> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, २९ जून, २०१२

उत्तम कांबळे यांना पुरस्कार मिळालाच नाही...

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाने एक वर्षापुर्वी सकाळचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांना कै.प्रमोद महाजन स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता.मात्र त्याचे अद्यापही वितरण न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक पत्रकार संघ आहेत.मात्र उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ (मराठी पत्रकार परिषद सलंग्न) व उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ (राज्य मराठी पत्रकार संघ सलंग्न )यांच्यात स्पर्धा आहे. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी धनंजय रणदिवे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तर अनंत अडसूळ उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे भारत गजेंद्रगडकर अध्यक्ष असताना सुनील ढेपे उपाध्यक्ष होते.ढेपे यांच्या सुचनेवरून या संघाने अनंत भालेराव स्मृती पुरस्कार सुरू केला.त्याची परंपरा अनेक वर्षापासून चालू आहे. तीन वर्षापुर्वी मतभेदातून उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ स्थापन झाला.या संघानेही इर्षेला पेटून एक वर्षापुर्वी ५१ हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे स्वरूप असलेल्या कै.प्रमोद महाजन स्मृती पुरस्काराची घोषणा केली व पहिला पुरस्कार सकाळचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांना जाहीर केला.मात्र एक वर्षे झाले तरी या पुरस्काराचे वितरण नाही.याबाबत माशी कुठे  शिंकली , हे कोणास ठावूक..मात्र ज्यांच्या आर्थिक मदतीवर या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती, त्यांनी रक्कमच दिली नसल्यामुळे या पुरस्काराचे वितरण होत नसल्याचे समजते.
उत्तम कांबळे यांना पुरस्कार घोषित करण्यात आल्यानंतर त्याच्या मोठ - मोठ्या बातम्या सर्वच वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्या होत्या.सकाळनेही ठळक प्रसिध्दी दिली होती.पुरस्कार घोषित करून, तो ने देणे हा संबंधितांचा सर्वात मोठा अपमान आहे.उत्तम कांबळे यांचा उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे जो अपमान केला आहे, त्याचा निषेध करावा,तेवढा थोडा आहे.याबाबत अनंत अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता, याबाबत मूग गिळून गप्प आहेत.

'उस्मानाबाद लाइव्ह' वरून साभार  

गुरुवार, २८ जून, २०१२

मुंबई, ठाण्यातल्या काही घडामोडी ...

१) "कृषीवल" मधून संजय आवटेना " टांग'' दिलेला रविराज कुचेकर सध्या मुंबई मित्रमध्ये. 
२) ठाण्यातील दैनिकामध्ये आणखी एक लवकरच भर. मुंबई महापालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी सौदागर जाधव यांच्या '' जन खुलासा'' दैनिकाचे काम जोरावर , गावकरी सोडून गेलेल्या अर्चना कांबळे, सोनाली रासकर या सांभाळतायात  धुरा.  
३) दैनिक "जनमुद्रा"ची वाताहत ... पेपर स्टोलला नाही. आठवड्यातून दोन - तीन वेळा प्रकाशित.
४) कैलाश म्हापदींचा  झंझावात आता कलर मध्ये ... दैनिक '' जनादेश '' आता रंगीत मध्ये येणार... अधून मधून रंगारंगीची '' झलक '' सुरु . 
५) ठाण्यातील हिंदी दैनिक  "दिनमान टाइम्स" बंद.
६) मुंबई मित्र मधून  प्रभाकर सूर्यवंशी  पुन्हा "गावकरी" त  " इन'' , "मित्र" मधून राम खांदारेही गावकरीत.
७ ) ले आउट आर्टीस्ट गौतम आर्यांची  दैनिक "मुंबई लक्षदीप" मधून विकेट , महिना भरापासून झालेत अस्वस्थ.
८) पुण्यातील "बहुजन महाराष्ट्र" च्या ठाणे आवृत्तीला हवा तसा जोर अद्याप नाही.. धर्मानंद कांबळे या युवा पत्रकाराची  खप वाढविण्यासाठी धडपड कायम. 
8) "महानायक" सोडून गेलेले  '' नायक ''  व्यंगचित्रकार अशोक सुतार सध्या '' कर्नाळा" दैनिकात. पौकेट कार्टून ची बहार पुन्हा फुलणार...  
९) अनघा धोंड्ये सह अजून एका उप संपादकीचा दैनिक  '' संध्याकाळ'' ला राजीनामा ; '' बाई" ना  कंटाळल्या.  सध्या शोध मोहीम सुरु ....
१०) राणेच्या '' जय महाराष्ट्र"  न्यूज चॅनल कडे सध्या नवख्या युवा पत्रकाराचे लक्ष ... बायोडाटे देऊन अजून बोलावणे नाही.

'बेरक्या'चा आवाज बंद करण्याचा कुटील डाव

बेरक्या ब्लॉग विषयी काही पिसाळलेले पत्रकार दररोज विविध अफवा पसरावित आहेत.ज्यांच्या ढुंगणाला मिरच्या लागल्या, तेच अशा अफवा पसरावित आहेत.या अफवांकडे चाणाक्ष पत्रकारांनी लक्ष देवू नये, अशी विनंती आहे.
वृत्तपत्र मालक , पत्रकार व कर्मचा-यांचे जे शोषण करीत होते, त्यातून बेरक्या ब्लॉगची निर्मिती झाली आहे.भविष्यात ज्या - ज्या वेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकरांचे नाव निघेल, त्या - त्या वेळी बेरक्याचाही उल्लेख केला जाईल, असे ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी विचारवंत जयदेव डोळे नेहमीच म्हणतात. जयदेव डोळे हे अनेक पत्रकारांचे गुरू असून, ते सहसा कोणाची स्तुती करीत नाहीत.त्यांनी  काढलेले गौरवोद्गार आमच्यासाठी ISO प्रमाणापत्र आहे.
बेरक्या ब्लॉग बंद करण्यासाठी काही मालक टपले आहेत. पत्रकारांचा आवाज घोटण्याचा हा कुटील डाव आहे.हा डाव उधळून लावण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.आपण सहकार्य नाही केले तर पत्रकारांचा पाठीराखा - बेरक्या पोरका होईल.त्यासाठी कोणालाही भीक न घालता एकत्र येवू या.चांगले पत्रकार एकत्र आले तर बेरक्या जिवंत राहील व  लोकशाहीचा चौथा खांब पुन्हा एकदा मजबूत होईल.

आपलाच
बेरक्या उर्फ नारदजाता - जाता : आम्ही स्वत:ला कधीच ग्रेट मानत नाही व जांभेकरांची कधीच तुलना करीत नाही.बेरक्या हा पत्रकारांचा कॉमनमॅन आहे. दबलेल्या व पिचलेल्या पत्रकारांना न्याय देण्याचे काम बेरक्याने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे.या ब्लॉगचा वापर आम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी कधीच केला नाही व करणार नाही.
मालक लोकांच्या आम्ही विरोधात नाही, मात्र त्यांच्या चुकीच्या धोरणाविरोधात आहोत.ज्या पत्रकार व कर्मचाऱ्यांमुळे वृत्तपत्र चालते, त्यांच्यावर मालकांनी अन्याय करू नये,अशी आमची भूमिका आहे.अनेक पत्रकारांना अचानक काढून टाकले जाते, गरज सरो वैद्य मरो, अशी मालकांची प्रवृत्ती असले तर त्यावर प्रहार नको का?

जळगाव गांवकरीतून सतीश अग्रवाल यांना नारळ

जळगाव- येथील गांवकरीचे व्यवस्थापक सतीश अग्रवाल यांना व्यवस्थापनाने परवाच नारळ दिले असून त्यांनी पुन्हा देशोन्नतीमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
अत्यंत मिठ्ठास वाणी असणार्‍या सतीश अग्रवाल यांनी जळगाव येथील देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख म्हणून सुमारे पाच वर्षे काम केले. यानंतर विदर्भातील मातृभूमि हे वर्तमानपत्र जळगावला आणण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या काळात तापी पतपेढीसह अन्य पतपेढ्यांवर मालिका लावण्यात आल्या अन् अचानक बंद झाल्या. यामागील कारण मातृभूमिकार बियाणी परिवाराच्या लक्षात येण्याआधीच त्यांनी मातृभूमि बंद केला. यानंतर त्यांनी गांवकरीचा रस्ता पकडला.
 याच काळात गांवकरीची धुरा ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांनी सांभाळली होती. गुरव यांनी मोठ्या मेहनतीने मरणपंथाला लागलेल्या गांवकरीमध्ये नवीन प्राण फुंकले. या वर्तमानपत्राचा अंक हलू लागला. मात्र गुरव यांच्या मेहनतीला सतीश अग्रवाल यांनी खर्‍या अर्थाने ‘कॅश’ केले. हे सारे होत असतांना अग्रवाल यांचा भलत्याच प्रकरणांमधील ‘इंटरेस्ट’ही चर्चेचा विषय बनला. जिल्ह्यात त्यांनी स्वत:चे ‘नेटवर्क’ उभारले होते. यामुळे नाशिक येथील मंडळीचे त्यांच्यावर ‘लक्ष’ होते. यातच त्यांना व्यवस्थापनाने परवाच नारळ दिल्याचे वृत्त आहे. अग्रवाल हे आपणास स्वातंत्र्य नसल्याने आपण गांवकरीवर लाथ मारल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र नाशिककरांशी संबंधीत एका प्रकरणामुळे व्यवस्थापनाने त्यांना अर्धचंद्र दिल्याचे समजते. सतीश अग्रवाल यांच्या जाण्यामुळे कर्मचारी सुखावले आहेत. मात्र गुरव यांच्या मेहनतीला योग्य न्याय देण्यासाठी व्यवस्थापनाने थोडा उदार दृष्टीकोण स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, गांवकरीनंतर काय करावे? या विचारात असणार्‍या अग्रवाल यांनी पुन्हा देशोन्नतीमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्यांनी अमरावतीला जाण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र यापूर्वीचा ‘अनुभव’ पाहता देशोन्नतीचे व्यवस्थापन त्यांना पुन्हा जवळ करेल याबाबत साशंकता आहे. अग्रवाल यांच्या जाण्यामुळे गांवकरीतील बहुतांश कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. अर्थात आता ते कुणाला ‘शेंडी’ लावतात? याकडे वर्तमानपत्रसृष्टीचे लक्ष लागून आहे


आता धो.ज.गुरवाना रान मोकळे  !
जळगाव - जळगाव गावकरीला आर्थिक स्थेर्य हे अग्रवाला मुळे मिळाले .ज्या गावकरीत ३-३ महिने पगार होत नव्हते तेथे  अग्रवाल आल्या पासून पगार वेळेवर होऊ लागले होते.पण ते गेल्यामुळे  कर्मचारी सध्या कमालीचे चिंतेत आहेत.धो. ज.गुरव आल्या पासून त्यांनीच आपले जुने वार्ताहर (लोकमत,देशदूत ) परत गावकरीत आणायला सुरुवात केली.त्यामुळे बरेच जुने वार्ताहर दुसऱ्या दैनिकात गेले.विजय राजहंस गेल्या नंतर धो.ज.गुरव यांना अग्रवाल यांनीच आणले त्यासाठी त्यांनी व्यवस्थापकाना बड्या मेहनतीने तयार केले (गुरव यांचा जुना इतिहास पाहता)जे तयार नव्हते ते तयार झाले. .अग्रवाल व व्यवस्थापक यांच्या मध्ये दैनिकाच्या  किमत वाढी वरून वाजल्याचे कळते.मात्र एवढे निचित कि गुरवना आता रान मोकळे झाले आहे.व आता देशदूत व लोकमत मध्ये असताना सारख्या मालिका सुरु होतील.

बुधवार, २७ जून, २०१२

पत्रकार पार्टे मारहाण प्रकरणी पाच जणांना अटक

माणगाव - लोकमतचे इंदापूर वार्ताहर धनंजय पार्टे यांना माणगावमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे, तर तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
धनंजय पार्टे हे एका कार्यालयात बसले असताना स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा राग मनात धरून शेकापच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खेचून कार्यालयाबाहेर काढले. मुंबई-गोवा रस्त्यावरून कचेरी रोडपर्यंत फरफटत आणून त्यांना जबर मारहाण केली. वाहतूक पोलीस भोईर यांनी संतप्त कार्यकर्त्यांना रोखून पार्टे यांना पोलीस ठाण्यात नेले.
धनंजय पार्टे यांनी आपला विनयभंग केल्याची व खंडणी मागितल्याची तक्रार शेकाप कार्यकर्त्या वर्षा कोलिष्टे यांनी केली आहे. याप्रकरणी
पोर्टेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगांव कोर्टाने ५ जणांना ३0 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. म्हसळा - माणगाव तालुक्यातील शासकीय शैक्षणिक निधीच्या अपहाराला वाचा फोडणार्‍या पार्टे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ म्हसळय़ातील पत्रकारांच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली आहे. 

नवशक्तीने दिला दहा जणांना '' नारळ ''

मुंबई - "जनसामान्याची महाशक्ती" असलेल्या नवशक्तीने  परवाच १० कर्मचार्यांना " नारळ '' दिलाय ... सध्या नवशक्तीच्या वातावरणात कामगार युनियन आणि प्रशासन यात '' "कोल्ड वॉर" सुरु आहे. याची झळ कर्मचार्यांना पोहोचतेय .... 
परवा हे  कर्मचारी  नित्य नियमाने कामावर आल्यावर त्यांना सिक्यूरिटीने  संपादकीय विभागात जावू न देता एखाद्या गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देत दुसऱ्या माळ्यावरील एच. आर.  '' देशपांडे'' बाईंची गाठ घ्यायला सांगितली, आणि हे सगळे कोडे उलगडले . अचानक झालेल्या या प्रकारामुळे हे कर्मचारी  काहीसे सुन्न झालेत. मात्र , '' त्या '' दिवशी नवशक्तीच्या कार्यालयातहि वातावरण गढूळ होते. संपादकीय  विभागाच्या रुपाली पेठकर- जोशी, वैशाली कांबळे, सुजाता सोरटे, लहू सरफरे, सुशांत मोरे,  यांना कामावरून कमी करण्यात आले. कामावरून कमी करण्याचे कारणही काय? तर म्हणे ...'' आपल्याला १६ पानाच्या ऐवजी आता १४ पानच करायचीत ''
 असे फुटकळ कारणाने हे कर्मचारीही जरा चक्रावले. डीटीपी  विभागातील सुभाष कांबळेनाहि याचा फटका पडलाय. विचारे तसेच अंतिम आणि जितु या  दोघा शिपायांना देखील '' कामगार कपात '' च्या नावाखाली कमी करण्यात आले.   अचानक झालेल्या या प्रकारामुळे  "जनसामान्याची महाशक्ती"असलेला नवशक्तीचा निगरगट्ट पण पुन्हा एकदा अधोरेखित झालाय .....

मुंबई पत्रकार भवनात "पत्रकार मेळावा"

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शुक्रवार दिनांक ६ जुलै, २०१२ रोजी सायंकाळी ०५.३० वाजता पत्रकार भवनात "पत्रकार मेळावा" आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार श्री एस.के.कुलकर्णी हे महनीय वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून पत्रकार संघातर्फे विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच काही ज्येष्ठ पत्रकारांचा सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानही करण्यात येणार आहे.

मंगळवार, २६ जून, २०१२

आणखी एका पत्रकारावर हल्ला

महाराष्ट्रातील आणखी एक पत्रकार राजकीय पुढाऱ्यांच्या हल्ल्याचा शिकार ठरला.घटना आहे रायगड जिल्हतील माणगावची.माणगाव येथील पत्रकार धनंजय पार्टे यांच्यावर शेकापच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी प्राणघातक हल्ला करून त्यांना जखमी केले.त्याचे डोके फोडण्यात आले आहे.हल्ला एवढा भीषण होता की,गेभीर जखमी झालेल्या पार्टे   उपचारासाठी मुंबईला हलवावे लागले आहे.
    माणगाव तालुक्यातील बामणोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम सुरू आहे.हे काम शेकापच्या ठेकेदाराला दिल्याची माहिती आहे.बांधकाम अध्याप 25 टक्के देखील पूर्ण झाले नसले तरी शेकापच्या ताब्यातील जिल्हा परिषदेने ठेकेदाराचे बिल अदा केले आहे.ही माहिती पार्टे यांनी माहितीच्या अधिकाराखाली उघड केली आहे.नंतर त्यासंबंधिची बातमी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाली केली.बातमीमुळे शेकापच्या पुढाऱ्यांचे बिंग फुटल्याने संतप्प झालेल्या पुढाऱ्यांनी सोमवारी पार्टे यांच्या कार्यालयात घुसून त्यांना बेदम मारहाण केली.पाच-पन्नासजणांचे शेकापचे टोळके पार्टे यांच्या कार्यालयात घुसले.पार्टे यांना मारहाण केली.यामध्ये जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानदेव पवार यांच्या पत्नी अंजली पवार यांचाही समावेश होता असे सांगण्यात आले.पार्टे यांना मारहाण करण्यात आली आणि वरती त्यांच्यावरच आता विनयभंगाची तक्रार अंजली पवार यांनी दिली आहे .पत्रकारांवर हल्ले करायचे आणि त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवायचे ही शक्कल राज्यभर अवलंबिली जात आहे.माणगावमध्येही तेच केले गेले आहे.या घटनेच्या विरोधात रागयडमधील पत्रकार एकजूट झाले असून त्यांनी आता 29जूनला मोर्चा काढण्याचा निर्णयघेतला आहे.रायगड प्रेस क्लब,मराठी पत्रकार परिषद आणि महाराष्ट्र पत्रकार हल्ला  विरोधा कृती समितीने या घटनेचा तिव्र धिक्कार केला आहे.1ऑगस्ट 2009 नंतरची राज्यातील पत्रकारावरील हल्लयीची ही 221 वी घटना आहे.पत्रकारांना राज्यात काम करणे कठीण झाले असताना सरकार अजूनही पत्रकार हल्ला विरोधी कायदा करण्यास  टाळाटाळ करीत आहे.या अधिवेशनात एक खाजगी बिल येणार आहे.त्यातून काय निष्पण्ण होते ते बघायचे.


एस.एम.देशमुख यांच्या ब्लॉगवरून साभार  

विश्वास नांगरे - पाटील यांना "आदित्य गौरव "पुरस्कार घोषित

औरंगाबाद - आदित्य प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणारा "आदित्य गौरव "पुरस्कार विश्वास नांगरे - पाटील   (अतिरिक्त पोलिस आयुक्त, मुंबई )यांना घोषित झाला आहे .मागच्या वर्षी हा पुरस्कार समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना देण्यात आला होता.
आदित्य प्रकाशनाचे संचालक विलास फुटाणे यांच्या संकल्पनेतून सकालेला हा पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो . विश्वास नांगरे पाटील यांनी २३/११ ला जो मुंबईवर आतंकी हल्ला झाला होता .तो हल्ला त्यांनी
तळहातावर प्राण घेऊन रोकला.होता त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे अनेकांचे प्राण वाचले .त्याच्या या कर्तव्य कठोर कार्याबद्दल त्याना हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे

लोकमतच्या यवतमाळ आवृत्ती प्रमुखाची अशीही घोडचूक

यवतमाळ - नागपूर लोकमतच्या हॅलो यवतमाळ पानावर दि.२६ जून रोजी एका दरोडयाविषयी बातमी प्रसिध्द झाली आहे.दरोड्यातील मास्टर माईंड गजाआड असे या बातमीचे शिर्षक आहे.बातमी बरोबर आहे, मात्र या बातमीत वापरण्यात आलेला फोटो संबंधित दरोडेखोराऐवजी चक्क संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवश्री सुधीर देशमुख यांचा वापरण्यात आला आहे.त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.ही घोडचूक यवतमाळ आवृत्ती प्रमुखांची असली तरी लोकमतला फार मोठी किंमत मोजावी लागत आहे.लोकमत प्रशासन आता संबंधितांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष वेधले आहे.

ताजा कलम - या घोडचुकीला यवतमाळ आवृत्ती प्रमुख जसा जबाबदार आहे,तशाच नागपूर डेक्सवरील संबंधित इन्चार्जही जबाबदार आहे.त्यामुळे दोघांपैकी कोणावर लोकमत कारवाई करणार, याकडे लक्ष वेधले आहे. 

रविवार, २४ जून, २०१२

`सरहद'ने उठवला लोकमतकरांचा बाजार

पुण्यातील पत्रकारांची खाबुगिरी कोणत्या थराला गेली आहे आणि खालपासून् वरपर्यंत सगळीकडे कशी खाबुगिरी चालली आहे याचे  किस्से अनेकदा ऐकायला मिंळतात. पत्रकारीतेला कलंक असलेल्या या खाबू गटाची अंदाधुंदी गेल्या काही वर्षात भयानक वाढली आहे. त्यामुळे बिल्डर्स, शैक्षणिक संस्थांचे चालक आणि शासकीय अधिकारी त्रस्त झाले आहेत. त्याला लगाम घालण्याची आवश्यकता होती. `सरहद' या संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी अखेर मांजराच्या गळ्यात घंटा बांधलीच.
                नहार यांनी काश्मीर प्रश्नी केलेल्या महान कार्यानंतर तेथील निर्वासित मुलांसाठी शाळा व महाविद्यालय सुरू केले. पंधरवड्यापूर्वी नहार यांना लोकमत कार्यालयातून सातत्याने `बाविस्करांना भेटा' असे निरोप मिळत होते. ते ज्यापद्धतीने दिले जात होते की चाणाक्ष नहारही स्तंभित झाले. त्यांनी काही दिवस या निरोपांकडे दुर्लक्ष केले. अखेर त्यांना `तुमच्याविरुद्ध एक बातमी आहे. ती आम्ही थांबवली आहे. बाविस्करांना भेटा' असा निरोप मिळाला. त्यावर ते लोकमतच्या कार्यालयात गेले. तेथे नेहमीप्रमाणे बाविस्कर नव्हतेच. त्यामुळे तेथील जोशींशी नहार यांनी संपर्क साधला. त्यावर बातमी असल्याचा निरोप खरा असल्याचे जोशी यांनी त्यांना सांगितले. पण बातमी कसली हे सांगितले नाही. त्यानंतर दुस-याच दिवशी अर्धा पानभर `सरहद' शैक्षणिक संस्थेची बातमी 16 जूनच्या अंकात झळकली. ती पूर्णत: निराधार असल्याचा नहार यांचा दावा आहे. त्यासाठी त्यांनी लगेच खुलासा करणारी पत्रकार परिषदही घेतली. पण, त्याच दिवशी सकाळी झालेल्या संपादकीय बैठकीत (योगायोगाने) हजर असलेल्या बाविस्करांनी त्यांचा खुलासा देण्याची गरज नाही असे ठणकावून सांगितले. अखेर पुरवणीत चार ओळींचा खुलासा छापण्यास ते राजी झाले. पण या मागे असलेला बाविस्करांचा डाव आणि त्यांची वृती उघड करण्याचा विडा नहार यांनी उचलला. त्यासाठी त्यांनी त्यांच्या देशभरात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ असलेल्या शेकडोजणांना मोबाईलवरून मेसेज पाठवून बाविस्करांचा बुरखा फाडला. तसेच त्यांच्याविरुद्ध हायकोर्टात दावाही दाखल केला. दरम्यान विदेशात असलेल्या विजयबाबू दर्डांना हे वृत्त समजले. त्यांनी नहार यांची समजूत काढली. भारतात परतल्यावर बोलून ठरवू असे त्यांना आश्वासन दिले. पण नहार यांच्या सर्वच मित्रांनी त्यांना वृत्तपत्रांच्य पडद्याआड चाललेल्या शोषणाविरुद्ध लढण्यास पाठींबा दिला आहे. त्यामुळे लोकमतकार चांगलेच गोत्यात आले आहेत.
                पुणे महापालिकेतील चाचा चौधरी, झेडपीतील भोईटे-जाधव टोळी आणि आपण पत्रकार आहोत असा दावा करून करंदीकर-पेंडसेंच्या तुंबड्या भरणारा घा-या परांजपे आणि त्याचे बगलबच्चे असे कितीतरी दुकानदार सध्या पुण्यात धुदगुस घालत आहेत. निरनिराळ्या नेत्यांच्या पत्रकार परिषदांना उपस्थिती लावून आणि वेडवाकडे प्रश्न विचारून ख-या पत्रकारांना मान खाली घालायला लावणारा घा-या परांजपे कुठल्याही पेपरचा पत्रकार नाही. मग तो पत्रकार संघात लुडबुद करतोच कसा? राष्ट्रवादीच्या `अंकुश' बरोबर रात्री जागवून निरनिराळ्या पक्षाच्या नेत्यांशी करंदीकर-पेंडसे जोडगोळीचे सेटींग करून ते आणि परांजपे किती गब्बर झालेत हे सर्वांना माहिती आहे. झेडपीमध्ये `उद्योग' वाढल्याने प्रभातकारांनी श्यामतात्यांना खड्यासारखे दूर केले. स्मार्ट मित्रामध्ये मात्र त्या बीटच्या जाधवरावांकडून मिळणा-या गलेलठ्ठ पाकीटांमुळे सर्वकाही आलबेल आहे. गेली आठवडाभर जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिका-याविरुद्ध मालिका चालवून त्याच्यावर कारवाई व्हायच्यावेळी मात्र त्याचे नाव का गाळले गेले? याचा तपशील मुंबईत पानवलकरांपर्यंत पोहोचला आहे. एवढे दिवस खालच्या पातळीवर चाललेली ही खाबुगिरी लोकमतला बाविस्कर आल्यावर एकदम वरच्या पातळीवर गेली.  कोथरुडमधील एका `भाऊं'च्या पुढेपुढे करून त्यांनी घर कसे मिळवले? ते दिवस-दिवस कसे गायब असतात? कोणाचाही फोन उचलता न् येण्याएवढे  ते कोणत्या `काम'गिरीत मग्न असतात हे आता सा-या पत्रकारांना माहिती झाले आहे. या सर्वांचा बुरखा कोणीतरी टरकवण्याची आवश्यकता होती. नहार यांनी सुरुवात केली आहे. त्यात अनेकजण उघडपणे सहभागी होतील आणि येत्या काही दिवसांत हे खाबुगिरी करणारे पत्रकार समाजासमोर नंगे होतील. त्यासाठी पुण्यातील एका जबाबदार समाजघटकाने मोहिम सुरू केली आहे आणि त्यात काही ख-या पत्रकारांचाही समावेश आहे.

दैनिक लोकमत, पुणे दि.16 जून
शनिवार, २३ जून, २०१२

युगधर्माचे प्रबंध संपादक अरुण जोशी यांना पीएच.डी.


नागपूर येथून प्रकाशित होणारे हिंदी दैनिक युगधर्मचे प्रबंध संपादक अरुण जोशी यांना नुकतीच पीएच.डी ही पदवी मिळाली आहे. दैनिक युगधर्म, देश (मराठी व हिंदी), उद्याची खबर आज, विदर्भ पुकार अशा वृत्तपत्रांच्या समूहाचे ते प्रबंध संपादक आहेत. त्याशिवाय विदर्भात अनेक शिक्षणसंस्था ते चालवतात. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधनाचा विषय होता - अ स्टडी ऑफ सोशिओ सायाकोलोजिकल को-रिलेशन ऑफ लीडरशिप बिहेवियर ऑफ प्रिन्सिपाल्स, हेड्स इन कॉलेजेस. शिलॉंग (मेघालय) येथील सी. एम. जे. विद्यापीठाच्या कला शिक्षण शाखेने ही पदवी दिली आहे.


                                                                       
                                                                          
नाशिकमध्ये डी.एम.चे नव्याचे नऊ दिवस संपले

नाशिक - नाशिकमध्ये लोकमतची मक्तेदारी संपविण्यासाठी एका मोठ्या दैनिकाची गरज होती.डी.एम.आल्यानंतर आता लोकमतची मक्तेदारी संपेल, असे लोकांना वाटले होते,मात्र लोकमत आहे,तिथेच आहे,  डी.एम.चा काडीचाही परिणाम झाला नाही.
नाशिकमध्ये लोकसत्तात चमकदार कामगिरी करणारे जयप्रकाश पवार डी.एम.ला अजूनही उभारी देवू शकले नाहीत.त्यांच्या नेतृत्वाखालील संपादकीय टीम लोकमतला अजूनही टफ देवू शकली नाही.डी.एम.बद्दल नाशिकमध्ये लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे.
भास्कर ग्रुपच्या डी.एम.ने गतवर्षी औरंगाबादहून सुरूवात केली.नंतर नाशिक,जळगाव,सोलापूर आवृत्ती सुरू केली.वर्षे झाले तरी मराठवाड्यातील नांदेड,लातूर,हिंगोली,परभणीला अजून अंक सुरू झालेला नाही.नगर शहरात अंक असला तरी नगर जिल्हा अजूनही बाकी आहे.डी.एम.चे पहिले बारा पाने म्हणजे उडप्पाचे जेवण वाटते.लोकांना मराठवाडा रसा हवा आहे.डी.एम.जोपर्यंत आक्रमक होत नाही,तोपर्यंत लोकमतशी स्पर्धा करू शकत नाही.
औरंगाबाद डी.एम.बरा असला तरी नगर,जळगाव आवृत्ती फेल असल्याचे सांगण्यात येत आहे.नाशिक,सोलापूर आवृत्ती जेमतेम आहे.आता डी.एम.ची कोल्हापूर,पुणे आवृत्तीची तयारी चालू असली तरी, जुना अनुभव पाहता, अनुभवी व चांगले पत्रकार डी.एम.कडे येण्यास इच्छुक नाहीत.मोठे पॅकेजचे त्यांना आमिष दाखविण्यात येते,मात्र हे पॅकेज संबंधिताची गरज संपल्यानंतर बंद होते,हेही नसे थोडके.

दैनिक दिव्य मराठी, नाशिकपाहिजेतची जाहिरात केवळ दोन हजारात

वृत्तपत्रात संपादकीय,वितरण,जाहिरात आदी विभागात जागा भरण्यासाठी जाहिरात दिली जाते.मोठ्या वृत्तपत्रात जाहिरात देवून मोठी रक्कम खर्च करण्यापेक्षा बेरक्या ब्लॉगवर केवळ दोन हजारात एक दिवस, पाच हजारात तीन दिवस जाहिरात दिली जाणार आहे.अन्य जाहिरातीही अल्प दरात दिल्या जाणार आहेत.
बेरक्या ब्लॉगवर जाहिरात म्हणजे, प्रचंड प्रतिसाद.अनुभव घ्या व परत सांगा....
संपर्क
बेरक्या उर्फ नारद
berkya2011@gmail.com

लिंकसाठी अल्प दर...

मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणाऱ्या  बेरक्या उर्फ नारद ब्लॉगवर आता फुकट लिंक टाकणे बंद करण्यात आले आहे.ज्यांना आपल्या वृत्तपत्राच्या वेबसाईटची लिंक टाकायची असेल, त्यांना दरमहा एक हजार मोजावे लागतील.सहा महिन्याचे व वर्षाचे पॅकेज घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी सवलत देण्यात आली आहे.तर या संधीचा लाभ घ्या व आजच संपर्क साधा...
बेरक्या उर्फ नारद
berkya2011@gmail.com

आवश्य वाचा...

शुक्रवार, २२ जून, २०१२

बेरक्या ब्लॉगवर आता जाहिराती...

महाराष्ट्र, देश व विदेशातील लाखो मराठी वाचकांचा लाडका बेरक्या उर्फ नारद ब्लॉगवर आता जाहिराती स्वीकारणे सुरू करण्यात आले आहे.या ब्लॉगला दररोज हजारो वाचक भेट असतात, म्हणूनच केवळ एक वर्षात या ब्लॉगने पाच लाख हिटस् चा टप्पा गाठला आहे.या ब्लॉगवर जाहिरात म्हणजे, जबरदस्त प्रतिसाद आहे.तेव्हा ज्यांना जाहिरात द्यायची असेल, त्यांनी आमच्या ई - मेलवर ( Berkya2011@gmail.com ) विनंती पत्र व जाहिरातीचे आर्टवर्क पाठवून द्यावे.त्यांना मेलवरून रेट सांगितला जाईल.तेव्हा जाहिरात पार्टींनी ही सुवर्णसंधी सोडू नये.

मराठी वाचकांचा लाडका,
बेरक्या उर्फ नारद

गुरुवार, २१ जून, २०१२

कोल्हापूर म.टा.चे लॉचिंग लांबले

कोल्हापूर - कोल्हापूर म.टा.साठी टीम तयार झाली असली तरी लॉचिंग आता जुलै ऐवजी ऑगस्ट महिन्यात होणार आहे.
कोल्हापूर म.टा.साठी जी टीम निवडण्यात आली आहे, त्यांना ऑफर लेटर देण्यात आले होते.पैकी बहुतांश जणांनी होणार देवून, करारपत्राची पुर्तता केली आहे.ज्यांनी करारपत्र दिले आहे, त्यांना 23 जुलै रोजी जॉईन होण्यास सांगितले आहे.यावरून कोल्हापूर म.टा.चे लॉचिंग 15 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर आवृत्तीची सर्व पाने पुण्यात पाठविली जाणार आहेत. पुण्यात ती तपासून पुन्हा कोल्हापुरात येवून प्रिंट होणार आहेत.त्यामुळे कोल्हापूर व पुण्यात दोन वेगवेगळे डेक्स राहणार आहेत.निवासी संपादक पराग करंदीकर यांच्यावरच कोल्हापूर आवृत्तीची जबाबदारी राहणार आहे.
असो, म.टा.च्या कोल्हापूर आवृत्तीसाठीबेरक्याच्या शुभेच्छा....

बुधवार, २० जून, २०१२

आवश्य वाचा...

मंगळवार, १९ जून, २०१२

मुख्यमंत्र्यासोबत चर्चा


सोमवार, ११ जून, २०१२

नगर सकाळचा विक्रमी वर्धापनदिन, डीएम लोकमतला चिंता

वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या नगर पंचवीस वर्षांनंतर या विशेषांकाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन करताना उपस्थित मान्यवर.
अहमदनगर - सकाळच्या नगर आवृत्तीचा वर्धापनदिन नुकताच धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळने 200 पानी विशेषांक प्रकाशित करून जाहिरातीच्या रुपाने 1 कोटी 11 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविल्याचे सांगण्यात येते. याशिवाय वर्धापनदिनाचा शानदार सोहळा आयोजित करून नगर जिल्ह्यात एक नवा विक्रम केला आहे. आता लवकरच लोकमत आणि दिव्य मराठीचा वर्धापनदिन येत आहे. त्यामुळे सकाळच्या तुलनेत तो कसा साजरा करायचा याची चिंता त्यांना लागली आहे.

सकाळ, पुढारी, दिव्यमराठीमार्गे पुन्हा सकाळमध्ये निवासी संपादक म्हणून दाखल झालेले बाळ ज. बोठेपाटील यांच्यासमोर वर्धापनदिनाचे आव्हान होते. ते सकाळमध्ये परत आल्यावर पुन्हा आपले वर्चस्व निर्माण करू शकतील का, याबद्दल उत्सुकता होती. त्यामुळेच त्यांनी आपली सगळी शक्ती आणि संपर्क पणाला लावून विशेषांकासाठी जाहिराती संकलित करण्याचे नियोजन केले. 25 वर्षांनंतरचे नगर असा विषय घेऊन 200 पानांचा विषेशांक काढला. तो सगल चार दिवस टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आला. आपल्या वीस वर्षातील संपर्काचा कस लावून बोठेपाटील यांनी या विशेषांकाचे काम केले. त्यासाठी त्यांना कार्यालयातील आणि जिल्ह्यातील सहकाऱयांची चांगली साथ मिळाल्याचे दिसून आले.
वर्धापनदिनाचा कार्यकम म्हणजे एखाद्या मंगल कार्यालयात हजार-पाचशे लोकांच्या उपस्थितीत होणारा पनसुपारीचा कार्यक्रम आणि तेथे दिली जाणारी आइस्कीम, काॅफी फार तर वडापाव अशीच अातापर्यंतची नगरमधील सकाळसह सर्वच वृत्तपत्रांची पद्धत होती. यावर्षी सकाळने मात्र हा कार्यक्रमही शानदार केला. एखाद्या स्वागत समारंभासारखा त्याचा थाट होता. सुमारे पाच हजार लोकांनी त्याला उपस्थितीती लावली. भव्य दिव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. हजारो खुच्यार् टाकण्यात आल्या होत्या. सलाम तरुणाईचा ही गाण्यांची मैफिल आयोजित करण्यात आली होती. याशिवाय जिल्ह्यात विविध क्षेत्रात नावलैकिक मिळविलेल्या पाच जणांचा यामध्ये सत्कार करण्यात आला. पालकमंत्री बबनराव पाचपुते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महापाैर शीला शिंदे, शहर व जिल्ह्यातील आमदार यावेळी उपस्थित होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सकाळ माध्यमसमूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. नगरच्या कार्यक्रमास ते प्रथमच उपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यासमवेत पुण्यातून सर्व विभांगाचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. खाण्याचा मेनूनही वेगळा होता. दहा प्रकारचे दिल्ली चाट अ‍ॅटम ठेवण्यात आले होते. त्यामुळे नगरकरांनी त्यावर मनसोक्त ताव मारला. पूर्वी सफारीत आणि आता साध्या पँटशर्टमध्ये दिसणारे बोठेपाटील या कार्यक्रमात मात्र सुटाबुटात वावरत होते.
नगरकरांचे डोळे िदपविणारा हा कार्य्रकम इतर पेपरवाल्यांसाठी मात्र अवघड बनला आहे. कारण आता इतरांनाही असाच मोठा कार्यक्रम आणि मोठी पुरवणी काढण्याचे उद्दिष्ठ स्वीकारावे लागणार आहे. त्याची चर्चा याच कार्यक्रमात करण्यात येत होती. एकूणच सकाळने नगरमध्ये आता एक नवा विक्रम केला असून वेगळा पायंडाही पाडला आहे. लोकमतचा वर्धापन दिन 15 ऑगस्टला तर दिव्य मराठीचा 16  ऑक्टोबरला आहे. त्यामुळे सकाळचे हे प्रमुख दोन स्पर्धक तो कसा साजरा करतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
वर्धापनदिन म्हटले की, विशेषांक काढून जाहिरातीचे उत्पन्न स्वतःच्या पदारात पाडून घेणे, अशीच आतापर्यंतची पद्धत आहे. यावेळी मात्र सकाळने मिळालेल्या उत्पन्नातील मोठा वाचकांसाठी खर्च केला. त्यामुळे आता इतरही वृत्तपत्रांकडून वाचकांची अशीच अपेक्षा असेल.

गुरुवार, ७ जून, २०१२

अमरावती मध्ये इलेस्ट्रॉनिक मीडिया असोसिअशनची स्थापना


अमरावती- इलेस्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींच्या न्याय व हक्कासाठी लढण्याकरिता  अमरावती मध्ये इलेस्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम करणाऱ्या सर्व reporters ची नुकतीच एक बैठक झाली असून त्यामध्ये इलेस्ट्रॉनिक मीडिया असोसिअशनची स्थापना  करण्यात आली .
यामध्ये राजेश सोनोने (झी २४ तास ) यांची अध्यक्षपदी  तर संजय शेंडे  (आयबीएन लोकमत ) यांची सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी यशपाल  वरठे (दूरदर्शन ) ,अनिल मुनोत (आर्सिएन  न्यूज ),कोषाध्यक्षपदी शशांक चवरे(ABP माझा ) तर सहसचिव पदी सुरेंद्र आकोडे (TV9 )यांची निवड  करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यांमध्ये सत्पाल वरठे (आजतक ),अरुण जोशी (UCN ),कृष्णा लोखंडे (सहारा समय ),प्रवीण वाडेकर (NEWS EXPRESS ),माया डोळस (इंडिया TV ),अमरदीप मुंदे (RCN ),प्रदीप सोजतीया (सिटी NEWS ),संतोष सोनोने (ETV ) अमोल देशमुख (RCN ) यांची निवड करण्यात आली ..   

नागपूर,कोल्हापूर खूष तर बाकी नाखूष...

यंदा पगारवाढ मिळणार नाही, असे ठणकावून सांगणा-या लोकमतचे दर्डाशेठ अखेर कर्मचा-यांपुढे झुकले आहेत.राज्यातील नागपूर,कोल्हापूर वगळता सिनियर उपसंपादकापर्यंत १ ते ३ हजार रूपयाची वाढ केली आहे.
कोल्हापूर व नागपूरमधील कर्मचा-यांना मात्र १० हजारापेक्षा जास्त पगारवाढ केली आहे.या दोन्ही ठिकाणी लवकरच महाराष्ट्र टाइम्स सुरू होत आहे.म.टा.ने कर्मचारी भरती करताना इतरापेक्षा दुप्पट वाढ केली आहे.त्यामुळे लोकमतने या दोन्ही ठिकाणी  फंडा वापरला आहे.दर्डाशेठच्या या नव्या फंड्यामुळे मात्र लोकमत कर्मचारी नाराज आहेत.

बुधवार, ६ जून, २०१२

कोल्हापूर म.टा.चा जुलैमध्ये प्रारंभ

कोल्हापूर - महालक्ष्मी व ज्योतिबाच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या ऐतिहासिक कोल्हापुरातून महाराष्ट्र टाइम्सचा प्रारंभ जुलैमध्ये होणार आहे.सध्या टीमची जुळवा-जुळव चालू आहे.
म.टा.च्या टीमसाठी कोल्हापुरात आतापर्यंत दोनदा मुलाखती झाल्या.संपादक अशोक पानवलकर व पुण्याचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी या मुलाखती घेतल्या.
संभाव्य टीममध्ये गुरूबाळ माळी, आप्पा माळी (तरूण भारत), इंदुमती गणेश (लोकमत), विजय पाटील,सचिन यादव, अनुराधा कदम, जान्हवी सराटे (पुढारी)यांचा समावेश राहणार आहे.
म.टा.चा सर्वाधिक फटका पुढारीला बसणार आहे.लोकमत,सकाळवर काही अंशी फरक पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.11 रूपयात चार महिने अंक, ही मटाची लॉचिंग स्कीम कोल्हापुरातही राबविण्यात आल्याने एक लाखाची नोंदणी पुर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

लोकमत समाचारचा नवभारत टाईम्सला आणि दिव्यमराठीचा सकाळला दणका

लोकमत वृत्तसमुहाने आता पुण्यात पाय रोवले आहेत. येत्या महिनाभरात लोकमत समाचार पूर्ण चौदा पानी रंगीत पेपर पुणेकरांच्या भेटीस येईल. त्यास्वरुपाच्या जाहिराती त्यांनी पुण्यातील चौकाचौकात लावल्या आहेत. या वर्तमानपत्राचा फटका पुण्यातील एकमेव हिंदी दैनिक आज का आनंद ला बसेल. आज का आनंदचे संपादक श्याम अगरवाल यांनी आपल्या समूहाची सूत्रे खासगी एजन्सीकडे दिल्यावर सर्वच आनंदीआनंद आहे. सकाळ आणि पाठोपाठ पुढारीतून हकालपट्टी केलेल्या आनंदने हा ग्रुप सावरण्यासठी आपल्या नेक्स्ट जनरेशनला लाखो रुपयांचे पॅकेज घेतले. पण सकाळी चिंतन एस् एमएस पाठविण्यापलिकडे त्यांची मजल गेली नाही. या समुहाचे नेक्स्ट 365 हे दैनिक तर पहिल्या दिवसपासून तोट्यात आहे. संध्यानंदचा आंग्ल अवतार असलेले हे दैनिक पुण्यातील कोणत्याही दैनिकाच्या आसपासही नाही.
 त्यातच आता लोकमत समाचारने टाईम्स ग्रुपच्या नवभारत टाईम्स या दैनिकाच्या संपादकापासून शिपायापर्यंतचा सर्व स्टाफ दुप्पट पगारावर घेतला. त्यामुळे, टाईम्सला दणका बसला. त्यांचे कार्यालय सुनसान पडले आहे. जाहिराती देऊनही त्यांच्यकडे कोणी वार्ताहर अद्याप्  गेलेला नाही. मटाचा पाय खोलात  जात असताना हिंदी दैनिकालाही फटका बसल्यामुळे टाईम्स ग्रुप चिंतीत झाला आहे.
                           दरम्यान, दिव्य मराठीने सकाळमधील एक मोठा ग्रुप गळाला लावला आहे. आपली स्पर्धा टाईम्सशी नसून सकाळशी आहे हे ओळखून तेथील संपादकीय विभागातील अस्वस्थ माळी-कडूसकर ग्रुप डीएम च्या गळाला लागला असल्याची चर्चा आहे. गेल्या रविवारी डीएम च्या खांडेकरांची आणि माळी-कडूसकर ग्रुपची कोथरुड  भागातील एका हॉटेलमध्ये दीर्घ बैठक झाली. त्यामध्ये सकाळमधील किमान् निम्मेजण माळी ग्रुपच्या नेतृत्वाखाली जाणार असल्याचे निश्चित झाले. सोशल इंहजिनीयरींगच्या नावाखाली श्रेष्ठ परंपरा असलेल्या सकाळमध्ये नंगानाच चालवलेल्या  घोळवें आणि ग्रुपच्या त्रासाला वैतागलेल्या माळी ग्रुपला डीएमतर्फे सकाळचे जुने निष्ठावंत उदयराव यांनी खांडेकरांशी संपर्क साधून दिला अशी माहिती आहे. एपींच्या निकट गेलेल्या उदय रावांची अचानक हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या ते डीएम साठी कार्यरत झाले आहेत. त्यांनीच हा बिग स्लाईस ऑफ केक डीएम ला मिळवून दिला आहे. विशेषम्हणजे आपल्यावर घोळ करणा-यांचा शिक्का नको अशी आता उपरती झालेल्या पाटलांच्या संभानेही माळी ग्रुप जॉईन करून घोळवेंना तोंडघशी पाडले आहे. ऑगस्टपासून डीएम चे प्राथमिक काम पुण्यातून् सुरू होईल. त्यानंतर डिसेंबरला पूर्ण एडिशन सुरू होईल. या ताज्या घडामोडीमुळे पुण्यातील वृत्तसृष्टीत खळबळ उडाली आहे. त्यामुळेच सकाळपासून माळी आणि त्यांच्या ग्रुपमधील सर्वांचेच फोन `एंगेज' लागतात असा अनेकांचा अनुभव आहे.
                   
   

पत्रकार दीपक चव्हान यांना राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

सांगली- सांगलीच्या वेश्या वस्तीत वेश्या महिलांची देशातील पहिली शाळा सुरु करणारे पत्रकार दीपक चव्हान यांना राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.१४ जून रोजी गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते गोव्यात या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण होणार आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील फडतरे यांनी सांगलीत या पुरस्काराची घोषणा केली
         पत्रकार दीपक चव्हान हे गेल्या १२ वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत आहेत. आपली पत्रकारिता सांभाळून त्यांनी समाजसेवेचे वृत्त हाती घेतले. आपल्या समाजसेवेच्या आवडीतून पत्रकार दीपक चव्हान यांनी व्यसनमुक्ती,युवक संघटन,महिला सबलीकरण, बालकामगार विरोधी चळवळ यासह अनेक राष्ट्रीय प्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून समाजात सातत्याने क्रांती करण्याचा प्रयत्न केला. समाजातील दुर्लक्षित आणि तुच्च मानल्या जाणार्या वेश्या महिलांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दीले आहे. या महिलांसाठी त्यांनी देशातील पहिली शाळा सांगलीत सुरु केली. सन २००६ पासून पत्रकार दीपक चव्हान हे स्वता ही शाळा चालवतात. तसेच  वेश्या महिलांच्या मुलांसाठी राज्यातील पहिली अंगणवाडीची सुरु केली आहे.तरुण मुलीना लेझीम बरोबर स्वचतेचेही धडे देनेचे कामं पत्रकार दीपक चव्हान करीत आहे. त्यांच्या या कार्याची दाखल घेत कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षीचा राष्ट्रीय तपोभूमी गोवा गौरव आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील फडतरे यांनी सांगलीत या पुरस्काराची घोषणा केली आहे. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोवा येथील कुंडईच्या तपोभूमी आश्रमात गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते आणि स्वामी ब्रम्हेशानंद महाराज यांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे सन्मानपूर्वक वितरण होणार आहे. या कार्यक्रमास गोव्याचे उद्योजक विजय चौगुले,पेन सुधागड्चे आमदार धैर्यशील पाटील, महिला उद्योजक फरीदा खान,सुरेश दळवी आदींसह गोव्याचे स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत. या पुरस्काराबद्दल पत्रकार दीपक चव्हान यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शनिवार, २ जून, २०१२

मग अचानक काय झाले ?

नवी मुंबई : नवी मुंबईतील बुलंद तोफखाना समजला जाणारा नारायण जाधव सद्या मंत्रालय वार्ताहर म्हणून मुंबईला गेला आहे.या नारायण जाधवने नवी मुंबईतील समस्या व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.त्याचा एक प्रसंग फार बोलका आहे.सचोटीने लिखाण करत असल्यामुळ तो नेत्यांना खुपत होता.मग त्याला रायगड ठाणे असे फिरविने बाबुजीना आवडले असावे.आज नारायण नवी मुम्बैत नसला तरी त्याच नाव आजदेखिल घेतले जाते. या नारायण ला राष्ट्रवादीचे नेते सतत पाण्यात बघायचे.अशाच एक बड्या नेत्याला नारायणने एक एस एमएस पाठवून जगा दाखविली.हा एस एमएस होता .हम फकीरों से सीखो गुर बादशाहका .या फकिराने सतत या नेत्यांचा व प्रशासनाचा बेफिकीर वृत्तीवर लेखनी चालविली आज ही लेखनी का थांबली याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे.हा फकीर बाद शह झाला की दबाव पुढे गप्पा झाला.आम्हाला वाव मिळत नाही म्हणून गप्पा आहोत आमचे वृत्तपत्र सरळ आदेशच काढते या बातम्या चालणार नाही त्या बातमी चालणार नाही .पण नारायण ला हा प्रश्न कधीच नव्हता मग अचानक काय झाले ?

फेसबुक वर शेअर करा

Facebook