> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2012 साठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई -  राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2012 या वर्षाकरिता दिनांक  1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 मे 2013 असा आहे.
            2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली  विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. जिल्ह्यातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. पुरस्कार पुढीलप्रमाणे.
        राज्यस्तर (मराठी) बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार-51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  राज्यस्तर(इंग्रजी) अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; राज्यस्तर (हिंदी) बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,  राज्यस्तर (उर्दू) मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; शासकीय गट (मराठी) यशवंतराव चव्हाण पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार-मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 41 हजार रुपये आणि केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट  (मा. व ज.) 41 हजार  रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.          
विभागीय पुरस्कार
        नाशिक विभाग : दादासाहेब पोतनीस पुरस्कार-51 हजार रुपये,  मानचिन्ह व प्रशस्तीपत्र (यापैकी रुपये  10 हजार, दै. गावकरीने पुरस्कृत केले आहेत);  औरंगाबाद विभाग (लातूरसह) : अनंतराव भालेराव पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  मुंबई विभाग: आचार्य अत्रे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; पुणे विभाग : नानासाहेब परुळेकर पुरस्कार-41 हजार रुपये,  मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; कोकण विभाग : शि. म. परांजपे पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;                कोल्हापूर विभाग : ग. गो. जाधव पुरस्कार -41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र; अमरावती विभाग : लोकनायक बापूजी अणे पुरस्कार-41 हजार रुपये,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र;  नागपूर विभाग : ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार-41 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र.
नियम व अटी
            पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकास विषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल.मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल.  या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.            
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2012 . .
            पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती  नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
            पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
            अर्जदारांनी राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
            मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील. ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई  (कोकण),  कोल्हापूर,  नागपूर,  अमरावती,  नाशिक,  पुणे आणिऔरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येईल.                 
            गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात पाठविता येतील. शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील. 2012 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेवर राज्यस्तर/विभागीयस्तर तसेच प्रवेशिका कोणत्या भाषेकरिता आहे याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. आपण पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. प्रवेशिका राज्यस्तरासाठी किंवा विभागीयस्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे, याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास, त्याचा विचार केला जाणार नाही.
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील पत्रकारांसाठी उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पु.ल.देशपांडे पुरस्कार देण्यात येतो.
ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खासगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय  उपक्रम  यांना यामध्ये सहभाग घेता येईल. पुरस्काराचे स्वरुप 41,000 रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र
                                                          
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2012 . .
असे आहे. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली,याबाबतचे संबंधित संस्थाप्रमुखांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.  प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी, कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक/जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे तर मुंबईकरिता मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय, मुंबई-32 यांचेकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तकथाचित्र राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मिडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच याशिवाय अटी नियम पुस्तिकेतील क्रमांक 6आणि अन्य संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.              
छायाचित्रकार पुरस्कार
राज्यस्तर : तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार 41 हजार रुपये, उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज) 41 हजार रुपये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.उत्कृष्ट छायाचित्रकार स्पर्धा मराठी,इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्राकरिता आहे.
2012 च्या पुरस्कारासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो  प्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक कामाच्या प्रसिद्धीसाठी जनतेमधील जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल.एकाच छायाचित्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियत कालिकात छायाचित्र प्रसिद्ध झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिकेसोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या   http://dgipr.maharashtra.gov.in तसेच  महाराष्ट्र शासनाच्या  www.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर  उपलब्ध  आहेत.  तसेच  जिल्हा  माहिती  अधिकारी, उपसंचालक,  विभागीय  माहिती  कार्यालय,  संचालक, नागपूर अमरावती व संचालक,  औरंगाबाद,  महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी गोवा तसेच  नवी दिल्ली  आणि वृत्त विभाग,  माहिती व जनसंपर्क  महासंचालनालय, मंत्रालय,   मुंबई-400032 येथे उपलब्ध आहेत.
            या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र...आज पहाटाच्यापास्नंच ट्विटवर बगयाची टीव टीव सुरू होती. कोणी यावं टिचकी मारून जावं तसं कोणी बी याव अन् न्यूज चॅनल सुरू करावं अस थे म्हणत व्हते. त्याले कारणबी तसंच व्हय. दरववर्षी ‘एक मेला‘ (की) सगयाले ‘जय महाराष्ट्र‘ आठोथे. यंदात थ कोण्या शेट्टी न अख्ख्या महाराष्ट्रालेच ‘जय महाराष्ट्र‘ केल्ला. (आतालोक महाराष्ट्राले दोन शेट्टी मालूम व्हते. एक सुनील अन् दुसरी आपली गोळ शिल्पा. आता भर उन्हायात ‘सुधाकर‘ उगवला) थ्यानं बीयरच्या पाटलीनं अख्ख्या महाराष्ट्राच पाणी शोषून घेत्ल. असा बयगे म्हणतात. थ्यामुयच सध्या दुष्कायाचे दिवस सुरू हैत. पाणी टंचाई असल्यानं बगयाले मासुयाच उरल्या नै. ज्या व्हत्या त्यायनं बी थ्याले ‘जय महाराराष्ट्र‘ केल्ला. थ्यामुयं. आपोआपच ‘अंबा-फणसाचे‘ चे दिस आल्ले. मंग काय चिल्लाहू राह्यले टीव टीव करत बयगे. आता थ त्यायले पोट ‘पूजा' कारायल्ले जुना बार बी उरला नै. थ्याच बारच्या मालकानंच म्हणे न्यूज चॅनल काळल्लं. थ्यामुयं बगयाले लैय दुःख झालं. थे पेंद्याले म्हण्ले बी, ‘‘ अबे पेंद्या मालं त डोक्सच चालू नै राह्यलं बॉ ! म्या बी बारच टाकयले पाहिले व्हता ‘महानगरात‘.
पेंद्या : हाव ना सायेब तुमचं डोक्स नाही तोंळ चाल्ते लै. आज तुम्ही बी मालक अस्ते ‘वृत्त वहिनी'चे
बयगे : कायले काम करू राह्यला तू पत्रकार म्हून. कोण घेत्ल तुले? ‘वृत्त वहिनी‘ नै ‘वृत्तवाहिनी'
पेंद्या : तुमीच थ घेत्ल सायेब मले. जाऊ द्या ! अशाच वहिन्याले नाचवून नाचवून थ्यानं वाहिनी काळली ना !
बयगे : हाव ना बे ! मले थ काही सुधरू नै राह्यलं. आपल्या कोकणातील ‘नारूदा'नं बी थ्याल्ले मदत केल्ली म्हणतात?
पेंद्या : सायेब एक सांगतो लहान तोंळी मोठा घास तसं. आपण याचा इचारच करू नै. ‘महाराष्ट्रा‘त उजेळ पाळायच्या भानगळीत आपल्या खालचा अंधार पायत जा !
बगये : म्हण्जे?
पेंद्या : परवा संजय आवटे सायेबानं थ्यायच्या वॉलवर एक लैयच खास पोस्ट टाक्ली. ‘मेरे पास मीडिया है‘ ही. थ्यात थ्यायनं शेखर गुप्ता यांनी थ्यायच्या ‘नॅशनल इंटरेस्ट‘ या स्तंभात काय लिव्हलं थे सांग्लं.
बगये : म्या कसं नै वाचलं?
पेंद्या : तुमालेच सवाल करता करता टेम कुठं भेटते सायेब?
बगये : बरं बरं काय व्हत थ्यात?
पेंद्या : लै मार्मिक अन् इचार करायले लावणार व्हत सायेब. अंबानीज् (ऑब्झव्र्हर), विजयपत सिंघानिया (इंडियन पोस्ट), एल. एम. थापर( द पायोनीअर), संजय दालमिया( संडे मेल), ललित सुरी (दिल्ली मिड डे) यायले मीडियाच्या धंद्यात अपयशाचा झटका बसला ... तरीही इथं गुंतवणूक करायले मोठ्या संख्येनं मंडयी येत है. काहून ?
बगये : काहून बॉ..
पेंद्या : थ्येच थ. हे लोक पेपर, न्यूज चॅनल सुरू करतात. त्यायले पत्रकारितचा आदर नै. त्यायले मालूम है तुमच्या सारखे लै पत्रकार उपलब्ध हैत. आंबा-फणसाचा रसबी थेच पिणार हैत. पॅकेज देऊन इकत घेतल्यासारखं. कारण हे बुद्धिजिवी भाळ्यानं मियू राह्यले ना ! त्यायले जर रंगिला औरंगाबादीसारखी गाळी-घोळी देल्ली की झाल्लं. हे पत्रकार तुम्हाले सन्मान मियवून देतील, मग राजकारणी, विचारवंत, सेलेब्रिटी सगये तुमच्या अवती-भवती, फिरतील.
बगये : अबे पेंद्या तुयाल्या चिभेले काई हाळ बिळ व्हय का नै? अबे थ आपल्या मालकानं बी आपल्याले असंच पॅकेज देऊन इकत घेत्ल ना !
पेंद्या : अन् रंगिला औरंगाबादीसारखं कव्हा हाळ हाळ करतील हैबी सांग्ता येणार नै सायेब.. साधा ‘जय महाराष्ट्र‘ बी करणार नैत.. काय?
पेंद्याचं हे बोलनं ऐकून बगये कव्हा नै थे विचारमग्न झाल्ले.

सोमवार, २९ एप्रिल, २०१३

बेरक्याची दखल ...

"पालिकेमधील महिला पत्रकाराचे प्रताप" या मथळ्याची बातमी बेरक्यावर प्रसिद्ध होताच आता पर्यंत तोंडावर कुलूप लावून बसलेल्या पालिका वार्ताहर संघाच्या वरिष्ठ व स्वयंघोषित शा पदाधिकाऱ्यांनी मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यापर्यंत हा प्रकार नेवून सदर ललनेला समज देण्यास सांगितले. जनसंपर्क अधिकारयानेही या ललनेला जबरदस्त झापले असून असून असे प्रकार पालिकेत खपवून घेणार नाही अशी तंबी दिली असल्याचे समजते. 

आपले पितळ उघडे पडल्याने या ललनेने आपली बदनामी केली असे कारण देत, पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनीच हा प्रकार बेरक्यावर टाकल्याचा संशय घेतला आहे. पालिका वार्ताहर संघ कशा प्रकारे चुकीची कामे करणाऱ्या पत्रकारांना पाठीशी घालतो हे उघड करावे म्हणून बेरक्याच्या टीमने मुंबई महानगर पालिकेमध्ये येवून केलेल्या शोधक वृत्तीमधून हा प्रकार उघड केलेला आहे, यामुळे येथील पत्रकारांचे या प्रकरणात काहीही देणे घेणे नाही. 

पालिका वार्ताहर संघाच्या स्वयंघोषित पदाधिकार्यांनी अशा प्रकारांची वेळीच दखल घेतली असती तर बेरक्यावर असे प्रकार प्रसिद्ध करण्याची गरजच भासली नसती. हे पालिकेमध्ये स्वयंघोषित पद्धतीने वार्ताहर संघाचे पदाधिकारी होणाऱ्यांना बेरक्याने सांगण्याची गरज नसावी असे वाटते.

मुंबई लोकल ...

मुंबईतल्या माध्यमांचा आणि घडामोडींचा घेतलेला आढावा  
१ ) सकाळ : सकाळमधील कर्मचार्यांना १५  ते २० टक्के पगारवाढ झाली आहे. मागील दिवसात सकाळमध्ये उपसंपादक / वार्ताहर पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षाहि झाल्यात, पण या परीक्षांना हवा तसा प्रतिसाद भेटला नाही. मागील संखेच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या कमी होती. बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार वैजयंता गोगावले , प्रशांत बडे , अभिषेक कांबळे हे परीक्षेला हजर होते.       
२ ) पुढारी : ' रंगीला ' आल्यापासून पुढारीत गळती कायम आहे. नुकतीच पुढारीतून १२ वी  विकेट पडली. झंजावती ले- आउट आर्टीस्ट मिलिंद नार्वेकर पुढारी सोडून लोकमतला जोइन्त झालेत. पुढारीचे माजी वृत्तसंपादक भालचंद्र पिंपळवाडकर हे जळगाव सकाळला असोसियेट एडिटर म्हणून जोइन्त झालेत. मालकाकडे डोके फोडून पगारवाढ मागितली  तरीही अदयाप कोणाची पगारवाढ झाली नसल्याने पुढारीत असंतोष कायम आहे. ले- आउटही ढेपाळले आहे. त्यातही शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका. काय करणार ? जेमतेम दोघा प्रुफरीडरचा १५ - २० पाने वाचून जीव जातोय. त्यात मुंबई , ठाण्यात जो तो आपली प्रतिष्ठा टिकविण्यासाठी भयंकर राजकारण करतोय. याच राजकारणामुळे पुढारी सोडून गेलेले प्रशांत सिनकर अदयाप रिंगणात आहे. 
३) लोकमत : विनायक पात्रुडकरांच्या गळाला आपल्या जुन्याच तलावातील आणखी २ मासे लागलेत. मिलिंद नार्वेकर आणि कल्पेश पोवळेना प्याकेज चांगले मिळाल्याने तेही आनंदात आहे. लोकमतचा दर्जा आता कित्येक पटीने सुधारला आहे. 
४) पुण्यनगरी : वैजयंता गोगावलेना पुण्यनगरीत अल्टीमेटम मिळाल्यानंतर त्या मुंबई लक्षदीप ला जोइन्त झाल्यात. त्यात बातम्यांचा दर्जा खालावला. वृत्तसंपादनची बोंब. कार्यकारी संपादक संजय मलमेना टेक ओवर करणाऱ्यांचे काही खरे नाही … अलीकडेच एक उपसंपादक मुंबई चौफेरला शिफ्ट. 
५) मुंबई मित्र : संपादक अभय मोकाशींच्या सोडून जाण्याने ' मित्र ' ची वाताहत. तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त रेटा. दोन - दोन महिने पगार नाही. ' चमकेश ' मालक इकडच्या तिकडच्या कार्यक्रमामध्ये गुंग. 
६) सामना : अजूनही पेजमेकरच्या  जमान्यात वावरणारा सामनात ले- आउटची मुंबईत जबरदस्त चर्चा. पेजिनेशन , बातम्यांची आखणी , मांडणी , सजावटीकडे विशेष लक्ष. वृत्तसंपादन,  मजकूरही दर्जेदार. पंचवीसएक ओपारेरांची सामन्याकडे फौज. प्रिंटींगचा दर्जाही सुधारला . 
७) महाराष्ट्र टाइम्स : ' स्मार्ट मित्र ' मध्ये बातम्यांचे मथळे, लिखाणात अनेक बदल. आकर्षक मथाल्यानवर विशेष भर.,  ले- आउट मध्ये मुबलक व्हाईट स्पेसला अधिक महत्व, सुटसुटीत मांडणीला प्राधान्य. मात्र मुंबई टाइम्स पुरवणीचा बट्ट्याबोळ. मराठी भाषेची लावली वाट. तरुणीच्या नावाखाली खपणार्या या पुरवणीत ' फाडू ' ' ढासू ' अश्या अनेक जळजळीत शब्दांचा भडीमार. मायबोली मराठीचा विसर?

                                               ----  ठिणग्या ----
* नवशक्तीत कामगार कपातीचे धोरण कायम, नवीन भरती नाही . खर्चात कपात ;मालकाने केले खिसे वर. 
* चित्रलेखाने केली ५ टक्के वार्षिक पगारवाढ 
* सध्या मुंबईत कोणत्याही नव्या दैनिकाची खबर नाही 
* वर्तमानपत्रांच्या छपाईचा कागद महागला. हिंदुस्तान टाइम्स , डीएनए सह अनेक दैनिकांनी केले पाने कमी 
* टीव्ही ९ ने उमटवली मराठी मनावर मोहर. अनेक ठिकाणी तुफान प्रतिसाद मात्र , कधी कधी बातम्यांमध्ये रक्तरंजितपणा दाखविण्याचा प्रयत्न. इंडिया टीव्हीच्या पावलावर पाऊल ठेवण्याची धडपड ?
* ' जय महाराष्ट्र ' चान्णेल चे लोन्चींग थाटामाटात …. ' आगे आगे देखो होता हे क्या ?' बेरक्याचे त्यावर पूर्ण लक्ष. खटकल अपेक्षाभंग केला तर हमखास ' झोडून ' काढणार 

रविवार, २८ एप्रिल, २०१३

संजीव उन्हाळे यांना वरुणराज भिडे पुरस्कार

■ पुणे येथे रविवारी वरुणराज भिडे स्मृती मुख्य पुरस्कार स्वीकारताना संजीव उन्हाळे.
 पुणे - पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाचा वरुणराज भिडे स्मृती मुख्य पुरस्कार आज 'लोकमत'च्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह व २१ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विरोधी पक्षनेते विनोद तावडे व 'लोकमत'च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले.
लोकशाहीची धुरा सांभाळणारे कायदेमंडळ, न्यायालये, प्रशासन आणि पत्रकारिता हे चारही स्तंभ आपली भूमिका काय, याविषयीच संभ्रमात पडल्याचे दिसत आहे. एक आपली भूमिका पार पाडू शकत नाही म्हणून दुसरा ती हातात घेतो आणि अपूर्ण माहितीत घोळ अधिक वाढतो. लोकशाहीच्या चारही स्तंभांमध्ये नकारात्मक वातावरण असले तरी त्यात चुकीचे आहे, असे म्हणणारेही आहेत. जेव्हा चूक आहे असे जाणवते तेव्हाच चांगले होण्याची आशा असते. असे चांगले करणार्‍यांचे आत्मबल वाढविण्याची जबाबदारी पत्रकारांची असून विश्‍वासाचा माहोल चारही स्तंभांभोवती उभा रहायला हवा, असे मत तावडे यांनी व्यक्त केले. अशोक तुपे, आरती कदम, नीलेश खरे, नंदकिशोर लोंढे, संदीप पोळ यांनाही विविध पुरस्कार देण्यात आले.

‘जय महाराष्ट्र’ या नव्या मराठी चॅनलचं दमदार लॉन्चिंग

मुंबई: सहाना ग्रुप ऑफ कंपनीज च्या ‘जय महाराष्ट्र’ या नव्या मराठी चॅनलचं शनिवारी  संध्याकाळी  मुंबईच्या ग्रँड हयात या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दमदार लॉन्चिंग झालं. सर्वच पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणणारं आणि तारे-तारकांच्या उपस्थितीत झालेलं हे ‘जय महाराष्ट्र’ चॅनलचं लॉन्चिंग मराठी  चॅनेल्सपैकी एकमेव व्दितीयच…
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, गृहनिर्माण राज्य मंत्री सचिन अहिर, उद्योगमंत्री नारायण राणे, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, खासदार गोपीनाथ मुंडे, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, बीसीसीआयचे राजीव शुक्ला अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी  व्यासपीठावरुन जय महाराष्ट्रचॅनल लॉन्च केलं. या सगळ्यांच्याच हातात रिमोट देण्यात आला होता आणि स्टेजवर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनसमोर रिमोट कंट्रोल धरून त्यांनी ऑनचं बटण क्लिक केलं….उपस्थित प्रेक्षक काही क्षणासाठी स्तब्ध झाले…काऊंटडाऊन सुरू झाला…आणि ‘जय महाराष्ट्र’ चा प्रोमो स्टेजवर लावलेल्या स्क्रीनवर प्ले झाला…. आम्ही  अचूक असू, थेट आणि बिनधास्त…हे असेल सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारं चॅनल…..प्रोमो संपला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला…उपस्थितांच्या चेह-यावर कुतूहल, आश्चर्य आणि कौतुक सहज लक्षात येत होतं…फक्त राजकीय़ नेत्यांची मांदियाळी नव्हे तर अख्ख बॉलिवूडही या लॉन्चिंग पार्टीला अवतरलं होतं. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र, अभिनेता ओम पुरी, भाग्यश्री पटवर्धन, मल्लिका शेरावत, संगीतकार जोडी साजिद-वाजिद आणि बॉलिवूडमधली दोन ग्रेट नावं स्टार प्रियांका चोप्रा आणि द सलमान खान यांचीही या लॉन्चिंग पार्टीला उपस्थिती होती.  अशा सगळ्या दिग्गजांनी ‘जय महाराष्ट्र’च्या लॉन्चिंगला येणं ही ‘जय महाराष्ट्र’ चॅनलच्या दमदार एन्ट्रीची नांदी म्हणावी लागेल.

अभिनेता सलमान खान याचं स्वागत करताना ‘जय महाराष्ट्र’
न्यूज चॅनलचे संपादकीय सल्लागार संचालक वाहिद अली खान.
कर्नाटकातून आलेल्या एका युवकाचा, आयुष्यात काहीतरी करु पहाणारा तरुण ते बिल्डर आणि सहाना ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन असा  शुन्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास थक्क करणाराते नाव सुधाकर शेट्टीत्यांचे सगळ्याच क्षेत्रातल्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, त्यामुळे हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. त्यांच्या याच सगळ्या गुणसमुच्चयाचा उल्लेख मान्यवरांच्या भाषणातूनही दिसून आला. ज्या महाराष्ट्राने मला मोठं केलं, त्याचे ऋण मनात ठेऊन हे मराठी चॅनल मी सुरू केल्याची भावना स्वतः सुधाकर शेट्टी यांनी व्यक्त केली…सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सगळेच चॅनल करतात. पण आपल्या जय महाराष्ट्र या चॅनलच्या लॉन्चिंगलाच श्री. सुधाकर शेट्टी यांनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून एक कोटींचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. यातून सुधाकर शेट्टी यांचं सामाजिक भान जाणवतं. यासगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी संपादकीय सल्लागार संचालक वाहिद अली खान यांनी उत्कृष्टपणे निभावली.
तसंच या लॉन्चिंगच्या सुरुवातीलाच ‘जय महाराष्ट्र’ न्यूज चॅनलचे संपादक मंदार फणसे,  कार्यकारी संपादक रवींद्र आंबेकर आणि तुळशीदास भोईटे यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलं आणि संपादकांनी जय महाराष्ट्र या चॅनलची भूमिका मांडली. महाराष्ट्राचं हित आणि सामाजिक बांधिलकी जपण्याला प्राधान्य देणारं हे चॅनल एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार  आहे…..

शनिवार, २७ एप्रिल, २०१३

पालिकेमधील महिला पत्रकाराचे प्रताप

काही वर्षापूर्वी मुंबई महानगर पालिकेमधील जनसंपर्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मागेल ते देवून, दिवस रात्र जनसंपर्क कार्यालयात ठाण मांडून पालिकेच्या पत्रकार कक्षाचे प्रवेशपत्र मिळवणाऱ्या एका महिला पत्रकाराचे प्रताप वाढल्याने पालिकेमध्ये सध्या सर्वत्र या महिला पत्रकाराची चर्चा आहे.

मुंबई महानगर पालिकेमध्ये वृत्तसंकलन करणारी ही महिला पत्रकार सतत पालिकेचा जनसंपर्क अधिकारी माझा खास माणूस आहे, माझे काही केल्यास सगळ्यांची वाट लावेल अशी खुले आम धमकी देत असते. पालिका वार्ताहर संघाचा अध्यक्ष मला प्रेस क्लब, मुंबई मध्ये सारखा भेटतो मला सारखे एसएमएस करत असतो. मला सगळे मोठे पोलिस अधीकारी ओळखतात मला कोणी काही केल्यास मी त्याला सोडणार नाही अश्या मोठे पणाच्या सतत गोष्टी करत असते. 

गेल्याच आठवड्यात या महिला पत्रकाराने लग्न झाले असतानाही इतर पुरुषांना आपल्या नादाला लावायच्या सवयी मुळे बुधवारी १० एप्रिलच्या संध्याकाळी "टाइम्स ऑफ इंडिया" वृत्तपत्राच्या पत्रकाराने दारू पिऊन आपल्या हाताची शीर कापून घेतली. आपल्या बरोबर दररोज खाऊन पिऊन मज्जा करणारी ठमा आपल्याला आता दाद देत नाही हे समजल्याने "टाइम्स ऑफ इंडिया" वृत्तपत्राच्या पत्रकाराने असा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. 

पालिकेच्या सुरक्षा रक्षकाच्या हि बाब निदर्शनास आल्यावर दोन सुरक्षा रक्षकांनी या पत्रकाराला पालिकेच्या पत्रकार कक्षाकडे आणले असता या पत्रकाराने मी जो पर्यंत हि महिला  पत्रकार कक्षाच्या बाहेर येत नाही तो पर्यंत येथून जाणारच नाही अशी भूमिका घेतल्याने इतरांना सतत आपल्या नादी लावणाऱ् या ललनाचे चांगलेच धाबे दणाणलेले होते. बाहेर आपली शीर कापून घेणारा पत्रकार उभा असून तो जाण्याचे नावच घेत नसल्याचे समजताच जनसंपर्क अधिकारी, पालिका पत्रकार संघाचा अध्यक्ष, पोलिस अधिकारी माझे खास आहे असे सांगणाऱ्या ललनाला शेवटी आपल्या नवऱ्याला पालिकेतून घरी घेवून जाण्यास बोलवावे लागले. 

पालिकेच्या आवारात पत्रकारांमुळेच असा प्रकार घडल्याने पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असले व या दोन्ही पत्रकारांवर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला नसला तरी पुन्हा असे प्रकार होऊ नये म्हणून मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागाने या महिला पत्रकारावर कारवाही करून तिचे पालिकेमध्ये येणेच बंद करावे अशी मागणी जनसंपर्क अधिकाऱ्याच्या चहाला जागणाऱ्या व जनसंपर्क अधिकारयाला मुजरा करणाऱ्या पत्रकारांकडून दबक्या आवाजात केली जात आहे.

धन्य ती मराठी पत्रकारिता...

आजपर्यंत मुंबईपुरताच राहिलेल्या मटाने गेल्या काही वर्षांपासून नवनवीन आवृत्त्या सुरू करून आपला विस्तार केला आहे. त्यामुळे एकेकाळी खरोखरच दर्जेदार वृत्तपत्र असलेला मटा आता आपल्या शहरातूनही सुरू होत असल्याचे पाहून मराठी मनाला आनंद झाला होता. पण रोजरोज सेलिब्रिटींचे मोठेमोटे फोटो, आंग्रेजाळलेली मराठी, तरुणाईच्या नावावर काहीही खपविणे हे पाहून प्रत्यक्षात त्यांच्या किती अपेक्षा पूर्ण झाल्या हे त्यांनाच माहीत.

      मुंबईबाहेर पहिली मोठी आवृत्ती सुरू झाली पुण्यात. त्यावेळी विविध पदांसाठी भरती करण्यात आली. त्यात खरच दर्जेदार काम करणा-या पत्रकारांना आशा वाटली की, आपल्याला मटात (टाईम्ससारख्या प्रतिष्ठीत समूहात) काम करायला मिळेल. मुंबईचा मटा वाचून माहीत असलेल्या वाचकांनाही वाटले काही तरी दर्जेदार वाचायला मिळेल. पण घडते आहे वेगळेच. सुरुवातीला प्रस्थापित अशा एकाच वृत्तपत्रातील अधिकाधिक कर्मचा-यांना जादा पगार देऊन आपल्याकडे खेचले गेले. त्यावेळी समाजाच्या दृष्टीने आवश्यक अशी खरीखुरी मराठी पत्रकारिता करणाऱ्यांपेक्षा वशिला, लाळघोटेपणा करू शकणाऱ्यांनाच महत्त्व दिले गेले. कारण सध्या या वैशिष्ट्यांची मराठीत चलती आहे. अन्य वृत्तपत्रात दर्जेदार काम करणाऱ्या पत्रकारांना फारसे महत्त्व देण्यात आले नाही. यामागे विचार एकच प्रस्थापितावर मात करणे. अन्य आवृत्त्यांसाठी पुण्यात भरती झाली त्याहीवेळी एवढाच निकष आणि विचार. त्यामुळे नव्या आणि जुन्या वृत्तपत्राची शैली, फोटोही सेमसेम. आगळ्यावेगळ्या स्कीममुळे अंकाचा खप सुरुवातीपासूनच जास्त असला तरी वाचक असेही म्हणू लागले की नवे वृत्तपत्र जुन्याचीच कॉपी आहे. मटात जी भरती झाली त्यातील ब-याच जणांची रितच न्यारी. त्यात आंतरराष्ट्रीय राजकारण आणि संरक्षण अशा प्रकारच्या विषयांवर `प्रभुत्व असलेल्यांची संख्या सर्वाधिक. वरच्यांना खूष करण्यासाठी आणि इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी आपली क्षमता नसली तरी त्यावर लेखन करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर मटात अशीही पध्दत आली की, या विषयांवर तुम्हाला काही माहीत असो वा नसो, कोणीही लिहावे.

मग काय व्हायचे तेच होऊ लागले. होणारच अक्षम लोकांचाच भरणा आहे ना त्यात. या विषयांवर लेखन करण्यासाठी मटात प्रचंड चढाओढ होऊ लागली आहे. त्यांच्यातील ब-याच जणांनी आगळीवेगळी पध्दत अवलंबली आहे. माहितीचा प्रचंड खजिना असलेल्या इंटरनेटवरून या विषयांशी संबंधित नामांकित संस्थांच्या साईटवरून एखाद्याचा अभ्यासपूर्ण लेख उचलायचा. त्याचे मराठीत भाषांतर करायचे आणि तो आपल्या नावावर खपवायचा. मात्र त्यांची ही चाल सुजाण वाचकांच्या नजरेत आली. २४ एप्रिलच्या चीनसंबंधीच्या मटा गाईडमध्येही चुकांचाच भडीमार. हे कमी म्हणून की काय रोजच्या अंकात शुध्दलेखनाच्या चुकाच चुका. बातम्यांमध्येही चुका. विनोदी किस्स्यांचेही रिपीटिशन.

या वर्णनामागे अपेक्षा एवढीच की स्पर्धक वृत्तपत्रातूनच पत्रकारांना स्वतःकडे ओढत बसण्यापेक्षा पत्रकारांच्या दर्जाला सर्वाधिक महत्त्व दिल्यास मराठी पत्रकारितेचे भवितव्य उज्ज्वल बनेल. त्यासाठी मीच शहाणा, मला सगळं येतं या वृत्तीतूनही बाहेर येणं अत्यंत आवश्यक आहे. पण त्यालाच आज सर्वांत आधी तिलांजली दिली जात आहे. राज्य आणि गल्लीतल्या राजकारणावर ठोकळेबाजपणे रेकून लिहिता-बोलता आले की मराठी पत्रकारितेत कोणीही नवशिकाही आंतरराष्ट्रीय घजामोडींचाही तज्ञ बनतो आहे. त्यामुळे ज्या विषयांमध्ये खरोखरच तज्ञता लागते, त्यावरही ते अधिकारवाणीने बोलू लागतो. इलेक्ट्रॉनिक मीडियात हे सर्रास घडते आणि ते प्रिंटमध्येही घडत आहे. मराठी पत्रकारांच्या मते तर, या विषयांमध्ये मराठी माणसाला फार इंटरेस्ट नसल्याने त्यासाठीच्या माहितगारांची गरज नाही. हे विषय शक्यतो टाळण्याकडेच वरिष्ठांचा कल असतो.
अलीकडेच सुरू झालेल्या टीव्ही नाईननेही असाच काही प्रकार केला. चित्त्याचा जीवनपट दाखवून जरा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न त्याने केला. पण अर्ध्या तासाच्या विशेष कार्यक्रमात आपण चित्ता सोडून वेगळाच प्राणी दाखवत आहोत हे त्यांना समजले नाही. चित्ता भारतात नाही हे कदाचित त्यांच्या हुशार तज्ञ पत्रकारांना कदाचित माहीत नाही. चित्ता झाडावर चढत नाही हेही ते विसरले आणि चक्क बिबट्यालाच चित्ता ठरवून वेळ मारून नेली.

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

नारदाची भ्रमंती

स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांच्यासोबत भोपाळहून महाराष्ट्रात आलेल्या 'दिव्य मराठी'च्या कोअर टीममधील समूह कार्यकारी संपादक अजित वडनेरकर यांचा राजीनामा; वाराणशी येथे 'अमर उजाला'चे निवासी संपादक म्हणून रुजू. अजित वडनेरकर यांच्या जागी प्रशांत दीक्षित यांची 'दिव्य मराठी'च्या समूह कार्यकारी संपादकपदी वर्णी...
.....................................

 'दिव्य मराठी'च्या अकोला युनिटच्या हालचाली गतिमान. जळगावमधील वरिष्ठ व्यवस्थापक संजय यादव (8390903072) यांना युनिट हेड म्हणून बढती मिळाल्याची अकोल्यात चर्चा.
....................................................................

भास्कर डॉट कॉममधून चौघांचा राजीनामा : 

भास्कर डॉट कॉममधून अनेक जणांनी एकाचवेळी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यातील चौघांची पक्की खबर 'बेरक्या'कडे आली आहे.  भोपाळ मुख्यालयात कार्यरत  राजीव सिंह आणि शोभा यांनी अमर उजाला डॉट कॉम जॉईन केले आहे. मनीष कुमार ने नई दुनिया इंदूर तर कौशी प्रताप सिंह यांनी राजस्थान पत्रिका जॉईन केले आहे.

दैनिक भास्करचे नॅशनल हेड  कमलेश सिंग प्रतिस्पर्धी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये एडिटर इन चीफ 
दैनिक भास्करचे नॅशनल हेड असलेले कमलेश सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला असून ते प्रतिस्पर्धी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये एडिटर इन चीफ म्हणून रुजू होत आहेत.  त्यासाठी 'दबंग'च्या मालकांनी  संपादक पंकज मुकाती यांना इतरत्र बदलीवर पाठवून ती खुर्ची खाली केली आहे. कमलेश सिंग यांना एका महिन्याच्या पगारापोटी २ लाख रुपये प्रमाणे वर्षभराचा पगार आगावू दिले गेल्याचीही चर्चा आहे.

आईच्या अंत्यसंस्काराची सुट्टी घेतल्याने 'भास्कर'ने 15 दिवसांचे वेतन कापले
  भास्कर समूहातील अंबाला (पंजाब) येथील आवृत्तीत कार्यरत सीनिअर रिपोर्टर आशिष श्रीवास्तव यांच्या आईचे निधन झाले म्हणून त्यांना १५ दिवस कामावर जाता आले नाही. १५  दिवसांनंतर ते पुन्हा कामावर आले तर संपादक नरेंद्र अकेला यांनी त्यांचे १५  दिवसांचे वेतन कापल्याची धक्कादायक बाब समजली. प्रशासनानेही त्यांचे वेतन कापले. संपादकांकडून रजा मंजूर करवून न घेता कामावर गेले म्हणून श्रीवास्तव यांचा पगार कापला गेला. या धक्क्यानंतर श्रीवास्तव यांनी तडकाफडकी राजीनामा दिला व ते 'आज समाज' दैनिकात रुजू झाले आहेत. संपादक व भास्कर प्रशासनाच्या या अमानवीय आणि माणुसकीला लाजविणारया कृत्याचा पंजाबात सर्वत्र तीव्र धिक्कार केला जात आहे.
'भास्कर'ची नॅशनल न्यूजरूम आता भोपाळऐवजी इंदूरमध्ये
 'भास्कर' समूहाच्या दैनिकातील कंटेंटचा आत्मा असलेली  नॅशनल न्यूजरूम आता भोपाळऐवजी इंदूरमध्ये शिफ़्ट होणार आहे.  नॅशनल हेड कल्पेश याज्ञिक हेही आता इंदूरमध्ये बसणार आहेत. तर भोपाळची जबाबदारी नवनीत गुर्जर सांभाळतील.  इंदूरमध्ये सध्या 'भास्कर'चे कार्यालय असलेल्या परिसरातच एक नवी बिल्डींग कंपनीने विकत घेतली असून सध्या तिचे रिनोव्हेशनचे काम सुरू आहे. नॅशनल न्यूजरूम याच नव्या इमारतीत शिफ़्ट होईल. याच कामासाठी  कल्पेश याज्ञिक गेले कित्येक दिवस इंदूरमध्येच डेरा टाकून आहेत. तेच या सर्व प्रकियेवर नियंत्रण राखून आहेत. हिंदी मीडियात अशा अफवा होत्या की, कल्पेश याज्ञिक यांचे पंख छटण्यासाठीच व्यवस्थापनाने त्यांना इंदूरला पाठवून दिले आहे. स्वतंत्र  नॅशनल आइडियेशन न्‍यूज रूम तयार करून मालकाने याज्ञिक यांचे खासमखास नवनीत गुर्जर  यांच्यावरच त्यांचे पंख छाटण्याची जबाबदारी सोपविल्याचीही अफवा होती. मात्र, तथ्यांची 'बेरक्या'ने जाच केली असता या अफ़वांमध्ये अर्थ नसल्याचे स्पष्ट झाले. कल्पेश याज्ञिक यांचे 'भास्कर' समूहात एक अतिविशिष्ट स्थान असून ते आजही अबाधित आहे. या संपादकाने गेल्या तीन वर्षात एकही रजा घेतलेली नाही. उलट समूह संपादक श्रवण गर्ग हे 'नई दुनिया'मध्ये गेल्यानंतर व्यवस्थापनाने  याज्ञिक यांना सर्वाधिकार बहाल केले आहेत. त्यामुळेच कमलेश सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. ते इंडिया टुडे समूह जॉईन करीत असल्याची चर्चा होती. मात्र, सिंग 'भास्कर'चे  प्रतिस्पर्धी दैनिक 'दबंग दुनिया'मध्ये चालले आहेत. सध्या तरी भास्कर समूहात  कल्पेश याज्ञिक आणि नवनीत गुर्जर यांचीच चालती व पूर्ण वर्चस्व आहे.

मुख्याधिकारयांकडून पैसे मागणारया पत्रकाराविरुद्ध अमळनेरात गुन्हा


अमळनेर - अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकायांकडून ‘जाहिरात द्या, नाहीतर पैसे द्या’ अशी बतावणी करीत त्यांचे मोबोइल कॅमेयाने फोटो काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या प्रतिनिधीविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांनी या बाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 19 एप्रिल रोजी येथील एका स्थानिक दैनिकाचा प्रतिनिधी असलेला गौतम प्रकाश बिहाडे हा नगरपालिकेतील माझ्रया दालनात आला व त्याने मला सांगितले की, एकतर मला जाहिरात द्या, नाही तर पैसे द्या. मी नाही सांगताच त्याने ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने माझ्रया कार्यालयात अनधिकृत प्रवेश करून माझ्रो मोबाइलमध्ये फोटो काढण्याचे प्रयत्न केले व पैशांची मागणी केली. या प्रकरणी शेटे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी बिहाडे विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार, १७ एप्रिल, २०१३

ठळक घडामोडी...

मुंबई - अभय मोकाशी यांनी संपादकपदाचा राजीनामा दिल्यापासून मुंबई मित्रची अधोगतीकडे वाटचाल...नव्या संचालिकाकडून कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक...तोकडा पगार तरीही दोन महिने झाले तरी पगार नाही...चार कर्मचाऱ्यांवर संपादकीय डोलारा...

* सकाळच्या स्त्री प्रतिष्ठा अभियानासाठी पुरूष बातमीदारांची प्रतिष्ठा पणाला. महिला सदस्या नाही दिल्या तर राजीनामा द्या म्हणतात. बातमीदार सकाळ-पासून संध्याकाळ पर्यंत सदस्यत्त्वासाठी महिला पटविण्याच्या प्रयत्नात फिरतात. तर सातशे रूपये घेऊन काय देणार असा प्रश्न महिला विचारतात. बातम्या नको पण सकाळ आवर अशी स्थिती अनेक ठिकाणी झाली आहे.औरंगाबाद - लोकपत्रचे प्रादेशिक विभाग प्रमुख अजिज तांबोळी यांची लवकरच नांदेडला बदली...नांदेड आवृत्ती प्रमुख म्हणून जबाबदारी...स्वतंत्र नांदेड आवृत्तीची पुन्हा सुरूवात...

औरंगाबाद - लोकपत्रचे मुख्य उपसंपादक पोपट पवार लोकमतच्या वाटेवर...संजीव उन्हाळेंची घेतली भेट...

कोल्हापूर - पुढारीचे चंद्रशेखर माताडे सकाळच्या वाटेवर...

कोल्हापूर - पुढारीचे सोपान पाटील बेळगाव तरूण भारतमध्ये...विशेष प्रतिनिधी म्हणून जॉईन...  

मुंबई - पुढारीमध्ये गळती सुरूच...उपसंपादक कल्पेश पोवळे पुढारी सोडून लोकमतमध्ये...साहेबांमुळे आतापर्यंत 10 जण गेले.

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३

पालथ्या घडावर पाणी...

( स्थळ : सानपाड्यातील एका बिअर बार शेजारील पानाची टपरी )
पेंद्या - राम, राम साहेब, भर दुपारीच  इकडं...
रंगिला - जावू दे... मरू दे... कितीही काम केलं तरी जोडेच...
पेंद्या - परवा तर जोडे खाता - खाता वाचला व्हता, अजून कोण मारले जोडे ?
रंगिला - अरे तसे नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की, काम करूनही बोलणी खावी लागतात...
पेंद्या - असं व्हय...पद्मश्रींची भाषा शिकलो म्हणा की...पद्श्री सारखं म्हणत असतात, जोड्याने मारू का,मला वाटले बसले की काय...
रंगिला - नाही अजून बसले...पण परवा थोडा हुकलो आणि लगेच माफीनामा लिहून दिला..सॉरी,सॉरी असे खूपदा म्हटले,तेव्हा कुठे त्यांनी ठिक आहे म्हटले...
पेंद्या - हुकलो की झुकलो ? पण जावू द्या,त्याचं म्हणावर नका घेवू ... करतील तुम्हाला क्षमा...जसं मागं शाळगावकरला चारदा माफ केलं व्हतं...
रंगिला - ते सगळं खरं आहे,पण मला नाही वाटत,आता मी जास्त दिवस राहीन...
पेंद्या - साहेब,शुभ बोला,तुम्हाला जगावंच लागेल, किमान देखणेसाठी तरी...
रंगिला - अरे बाबा,हळू बोल, पद्मश्रींची माणसे माझ्यावर पाळत ठेवून आहेत...
पेंद्या - बरं,बरं हळूच बोलतो, मग काय म्हणतात, आपले देखणे...
रंगिला - अरे बाबा, तो विषय इथं काढू नको, त्याच्यामुळेच माझी बदनामी होतीया....
पेंद्या - अवं साहेब, बाकीचे काय धुतल्या तांदळासारखे आहेत का...तुमचा तो ब्युरो, परवा आपल्या घरी घेवून गेला होता...
रंगिला - (आश्चर्याने ) काय, काय...काय केले ब्युरोने?
पेंद्या - जावू द्या, इषय लई नाजूक हाय...तो आयुष्यातून उठायचा...
रंगिला - अरे बाबा सांग, वाटल्यास थर्टी पाजवितो...
पेंद्या - च्या मारी, थर्टीसाठी,थर्ड डिग्री वापरता म्हणा की...
रंगिला - बरं तसंच सांग, नंतर मोठी पार्टी देतो...
पेंद्या - साहेब, फुकटच्या पाट्र्या मी नाही करीत, जसं तुम्ही आणि पिंपळपाननं केलं...
रंगिला - अरे आम्ही कधी केली, फुकटची पार्टी...
पेंद्या - पंधरा दिसापुर्वी प्रेस क्लबमध्ये तुम्ही आणि पिंपळ पानने भर दुपारीच फुकटर्ची पार्टी केली आणि तसेच ऑफीसमध्ये आलाव म्हण..त्यावरून पद्मश्रीं जाम चिडले आणि तुमची खरडपट्टी केली ...
रंगिला - अरे बाबा, तसेच आलो पण काम व्यवस्थितच केलं ना...
पेंद्या - एवढंच नाय तर पेड न्यूज ढापल्या म्हणूनही बोंबाबोंब उठलिया...
रंगिला - हा माझ्यावर खोटा आरोप आहे, कोणीतरी माझ्यावर षडयंत्र रचतयं...
पेंद्या - असं व्हय, खरं,खोटंं तुम्हालाच माहित...बरं ते जावू द्या, काय झालं तुमचं स्मार्ट मित्रच....
रंगिला - अरं तिथं पण, माझ्यावर षडयंत्र करण्यात आलं, माझे काम होता होता हातचे गेले...
पेंद्या - साहेब, यावर एक उपाय सांगू काय ...तुम्ही इकडं यायचं सोडा, देखणे - फिकणे सोडा,तुम्ही फक्त कामाशी गाठ घाला...मग बघा तुम्हाला कसे चांगले दिवस येतील.तुमच्यात खूप टालेंट हाय,तुमच्यासारखं पेज ले-आऊट कोणीच करू शकत नाही...पण हे सगळे सोडा...
रंगिला- अरे बाबा, हा सल्ला देणारा तू एकटाच उरला होतास...अरे माणसांचा जन्म पुन्हा - पुन्हा मिळत नसतो, माणसांनी खावून - पिऊन सगळी ऐश्य करावी...
पेंद्या - मग करा ऐश्य आणि खावा जोडे, येतो मी....यालाच म्हणतात, पालथ्या घडावर पाणी....

बगळे, कांडेकर हाजिर हो...

महाराष्ट्राचं इथानभवन. बालवाळीतल्या पोट्यासारखा नुस्ता कल्ला. कोण कोणाले काय बोलू राह्यलं हे कोणालेच कोणाचं ऐकू येत नव्हं. खानदेशातून आलेले नाथाभौ गुमान आपल्या बाकावर बसले व्हते. सगयाच्या मस्त गप्पा-टप्पा रंगात आल्या. एवळ्यात कोयसे पाटील आले. येता येताचं त्याह्यच्याकळं धाकल्या पवारसाहेबानं डोये वटारून पाहिलं. तेरे मस्त मस्त दो नैयनं म्हणत कोयसे पाटील काय समजायचे थे समजून गेले अन् आपल्या जाग्यावर जाऊन बसले. बसल्या बसल्याच त्यायनं एका नजरेत अख्खं इथानभवन पाहून घेतलं. त्यायची नजर गॅलरीत स्थिरावली. कोण-कोण पत्रकार तथिसा येऊन बसेल हैत हे थे निरखू लागले. त्यात पेंद्यापन ह्यताच. पेंद्याले त्यायच्याकळं पाहून स्मितहास्य करावं वाटलं; पण जाऊ द्या बाप्पा ! कायले आफत ओळून घ्यायची, बिनकामाचा हक्कभंग व्हायचा, असं मनातल्या मनात पुटपुटत पेंद्या तसाच बसून राह्यिला. एकदाचं काम सुरू झालं.

कोयसे पाटील : बगळे आणि कांडेकर आज तुम्हाला येथे का बोलावले हे माहिती आहेच. त्यावर तुम्हाला काय म्हणायचे?

कांडेकर : काहीच नाही साहेब.

बगये : नाही मला तुम्हचे हे म्हणणं अजिबात पटलं नाही. हा लोकशाहीवर घाला आहे. (जोर जोरात हातवारे करीत)

कोयसे पाटील : बगळे शांत व्हा ! हा तुमचा स्डुडिओ नाही. आमचे विधानभवन आहे. सगळा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय.

बगये : म्हणून तर. मला माझं मत मांडण्याची संधी द्यायलाच हवी.

कोयसे पाटील : बगळे, आम्ही तुम्हाला मत मांडण्याची एक संधी देतो. स्डुडिओतल्यासारखी भांडण्याची नव्हे. थोडक्यात सांगा !

कोयसे पाटलानं असं म्हणताच. इकळ विरोधी बाकावर बसलेले आमच्या नागपुरातील कमळाबाईचे सडणवीस एकदमच उठले अन् व-हाडी ठस्सक्यात म्हणले : ‘‘साहेब ह्यो आम्हाले त्याच्या ‘ठाम मत'वर बोलावते. ऑफिसाच्या अंदर गेल्यावर चॉपण पाजते. मातर आम्ही बोलू लाग्ल्यावर मधातच ब्रेक घेते. आता याले बी ब्रेक द्या ! अन् सरय कारवाईच करा.
त्यायचे बोलणे ह्योत न ह्योते तेच अमरावतीचे सच्चू कळू बोल्ले : ‘‘अबे त आता त्याले सवाल कारा ना बे ! थो थ आपल्याले लैयच वाजवते सवालावर सवाल करून''. सच्चू कळूच्या ‘प्रहारा'वर सगयेच सदस्य पेटून उठले नि ‘‘बोला बगये बोला" एका सुरात म्हणले. एकच कल्ला झालेला पाहून बगये जरासे बावरले. त्यायन् त्यायच्या पुळ्ळं ठेवलेल्या पेल्यातला एक घोट पिल्ला (को-या पाण्याचा). फुल्ल पॅण्डीच्या खिशातून रुमाल काळला. त्यानं कापयावरचा घाम पुसला अन् हातवारे करून पुन्हा बोलायनले लाग्ले : ‘पत्रकारिता हे अत्यंत पवित्र काम आहे''

त्यायचं वाक्य अर्धच तोळून इदर्भातील यवतमायातचे एक ज्येष्ठ सदस्य कव्हा ना थे पहिल्यांदाच बोल्ले : ‘‘मग तुम्ही पवित्रा काऊन घेता बाप्पा ! पवित्र काम पवित्रच करा ना ! पण तुमचं कसं जननं कमी अन् कण्णण जास्त असंच ह्यय '' एवळ्यात धाकल्या पवार साहेबानं त्यायचा मनिला ओळून त्यायले खाली बसवलं अन् थकल्या आवाजात म्हणले : ‘‘गप्प रे ! उगाच टग्यासारख्या लघूशंका काढू नको गावंढळ भाषेत बोलून. नाहीत माझ्यासारखं व्हायचं''. त्या सदस्यानं त्याची चीभ चावून मनातल्या मनात म्हणला : ‘‘आपलीच मोरी अन् मुतायची चोरी''. इकळं ‘‘बोला वगळे बोलाचा'' कल्ला सुरू होताच. बगयेनं पुन्हा बोलयले सुरुवात केली : हा हक्कभंग मला मान्य नाही. ही प्रसारमाध्यमांची...
मध्ये लगेच मनसेनेचे कांदगाकवर यायनं नाक खुपसलं : ‘‘अरेरावी आहे ही. ती आम्ही कदापी खपवून घेणार नाही''.

बगये : अहो ! कुणी तरी मला बोलू देता का?

कोयसे पाटील : बोला बगळे बोला ! तुम्हाला बोलायची संधी दिलीच आहे आम्ही !

बगये : मी फक्त जनभावना व्यक्त केल्या.

हे ऐकून आतालोक मोठ्या पयत्नान चुपचाप बसलेले धाकले पवार साहेब इज तयपायी तसे तयपले : ‘‘ का रे! ही तुझी जनभावना अन् आम्हाला लाखो लोकांनी मत देऊन येथे पाठविलं ती कोणती भावना?

बगये : साहेब विषयांतर करू नका !

सच्चू कळू : कायचे इषयांतर बे ! आम्ही इषयावर हो. तुच कायही बोलू राह्यला. अन् मालून ठेव ह्यो तुहा शो नै! ह्यो महाराष्ट्राचा रियॅलिटी शो ह्यय".

लै टाईम झाला म्हणून आता अध्यक्ष कोयसे पाटील म्हणाले ‘‘शांत व्हा ! शांत व्हा ! आजचं काम इथंचं थांबू! मी आता माझा अर्धा निकाल देतो. कांडेकर यांनी त्यांचं योग्य मत मांडलं; पण बगळे त्यांचे मत योग्य पद्धतीनेने मांडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नागपूर येथील अधिवेशनाला अपस्थित राहण्याचे आदेश आम्ही देतो. शिवाय त्याच अधिवेशनात आम्ही त्यांना शिक्षा देऊ!''
*****
आजचा सवाल
आगामी निवडणुकीनंतर आता नागपुरातील अधिवेशनात सावजींचा रस्सा खाण्यासाठी यापैकी किती सदस्य असतील आणि वगळेंवरील हक्कभंग पारित होईल का?

होय - ५० टक्के
नाही - ५० टक्के
तथस्थ - 00 टक्के
( च्या मारी आता आम्ही काय समजावं? असा इचार करीत करीत पेंद्या रामटेकले फिरायले पण गेला.)

......................................................................................................................................


टीप : व-हाडी भाषेत 'ढ' आणि 'ड' चा उच्चा 'ळ' होतो तर 'ळ' चा उच्चा 'य' होतो.

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

आजचा सवाल...

( ठाम मत कार्यालय,मुंबई )
पेंद्या - राम...राम...बगळे साहेब...
बगळे - तु कोण, आणि इथं कशासाठी आला आहेस...
पेंद्या - अवं,तुमचा आजचा सवाल मी कधी - कधी पाहतो,म्हटलं मी पण एक सवाल विचारावा...
बगळे - सवाल विचारण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, तुला नाही...चल निघ येथून,मला आजचा सवालसाठी विषय निवडाचाच...
पेंद्या - का नाही विचारू शकत,सवाल विचारण्याचे कंत्राट तुम्हाला एकट्याच मिळाले आहेत का...
बगळे - सवाल विचारण्याचा अधिकार फक्त मलाच आहे आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार माझ्या विरोधी चॅनलला आहे...
पेंद्या - विरोधी चॅनलका का प्रतिस्पर्धी चॅनलला...
बगळे - मला उलट सवाल विचारू नको...असे प्रश्न फणसला विचारू शकतोस...
पेंद्या - त्यांच्याकडे जावून आलो साहेब,ते म्हणत्यात अजून आमचं चॅनल सुरू झालं नाय...तु बगळे साहेबांकडे जा...
बगळे - चॅनल सुरू झालं नसेल तर इंडियाच्या वेबसाईटवर दाखव म्हणावं...
पेंद्या -  मला वेबसाईटवर नको, चॅनलवर चमकायचं...
बगळे - तु का मोठा नेता लागून गेला की मोठा पत्रकार...
पेंद्या - का वो, चॅनलवर फक्त बाळच चालतात का, आही नाही चालत का...
बगळे - अरे बाळ, बाळ मोठा पत्रकार आहे, तु अजून बाळ आहेस...
पेंद्या - ऑ...ते बी बाळ,मी बाळ.. मग ते का तुमचं लाडकं बाळ आहे का...
बगळे - अरे ते फार मोठे पत्रकार आहेत, असं त्यांच्याविषयी बोलू नकोस...
पेंद्या - ते मोठे पत्रकार होते,आता नाहीत.तुमच्या ठाम मतने त्यांना मोठं समजणं सुरू केलय...
बगळे - अरे माझं डोकं आता खावू नको...चल निघ आता,मला पाईप टाइमची तयारी करायची आहे...
पेंद्या - अवं त्यासाठी धुपलेली अलका असतेच की...तुम्ही कशाला टेन्शन घेता...
बगळे - अरे जोडीला मी असतो, नाही तर टी.आर.पी.घसरायचा...
पेंद्या - हा टी.आर.पी.अजून नवा कोण ? फणस गेल्यावर त्याला घेतले की काय...
बगळे - तुला, चॅनल,टी.आर.पी.नाही कळत...अशा गोष्टीत तु लक्ष घालू नकोस...
पेंद्या - साहेब, सोडून बोला, तुमच्या बाष्पळ बडबडीनंच टी.आर.पी.घसरलाय...
बगळे - ऑ, असं कोण म्हटलं...माझ्यामुळंच चॅनल टिकूण आहे...
पेंद्या - पण तुम्ही  कोणाला टिेकू देत नाही, नायतर तुमचं चॅनल कुठल्या कुठं गेल असतं...
बगळे - मी कोणाला जायला सांगितले नाही,तो मॅनेजमेंटचा निर्णय आहे...सगळं खापर माझ्यावरच फोडतात..
पेंद्या - साहेब, ठाम मतचे निम्मे लोक जय महाराष्ट्र म्हणत फणसकडे गेले,आता तुमचं कसं होणार ...
बगळे - मी कोणाला घाबरत नाही, शेवटी ठाम मत , ठाम मतच आहे....
पेंद्या - तुम्ही कशाला घाबरता,लोकांना घाबरवता...कारण सवालमध्ये कोणाला बोलूच देत नाहीत ना...थोडं कोण बोलायला लागलं की, थोडं थांबा,येतो मी पुन्हा तुमच्याकडे म्हणता,आणि शेवटपर्यंत येतच नाहीत आणि शेवटी टक्केवारीवर येता...
बगळे - अरे टक्केवारीशिवाय कार्यक्रम पुर्ण होतच नाही...
पेंद्या - आता कसं खरं बोललाव...सगळं टक्केवारीवर चालू, त्यालाच टी.आर.पी.म्हणायचे ना...
बगळे - अरं ती टक्केवारी नाही, लोक काय म्हणतात, त्या टक्केवारीवर बोलतोय...
पेंद्या - सवाल काय आणि प्रश्न काय...एकूण एकच ना...
बगळे - आता चलतो मी,पाईप (प्राईम) टाईमची वेळ झाली...अगं अलका सुरू कर...
पेंद्या - साहेब..साहेब...आपला सवाल राहिलाच की...अजित दादां यावेळी खरंच राजीनामा देणार का...
बगळे - आता ऐका - आजचा सवाल - अजित दादा यावेळी खरंच राजीनामा देणार का...
अलका - अवं सर, आता सध्या प्राईम टाईम आहे...सवाल नंतर आहे...
बगळे - राहू दे आता....'आजचा सवाल' महत्वाचा आहे...पाईप सॉरी प्राईम टाईम नंतर कर...
अलका - सर,बाळ अजून आले नाहीत...मग मी थांबू का,आजच्या सवालसाठी...
बगळे - चालेल, नो प्राब्लेम...वाटल्यास अजित दादांना फोन कॉल करू...
(दादांना फोन कॉल)- - दादा, एकाची लघु - शंका आहे, माझी नाही....तुम्ही खरचं राजीनामा देणार का...
दादा - अहो, बगळे, या लघुशंकेमुळंच मी अडचणीत आलो आहे, आणि तुम्ही लघुशंका काढता...
बगळे - दादा, तुमचा काही तरी गैरसमज होतोय, ती लघु - शंका नाही, वाटल्यास शंका म्हणा...
दादा - मग निट शंक मारा की ...सगळे आमदार म्हणतात,नका देवू राजीनामा...साहेबांना आम्ही सांगू म्हणतात...
बगळे - (दादांचा फोन कॉल कट करून) आता ऐका - महत्वाची ब्रेकिंग न्यूज - दादा राजीनामा देणार नाहीत...
अलका - सर,आज पाईप ओढला नाहीत का, सांरखा प्रोग्राम का बदलत आहात...
बगळे - नाही गं, कोण तर पेंद्या आलाय, त्यानं सगळा घोटाळा केला...
अलका - सर, या घोटाळ्यावरच आजचा सवाल करायचा का...
बगळे - (चिडून) तू आता पाईप सॉरी प्राईम टाइम सुरू कर...
अलका- चालेल, आजचा सवाल कॅन्सल...आता ऐका हेडलाईन्स....

( हेडलाईन्समध्ये पुन्हा तेच - अजित पवार राजीनामा देणार नाहीत )
......................................

* प्राईम टाइम संपल्यानंतर बगळे पाईप ओढायला जातात...त्याअगोदरच पेंद्या बगळेंना कस बनवंल म्हणून गालातल्या गालात हसत निघून जातो...

सोमवार, ८ एप्रिल, २०१३

थोडक्यात महत्वाचे...

मुंबई  - जय महाराष्ट्र चॅनेलने नुकतीच आपल्या स्ट्रींजर अन रीपोर्टरची बैठक घेतली. सगळ्यां रिपोर्टर सहीत स्ट्रींजरला मोबाईल हॅंडसेट भेट म्हणून देण्यात आले. हॅंडसेट महागडे नसले तरी हॅंडसेट देणार जय महाराष्ट हे पहील चॅनल बनलय. तसच सगळ्या स्ट्रींजर अन रीपोर्टरला चांगल्या पगारी देणार असल्याचे ओफ़ीसने सांगीतलय. खासकरुन स्ट्रींजरची काळजी घेणारे हे पहीलेच चॅनल असल्याचे दिसून आल. जय महाराष्ट्र चॅनेलच्या जाहिराती करणारे बॅनर लवकरच संबंध महाराष्ट्रात झळकणार आहेत. राज्यातील सगळ्या शहरात सुरुवातीपासुन केबलवर जय महाराष्ट्र चॅनल दिसनार आहे. अगदी पहिल्या दिवसापासुनच जय महाराष्ट्र चर्चेत रहावे असा व्यवस्थापनाचा प्रयत्न असल्याचे या बैठकीनंतर काहींनी बेरक्याला सांगीतल आहे.
या सगळ्या प्रकारामूळे मात्र अन्य चॅनेलमध्ये खळबळ माजलीय. विशेषत: आय.बी.एन. लोकमत अन टी.ह्वी. नाईनच्या स्ट्रींजरना तुलनेने फारच कमी पगार मिळतो. त्यामुळ या दोन्ही चॅनेलचे स्ट्रींजर सध्या अस्वस्थ आहेत. बेरक्याला मिळालेल्या माहीतीनुसार अनेक स्ट्रींजर काम सोडनार असून वर्तमानपत्राच्या आस-याला जाणार आहेत. तर काही जण आपले चॅनेल बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सध्या अनेक स्ट्रींजर मंडळींनी आपले जिल्हा मुख्यालय सोडुन मुंबई गाठली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात मोठी उलथापालथ होणार अस चित्र आहे.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

नागपूर :विदर्भाच्या प्रश्नांवर ताकदीने भाष्य करणारे, शांत, संयमी वृत्तीचे लोकमतचे निवासी संपादक मोरेश्वर बडगे काहीच महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. ३५ वर्षांपासून ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. महाराष्ष्ट्राच्या सर्वच प्रश्नांचा त्यांना अभ्यास आहे. त्यांच्या अनेक लेखांमुळे, बातम्यांमुळे मुंबईच नव्हे तर अनेकदा दिल्लाच्या संसदेलाही हादरे बसलेले आहेत. आता ते सेवानिवृत्त होणार आहेत. स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा त्यांनी आपल्या लेखणीद्वारे जिवंत ठेवलेला आहे.
 .................................
नाव सोनूबाई....हाती कथलाचा वाळा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपोषणाला बसलेल्या कास्तकारांविषयी जी काही अश्लाघ्य वक्तव्ये केल्यावर सगळ्या पेपर्सनी आणि चॅनलनी त्यांना झोडपून काढले. आश्चर्य म्हणजे सकाळमध्येही त्यांच्या विरोधात अग्रलेख छापून आला. मात्र शेतक-यांचा पेपर असा टेंभा मिरवणा-या एग्रोवनने दादाविरोधातल्या बातम्या मिळमिळीत व बातम्या आतल्या पानी दिल्या. खरे तर या पेपराने बातम्या आणखी अग्रलेखातून उपमुख्यमंत्र्यांना सोलवटून काढले पाहिजे होते. सकाळचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध असूनही सकाळ त्यांना झोडपू शकतो तर हे का नाही? एरवी फुटकळ विषयावर मोठाल्या बातम्या आणि वायफळ अग्रलेख लिहिणारे संपादक बिनकण्याचे व भित्रट असले पाहिजेत. 
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,


मुंबई - लोकसत्ताचे डेप्युटी एडिटर प्रशांत दीक्षीत यांचा लोकसत्ताला रामराम...दिव्य मराठीत याच पदावर रूजू... 

रविवार, ७ एप्रिल, २०१३

लातूरच्या पत्रकार संघात परिवर्तन...

लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत पांडोबा-दगडोबाचा पराभव होणार... असे भाकीत आम्ही व्यक्त केले. हे भाकीत प्रसिध्द होताच पांडोबाने रणांगणातून पळ काढला.त्यानंतर दगडोबा नावात जय असूनही पराजय मान्य केला.त्यामुळे परिवर्तन पॅनलचे अशोक चिंचोले आणि विजय स्वामी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
लातूर जिल्हा पत्रकार संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे अशोक चिंचोले आणि विजय स्वामी विजयी झाले. मागच्या १३ वर्षांपासून या संघाची निवडणूक बिनविरोध होत होती. यंदा पहिल्यांदा राजकारण विरहित निवडणूक झाली यात अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक चिंचोले आणि सरचिटणीसपदाचे दावेदार विजयकुमार स्वामी विजयी झाले.
अशोक चिंचोले यांना १३६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी विकास गाढवे यांना १०० मते पडली. सरचिटणीसपदाचे उमेदवार विजय स्वामी यांना १७३ तर त्यांचे प्रतिस्पर्धी नरसिंग घोणे यांना ५४ मते पडली. अशोक चिंचोले आणि विजय स्वामी बहुमताने विजयी झाले आहे. पांडोबा निवडणुकीत तटस्थ राहिले तर दगडोबांनी परिवर्तनच्या विरोधात प्रचार केला.
लातूरच्या पत्रकार संघात आता खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले आहे.पांडोबा आणि दगडोबाची बजबजपुरी आता संपली आहे. सर्व परिवर्तन मित्रांना बेरक्याच्या शुभेच्छा...

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

बेरक्याचे निवेदन....


शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

थोडक्यात महत्वाचे...

* नांदेड - एका बातमीवरून मानबिंदूच्या दोन ज्येष्ठ आणि शहाण्या उपसंपादकांमध्ये गुरुवारी कार्यालयातच कडाक्याचे भांडण झाले. हाणामारीसुद्धा होणार होती; पण ‘धर्म'चा धाक असल्याने साहेबांचाच ‘राज' चालला. तरीही ‘भास्कर' तळपलेला होता. म्हणे अशा भिकार सहका-यांवर ‘सु' करून मागचे पुढचे ‘नील' करेल. त्यामुळे ‘धर्म' संकटात सापडला आहे.

* नांदेड - मानबिंदूच्या जाहिरात विभागात काम करणारी मुलगी प्रियकारासोबत पळून गेली. गेली तर चांगलच आहे; पण सोबत तिने वसुलीचे ४० हजार रुपयेसुद्धा नेले. शेटजीकडून अशा पद्धतीने पगार व्याजासगट वसूल केला. याची सध्या मानबिंदूसह नांदेडच्या पत्रकारांमध्ये चांगलीच चर्चा आहे.
असो, मियॉ बिबी राजी तो...


* अकोला - संपादकीय विभागाच्या मीटिंगमध्ये प्रेमदास यांनी स्वतःचेच स्वतः कौतुक करून घेतले. ते म्हणाले, ‘मी आता पीटीआयच्याही पुढे गेलो. पीटीआयअगोदर माझ्याकडे बातमी होती. लोकांना काय. काहीपण बोलतात'.
****************************

- याला म्हणतात वराती मागून घोडे नाचती नाकतोडे
 

................................................................

* मुंबईच्या आमच्या एका मित्राचे म्हणणे...
- रंगिला औरंगाबादीची स्मार्ट मित्रच्या संपादकपदी निवड होणार होती, पण बेरक्यामुळे गेली...
+  आता हे म्हणणे माझ्या बुध्दीला पटत नाही...
 

 ..................................................................

* सगळ्यांच्या नजरा डीएमकडे
अकोला - अकोल्यामध्ये डीएम येणार हे निश्चित झाल्याने लोकमत, देशोन्नती या आघाडीच्या दैनिकातील अनेक जण औरंगाबादला जावून आपला रिझुम देऊन आले. 

--------------------------------------------------------------------------------


मुंबई - म.टा.चे संपादक अशोक पानवलकर यांचे आसन डगमळीत तर पुण्याचे पराग करंदीकर यांचे आसन बळकट...करंदीकडे पुणे, कोल्हापूर, नाशिक,औरंगाबाद आणि नागपूरची जबाबदारी...पानवलकर यांची लवकरच विकेट...रिझल्ट झिरोमुळे पानवलकरांवर संकट..रंगिला औरंगाबादीचे जोरदार प्रयत्न...पण बेरक्याच्या पोलखोलमुळे संधीवर संक्रांत... 
......................................

नागपूर - सकाळच्या एमआयडीसी ऑफीससाठी मुख्य उपसंपादक हवा असल्याची जाहिरात काही दिवसांअगोदर झळकली. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या उपसंपादकामध्ये नाराजीचा सुर आहे. अनेक जण विदर्भ सकाळच्या पहिल्या दिवसांपासून कार्यरत आहेत; पण ते उपसंपादकच आहेत. त्यामुळे आपल्याला बढती का नाही, असा प्रश्न विचारात त्यांच्यात असंतो आहे. तर बाहेरच्या दैनिकातून येणा-या उपसंपादकाला थेट मुख्य उपसंपादक म्हणून घेणार या विषयीसुद्धा रोष आहे. 

बुधवार, ३ एप्रिल, २०१३

ठळक घडामोडी...

* लातूर - लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ निवडणूक : विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश दगडे आणि माजी अध्यक्ष पांडुरंग कोळगे यांची सपशेल माघार...परिवर्तन पॅनलचे अशोक चिंचोले आणि विजय स्वामी यांच्या विजयाचा मार्ग सुकर...

* मी मराठी  आणि  Live इंडिया या चॅनेलच्या स्ट्रींजंरचे थकलेले पेमेंट नुकतेच देण्यात आल. स्ट्रींजरना अपेक्षीत रक्कमेपेक्षा कमी पेमेंट देण्यात आल आहे. मात्र "भागते भूत की लंगोट सही" म्हणून स्ट्रींजर मंडळींनी समाधान व्यक्त केल. उर्वरित पेमेंट्साठी आता स्ट्रींजर तगादा लावणार आहेत.कांचन अधिकारी यांनी सुरू केलेल्या या दोन्ही चॅनेलला आधी HDIL ने घेतल होत मात्र आता समृद्धी जीवन ग्रुपकड या चॅनेलची मालकी आहे. त्यामुळे या दोन्ही चॅनेलकडून कर्मचा-याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हे चॅनल पुन्हा प्रकाश झोतात येण्यासाठी समृद्धी ग्रुप प्रयत्नशील असल्याचे कळतय.

* प्रहार मुंबई चे फोटोग्राफर विनम्र आचरेकर यांना मारहाण झाली आहे. आर.बी. आय.च्या प्रिमायसेस मध्ये फोटो काढायला बंदी आहे . पण घटनेचे गांभेर्य पाहता विनम्र त्या ठिकाणी फोटो काढायला गेले ..मात्र सुरक्षा यंत्रणेने त्यांना मारहाण केली. 

* नगर जिल्ह्यातील सकाळचे बातमीदार बेरक्याला लाईक करायलापण घाबरतात. बेरक्याला माहिती पुरविणारांचा शोध घेतला जातोय म्हणून दहशत आहे.बेरक्यामध्ये सकाळबाबत आल्यानंतर सकाळ वरमलाय. बातमीदारांशी हेळसांडीने बोलण्याचे प्रमाण घटल्याने हा बातमीदरांना सुखद धक्काच वाटतो. पण कदाचित वर्धापनदिनानंतर काही उलथापालथ होतील. 
वर्धा येथे पत्रकारांना पोलिसांची दमदाटी

* वर्धा - लोकमतचे पत्रकार रूपेश खैरी आणि प्रशांत वेलांडी यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम साळी यांच्या विरोधात काही बातम्या प्रसिध्द केल्याबद्दल चिडलेल्या साळी यानी पत्रकारांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना दमदाटी आणि शिविगाळ केली.सोमवारी हा प्रकार घडला.वर्धा येथील पत्रकारांनी या घटनेचा निषेध करीत आज जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांची भेट घेऊन साळी यांच्याकडून खुलासा मागवावा अशी मागणी केली.वर्धा येथेच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी पत्रकार पोलिसांच्या अरेरावीला बळी पडत आहेत.
 

सोमवार, १ एप्रिल, २०१३

कॅमेरामन अविनाश पंवार यांचा विष पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न

झी न्यूजचे दिल्लीतील कॅमेरामन अविनाश पंवार यांनी विष पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली त्यांना राजीनामा मागितला होता म्हणे... 
 अविनाश पंवारने जिंदाल विरूद्ध झी असा संघर्ष सुरू असताना जीवावर उदार होऊन छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी छायाचित्रण केले होते... अशा माणसाला केवळ खर्चकपातीच्या नावाखाली बाहेर काढणे मनाला पटणारे नाही... अविनाश पंवार अतिशय सज्जन माणूस आहे... त्यांच्या प्रकृतीला लवकर आराम पडो, हीच प्रार्थना...

फेसबुक वर शेअर करा

Facebook