‘आधुनिक किसान’च्या वेब दैनिकाचा शुभारंभ

 औरंगाबाद - महाकिसान ऍग्रो पब्लिशर्सच्याआधुनिक किसान (www.adhunikkisan.com)या वेब ऍग्री दैनिकाचा शुभारंभ महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि जैन इरिगेशनचे सिस्टिम्सचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्याद्वारे करण्यात आला. अध्यक्षस्थानी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अंकुशराव टोपे यांची उपस्थिती होती. औरंगाबाद येथील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये शनिवारी ( डिसेंबर) रोजी हा सोहळा पार पडला.
उद्घाटनीय भाषणात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कषी विकासाला चालना देण्यासाठी सकारात्मक पत्रकारिता ही अत्यंत गरजेची असून सा. ‘आधुनिक किसानगेल्या काही दिवसापांसून उपयुक्त कार्य करत आहे. नव्याने सुरू झालेल्या वेब दैनिकामुळे या कामात आणखी गती येण्यास मदत होईल. अशोक जैन म्हणाले की, शेती ङ्गायद्याची होण्यासाठी शेतकर्यांनी आधुनिकता अंगीकारावी. ‘आधुनिक किसानसारखे कृषी माध्यम शेतकर्यांना आधुनिक तंत्राची परिपूर्ण माहीती देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना अंकुशराव टोपे यांनी कृषी उद्योगापुढे अनेक आव्हाने असून यातून मार्ग काढण्यासाठी माध्यमांनी मार्गदर्शक म्हणून काम करावे असे आवाहन केले.

यावेळी ग्रीन गोल्ड सीड्सचे अध्यक्ष मधुकरराव मुळे, नाथ बायोजीन्सचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कागलीवाल, महिको सीडस्चे कार्यकारी संचालक राजेंद्र बारवाले, राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट, आयसीएआर पुरस्कारप्राप्त शेतकरी उद्धव खेडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविकआधुनिक किसानचे संचालक संपादक निशिकांत भालेराव यांनी केले. जागृती जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शनआधुनिक किसानचे संचालक प्रकाशक विनोद अपसिंगेकर यांनी केले.

महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या महाकिसान ऍग्रो पब्लिशर्सच्याआधुनिक किसानया साप्ताहिकाच्या यशस्वी वाटचालीनंतर आता इंटरनेटच्या माध्यमातून कृषी जगतातील दैनंदिन घडामोडी मांडणारेआधुनिक किसानहे वेब दैनिक सुरू करण्यात आले आहे. वाचकांना  http://www.adhunikkisan.com/ या संकेतस्थळावर शेतीतील ताज्या बातम्यांसोबतच मार्गदर्शक लेख देखील दिले जाणार आहेत. या संकेतस्थळावरील प्रत्येक बातमी आणि लेखांवर वाचकांना आपले मते नोंदविण्याची आणि सूचना करण्याची सुविधा या वेब दैनिकात आहे. याशिवाय फेसबुक, ट्वीटरसारख्यासोशल माध्यमांच्याआधारे शेतकरी, वाचकांना विविध कृषी विषयांवर चर्चा करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगणकाबरोबरच, टॅबलेट आणि स्मार्टफोनवरही हे वेबदैनिक वाचकांसाठी उपलब्ध आहे. राज्यातील आणि देशातील बाजारसमित्यांमधील अद्ययावत बाजारभाव, हवामानाचा अंदाज, -मॅगझीन, ऑनलाईन कृषीसल्ला, व्हिडिओ, ब्लॉग्स यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण माहिती वेब दैनिकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.