> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, ३० जून, २०१३

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देवदास मटाले

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या शनिवारी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत देवदास मटाले यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी विजयकुमार बांदल व शशिकांत सांडभोर निवडून आले.
 शनिवारी झालेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत कार्यवाहपदी प्रमोद तेंडुलकर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले, तर विश्‍वस्त म्हणून वैजयंती आपटे व कोषाध्यक्षपदी दीपक म्हात्रे यांची निवड झाली. संघाच्या कार्यकारिणीवर विष्णू सोनावणे, नेहा पुरव, सत्यवान ताठरे, आत्माराम नाटेकर, प्रशांत नाडकर, दीपक परब, सदानंद शिंदे, सतीश खांबेटे व अरुण कुलकर्णी यांची निवड झाली. निवडून आलेले मंडळ दोन वर्षांसाठी कार्यरत असेल.


विद्यमान कार्यकारी मंडळ

शनिवार, २९ जून, २०१३

अशा रिपोर्टरना काय म्हणावे....


उत्तराखंडमध्ये महाप्रलय होवून शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.अनेकजण बेपत्ता आहेत.जे बेपत्ता आहेत,त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त आहेत.अनेकांच्या घरात शोकाकूल वातावरण आहे.ज्यांच्या घरातील कर्ता पुरूष,माता -पिता केले,त्यांच्या घरात काय दु:ख आहे,हे त्यांनाच माहित...ज्यांचे जळते,त्यांनाच कळते...
उत्तराखंडमधील परिस्थिती पाहून प्रत्येक भारतीय व्यक्ती दु:खी आहे,ठिकठिकाणी मदत निधी गोळा केला जात आहे.मात्र मीडियातील काही लोकांना त्याचे काही सोयरसुतक वाटत नाही,कव्हरेज करण्याच्या नावाखाली उत्तराखंडमध्ये गेलेले रिपोर्टर कसे वागत आहेत,त्याची काही उदाहरणे...

१. एका गरीब माणसाच्या खांद्यावर बसून, एका न्यूज एक्स्प्रेसच्या दीड शहाणाने बाईट दिली...त्याची नंतर हकालपट्टी झाली,हा भाग वेगळा...
२. केदारनाथमधील शिवाचे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते,या मंदिरात एबीपीचा रिपोर्टर चप्पल घालून गेला...त्यामुळे भावना दु:खावल्या गेल्या.
३. कव्हरेजसाठी गेलेली झी २४ तास एक रिपोर्टर हलकट जवानी गाणे

लावून, टर्र उडवत आहे...तिच्या बाबतीत न लिहिले बरे...
असे अनेक किस्से आपणास पहावयास मिळाले...भारतीय सैनिक पीडित लोकांना वाचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत असताना काही जवानही शहीद झाले...पण सैनिकांनी आपले मनोधैर्य खचू दिले नाही...
मात्र काही रिपोर्टरनी मीडियाची लाज घातली आहे....त्याचा निषेध आणि धिक्कार...
आणखी एक किस्सा पहा...

झी 24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर यांचा नौटंकीपणा कसा आहे,ते या व्हिडीओमध्ये दिसेल. 
( कशाला एवढी चमकोगिरी करावी लागते देव जाणे ....)शुक्रवार, २८ जून, २०१३

सोलापुरातील रिपोर्टरचा कसा झाला पोपट ...


 सोलापूरात मुळेगाव परिसरात मृतदेह आढळल्याची बातमी एबीपी माझावर प्रसारित करण्यात आली होती, वास्तविक अशी कोणतीही घटना घडली नसताना केवळ अफवेवर ही बातमी देण्यात आली होती.
सोलापुरातील या रिपोर्टरचा कसा पोपट झाला होता,याची बातमी बेरक्याने दिली होती.आता त्याचा पुरावाच बेरक्या देत आहे...काय म्हणावे अशा रिपोर्टरना...अफवेवर किंवा लोकांच्या सांगण्यावरून बातम्या कोणी देत असेल आणि समाजात भीती पसरावत असेल तर बेरक्याने थंड बसायचे काय ?
आता कोणी म्हणू नये, हा त्या चॅनलचा वैयक्तीक प्रश्न आहे आणि त्या रिपोर्टरचा...धन्य...


याच महाशह्याने सोलापुरात कसलीही रोगाची साथ नसताना कांही वर्षापुर्वी सोलापुरात गॅस्ट्रोचे  १७०० रुग्ण आढळल्याचे बातमीही चालविले होते ,या पत्रकारावर अफवा पसरविल्याबाबत कांही कारवाई करता येते का याचा विचार पोलिस करीत आहेत

बेरक्या विरोधकासाठी निवेदन

समाजाला शहाणपणा शिकविण्याचे काम पत्रकार करीत असतात.हे पत्रकार दररोज समाजातील उणी - दुणी काढून, समाजाचे जणू आम्हीच कैवारी आहोत,असे भासवत असतात.अशा पत्रकारांची उणी - दुणी बेरक्याने कढले तर चुकले कुठे....काही पत्रकारांना तर पत्रकार असल्याची मोठी झिंक असते.दररोज शासकीय आणि राजकीय लोकांना पिडत असतात.या पिडणा-या पत्रकारांना बेरक्याने पिडले तर चुकले कुठे...बातमी देणे हे पत्रकारांचे काम आहे, मात्र बातमी देताना किती कष्ट पडले, हे कोणी सांगत असेल तर त्याच्यासारखा दांभिकपणा आणि भंपकपणा दुसरा असू शकत नाही.त्याचा हा नौटंकीपणा बेरक्याने उघडा केला तर त्याची वैयक्तीक बाब असू शकत नाही.
कोणाला तरी ब्लॉकमेल करायचे,त्याच्याकडून पैसे वसूल करायचे आणि  रात्री मटण आणि दारूवर ताण मारायचा,हे कोणत्या तत्वात आणि चौकटीत बसते. अनेक पत्रकार दिवसा घ्येयवादी आणि रात्री पेयवादी आहेत...त्यांचा ढोंगीपणा उघडकी आणले तर चुकले कुठे ?
मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. या स्तंभाकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत, मात्र या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. या क्षेत्रात दोन नंबरवाले शिरल्याने,सारा बट्टाबोळ झाला आहे.मग बेरक्याने हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचे का ?
बेरक्याची चळवळ मीडियातील घाण साफ करण्याची आहे. आता तुम्ही म्हणाल, हा ठेका बेरक्याला कोणी दिला...ज्यावेळी अधर्म सुरू होतो, त्यावेळी कोणीतरी जन्म घेतो, तसाच बेरक्याचा जन्म झालेला आहे...
बेरक्या म्हणजे नेमका कोण, हे कोडे अनेकांना पडले आहे.बेरक्या आपली ओळख लपवितो, ओळख लपवून कोणालाही लिहिता येते,बेरक्याने आपली ओळख जाहीर करावी असे अनेक प्रश्न आणि त्यावर उपप्रश्न विचारले जातात.
सीआयडी असो की सीबीआय... एकादा गुन्हा उघडकीस आणताना, तपास अधिकारी ओळख लपवत असतात.प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अधिकारी वेगवेगळी कामे करत असतो.तसेच बेरक्या नेटवर्कचे आहे...बातमी शोधणारे, बातमी लिहिणारे अनेक आहेत, त्यावर नजर ठेवणारे आणि  निर्णय घेणारे अनेक आहेत,शेवटी बातमी प्रसिध्द करणारा एकच आहे....
मग कोणा- कोणाचे नाव द्यायचे...बेरक्या महाराष्ट्रात अनेक आहेत.ते चांगले काम करीत आहेत. चांगले काम करीत असताना,टीका ही होतच असते. तशी बेरक्या नेटवर्कवरही टीका होते,टीका योग्य असेल त्याचे स्वागत करू आणि कामात दुरूस्त करू पण कोणी जाणीवपुर्वक टीका करून,लक्ष विचलित करीत असेल,त्यांना वठणीवर आणावेच लागेल...
हे अभियान गेल्या अडीच वर्षापासून चालू आहे. हे काम करणे काही सोपे नाही. बेरक्याचा शोध लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.त्यात ९९ टक्के अयशस्वी झाले.जो यशस्वी झाला,तो आमची भूमिका ऐकूण गप्प बसला.बेरक्याने आपल्या जीवनात अनेक तत्वे पाळली आहेत.जगाला शहाणपणा शिकविणा-या पत्रकारांची उणी - दुणी काढत असताना तो स्वत: सर्व बाबतीत दक्ष आहे...त्याने सर्व पथ्ये पाळलेली आहेत...
बेरक्या चांगल्या पत्रकारांच्या विरोधात कधीच नाही, आणि राहणार नाही...मात्र ज्यांना खेटायचे आहे,त्यांनी जरूर खेटावे...त्याला उत्तर देण्यास आणि ताळ्यावर आणण्यास बेरक्या सक्षम आहे...

बेरक्या उर्फ नारद

............................................................................................................
''जे जे आपणाशी ठावे, ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे, सकळजण'' संत तुकारामांच्या या अभंगाप्रमाणे आपल्याकडील ज्ञान इतरांपर्यंत पोहचून त्यांना शहाणे करण्याच्या हेतूने बेरक्या ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.
................................................... ......................................................
 बेरक्याने आपले सगळीकडे सोर्स निर्माण केलेले आहेत. बेरक्यावर येणाऱ्या बातमीची खातरजमा केली जाते....जर कोणाला वाटले तर बेरक्यावर बदनामीचा खटला दाखल करू शकतो...मात्र गेल्या अडीच वर्षात एकही खटला बेरक्यावर दाखल झालेला नाही.याचा अर्थ बेरक्याची विश्वासर्हता आहे की नाही ? शेवटी आम्ही काही सर्वज्ञ नाही...आमच्याकडूनही काही चुका होवू शकतात..जर कधी चुकलो तर माफी मागायला मागे - पुढे पहाणार नाही... 

गुरुवार, २७ जून, २०१३

इलेक्ट्रॉनिक मीडियाने गाठली हिन पातळी....

उत्तराखंडमध्ये महाप्रलय येवून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.त्यांना करण्यात येणारी मदत आणि उपाययोजना यावरून हिंदी आणि मराठी न्यूज चॅनलवर दररोज चर्चा चालू आहे.त्यात राजकारण्यांनी हिन पातळी गाठली आहे.
जशी राजकारण्यांनी हिन पातळी गाठली तशीच इलेक्ट्रॉनिक मीडियाने हिन पातळी गाठली आहे.चर्चा चालू असताना, आमचे रिपोर्टर सर्वात आधी पोहचले, सर्वात अगोदर दृश्ये टिपली,डोंगर,द-या ओलांडून रिपोर्टरचे महाकव्हरेज,सबसे तेज, सबसे पहले, आम्हीच कसे सरस आहोत, संपादकांना केलेला फोन कॉल,वगैरे दाखवून स्वत:ची किती लाल आहे,हे सांगत आहेत.
प्रिंट मीडिया असो कि इलेक्ट्रॉनिक मीडिया,बातम्या देणे,हे काम आहे.त्यात मार्केटींग केली जात आहे.ऊन,पाऊस,थंडी खराब हवामान याची तमा न बाळगता भारतीय सैनिक जीवाची पर्वा न करता काम करून, अनेकांचे प्राण वाचवत आहेत.त्यांना सलाम ठोका...
मात्र हे राजकारणी आणि मीडियावाले, मढ्याच्या टाळूवरील लोणी खात आहेत...त्याचा निषेध...

सातारचे पत्रकार सचिन जवळकोटे यांच्यावर गुन्हा दाखल

कराड : कोळेकरवाडी (ता.पाटण) येथील एकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा येथील पत्रकार सचिन नागेश जवळकोटे यांच्यावर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी त्याबाबतची फिर्याद दिली आहे. 
श्री.भरणे यांनी दिलेली माहिती अशी : कोळेकरवाडी येथे १४ जानेवारी २०१३ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा ढेबेवाडी पोलिसांत दाखल आहे. त्या गुन्ह्याबाबत आलेल्या वृत्तामध्ये ती मुलगी गर्भवती असल्याचा उल्लेख होता. मात्र, प्रत्यक्षात वैद्यकीय तपासणीत तसे आढळून आले नाही. १९ जानेवारीला संबंधित मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या चुलत्याने चुकीच्या आधाराने छापून आलेल्या वृत्तामुळेच माझ्या भावाने आत्महत्या केली असून, त्याबाबत योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी अर्जाद्वारे पोलिसांकडे केली होती. त्याबाबत पोलिसांनी चौकशी केली. वैद्यकीय अधिकारी, मुलीचे नातेवाईक, अर्जदार, श्री.जवळकोटे यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदविण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या माहितीनुसार वृत्त प्रसिद्ध केले, असे श्री.जवळकोटे यांने जबाबामध्ये म्हटले आहे. मात्र, हे वृत्त खोटे होते, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार श्री.भरणे यांनी फिर्याद दिली आहे.
(साभार : दैनिक सकाळच्या सातारा आवृत्तीत २६ जून २०१३ रोजी पान ४ वर प्रकाशित वृत्त)


* सचिन जवळकोटे हे लोकमतच्या सातारा आवृत्तीचे संपादकीय प्रमुख आहेत.

बुधवार, २६ जून, २०१३

बीड जिल्ह्यात वार्ताहरावर प्राणघातक हल्ला

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर बुधवारी दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आहे.

या हल्ल्यात अरविंद वाव्हळे हे गंभीर झाले जखमी आहेत. ते झुंजार नेता या वृत्तपत्राचे वार्ताहर आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात बातम्या दिल्या म्हणून माजी सरपंचाने हा केल्याची माहिती हाती आली आहे.

 हल्लेखोरास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.या हल्लाचा सर्व पत्रकाराच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे.


‘बेरक्या’ या संपूर्ण प्रकरणाने कमालीचा व्यथित आहे. कारण ‘बेरक्या’ हा पत्रकारांचा पाठिराखा आहे; त्यांच्या सुख-दु:खातील साथीदार आहे. कोणत्याही पत्रकारावरील हल्ला, आघात ‘बेरक्या’ला अस्वस्थ करतात. हा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे.
पत्रकारांवर जे हल्ले वाढले आहेत,त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. आपणच आपल्या लोकांचे पाय खेचतो...आपल्यांत एकी नाही.हा अमक्या पेपरचा,अमक्या गटाचा पत्रकार...आपल्याला काही घेणे - देणे नाही,असे वागतो...कोणत्याही गावांत,शहरात,तालुक्यात,जिल्ह्यात किंवा महानगरमध्ये जा,तिथे पत्रकारांमध्ये अनेक गट आणि तट दिसतील.अरे, अश्या प्रकरणात तरी एक व्हा...हल्ल्याची बातमी किती वृत्तपत्र आणि चॅनल देतात ? हा अमक्या पेपरचा वार्ताहर आहे, हल्ला करणारा आपल्या गटाचा आहे, जाहिराती बुडतील म्हणून विचार करतात...त्याचा आज परिपाक आहे.
पुर्वी पत्रकारांना किती आदर होता,आता पत्रकार आहे,म्हणायला लाच वाटते,काय घडतय असे....कोण याचे आत्मपरिक्षण करतात आहे का ? चलता है,चलने दो..म्हणतात....

चला आता तरी एक होवू या...

हरामखोराची हकालपट्टी...

उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीच्या खंादयावर बसून रिपोर्टिंग करणारा पत्रकार नारायण परगाईची न्यूज एक्स्प्रेसने हकालपट्टी केली आहे.चॅनल हेड निशांत चतुर्वेदी यांनी ही कारवाई केली आहे. एका व्यक्तीच्या खांद्यावर बसून रिपोर्टिंग करतानाची परगाईची छबी यू ट्यूबवरून देशभर फिरत होती.त्यावर वाचकांच्या तीव्र,संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.या पूर्वी देखील एका लहान मुलाच्या खांदयावर बसून बातमी देण्याचा हलकटपणा परगाईनं केला होता.त्यावरूनही तेव्हा वाद झाला होता.
बातमीसाठी एखाद्याच्‍या खांद्यावर अमानवी पद्धतीने बसणे चुकीचे होते, असे त्‍यांनी म्‍हटले. पत्रकार नारायण परगेन उत्तराखंड येथील पूर आणि भूस्‍खलनामुळे क्षतीग्रस्‍त झालेल्‍या भागाची बातमी कव्‍हर करण्‍यासाठी गेला होता. जेव्‍हा इंटरनेटवर हा व्हिडिओ अपलोड झाला तेव्‍हा हे प्रकरण सर्वांसमोर आले. यामध्‍ये नारायण एका स्‍थानिक व्‍यक्‍तीच्‍या खांद्यावर बसून रिर्पोटिंग करीत होता. ज्‍या व्‍यक्‍तीने पत्रकाराला खांद्यावर घेतले होते. त्‍याला त्‍याचा भार सहन होत नव्‍हता व तो थरथर कापत होता.
 उत्तराखंडचे रिपोर्टिंग करताना परगाईनं अक्षम्य गुन्हा केला असं संस्थेचं म्हणणं आहे.असे करून परगाई यांनी संस्थेला धोका दिला असं संस्थेला वाटत असल्यानं तात्काल प्रभावाने त्याची हकालपट्टी केली गेली आहे.

साभार - उद्याचा बातमीदार...

शनिवार, २२ जून, २०१३

मीडियाच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह...

मीडियाची विश्वासर्हता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, त्याची ही दोन उदाहरणे...
१. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.नंतर त्याचा खर्च राज्य सरकारने करणे अपेक्षित होते.मात्र हा खर्च मुंबई महापालिकेने करावा,असे निर्देश राज्य सरकारने दिले.महापालिका पाच लाखाचा धनादेश काढणार,ऐवढ्यात लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये बातम्या झळकल्या...उध्दव ठाकरे यांना पाच लाख रूपये कमी आहेत का,मुंबईत राहणा-या लोकांच्या खिशातून खर्च कशासाठी, असा एकूण त्यात सार होता.
नंतर अशाच रितीच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक चॅनलवाल्यांनी दिल्या...शेवटी उध्दवजी खिन्न मनाने पाच लाखाचा धनादेश मुंबई महापालिकेकडे सुपूर्द केला.मात्र मुंबई महापालिकेने हा धनादेश उध्दवजींना परत करून, ही जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले,मात्र उध्दवजींनी हा धनादेश परत न घेता,या पैश्यातून ज्यांनी खोट्या बातम्या दिल्या,त्यांना पुरस्कार देण्याची सुचना मांडली. उध्दवजीची ही गांधीगिरी सर्व मीडियावाल्यांना आत्मपरिक्षण करणारी आहे.

. चित्रपट अभिनेता शाहरूख खान याने गर्भलिंग चाचणी केल्याची बातमी मिड- डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती,नंतर हीच बातमी अनेक मराठी वृत्तपत्राने दिली. नंतर चॅनलवाल्यांनी ही बातमी चालविली. तथाकथित सामाजिक कार्यकत्र्या वर्षा देशपांडे यांना आयते कुरण मिळाले.त्यांनी खूप मोठी गरळ ओकली.
शहारूख खानने कुठे तरी मला मुलगा होणार आहे,असे वाक्तव्य केले होत,त्यावरून साप,साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार घडला.मात्र शहारूख खान याने हे वक्तव्य  कुठे आणि कधी केले होते,याची माहिती कोणाकडेही नव्हती.

प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया, बातम्या देताना खातरजमा केली पाहिजे,मात्र हवेत तिर मारण्याचे प्रकार सुरू झाल्याने मीडियावाले तोंडावर आपटत आहेत...
आपण यास काय म्हणाल ?

नांदेड न्यूज लाईव्हला वाचकांची वाढती पसंती

नांदेड - नांदेड जिल्ह्यातील विशेष: हिमायतनगर भागातील ताज्या बातम्या वाचण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. हिमायतनगरचे पत्रकार अनिल मादसवार यांनी,नांदेड न्यूज लाइव्ह हा ऑनलाईन न्यूज पेपर काही दिवसांपुर्वी सुरू केला असून, राज्यतील तसेच देश - विदेशातील नांदेडकरांनी या वेबसाईटला भेट देवून,आपली पसंती दिली आहे.
या ऑनलाईन न्यूजपेपरचे संपादक अनिल मादसवार हे हिमायनगर (जि.नांदेड) येथील रहिवासी असून,ते गेल्या 7 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. विविध पुरस्कार प्राप्त पत्रकार मादसवार यांना ऑनलाईन न्यूज पेपर सुरू करण्याची प्रेरणा सुरेश कुलकर्णी, गोविंद
मुंडकर,सदाशिव हाडे यांनी दिली.या ऑनलाईन लाईन न्यूज पेपरमध्ये ताज्या घडामोडी प्रसिध्द होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील वाचकांची मोठी सोय झाली आहे.हा ऑनलाईन पेपर वाचण्यासाठी क्लीक करा-

नांदेड न्यूज लाईव्ह

शुक्रवार, २१ जून, २०१३

लोकमत प्रशासनाने शेपूट घातले

जळगाव - महापालिका आणि पोलीस प्रशासन मारहाण करणा-या महापालिका कर्मचा-यांवर कारवाई करण्यास तयार असताना, लोकमत प्रशासनाने शेपूट घातल्याने लोकमतचे रिपोर्टर सुधाकर जाधव मारहाण प्रकरणी अद्यापही संबंधिताविरूध्द गुन्हा दाखल झालेला नाही.
जळगाव महापालिका कर्मचा-यांच्या विरोधात लोकमतने बातम्या दिल्यानंतर कर्मचा-यांनी लोकमतच्या अंकाची होळी करून, रिपोर्टर सुधाकर जाधव यांना बेदम मारहाण केली होती.या मारहाणीचे वृत्त बेरक्याने दिल्यानंतर राज्यभरातील पत्रकारांत संतापाची लाट उसळलेली आहे.मात्र लोकमत प्रशासन अद्यापही थंड आहे.
या मारहाण प्रकरणी अद्याप जाधव यांनी पोलीस किंवा महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केलेली नाही.केवळ मारहाणीची बातमी देवून लोकमतवाले मोकळे झालेले आहेत.मात्र कायद्यानुसार जोपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही,तोपर्यंत संबंधिताविरूध्द कारवाई होत नाही.
लोकमत प्रशासन गुन्हा दाखल करण्यास जाधव यांना परवानगी देत नाही आणि नोकरी जाईल, या भीतीपोटी जाधव यांनी स्वत:हून तक्रार दाखल केलेली नाही.लोकमत प्रशासनाला स्वत:च्या खपाची तर जाधव यांना नोकरीची काळजी आहे.लोकमतच्या अंकाची होळी करून,मुजोर कर्मचा-यांनी लाथा मारल्या होत्या,तर लाथा खावूनही जाधव यांच्यातील स्वाभिमान जागृत होत नाही,हे दुर्देवच म्हणावे लागेल.
त्यामुळे राज्यभरातील पत्रकारांनो अशावेळी बेरक्याने काय करावे आणि आपणही काय करणार ? गांधारीसारखे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसा, दुसरे काय ?

बुधवार, १९ जून, २०१३

जळगावात ‘लोकमत’च्या वार्ताहराला मारहाण, साथीदाराला सोडून इतरांचे पलायन!

जळगाव - महापालिकेच्या कामचुकार कर्मचाºयांची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून आज दुपारी जळगावात ‘लोकमत’चे वार्ताहर सुधाकर जाधव यांना महापालिकेतील कामचुकारांनी मारहाण केली. विशेष म्हणजे महिला कर्मचाºयांनीही जाधव यांची कॉलर पकडून त्याला धक्काबुक्की केली. एकीने तर त्यांना पाठीमागून कंबरेत लाथ मारली. त्यामुळे खाली पडलेल्या जाधव यांना जबर मारहाण करण्याचा कामचुकारांचा इरादा होता. मात्र, ‘पत्रकारमित्र’ नगरसेवक कैलास सोनवणे मदतीला धावून आले आणि त्यांनी जाधव यांची कामचुकारांच्या तावडीतून सुटका केली.
‘लोकमत चमू’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनच्या आधारे आजच्या जळगाव ‘लोकमत’मध्ये ‘हॅलो’ पुरवणीत ‘दांडीबहाद्दर: मनपातील 40 टक्के कमर्चारी बेशिस्त पालथ्या घड्यावर पाणी’ ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याविरोधात सकाळी कार्यालय सुरू होताच महापालिकेतील महिला कर्मचारी एकत्रित झाल्या. ‘लोकमत’च्या बातमीत छायाचित्र प्रसिद्ध झालेल्या महिलेला घरी मनस्ताप सहन करावा लागला, अशी कर्मचाºयांची तक्रार होती.  ‘तू घरून तर बरोबर वेळेवर निघतेस; कार्यालयात मात्र उशिरा पोहोचतेस, मग तू जातेस तरी कुठे?’ असा सवाल त्या महिला कर्मचाºयाला केला गेला होता. त्यामुळे त्या सहानुभूतीतून सर्वच कर्मचारी चटकन एकत्र आले.  ‘लोकमत’चा निषेध करायचा; प्रशासन व संपादकाला निवेदन द्यायचे असेच तेव्हा ठरले होते. मात्र, सर्व वर्तमानपत्राच्या कार्यालयात फिरून पत्रके वाटून ‘नेतेगिरी’ करणारा एक शिपाई कर्मचारी व रेल्वेचे ठेके घेणारा सफाई कामगार नेता यांनी या आंदोलनाची सूत्रे हाती घेताच खेळ बिघडला.
 
महापालिकेतील कामचुकारांनी मनपा इमारतीच्या प्रवेशद्वारापाशीच ‘लोकमत’ची होळी केली. नेमक्या त्याचवेळी राज्यव्यापी नियोजनाचा भाग म्हणून स्टिंग आॅपरेशनच्या फॉलोअपसाठी आलेल्या वार्ताहर सुधाकर जाधव यांच्याकडे महिलांनी मोर्चा वळविला व त्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. आश्चर्य म्हणजे जाधव यांच्या बरोबरीने तेथे आलेला सहवार्ताहर आणि छायाचित्रकाराने सहकाºयाला संकटसमयी मदत करण्याऐवजी तेथून पलायन केले. ‘लोकमत’च्या शहर कार्यालयात हा प्रकार कळल्यावर महापालिकेत पोहोचलेल्या ज्येष्ठ वार्ताहरालाही धक्काबुक्की केली गेली. यावेळी ‘दिव्य मराठी’च्या विरोधातही घोषणाबाजी केली गेली. 
‘बेरक्या’ या संपूर्ण प्रकरणाने कमालीचा व्यथित आहे. कारण ‘बेरक्या’ हा पत्रकारांचा पाठिराखा आहे; त्यांच्या सुख-दु:खातील साथीदार आहे. कोणत्याही पत्रकारावरील हल्ला, आघात ‘बेरक्या’ला अस्वस्थ करतात. मुख्य प्रवाहातील पत्रकारावर बातमीच्या राहातून झालेला आजचा हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. ‘बेरक्या’ची ‘लोकमत’च्या व्यवस्थापनाला कळकळीची विनंती आहे की, सत्यासाठी लेखणी झिझविल्याने हुडदंगांच्या रोषाला सामोरे जावे लागलेल्या पत्रकाराला वाºयावर सोडू नका. गुन्हा दाखल करा. जळगाव महापालिका आपल्याच ताब्यात आहे, कामचुकारांना घरची वाट दाखवा म्हणजे मग उद्या कुणी अशी हिंमत करणार नाही. जळगावातील पत्रकारांनो, आपणही विचार करा, आज ‘लोकमत’च्या पत्रकारावर ही वेळ आलीय; उद्या तुम्हीही याला बळी पडणार नाही कशावरून? उठा, संघटीत व्हा! ‘नको तिथे अतिसक्रिय’ असलेल्या जळगाव जिल्हा पत्रकारसंघाला साधी निषेधाचीही बुदधी सुचू नये, हे दुर्दैवच! अशी बाजारबुणगी किती दिवस संघटनेवर राहणार? श्रमिक पत्रकारांनो, तुम्हीच विचार करा. या संपूर्ण प्रकरणात  ‘बेरक्या’ पूर्णत: ‘लोकमत’च्या व्यवस्थापनाच्या पाठीशी आहे.  या मंडळींनी ‘लोकमत’ची होळी तर केलीच शिवाय मस्तवालपणे; उन्मंतपणे वर्तमानपत्र पायदळी तुडविले. हा खरेतर संपूर्ण पत्रकारिता जगावरच आघात मानायला हवा. 

दिव्य मराठीत जोगळेकर, गायकवाड रुजू ….

अकोला :  दिव्य  मराठीत सकाळचे श्रीकांत जोगळेकर आणि तरुण भारतचे मिलिंद गायकवाड रुजू …. दोघांच्या आगमनामुळे प्रेमदास राठोड विरोधी गट जम खुश….  संपादकीय विभागात एका विशिष्ट जातीच्या पत्रकारांची संख्या वाढली…. मुख्य उप संपादक फलटणकर यांच्यासह  देशपांडे-जोशी गट एकीकडे आणि इतर दुसरीकडे  असा सामना अकोल्यात बघायला मिळणार आहे.
 अनेक नवख्या पत्रकारांचा आणि बहुजन समाज विरोधी भूमिका असलेल्या पत्रकारांचा दिव्य मराठीत अधिक भरणा असल्यामुळे  बहुजन चेहरा असलेल्या लोकमतला टक्कर देणे डीएम ला कठीण जाणार असल्याची अकोल्यात चर्चा ….
देशपांडे - जोशी गटाने काड्या केल्यामुळे अनेक चांगल्या पत्रकारांचा पत्ता कट......

मंगळवार, १८ जून, २०१३

आणि स्वताला वेगळा समजणारया वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचा पोपट झाला …

सोलापुरातील कधीच फिल्डवर न जाता बातमी करणाऱ्या आणि स्वतःला  इतराहून वेगळ्या समजणाऱ्या एका वृत्तवहिनीच्या पत्रकाराचे आज सकाळी चांगलेच पोपट झाले ,आपले पत्रकारीतेतले सोर्स किती पक्के आणि मजबूत आहेत हे दाखवण्यासाठी सकाळी आपल्या वृत्तवाहिनीवरून सोलापुरातील मुळेगाव परिसरात एका स्त्रीचे मृतदेह आढळल्याचे ब्रेकिंग चालीविले इतकेच नाही तर घटनेपासून लांब राहून आपल्याला या घटनेबाबत किती माहिती आहे हे दाखविण्यासाठी फोनोही दिला.
कालच सोलापुरातील दहिटणे शिवारात तीन पुरुष जातीचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकाच खळबळ माजली असून मृतदेहाजवळ कुठलीच ओळख दर्शविणारी वस्तू आढळून न आल्याने पोलीसासमोर एक आवाहन असतानाच आज सकाळी पुन्हा एकदा एक मृतदेह हैद्राबाद सोलापूर रस्त्यावरिल मुळेगाव येथे एका स्त्री जातीचे मृतदेह आढळल्याचे या पत्रकाराने ब्रेकिंग चालवून त्याचे फोनो हि दिले ,आधीच तीन मृतदेह आढळल्याने त्याच्या तपासात व्यस्त असणाऱ्या पोलिसांना या बाबत कळल्या नंतर पोलिसअधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यानी घटनास्थळी धाव घेवून तब्बल तीन तास परिसरातील शेती पिंजून काढली,हि बातमी अगदी वाऱ्यासारखी शहरात पसरल्या नंतर कांही वृत्तपत्राचे प्रथिनिधिनी गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली होती ,मात्र शिवारात कसल्याही प्रकारचा मृतदेह आढळून आला नाही त्यामुळे त्या पत्रकाराचा चांगलाच पोपट झाला असला तरी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावफळ झाली,याबाबत कांही वरिष्ठ अधिकारयानी त्याच्याकडे फोन वर संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला मात्र पुरता झाला प्रकार अंगलट येण्याच्या भीतीने त्यांनी फोन बंद ठेवणे पसंद केले, (नंतर मात्र फुशारकी मारत मला कितेक्य फोन आले मी त्याला गीणलो नाही असे उसने अवसान आणून पत्रकारांना सांगत होता ) आणि या महाशयाबाबत सोलापुरातील कुठल्याही पत्रकारांना वेगळे सांगायची गरज नव्हतीच मात्र कधीच फिल्डवर न जाताच आपण इतराहून किती वेगळे आहोत हे दाखवायला जाण्याच्या प्रयत्नात आज त्याचा पुरता पोपट झाला हे मात्र निश्चितच …
( टीप -काल मिळालेले आढळेलेल्या तीन मृतदेहाची बातमी इतर वृत्तवाहिन्यानी दाखविले होते मात्र त्यावेळी हे महाशय कुठे होते त्यांनाच ठावूक ,मात्र आज साऱ्यांना चकवा देण्यासाठी केलेल्या त्याच्या या कष्ठाची पराकाष्ठा झालीच नाही ,याच महाशह्याने सोलापुरात कसलीही रोगाची साथ नसताना कांही वर्षापुर्वी सोलापुरात गॅस्ट्रोचे  १७०० रुग्ण आढळल्याचे बातमीही चालविले होते ,या पत्रकारावर अफवा पसरविल्याबाबत कांही कारवाई करता येते का याचा विचार पोलिस करीत आहेत )
............................................


ज्याच्या नावात शिव आहे,आणि प्रौढ असताना कुमार आहे....
चॅनलचे ब्रीद आहे - 
चॅनल नाही बदलले...बातम्या नाही बदलल्या, बदलले आहे फक्त नाव...
आता तुम्हीच ओळखा कोण आहे हा...

शुक्रवार, १४ जून, २०१३

अकोला अपडेट

१. लोकमतचे नवे निवासी संपादक रवी टाले शुक्रवारी सायंकाळी देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांची शेवटची सदिच्छा भेट घेवून, आशिर्वाद घेतले.
- देशोन्नीचे कर्मचा-यांनी उठवली अफवा...टाले परत येणार...मात्र त्यात तथ्य नाही...
- टाले मोबाईन परत करण्यास निशांत टॉवर्सवर गेले होते -
संबंधिताकडून खुलासा 
 - टालेंना बेरक्याचा प्रेमाचा सल्ला - लोकमतमध्ये टिकायचे असेल तर - काही पथ्ये पाळा...

. बेरक्या इम्पॅक्ट - देशोन्नतीचे छोटे सरकार ऋषी पोहरे एक महिन्याचा परदेशी दौरा पंधरा दिवसांत आटपणार...

  - प्रकाश पोहरे यांनीही कामात लक्ष घातले...कर्मचाऱ्यांना भरली धडकी...

३. दिव्य मराठीचे नवे निवासी संपादक प्रेमदास राठोड यांची औरंगाबादेत ट्रेनिंग सुरू...

. प्रेमदास राठोड यांच्या अनुपस्थितीत अभिलाष खांडेकर यांनी नाराजांची समजूत काढली...
- खांडेकर म्हणाले, कोणावरही अन्याय होणार नाही,आमचे वरून पुर्ण लक्ष राहणार...

५. नागपूर ब्युरो कार्यालयातील रिपोर्टर अतुल पेठकर, मंगेश राऊत (व्हाया तरूण भारत) यांनी खांडेकर यांची अकोल्यात भेट घेवून, आशिर्वाद घेतले...


6. बेरक्याने जाहिर केलेले संगणक ऑपरेटर्स मनोज वाकोडे, डिगांबर आयस्कार, राजु बोरकुटे  डीएमला जॉईन झाले. देशोन्नती प्रेसमधील योगेश गावंडे, दिपक मोहिते, डिगांबर आयस्कार हे ऑपरेटर्स गेल्यामुळे या विभागाची धुरा सांभाळणारे गोपाल दांदळे चांगलेच हादरले आहेत. त्यांच्या विश्वासातले समजले जाणा:या या तिघांच्या अनुपस्थितीत अकोला प्रेसवरुन देशोन्नतीच्या दहा आवृत्त्या सांभाळतांना त्यांच्या नाकी नऊ येतील यात शंका नाही

‘लोकमत’चे मध्य प्रदेश लॉंचिंग : नकटीच्या लग्नात 1760 विघ्ने!

हाराष्ट्रात ‘दिव्य मराठी’च्या रुपाने ‘भास्कर’ने जोरदार फटका दिल्यामुळे कातावलेल्या, चवताळलेल्या ‘लोकमत’ने तडकाफडकी मध्य प्रदेशात धडक देण्याची योजना बनविली. मात्र या नकटीच्या लग्नात आता 1760 विघ्ने येते आहेत. छिंदवाडा येथून ‘लोकमत समाचार’ची पहिली आवृत्ती प्रकाशित करून ‘लोकमत’चे मध्य प्रदेशात जोरदार लॉंचिंग करण्याची योजना दर्डा शेठजींनी आखली आहे. त्यांना तमाम ‘भास्कर’विरोधकांनी शक्ती पुरविली आहे. छिंदवाडा हा तुलनेने ‘भास्कर’चा फारसा प्रभाव नसलेला भाग ‘लोकमत’ने मध्य प्रदेश लॉंचिंगसाठी निवडला. 

छिंदवाडा आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाची सर्व तयारीही झाली होती. 2 जुलै रोजी हा कार्यक्रम व्हावयाचा होता. त्यासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि विधानसभा अध्यक्ष ईश्वरदास रोहाणी हे मुख्य पाहूने होते. दोघांनी आपली उपस्थितीही फायनल केली होती. मात्र, तोंडावर असलेल्या निवडणुका व पॉलिटीकल रेव्हेन्यूची शक्यता पाहता कोणा एका पक्षाचा सुरूवातीपासून शिक्का बसण्याऐवजी इतर पक्षाच्या दिग्गजांनाही प्रकाशनाच्या उद्घाटन समारंभात बोलवावे, असा दर्डा सीनिअर्सचा आग्रह होता. छोटे बाबू मंडळी मात्र आपला समझोता फक्त सत्ताधीशांशी हा युक्तिवाद पुढे करीत होती. अखेर सीनिअर्सचा आग्रह मान्य करून मुख्यमंत्री व भाजपच्य बड्या नेत्यांबरोबरच कॉंग्रेस महासचिव दिग्विजय सिंग आणि केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनाही प्रमुख पाहुने म्हणून बोलविण्याची योजना आखली गेली. स्वत: खासदार बाबूजी अत्यंत सन्मानाने, आदरपूर्वक निमंत्रण घेऊन कॉंग्रेसनेत्यांच्या दारी पोहोचले. मात्र, या मंडळींनी ‘लोकमत’कारांची चाल ओळखून भाजपच्या नेत्यांसह व्यासपीठ शेअर करण्यास नकार दिला व दोन जुलैच्या कार्यक्रमात येण्याबाबत अनंत अडचणींचा पाढा वाचला. अखेर बड्या बाबूजींनी पूर्वीच्या दोन जुलैच्या उद्घाटन कार्यक्रमाचा बेत रद्द करीत कॉंग्रेसनेत्यांच्या सोयीची; त्यांच्याच सल्ल्याने 12 जुलै ही नवी तारीख पक्की केली. 

या बदलानंतर अखेर बडे बाबूजी पुन्हा भाजपच्या दारी गेले. कारण त्यांना आता मुख्यमंत्री, अध्यक्षांची माफी मागून नवी तारीख मिळवायची होती. या दोघांनी त्यापूर्वीच 2 तारखेला ‘ओके’ दिले होते. त्यांना ही ‘ओके’ केलेली जुनी 2 तारीख बदलून 12 तारखेसाठी राजी करणे हे तसे कठीणच काम होते. मात्र, बाबूजींनी अद्वितीय संवादकौशल्य व ‘वाकण्याच्या’ क्षमतेतून मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि विधानसभा अध्यक्ष ईश्वरदास रोहाणी या दोघांनाही पटवून बदललेल्या 12 तारखेला प्रकाशन कार्यक्रमास येण्यास राजी केले. त्यांची नवी तारीख मिळविली. 

खरी खिचडी यानंतरच पकली. ‘भास्कर’वाल्यांनी मध्य प्रदेशातील ‘माहिती-जनसंपर्क’वाल्यांना आतल्या गोटातील खबर पुरविली. दोन तारीख बदलून 12 का केली, हा प्रश्न तसाही सर्वांनाच पडला होता. झाले! ‘माहिती-जनसंपर्क’वाल्यांनी चौहान आणि रोहाणी यांना तारीख बदलाचे ‘गुपित’ सांगितले.  दिग्विजय सिंग आणि कमलनाथ या कॉंग्रेसींच्या सांगण्यावरून पूर्वी ठरविलेली 2 तारीख बदलून 12 केली गेली व त्याबाबत आपणास अंधारात ठेवले गेले, हे समजल्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान हे ‘लोकमत’कारांवर भलतेच संतापले. त्यांनी ‘माहिती-जनसंपर्क’ खात्यामार्फतच बड्या व छोट्या बाबूजींनाही निरोप पोहचविला, की चौहान आणि रोहाणी या दोघांनाही 12 तारखेच्या प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित राहता येणार नाही. त्यासाठी विधीमंडळ अधिवेशनाच्या तयारीमुळे व्यग्रतेचा हवाला दिला गेला. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान  यांचे हे ‘खेदपत्र’ (खरे तर नकार!) म्हणजे ‘लोकमत’कारांसाठी ‘लेटर-बॉम्ब’च ठरले. 

सत्ताधारयांच्या प्रकाशन कार्यक्रमावरील बहिष्कारानंतर, वैतागलेल्या लोकमत प्रशासनाने आता असा मध्यममार्गी तोडगा काढलाय की, छिंदवाडा येथून ‘लोकमत समाचार’चा मध्यप्रदेशातील पहिला आवृत्ती प्रकाशन कार्यक्रम अर्थात ‘लोकमत’चे मध्य प्रदेश लॉंचिंग 12 जुलै रोजी सकाळी होईल. त्यासाठी राज्यातील सर्व कॉंग्रेस नेत्यांना बोलाविले जाईल. याच दिवशी रात्री प्रीतीभोजन कार्यक्रमाचा बेत आखण्यात आलाय.  या शाही भोजनासाठी मात्र मुख्यमत्र्यांसह राज्यातील सर्व भाजप व कॉंग्रेसेतर नेत्यांना आमंत्रित केले जाईल. अर्थात हे सारे काही लोकमत प्रशासनाच्या पातळीवर ठरलेय. त्यात सारे बाबूजी कितपत यशस्वी होतात, याबाबत शंकाच आहे. ‘लोकमत’ हा कॉंग्रेसी दर्डा परिवाराचा पेपर आहे आणि मध्यप्रदेशात कट्टर कॉंग्रेसविरोधी भाजपचे सरकार आहे. 

‘लोकमत’वाल्यांना कॉंग्रेसी, मॅडम यांना दुखावून चालणार नाही आणि दुसरीकडे मध्यप्रदेशात पेपर चालवायचा, ‘भास्कर’ला धक्का द्यायचा तर  सत्ताधारी भाजपला सोबत घ्यावेच लागेल. ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी ‘लोकमत’कारांची अवघड अवस्था झालीय. ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ या स्थितीत बाबूजी सापडले आहेत. एकीकडे ‘दिव्य मराठी’चा आता थेट ‘लोकमत’चा गड असलेल्या विदर्भात धडाका सुरू होतोय तर दुसरीकडे ‘लोकमत’वाल्यांच्या ‘काऊंटर अ‍ॅटॅक’ची योजना म्हणजे फुसका बार ठरू पाहत आहे. ज्युनिअर बाबूजींनी ‘शत्रूला शत्रूच्या प्रदेशातच घुसून नामोहरम करायचे’ हा पुस्तकी पाठ तर सातत्याने मांडला; पण आता त्याच्या अंमलबजावणीत अनंत अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ‘लोकमत’चे मध्य प्रदेश लॉंचिंग म्हणजे ‘भीक नको; पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची वेळ आलीय. 

तसाही   सध्या नागपूरहून लोकमत समाचार मध्यप्रदेशात सकर््युलेट होतोच. छिंदवाडा हे शहर नागपूरला जवळचे म्हणून प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तिथून पहिली आवृत्ती काढून त्यापाठोपाठ भोपाळ, इंदूर, जबलपूर अशा विस्ताराची योजना आहे. भोपाळमध्ये तर बिल्डींग बनून तयार आहे. तेच मध्यप्रदेश ‘लोकमत’चे मुख्यालय राहील. तशी  ‘लोकमत समाचार’ची महाराष्ट्रातही विस्ताराची योजना आहे. मुंबई, नाशिक आवृत्त्या सशक्त करने रडारवर आहे. सध्या  ‘लोकमत समाचार’च्या नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अकोला, पुणे व जळगाव अशा सहा आवृत्त्या आहेत. ‘लोकमत टाईम्स’च्या औरंगाबाद व नागपूर अशा दोन तर ‘लोकमत’च्या महाराष्ट्र-गोव्यात 11 आवृत्त्या आणि एकूण 46 उप-आवृत्त्या आहेत. 

नोट: बेरक्या महाराष्ट्रातील  प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com

‘आज तक’ने एका फटक्यात 150 जणांना काढले!


टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील बड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या टीव्ही टुडे समूहातून किमान 150 जणांची सुट्टी होत आहे. या समूहाचे मुख्य माध्यम असलेले ‘आजतक’ निरंतर तोट्यात चाललेय; त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने या 150 जणांना घरी बसविण्यात येणार आहे. टीव्ही टुडे समूहाच्या ‘एचआर’ने या सर्वांना ‘आस्क्ड टू गो’ श्रेणीत ठेवले आहे. ही अत्यंत गोपनीय लिस्ट ‘बेरक्या’च्या हाती आली आहे. आतापर्यंत 66 जणांची सुट्टी करण्यात आलेल्यांची ही यादी आहे. लवकरच सर्वच्या सर्व 150 जणांच्या ‘मुक्ती’ची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यापुढे अनेक बड्या माध्यमसमूहात अशी वेळ येण्याची शक्यता आहे. भरमसाठ वेतनाची खैरात, वाढता खर्च, उधळपट्टी यामुळे अनेक माध्यमसमूह तोट्याच्या गर्तेत चालले आहेत. 
 
टीव्ही टुडे समूहाने आतापर्यंत 66 जणांना एकगठ्ठा बाहेरचा रस्ता दाखविण्याऐवजी एकेकाला, वेगवेगळे कारण सांगून कपात चालविली आहे. आश्चर्य म्हणजे, देश-परदेशातील अन्यायाला वाचा फोडणारे, अनेकांना न्याय मिळवून देणारे हे सारे बुद्धधीजीवी पत्रकार स्वता:ची लढाई लढण्याऐवजी गुपचूप ‘मुक्ती’पत्र स्वीकारून इतरत्र सोय पाहत आहेत. 150 जणांची कपात होवूनही मीडियात संघर्षाचा ब्र शब्दही उमटू नये, हे मालकशाही मुजोर झाल्याचे नव्हे तर; पत्रकार संघटना अत्यंत कमजोर व बटिक झाल्याचे लक्षण मानले जात आहे. अलीकडेच ‘फोबर््स इंडिया’ने एका झटक्यात संपादक इंद्रजित गुप्ता यांच्यासह चौघा वरिष्ठ पत्रकारांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखविला. या अपमानास्पद प्रकाराबाबत मुंबईतील प्रेस क्लबच्या पत्रकबाजीऐवजी इतरत्र कुठे काही बोंबही झाली नाही. 

टीव्ही टुडे समूहाने आपला तोटा कमी करण्यासाठी अलीकडेच 26 टक्के भागभांडवल आदित्य बिर्ला समूहाला विकले. 2009 मध्ये 32 कोटींच्या नफ्यात असलेला टीव्ही टुडे समूह वाढत्या स्पर्धेत अवघ्या तीन वर्षांत तोट्याच्या दलदलीत फसला आहे.

 कंपनीच्या द्ृष्टीने नॉन प्रॉफिटेबल अ‍ॅसेटस ठरवून 150 जणांच्या बरखास्तीचा डाव तडीस नेला जात आहे. त्यातील 50 टक्के काम तसे पूर्णही झाले आहे. यात सीनियर आणि ज्युनियर सर्व कर्मचारी;  एडिटोरियल, पीसीआर, एमसीआर, मार्केटिंग, एडिटिंग, आयटी, कॅमेरामन सहीत अनेक विभागातील मंडळी  समाविष्ट आहेत.

इलेक्ट्रॉनिक मीडियात आता नविन टेक्नॉलॉजी...

मुंबई - एकाद्या घटनेचे थेट प्रक्षेपण करायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक मीडियास ओबी व्हॅनची गरज भासत होती.ओबी व्हॅनची किंमत कोटीच्या घरात आहे. त्यातही बरेच अडथळे येतात.मात्र आता लाइव्ह बॉन्ड नावाची नविन टेक्नॉलॉजी आली आहे.
कॅमेरावर या यंत्रणेचे युनिट बसवून थेट प्रक्षेपण करता येते. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने ही यंत्रणा उपलब्ध केली आहे. दक्षिण मुंबईला जोडणा-या  इस्टर्न एक्स्प्रेस फ्रीवे काल उद्घाटन झाले होते. १७ किलोमीटर लांबीचा हा रस्ता कसा आहे, याचे लाइव्ह प्रक्षेपण आज दाखविण्यात आले. खास रिपोर्टर विलास बडे यांनी त्याचे कव्हरेज केले.
ओबी व्हॅनला प्रवासाचे चित्रण करता येत नाही.मात्र या नव्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही अडचण आता दूर झाली आहे.विशेष म्हणजे ही यंत्रणा मुठीत धरता एवढी आहे. थ्रीजीच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने ऑलरेडी चार ओबी व्हॅन घेतल्या आहेत.आता ही यंत्रणाही आणल्यामुळे भविष्यात हे चॅनल कात टाकेल,अशी अपेक्षा आहे. बातम्या आणि टेक्नॉलॉजीत बदल केल्यामुळे जय महाराष्ट्र चॅनल आता पुन्हा चर्चेत आले आहे.

ता.क. - हे नविन युनिट कोणत्याही कॅमेरास बसते...त्यामुळे महाराष्ट्रातील रिपोर्टरना त्याचा लाभ होणार आहे..

मु.पो.अकोला

अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे. दिव्य मराठीच्या पाश्र्वभूमीवर अकोल्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. लोकमतने प्रेमदास राठोड यांना हलवून पहिला धक्का दिला.त्याच राठोड यांना दिव्य मराठीत घेतले.तर टोकाचा विरोध असलेल्या देशोन्नतीतील रवी टाले यांना घेवून लोकमतने दुसरा धक्का दिला.
लोकमत एकीकडे अनेक व्यूहरचना करीत असताना,मायभूमीतच देशोन्नती शांत आहे.रवी टाले लोकमतमध्ये आणि अन्य काही जण दिव्य मराठीत गेले असताना,देशोन्नतीच्या पोहरे फॅमिलीला त्याचे काहीच सोयरसुतक वाटत नाही.खुद्द छोटे सरकार ऋषी पोहरे ऐन युध्दाच्या काळात अमेरिकेला गेले आहेत.
देशोन्नतीला अजून कॅप्टन मिळालेला नाही.कोच परदेशात...त्यामुळे देशोन्नतीची टीम हरल्यात जमा आहे.
त्यामुळे आता खरा सामना लोकमत विरूध्द दिव्य मराठी असा रंगणार आहे....

सकाळही काढणार अकोला आवृत्ती

दिव्य मराठीच्या पाठोपाठ सकाळचीही अकोला आवृत्ती लवकरच निघणार आहे.या आवृत्तीची प्रिटींग जळगावात होणार आहे.मात्र सकाळला संपादकीय टीम मिळणे अवघड झाले आहे.दिव्य मराठी आणि लोकमतमधून कोण फुटतो का,याची सकाळ वाट पहात आहे.शेवटी देशोन्नतीतील उरलेला स्टॉफ सकाळ फोडेल,असे चिन्हे आहेत.तोही नाही फुटल्यास बाहेरहून माणसे आयात करावी लागतील.

गुरुवार, १३ जून, २०१३

प्रेमदास राठोड जिद्दीला पेटले,लोकमतच्या दोघांना फोडले...

अकोला - लोकमत सोडून दिव्य मराठीत गेलेल्या प्रेमदास राठोड यांनी, लोकमतचे कर्मचारी फोडणे सुरू केले आहे. त्यांनी औरंगाबाद लोकमतमधील आपल्या दोन समर्थकांना फोडले असून, एकाला औरंगाबादेत तर दुस-याला अकोल्यात आणले आहे.दोघांनाही लोकमतपेक्षा दुप्पट पॅकेज दिले आहे.
एकीकडे दिव्य मराठीत प्रेमदास राठोड यांना टोकाचा विरोध होत असताना, प्रेमदास राठोड यांनी भीष्म प्रतिज्ञा केली आहे की, लोकमतचे अनेक कर्मचारी फोडून दाखवितो. मी जर माणुसघाणा आहे तर, आता लोकमतचे किती लोक जमा करतो, ते पहाच...असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे.ज्यांना दिव्य मराठी सोडून जायचे त्यांनी खुशाल सोडून जावे,मी माझी टीम जमा करतो,असेही त्यांनी खासगीत म्हटले आहे.
त्याची सुरूवात त्यांनी आता सुरू केली आहे. लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत डेक्सवर असलेल्या उपसंपादक साजीद पठाण आणि मिलिंद देशपांडे यांना  राठोड यांनी फोडले आहे.पठाणला दिव्य मराठीच्या औरंगाबाद आवृत्तीत तर देशपांडे यांना अकोल्यात आणले आहे.विशेष म्हणजे देशपांडे यांना मुख्य उपसंपादक पद देण्यात आले आहे.
राठोड आता लोकमतचे किती कर्मचारी फोडतात,त्यांची ताकद किती आहे,हे लवकरच कळणार आहे. खांडेकर यांनी राठोड यांना लोकमतचे कर्मचारी फोडण्याची फुल्ल परवानगी दिली असून,अकोला आवृत्ती कसल्याही परिस्थितीत यशस्वी करून दाखविण्याचे चॅलेंज दिले आहे.

मंगळवार, ११ जून, २०१३

अकोला मीडियात भूकंप

अकोला - दिव्य मराठीने अकोल्यात पाऊल ठेवताच अनेक घटना - घडामोडी घडत आहेत.मंगळवारी तर भूकंप झाला. लोकमतचे निवासी संपादक प्रेमदास राठोड हे अखेर लोकमतचा राजीनामा देवून दिव्य मराठीत जॉईन झाले आहेत. तर देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले हे लवकरच लोकमतमध्ये जॉईन होतील. राठोड हे दिव्य मराठीचे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांच्या संपर्कात असल्याचे वृत्त बेरक्याने पंधरा दिवसांपुर्वी प्रसिध्द केले होते.अखेर हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.
दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकर सुरू होत आहे.टीमची जुळवाजुळव पुर्ण झाली आहे.मात्र निवासी संपादक कोण होणार,याकडे लक्ष वेधले होते. या पदासाठी लोकमतचे गजानन जानभोर आणि सकाळचे श्रीमंत माने यांनी नकार दिल्यामुळे, खांडेकरांपुढे एकच पर्याय होता,तो म्हणजे लोकमतचे प्रेमदास राठोड.
एकीकडे राठोडमुळे लोकमतमध्ये प्रचंड नाराजी होती.त्यामुळे अनेकजण दिव्य मराठीच्या वाटेवर होते.त्यामुळे लोकमत प्रशासनाने राठोड यांना मुंबईला हलवून नागपूरचे सीटी एडिटर गजानन जानभोर यांच्याकडे तात्पुर्ती जबाबदारी सोपवली.त्यामुळे अजय डांगे आणि राजू चिमणकर वगळता,एकीही संपादकीय स्टॉफ फुटला नाही.
नंतर राठोड यांनी कौटुंबिक अडचण सांगितल्यानंतर लोकमत प्रशासनाने त्यांना हॅलोचे ग्रामीण हेड करून, अकोल्यात एम.आय.डी.सी.कार्यालयात बसविले.त्यामुळे राठोड नाराज झाले.ते गेल्या काही दिवसांपासून खांडेकरांच्या संपर्कात होते.बेरक्याने तसे वृत्त दिले होते. अखेर राठोड लोकमतचा राजीनामा देवून, दिव्य मराठीत जॉईन झाले आहेत.त्यांच्या पदाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी,त्यांना दिव्य मराठीत निवासी संपादकपद दिले जातील...त्यामुळे आता देविदास लांजेवार यांचा विषय आता संपला आहे.बहुतेक लांजेवरवर वृत्तसंपादक पदाची जबाबदारी सोपविण्यात येईल,असा अंदाज आहे.
राठोड यांच्या आगमनामुळे लोकमत सोडून दिव्य मराठीत आलेले अजय डांगे आणि राजू चिमणकर यांची मोठी गोची झाली आहे.कारण दोघांनी केवळ राठोडच्या छळाला कंटाळून,लोकमत सोडले होते.तसेच दिव्य मराठीच्या वाटेवर असलेला लोकमतचा स्टॉफही आता लोकमतमध्ये थांबेल.लोकमतचा अखेर सुंटीवाचून खोकला गेला आहे.
अकोल्यात आणखी एक भूकंप घडला आहे. देशोन्नतीचे कार्यकारी संपादक रवी टाले हे प्रकाश पोहरे यांचे फॅमिली मेंबर.मात्र केवळ एका बिलामुळे पोहरेंनी त्यांना केले.त्यामुळे टाले हे राजीनामा देवून घरी बसले होते. टाले देशोन्नती परत येणार का, की अन्य वृत्तपत्रात जाणार,अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती.अखेर टाले लवकरच लोकमतचे जॉईन होतील.त्यांची आणि मोठ्या राजेंद्र बाबूंजींची मुंबईत भेट झाली असून,टाले लवकरच लोकमतमध्ये दिसतील.त्यांना लोकमतमध्ये निवासी संपादक किंवा कार्यकारी संपादक पद दिले जातील.

ता.क.-  प्रेमदास राठोड यांना बंपर लॉटरी...लोकमतपेक्षा डी.एम.मध्ये दुप्पट पॅकेज...शिवाय फिरण्यास ड्रायव्हरसह चार चाकी गाडी आणि राहण्यास बंगला....

* अकोला - प्रेमदास राठोड दिव्य मराठीत गेल्याने लोकमतची लढाई झाली सोपी....गजानन जानभोरला रवी टालेंची साथ मिळाल्यामुळे लोकमतच राहणार नं.1...कोई शक?

रविवार, ९ जून, २०१३

मु.पो.पुणे

पुणे - नंदकुमार सुतार यांच्या एन्ट्रीनंतर सकाळमधील जुना गट (सुनील माळी,सुनील कडूसकर,माधव गोखले ) नाराज... लवकरच या नाराजीचा स्फोट होणार..

 * सकाळमधील सिनियर्स(जुना गट की सगळेच) उडवताहेत तनिष्का कार्यक्रमाची खिल्ली. तसे सगळेच कंटाळलेत. रिपोर्टर्सना सांगतात बनवा गट, त्यांच्या मिंटींग अटेंड करा आणि छापा मोठी  बातमी.......शब्दसंख्या चांगली लांबवा. या बातम्यांना आपल्याकडे जगाच जागा आहे...
ही तर पेड न्यूजच झाली.........20 सभासदांचा एक गट, प्रत्येक महिलेकडून 700 रूपये. म्हणजे एका गटाचे 14000 त्याबदल्यात एक मोठी बातमी फोटोसह आणि कार्यक्रमाला नाव काय तर 'स्त्री प्रतिष्ठा' अभियान. पैसेवाल्यांनाच प्रतिष्ठा.........ज्यांना खर्‍या अडचणी त्या स्त्रीया ही फी भरूच शकत नाही.आणि पैसेवाल्यांना काय अडचणी असणार....


पुणे - म.टा.च्या निवासी संपादकपदासाठी पानवलकरांचे पंटर आशिष पेंडसे आणि धनंजय जाधव यांची नावे चर्चेत...पराग करंदीकर यांना पुणे सोडून अन्य आवृत्त्याची जबाबदारी देणार...

पुणे - विजय कुवळेकर मुख्य संपादक झाल्यापासून लोकमतमध्ये गटबाजीला ऊत....कुवळेकरांना कोपऱ्यात एक खोली देवून बसविले...संपादक विजय बावीस्कर यांनी अविनाश थोरात यांच्या माध्यमातून सर्व रिपोर्टर आपल्या पाठीशी ठेवले...
विजय कुवळेकर यांनी निरामय ही पुरवणी सुरू केली...मात्र लोकमतच्या जाहिरात बॅनरबाजीत या पुरवणीचा उल्लेख नाही...कुवळेकरांनी सर्व जुन्या लेखकांचे लेख बंद करून नविन लेखक निवडले...मात्र बावीस्करांना लिहिण्यास सांगितले...गेल्या दहा वर्षात लिखाण न करणाऱ्या बावीस्करांना नाइलाजास्तव लिहावे लागत आहे..त्यातून बावीस्कर एक्स्पोझ होत आहेत...
 

शुक्रवार, ७ जून, २०१३

अकोला डी.एम.ची फायनल टीम

अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे.या आवृत्तीसाठी टीम तयार करण्यात आली आहे.
उप वृत्तसंपादक - मनिष जोशी (सकाळ)
चिफ रिपोर्टर -  सचिन देशपांडे (लोकसत्ता)
वरिष्ठ रिपोर्टर -  प्रबोध देशपांडे (महाराष्ट्र टाइम्स)
क्राईम रिपोर्टर - अजय डांगे (लोकमत)
रिपोर्टर - अशिष गावंडे, सचिन राऊत (देशोन्नती), शंतनु राऊत (मातृभूमी), कुंदन जाधव (देशोन्नती)

मुख्य उपसंपादक - नितीन फलटणकर (डी.एम.नाशिक कार्यालयातून बदली)
वरिष्ठ उपसंपादक - प्रमोद गावंडे (सकाळ,जळगाव)
उपसंपादक - राजू चिमणकर (लोकमत), सचिन कापसे (सकाळ),प्रशांत कळाशंकर (सकाळ)

फोटोग्राफर - नीरज भांगे आणि प्रवीण ठाकरे
प्रुफ रिडर - संजय कोथळकर (देशोन्नती)

बुधवार, ५ जून, २०१३

महाराष्ट्रनामा...

बेरक्या इफेक्ट : जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने गेल्या आठ दिवसांत बऱ्यापैकी बदल केले....दोन नविन ओबी व्हॅनही घेतल्या...ओबी व्हॅनची संख्या झाली आता चार...मुंबईत दोन तर पुणे आणि नागपुरात प्रत्येकी एक...

****

जळगाव - नवीन संपादकांनी आल्या-आल्या सिटी ऑफिसची टीम बदलवली होती.
वेगवेगळ्या बिटावर प्रस्थापित झालेल्यांना आता खाली बसवीत नवीन चार उपसंपादकांना बीट मिळणार असून त्यात "सायदैनिक साईमत"मधून जिल्ह्यात क्राइम गाजवणारे विजय वाघमारे सामनातून गेलेले (कि काढलेले )गणेश खाम्बते,देशदूतचे सूरवाडकर आणि देशदूत सोडल्या नंतर दोन वर्ष अज्ञातवासात राहिलेले शिरीष सरोदे यांचा समावेश आहे. समूह संपादक श्रीराम पवार यांनी नुकतीच याची व्हि. सी घेतल्याचे वृत्त आहे पिंपळवाडकर आपली नवीन टीम तयार करत असल्याचे
मानले जात आहे.


*****

 पुण्यात लवकरच बारामतीच्या एका उंद्योगपतीचा विश्व सह्याद्री नावाचा बारा पानी पेपर सुरू होणार आहे...पिंपरी - चिंचवडमध्ये जोर लावणार...पुण्यनगरीतून राजीनामा दिलेले की काढण्यात आलेले संजीव शाळगावकर विश्व सह्याद्रीच्या वाटेवर...
- पुढारी आणि प्रभातच्या वाटाघाटी फिसकटल्यामुळे शाळगावकर यांची शाळा अजून भरली नाही...
-पुण्यात शास्त्रीरोडवर विद्या सहकारी बँकेच्या शेजारी ऑफीस आहे. पुढारीतील के.के.कुलकणी ( no 8237893347 ) सध्या येथे इन्चार्ज म्हणून रूजू झाले आहेत...


  नागपूर - डी.एम.च्या पार्श्वभूमीवर सकाळचे ग्रामीण विभाग प्रमुख संजय देशमुख यांची अमरावती येथे बदली...

अकोला - डी.एम.च्या गळाला लोकमतचे अजय डांगे आणि राजू चिमणकर हे दोघेच लागले...प्रेमदास राठोडमुळे नाराज झालेला लोकांची समजूत काढण्यात गजानन जानभोर यांना यश

अकोला -  दिव्य मराठीच्या पार्श्वभूमीवर गजानन जानभोर  यांनी एमआयडीसीतील विवेक चांदुरकर व राम देशपांडे यांना सिटीमध्ये घेतले. तसेच लोकमत सोडून गेलेल्यांची उणीव भरून काढण्यासाठी पुण्यनगरीचे अनिल गवई , देशोन्नतिचे संतोष येलकर यांच्या मुलाखती घेतल्य...


अकोला - आवृत्ती सुरू होण्याची वेळ आली तरी दिव्य मराठीला निवासी संपादक मिळेना....गजानन जानभोर आणि श्रीमंत माने यांचा नकार...बाळ कुलकणी मापात बसेनात...प्रेमदास राठोडबाबत अडचणी....त्यामुळे निवासी संपादकाचा पेच कायम...औरंगाबाद आवृत्तीचे वृत्तसंपादक देविदास लांजेवर यांच्याकडे जबाबदारी येण्याची शक्यता...

अकोला - बेरक्याचे भाकीत खरे ठरले....ऑफर लेटर हाती असतानाही लोकमतचे सदानंद शिरसाट डी.एम.मध्ये जॉईन झाले नाहीत....लोकमतमध्ये राहणे पसंद केले...

 कोल्हापूर - दैनिक व्हिजन वार्ता कार्यालयात सोलापूरच्या जवळपास 20 कर्मचाऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन....थकीत चार महिन्याचा पगार देण्याची मागणी...
- सोलापूर पाठोपाठ नगर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे दैनिक व्हिजन वार्ता कार्यालयात ठिय्या आंदोलन...

औरंगाबाद - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले...दिव्य मराठीचे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांची बदली कन्फर्म...प्रशांत दीक्षित नवे स्टेट एडिटर...सध्या दीक्षित यांची भोपाळमध्ये ट्रेनिंग सुरू....ट्रेनिंगहून परत येताच, सुत्रे घेणार...


 ठाणे - महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार विश्वास पुरोहित यांचा राजीनामा … लोकमत ऑनलाईनला रुजू . मटाने गेल्या तीन वर्षांपासून पगारवाढ केली नसल्यामुळे राजीनाम्याचा निर्णय.

 मुंबई - पुण्यनगरीचे उपसंपादक दीपक पवार नवशक्तीच्या वाटेवर … प्याकेज चांगले मिळाल्याची चर्चा. तुटपुंज्या पगारामुळे पुण्यनगरीतील अनेकजण कंटाळलेत.

पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचा:यांना चांगले दिवस

गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुं'या पगारात ढोर मेहनत करणा:या पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचा:यांना गेल्या दोन वर्षांपासून चांगले दिवस आले आहेत. चांगल्या दिवसाचे हे वारे यंदा'या मान्सूनबरोबर अकोल्यासह पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात वाहायला लागल्याने बळीराजाप्रमाणेच या कर्मचा:यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. कर्मचा:यां'या वेतनात वार्षिक २०० ते २५० रुपये वाढ करणा:यांची या नव्या वा:यांमुळे चांगलीच पंचाईत झाली असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी केलेले शोषणही यानिमित्ताने उघड झाले आहे. 
कोणत्याही क्षेत्रात काम करणा:या कर्मचा:यांना त्या'या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा असते. हा मोबदला मिळत नसेल तर संबंधित कारखानदार किंवा कंपनी मालकांवर कायदेशीर बडगाही उगारला जातो. असे असले तरी वेगवेगळ्या कायदेशीर पळवाटा शोधून ही मंडळी आपले शोषणाचे काम अव्याहतपणे सुरूच ठेवते. पत्रकारिते'या क्षेत्राचेही तेच झाले. या क्षेत्रात काम करणा:या श्रमिक पत्रकारांना आणि पत्रकारेतर कर्मचा:यांना कामाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून शासनाने वेळोवेळी वेगवेगळ्या आयोगांची नेमणूक केली. त्या आयोगांनी केलेल्या शिफारशींनुसार वर्तमानपत्रां'या मालकांनी कामगारांना वेतन देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात असे कधीही घडले नाही. चार-दोन मालक किंवा व्यवस्थापन याला अपवाद असतीलही, पण बहुतांश मंडळींनी कामगारांचे शोषण करण्यातच धन्यता मानली. या क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवलेल्या अनेकांनी प्रस्थापित वर्तमानपत्रां'या मालकांवर, त्यां'या व्यवस्थापनावर तोंडसुख घेत त्यांना भांडवली वर्तमानपत्र ठरविले. प्रत्यक्षात भांडवलदारांविरुद्घ गळा काढणारी ही मंडळी बेमालूमपणे त्यां'याच पंत्त*ीत जाऊन बसली. 
कोणतेही वर्तमानपत्र स्वातंत्र्यपूर्व काळासारखे केवळ देशप्रेमा'या भावनेतून किंवा जनजागृती'या उद्देशाने सध्या'या काळात चालविणे अशक्य आहे. असे असले तरी वर्तमानपत्रांमध्ये असणारा प्रचंड जाहिरातींचा ओघ वर्तमानपत्रां'या व्यवस्थापनाला तारत असतो. कितीही लपून ठेवले तरी पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचा:यांना आपल्या व्यवस्थापनाचा ताळेबंद पुरेपूर माहिती असतो. संपूर्ण जगातील अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्या'या बाता मारणा:या या पत्रकारांकडून स्वत:वरील अन्यायासाठी मात्र चकार शब्द काढता येत नाही, हे मोठे दुर्दैव आहे. असा शब्द काढणे म्हणजे तो मालक किंवा व्यवस्थापना'या विरुद्घ केलेला विद्रोह असतो आणि असा विद्रोही पत्रकार व्यवस्थापनाला चालत नाही. परिणामी, बाहेर छाती काढून पत्रकारितेचा तोरा मिरविणारे पत्रकार शेपूट घालून वर्षानुवर्षे निमूटपणे आपले काम करीत असतात.
 गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मात्र या क्षेत्रात निर्माण झालेली स्पर्धा या क्षेत्रातील कामगारां'या आपोआप पथ्यावर पडली आहे. अर्थात यासाठी कोणी भाग्यविधाता समोर आलेला नाही. या क्षेत्रातील मर्यादित मनुष्यबळ, नव्या तरुणांनी या क्षेत्राकडे फिरविलेली पाठ यामुळे आपोआपच रोजगारा'या जास्त संधी आणि तोकडे मनुष्यबळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद शहरापासून दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली या क्षेत्रातील माणसांची टंचाई अद्यापही कायम आहे. विदर्भात काही वर्षांपूर्वी बदमाशी चालायची. इकडे माणसे मिळत नसतील तर मराठवाड्यातून किंवा आणखी दुस:या भागातून माणसे आणा, पण स्थानिक कर्मचा:यांचे पगार वाढवायचे नाहीत, अशी हेकेखोर भूमिका अनेक वर्षे चालली. व्यवस्थापना'या दुर्दैवाने आणि कामगारां'या सुदैवाने आता सर्वच ठिकाणी स्पर्धेची परिस्थिती निर्माण झाल्याने त्या-त्या भागातील माणसांना तेथेच काम उपलब्ध होत असल्याने ते दुस:या ठिकाणी जायला तयार नाहीत. परिणामी, पूर्वीचा हा डावही आता चालेनासा झाला असून, विद्यमान कर्मचा:यांना वेतन वाढवून दिल्याशिवाय अनेकांपुढे पर्याय उरला नाही. 
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून जी वर्तमानपत्रे यापूर्वी फत्त* मुंबई किंवा अन्य विशिष्ट भागातून प्रकाशित व्हायची त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पाय पसरायला सुरुवात केली आहे. उत्तर भारतात सर्वत्र असलेले एक हिंदी वृत्तपत्र समूह मराठी वृत्तपत्र घेऊन महाराष्ट्रात आल्याने या स्पर्धेत आणखीच वाढ झाली. याशिवाय अन्य काही वर्तमानपत्रेही येथे येऊ घातल्याने पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचा:यांची मजा झाली आहे. आतापर्यंत 'यांना तुसळेपणाने वागविले जात होते अशां'या पाठीवरून आता अचानक हात फिरवूनही उपयोग होत नसल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत. पत्रकार म्हणून काम करणा:या बहुतांश मंडळींना पैसा ही बाब गौण असते. त्यां'यामध्ये असणारा ÓरहेमानÓ त्यांना चूप बसू देत नाही म्हणून ते या क्षेत्रात आलेले असतात. अशा मंडळींना धन मिळाले नाही तरी चालते, पण मानाची अपेक्षा असते. त्यांचा वेळोवेळी मानभंग होत असेल तर मात्र ते धनाची पर्वा न करता संबंधित व्यवस्थापनाला पाठ दाखविल्याशिवाय राहत नाहीत. पत्रकारांशिवाय उत्कृष्ट काम करणारे ऑपरेटर, व्याकरणा'या चुका काढणारे मुद्रितशोधक, वितरणामध्ये काम करणारी आवड असणारी मंडळी आणि 'या विभागावर वर्तमानपत्राची आर्थिक बाजू भक्कम करण्याची जबाबदारी असते त्या जाहिरात विभागात काम करणारी Óस्मार्टÓ मंडळी शोधता शोधता आता सर्वां'या नाकानऊ येणार आहे. बोटावर मोजण्याइतकी प्रत्येक शहरातील किंवा जिल्ह्यातील ही मंडळी आता गेल्या अनेक वर्षांपासून यां'यावर होत असलेल्या अन्यायाचा सूड उगविण्यासाठी स'ज आहे. अगोदर व्यवस्थापन वेतन ठरवायचे व कामगार मान डोलवायचे, आता कामगार आकडा सांगतात आणि व्यवस्थापन मान डोलवते हा कामगारांचा विजय आहे. 
अॅड.सुधाकर खुमकर
मो.८८८८८  ४२४५७
(लेखक हे सिटी न्यूज सुपरफास्टचे संपादक असून, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेत.)

फेसबुक वर शेअर करा

Facebook