> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ३० मार्च, २०१३

महाराष्ट्रनामा....

* 'गांवकरी' लवकरच मुंबई आवृत्ती सुरू करणार; मंत्रालयासाठी व मुंबई/ठाणे/सानपाड्यात नव्या माणसांचा शोध सुरू. सध्या इन-मीन-साडेतीन माणसांवर चालतोय कारभार. 
-'गांवकरी'च्या मालकांनी माणसे सांभाळण्याचे मवाळ धोरण सोडले. दीपक रत्नाकर यांचा अल्टीमेटमनंतर 'पुण्यनगरी'त प्रवेश. तुळशीदास बैरागी यांचेही काम थांबविले. कार्यकारी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांच्या जवळकीतील अनेक माणसे सध्या 'रेड झोन'मध्ये. संतोष लोळगे यांची तनपुरेंशी जोरदार खडाजंगी. त्यानंतर लोळगे हेही बाहेर. 
* अलिबागेत अस्वस्थता... 'कृषीवल'मधून अनेक माणसे पडली बाहेर.  संजय आवटे एकाकी पडले;
* भालचंद्र पिंपळवाडकर(९७६५५६६००९) यांचा 'पुढारी'ला रामराम! 'सकाळ'मध्ये प्रवेश; श्रीराम पवार यांच्याशी असलेल्या कोल्हापूर कनेक्शनमुळे 'खानदेश सकाळ'च्या निवासी संपादकपदी वर्णी लागण्याची शक्यता. मुकुंद एडके, चंद्रकांत यादव यांची संधी हुकणार! विवेक गिरधारी यांना 'सानपाडा पुढारी'तील मूळपुरुष पिंपळवाडकर यांची विकेट घेण्यात यश आल्याने त्यांची वट वाढणार ... अर्थात माणसांचा त्रासही वाढणार. गणेश देवकर, संतोष खरात यांचाही छळाला कंटाळून राजीनामा. गिरधारी देवकराला म्हणे, मला सॉरी म्हण. सॉरी म्हटले तरच काम करू देईन. गिरधारी यांना पाहताच कटू पाहताहेत 'पुढारी'तील माणसे ... 
* मंदीच्या लाटेत 'दिव्य मराठी'तीतही अस्वस्थतेचे वारे. कार्पोरेट सोशल विभाग तडकाफडकी बंद केला. अनेक जणांना नारळ. वेब आवृत्तीचे संपादक विश्वनाथ गरुड यांचा राजीनामा. कामाचा अतिरिक्त ताण, फेव्हरीझम, संपादकांची मनमानी यामुळे औरंगाबादेत अनेक जण हैराण. 
* सकाळ व 'एग्रो वन'चे अकोला प्रतिनिधी गोपाळ हागे यांचा राजीनामा. 'आधुनिक किसान' जॉईन करणार. 
सकाळच्या सर्व तालुका वार्ताहरांना तनिष्का व्यासपीठासाठी वर्गणीदार/सदस्य गोळा करण्याचे उद्दीष्ट्य.जास्तीत-जास्त वर्गणीदार/सदस्य व्हावेत म्हणून अधिकाधिक वार्ताहर नेमण्याचे धोरण. वार्ताहर नेमण्याची जाहिरात काढली. धुळ्यासाठी तीनदा जाहिरात देवूनही उपसंपादक/वार्ताहर म्हणून एकही अर्ज नाही. 
*'पुण्यनगरी'ला जळगाव/धुळ्यात माणसे मिळेनात. कार्यकारी संपादकासाठी शोध सुरू. अनिल पाटील, अनिल चव्हाण यांना संधी नाही. 
* जळगावात 'लोकमत'लाही माणसे मिळेनात. 'देशदूत'मध्ये अस्वस्थतेचे वारे. १६ कर्मचारी पडले बाहेर. दोन महिने पगार नाही. 
*निखिल वागळे यांच्या मनमानीमुळे 'आयबीएन-लोकमत'मधील मंडळी हैराण. चाटूगिरी करणारेच अधिक चमकवले जात असल्याने नाराजी वाढतेय. धुपकर-दुसाने यांना झुकते माप तर आशिष जाधव व त्यांच्या दोघा पंटर्सनाच मोक्याच्या जागा मिळाल्याने धुसफूस. बायकोसकट सगळी जवळकितील बाजूल पडलेली खोडे चर्चात्मक कार्यक्रमातून उजवताहेत वागळे. पंटर युवराजचीही अलीकडे केली जातेय सोय. 
* वागळे-राजीव खांडेकर यांच्यावरील हक्कभंगामुळे महाराष्ट्रभर पत्रकारांच्या निषेधबाजीला उत. मराठवाड्यात पत्रकारावर गुटकासम्राटाने हल्ला चढविला; इतरत्र प्रिंट पत्रकारावर हल्ले होतात तेव्हा 'टिवटिवे च्यानेली' निषेधाचा सूर तरी आळवतात का? तेव्हा प्रिंटवाल्यांनो उर बडविणे बंद करा. वागळे समर्थ आहेत. ते तुमच्या पाठीशी उभे राहतील तेव्हाच तुम्ही मातम मनवा .... राज्यभरातील प्रिंटमधून उठत असलेला हा सूर !
* महाराष्ट्र टाईम्स मे महिन्यात जळगावात ब्युरो ऑफिस सुरू करण्याच्या तयारीत. व्यवस्थापक काटे यांनी दिली जळगावास भेट. जळगावला अकोला/बुलढाणा जोडले गेल्यास मोठे आवृत्ती सेंटर उभारले जाण्याची शक्यता. धुळे विभागीय कार्यालयामार्फत गुजरात, मध्य प्रदेशातील मराठी भाषिक प्रांतात मारणार मुसंडी. 
* 'मटा' व्यवस्थापनाकडून बेनेट-कोलमन कार्यकारी मंडळास अहवाल सादर. मंजुरी मिळाल्यास 'दिव्य मराठी'पूर्वीच अकोला-विदर्भात उडणार धमाका. इतरत्रही 'दिव्य'पुढे आव्हान उभे करण्याची योजना. 
(विस्ताराने 'विवेकपुराण' लवकरच वाचा)

मंगळवार, २६ मार्च, २०१३

वागळे हिरो होवू नये म्हणून खांडेकरवरही हक्कभंग....

ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यावरही विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खांडेकर एक शांत आणि संयमी संपादक म्हणून परिचित असताना, आमदारांना ते असे काय बोलले की, त्यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला.
आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे वाचाळ आहेत, हे सर्वांना माहित आहे.कोणावरही काही आरोप करतात, ते लोकांचे न ऐकता स्वत:ची बडबड सुरू ठेवतात, हे सर्वांना माहित आहेत, मात्र खांडेकरचे नाव वागळेबरोबर जोडले गेल्याने महाराष्ट्रातील मीडियाही बुचकळ्यात पडला आहे.

नाहीतर वागळे हिरो ठरले असते...

वागळेंना माणसे अंगावर घेण्याची सवय आहे. काही झाले तरी चॅनलपेक्षा स्वत:चे नाव गाजले पाहिजे हा त्यांचा मनसुबा असतो. म्हणूनच ते स्वत:ला फोकस करीत असतात. आमदारांविरोधात आरोप केल्यानंतर विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल होणार, हे त्यांना माहित होते.मात्र त्यांचा हा डाव आमदारांनीही उधळून लावला आहे.
एकट्या वागळेवर हक्कभंग प्रस्ताव झाला झाला असता, तर वागळे हिरो ठरले असते, म्हणून राजीव खांडेकरचे नावही गोवण्यात आले,अशी चर्चा आहे.

पत्रकार संरक्षण कायदा चुलीत

वागळे आणि खांडेकर यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव विधीमंडळात गाजल्यामुळे पत्रकार संरक्षण कायदा आता चुलीत गेला आहे. कायदा नाही तर पत्रकार असे काही बोलतात, उद्या कायदा झाला तर पत्रकार कसे वागतील,असे आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा कायदा होण्याची शक्यता दुरावत चालली आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या कायद्यासाठी जो लढा देत होती, ती मेहनत यानिमित्त वाया गेली आहे.

पाहुण्यांच्या हस्ते साप मारला

ABP माझावरील चर्चेत भाई जगताप नेहमीच भाग घेत असतात. मात्र त्यांनीच विधान परिषदेत राजीव खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. हे ऐकूण अनेकांना आश्चर्य वाटले असेल,मात्र आमदारांनी पाहुण्यांच्या हस्ते साप मारून, खांडेकरांना जोरदार झटका दिला आहे.


जाता - जाता : 
1. राज्यातील पत्रकारांत राजीव खांडेकर यांच्याबाबत सहानुभूती आहे, मात्र वागळेबाबत नाहीत.त्यामुळे हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याचा निषेध करावा की, नाही याबाबत अनेक पत्रकार संभ्रमात पडले.
2. कडा, धारूर आदी छोट्या तालुक्यातील पत्रकार संघाची बातमी आजपर्यंत कधी चॅनलवर आली नाही, मात्र निषेधाच्या निमित्ताने त्यांचे नाव चॅनलवर आले.ऐवढेच काय औरंगाबाद जिल्हा पत्रकार संघाची बातमीही कधी चॅलनवर आली नव्हती, ती यानिमित्त आली.म्हणतात ना,अब आया ऊंट पहाड के निचे... 
3. हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता पुढे काय होणार,याकडे लक्ष वेधले आहे.
- वागळे माफी मागणार नाहीत, कारण त्यांची जेलमध्ये जाण्याची तयारी आहे.पुर्वीही ते बऱ्याच वेळा गेले आहेत.
-याउलट खांडकर माफी मागून मोकळे होतील. कारण खांडेकरांची जेलमध्ये जाण्याची इच्छा नाही.

चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पुणे  - अप्रतिम मीडिया व ओम ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या वतीने आदर्श उद्योग समूह प्रायोजित चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरिय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दरवर्षी प्रिंट व इलेक्टॉनिक माध्यमातील पत्रकारांना त्यांचे विशेष कौशल्य व गुणवत्ता लक्षात घेऊन चौथा स्तंभ या राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा पुरस्कार वितरण सोहळा एप्रिलमध्ये मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती संयोजक डॉ.अनिल फळे यांनी दिली.

यंदा चौथा स्तंभ पुरस्कार घोषित झालेल्यांची नावे व गट पुढीलप्रमाणे- 
मनोज देवकर, आयबीएन-लोकमत, ठाणे (स्पेशल पॉझिटिव्हस्टोरी)
मंगेश सौंदलकर, प्रहार, मुंबई (आरोग्य)
सुधीर जाधव, आयबीएन-लोकमत, कॅमेरामन(व्हिडिओग्राफी)
सुदर्शन रापतवार, लोकमत परिसर, अंबेजोगाई(विशेषांक)
अर्चना राणे, प्रहार, मुंबई (पर्यावरण)
सचिन माने, सकाळ, छायाचित्रकार, औरंगाबाद (प्रेस फोटोग्राफी)
वासित मोहसिन, लोकमत, औरंगाबाद (विशेषवार्ता)       
गिरिधर पांडे, महाराष्ट्र टाईम्स, पुणे (सांस्कृतिक)
विलास बडे, आयबीएन-लोकमत, मुंबई (स्पेशलस्टोरी)
अ‍ॅड.ललित जोशी, साप्ताहिक आदर्श सहकार, औरंगाबाद(सहकार)
शेख वाजिद राजू, देशदूत, नगर (प्रेस फोटोग्राफी)
समीर मराठे, लोकमत, नाशिक (स्पेशल रिपोर्ट)
सुभाष कच्छवे, लोकपत्र, परभणी (ग्रामीणवार्ता)..  
सचिन कोरडे, लोकमत, गोवा(क्रिडा)
शरद तांबट, मुक्त पत्रकार, कोल्हापूर(सामाजिक)
डॉ.विनोद गोरवाडकर, साप्ताहिक नगारा(सामाजिक-सांस्कृतिक)
शाश्वत गुप्तारे, सकाळ टाईम्स, पुणे(डिफेन्स)             
अनुप गवळी, लोकशाही वार्ता, (शिक्षण)
शशिकांत पाटील, सकाळ, न्यायडोंगरी, नांदगाव (कृषी)
मंगेश कुलकर्णी, महाराष्ट्र टाईम्स, पुणे(स्तंभलेखन)
अनिल वाघमारे, लोकप्रश्न, वडवणी, जि.बीड(स्त्री भ्रूणहत्या)
गोरखनाथ लंगडे, साप्ताहिक एकला चलोरे, धुळे(सामाजिक)
संजय डहाळे, सामना, मुंबई (संपादनकला)
आसाराम लोमटे, लोकसत्ता (राजकारण)
कल्याण देशमुख, पुण्यनगरी(कोर्ट    )
सुनिल कुलकर्णी, दिव्य मराठी, नांदेड (पॉझिटिव्ह स्टोरी)
अभय इंगळे, तरुण भारत, यवतमाळ (ग्रामीणवार्ता)
बाबा गाडे, दै.महानायक, औरंगाबाद(सामाजिक)
कु.श्यामल इंगळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद(विद्यार्थी पत्रकार)
जगदिश भावसार, प्रेस फोटोग्राफर, श्रीरामपूर(प्रेस फोटोग्राफी)
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद(स्पेशलस्टोरी)
सुभाष बोंद्रे, जाहिरात व्यवस्थापक, दिव्य मराठी, औरंगाबाद(विशेषांक संकल्पना)
दिनेश हारे, फिचर रायटर, दिव्य मराठी, औरंगाबाद(कमर्शियल रिपोर्टिंग)
सुरेश जंपनगिरे, सामना, परभणी (सहकार)
पंकज जोशी, आधुनिक किसान, औरंगाबाद (कृषी)
तुषार वखरे, पुण्यनगरी, औरंगाबाद(शिक्षण)
नेहा पुरव, टिव्ही जर्नालिस्ट, मुंबई

याशिवाय विशेष बाब म्हणून डॉ. बलभीमराज गोरे, सिद्धहस्त लेखक-पत्रकार शिक्षक,
श्री.राजू पाटोदकर, वरिष्ठ माहिती सहाय्यक संचालक, मंत्रालय, मुंबई
श्री.एस.एम.देशमुख, निमंत्रक, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मुंबई
श्री.किरण नाईक, कार्याध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, मुंबई यांना चौथा स्तंभ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

अप्रतिम मीडिया,
दुसरा मजला, चित्रलेखा चेंबर्स,
आयडियल कॉलनी,
पौड रोड, कोथरुड,पुणे


रविवार, २४ मार्च, २०१३

शिवाजी शिर्केच्या राजीनाम्याचे गुढ काय?

नगर - देशदूत म्हणजे शिवाजी शिर्के आणि शिर्के म्हणजे देशदूत असे गणित जुळले असताना, शिवाजी शिर्के यांनी एक मार्च रोजी देशदूतच्या संपादकपदाचा राजीनामा दिला. गेले काही दिवस शिर्केच्या राजीनाम्याची दबक्या आवाजात चर्चा होती, मात्र या चर्चेला दुजोरा मिळताच,बेरक्याने ब्रेकिंग न्यूज दिली.त्यानंतर नगरसह शिर्केंच्या चाहत्यात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या  सारडा शेठचे अगोदरच सार्वमत नावाचे दैनिक नगरमध्ये सुरू होते. मात्र तीन वर्षापुर्वी देशदूतची  नगर आवृत्ती काढून त्यांनी एकप्रकारे धाडस केले.लोकमतच्या मुशीत तयार झालेला शिवाजी शिर्के संपादक म्हणून या दैनिकाला मिळाला.नविन बातम्या, वेगळ्या विषयावरील कव्हरस्टोरी देवून शिर्केनी देशदूत नावारूपास आणला. एस.पी.कृष्णप्रसादच्या काळात देशदूतने चांगली भूमिका निभावली, इतकेच नाहीत तर लांडे खून प्रकरणात खोतकर, कर्डिले या बड्या धेंड्याच्या विरोधात मोहीम उघडली.या बातम्यांमुळे शिर्केना खूप त्रास झाला,मात्र सारडा शेठने एकदाही शिर्केंची चौकशी केली नाही, किंवा बळ दिले नाही.वर्धापनदिनास कोटीच्या घरात जाहिराती देवूनही कधी अभिनंदन केले नाही.
खप कमी करून जास्त जाहीराती मिळविण्याचा फंडा सारडा शेठचा, मात्र हे गणित पचत नसल्यामुळे शिर्के नाराज होते.एवढेच नाही तर मार्केटींग, जाहिरात यासाठी संपादकालाच पळापळ करावी लागत होती. त्यात शिर्केंना दोनदा हृदय विकाराचा झटका येवून गेला होता.धावपळ त्यांना सहन होत नव्हती.
तीन महिने पगार नाही
देशदूतच्या कर्मचा-यांचा गेल्या तीन महिन्यापासून पगार झालेला नाही. सारडा शेठ पगार पाठवायला तयार नाहीत. नगरमध्यचे कमवा आणि पगारी करा, हा त्यांचा अट्टाहास. मात्र हे गणित जुळत नव्हते. त्यात सध्याचे ऑफीस परवडत नसल्याने ते हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. कर्मचारी पगारीसाठी शिर्केकड खेटे घालत होते, आणि सारडा शेठ हात झटकत होते, तेही शिर्केच्या राजीनाम्याचे कारण सांगितले जात आहे

जाता - जाता :
 १) शिर्केच्या राजीनाम्यानंतर नगरमध्ये देशदूतला संपादक मिळत नाही, त्यामुळे कर्मचारी कपात करून, देशदूत सायंदैनिक करण्याच्या हालचाली चालू आहेत.त्यामुळे पेजची संख्या कमी होणार आहे.
२) शिवाजी शिर्के हे आता कोणत्या वृत्तपत्रात जाणार, हे अजूनही कळले नाही.मात्र दुसरे चांगले निमंत्रण येईपर्यंत ते आराम करणार आहेत.

नगरचा फेरफटका...

1) देशदूतचे संपादक शिवाजी शिर्के यांचा राजीनामा... वैयक्तिक कारण... पण अंतर्गत कारण वेगळेच... देशदूतच्या जागरणमधील विलिकरणाची चर्चा जोरात... पण शिर्केंची सोडचिट्ठी गुलदस्त्यात.…
2) पुढारीच्या एका ग्रामीण वार्ताहराचा आत्महत्येचा प्रयत्न.... वर्धापन दिन जवळ आल्याने जाहिराती संकलनाचा ताण आल्याची चर्चा...
3) महाराष्ट्र टाइम्स मे मध्ये  नगरला येण्याची पुन्हा चर्चा सुरू.…
4) दिव्य मराठीच्या क्राईम रिपोर्टरची बदनामी करणारे निनावी पत्र... पोलिस व काही पत्रकरांनी पुन्हा एकदा या रिपोर्टला टार्गेट करून घाणेरडे आरोप करणारे पत्र लिहून सगळ्यांना पाठविले आहे.
5)वर्धापन दिन तारीख जवळ आल्याने सकाळवाल्यांची जाहिरातीसाठी धावाधाव...
6) म.टा पाठोपाठ प्रहारही नगरला येणार... .संपादकपदासाठी कोटींच्या टार्गेटची आश्वासने...
7) विक्रम पाचपुते पेपर काढण्याच्या विचारात. एखादे बॅनर विकत घेणार...
8)विनभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सकाळचा छायाचित्रकार निलंबित

सकाळ अपडेट
1. सकाळमध्ये फुकट वापरून, राबवून घेत असल्याची भावना बातमीदारांमध्ये वाढीस.
2.स्त्री प्रतिष्ठा अभियान, सरपंच महापरिषद, वर्धापन दिनाच्या जाहिराती, रोज बातम्यांचे अचानक दिलेले विषय हे सर्व तुटपुंज्या मानधनावर.
3.मालकांच्या मोठेपणासाठी राबणारे वेठबिगार म्हणजे बातमीदार अशी बातमीदारात चर्चा.
4.जाहिरात गोळा करण्याची नगरजिल्ह्यात गळेकापू स्पर्धा.

शनिवार, २३ मार्च, २०१३

पत्रकारितेत 'गाढव' कोण ?

आय.बी.एन.- लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दोन वर्षापुर्वी बीड जिल्हा पत्रकार संघाने पुरस्कार देवून गौरव केला होता.त्यानंतर काही दिवसांनी लोकसत्तात एका वाचकांने वागळेंना पुरस्कार कशासाठी दिला म्हणून पत्र लिहिले होते. लोकसत्ताने हे पत्र प्रसिध्द केल्यानंतर वागळे लोकसत्ताचे कार्यकारी संपादक गिरीश कुबेर यांच्यावर नाराज होते.
नंतर पुण्यात एका मुलाखतीच्या कार्यक्रमात वागळेंनी गिरीश कुबेर गाढव असल्याचा जावाईशोध लावला होता. वागळेंनी गाढवाची उपमा दिल्यानंतर गिरीश कुबेर व वागळे यांच्यात शितयुध्द सुरू झाले.
नंतर कुबेरांनी ठरवले की, लोकसत्तात वागळेची कोणतीच बातमी अथवा नाव द्यायचे नाही,आणि वागळेंनी ठरवले की, कुबेरांना आय.बी.एन.लोकमतवर चर्चासत्रासाठी बोलवायचे नाही.
परवा विधीमंडळात निखिल वागळे आणि राजीव खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला.त्याची लोकसत्तात केवळ दोन ओळीची बातमी प्रसिध्द झाली. त्यात केवळ खांडेकरांचे नाव होते, वागळेंचे नव्हते. कुबेरांनी आपला शब्द येथेही खरा केला.
ऐवढेच नाही तर कुबेरांनी टयुटरवर टयुट केले आहे की, पत्रकारांनी राज्यकत्र्याविरूध्द बोलताना भान ठेवले पाहिजे. तो वागळेंना अप्रत्यक्ष जोडा होता.
गंमत अशी की, यासंदर्भात ABP माझावर जे चर्चासत्र झाले, त्यात गिरीश कुबेरही होते. कुबेरांनी यावेळी हक्कभंगाचा विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले होते,तसेच आमदाराविरूध्द प्रखर टीका केली होती.
मात्र कुबेरावर विधीमंडळात हक्कभंग दाखल झाला नाही. कुबेरांनी राज्यकत्र्यांविरूध्द मवाळ धोरण वापरल्याने व गुप्त वाटाघाटी केल्याने त्यांच्याविरूध्द हक्कभंग प्रस्ताव दाखल झाला नसल्याची चर्चा आहे.
मग पत्रकारितेत गाढव कोण, हे तुम्हीच ठरवा.
...................................................
निखिल वागळे हे माणुसघाणे आहेत, त्यांचे स्वत:च्या पत्नी आणि मुलाबरोबर पटत नाही तर कर्मचा-याबरोबर कसे पटणार.एक मुलाखातकार म्हणून वागळेंना तोड नाही, कोणालाही अंगावर घेण्याची त्यांची धमक आहे. मात्र कधी कधी ते वाहत जातात.राजदीप सरदेसाई यांच्या वरदहस्तामुळे केवळ वागळे आय.बी.एन.लोकमतमध्ये टिकून आहेत.मात्र हा माणूस चॅनलपेक्षा स्वत: मोठा झाला आहे. चॅनलला चेहरा लागतो, म्हणून राजदीप सरदेसाई वागळेंचे अवगुण माफ करतात, मात्र चांगल्या गुणापेक्षा अवगुण जास्त असल्याने वागळेंवर टीका जास्त होते.
वागळे हे घमेंडखोर आहेत, त्यांना लोकांची किंमत वाटत नाही.लोक त्यांंना भेटायला येतात, पण ते भेटत नाहीत.
वागळे तुमच्या गुणावर आणि मतावर तुम्ही ठाम रहा, लोक तुमच्यावर असेच टीका करणार....
 
 निरगुडकरांनी शेपूट घातले
एकीकडे वागळे आणि खांडेकर यांच्याविरूध्द हक्कभंग दाखल झाल्याच्या बातम्या गाजत असताना, झी २४ तासचे उदय निरगुडकर आपल्या चॅनलवर वेगळीच बातमी चालवित होते.
म्हणे उदय निरगुडकर यांचे आमदारांनी अभिनंदन केले, झी २४ तासचीच खरी पत्रकारिता.
वारे वा निरगुडकर, शेपूट घातले म्हणजे खरी पत्रकारिता नव्हे.


शुक्रवार, २२ मार्च, २०१३

'बेरक्या' ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण...

औरंगाबाद - पत्रकारांचा पाठीराखा म्हणून परिचित असलेल्या बेरक्या ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण झाली. बेरक्या भविष्यातही सुरूच राहणार आहे.कोणतीही बातमी दबणार नाही किंवा दबली जाणार नाही,असा शब्द बेरक्याने दिला होता,आणि तो तंतोतंत पाळलेला आहे.
दोन वर्षापुर्वी बातमीदार नावाचा ब्लॉग सुरू होता.या ब्लॉगला मराठवाड्यातील बातम्या पुरविण्याचे काम बेरक्याने केले.नंतर २१ मार्च २०११ रोजी बातमीदारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेरक्याने स्वतंत्र ब्लॉग सुरू केला.त्याच्या अगोदर बोरूबहाद्दर सुरू झाला होता. बातमीदार,बोरूबहाद्दर आणि बेरक्याने महाराष्ट्रातील मीडियात आपला दबदबा निर्माण केला होता,मात्र बातमीदार आणि बोरूबहाद्दर ब्लॉग एकापाठोपाठ बंद पडल्याने बेरक्या एकटा पडला होता.मात्र बातमीदार आणि बोरूबहाद्दराने ब्लॉग जरी बंद केला तरी बेरक्यास मदत केल्याने बेरक्याने हे शिवधनुष्य अजूनही उचलून धरले आहे.
बेरक्याने पत्रकारांवर होणारा अन्याय,त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले.ते मांडत असताना समोरचा कोण आहे,याचा विचार कधी केला नाही.त्यामुळे सकाळ,लोकमत,दिव्य मराठी,महाराष्ट्र टाइम्य,देशोन्नती,पुढारी आदी वृत्तपत्रातील बातम्या निर्भिडपणे प्रसिध्द झाल्या.आय.बी.एन-लोकमत,झी २४ तास या चॅनलमधील बातम्याही बेरक्याने दिल्या.
बातम्याबरोबर पत्रकारांना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांचे कौतुक करण्याचे काम बेरक्याने केले.एस.एम.देशमुख हे पत्रकारांच्या प्रश्नासाठी लढत आहेत,त्यांच्या चळवळीला बळ देण्याचे काम बेरक्याने केले.
हा ब्लॉग चालवित असताना,अनेक अडथळे आले.बेरक्या कोण आहे, हे शोधण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली.मात्र दोन वर्षे झाली तरी बेरक्या नेमका कोण आहे,हे अजूनही सिध्द झालेले नाही.कोणीही कोणाचेही नाव घेतात,मात्र बेरक्या हा एकटा नसून,हे अनेकांचे टीमवर्क आहे.
बेरक्याने दोन वर्षात आठ लाख हिटस्चा टप्पा पार केलेला आहे. हे केवळ पत्रकारांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळेच घडले.अनेकजण उघडपणे बोलू शकत नाहीत,मात्र त्यांचा आतून बेरक्याला पाठींबाच आहे.
सर्वांचे आभार. बेरक्या ब्लॉगला दोन वर्षे पुर्ण झाली आहेत.बेरक्या ब्लॉग असेच कोणाचाही मुलाहिजा न ठेवता चालूच राहणार...
आम्ही कोणत्याही एका पत्रकाराविरूध्द आणि वृत्तपत्र मालकांच्या विरोधात नाहीत. त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहोत.

जाता - जाता : बेरक्या बंद पडला, बेरक्या बंद पडणार, अशी अफवा नेहमी पसराविणाऱ्यांची तोंडे बंद झाली का ? त्यांच्या नाकावर टिच्चून बेरक्या सुरू आहे, सुरूच राहणार.पत्रकारितेत राहून पत्रकारांवर अन्याय किंवा पिळवणूक करणाऱ्यांना बेरक्या सोडणार नाही. त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्यास बेरक्या तयार आहे.

लोकमतच्या नवी मुंबईतील बलात्कारी वार्ताहराला दोन वर्षे सश्रम कारावास

पनवेलच्या आश्रमातील गतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा ट्रस्टी रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. हा प्रकार 5 मार्च 2011 मध्ये उघडकीस आला होता. त्यापूर्वी वर्षभर हा अत्याचार सुरू होता. या आरोपींपैकी रामचंद्र व नानाभाऊ करंजुले हे आश्रमाचे ट्रस्टी असून बडदे अधीक्षिका होती. मावळेही या मुलींच्या देखभालीचे काम करत होती. या आरोपींवर भारतीय दंडसंहितेचे कलम 302 (खून), 307 (खुनाचा प्रयत्न), 354 (विनयभंग), 376 (बलात्कार), 377 (अनैसर्गिक संभोग) आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. यातील नानाभाऊ करंजुले हा अनेक वर्षे लोकमताचा नवी मुंबई/पनवेल येथील वार्ताहर होता. हा सारा प्रकार सुरू असतानाही तो 'लोकमत'मध्ये आपल्या 'रंगीला औरंगाबादी'च्या छत्रछायेत होता. 'रंगीला'चा हा एकदम 'खास माणूस'! तो सारी काही सोय करायचा. त्यामुळे लाल कार नेहमी सानपाड्यातून रात्री-अपरात्री  केव्हाही  सानपाड्याहून पनवेलच्या दिशेने धावायची. नानाभाऊ करंजुलेने 'लोकमत'चा धाक दाखवित या प्रकरणाचा तपास दडपण्याचाही प्रयत्न केला होता. अखेर कायदाच सर्वश्रेष्ठ ठरला. न्यायसंस्थेचा विजय असो. नागपुरी शेठे आणखी किती दिवस संपादकांवर आंधळा विश्वास ठेवून असे बलात्कारी लांडगे आणि खंडणीबहाद्दर धेंडे कामाला ठेवतील देव जाणो. होउन जावू द्या एकदाची साफसफाई. काय होईला? एखाद दोन जाहिराती कमी मिळतील किंवा बातम्या चुकातील. पण समाज तुम्हाला धन्यवाद देईला; जसे आज न्यायसंस्थेला देतोय... करावी का शेठजी आपणाकडून महाराष्ट्राने ही अल्पशी अपेक्षा? मानबिंदू आहात ना आपण या महाराष्ट्राचे!

मूळ घटनेच्या विस्तृत माहितीसाठी खालील बातमी वाचा :
गतिमंद मुलींवर अत्याचार करणाऱ्यास फाशी

रविवार, १७ मार्च, २०१३

झी 24 तासचे आऊटपूट एडिटर अनंत सोनवणे यांना अखेर नारळ ...

मुंबई - झी 24 तासचे आऊटपूट एडिटर अनंत सोनवणे यांना अखेर नारळ देण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर सोनवणे पुन्हा ऑफिसमध्ये येवू नयेत यासाठी सिक्युरिटीलाही सूचना देण्यात आल्या. अनंत सोनवणे यांनी चेअरमन सुभाष चंद्र यांच्याकडे तक्रार नोंदवली होती, मात्र उपयोग झाला नाही.
डॉ. उदय निरगुडकर यांच्या जातीयवादाने अनंत सोनवणेंचा बळी घेतला. दिनेश पोतदार यालाही राजीनामा द्यावा लागला. पुढील काही दिवसांत आठ ते दहा जणांचे राजीनामे घेतले जाणार आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एकाही ब्राह्मणाचा राजीनामा घेतला जात नाही. बहुजनांचे बळी देण्याचं काम सुरू आहे.
इतके दिवस अनंत  सोनवणेंच्या  बरोबर असणा-या स्नेहा अंकईकर, कल्याणी कुलकर्णी या ब्राह्मम कन्या आता ब्राह्मण गटात सामील झाल्या आहेत. अनंत  सोनवणेंना मानणारा गट आता जवळपास नामशेष झाला आहे. विठोबा सावंत हा अनंत सोनवणेंचा समर्थक, मात्र त्याने निरगुडकर याच्याबरोबर जमवून घेतलं आहे. तर मिळालेलं रिपोर्टिंग वाचावं यासाठी कृष्णात पाटीलनंही विठोबाच्या सुरात सुर मिसळला आहे. त्यामुळे आता डॉ. उदय निरगुडकर याच्या विरोधात फक्त विनोद पाटील एकटा लढत आहे. मात्र झी 24 तासमधल्या  ब्राह्मण गटाला मोठा जोर आला आहे. संदीप साखरे, अमोल परांजपे यांना आऊटपूट एडिटर आणि शिफ्ट इन्चार्ज होण्याची स्वप्न पडू लागली आहे. झी 24 तासमधून पद्धतशीरपणे बहुजनांना काढण्याचं काम सुरू आहे. मागील काही महिन्यात ब्राह्मणांची झालेली भरती आणि बहुजनांची झालेली गच्छंती याचं जळजळीत उदाहरण आहे.

"प्रेस कौन्सिल' समितीची पूर्णेला भेट

पूर्णा - येथील पत्रकार दिनेश चौधरी यांच्यावरील ऍसिड हल्ला प्रकरणाची दखल राष्ट्रीय पातळीवरील "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'ने घेतली असून शुक्रवारी (ता.15) या समितीचे अनिल अग्रवाल यांनी पूर्णा येथे श्री. चौधरी व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

या घटनेच्या चौकशीसाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने एक सदस्यीय समिती स्थापन केली असून घटनेच्या सखोल चौकशीसाठी सदस्य अनिल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. अग्रवाल यांच्या समवेत दैनिक "हिंदुस्थान'चे संपादक उल्हास मराठे, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, निवासी उपजिल्हाधिकारी विश्‍वांभर गावंडे आदींनी श्री. चौधरी यांची त्यांच्या घरी भेट दिली. घरी श्री. अग्रवाल यांनी चौधरी यांच्याशी चर्चा व विचारपूस केली. या संबंधीची माहितीची नोंद करून तीन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल प्रेस कौन्सिलकडे आपण सादर करू, असेही ते या वेळी म्हणाले.

पूर्णा पोलिस प्रशासनाने या प्रकरणी काय कायदेशीर कार्यवाही केली, याबाबतचा आढावा त्यांनी या वेळी घेतला. पोलिस अधीक्षक संदीप पाटील व स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी चर्चा केली. या वेळी त्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कार्यवाही बाबतचे निर्देश दिले.

स्थानिक पत्रकारांशी संवाद साधून श्री. अग्रवाल यांनी ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"मुख्यमंत्र्यांशी केली न्या. काटजूंनी चर्चा'
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती काटजू यांनी या प्रकरणाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली. त्यांना चौकशी समितीबाबत माहिती दिली असून पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया संबंधितांना निर्देशही देईल, अशी ग्वाही अनिल अग्रवाल यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.
साभार : ई - सकाळ 

शनिवार, १६ मार्च, २०१३

पत्रकारांचा मोर्चा धडकला

परभणी- पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा तयार करावा, या मागणीसह पूर्णा आणि गंगाखेड येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १६ मार्च रोजी पत्रकारांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात मराठवाड्यातून पत्रकार मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख आणि किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकातून दुपारी१ वाजता हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान पत्रकार हल्लाविरोधी कायदा झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे अनेक पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त करुन पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा व्हावा, यासाठी आग्रह धरला. त्यांनतर जिल्हाधिकारी डॉ.शालीग्राम वानखेडे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये अब्दुल हफीज (जालना), जयप्रकाश दगडे (लातूर), केशव घोणसे पाटील (नांदेड) तसेच अ.भा. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन धूत, बहुभाषिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दिलीप माने यांच्यासह परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले पत्रकार सहभागी झाले होते.
तत्पूर्वी सकाळी पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीने एस.एम. देशमुख व पत्रकारांनी पालकमंत्री प्रकाश सोळंके यांची भेट घेतली. यावेळी पूर्णा व गंगाखेड येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची माहिती देत पत्रकारांसाठी संरक्षणाचा कायदा तयार करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.

पत्रकारांची फुकटची दिल्लीवारी……

मुंबई  - रिपाइच्या रामदास आठवले यांचा १३ मार्च रोजी नवी दिल्ली येथे संसद भवनावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चा साठी खास वृत्तसंकलन करण्यासाठी मुंबई मधून १२ ते १५ पत्रकारांना खास तिकीट काढून विमानाने दिल्लीला नेण्यात आले होते. महाराष्ट्रामधील वृत्तपत्रांमध्ये या मोर्चाच्या बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात इतकाच याचा उद्देश होता. मुंबई मराठी पत्रकार संघ तसेच मुंबई महानगर पालिका मधील वृत्तसंकलन करणारे पत्रकार सतत आठवलेंच्या पत्रकार परिषदाच्या बातम्या आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करत असतात. यावेळीही या पत्रकारांनी भर उन्हामध्ये उपाशी पोटी रामदास आठवलेंच्या या मोर्चाचे चांगले वृत्त संकलन करून बातम्या आपल्या वृत्तपत्रांना बातम्या पाठवल्या या बातम्या १४ मार्चच्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध सुद्धा केल्या. 

आठवलेंच्या मोर्चाच्या निमित्ताने आठवलेंची क्वचित कधी तरी बातमी प्रसिद्ध करणारे काही मंत्रालयाचे तसेच बेळगाव " तरुण भारत " मधील वृत्तपत्राच्या मनोरंजन बीट वर काम करणारा व सध्या मुंबई प्रमुख असलेला पत्रकार दिल्ली फिरायला मिळते म्हणून सामील झाले. परंतू या पत्रकारांनी कोणतीही बातमी द्यायचे टाळून दिल्ली फिरण्यावरच भर दिला. मंत्रालायामधील एका पत्रकाराने तर कहरच केला दुसऱ्या एका पत्रकाराने लिहिलेली बातमी जशीच्या तशी आपल्या वृत्तपत्राला दिल्लीहून पाठवली आणि प्रसिद्ध करून घेतली. हा पत्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर आठवलेंच्या जनसंपर्क अधिकाऱ्याला फोन करून साहेबांची बातमी मी मुख्य पानावर लावून घेतली आहे असे " लोकनायक " आठवलेंच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. 

दिल्लीमध्ये १३ मार्चला आठवलेंचा मोर्चा नवी दिल्लीच्या जंतर मंतर वर चालू असताना या पत्रकारांनी खासदार संजय राउत यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी या पत्रकारांना भेट दिली नाही. मग या पत्रकारांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्याकडे वळवला पवारांची भेट झाल्यावर पवारांनी या पत्रकारांना घरी जेवायला नेले असा दावा या पत्रकारांनी केला आहे. रात्री हे पत्रकार गोपीनाथ मुंडे यांना सुद्धा भेटले अशी माहिती उपलब्ध झाली आहे. या सर्व प्रकारावरून हे पत्रकार दिल्लीला रामदास आठवलेंच्या पैशांवर आपली स्वताची कामे करायला आले होते का, आठवलेंच्या मोर्चाच्या बातम्या या पत्रकारांना प्रसिद्धच करायच्या नव्हत्या तर या पत्रकारांना आठवलेंनी कोणत्या कारणासाठी दिल्लीला नेले असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मंगळवार, १२ मार्च, २०१३

त.भा.चे वार्ताहर दिनेश चौधरी यांच्यावर ऍसिड हल्ला

परभणी - जिल्ह्यातील पूर्णा  जंक्शन येथील सोलापूर तरूण भारतचे वार्ताहर दिनेश सदाशिव चौधरी यांच्यावर मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घरात घुसून ऍसिड हल्ला केला.हल्लेखोराने दिनेश चौधरी यांच्या दाराची बेल वाजविल्यानंतर श्रीमती चौधरी यांनी दरवाज उघडला.त्याच वेळेस दिनेश चौधरीही बाहेर आले.ही संधी साधून हल्लेखोराने उभयतांवर ऍसिड फेकले.या ऍसिड हल्ल्यात दिनेश चौधरी आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांना पुढाल उपचारासाठी रात्रीच नांदेडला हलविण्यात आले आहे.
श्रीमती चौधरी या जास्त भाजल्या असून चेहरा आणि छातीवर हा हल्ला झाला आहे .राज्यात गुटका बंदी असली तरी पूर्णा येथे  गुटका सर्रास विकला जातो.त्याविरोधात दिनेश चौधरी यांनी सातत्यान आवाज उठविला.त्यामुळे ज्यांचे आर्थिक हितसंबंध दुखावले आहेत अशा प्रवृत्तीनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारावर अशा प्रकारे ऍसिड हल्ला होण्याची महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.या हल्ल्याच्या निषेधार्थ आज पूर्णा बंदचे आवाहन करण्यात येत आहे.जिल्हा पोलिस प्रमुख आज पूर्णाला भेट देणार आहेत.पूर्णा येथील पत्रकार एस.पीची भेट घेऊन आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी करणार आहेत.पत्रकारांची अकरा वाजता बैठक होत आहे.पत्रकार चौधरी यांच्यावरील हल्लयाचा मनसेने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती लवकरच नांदेडला जावून जखमी पत्रकाराची भेट घेत आहेत.या संदर्भात गृहमंत्र्यांचीही भेट घेतली जाणार आहे.
दिनेश चौधरी हे 35 वर्षीय पत्रकार एक सामाजिक बांधिलकी जपत निष्टेने पत्रकारिता करणारे पत्रकार म्हणून पूर्णेत ओळखले जातात.त्यांच्यावरील हल्ल्याने पूर्मा येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मागच्या आठवड्यातच सातारा येथील पत्रकार विशाल कदम याला आम आदमी पार्टीच्या मंडऴीनी मारहाण केली होती.ती घटना ताजी असतानाच पूर्णा येथील पत्रकारावर हल्ला झाल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.नव्या वर्षातील अडिच महिन्यातला म्हणजे 65 दिवसातला हा पंधरावा हल्ला आहे.म्हणजे राज्यात साडेचार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला केला जात आहे.गेल्या वर्षी हे प्रमाण पाच दिवसाला हल्ला असे होते.

साभार - उद्याचा बातमीदार
गुटखा तस्कराची मस्ती....!
गुटखा विक्रीच्या बातम्या छापल्या म्हणून परभणी जिल्ह्यातील पुर्णा इथल्या एका पत्रकाराच्या कुटूंबावर अ‍ॅसीड हल्ला करण्यात आलाय. यात पत्रकार दिनेश चौधरी त्यांची पत्नी अन मुलगी गंभीररित्या भाजली आहे. सध्या या तिघांवरही नांदेडच्या एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुर्णा हे मराठवाड्यातील महत्वाचे रेल्वे जंक्शन आहे. आंध्रप्रदेश अन कर्नाटकातुन मोठया प्रमाणात गुटख्याची तस्करी करुन तो पुर्णा इथ आनला जातो. अन पुर्णा इथून गुटखा राज्यभर पाठवल्या जातो. गेल्या काही दिवसापासून पुर्णात गुटख्याची मोठी तस्करी सुरू आहे. या संदर्भात पत्रकार दिनेश चौधरीने आपल्या वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित केल्या होत्या. त्याचा राग मनात धरून गुटखा तस्करानी पत्रकारांच्या कुटुंबावर अ‍ॅसीडचा हल्ला चढवला.या प्रकरणी पुर्णा पोलीसांनी तीन संशयीताना ताब्यात घेतलय.गेल्या काही दिवसापासुन पुर्णा हे गुटखा विक्रीचे मध्यवर्ती केंद्र बनलय. गुटखा तस्करानी रेल्वे पोलीसांच्या देखिल खोट्या तक्रारी केल्या आहेत. अन आता बातम्या छापणा-या पत्रकाराच्या कुटुंबावर थेट अ‍ॅसीड हल्ला करण्यापर्यंत तस्करांची मजल जातेय. या प्रकारानंतर पत्रकार दिनेश चौधरीचे कुटुंब कमालीचे भेदरलेल आहे. पुर्णा कॉंग्रेसचा शहराध्यक्ष सय्यद हसनने हा हल्ला घडवला असा आरोप जखमी पत्रकाराने केलाय.
शनिवारी परभणीत पत्रकारांचा मोर्चा 
परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील सोलापूर तरूण भारतचे पत्रकार दिनेश चौधरी आणि त्यांच्या पत्नीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पऱभणीच्यावतीने परभणी येथे शनिवारी पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख या मोर्चाचे नेतृत्व कऱणार असल्याची माहिती पत्रकार हल्ला विरधी कृती समितीच्या पत्रकात देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुटका बंदी असतानाही पूर्णा शहरात गुटका मोठ्या प्रमाणात विकला जात होता.त्यासंबंधीची बातमी दिनेश चौधरी यांनी तरूण भारतमध्ये दिली होती.त्यामुळे संतप्त झालेल्या गुटकाकिंगने चौधरीवर घरात जावून ऍसिडचा हल्ला केला यात ते आणि त्यांच्यापत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर सध्या नांदेडच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.महाराष्ट्रात पत्रकारावर ऍसिड हल्ला होण्याची ही पहिलीच घटना असल्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने याची गंभीर दखल घेत मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम.देशमुख.किरण नाईक,आसाराम लोमटे,हेमंत कौसडीकर,अशोक कुटे आदिंनी केले आहे.
महाराष्ट्रात सातत्याने पत्रकारांवर हल्ले होत आहेत.राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच हे हल्ले होतात. चार दिवसांपूर्वी सातारा येथे आम आदमीच्या कार्यकर्त्यानी तेथील पत्रकारावर हल्ला केला होता.पुर्णेतील हल्ला प्रकरणातही शहर कॉग्रेसच्या अध्यक्षाचा हात असल्याचे पुढे येत आहे.राजकीय पक्षच हल्ले करीत असल्याने सरकार कायदा करायला तयार नाही.विरोधकांनी जेवढ्या प्रभावीपणे हा विषय लावून धरायला हवा तेवढ्या प्रमाणात तो धरला जात नाही.त्यामुळे महाराष्ट्रात दर चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असतानाही सरकार कायदा करीत नाही त्यामुऴे कायद्यासाठीची ही लढाई अधिक तीव्र कऱण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकात देण्यात आली आहे.   
 

पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता असावी : काटजू

नवी दिल्ली : पत्रकारासाठी किमान शैक्षणिक अर्हतेची अट नसल्यामुळे पत्रकारितेचा दर्जा खालावत असल्याचं मत प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी व्यक्त केलंय. पत्रकारांसाठी किमान शैक्षणिक अर्हता काय असावी आणि त्यामध्ये एकवाक्यता कशी आणता येईल, यावर अहवाल देण्यासाठी मार्कंडेय काटजू यांनी एका कमिटीचीही स्थापना केलीय.

निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी स्थापन केलेल्या या त्रिसदस्यीय कमिटीमध्ये प्रेस कौन्सिलचे सदस्य असलेले श्रवण गर्ग आणि राजीव साबडे तसंच पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातील असोसिएट प्रोफेसर उज्वला बर्वे यांचा समावेश आहे. 

मार्कंडेय काटजू यांनी आज एक पत्रक जारी करून ही भूमिका मांडलीय. त्यामध्ये त्यांनी पत्रकारितेसारख्या महत्वाच्या आणि लोकांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या क्षेत्रातील करीअरसाठी काहीतरी किमान शैक्षणिक अर्हता असण्याची आवश्यकता असायला हवी, अशी मांडणी केलीय.

आपली बाजू सविस्तरपणे मांडताना काटजू यांनी वकील आणि डॉक्टर या व्यावसायिकाचं उदाहरण दिलंय. वकिलांना एलएलबीची पदवी आणि बार कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक असते, तसंच डॉक्टरांनाही एमबीबीएसची पदवी आणि मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी अनिववार्य असते. शिक्षकांनाही डीएड, बीएड अशी शिक्षणशास्त्रातली पदवी किंवा पदविका आवश्यक असते, तशी शैक्षमिक अर्हता पत्रकारांसाठीही असायला हवी. सध्या पत्रकारितेचं डिप्लोमा किंवा डिग्रीपर्यंत शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्यामध्ये अनेक पत्रकार आपला अभ्यासक्रम पूर्णही करतात, मात्र नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसायासाठी पत्रकारितेतील पदवी किंवा पदविका अनिवार्य अशी अट नसते. त्यामुळे कुणीही पत्रकारितेचा व्यवसाय करू शकतो. त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात किंवा होत आहेत, असं सांगून काटजू यांनी सध्या कुणीही अल्पशिक्षित किंवा अपुऱ्या व्यावसायिक ज्ञानावर या क्षेत्रात प्रवेश घेतलेल्यांमुळे पत्रकारितेचा दर्जा खालावण्याबरोबरच त्याचं गांभीर्य कमी होत असल्याची खंत व्यक्त केलीय.  

पत्रकारितेतील पात्रता निश्चित करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती
नवी दिल्ली : पत्रकारितेत येण्यासाठी कायद्याने बंधनकारक असलेली पात्रता निश्चित करायला हवी, अशी भूमिका प्रेस कौंसिल ऑफ इंडियाने मांडली आहे.
प्रेस कौंसिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी हीच पात्रता निश्चित करण्यासाठी एका त्रिसदस्यीय समितीची नेमणूकही केली आहे.

डॉक्टर, वकील अशा कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या त्या क्षेत्राची पदवी घेणं आवश्यक आहे.

मात्र पत्रकार होण्यासाठी अशी कोणतीही पदवी कायद्याने बंधनकारक नाही. पत्रकारितेचा समाजावर मोठा परिणाम होतो, त्यामुळे प्रशिक्षित नसलेले लोक या क्षेत्रात येतात तेव्हा त्याचा परिणाम पत्रकारितेवर होतो असा काटजूंचा दावा आहे.

काटजूंनी नेमलेली त्रिसदस्यीय समिती आपला अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द करेल, तो अहवाल प्रेस कौंसिल ऑफ इंडियाच्या सर्व सदस्यांसमोर ठेवला जाईल आणि मान्यता मिळाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी सरकारकडे पाठवण्यात येईल.

 
साभार - ABP माझाजाता- जाता बेरक्याचे सवाल
- मराठवाडाचे दिवंगत संपादक अनंतराव भालेराव, संचारचे दिवंगत संपादक रंगाआण्णा वैद्य कोणत्या कॉलेजमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते, तेच शेवटचे आदर्श संपादक ठरले.
- सध्याच्या किती संपादकांनी पत्रकारितेचा कोर्स केला आहे ?
-या उलट किती तरी विद्याथ्र्यांनी पत्रकारितेचा कोर्स केला आहे, मात्र चार ओळी नीट लिहिता येत नाहीत.
-स्वत: काटजू कोणत्या पेपरचे पत्रकार होते ? ते न्यायाधिश होते, पत्रकार नव्हते.मात्र पत्रकारांना उपदेशाचे डोस देत आहेत.
- पत्रकाराला अनुभव महत्वाचा आहे. त्याच्या अंगात संवेदनशिलपणा पाहिजे.बातमी दगडात,धोंड्यात,फळात आहे, फक्त दृष्टी पाहिजे.तो स्वत:चा गुरू स्वत:च आहे.त्यामुळे माझ्या मते पत्रकारांना लिहिता,वाचता आले तरी बस्स आहे.
-ग्रामीण भागात बी.जे.केलेले किती विद्यार्थी सापडतात. जे करतात, ते शहराकडे जातात. मग ग्रामीण भागात कोर्स केलेले पत्रकार आणायचे कोठून ? 

बुधवार, ६ मार्च, २०१३

सुरेश पवार यांची बोळवण...

कोल्हापूर - सुरेश पवार ऐककाळी पुढारीचे समूह कार्यकारी संपादक होते.तीन वर्षापुर्वी पद्मश्रीबरोबर खटके उडाल्यानंतर ते पुण्यनगरीत गेले. पद्मश्रींने मग दिलीप लोंढे यांना कार्यकारी संपादक म्हणून घेतले आणि त्यांचे नाव प्रेसलाईनमध्ये येवू लागले. तिकडे पुण्यनगरीत गेलेले सुरेश पवार सहा महिन्यातच कंटाळले आणि पद्मश्रींच्या हातापाया पडून पुन्हा पुढारीत परत आले.मात्र त्यांची जागा दिलीप लोंढेंनी घेतल्यामुळे त्यांची गोची झाली.तेही कार्यकारी संपादक अलिखित होते,मात्र प्रेसलाईनमध्ये स्वत:चे नाव यावे यासाठी ते उताविळ होते.अखेर त्यांची बोळवण करण्यासाठी पद्मश्रींनी त्यांचे नाव निवासी संपादक म्हणून देण्याचे ठरविले आहे.
सुरेश पवार यांचे नाव उद्यापासून निवसी संपादक म्हणून पुढारीच्या प्रेसलाईन येईल. हा त्यांचा सन्मान आहे की, बोळवण हे तुम्हीच ठरवा.मात्र ते फौजदारचा कॉन्स्टेबल झाले हे मात्र नक्की

सोमवार, ४ मार्च, २०१३

मु.पो.नगर

1. सकाळच्या नगर जिल्यातील दोन बातमीदारांनी काम थांबवले. विना मोबदला राबवून घेत असल्याची भावना. नको त्या कामांचा ताण, स्त्री विषयक कार्यक्रमावर मोठी नाराजी. या कार्यक्रमाच्या व्हिडिओ काँन्फरन्सच्यावेळी अभिजित पवारांनी बातमीदारांना भिकाऱयासारख्या तक्रारी सांगू नका अशा शब्दात सुनावले. 
2. नगरच्या दिव्य पत्रकाराला कर्जतच्या कोर्टात सक्तमजुरीची शिक्षा झाली असली तरी सकाळमधील एक मोठे नाव विघ्नहर्त्याप्रमाणे पाठिसी असल्याने बातमी छापून आली नाही. बेरक्याने मात्र या दिव्य पत्रकाराची दखल घेतल्याने जिल्ह्यातील वृत्तपत्र क्षेत्रात खळबळ उडाली. 
3. सकाळच्या जाब्ज पुरवणीत , आम्ही आयुष्याला वैतागलोय हा लेख आला आहे. लेखक नितीन थोरात आहेत. विविध खाजगी क्षेत्रात काम करणारांना हा लेख लागू पडतो. परंतु सकाळ मधेच काम करणारांसाठी तर हा सर्वात पक्का लागू पडतो. बातमीदार ते संपादक सर्व मंडळी सकाळमधील वागणूक व कामाच्या बोजाला दिवसेंदिवस कंटाळली आहेत.

शनिवार, २ मार्च, २०१३

दिव्य पत्रकाराला एक वर्षे सक्तमजुरी

कर्जत, (जि. नगर) - पत्रकार गणेश प्रल्हाद चौभे याच्यासह सुभाष कुंडलिक चौभे, अंबादास यशवंत साठे (सर्व रा.बाबुर्डी बेंद, ता.नगर,जि.नगर) व सतीष रूपचंद मुळे (रा.मुळेवाडी,ता.कर्जत) यांना एक वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एन. पाटील यांनी ही शिक्षा सुनावली आहे. गणेश हा माजी ,दिव्य, पत्रकार असून काही दिवसांपूर्वीच त्याने राजीनामा दिला आहे. एकतर्फी प्रेमातून एका मुलीचे लग्न मोडण्यासाठी तो साथिदारांना घेऊन गेला होता. तेव्हा ग्रामस्थांनी त्यांना चोप दिला व पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
याबाबतची हकीकत अशी, 16 मार्च 2010 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास यातील प्रमुख आरोपी गणेशसह वरील साथीदारांनी कापरेवाडी (ता.कर्जत) येथे एका घरी जाऊन त्यांच्या मुलाचे लग्न मोडण्यासाठी धुमाकूळ घातला होता. ज्या दिवशी दुपारी आळंदी येथे हे लग्न होणार होते, त्याच दिवशी पहाटे हा प्रकार झाला. आरोपी गणेश याला या लग्नातील नियोजीत वधूबरोबर लग्न करायचे होते. या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून मुलाच्या (नियोजीत वर) घरी जाऊन त्याच्या विधवा आईला धमकावले. तुझ्या मुलाचे लग्न या मुलीशी लावू नकोस. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. असे म्हणत त्याने धमकावले होते. तर स्वतः पत्रकार असून नगरच्या मोठमोठ्या नेत्यांशी आपले जवळचे संबंध असल्याचे तो प्रभावटाकण्यासाठी त्यावेळी सांगत होता. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात खटला दाखला केला. नुकताच या खटल्यायाचा निकाल लागला. निकाल ऐकून यातील मुख्य आरोपी गणेश रडू कोसळले.य़ा खटल्यात सरकारपक्षातर्फे संदीप नागरगोजे यांनी कामकाज पाहिले. गणेश याचे शिक्षक पत्रकारांना काम करण्यास बंदी करावी, या मागणीची याचिका आैरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू असतानाच त्याच्याविरूद्ध दाखल जुन्या गुन्ह्याचा निकाल लागला आहे. शिक्षक पत्रकारांनीच त्याच्या वृत्तपत्राच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्याने त्याला वृत्तपत्र सोडावे लागल्याचे सांगण्यात येते.

शुक्रवार, १ मार्च, २०१३

पुण्यनगरीमध्ये आसबे, इनामदार यांची एन्ट्री

सोलापूर - सुधीर जोगीपेठकर पुण्यनगरी सोडून व्हिजन वार्तास गेले होते. मात्र व्हिजन वार्ताची वात न लागल्यामुळे जोगीपेठकर पुन्हा पुण्यनगरीसाठी प्रयत्नशील होते.मात्र पटवारींनी जोगीपेठकरांना झटका देत सुर्यकांत आसबे आणि सादीक इनामदार यांना संधी दिली आहे.
आसबेंवर शहर मुख्य वार्ताहर तर सादीकवर उपसंपादकांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पुण्यनगरीच्या सुत्राकडून सांगण्यात आले.आसबे यापुर्वी संचार व्हाया लोकशाशनचे संपादकीय प्रमुख होते. तर इनामदार एकमतमध्ये होते.
जोगीपेठकर सांगत होते की,पुण्यनगरीची खुर्ची आपणासाठी राखीव आहे, मात्र व्यवस्थापक पटवारींनी बरोबर पत्ता कट केला आहे.

जाता- जाता : दैनिक व्हिजन वार्ताचे कार्यालय होटगी रोडवरील अकबर व्हिला या बिल्डींगमध्ये होते.तीन महिन्याचे भाडे न दिल्यामुळे मालकांने जागा खाली करण्यात सांगितले आहे.या बिल्डींगमधधीन दोन मजले आता दिव्य मराठीस भाड्याने देण्यात आले आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook