोडल्यास त्यांच्या कर्तुत्त्वाची महती समजेल) ते नेहमी आपल्या अनुयायांना सांगत असतात. हे महाशय इतके लवचिक आहेत कि राहुल बाबांचे जोडे उचलणारे महाराष्ट्रातील मंत्री रमेश बागवे हेदेखील त्यांच्यापुढे खुजे वाटावेत. या त्यांच्या 'सद' गुणांमुळेच ते इथवर पोचले असावेत. असो ! दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांनी पत्रकारिता कशी असावी हे सांगितले. हाडाचा पत्रकार कसा असावा हे सर्वचजण सांगतात. मात्र बातमीदारी कशी करू नये याचे धडे हे महाशय आपल्या समर्थकांना देत असतात. यातच त्यांचे मोठेपण सामावले आहे. आपणच त्रिकालवेधी आहोत असा यांचा (गैर) समज. एखाद्या प्रामाणिक बातमीदाराच्या बातमीचा गळा घोटून त्या बातमीदाराला कसे गुदमरून सोडावे हे कसब त्यांच्याकडून शिकावे. हे महाशय आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यात डॉक्टर गोबेल्सला देखील लाजवेल अशा प्रचार तंत्राचा वापर करतात. बातमीदारी कशी असू नये हे ज्याला शिकायचे असेल त्याने हे सर्व 'गुण' आत्मसात करावेत. माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला त्यांच्याकडून लिहिण्याची प्रेरणा मिळाली याबद्दल त्यांचे शतशः आभार.

माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा समस्त सामनावीर आदर बाळगतील अशी आशा व्यक्त करतो. (पत्रकारितेच्या भ्रामक कल्पनांनी भारावून जाऊन या देशात प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे, असे मी बाळशास्त्री जांभेकरांच्या बाण्यात म्हंटले होते. त्यावेळी एका उपेक्षित आणि दुर्लक्षित (त्यांच्याच भाषेत सांगायचे झाल्यास ) आदरणीय विभाग प्रमुखांनी मला बाळासाहेबांच्या आवेशात ,'ते कार्यालयाच्या बाहेर' असे ठणकावून सांगितले होते हुकुमशाही राजवटीत अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्य मानणाऱ्या 'बंडखोरां'ची मुस्कटदाबी कशी होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्याक्षणी मला आला). शेवटी व्होलतेअरचे वाक्य उदधृत करून मी माझा पत्र प्रपंच येथेच संपवितो...

मी तुझ्या प्रत्येक मताशी असहमत आहे. तरीदेखील तुझ्या मताचे आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता मी माझ्या प्राणांची बाजी लावीन.

लोभ असावा,
आपला नम्र
बोरुबहाद्दर

सुवर्णा दुसाने - जगदाळे यांना वरुणराज भिडे आश्वासक पत्रकारिता पुरस्कार

पुण्यातील पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारा प्रतिष्ठेचा  ‘आश्वासक पत्रकारिता पुरस्कार’ यंदा  'आयबीएन-लोकमत'च्या मुंबईतील रिपोर्टर सुवर्णा दुसाने - जगदाळे (9930360544 ) यांना जाहीर झाला आहे. त्यांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन!!मुंबईचे नूतन  महापौर सुनील प्रभू यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बायकोच्या नावावर असलेल्या कांदिवलीतील घराचा तपशील दडपला होता. सुवर्णा दुसाने यांनी ही लबाडी पुराव्यांसकट चव्हाट्यावर आणली होती. त्यांना आमिषे, प्रलोभने दाखविली गेली. वरिष्ठ पातळीवरून अगदी शिवसेना कार्यप्रमुखांच्या पातळीवरून दबाव येवूनही त्या मागे हटल्या नाहीत.


खानदेशातील, जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यासारख्या लहानशा गावातून (अर्थात झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचे हे माहेर!) मुंबईत येवून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटविणारया सुवर्णा दुसाने-जगदाळे यांची कामगिरी त्यामुळेच कौतुकास्पद ठरते..

मंगळवार, २४ एप्रिल, २०१२

अमरावतीतली पत्रकारिता

20 ऑक्टोबर 2006 ते 4 डिसेंबर 2007 या जवळपास सव्वा वर्षाच्या काळात मी अमरावतीत पत्रकारिता केली. हैदराबादहून माझी इथं रिपोर्टर आणि ब्युरो चीफ या पदावर बदली ( बदली म्हणजे शिक्षा नव्हे ) करण्यात आली. हैदराबादून फिल्डवर येण्यासाठी मोठं लॉबिंग करावं लागायचं, तसंच कोणत्यातरी गटाचा कपाळावर ( कुंकू नव्हे ) शिक्का मारावा लागायचा. मात्र या पैकी कोणताही प्रयत्न न करता माझी अमरावतीसाठी निवड झाली होती. याचा माझ्यासह अनेकांना धक्का बसला होता. अर्थात कोणतंही राजकारण न करता, बदल घडवता येतात, हे यातून तेव्हा दिसून आलं. एक प्रकारे डेस्कवर कोणत्याही राजकारणात न राहता अलिप्त राष्ट्रांप्रमाणे आगेकूच करणा-या विचारसरणीचा तो विजय. आता तुम्ही म्हणाल साधी बदली पण काय कौतुक ? आता आपलं कौतुक आपणच करण्याचे हे दिवस आहेत. त्याला काय करणार ?

उर्वरित लेख वाचण्यासाठी क्लीक करा...

अमरावतीतली पत्रकारिता 

'दिव्य मराठी'ने तोडले अकलेचे तारे ...

वृत्तपत्रे नगरपालिका, महानगरपालिका यांचे पैसे वाचवू शकतात का? कुणी एखाद्या वार्ताहराने असा दावा केला तर कुणी विश्वास ठेवेल का? मुळीच नाही; उलट अशा वार्ताहराला वेड्यात काढले जाईल. त्याचे डोके फिरलेय म्हणून इतर रिपोर्टर त्याला टाळू लागतील. पण असा चमत्कार झालाय खरा. गुणवत्ता, वेगळेपणाच्या गप्पा हाणणारया 'दिव्या मराठी'ने असा 'न भूतो न भविष्यति' चमत्कार धुळ्यात घडवून आणला.
दिव्य मराठीने वाचवले मनपाचे 30 लाख रुपये

ही बातमी जरूर वाचा... ही बातमी वाचून हसावे की रडावे हे वाचकांना कळले नाही; तुम्हालाही कळणार नाही.. मात्र माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्याकडून छोटा संगणक पटकावणारा आणि एका गुन्ह्यात आरोपी असलेला लफडेबाज वार्ताहरच कानामागून आला आणि तिखट झाला. त्याच्या स्वत:च्या कॉपीमुळे जळगावात ब्युरो चीफ हैराण झाले आहेत. आणि हे महाशय मराठवाड्यातील वार्ताहरांना पत्रकारिता शिकवायला पाठविले गेले. अरे बाबा तू काय शिकविणार आम्हा मराठवाड्यातील मंडळींना.... घाम गाळून, बारा गावाचे पाणी पिवून तयार झालोत आम्ही... रात्री दहा वाजता गोधडीत गुंडाळून घेवून झोपत नाही आम्ही..

या महाशयांनी तोडलेले आणखी काही अकलेचे तारे पाहा...
पांझरेतील कचरा गोळा करून विद्यार्थी सेनेने केली होळी
 सेनेचा पाठपुरावा - ‘दिव्य मराठी’ च्या अभियानातून पांझरा प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
म्हणे एका वृत्तापात्रामुळे दोन कोटी तरतूद झाली. अभियान चांगले आहे, त्याबद्दल शंकाच नाही. त्याबद्दल 'दिव्य मराठी'चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांचे अभिनंदन! निसर्ग, पर्यावरण, वन्यजीवन याबद्दल त्यांना मोठी आस्था आहे. मध्यप्रदेशात ते अनेक सरकारी कमिट्यावर आहेत. त्यांच्या शब्दाला सरकारदरबारी मोठे वजन आहे. जिथे 'भास्कर'चे प्रचंड प्राबल्य वर्षानुवर्षे आहे; त्या मध्यप्रदेशात कधी असा चमत्कार घडलेला नाही. मग तो धुळ्यात कसा घडला. वाचकांना अक्षरश: वेड्यात काढले गेले. वृत्तपत्रे सांगतील आणि तरतुदी होतील तर मग स्थानिक स्वराज्य संस्था हव्यातच कशाला? 'दिव्य मराठी'च्या वार्ताहरानाच जागोजागी पालिका ध्यक्ष, महापौर, आयुक्त करूयात की.. म्हणजे भ्रष्टाचारालाही सुट्टी! नाही म्हणायला उत्तरेत ट्रीप काढायला, मौजमस्ती करायला रोहिदास दाजी वैगेरेकडून वर्षाला एखादवेळी 'बक्षिसी' घेतली तर हरकत नाही. (दिवाळीत नाही का दारोदारी फिरून पोस्टमन वसुली करतो)

कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी सांगतील असे काम होते का? तरतुदी अंदाजपत्रकात महिने-दोन महिने आधीच केल्या गेलेल्या असतात. सेटिंग मधून एखादा पदाधिकारी देतो कोट. त्याच्या काय बापाचे जाते. पेपरमुळे केली दोन कोटींची तरतूद सांगायला. संपादकांना शेंडी लावू शकतात असे वार्ताहर पण वाचकांना वेड्यात नाही काढू शकत. पर्यायाने होते काय? वृत्तपत्राचे हसू!! धुळ्यात 'दिव्य मराठी'ने किती वाचविलेत? दोन कोटी 30 लाख!! शाब्बास रे भाऊ...

सोमवार, २३ एप्रिल, २०१२

पुण्यातील, मुंबापुरीतील घडामोडी...

 • 'नवशक्ती'त तिघांच्या एन्ट्री नंतर तिघांना डच्चू; एग्रोवन, मटा, आयबीएन लोकमत, मी मराठीमार्गे सचिन परब यांचे शेपूट पकडून श्रीरंग गायकवाडही आता 'नवशक्ती'त....
  - पुण्याच्या पत्रकारितेतून थोडे बाजूला फेकले गेलेले सुकृत करंदीकर पुन्हा मुख्य प्रवाहात; 'दिव्य मराठी'साठी पुण्यात प्रमुख वार्ताहर, सोलापूरकर निवासी संपादक संजीव पिंपरकर यांनी केली मदत
  -  अलिबागच्या समुद्रकिनारी सोलापुरी संजय आवटे महाराजांचे बस्तान काही बसेना; खास खबरया रविराज कुचेकर टांग देवून पळाला. आता मित्राच्या मदतीने मुंबई 'गावकरी'तून आणलेले जबरदस्त आर्टीस्ट टीमही बाहेर पडण्याच्या मार्गावर. आवटे फक्त स्वत:चाच फायदा पाहता, इतर कर्मचारयांसाठी काही करीत नाही, ही भावना वाढीस लागली आहे. त्यातच स्वत: आवटेही परेशान आहेत. त्यांना वर्षभरात कुठलाही ठसा उमटवता आलेला नाही. सुरुवातीला भरपूर बाता मारल्या; पण रिझल्ट शून्य. कोकणात होता तो 'कृषीवल'चा दरारा घालविला. मालक जयंत पाटील तर जाम नाराज झाले आहेत. सुप्रियाताईही म्हणताहेत की 'एसेम'च बरे होते. नाशिककर बाई तर रोज संजयरावांची खरपूस हजामत करीत आहेत..
  - 'सामना'मध्ये अलीकडे छोटे सरकार उर्फ आदित्यही लक्ष घालीत असल्याने खासदार संपादकही हैराण झाले आहेत. त्यांच्या लाडक्या पाच नंबरी 'चिंदर' गावच्या 'बंदर'ने सुरुवातीला पेपरची वाट लावली; आता खासदारांचीही लावतोय. कुलगुरू हटाव प्रकरण अगदी जोरात असताना 'सामना' गप्प होता म्हणून छोटे सरकार जाम भडकले होते. आता 'छोटे'ही आपली हजामत करू लागला म्हणून खासदार संपादकांनी मग 'बंदर'ला धो-धो धुतले. तडकाफडकी विद्यापीठ प्रकारणात मालिका सुरु केली गेली. स्वत: 'बंदर' फिल्डवर उतरला. आता बोंबला! हा काय डोंबलाची बातमी लिहिणार. दहावी नापास प्रसादाची जेव्हढी कुवत तेव्हढीचा रत्नागिरीतील 'बंदर'चीही!तरीही हा बंदर दोन-दोन पोरींना घेवून मजा मारतोय.. मर्जी सांभाळेल त्याला मंत्रालय.. नवीनच जॉईन झालेला एक खानदेशी थेट बदल्यांची कामे घेवून महसूलमंत्र्यांकडे जातोय..
  - 'सकाळ'मध्ये अर्धवट बीट; जोडीला स्पर्धेत 'प्रहार'मधून आलेल्या त्याच संस्थानातील बाई यामुळे हैराण झालेले एक बाळ नुकतेच 'तरुण भारत'मधील जुने साहेब जिथे रुजू झालेत तिथे, परळात जावून आलेत.
  - मुंबईत सध्या पत्रकारितेत फेल असलेले टगे रात्री विविध वाहिन्यांवरून जानवी ओंजाळीत आपल्या तोकड्या बुद्धिमत्तेचे तारे पाजळीत असतात.

बोगस पत्रकारांना रोखण्यासाठी प्रेस कौन्सिलने पाऊले उचलावीत...देशोन्नती व्यवस्थापनाची नीच खेळी, २५० कर्मचाऱ्यांचे राजीनामे


अकोला - कर्मचाऱ्यांची पिळवणूक, नीच दर्जाची वागणूक आणि  छळासाठी वृत्तपत्र सृष्टीत अग्रणी असलेल्या देशोन्नती  व्यवस्थापनाने     नुकताच  एक धक्कादायक   निर्णय    घेऊन  सुमारे २५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यांसह वितरण, जाहिरात विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत.. यामुळे देशोन्नतीमध्ये  मोठा भूकंप झाला असून कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
 गेल्या कित्तेक वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवा जेष्टता कमी केल्यामुळे भविष्य निर्वाह निधीमध्ये कंपनीला अधिक रक्कम टाकावी लागणार नसून दरवर्षी २० लाखाची बचत होणार असल्याची कल्पना देशोन्नतीचे मालक  प्रकाश पोहरे आणि रिशी पोहरे त्यांच्या काळ्या पैशाचा हिशेब बघणाऱ्याला सुचली कर्मचाऱ्यांचे राजीनामे घ्यायचे, त्यांची सेवा खंडित करायची आणि नंतर त्यांना दुसऱ्याच कंपनीचे कर्मचारी दाखवून  करार पद्धतीने पुन्हा सेवेत घ्यायचे.. अशी नीच खेळी खेळल्या गेली आहे. त्यासाठी सर्वांचेच राजीनामे घेण्यात आले असून ते आता देशोन्नतीचे कर्मचारीच नाहीत असा बनाव निर्माण करण्यात आला आहे... यामुळे देशोन्नतीला पी.एफ. , व्यवसाय कर, इत्यादीसाठी जादा खर्च करावा लगणार नाही.. आधीच नियमाप्रमाणे वेतन दिल्या जात नसून, जादा रकमेवर सह्या घेऊन कमी पगार द्यायचा... कर्मचाऱ्यांची पिळवणूक करायची परंपरा जोपासणाऱ्या देशोन्नतीने सर्वांचे राजीनामे घेताना याची तक्रार कराल तर याद राखा अश्या धमक्याही दिल्या आहेत.  आधीच जीव मुठीत धरून काम करणारे कर्मचारी यामुळे अधिक घाबरले असून ..... आता आपण दुसऱ्याच कागदोपत्री अस्तित्व असलेल्या कंपनीचे कर्मचारी राहणार असून काम करताना मात्र पोहरे यांच्याच दावणीला बांधून राहावे लागणार असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... पी. एफ. च्या रेकॉर्डवरील जेष्टता जाणार असून अनेकांचे मोठे नुकसान होणार आहे... जे अनेक वर्षापासून काम करीत आहेत त्यानाही या तुघलकी निर्णयाचा फटका बसला आहे. यामुळे कर्मचारी प्रचंड नाराज झाले असून.... पोहरेला शिव्यांची  लाखोली वाहत आहेत... कर्मचार्यांची पिळवणूक करायची आणि त्यातून वाचलेल्या पैशावर मौज करायचे काम पोहरे आणि त्यांच्या चांडाळ चौकडीने गेल्या कित्तेक वर्षापासून chalvile आहे... कर्मचाऱ्यांचे रक्त पिऊन , जाहिरातीतला मलिदा, तालुका प्रतिनिधी, बी.एम. कडून दरमहा मिळणारा मलिदा लाटून  गब्बर झालेला सापधार्य्या  गरुडीची बिन जशी वाजत आहे तसेच पोहरे पिता-पुत्र डोलत असल्यामुळेच देशोन्नतीचे वाटोळे होत असून... मुक्या बिचार्या संपादकाची  नुसती टोलवाटोलवी सुरु आहे... ज्यांचे राजीनामे घेतले आहेत त्या कर्मचार्यांना पर्याय नसल्यामुळे ते तेथेच काम करीत असून आपले भले करायला दुसरे मोठे पेपर आले की  कित्तेक वर्षांपासून पिळवणूक करणाऱ्या पोहरे आणि त्याच्या चपात्यांची  चागलीच वाट लाऊ अशी चर्चा सुरु आहे...

रविवार, २२ एप्रिल, २०१२

बेरक्या इफेक्ट

* पुणे पुढारीतील सुता-याच्या नंदाला पाच लाखाचा चेक नव्हे रोख रक्कम भरण्याचा पद्मश्रींचा आदेश, परंतु बेरक्यावर खरी भानगड उघडकीस येताच २० लाख भरण्याचा आदेश...
२० लाख भरण्यासाठी स्वत:चा प्लॅट विक्रीस काढल्याची चर्चा... 
* पुणे पुढारीचे सहयोगी संपादक संजीव शाळगावकर यांना १ मे पुर्वी राजीनामा देण्याचा पद्मश्रींचा आदेश,आदेश न पाळल्यास गचांडी देवून हाकलणार...
* पुढारीच्या पिंपरी चिंचवड कार्यालयातील वरिष्ठ रिपोर्टर नंदकुमार सातुर्डेकर यांना अखेर निम्मा पगार मिळाला, जॉईन झाल्यानंतर उर्वरित पगार मिळणार...

शनिवार, २१ एप्रिल, २०१२

वर्तमानपत्र हेच सर्वश्रुत उपयुक्त माध्यम

नवीन माध्यमं, जुनी माध्यमं यांच्याबाबतची चर्चा लोक चवीनं करत असतात; पण निदान आपल्या देशात तरी वर्तमानपत्रासारख्या माध्यमाला पुढची वीस वर्षं तरी सतत वाढत अपेक्षित आहे. जगामध्ये भारताइतकं स्वस्त वर्तमानपत्र कुठंही नाही. अगदी पाकिस्तान, श्रीलंकेतसुद्धा वर्तमानपत्राची किंमत सुमारे तीस रुपये आहे. यामुळं भारतामध्ये वर्तमानपत्र हे कुणालाही सहज परवडू शकतं, हे सिद्ध झालं आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक लोक, अनेक वर्तमानपत्रं घेऊन आपली ज्ञानाची आणि माहितीची भूक भागवतात.

पंधराव्या शतकात प्रिटिंग प्रेसचा शोध लागला; त्यानंतर अर्थातच ज्ञानप्रसारात किंवा माहितीच्या क्षेत्रात एक नवीन युग अवतरलं. ही गोष्ट फक्त पुस्तकांपुरती किंवा धर्मग्रंथांपुरती मर्यादित राहिली नाही; तर 1605 मध्ये जगातील पहिलं वर्तमानपत्र लोकांसमोर आलं. त्यानंतर मुद्रितमाध्यमाचा हा प्रसार सर्व अंगांनी आजतागायत होतच राहिलेला आहे; पण विशेषतः वर्तमानपत्रं ही युरोपमध्ये सुमारे 400 वर्षं सातत्यानं वाढत गेली. 1990 च्या सुमाराला पाश्‍चिमात्य देशांतील वर्तमानपत्रखपाला थोडेसे अडथळे निर्माण झाले, असं म्हणता येईल. अर्थात पाश्‍चिमात्य किंवा विकसित देशांमध्ये वर्तमानपत्रांचा खप लोकसंख्येच्या जवळपास 90 टक्‍क्‍यांच्या आसपास पोचलेला होता; पण याविरुद्ध आशिया, दक्षिण अमेरिका, आफ्रिका येथे जगातील जवळपास 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकसंख्या राहते, तिथं मात्र आजही वर्तमानपत्रं ही वाढत्या संख्येनं दिसतात. याच खंडांमध्ये काही वर्तमानपत्रं तर अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकात सुरू केलेली आहेत आणि आजही ती अस्तित्वात आहेत. वर्तमानपत्राच्या क्षेत्रात अर्थात आधुनिक तंत्रज्ञानामुळं आणि नवीनवीन क्षेत्र जी उदयास येत आहेत, त्यामुळं बदल झालेले आहेत आणि होत आहेत.

अलेक्‍झांडर ग्रॅहम बेल, जो स्कॉटलंडमधला एक शास्त्रज्ञ होता, त्यानं 1875 मध्ये जगाला टेलिफोन दिला. अर्थातच टेलिफोनचं युग हे आजतागायत जगभर वाढतच राहिलं; पण आता मात्र टेलिफोनऐवजी लोक मोबाईल-सेवा अधिक स्वीकारू लागलेले आहेत. म्हणजे सुमारे 150 वर्षांनंतर दुसऱ्या क्रांतीमुळं मोबाईल फोन हे जास्त स्वीकारणीय झालेले आहेत आणि ज्या वेगानं टेलिफोनची वाढ झाली, त्याच्या कितीतरी पटींनी मोबाईलची वाढ झाली. याचं कारण प्रचंड सोय आणि अत्यंत वाजवी किंमत हे होय. अर्थात अशा तंत्रज्ञानात येत्या काळात खूप संशोधनं होणार आहेत आणि घड्याळ, कॅमेरा यांसारख्या गोष्टींची कदाचित गरजही वाटणार नाही, कारण या सर्व सुविधा मोबाईल फोनमधून मिळणार आहेत. अगदी गाण्यासारखी गोष्ट या प्रकारच्या मोबाईलमधून मिळू शकेल, असं कुणाला वाटलंही नव्हतं. त्यामुळं कल्पनेच्या भरारीबरोबर नवीन संशोधन होणार आहे आणि नवनवीन सोयी या मोबाईलमधून उपलब्ध होणार आहेत.

आपण जर रेडिओचा विचार केला, तर 1892 ला निकोला टेल्स या माणसानं त्याचा शोध लावला आणि त्याचाही अर्थातच विस्तार झाला; पण त्याला काही मर्यादा जरूर होत्या. घरोघरी रेडिओ हे सर्वत्र झाले नाही; पण काही देशांमध्ये ते फक्त मर्यादित राहिले. 1970 नंतर त्याचाही विस्तार थांबल्यासारखा झाला आणि आता इंटरनेट रेडिओ किंवा म्युझिक डाऊनलोडिंगसारख्या गोष्टींमुळं रेडिओच्या विस्ताराला मर्यादा येऊ लागल्या आहेत. यानंतर आला टेलिव्हिजन. जॉन लॉगी बेअर्ड या दुसऱ्या स्कॉटमंडनं याला अस्तित्वात आणलं ते 1926 मध्ये. म्हणजे आजचं जे स्वरूप आहे, त्याची पहिली प्रतिकृती 1926 मध्ये अस्तित्वात आली. यामध्ये अर्थातच सातत्यानं प्रगती होत गेली आणि आज डिजिटल आणि रंगीत याच्याही पुढं थ्री डी या तंत्रज्ञानात आपण ते लवकर पाहणार आहोत. यामध्ये जगभरच काय; पण भारतातसुद्धा विविध प्रकारची, विविध विषयांवर शेकडो चॅनेल्स आलेली आहेत. याचा अंतिम उद्देश हा करमणूक, माहिती या स्वरूपात राहतो. हे होऊनसुद्धा आता सुधारलेल्या देशांमध्ये याची वाढ थांबल्यासारखी दिसते. आपण विकसित देशांतील वर्तमानपत्र आणि टीव्हीमधील वाढ पाहिली तर अजूनही वर्तमानपत्रांची वाढ अधिक आहे, असं दिसते. बीबीसी या संस्थेनं 1922 मध्ये रेडिओ सुरू केला; तर 1932 मध्ये टेलिव्हिजन सेवा सुरू केल्या. 1932 मध्येच ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला, की संध्याकाळी 5 वाजल्यानंतर रेडिओवर कुठलीही बातमी देता येणार नाही. याचं कारण आदल्या दिवशीच बातम्या समजल्यामुळं वर्तमानपत्र कोण वाचणार, हे होतं. आज आपल्याला 24 तास बातम्यांची शेकडो चॅनेल्स विविध देशांमध्ये दिसतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की कुठल्याही माध्यमानं दुसऱ्या माध्यमाला संपवलेलं नाही; तर प्रत्येक माध्यमानं आपापली जागा घेतली, तिचा विस्तार झाला आणि काही काळानंतर तो विस्तार थांबला. काही वेळा त्याला उतरती कळाही लागली. 1989 मध्ये टीम बर्नर्स या शास्त्रज्ञानं थथथ (वर्ल्ड वाईड वेब) शोध लावला आणि कम्युनिकेशन क्रांतीत एक नवीन दालन उघडलं गेलं. 1993 मध्ये इंटरनेटनं एकंदर टेलिकम्यिुनिकेशन माहितीपैकी जेमतेम एक टक्का माहितीचा इंटरनेटच्या माध्यमातून वापर केला; परंतु 2007 पर्यंत म्हणजे 14 वर्षांनंतर हे प्रमाण सुधारित देशांमध्ये 90-95 टक्‍क्‍यांच्या पुढं जाऊन पोचलं. आपल्यासारख्या देशांमध्येसुद्धा याचा सातत्यानं वाढता वापर होत आहे. इंटरनेटचा परिणाम वर्तमानपत्रं आणि टीव्ही-माध्यमांवर जाहिरातींबाबत निश्‍चित झाला. जाहिरातींच्या वाढत्या उत्पन्नांना निश्‍चितपणे खीळ घालण्याचं काम इंटरनेट या माध्यमानं केलं. आपण पाहतो मायक्रोसॉफ्ट हे 1975 मध्ये, गुगल 1998 मध्ये , याहू 1994 मध्ये, एओएल 1994 मध्ये तर आता मायस्पेस, नेटस्केप किंवा फेसबुक यांसारख्या गोष्टी अत्यंत अल्पकाळात जगभर पसरल्या. इतकं असूनही ही माध्यमं एकमेकांचा उपयोग आपल्या प्रसारासाठी करू लागली आणि करतात. गुगलसारखी संस्था वर्तमानपत्रात जाहिराती देऊ लागली आहे. त्यांना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचायचे असेल, तर वर्तमानपत्र हेच सर्वश्रुत उपयुक्त माध्यम वाटतं. नवीन माध्यमं, जुनी माध्यमं यांच्याबाबत चर्चा लोक चवीनं करतात; पण निदान आपल्या देशात तरी वर्तमानपत्रासारख्या माध्यमाला पुढची वीस वर्षं तरी सतत वाढत अपेक्षित आहे. जगामध्ये भारताइतकं स्वस्त वर्तमानपत्र कुठंही नाही. अगदी पाकिस्तान, श्रीलंकेतसुद्धा वर्तमानपत्राची किंमत सुमारे तीस रुपये आहे. यामुळं भारतामध्ये वर्तमानपत्र हे कुणालाही सहज परवडू शकतं, हे सिद्ध झालं आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक लोक, अनेक वर्तमानपत्रं घेऊन आपली ज्ञानाची आणि माहितीची भूक भागवतात.

प्रताप पवार

बेरक्या हि एक गरज आहे...

बेरक्या हि एक गरज आहे...
बेरक्या हि एक चळवळ आहे..
बेरक्या हा घूसमटलेला पत्रकारितेचा श्वास आहे...
बेरक्या आहे बारीक कटाक्ष ..
बेरक्या आहे दुष्ट भांड वाल दारांचा कर्दन काळ...
बेरक्या एक लेखणीचा स्वाभिमानी हुंकार ...

बेरक्या एक बाप ....सरत हि नाही ,पुरत हि नाही !
 
By Deepak Bidkar
Pune 
 
**
बेरक्या ब्लॉग हा पत्रकारांनी पत्रकारासाठी चालविलेला ब्लॉग आहे.हा ब्लॉग सर्व पत्रकारांसाठी खुला आहे.तो सर्व पत्रकारांचा कॉमनमॅन आहे.मी वैयक्तीक या ब्लॉगचा उपयोग कधीच केला नाही.माझे स्वत:चे गुणगाण यावर कधीच केले नाही, आणि माझी दुश्मनीही काढली नाही...
काही पत्रकारांनी या ब्लॉगचा दुरूपयोग केला हे मान्य आहे.मी मात्र कधीच केला नाही.पण  आता आम्ही सावध झालो आहे...येणारी बातमी काटेकोटपणे तपासली जात आहे, आणि खासगी बाबी येणार नाहीत,याची काळजी घेत आहोत...
खरे तर आमचा कसलाही स्वार्थ नसताना,आम्ही हे शिवधनुष्य पेललेले आहे...उलट त्यात आमची रिस्क आहे...ही रिस्क केवळ पत्रकारांच्या कल्याणासाठी स्वीकारलेली आहे...

बुधवार, १८ एप्रिल, २०१२

पत्रकारांचा पाठीराखा - बेरक्या उर्फ नारद...

अमरावतीचे अविनाश दुधे हे नुकतेच पुण्यनगरीत जॉईन झाले.त्यांना लोकमतमधून काढून टाकल्यानंतर अमरावतीच्या काही पत्रकारांनी सळो की पळो करून टाकले होते.परंतु बेरक्याने सत्य बाजू सर्वासमोर मांडली.त्यामुळेच दुधेंना न्याय मिंळाला...
काही महिन्यापुर्वी अकोल्याचे गजानन जानभोर यांनी लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभा राहिलो...म्हणूनच ते पुन्हा लोकमतमध्ये जॉईन झाले व आमच्यामुळे न्याय मिळाला...
अशी किती तरी उदाहरणे देता येतील...म्हणूनच आम्ही म्हणतो...
पत्रकारांचा पाठीराखा - बेरक्या उर्फ नारद...

मंगळवार, १७ एप्रिल, २०१२

ताज्या घडामोडी...

औरंगाबाद - लोकमत कर्मचा-यांची पगारवाढ आता दोन वर्षातून एकदा...लोकमत प्रशासनाचा निर्णय...ज्यांना लोकमत सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे ...जादा कर्मचारी भरतीमुळे लोकमत प्रशासनाला चिंता नाही...
 
मुंबई - लोकमतचे मंत्रालय वार्ताहर संदेश सावंत यांना नारळ, सामनामध्ये प्रयत्न सुरू
मुंबई - लोकमतचे महापालिका वार्ताहर प्रशांत डिंगणकर यांचा राजीनामा
मुंबई - लोकमतमधील यदु जोशी गटाची सरशी, अतुल कुलकर्णीचे दोन पंटर घालविले...
 
मुंबई सामनामध्येही मोठी गडबड ..... उन्मेष कुलकर्णी यांचा राजीनामा... शैलेश निकाळजे सह तिघा संपादकीय सहकारयांना कन्फर्मेशन नाही... महिनाभरात कामगिरी न सुधारल्यास बाहेरचा रस्ता दाखविण्याची तंबी....
 
* पद्मश्रींनी कोल्हापुरात गिरमे नावाच्या एका व्यक्तीची नेमणुक केली आहे. बेरक्यावर पुढारीबद्दल जे जे येते त्याची लगेचच प्रिँट काढून त्यांच्याकडे सुपुर्द करायची एवढेच गिरमेंचे खास आणि मेहनतीचे काम असल्याचे समजते...
 
* जळगाव सकाळ मध्ये काम करणाऱ्या चार फोटोग्राफर पैकी दोन फोटोग्राफरांना अचानक कामावरून काढून टाकले.दिव्य मराठी व लोकमतशी कंबर कसून स्पर्धा करण्यासाठी सकाळने चार चार फोटोग्राफर कामावर लाऊन घेतले होते मात्र त्यापैकी दोन फोटोग्राफरांचा वापर करून घेतल्या नंतर, काहीही चूक नसतांना अचानक एक दिवशी संपादक माने यांनी दोघांना एमआयडीसित बोलावून काम थांबविण्यास सांगितले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'आम्ही आमच्या इच्छेने काम सोडले आहे ' बाहेरच्यांना असे सांगायला लावले. या प्रकरणावरून सकाळ मध्ये जातीचे राजकारण केले असल्याची चर्चा आहे. यावरून सर्व फोटोग्राफरांनि संघटीत होण्याची गरज आहे.
 
 

सोमवार, १६ एप्रिल, २०१२

‘स्टार माझा’ होणार ‘एबीपी माझा’

नवी दिल्ली : ‘स्टार माझा’ या लोकप्रिय मराठी न्यूज चॅनलच्या नावात लवकरच ‘एबीपी माझा’ असा बदल करण्यात येईल, अशी घोषणा एमसीसीएसच्या वतीनं आज करण्यात आली. एमसीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वेंकटरमणी यांनी ही माहिती दिली.

‘स्टार माझा’ हे मराठी न्यूज चॅनल, मीडिया कण्टेन्ट अँड कम्युनिकेशन्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) या कंपनीच्या मालकीचं आहे. ‘एमसीसीएस’मध्ये आनंद बझार पत्रिका ग्रुप (एबीपी) आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या दोन उद्योगसमूहांची भागीदारी आहे. एबीपी आणि स्टार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगसमूहांनी त्या भागिदारीतून स्वतंत्र होण्याचा निर्णय परस्परसामंजस्यानं घेतला आहे. त्यानुसार स्टार ब्रँडचं एमसीसीएसशी असलेलं नातं खंडित करण्याचंही एबीपी आणि स्टार इंडिया यांनी मान्य केलं आहे.
स्टार इंडियाच्या व्यवसायाचा मुख्य केंद्रबिदू हा मनोरंजन असून, भविष्यात स्टारनं मनोरंजन क्षेत्रावरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. एबीपी समूह हा प्रामुख्यानं वृत्तव्यवसायात कार्यरत आहे आणि नजीकच्या काळात ‘एमसीसीएस’ या कंपनीच्या माध्यमातून टेलिव्हिजन न्यूजक्षेत्रात आपला ब्रँड उभा करण्याचा आणि तो वृद्धिंगत करण्याचा निर्णय एबीपी समूहानं घेतला आहे. त्यामुळं ‘स्टार माझा’ या मराठी न्यूज चॅनलच्या नावात लवकरच ‘एबीपी माझा’ असा बदल करण्यात येईल. तसंच एमसीसीएसचं हिंदी न्यूज चॅनल ‘स्टार न्यूज’ आणि बंगाली न्यूज चॅनल ‘स्टार आनंदा’ यांच्या नावात अनुक्रमे ‘एबीपी न्यूज’ आणि ‘एबीपी आनंदा’ असा बदल करण्यात येईल.

एमसीसीएसचं स्टार ब्रँडशी तब्बल आठ वर्ष अतिशय दृढ नातं होतं. या नात्याचा लाभ दोघांनाही झाला. या आठ वर्षांत तिन्ही न्यूज चॅनल्सनी टेलिव्हिजन न्यूज व्यवसायात मानाचं स्थान मिळवलं आहे. माझा आणि आनंदा या न्यूज चॅनल्सनी तर अनुक्रमे मराठी आणि बांगला भाषेतलं पहिल्या क्रमांकाचं न्यूज चॅनल अशी ओळख मिळवली आहे. त्यामुळं साहजिकच टेलिव्हिजन न्यूज व्यवसायात ‘एमसीसीएस’ या कंपनीचं नाव आज मोठ्या आदरानं घेतलं जातं.

विश्वासार्हता ही एमसीसीएसची ओळख बनली आहे. एमसीसीएसचा प्रत्येक शिलेदार ती विश्वासार्हता टिकवण्यासाठी नेटानं झटत असतो. आणि म्हणूनच एमसीसीएसनं प्रेक्षक, जाहिरातदार, डिस्ट्रीब्युटर्स आदी प्रत्येक घटकाशी विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं जोडण्यात यश संपादन केलं आहे. एमसीसीएसच्या तिन्ही चॅनल्सचं नेतृत्त्व सक्षम संपादकांच्या हाती आहे. या संपादकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पत्रकार, अँकर्स आणि तांत्रिक कर्मचारी आपल्या प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारितेचा दर्जा कायम सर्वोच्च स्तरावर राखण्यासाठी सातत्यानं झटत आहेत. भविष्यकाळातही या तिन्ही चॅनल्सवरच्या बातम्यांचा सर्वोत्तम दर्जा कायम राखण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असं एमसीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वेंकटरमणी यांनी सांगितलं.

शनिवार, १४ एप्रिल, २०१२

"पुण्य नगरी" लवकरच अकोल्यातून...

विदर्भात सध्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या दैनिक  पुण्य नगरीची विदर्भातील  दुसरी आवृत्ती  लवकरच अकोल्यातून प्रकाशित होत असल्याची जोरदार चर्चा वृत्तपत्र सृष्टीत सुरु आहे. नागपुरातील  संपादक सचिन काटे सकाळमध्ये रुजू झाल्यामुळे पुण्य नगरीने लोकमतमध्ये अनेक पदांवर काम केलेल्या जेष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी  यांच्यावर संपादक पदाची धुरा टाकली आहे. दिव्य मराठी, सकाळ आणि मटाच्या आक्रमनापुर्वीच  विदर्भात भक्कम होण्याची खेळी पुण्य नगरीने सुरु केली आहे. पुण्यचे मालक,संपादक  बाबा शिंगोटे आणि त्यांच्या विश्वासू शिलेदारांनी  अकोल्यातून आवृत्ती सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळेच  बाळ कुलकर्णी यांच्यासारखा अनुभवी संपादक  घेतला असून, अकोला कार्यालयाचा विस्तार लवकरच होत आहे.
लोकमतने घात केलेल्या अविनाश दुधे यानाही पुण्य नगरीने घेतले असून, कुलकर्णी आणि दुधे यांनी दोन दिवसांपूर्वीच अकोल्यात भेट देऊन अकोला  आवृत्ती बाबत चर्चा केली, तूर्तास दुधे यांच्याकडे अमरावती विभागाची संपादकीय जबाबदारी राहणार आहे.अकोल्यात  प्रिंटींग युनिट सुरु होणार असून, अकोला ,बुलढाणा, वाशीम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सामाद्कीय मुख्यालय आता अकोल्यात होणार आहे.. सध्या अकोला कार्यालयाची धुरा सांभाळणारे अनिल माहोरे यांच्याकडे व्यवस्थापनाची जबाबदारी राहणार असून, अकोल्यात संपादकीय विभाग प्रमुख म्हणून अकोल्यातीलाच जेष्ठ पत्रकाराची वर्णी लागणार आहे.. या पदासाठी  ज्यांची नवे अग्रक्रमावर आहेत त्यामध्ये सुधाकर खुमकर, अविनाश राऊत यांचा समावेश आहे.. इतरही पत्रकाराची नवे चर्चेत असली तरी, खुमकर, राऊत यांच्या एवढा अनुभव असलेलीले आणि सध्या कुठल्याही पदावर नसलेली ही दोनच नवे घेण्यासारखी आहेत. पुण्य नगरीचा विचार केला तर खुमकर यापूर्वी पुण्य नगरीमध्ये अकोला जिल्हा प्रतिनिधी  होते..  त्यांनी नंतर देशोन्नतीमध्ये  खुर्ची पटकाविली होती.. त्यामुळे पुण्य नगरीचे व्यवस्थापन त्यांच्यावर नाराज झाले होते.  अखेर देशोन्नतीनेही त्यांचा घातच केला.. आता उरले अविनाश राऊत.. त्यांच्यावर संपादकीय प्रमुख पदाची जबाबदारी टाकल्या जाऊ शकते.. मात्र त्याची वर्णी लागू नये यासाठी अकोल्यातीलच  काही पत्रकार देव पाण्यात बुडवून बसले आहेत. राऊत यांची बेधडक पत्रकारिता. दमदार लेखणी अनेकांना नको आहे.. त्यासाठी काही जन अनिल माहोरे यांच्या मार्फत  पुण्य च्या व्यवस्थापनाकडे फिल्डिंग लावत असल्याचीही चर्चा सुरु आहे... दिव्य मराठी अकोल्यात येण्यापुर्वीच अकोल्यातील मोजके चागले पत्रकार आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न पुण्य नगरी ने सुरु केला असून मालकाचे विशासू म्हणून ही जबाबदारी अनिल माहोरे यांच्यावर टाकण्यात आली असून, बाळासाहेब कुलकर्णी आणि माहोरे याबाबत लवकरच चर्चा करणार आहेत... पुण्य ने पुढील महिन्यात अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे... . दुसरीकडे बाळासाहेब कुलकर्णी यांनी राऊत, खुमकर याचे काम बघितलेले आहे, कुलकर्णी अकोल्यात लोकमतचे प्रमुख असताना अविनाश राऊत देशोन्नतीमध्ये  आवृत्ती प्रमुख होते, खुम्कारांचीही पत्रकारिता जोरात होती... त्यामुळे कुलकर्णी यांच्याकडून दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब होऊ शकते...

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१२

आय.बी.एन.- लोकमतला चार वर्षे पुर्ण

आय.बी.एन.- लोकमतला शुक्रवारी चार वर्षे पुर्ण झाली....वर्धापन दिन साधेपणाने साजरा....७० कर्मचारी काढल्याचे सर्वांनाच शल्य....
आय.बी.एन.- लोकमतने काय मिळविले?
- आक्रमक पत्रकारितेचा ठसा उमटविला...
- स्टार माझा पेक्षा वेगळ्या स्टो-या दिल्या


आय.बी.एन.- लोकमतन काय घालविले
- कर्मचारी कपात करून अविश्वासाचे वातावरण निर्माण केले...
- मिस मॅनेंजमेंटमुळे टी.आर.पी.घसरला....

काय करावे लागेल ?
 - सध्याचा स्टॉप स्टार माझा ऐवढाच आहे...मॅनेंजमेंटमध्ये सुधारणा करावी लागेल...
 - स्ट्रींजर रिपोर्टरकडे लक्ष द्यावे लागेल...

सोमवार, २ एप्रिल, २०१२

उपसंपादक विकास देशमुख यांची लोकमतला सोडचिठ्ठी.

वाशीम - लोकमतचे उपसंपादक तथा  कारंजा मोडेम प्रमुख  विकास देशमुख यांनी २५ मार्च रोजी  लोकमतचा राजीनामा दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागपूर सकाळ मध्ये ते रुजू होतील. काही महिन्या अगोदर  तत्कालीन संपादकीय प्रमुख अविनाश दुधे यांनी देशमुख यांच्यावर कारंजा मोडेम प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली होती. ती त्यांनी उत्तमरीत्या पेलली. यापूर्वी देशमुख वाशीम ग्रामीणचे काम पाहत होते. त्यांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानाचा सन २००९-१० मध्ये पत्रकारितेत दिला जाणारा अमरावती विभागाचा पहिला पूरस्कार  प्राप्त आहे. पत्रकारितेत भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा....

रविवार, १ एप्रिल, २०१२

साम मराठीने सहा कर्मचा-यांना दिला नारळ ...

साम मराठी वाहिनीनेही तिच्या लौकिकाला साजणारा 'उत्तुंग षटकार' लगावत सहा कर्मचा-यांना नारळ दिलाय. मागच्याच महिन्यात चौकार लगावत चौघांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. साममध्ये दर महिन्याला एक - दोघांची कत्तल ही ठरलेलीच असते. वरिष्ठांना किती कर्मचा-यांकडून काम करून घ्यायचे याचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरमसाठ नोकर भरती केली जाते. तोटा व्हायला लागल्यावर याच कर्मचा-यांचा बळी दिला जातो, वरिष्ठ मात्र मजा करत राहतात. चार वर्ष झाली तरी साम अजून रांगतच आहे. ई टीव्हीच्या मानसिकतेतून हे चॅनेल अजूनही बाहेर पडलेलं नाही. अशोक सुरवसे आणि गँगने त्यांच्या मर्जीतले ई टीव्हीतले बुलेटिन प्रोड्युसर आणि लाळघोटेपणा करणारे रिपोर्टर भरले मग काय ? चॅनेलची वाट लागणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
आणि जग जिंकायला निघालेले वागळे आणि कंपनी त्यांचे कर्मचारीही जपू शकले नाही. तिथल्या एका फणसाने अनेक बुलेटिन प्रोड्युसरला वाईट वागणूक दिली. रिपोर्टर लोकांनाही वाईट पद्धतीनं छळलं. मात्र स्त्रीयांच्या बाबतीत तो चांगलाच उ'दार' होता. आयबीएन - लोकमतची वाट लावल्यानंतर हे पार्सल आता झी २४ तासच्या वाटेवर आहे. देवा, या चॅनेलला तरी बुडू देऊ नको. कारण आतापर्यंत फक्त झी २४ तासमधूनच कर्मचा-यांना रिसेशनमध्ये किंवा चॅनेलला तोटा झाला म्हणून काढण्यात आलेलं नाही. स्टार माझानंही कमीत कमी कर्मचा-यांकडून काम करून घेतलं. भरमसाठ लोक घेतले नाही. परिणामी स्टार माझा आजही एक नंबर आहे.

बोलावणे आले म्हणून संस्थेला ब्लॅकमेल

औरंगाबाद - आम्हाला प्रतिस्पर्धी दैनिकाचे बोलावणे आले आहे, ऐवढी पगार देतो म्हणतात, तुम्ही वाढवून दिली तर थांबतो,नाही तर जातो, अशी धमकी देवून लोकमत, सकाळ व दिव्य मराठीतील काही महाभाग संस्थेला ब्लॅकमेल करीत असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या वर्षी याच महिन्यात भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठीचे औरंगाबादेत आगमन झाले आणि कधी नव्हे ऐवढे प्रिंट मीडियाला चांगले दिवस आले.दिव्य मराठीने सकाळ व लोकमतला टार्गेट केल्यामुळे या दोन्ही दैनिकातील कर्मचा-यांचा भाव वधारला.त्यांना दिव्य मराठीने दुप्पट पगार देवून आपल्या कळपात ओढले, पण गंमत अशी की, ज्यांची लायकी नाही, अशांनाही त्यांना घेतले.परिणामी भेदरलेल्या लोकमत व सकाळनेही आपल्या कर्मचा-यांना नाईलाजास्तव पगारवाढ केली.
औरंगाबाद पाठोपाठ दिव्य मराठीने नाशिक, जळगाव व सोलापुरात पाऊल ठेवले.तेथेही लोकमत, सकाळ कर्मचा-यांचा भाव वधारला.जेथे दिव्य मराठी तेथे पगारवाढ असे धोरण लोकमत,सकाळने ठेवले आहे.गंमत अशी की, ज्यांची खरोखरच लायकी आहे,त्यांना पगारवाढ झाली तर आनंदच आहे, पण ज्यांना चार ओळी नीट लिहिता येत नाही, अशा महाभागांना आंधळे गबाळ लागले आहे.
लोकमतच्या ऋषी बाबूंनी तर कर्मचारी फुटाफुटाचा चांगलाच धसका घेतल्याचे समजते.ओ जा रहा है क्या, कोण - कोण जाणे वाले है, याचा आढावाच ते दररोज घेत असल्याचे समजते.त्यामुळे बिचा-या संबंधितांना दररोजची कामे सोडून त्यांची उत्तरे तयार ठेवावी लागत आहे.त्यात गंमत अशी की, असा अहवाल देताना संबंधितांना हासावे का रडावे झाले आहे.कारण ज्याची लायकी नाही,तेच जास्त ब्लॅकमेल करीत आहेत.या ब्लॅकमेलपणाला कंटाळून लोकमत, सकाळ व दिव्य मराठीने ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे, असा पवित्रा घेतल्याचे समजते.ताजा कलम : मोठ्या अपेक्षेने दिव्य मराठीत गेलेले एकूण ४७ जण वर्षभरात सोडून गेले आहे.ते स्वत:हून निघाले का, त्यांना हाकलले हा संशोधनाचा विषय आहे.

ताज्या घडामोडी...

मुंबई -सहारा चॅनल मराठीत रिलॉचिंग करणार...आता होणार सहारा मराठी...सर्व हिंदी भाषिक स्टॉप हलवून, मराठी माणसाच्या हातात सुत्रे देणार...राज्यातही सर्व ठिकाणी फेरबदल करणार...पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आदी ठिकाणी ब्युरो ऑफीस करणार...स्टार माझाला फाईट देण्याइतपत चॅनल सक्षम करणार....सन २०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोक्यासमोर ठेवून काम करणार....
सहाराच्या एका वरिष्ठ अधिका-याचा दुजोरा...मराठवाड्यासाठी आय.बी.एन.-लोकमतमध्ये ब्युरो चिफ म्हणून काम करणा-या व सध्या सकाळमध्ये काम करणा-या एका कार्यक्षम पत्रकारास महाराष्ट्राच्या प्रमुख पदासाठी निमंत्रण...

मुंबई - नारायण राणे यांच्या मालकीचे 'जय महाराष्ट्र' न्यूज चॅनलचा लवकरच प्रारंभ... भरती प्रक्रिया सुरू, संपादकपदासाठी झी २४ तासचे मंदार परब यांचे नाव फिक्स, तर आय.बी.एन.लोकमतचे वृत्तसंपादक मंदार फणसे पुन्हा झी २४ तासमध्ये जॉईन होणार...
 
मुंबई - आय.बी.एन.लोकमत पाठोपाठ आता पवारांच्या साम मराठीच्या कर्मचा-यांवर बेकारीची कु-हाड कोसळणार
 

फेसबुक वर शेअर करा

Facebook