> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ मे, २०१२

सकाळमध्ये तीन तट- मटामध्ये दुभंग आणि पद्मश्रींचा राग

पुण्यातील सकाळ, मटा आणि पुढारीत गेल्या आठवड्यात् महत्वपूर्ण घडामोडी घडल्या असून पत्रकार वर्तुळात त्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळमध्ये सर्व काळ `घोळ' करणारे गोविंदराव, टीम माळी आणि `डोईफोडी' करून निष्ठावंत गटाचे नेते म्हणवणारे रमेश आणि त्यांच्या कंपूमुळे सकाळमध्ये तीन उभे तट पडले आहेत. 
गोविंदराव यांनी सोबत नेलेल्या छ्त्रपती संभाजी, सहकार`रत्न' सावळे, आणि पिंपरीच्या लटपट्या ओम आणि त्याच्या `खास' साळवींचा आणि एकंदरच टीम गोविंदचा काहीही विशेष प्रभाव पडलेला नाही. पहिला महिना सोडल्यानंतर गोविंदरावांनी किल्ला लढवला खरा; पण मर्यादा पुरुषोत्तम संभाजींचे लक्ष एकीला हात करायचा दुसरीला डोळा मारायचा आणि भल तीबरोबरच घरोबा करायचा यातच गुरफटल्यामुळे आणि पुण्याची प्राथमिक माहिती नसलेल्या लातूरकर सावळेंच्या निषर्भतेमुळे या टीमची प्रतिमा डागळली. अकार्यक्षमतेबरोबरच बाकीचेही त्यांचे उद्योग उघड झाले. त्यामुळे माळी गटाने उचल खाल्ली. त्यांच्या डीआर सोडून कडूसकर वगैरे मंडळींचीही मर्यादा सकाळमध्ये उघड झाली. पण या गटाने टीम गोविंदला पिंपरीपुरतेच मर्यादीत ठेवून बाजी मारली आहे. गोविंदरावांनी पुण्यातील राजकारणावर अवाक्षरही लिहायचे नाही ही माळी गटाची मागणी मान्य झाली. पुण्यातील राजकारणातील उलटसुलट बातम्यांनी माळी आणि त्यांची टीम त्रस्त झाली होती. या माळींच्याच हाताखाली गोविंदाने पत्रकारीतेचे धडे गिरवले. पण त्या माळींनाच घरचा रस्ता दाखविण्याची भाषा आता ते आपल्या टीममध्ये बोलून दाखवित आहेत. डोईफोडे ग्रुप आपण सकाळचे खरे निष्ठावंत असल्याचा दावा करतो आहे. या गटात योगेश कुटे हे त्यांचे खंदे शिलेदार आहेत. शेवलेकरांकडून मार खाल्ल्यामुळे फेमस झालेल्या कुटेंचे अनेक् उद्योग त्यानंतर उघड झाले. या तिन्ही गटांमध्ये सध्या जोरदार शीतयुद्ध सुरू आहे. त्यातूनच परस्परांविरुद्ध अफवा पसरविण्याचे तंत्र या तिन्ही गटांनी अवलंबले आहे. माळी गटाला पालिकेतून चाचा चौधरीमार्फत किती पाकीटे मिळतात याची माहिती घोळवे गटाने मिळवली. तर घोळवेंनी केलेले घोळ शोधण्यासाठी माळींनी आपली पिंपरीतील जुनी टिम कामाला लावली. डोईफोडे-कुटे मिळेल त्या पाकीटावर समाधान मानून उर्वरीत दोन्ही गटांविरुद्धची माहिती संकलीत करीत आहे.
            स्मार्ट मित्र असलेल्या मटामध्येही उभे दोन तट पडले आहेत. करंदीकरांविरुद्ध पेंडसे -लोणींच्या खांद्यावर बंदुक ठेवून निशाणा साधत आहेत. करंदीकरांना कोल्हापूरला पाठवून पुण्याच्या संस्थानाचा ताबा घेण्याच्या इर्षेने पेंडसे पेटून उठले आहेत. त्यामुळेच त्यांनी करंदीकरांच्या विश्वासू सहका-यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे सत्र अवलंबिले आहे. त्याचवेळी पेंडसे यांच्या`कास्टींग काऊच' चे प्रकरण थेट मुंबईला करंदीकर यांनी पोचविले आहे. सध्या या उभय गटात जुंपलेल्या भांडणाचा थेट परिणाम अंकावर होऊन एकच बातमी एकाच अंकात दोन वेळा छापून येण्यासारखे प्रकर वारंवार घडू लागले आहेत.
         पुढारीकारांनी गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेऊन संपादकीय विभागाची आणि जाहिरात विभागाची झाडाझडती घेतली. महसूल कमी होऊ लागल्याने पद्मश्री  कमालीचे संतापले. त्यांनी सुनील नरसिंहन आणि त्यांच्या टिमची कडक शब्दांत हजेरी घेतली. तसेच नंदू, संजू आणि मॅडम यांना खड्या शब्दांत सुनावले. तेथे अर्जुन शिरसाट यांना कामावर घेण्याचा आदेश कोल्हापूरहून देऊनही नंदुने पुण्यात त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. या प्रकाराबाबत काही आकस्मिक कृती कोल्हापूरहून घेतली जाण्याची शक्यता असून पुढारीला संपविण्याचा जणू विडा घेतलेल्या नंदू, संजू आणि मॅडमबाबत काही महत्वपूर्ण निर्णय होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
               

सकाळ आई नाही आणि बापही

सकाळमधल्या आई पुराणाविषयी बेरक्यावर वाचले. तोपर्यंत आता गेल्या वेळच्या
सप्तरंग पुरवणीतील उत्तम कांबळेंची फिरस्ती बापावर आहे. यांचाच तेवढा बाप
बाकीच्यांचा बाप हा बाप नसावा, असे सारे हे वर्णन आहे. किती वेळा यांच्या
आईचे आणि यांच्या बापाचे पुराण वाचायचे? शिवाय यांच्या फिरस्तीला चांगले
म्हटले असेल, तरच ते वाचकांच्या पत्रव्यवहारात छापले जाते. हिंमत असेल,
तर हे पत्र छापून दाखवावे. पण तसे होणार नाही. कारण यांच्यावरची टीका कशी
प्रसिद्ध करणार? पुन्हा पुन्हा त्यांना तेच ते आईबाप लिहायला देणाऱया
सकाळ संस्थेलाच सध्या कोणी आई आणि बापही नसावा, म्हणूनच वाचकांच्या माथी
हे आईबाप पुन्हा पुन्हा मारले जात आहेत. आणखी किती काळ चांगल्या लिखाणाची
प्रतीक्षा सकाळच्या `मायबाप` वाचकांना (सकाळवाले मानत असतील, तर) करावी
लागणार आहे, ते (वाचकांचे) आईबापच जाणोत!

by Dhananjay Kartiki
dhananjay.kartiki@gmail.com

मंगळवार, २९ मे, २०१२

"सकाळ'च्या प्रतिनिधीला डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी

मुंबई - सीमा तपासणी नाक्‍यावरील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे बिंग फोडणाऱ्या "सकाळ'च्या प्रतिनिधीला डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणातील ठाण्यातील आरटीओ इन्स्पेक्‍टर एस. सी. शुक्‍ला यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस परिवहन खात्याला अद्यापही दाखविता आलेले नाही. परिवहन आयुक्तांनी मागविल्याने ठाणे आरटीओने या प्रकरणाचा अहवाल नुकताच सादर केला असला तरी त्यात शुक्‍ला यांना पाठीशी घालण्याचाच पुरेपूर प्रयत्न केल्याचे कळते. खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन खाते असल्याने आणि त्यांनीही या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई व्हावी म्हणून चर्चा केल्यानंतरही अतिशय मोघम व महत्त्वाच्या मुद्द्यांना हात न घालता हा अहवाल सादर झाल्याने आता फेरअहवाल मागविण्याची वेळ आयुक्तांच्या कार्यालयावर आल्याचे सांगण्यात येते.

सीमा तपासणी नाक्‍यांवर सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचा "सीमा तपासणी की खिसाभरणी' या वृत्तमालिकेतून "सकाळ'ने पर्दाफाश केल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. अनेक ठिकाणी दलालांसह हप्ते गोळा करणाऱ्यांच्या साखळीला धक्का बसला. संपूर्ण परिवहन खात्यात याच विषयावर चर्चा सुरू झाली आणि कोणी, किती कमावले याच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या.

गुजरातच्या सीमेवर असलेल्या अच्छाड येथील सीमा तपासणी नाक्‍यावर भ्रष्टाचाराचे बिंग फोडण्यासाठी गेलेल्या "सकाळ'च्या प्रतिनिधीला या नाक्‍यावर "वसुली'च्या कर्तव्यावर असणारे एस. सी. शुक्‍ला या आरटीओ इन्स्पेक्‍टरसह अन्य काही आरटीओ कर्मचारी आणि दलालांनी गाडीत डांबून ठेवले. धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकीही दिली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी तत्काळ संपूर्ण प्रकरणाचा अहवाल ठाणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांच्याकडून मागविला होता. मात्र, एवढ्या गंभीर घटनेतही आरटीओकडून अहवाल देण्यासाठी आठवडाभरापेक्षा जास्त काळ घालविण्यात आला, चालढकलही करण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानंतरही अहवाल देण्यात दिरंगाई झाली. नुकताच हा अहवाल आयुक्तांकडे सोपविण्यात आला; पण त्यात ठाणे आरटीओने शुक्‍ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वाचविण्याचाच पुरेपूर प्रयत्न केल्याचे कळते. अत्यंत मोघम स्वरूपात हा अहवाल असल्याने मूळ मुद्द्यांना, नाक्‍यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना, अधिकाऱ्यांनी संगनमताने चालविलेल्या गैरव्यवहारांना व वसुलीच्या नावाखाली नेमलेल्या दलालांना पाठीशी घालण्यात आल्याचेच दिसून आल्याने मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्‍न आयुक्त कार्यालयाला पडला आहे.


   

तरुणभारत च्या पत्रकाराचा पुरवठा अधिकारी च्या दालनात धुडगुस...

चोपडा ( जळगाव )- दिनांक -२५/०५/२०१२ वेळ सायंकाळी ६ ची ठिकाण -चोपडा इथील पुरवठा अधिकारी यांचे दालनात ''मार्च एन्डींग'' साठी सुमारे अर्धा तास या ''नंद ''लीला सुरु होत्या....सोबत दोन पत्रकार हि होते ...मार्च एन्डींग ची भेट इतर पत्रकारांना आधी का दिली आणि मलाच का नाही दिली याचा राग येवून या बहाद्दराने सोबत दोन सहकाऱ्यांना घेवून मद्यधुंद अवस्थेत सुमारे अर्धा तास गोंधळ घालत इतर पत्रकारांना हि शिवीगाळ केली....अचानक झालेल्या या प्रकाराने पुरवठाधिकारी पुरते घामेघूनम झाले होते ....समजूत काढण्याच्या भूमिकेत असलेले अधिकार्यांना या पत्रकाराने ''माझ्या वर खंडणीचा गुन्हा दाखल करा माझे कोणीच काही करू शकत नाही '' असे म्हणून हाताने ओढण्याचा हि प्रयत्न केला .....हा सगळा धुडगुस सुरु असतांना याच कार्यालयातील एका हुश्शार कर्मचाऱ्याने सगळा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करून घेतला......तर याच पत्रकारा सोबत असलेल्या एका सहकार्याने झाल्या प्रकाराची रेकॉर्डिंग हि करून घेतली....आपले नाव न सांगण्याच्या अटीवर महसूल कचेरी आवारातील एका अधिकाऱ्याने हा प्रकार आम्हाला कळवला असून सदर प्रकारची तक्रार चलचित्र सहित संबधित वृत्त पत्राच्या वरिष्ठान पर्यंत करणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले ......तसेच काहि पत्रकार ''माहितीच्या अधिकाराचे'' अस्त्र वापरून महुसूल अधिकाऱ्यांना ब्लेक मेल करीत असल्याचे हि या कर्मचाऱ्याने सांगितले.....

ता.क .- सदर प्रकारची महसूल कर्मचारी संघटनेने दखल घेतली असून या संबधी पुढील कार्यवाही साठी विचार विनिमय सुरु असल्याचेही कळते आहे....

सोमवार, २८ मे, २०१२

कोळी समाजाच्या आंदोलनात फोटोग्राफर जखमी तर मध्यस्ती मस्त...

जळगाव- रविवारी झालेले कोळी समाजाचे आंदोलन आटोपण्याच्या परिस्थितीत असताना अचानक जमावाने फोटोग्राफर व पोलिसांवर जोरदार दगड फेक सुरु केली. या दगडफेकीत कव्हरेजसाठी आलेले
दैनिक भास्कर चे  प्रवीण गायकवाड, दिव्य मराठीचे  आबा मकासरे हे दोन्ही फोटोग्राफर जखमी झाले, तर आबा मकासरे यांना पाच ते सात युवकांनी घेराव करून त्यांचा कैमेरा पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र  तेथे एक  पोलीस अधिकारी धावत आल्याने आबा मकासरे यांची सुटका झाली. नंतर दोघांवर  दुपारी जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आला. घडलेला प्रकारची माहिती आंदोलकाच्या पदाधिकार्यांना देण्यात आली. त्यांनी झालेल्या घटनेची निंदा व्यक्त केली. मात्र यावेळी एक घाणेरडा प्रकार उघडकीस आला मिडिया आणि आंदोलक यांच्यातील एका मध्यस्ती [फोटो पत्रकार ] याने झालेल्या घटनेचे भांडवल करीत. १५ हजार लाटल्याचे समजले. आज दिवसभर फोटो पत्रकारांची  झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा रंगत होती.

शनिवार, २६ मे, २०१२

प्रभू गोरे यांना पत्रकारितेत पीएच.डी.

   औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रभू व्यंकटराव गोरे यांना पत्रकारितेत नुकतीच पीएच.डी. प्रदान केली. 


‘नवाकाळचे संपादक नीलकंठ खाडिलकर यांच्या अग्रलेखांचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागप्रमुख डॉ.वि.ल.धारूरकर यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल प्रभू गोरे यांचे प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे, प्रा.जयदेव डोळे, प्रा.सुरेश पुरी, प्रा.डॉ.दिनकर माने, शिवाजी धात्रक, संतोष साठे आदींनी अभिनंदन केले आहे.

दैनिक युगधर्मचा विस्तार

मध्य भारत आणि विदर्भ प्रांतात गेली ६५ वर्षे प्रसिद्ध असलेले हिंदी दैनिक युगधर्म यांनी हळुवारपणे पावले टाकत आपला विस्तार करण्याचे ठरवले आहे. सध्या पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारित करण्याची प्रबंध संपादक आणि मालक अरुण जोशी यांची योजना आहे.  त्यासाठी विदर्भात कुठल्याही प्रेसमध्ये नसतील अशी अद्यावत मशिनरी त्यांनी आपल्या हनुमान नगर, महाल या नागपूर येथील प्रिंटींग प्रेस मध्ये ठेवली आहे. त्याचबरोबर संपूर्ण फोर कलर पेपर सुरु करणारे यंत्र देखील बसवले जात आहे. एकूण सहा वृतपत्रे श्री. अरुण जोशी नागपूरहून चालवतात. मुंबईतून येणाऱ्या बातम्यादेखील युगधर्म मध्ये प्रामुख्याने दिसून येत आहेत. त्यासाठी मुंबईचा संपादकीय विभाग अशोक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. 

रविवार, २० मे, २०१२

दुसर्‍याची ती - बाई...

मातृदिनानिमित्त पुण्यात मुख्यालय असलेल्या साखळी दैनिकाच्या मुख्यसंपादकांनी पुरवणीची पाने रंगवून स्वतःच्या मातेची महती सांगताना साने गुरूजींच्या मातेला कमीपणा येईल अशी वक्तव्ये बेमालूमपणे लेखात व्यक्त केली आहेत. त्याचा पंचनामा बेरक्याने आपल्या शैलीत केलाच आहे. मात्र, महाराष्ट्रभर साहित्याचा पाईक म्हणून चेहरा लाभलेल्या या मुख्यसंपादकांची इतरांच्या बाई- बाळींविषयी खासगीतील मते अत्यंत खालच्यास्तरावरील आहेत, याचे अनुभव अनेकजण सांगतात. स्त्रीभ्रूण हत्येविषयी किंवा महिलांच्या सन्मानाच्या दिवशी (महिला दिन, मातृदिन वगैरे) मुख्यसंपादक अत्यंत चेव आल्यासारखे अग्रलेख पाडतात. (होय पाडतात हा शब्द एवढ्यासाठीच की सकाळी 12 गावच्या 12 संपादकांची विषय निवडण्यासाठी मोबाईल कॉन्फरन्स होते. आपल्या आवडीचा विषय घेऊन त्यावर मोजून मगत्यावर ओळी पाडल्या जातात. बर्‍याचवेळी चंद्रात भाकरी दिसत असल्याची उपमा वापरली जाते. कोणतीही ठोस भूमिका न मांडता गोल गोल मत मांडले जाते. आपलाच अग्रलेख आपणच 10 वेळा वाचून तो किती अभ्यासपूर्ण आहे, ही माहिती युवा मालकापासून इतर संपादकांना दिली जाते. जवळचे दोन-तीन भाट संपादक दुसर्‍यादिवशी अग्रलेख लोकांना आवडल्याचे सांगतात. गंमत म्हणजे आवडणारे कोण असतात ?  हे कधीही विचारले जात नाही. जावू द्या हे मुख्यसंपादकांच्या फिरस्तीत होणार्‍या विषयांतरासारखेच झाले). तर मी काय सांगत होतो...आई विषयी लिहीण्याचे पेटंट या मुख्यसंपादकांकडेच आहे. मग ते आई विषयी मजकूर पाडण्याची संधी पाहतात. आई विषयी लिहिण्यासाठी त्यांचे हात - बोटे शिवशिवतात... मात्र, आपल्या घरी (बंगल्यात) कोणी भेटायला आले तर बैठकीत समोर बसलेल्या आईला आत जायला सांगतात.
मुख्यसंपादक बायांविषयी कसे वागतात याच्याही कहाण्या अनेक जण रंगवून सांगतात. मूळात मुख्यसंपादकांच्या पत्नीचा नाशिक जिल्हा मराठा संस्थेतील सुरूवातीचा काळ अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. नाशिकच्या ओक बंगल्यात खालच्या खोल्यांमध्ये राहणारे संपादक कसे वागत? हे त्यावेळी तेथेच राहणारे इतर संपादकिय सहाकारी सांगतात.
मुख्यसंपादकांना महिला सहकारी भरण्याची भारी हौेस होती. सुरूवातीच्या काळात 5- 10 बाया बापड्या आल्या. मध्यंतरी दोन - दोन पहिला पीए होत्या. या महिलांचे अनुभव सुद्धा स्तंभीत करणारे आहेत. मुख्यसंपादक प्रत्येक महिला उपसंपादकास यल्लमा देवीचा कहाणी सांगत. त्यानंतर विषय नग्नपूजेकडे जायचा. मग, मला मारायला लोक आले... मी पोस्टमन कडून पैसे घेतले... तेथून जीव वाचवून पळालो...ही कहाणी रंगवून सांगत. तेव्हाच्या महिला, मुली नग्नपूजेसारखा विषय ऐकून बावचळून जात (कारण तेव्हा लैंगिक शिक्षण देण्याची अशी पद्धत नव्हती). काही कक्षाबाहेर येवून रडत.
एका महिला सहकार्‍यास मुख्यसंपादक चित्रपटाला घेवून गेले. त्यानंतर काही दिवसांनी तिच्याशी वाद विकोपाला गेला. तेव्हा पुण्याहून महिला अधिकारी चौकशीसाठी आल्या. संबंधित मुलीने कोर्टांत दावा केला होता. त्यात तपशिल सेक्सशूअल हरॅशमेंटचा होता. बचावासाठी मुख्यसंपादकांनी सांगितले, होय मी कोर्टात सांगणार...माझे या मुलीशी शारिरीक संबंध होते. तेथे तीची बदनामी होईल. मला काय त्याचे...वकिल नवरा असलेल्या मुलीनेनंतर बदनामी टाळण्यासाठी माघार घेतली.
नासिकच्या एका प्रसिद्ध लॉ कॉलेजच्या माजी पदाधिकार्‍याच्या भाचीनेही मख्यसंपादकांच्या विषयी अशाच आशयाची तक्रार केली होती.
मुख्यसंपादकाच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी पुण्याहून त्यावेळच्या सरव्यवस्थापक (पुण्यातील मालकाच्या कोल्हापुरातील पुतणी) नासिकला आल्या. त्यांना मुख्यसंपादकांचे अनेक प्रताप कळले.
तेव्हा हे नासिक आवृत्तीचे संपादक असलेले महाशय सरव्यवस्थापक बाईंचा उल्लेख आमच्या कोल्हापुरातील बाई (त्या मॅडम कोल्हापुरातील होत्या) असा करीत. आणि पुढे पुस्ती जोडत की, कोल्हापुरात फडात नाचणार्‍या बाईला आम्ही बाई म्हणतो बरे...मालकाच्या पुतणीविषयी संपादक काय काय म्हणत...?
संपादकांनी स्वतःच्या पत्नीला फारशा कार्यक्रमातून कधी नेले नाही. साहित्य प्रांतात अध्यक्षपद पदरात पाडून घेतल्यानंतर नासिकमध्ये झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या दोघांचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्य पत्नीचा चेहरा कळला. नासिकच्याच एका मॉलमध्ये एका प्राध्यापिकेसह हे संपादक महाशय गेले होते. तेथे एका परिचिताने सोबत वहिनी वाटते, असे विचारले होते. त्यावर संपादक केवळ हसले (ही मूक संमती असावी का?) अखेर ती प्राध्यापिकाच ओशाळून नाही म्हणाली...

(ताजा कलम - दैनिकात पान 4 वर पशूहत्या बंदीचे गुळमुळीत समर्थन करणारा अग्रलेख लिहिणारे हे संपादक महाशय त्याच्या दुसर्‍या दिवशी दैनिकाच्या वर्धापनदिनाला मटणाची मागणी करीत. ते करताना कोल्हापूरच्या रस्सामटणाची मागणी करीत. त्यावेळी व्यवस्थापकही कोल्हापुरातील होते. मग दोघेही आम्ही कसे मटण दिले, यावरच गप्पा रंगवत असत..)

बुधवार, १६ मे, २०१२

लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाचं अतिशय फालतू सदर

1)
नमस्कार बेरक्या,

लोकसत्तामध्ये गेल्या काही महिन्यांपासून 'वाचावे नेटके' नावाचं एक अतिशय फालतू सदर संपादकीय पानावर सुरु झालेलं आहे. ब्लॉग्जच्या ओळखी करून देण्याच्या नावावर या सदरात ब्लॉगर्सना यथेच्छ लाथाळी केली जाते. आणि त्याहीउपर म्हणजे अतिशय विचित्र आणि अगम्य भाषेत लेख लिहिलेले असतात. मागे एकदा समस्त स्त्री ब्लॉगर्सच्या लिखाणावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली गेली होती. काही आठवड्यांपूर्वी अगदी विनाकारण, काहीएक संबंध नसताना माझ्या ब्लॉगवर (www.harkatnay.com) आणि महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर (www.kayvatelte.com) वैयक्तिक चिखलफेक झाली. मी त्याला माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिलं. त्यानंतर काही आठवडे आडून आडून आणि गेल्या सोमवारी पुन्हा एकदा थेट माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन टोमणे मारले गेले. हे सगळं का चालू आहे याची मला कल्पना नाही पण चालू आहे एवढं खरं. गेल्या सोमवारच्या प्रकारानंतर मी संपादक गिरीश कुबेर यांना पत्र लिहिलं आणि तेच पत्र माझ्या ब्लॉगवरही टाकलं. त्या पत्रात मी खुलासेवारपणे त्यांच्या सदरातून माझ्या ब्लॉगला कसे टोमणे मारले गेले आहेत आणि एकूणच मराठी ब्लॉगर्सना वेळोवेळी कशी नावं ठेवली गेली आहेत याचे सगळे पुरावे दिले. कहर म्हणजे संपादकीय पानावर मिरवणाऱ्या या स्तंभात 'च्यायला' आणि 'बुडाखाली' यासारखे वृत्तपत्रीय भाषेला न शोभणारे शब्द राजरोसपणे वापरले गेले आहेत. असो.

गिरीश कुबेरांना लिहिलेलं पत्र माझ्या ब्लॉगवर या दुव्यावर वाचता येईल. त्याखालच्या प्रतिक्रियाही नक्की वाचा म्हणजे सर्वसामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया लक्षात येतील. वृत्तपत्र आणि पत्रकार यांना 'बेरक्या' च वठणीवर आणू शकतो अशी कीर्ती ऐकून असल्याने तुम्हाला मेल करतो आहे. तुम्हाला जे काही शक्य होईल ते करावे ही विनंती. धन्यवाद.

आपला
हेरंब ओक
 heramboak@gmail.com



2
नमस्कार,

लोकसत्ता मधे दर सोमवारी वाचावे नेटके हे सदर लिहिले जाते. लिहिणारा टोपण नावाने लिहीतो,अभिनव गुप्त.   ह्याचे खरे नांव काय  आहे ते माहिती नाही,
सध्या हा माणूस अगदी अगम्य भाषेत काहीतरी लिहून वैयक्तिक टिपण्या करतोय ब्लॉगर्स वर. त्यातल्या त्यात हेरंब ओक आणि मी त्याच्या खास शुटींग टार्गेट वर आहे. एक पत्र पाठवलं होतं गिरिश कुबेरला, पण त्याने पण त्या पत्राचा उपयोग बातमीत अतिशय वाईट रितीने करून घेतला.

त्याला उत्तर म्हणून एक लेख लिहिला होता काय वाटेल ते ब्लॉग  वर, " कुरकुरे" नावाचा.

या  लेखानंतर त्याचे असे वागणे थांबेल असे वाटले होते पण , नंतरही  त्याच्या सदरा मधे  विक्षिप्तपणे माझ्यावर आणि हेरंब वर कॉमेंट्स करत असतोच.
नुकतेच एक पत्र  मी  आणि   हेरंबने पण गिरीश कुबेरांना पाठवले.  त्यालाही उत्तर दिलेले नाही गिरीश कुबेरांनी

हे सगळं करण्यामागचा त्यांचा उद्देश टीआरपी मिळवणे आहे असे दिसते. आमच्या वर टीका केली की मग आम्ही त्यावर उत्तर  देणारच, आणि त्याच्या सदराला प्रसिद्धी  वाढणार आणि वाचक मिळणार..सगळं काही टीआरपी साठी करताहेत कुबेर आणि तो अभिनव गुप्त. वाचक मिळवण्यासाठी  लोकसत्ताला या पातळीवर यावं लागतंय??

काय करावे? त्यावर पुन्हा  पुन्हा आम्ही लिहिलं< तर त्याची प्रसिद्धी वाढते, नाही लिहिलं तर तो जास्तच सोकावतोय.
बेरक्या काही मदत करू शकेल का?
महेंद्र


  गिरीश कुबेरांना लिहिलेले पत्र खालीजोडलेले आहे.
---------- Forwarded message ----------
From: Mahendra <kbmahendra@gmail.com>
Date: 2012/5/15
Subject: A letter from Heramb
To: "girish.kuber" <girish.kuber@expressindia.com
>


श्री गिरीश कुबेर यांस,
स.न.
मी  तुम्हाला लिहिलेले वैय्यक्तिक पत्र तुम्ही पेपर मधे  ज्या पद्धतिने
वापरले   , त्यावर मला काही म्हणावयाचे नाही. फक्त तो तुम्ही  माझ्या
कंबरेखाली केलेला वार होता एवढेच मला सांगावेसे वाटते.   वैयक्तिक पत्र
पाठवल्यावर वैय्यक्तिक उत्तर अपेक्षित असते,    पण कदाचित तुम्हाला तसे
वाटत नसावे.

 तसेच त्या नंतर ( म्हणजे माझ्या पत्रानंतर)  सुध्दा   त्या  अभिगुप्तला
त्याच्यावर आणि हेरंब वर  वैय्याक्तिक टीका करण्यापासून रहावले नाही.
दुसऱ्या आणि नंतरच्या आठवड्यात पण वैय्यक्तिक टिका केलेली आहे.

 तुमच्या बद्दल एक  अर्थशास्त्राचा गाढा अभ्यासक आणि चांगला लेखक म्हणून
एक आदर होता/अजूनही थोडा शिल्लक आहे.   ज्या तऱ्हेने तुम्ही अभिगुप्तला
सपोर्ट करीत आहात ,त्याच प्रकारे सुरु राहिले तर कदाचित तो पण  फार काळ
शिल्लक रहाणार नाही.

 ज्या प्रमाणे माझे पत्र तुम्ही प्रसिद्ध केलेत, तसेच हेरंब ओक ने
तुम्हाला  एक ओपन लेटर लिहिले आहे,त्याची लिक इथे देतोय.हे पत्र आणि
त्यावरच्या प्रतिक्रिया जर तुम्ही वाचावे नेटके मधे छापल्या तर ते  सदर
सध्या ज्या तऱ्हेने सदर जात आहे त्या पेक्षा निश्चितच वाचनिय़ होईल. जर
तुमची खरच हिम्मत असेल छापा ते पत्र जसेच्या तसे.. कॉमेंट्स पण छापल्या
तरी हरकत "नाही".
http://www.harkatnay.com/2012/05/blog-post_13.html
 

सोमवार, १४ मे, २०१२

शैलेंद्र चव्हाण इस्त्राईलच्या अभ्यास दौरयावर रवाना

मुंबई :  मुक्त कृषी पत्रकार शैलेंद्र चव्हाण हे नुकतेच इस्त्राईलच्या कृषी अभ्यास दौरयावर रवाना झाले आहेत. दहा दिवसांच्या या दौरयात ते तेल अवीव येथील तीन वर्षांनी होणारया आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार प्रदर्शनास भेट देतील. अल्मोग भागातील चीबूत आदिवासी जमातीकडून होणारया सामूहिक शेतीचाही ते अभ्यास करतील. चीबूत जमात सहजीवनाने रहाते व प्रत्येकाला आवडीचे काम करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यातून त्यांनी खडकाळ माळरानांवर हरित क्रांती घडवून आणली आहे. सामूहिक शेतीतून दर्जेदार खजूर, कलिंगड, टोमाटो आणि केळीचे पीक घेण्यात चीबूत तरबेज मानले जातात. याशिवाय इस्त्राईलमधील जैविक प्रकल्प आणि रोबोटिक डेअरी फार्मिंग प्रकल्पांना भेट देवून त्यांची माहितीही घेतली जाणार आहे.  जलसिंचन, सूक्ष्म पाणीवापर आणि पाण्याचे पुनर्प्रक्रिया याचाही अभ्यास या दौरयात केला जाईल. शैलेंद्र चव्हाण यांनी पुण्याच्या रानडे इनस्टीट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली आहे. गेली आठ वर्षे ते सकाळ समूहाच्या एग्रोवन दैनिकात खानदेश प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. अलीकडेच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला असून आता त्यांनी म्हसावद (जि. जळगाव) येथील स्वत:च्या १०० एकर शेतीत आधुनिक पीकपद्धतीचे प्रयोग सुरू केले आहेत. कृषी पत्रकारितेच्या क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. केळी, कापूस तसेच सूक्ष्मसिंचन, प्रगतीशील शेती यात त्यांचा विशेष अभ्यास आहे.

रविवार, १३ मे, २०१२

श्यामची आई नि संपादकांची आई...

जागतिक मातृदिनी १३ मे रोजी मीडियात बरेच काही छापून आलं. सकाळमध्ये जरा जास्तच. अगदी शब्दकोडं, भविष्य लिहिणा-या कुडमुड्यांनीही आईवर लेखणी घासली. सप्तरंगच्या २४ पानांचा एकूण एक कोपरा आईवरच्या लिखाणानं भरला होता. चांगलं आहे. अलिकडं सकाळनं या विषयाचा इतका चावून चोथा केला की बास. याचं कारण मुख्य संपादकांचा आई हा विषय फार जवळचा. आपली आई आणखीच ग्रेट. मागं त्यांची आई इंग्रजीत प्रसिद्ध झाली. त्या दिवशी सकाळच्या झाडून आवृत्त्यांना आईच्या महतीचं कव्हर चढलं. इंग्रजीत त्याला जॅकेट म्हणतात. या जॅकेटवर अर्थातच मुख्य संपादकांची आई! (म्हणजे लेख, पितृदिनाला वडिलांवर लेख).  कालच्या सप्तरंगमध्ये पुस्तक परिचयात कहरच झाला आहे. पाच पुस्तकांची परीक्षणं छापली आहेत. श्यामची आई व इतर तीन आयांच्या पुस्तकांना प्रत्येकी १०-१२ ओळी तर संपादकांच्या `आई समजून घेताना' पुस्तकाला ३२ ओळी. या पुस्तकाचं कव्हरही इतर चार पुस्तकांपेक्षा दुप्पट आकाराचे! खरी गंमत पुढं आहे. पुस्तक परिचयाच चक्क लेखकाचे कोट घेतले आहे. श्यामची आई आणि त्यांची आई या तुलनेवर ते म्हणतात, "साने गुरुजींनी लिहिलेली श्यामची आई ही कादंबरी आहे तर माझी अक्का (आई) ही वस्तुस्थिती आहे. दोघींचे जीवन भिन्न आणि त्या जगत असलेल्या व्यवस्थाही भिन्न!"  पुढं या पुस्तकाचे देशात-परदेशांत कसे स्वागत झाले...चौदा आवृत्त्या कशा निघाल्या....समीक्षेवर पारितोषिकं कशी लावली...हजारो वाचकांनी पुस्तक वाचले...असे वर्णन आहे. असेलही खरे. श्यामची आई पुस्तकाच्या फक्त "शेकडो" प्रती खपत आहेत. असा ओझरता उल्लेख आहे. (गेल्या ६० वर्षांत श्यामची आई या पुस्तकाच्या किती प्रती खपल्या याची गिनती करणारा संपेल. पण गिनती पुरी होणार नाही.)
बाकी राहू देत...साने गुरुजींची केवळ श्यामची आई लिहीली एवढीच ओळख होती का? त्यांचे जीवन म्हणजे करुणेचा मोठा इतिहास होता. केवळ दलितच नाही तर समाजातल्या हरेक दुबळ्या वर्गासाठी त्यांनी लढा दिला. उपेक्षित, वंचितांना हुंकार दिला. स्वातंत्रलढ्यात वैचारिक नेतृत्व दिले. हजारो निःस्वार्थी कार्यकर्ते घडविले. कुण्या जातीचे-पंथाचे अशी त्यांची ओळख मुळीच नव्हती. ते जगत असलेली व्यवस्था उसन्या अधिकारावर जगणा-या लेखकांनी मागीतली तरी मिळणार  नाही.  साने गुरुजींनी आयुष्यभर स्वतःला क्लेश करवून घेतला. (दुस-याला दिला नाही)  मानधनं आणि पुस्तकांचे गठ्ठे मिळतात म्हणून यांनी कधीच भाषणं दिली नाही. त्यांच्या करुणामय वक्तृत्वानं अनेक पिढ्या घडल्या. सानेगुरुजी कथामाला हे त्याचे फलीत. या आयुष्याची अखेरही करुणामय झाली. दुःख असह्य झालं तेव्हा गुरुजींनी स्वतःला संपविले. त्यावेळी ते कफल्लक होते. त्यांच्याकडे सरकारी कोट्यातला फ्लॅट होता ना गबर बँकबॅलन्स. श्यामची आई असल्या  "मदर्स डे" ची मौताज मुळीच नाही. "श्यामच्या आई"शी उगीचच तुलना करुन कुणी स्वतःला मोठं समजत असेल तर समजोत बिचारे! त्यांच्याशी वाद घालायला गुरुजी आहेत कुठं?  असते तरी त्यांचा टिकाव या ''व्यवस्थेनं" लागू दिला असता?

शुक्रवार, ११ मे, २०१२

अमरावती लोकमतला भगदाड

लोकमतच्या अमरावती कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांनी काल एकाच वेळी लोकमतचा राजीनामा दिला. हे सारे कर्मचारी पुण्य नगरी मध्ये जाणार असल्याचे समजते. नागपूर पाठोपाठ अमरावतीतही कर्मचाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरु झाल्यने लोकमतला विचार करावा लागणार आहे . अरुण मंगळे,  शशांक लावाके, प्रेमदास वाडकर , आणि संजय भोपळे या कर्मचाऱ्यांनी लोकमत ला सोडचिट्ठी दिली . यापैकी मंगळे हे गेल्या 23 वर्षापासून लोकमत मध्ये होते. एवढे जुने आणि निष्ठावान कर्मचारी लोकमत सोडून जात असतानाही लोकमत चे शेठजी मात्र आपल्या मस्तीतच आहे. ज्यांना जायचं आहे ते खुशाल जावू शकता, आम्ही कोणालाही थांबविणार नाही, ही त्यांची भाषा आहे. या चौघांपाठोपाठ उमेश शर्मा , रवी खांदे , ओजास्विनी असणारे गोपाल हरणे , राजेश जवंजाळ , संजय पंड्या, संतोष  भुजाडे हे कर्मचारी ही लोकमतला लवकरच रामराम करणार असल्याची माहिती आहे. असेच वातावरण लोकमतच्या अकोला. वाशीम, बुलडाणा येथील कार्यालयात आहे. तेथील राजू ओढे, अजय दंगे, मनोज भिवगडे, राजरत्न   सिरसाट, सदानंद सिरसाट  नागेश घोपे, राजेश शेगोकार, सनात आहाळे , योगेश बडे, सिद्धार्थ आराख आदी कर्मचारी नाराज असून इतर वर्तमानपत्रांच्या व्यावास्थ्पानाच्या संपर्कात आहे. लोकमत च्या तालुका प्रतिनिधीमधेही मोठी नाराजी आहे.

गुरुवार, १० मे, २०१२

एग्रोवनला आणखी एकाचा रामराम

सकाळ-एग्रोवनचे सिनीअर सबएडीटर दीपक चव्हाण यांनी एग्रोवनला रामराम केला आहे. मुळचे कास्तकार असलेले चव्हाण एग्रोवन सुरू झाला तेव्हापासून तेथे होते. अतिशय अभ्यासू, कष्टाळू व प्रामाणिक अशी त्यांची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमा पट्ट्यातले मूळ असलेले चव्हाण यांनी एग्रोवनमधील पुरवण्या व विशेष विषयांचे काम चांगल्या पद्धतीने केले. कमअस्सल लोकांना अधिक वेतन, बाहेर दौ-याच्या संधी मिळत गेल्याने तसेच कामाचे समाधान नसल्याने ते काहीसे नाराज होते. गेल्या तीन चार महिन्यांत शैलेंद्र चव्हाण (जळगाव), सुदर्शन सुतार (सोलापूर), आश्वीन सवालाखे (नागपूर) या जुन्या लोकांनी एग्रोवन सोडले आहे. ज्यांना बाहेर संधी मिळू शकत नाही असे लोक केवळ रडतखडत काम करीत आहेत. 

पगार वाढीनंतरही सकाळमध्ये नाराजी कायमच

पुणे - कामांचे कथित मूल्यमापन केल्यानंतर करण्यात आलेल्या वेतन वाढीनंतरही सकाळ मधील कर्माचा-यांमध्ये अजूनही प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे पगार वाढीनंतर देखील सकाळमधून पुन्हा मोठा पोळा फुटणार आहे. इतर पेपरमधून सकाळमध्ये आलेल्या लोकांना कंपनीने १२ ते ५० हजार रुपये असा घसघशीत पगार देण्याचा सपाटा लावला आहे. याउलट सकाळमधील जे कर्मचारी खरच इतक्या मोठ्या पगाराच्या लायकीचे आहेत त्यांना मात्र  ४ हजार..९ हजार..१० हजार...१५ हजार अश्या वेतनावर नेऊन ठेवत सकाळने गधे आणि घोडे आमच्यासाठी सारखेच आहेत हे सिद्ध केले आहे.
सकाळमधील संगणक कर्मचारी कंपनीला रामराम ठोकत असल्याने अलीकडेच त्यांना एका तात्पुरत्या कंपनीच्या रेकोर्डवरून सकाळवर घेण्यात आले. परंतु त्यांच्या कडूनही तोच जुलुमी करार करून घेतल्या जाण्याची शक्यता आहे, ज्यात सकाळ सोडून गेलेले अनेक कर्मचारी अडकले आहेत. आपल्या जुन्या कर्माचा-यांवर अन्याय करण्याची सकाळची सवय खूप जुनी आहे. सकाळ व्यवस्थापन वृत्तपत्र जगतात पाटी कोरी असलेला एखादा कर्मचारी २० हजार रुपयांवर घेईल पण जुन्या कर्माचा-यांचे वेतन २० हजार करणार नाही. बर इतके प्रचंड वेतन देऊनही जो नवा कर्मचारी सकाळ घेते तो एक तर सकाळमधून सगळे काही शिकून घेतो आणि दुस-या कंपनीत दुप्पट वेतनावर निघून जातो. डिवचल्या जातो तो बिचारा जुना कर्मचारी. या वर्षी ही वेतनवाढ करताना हिच चूक पुन्हा सकाळने केली आहे. 
सकाळच्या या वागणुकीमुळे वेतनवाढ केल्यावरही कंपनीला कर्मचारी फुटीचा मोठा फटका सहन करावाच लागणार आहे. लवकरच भास्कर समुहाचा डीएम विदर्भात येत आहे. त्याने आपली पाळेमुळे जळगाव खानदेशातून विढर्भात पसरविणे सुरु केले आहे. महाराष्ट्र टाईम्स सुद्धा नागपुरातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तिकडे भास्कर समुहाचा सर्वात मोठा स्पर्धक असलेला जागरण हा पेपर देखील महाराष्ट्रात येत आहे. अशात कर्माचा-यांना जाणीवपूर्वक दुखविण्याचा प्रचंड मोठा फटका सकाळला बसणार आहे, ज्याची कंपनीच्या अधिका-यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. या वेळी होणारी ही फुट इतकी गंभीर असेल, कि एकेकाळी सकाळची खरी ताकद असलेली 'क्रीम टीम' बाहेर पडेल. विशेष म्हणजे यंदा कर्मचारी सकाळने नोटीस दिल्यास सामुहिक वकील करून उलट कंपनीवरच भारतीय संविधानाने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारा करार लिहून घेण्याचा खटला भरण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी सकाळने विनाकारण डिवचलेल्या लोकांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे. हा सगळा प्रकार झाला नोकरी सोडून गेल्यावर सकाळने नोटीस बजावल्यास किंवा भविष्य निर्वाह निधीचा अर्ज लवकर न दिल्यास. परंतु त्यापूर्वी बाहेरून आलेल्यापेक्षा घरच्यांची ओंजळ जास्त रिकामी ठेवल्याच्या प्रकाराच जबर झटका सकाळला सोसावा लागणार आहे.  
खरेतर आपली कंपनी हे आपले एक कुटुंब असते हे सकाळकारांना कळीला हवे. पूर्वी असेच वातावरण सकाळमध्ये होते. कंपनीतील माणसांच्या कामाची आणि माणुसकीच कदर केल्या जात होती. जे खरोखर प्रामाणिक असतील त्यांना त्या प्रमाणे पद आणि पैसा दिल्या जात होता. परंतु सकाळची संध्याकाळ होऊ लागली आणि सुरु झाली उलट गिनती. या उलट गिनतिची चाहूल त्याच दिवशी लागली होती ज्यादिवशी सकाळ नावाच्या लहानश्या रोपट्याचे वटवृक्ष करणा-या विजयाताई पाटील यांना खड्यासारखे बाहेर काढण्यात आले. सकाळने कर्मचारी गळती रोखण्यासाठी काय नाही केल. धमक्या दिल्या...करार लिहून घेतले....सोडून गेलेल्या लोकांना वकिलामार्फत नोटीस बजावल्या...तरीही सकाळ सुडून जाणा-यांची गळती काही थांबली नाही. त्यामुळे सकाळने दहा वर्षाचे अहवाल.. गावांचे सर्वेक्षण...केआरए...स्कोरकार्ड... जाहिरात टार्गेट... फालतू आणि भिकारचोट बातम्यांमधून मिळणारी अंकवाढ... इवेन्टमधून पैसा.... परीक्षांमधून पैसा....यामागे न धावता आपल्या मुळ ब्रांडला मजबूत करण्याकडे जास्त लक्ष द्यावे. 
सकाळकरांनी पुण्यात बसून उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्येक युनिटच्या ठिकाणी जाऊन कर्माचा-यांशी संवाद साधावा. नेमकी वस्तुस्तिथी जाणून घ्यावी, सकाळचा खप आणखी कसा वाढेल यासाठी आपल्याकडे काय कमी आहे.. मनुष्यबळ...संगणक..इंटरनेट जोडण्या...मोडेम सेंटर... बातमीदारांना वेतन..युनिटच्या ठिकाणी बसलेल्या अधिका-यांनी चापलुसी यावर स्वतः लक्ष घालावे. आपली शेती पडीत ठेऊन दुस-याची बटाइने घेणे किंवा अति शहाण्या मजुरांच्या भरवश्यावर कसदार जमीन आणि भरलेले शेत सोडून झोप काढणारा नेहेमी गोत्यातच येतो या इसाप नीतीमधील गोष्टीतून काहीतरी बोध घ्यावा. त्यासाठी बाहेरहून कोणता सूर्या...सरदार... अथवा इतर कोणी खुर्चीत बसविण्याची गरज नाहीच.

शुक्रवार, ४ मे, २०१२

पत्रकारांवरील त्रासावर संसदेत झाली चर्चा

नवी दिल्ली- संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना त्यासाठी आवश्‍यक प्रवेश मिळण्यास प्रचंड त्रास होतो. राज्यसभेच्या "बाबूशाही'कडून तर याबाबत अडवणूकच केली जाते, असा नेहमीचा अनुभवाचा विषय राज्यसभेत आज गाजला.

प्रश्‍नोत्तराच्या तासात अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना (पीआयबी कार्डधारक) उपनगरी व मेट्रो रेल्वेतही तिकिटात सवलत मिळावी, असा प्रश्‍न होता. याला जोडून कॉंग्रेस सदस्य विजय दर्डा यांनी राज्यसभेचा प्रेस पास मिळण्यात पत्रकारांना येणाऱ्या अडचणींची व्यथा मांडली. ते म्हणाले, की लोकसभेचा पास एक वर्षात मिळतो. राज्यसभेचा तोच पास मिळण्यासाठी किमान तीन वर्षे वाट का पाहावी लागते? सभापती हमीद अन्सारी यांनी दर्डा यांचा प्रश्‍न मूळ प्रश्‍नाशी संबंधित नसल्याच्या नियमावर बोट ठेवून फेटाळला. परंतु, पत्रकार कक्षातून मात्र याच प्रश्‍नाला जोरदार पाठिंबा मिळाल्याचे चित्र होते.

उन्हातान्हात संसदेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी विजय चौकात एखादे निवारा शेड बांधण्यात यावे, अशी जोरदार मागणी राज्यसभेच्या माजी उपसभापती नजमा हेपतुल्ला यांनी केली. याबाबत "सकाळ न्यूज नेटवर्क'ला त्यांनी सांगितले, की संसदेत वातानुकूलित सभागृहात बसून होणाऱ्या चर्चेचे वार्तांकन करण्यासाठी राष्ट्रीय प्रसार माध्यम प्रतिनिधी, कॅमेरामन यांना मात्र विजय चौकात उन्हात काम करावे लागते. 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्यावेळी अनेक कॅमेरामन यांनी जिवावर उदार होऊन चित्रीकरण केले होते. अतिरेक्‍यांना पकडण्यासाठी मदत झाली होती. तरी विजय चौकात निवारा शेड बांधून पाण्याची व्यवस्था करण्याची माझी मागणी आहे.

खासगी बाबीत हस्तक्षेप
राज्यसभेचा कायमस्वरूपी पास मिळण्यासाठी किमान 20 संसद अधिवेशनांचे (किमान सव्वातीन वर्षे) सातत्याने वार्तांकन करावे लागते. मात्र, पास मिळण्यासाठीही राज्यसभेच्या बाबूशाहीकडून पत्रकारांचा मानसिक छळ होतो. अनेक पत्रकार वैतागून राज्यसभेत वार्तांकनास जात नाही, असेही दिसून येते. राज्यसभेतही प्रसारमाध्यम सल्लागार समिती आहे; पण कागदाला पेन न लावताही संसदेत "ज्येष्ठ पत्रकार' म्हणून मिरविणारे राज्यसभा समितीचे अनेक सदस्य नवख्या पत्रकारांना मदत करीत नसल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष पास देणाऱ्या लोकसभा व राज्यसभा कार्यालयातील कर्मचारी खासगी बाबींत नाक खुपसतात. राज्यसभेतील बाबूशाहीने 25 वर्षीय पत्रकाराला "तुम्ही पाच वर्षांचा कामाचा अनुभव दिला आहे. मग, तुम्ही पदवी तरी घेतली आहे की नाही? कोणत्या महाविद्यालयातून घेतली? असे प्रश्‍न विचारून भंडावून सोडल्याचा अनुभवही ताजा आहे.

मंगळवार, १ मे, २०१२

चरण पाटील यांची हकालपट्टी


'दिव्य मराठी जळगाव'च्या हंगामी चीफ रिपोर्टर पदावरून चरण पाटील यांची हकालपट्टी; स्वत:च्या मुलाच्या मोफत प्रवेशाच्या बदल्यात संबंधित संस्थेची विनापरवानगी, बेकायदा बांधलेल्या इमारतीचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा पोलखोल करणारी सनसनीखेज स्पेशल स्टोरी दाबून ठेवणे नडले; आता साधा वार्ताहर म्हणून कामा करण्याची तयारी नसल्याने हगवणीचे खोटे कारण सांगून दांडी .

* महाराष्ट्र टाइम्समधील अनेकांना प्रमोशन ... संजय व्हनमाने, नरेश कदम स्पेशल करस्पोन्डन्ट; राजीव काळे चीफ सब एडिटर

फेसबुक वर शेअर करा

Facebook