> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३० जुलै, २०१३

मजीठिया आयोगाची अंमलबजावणी तर सोडा...आता आहे ती नोकरी गमवा....

अकोला - वृत्तपत्र कर्मचा-यांना मजीठिया आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिल्यानंतर वृत्तपत्र मालकांनी ही वेतनश्रेणी देण्याऐवजी जे कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त आहेत,त्यांचे राजीनामे घेवून, त्याना करार पध्दतीने घेण्यासाठी दबाब आणत आहेत.या दबाबतंत्राची सुरूवात दर्डा शेठनी अकोल्यापासून सुरू केली आहे.
मजीठिया आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी देण्याची अंतिम मुदत सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे.या वेतनश्रेणीचा लाभ लोकमतच्या अनेक कर्मचा-यांना मिळू शकतो.सध्या स्पर्धा असल्यामुळे संपादकीय विभाग सोडून,अन्य विभाग (प्रॉडक्शन,वितरण,जाहिरात)मध्ये जे कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त आहेत,त्यांचे राजीनामे घेवून,त्यांना करार पध्दतीने काम करण्यास दबाब आणण्यात येत आहे.अकोला लोकमतमध्ये जवळपास १२५ कर्मचारी या आयोगासाठी पात्र आहेत,त्यापैकी ७५ कर्मचा-यांना राजीनामे मागण्यात आले आहेत.मात्र राजीनामा देण्यास कर्मचा-यांनी नकार दिल्याने मालक विरूध्द कर्मचारी असा संघर्ष अकोला लोकमतमध्ये सुरू झाला आहे.
राजीनामा घेण्यासाठी दर्डा शेठचे राईट हॅन्ड बालाजी मुळे तथा एम.बालाजी सध्या अकोल्यात तळ ठोकून आहेत.मात्र एकाही कर्मचा-यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही.अकोल्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास दर्डा शेठ संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबविणार आहेत.
हे दबाबतंत्र हळू हळू अन्य वृत्तपत्रांतही येणार आहे.कारण मजीठिया आयोगात घसघसीत पगारवाढ सुचविण्यात येणार आहे.


दर्डा शेठचे नवे तंत्र...राजीनामा द्या नाही तर...
मजीठिया आयोगाची अंमलबजावणी करण्याऐवजी दर्डा शेठनी आता नवे दबावतंत्र अवलंबविले आहे...बऱ्या बोलाने राजीनामा द्या नाही तर मुंबई किंवा पणजीला बदली करू,असा दम देण्यात येत आहे.या दबावतंत्राला आता काही जण बळी पडत आहेत.
 अकोला लोकमत मध्ये मागील पंधरा वर्षापासून चालक पदावर काम करणाऱ्या अरुण नामक कर्मचाऱ्याला राजीनामा देणे भाग पाडले . राजीनामा देणार नसाल तर गोव्याला बदली करू अशी दमदाटी दिली , परिणामी अरुण ने मजबुरीने राजीनामा दिला .


तेव्हा वृत्तपत्र कर्मचा-यांनो सावधान...एकत्र या...म्हातारी मेल्याचे दु:ख नाही,काळ सोकावतोय....

सोमवार, २२ जुलै, २०१३

मालकांनो, 'बेरक्या'ची भूमिका तुमच्याविरोधात मुळीच नाही!

गेल्या काही दिवसातील 'बेरक्या'त अपडेट होणाऱ्या बातम्यांवरून मीडियातील काही मंडळी जाणूनबुजून मालक-व्यवस्थापनाचा असा गैरसमज करून देत आहेत, की 'बेरक्या' त्यांच्याविरोधात आहे. मात्र, आम्ही तमाम मालकमंडळीस खुल्या दिलाने, जाहीरपणे सांगतो की 'बेरक्या' ही काही मालकांविरोधातील चळवळ नाही. 

एखादी संस्था, ब्रांड उभी करतांना मालकास किती कष्ट उपसावे लागतात, किती तडजोडी कराव्या लागतात, किती त्याग करावे लागतात त्याची कल्पना पगारदार नोकरास कधीही येणार नाही. त्यासाठी पिढ्या खपतात, हयात घालवावी लागते, कुटुंबापेक्षा संस्था मोठी मानून झोकून देवून घड्याळ्याच्या तासांपलीकडे काम करावे लागते. 'लोकमत'साठी राजेंद्र दर्डा यांनी सुरुवातीच्या संपाच्या काळात तब्बल २० दिवस प्लेटा ते गठ्ठे उचलणे सर्व काही केले. अगदी काल-परवा छिंदवाडा आवृत्ती प्रकाशनालाच कामगारांनी असहकार पुकारला. तेव्हा पगारी नोकर कामास आले नाहीत. स्वत: विजय दर्डा यांना सारे काही सांभाळावे लागले. रमेशचंद्र अग्रवाल यांनी 'भास्कर' कसा वाढविला, किती यातना भोगल्या ते सारेच जाणून आहेत. 'देशोन्नती'चे प्रकाश पोहरे, 'पुढारी'चे प्रतापराव जाधव, 'गांवकरी'चा पोतनीस परिवार, 'प्रहार'चे नारायणराव राणे, 'वास्ट मीडिया'चे! अभिजित राणे, 'तरुण भारत'वाला परिवार, तिकडे 'बेळगाव तभा'चे किरण ठाकूर, गोव्यातील 'सत्यप्रभा'चे नाईक, 'कृषीवल'चे जयंतराव पाटील अशी एक ना अनेक किती नावे घ्यावीत. या मालकांच्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे. पत्रकारितेतील पगारदार नोकर जेव्हा मालकाच्या भूमिकेत शिरून निर्णय घ्यायला लागतील तेव्हा कुठेही कोणतीही कटुता, खुन्नस, काटा-काटी असे प्रकार होणार नाहीत. 'ब्रांड'चाच विचार, 'ब्रांड'चेच हित जपले जाईल.

मराठी पत्रकारितेत आज जे काही सर्वत्र चाललेय त्यात मालकांचा थेट सहभाग आहे तरी किती? फारतर ५-१० टक्के! पगारदारांवर विश्वासाने सारे काही सोपविल्यावर दैनंदिन निर्णयप्रक्रियेत मालक कुठे नसतोच. मात्र ज्या विश्वासाने हे अधिकार बहाल केले जातात त्याच निरपेक्ष, तटस्थ भावनेने ते राबविले जात नाहीत. अनेकदा त्याचा गैरवापर होतो. कधीकधी तर यातून माणसे कोलमडून पडतात, उद्ध्वस्त होतात. 'बेरक्या' कुणाला उद्ध्वस्त होउ देणार नाही आणि कुणाला उद्ध्वस्त करण्यासाठी 'बाहुले' म्हणूनही वापरला जाणार नाही.

सातत्याने पत्रकारांचा पाठीराखा बनून राहणे, त्यांच्या हितांची जपणूक करणे हेच 'बेरक्या'चे धोरण आहे, तीच त्याची भूमिका आहे. पत्रकारांवर थेट मालकांकडून अन्याय होण्याचे प्रमाण हे अगोदरच सांगितल्यानुसार, अवघे ५ ते १० टक्के आहे. अनेकदा तर त्यांना काही चुकीचे घडतेय याची कल्पनाही नसते व ते पूर्णत: अंधारात असतात. त्यामुळे मालकांनी  'बेरक्या' त्यांच्याविरोधात आहे, असा चुकूनही ग्रह करून घेवू नये, अशी आमची नम्र विनंती आहे. 

जो कुणी चुकीचे करतोय त्याला आवरणे, त्याच्या चुका लक्षात आणून देणे व न्यायाच्या भूमिकेचा पुरस्कार करणे यासाठी ही 'बेरक्या'ची धडपड आहे. त्यात आमच्या हाती काहीच लागत नाही. उलट अनेकांचे हित साधले जाते, जपले जाते. 

'बेरक्या'ची चळवळ ही व्यक्तींविरुद्ध मुळीच नाही. आम्ही व्यक्तींच्या नव्हे तर प्रवृत्तींच्या विरोधात आहोत. कारण प्रवृत्ती कुठल्याही कारणाने का असेना वाईट वळणावर गेली की, सारासार विवेक गमावला जातो आणि विवेकहीन माणूस प्रत्यक्षात कितीही चांगला असला तरी तो इतरांना उद्ध्वस्त करू पाहतो. म्हणूनच आम्ही पुनश्च एकदा सांगतो, 'बेरक्या' कुणाला उद्ध्वस्त होउ देणार नाही. पत्रकारांच्या हितांची जपणूक, सत्याचा शोध आणि नाठाळांच्या माथी काठी हाणणे नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, याची मात्र आम्ही १०० टक्के खात्री देतो. 

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी चंद्रशेखर बेहेरे

मुंबई - पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या आणि मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणा़ऱ्या  मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नंदूरबार येथील तापीकाठ दैनिकाचे संपादक चंद्रशेखर   बेहेरे यांची तर सरचिटणीसपदी माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक अधिकारी विजय पवार यांनी सोमवारी  या निकालांची मुंबई येथे घोषणा केली..ही निवड दोन वर्षांसाठी आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे व्दैवार्षिक अधिवेशन 24 आणि25 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होत आहे.या अधिवेशनात नवे पदाधिकारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील.परिषदेच्या घटनेनुसार विद्यमान कार्याध्यक्ष किरण नाईक 1 सप्टेंबरपासून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.परिषदेच्या कोषाध्यक्ष आणि अन्य पदांच्या नेमणुका नंतर जाहीर करण्यात येतील असे परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.चेंद्रशेखर बेहेरे गेले अनेक वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून तापीकाठ हे नंदूरबारमधील लोकप्रिय दैनिक ते चालवतात.त्यांच्या मालकीचे लोकल न्यूज चॅनलही आहे.नंदूरबार जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.संतोष पवार हे माथेरान येथील सकाळ दैनिकाचे वार्ताहर आहेत.गेली वीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या पवार यांनी रायगड जिल्हयात पत्रकारांचे भक्कम संघटन उभे केले आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाच्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.रायगड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे ते निमंत्रक असून माथेरान नगरपालिकेची ते नगरसेवकही आहेत.त्यांच्या निवडीने रायगडमधील पत्रकारांनी आनंद व्यक्त केला आहे.
परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख परिषदेचे विद्यमान कार्याध्यक्ष किरण नाईक,विध्यमान सरचिटणीस सिध्दार्थ शर्मा,सुभाष भारव्दाज,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शऱद पाभळे,शरद वाळुंज यांनी बेहेरे आणि संतोष पवार यांचे अभिनंदन केले आहे.

बुधवार, १७ जुलै, २०१३

निखिल वागळे झाले शकुनीमामा....

प्रशांत कोरटकर

नागपूर -आय.बी.एन.- लोकमत सोडून जय महाराष्ट्रमध्ये गेलेले नागपूर ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर आणि वाशिमचे स्ट्रिंजर रिपोर्टर मनोज जैस्वाल यांना मिळालेला इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंका फौंडेशनचा 'रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार' रद्द करण्यात आला आहे.हा पुरस्कार रद्द करण्यामागे निखिल वागळे यांनी शकुनीमामांची भूमिका बजावली.
प्रशांत कोरटकर आणि मनोज जैस्वाल हे आय.बी.एन-लोकमतमध्ये असताना एक सामाजिक स्टोरी केली होती.या स्टोरीला दिल्लीच्या रामनाथ गोयंका फौडेशनचा पुरस्कार काही दिवसांपुर्वी जाहीर झाला होता.तो पुरस्कार वितरणाच्या आदल्या दिवशी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.यामागे निखिल वागळे यांच्या तक्रारीमुळे हा पुरस्कार रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.शेखर गुप्ता आणि वागळेंच्यात गुप्त चर्चा होवून हा निर्णय घेण्यात आला.
कोरटकर आणि जैस्वाल हे  आता आय.बी.एन.-लोकमतमध्ये नाहीत,हा पुरस्कार केवळ आय.बी.एन.-लोकमतमुळे मिळाला होता,अशी काव-काव करून,वागळेंनी पुरस्कार रद्द करून आपण किती कोयत्त्या मनाचे आहोत,हे दाखवून दिले.एखाद्याला पुरस्कार देवून,तो रद्द करणे,हे इंडियन एक्स्प्रेसच्या नियमात बसते का,हे विचारण्याची वेळ आली आहे.पुरस्कार देताना या बाबीचा का विचार केला गेला नार्ही,असा प्रश्न विचारला जात आहे.

मनोज जैस्वाल
पुरस्कार देताना,संबधित वृत्तपत्र अथवा चॅनलच्या संपादकाचे शिफारस पत्र मागविण्यात येते,मग का मागविण्यात आले नाही.वागळे दक्षिण अफ्रिकेच्या दौ-यावर गेले होते,आल्यानंतर त्यांनी  हा पहिला उद्योग केला.आय.बी.एन.-लोकमतवर शिवसेनेने हल्ला केल्यानंतर,पत्रकार संरक्षण हक्काबाबत आरडा-ओरड करणारे वागळे की बगळे,पत्रकारांचा हक्क का हिरावत आहेत.
प्रिंट मीडियात अनेक जण इकडून - तिकडून जातात...नव्या वृत्तपत्रात काम करीत असताना,जुन्या वृत्तपत्राच्या कामगिरीवर अनेकांना पुरस्कार मिळालेला आहे,मात्र चॅनलला वेगळा नियम लावला जात आहे का?
धन्य ते वागळे आणि धन्य ते पुरस्कार देणारे इंडियन एक्स्प्रेसवाले...
कोरटकर आणि जैस्वाल,तुम्ही इंडियन एक्स्प्रेसच्या रामनाथ गोयंका फौंडेशनच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करा...आमच्यासह राज्यातील पत्रकार तुमच्या पाठीशी आहेत...

 टोच्या

Photo: 1972 मध्ये 'पिंजरा' हा मराठी चित्रपट खूप गाजला होता.हा चित्रपट अजूनही लोक खूप आवडीने पाहतात...या गाजलेल्या 'पिंजरा' चित्रपटात नायिका संध्याचा एक डॉयलॉग आहे...
लोक तमाशा फडावर जावून विचारतात, इथं मास्तर आले होते का ? 
तेव्हा नायिका आपल्या खास स्टाईलमध्ये म्हणते, अगं बाई,सांगणाऱ्यानं कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी कसं ऐकलं ?

सारांश - नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा जो पुरस्कार रद्द झाला,त्यावरून संध्याचा हा डॉयलॉग आठवला...वागळे यांनी कसे काय सांगितले आणि शेखर गुप्ताने कसे काय ऐकले...
एक मुर्ख तर दुसरा महामुर्ख....
काय मंडळी बरोबर आहे ना....1972 मध्ये 'पिंजरा' हा मराठी चित्रपट खूप गाजला होता.हा चित्रपट अजूनही लोक खूप आवडीने पाहतात...या गाजलेल्या 'पिंजरा' चित्रपटात नायिका संध्याचा एक डॉयलॉग आहे...
लोक तमाशा फडावर जावून विचारतात, इथं मास्तर आले होते का ?
तेव्हा नायिका आपल्या खास स्टाईलमध्ये म्हणते, अगं बाई,सांगणाऱ्यानं कसं सांगितलं आणि ऐकणाऱ्यांनी कसं ऐकलं ?

सारांश - नागपूरचे प्रशांत कोरटकर यांचा जो पुरस्कार रद्द झाला,त्यावरून संध्याचा हा डॉयलॉग आठवला...वागळे यांनी कसे काय सांगितले आणि शेखर गुप्ताने कसे काय ऐकले...
एक मुर्ख तर दुसरा महामुर्ख....
काय मंडळी बरोबर आहे ना....

मंगळवार, १६ जुलै, २०१३

सांगलीचा 'वस्ताद' येतोय...

सांगली हे शहर पैलवानासाठी प्रसिध्द आहे.या भागातील अनेक पैलवान महाराष्ट्र केसरी ठरले आहेत.पैलावानांच्या गुरूला वस्ताद म्हटले जाते.(वस्ताद म्हणजे वरचढ हाही अर्थ घेतला जातो आणि एक शिवीही आहे.)हेच नाव घेवून कवठे- महाकांळचे उद्योगपती माधव कुलकर्णी  वस्ताद नावाचा पेपर सुरू करीत आहेत.हे कुलकर्णी मोठे उद्योगपती असून,त्यांचा साखर कारखान्याला मशिनरी पुरविण्याचा उद्योग आहे.ते आबाचे कट्टर समर्थक असल्याचे सांगितले जाते.आबाचा आशिर्वाद असल्यामुळे या पेपरकडे पत्रकारांच्या नजरा वळल्या आहेत.
या वस्ताद पेपरमध्ये या भागातील वृत्तपत्रातील वस्ताद पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांच्या पुढारीतील अनेकजण पुढारी सोडून वस्तादमध्ये जात आहेत.वस्तादमुळे पुढारी खाली होत असून,वस्तादने लॉचिगपुर्वीच पुढारीवर अनेक डाव टाकले आहेत.सकाळचे माजी संपादकीय प्रमुख सुधीर कुलकर्णी यांच्यावर या पेपरची सध्या जबाबदारी टाकण्यात आली आहे.उद्योगपती माधव कुलकर्णी यांनी हा पेपर आपल्या मुलीच्या हट्टापायी काढल्याचे सांगितले जात आहे.किमान दोन वर्षे खर्च देण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे.वस्ताद किमान १२ पानी रंगीत वृत्तपत्र असणार असून,सांगली आणि कोल्हापूर अशा दोन आवृत्त्या निघणार आहेत.छपाई कोल्हापूरात होणार आहे.(जिथे व्हिजन वार्ताची छपाई केली जात होती.)
सांगली - कोल्हापूरमध्ये आता या वस्तादमुळे दोन वस्तादमधील लढत पहावयास मिळणार आहे...या लढतीवर बेरक्याचे बारीक लक्ष आहे.

रविवार, १४ जुलै, २०१३

नगरमध्ये सायंदैनिके मिळतात फुकट....

 नगर ही संताची तशी आता वृत्तपत्रांची भूमी होते की काय?नगरमध्ये लवकरच सुरू होत आणखी एक सायं दैनिक...सुभाष चिंधे आणि सुभाष मुदगल यांनी काढला हा पेपर.. सायंदैनिकांची संख्या वाढल्याने त्यांच्यात खपाची स्पर्धा सुरू झाली आहे. जाहिराती टिकवून ठेवण्यासाठी खपाचे आकडे वाढविणे आवश्यक ठरते. त्यामुळे बहुतेक सायंदैनिके फुकट वाटली जात आहेत. नव्याने आलेल्या सायंदैनिकांसोबतच जुन्या प्रस्थापित सायंदैनिकांनाही फुकट वाटप करावे लागत आहे.
 

सायं दैनिकांनध्ये सध्या अशोक सोनवणे सम्राट होऊ पाहत आहेत. त्यांचा पूर्वी लोकमंथन पेपर आहे. आता समर्थनगरी नावाचा पेपर काढला आहे. फुकट वाटप त्यामुळेच सुरू झाले आहे.सोनवणे यांना निवडणूक लढवायची आहे. सध्याचे शिवसेना आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात रान पेटविण्यासाठी ते सायंदैनिकाचा वापर करू इच्छितात.
श्रीरामपूरमध्ये तर दीडशेहून अधिक साप्ताहिके आहेत. तेथे असे म्हणतात की जर पाच जण पुढे चालले असले, आणि पाठामागून कोणी अहो पत्रकार असा आवाज दिला तर त्यातील तिघे मागे वळून पाहतात.

नगरच्या पेपरमध्ये एकूण सगळीत चमकोगिरी सुरू आहे. येथे पगार आणि पगारवाढ यांची चिंता असलेले खूप थोडे पत्रकार शिल्लक आहेत. बाकीच्यांना कशाच काही देणेघेणे नाही. यातील निम्मे लोक हाैस म्हणून पत्रकार झाले आहेत तर काही आपले इतर धंदे सुरू ठेवण्यासाठी...


एक काळ असा होता की नगरची पत्रकारिता जागृत मानली जायची. त्यामुळे शरद पवारां सारखे नेते सुद्धा नगरच्या पत्रकारांना कधी टाळत नव्हते. 

शनिवार, १३ जुलै, २०१३

‘दिव्य मराठी’च्या अकोला आवृत्तीचे थाटात लोकार्पण


अकोला - विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. दैनिक दिव्य मराठीच्या राज्यातील सहाव्या आणि विदर्भातील पहिल्या अकोला आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.  प्रमिलाताई ओक सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अकोलेकरांनी ‘दिव्य मराठी‘वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
दैनिक भास्कर देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह आहे. हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी या चार भाषांमध्ये वृत्तपत्र प्रकाशित करीत ‘दिव्य मराठी’ने वृत्तपत्र क्षेत्रातील आपले स्थान बळकट केल्याचे देशमुख म्हणाले. विदर्भाच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच विकासात वृत्तपत्रांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.

व्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर, भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, संचालक सुमीत अग्रवाल, बिझनेस स्टेट हेड निशित जैन, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार वसंतराव खोटरे उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’तर्फे प्रमुख पाहुण्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी केले, तर निवासी संपादक प्रेमदास राठोड यांनी आभार मानले. या प्रसंगी मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नागपूर ते अकोल्याचे अंतर कमी व्हावे- रमेशचंद्र अग्रवाल
अकोल्याचा विकास करायचा असेल, तर अकोल्याहून नागपूर तीन तासांत गाठता यायला हवे. सध्याच्या काळात जग किलोमीटरवर नव्हे, तर घड्याळाच्या काट्यावर चालते. त्यामुळे नागपूरहून येण्यासाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता आहे. येथील विमानतळाचा विकास करण्याची गरज आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील उज्जैन, सागरप्रमाणे येथे हवाई प्रशिक्षण अकादमी सुरू करावी.  जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांनी ते स्वत: पायलट असल्याचे सांगितले, तसेच खासदार आनंदराव अडसूळ हे पायलटचे वडील आहेत. त्यांनीही या कामासाठी पुढाकार घ्यावा.  1999 पासून दैनिक भास्कर नंबर वनवर आहे. भास्कर समूहाने जनतेला दिलेली वचने पूर्ण केली आहेत. त्यामुळे हे वृत्तपत्र नंबर वनवर आहे. सूर्य जसा प्रकाश देण्यासाठी कोणताही भेदभाव करीत नाही, तसे दैनिक भास्कर समूहातील दैनिक दिव्य मराठीदेखील वाचकांशी भेदभाव करणार नाही. केवळ वर्तमानपत्र काढणे हा आमचा उद्देश नसून, अकोल्याचा विकास व्हावा, नागरिकांचा आवाज बुलंद व्हावा, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.

वृत्तपत्रांचे स्थान अजूनही अबाधित - कुमार केतकर
भारतात सर्वाधिक वृत्तवाहिन्या आहेत. त्यावर बातम्यांचा अखंड प्रवाह सुरू असतो. मात्र, तिथे आवडीची बातमी पाहण्यासाठी वाट बघावी लागते. आयपॅड, फोनवर बातम्यांचे विश्लेषण येत नाही,  त्यासाठी वर्तमानपत्र महत्त्वाचे माध्यम आहे, तसेच त्याचे स्थान अबाधित आहे.  बातमीमागची बातमी, घटनेचे निरूपण, भविष्याचा वेध वृत्तपत्रात घेता येतो. यामुळे अद्यापही वाचकांच्या मनात वृत्तपत्रांविषयी अनन्यसाधारण महत्त्व आहे. खासगी वाहिन्यांच्या आगमनाच्या काळात म्हणजेच  1992 मध्ये दैनिक भास्करची भरभराट झाली. वाहिन्यांवरील बातम्यांमुळे समाधान होत नाही, कारण वाहिन्यांवर चॉइस नाही. गाव, शहर आणि जिल्ह्यातील बित्तंबातमी दूरचित्रवाणीवर आली तरी तो बातमीचा छोटा ट्रेलर असतो, त्यामुळे नागरिक बातम्यांसाठी वृत्तपत्राची प्रतीक्षा करतात. दैनिक दिव्य मराठीमध्ये वाचकांच्या तक्रारी, हरकती, सूचना आणि अपेक्षांची दखल घेतली जाईल, असे केतकर म्हणाले.

अकोला अपडेट ...

अकोला - दिव्य मराठीला लॉचिंगच्या दिवशीच दणका
देशोन्नतीतून दिव्य मराठीत गेलेले उपसंपादक आशिष गावंडे आणि सचिन राऊत लोकमतमध्ये
निवासी संपादक रवी टाले आणि गजानन जानभोर यांचा दिव्यला दणका
जागभोर गेल्या चार दिवसांपासून अकोल्यात ठाण मांडून

अकोला - दिव्य मराठीच्या अकोला आवृत्तीचे शानदार प्रकाशन
महापौर ज्योस्नाताई गवई यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळे दलित समाजात नाराजी
महापौराचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळल्याने प्रकाश आंबेडकर यांची कार्यक्रमाकडे पाठ
निवासी संपादक प्रेमदास राठोड यांना व्यासपीठावर बसविले नाही...
दै.देशोन्नतीचे संपादक श्री.प्रकाश  पोहरे लिखीत "सिंघम" प्रहार हे पुस्तक देशोन्नतीच्या  सर्व आवृत्त्यांमध्ये  कर्मचार्याना वाटण्यात आले आहे.  त्यांच्याकडून सक्तीने प्रत्येकी 70 रूपये शुल्क आकारण्यात आल्याने कर्मचार्यामध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. त्यावर भर म्हणून प्रत्येक कर्मचार्याला प्रत्येकी 10 पुस्तके जादा देवून विक्री करण्यास सांगण्यात आले असून त्यांना सेल्समन बनवून सोडले आहे. त्यात जळगाव आवृतीचे चित्र वेगळेच असून काहींना 100 रूपयांमधील 30 रूपये देखील परत करण्यात आले नाहीत.…

शुक्रवार, १२ जुलै, २०१३

ध्येयापासून मीडिया आणि राजकारण्यांनी भटकू नये

छिंदवाडा : लोकमत समाचारच्या सातव्या आवृत्तीचे आज छिंदवाडा येथे शानदार सोहळ्यात लोकार्पण झाले. लोकमत समूहाने या २१ व्या आवृत्तीसह मध्यप्रदेशात पर्दापण केले.
याप्रसंगी 'सामान्य जनतेच्या विकासात राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमांची भूमिका' या विषयावरील आयोजित परिसंवादात मान्यवर सहभागी झाले होते. सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या ध्येयापासून प्रसिद्धी माध्यमे आणि राजकारण भटकत असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
छिंदवाड्याचे आपले एक विश्‍व आहे. भोपाळ हे छिंदवाडा बनू शकत नाही; पण छिंदवाडा हे भोपाळ बनू शकते. आताचा छिंदवाडा ८0 च्या दशकातील राहिलेला नाही. येथील लोकांचे विचार बदलले आहेत. त्यांना विकासाचे महत्त्व कळले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले. ते लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. छिंदवाडा येथून लोकमत समाचार सुरू करण्याचा निर्णय योग्यवेळी उचललेले योग्य पाऊल असल्याचे ते म्हणाले. पंकज चित्रपटगृहात आयोजित लोकार्पण सोहळ्यात लोकमत समाचारच्या छिंदवाडा आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ, राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर प्रसाद, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकमत समूहाचे सीएमडी व खासदार विजय दर्डा, महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आज तकचे कार्यकारी संपादक पुण्यप्रसून वाजपेयी आणि आयबीएन-७ चे मॅनेजिंग एडिटर आशुतोष उपस्थित होते. लोकार्पणप्रसंगी लोकमत समाचारचे संपादकीय संचालक व संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कार्यकारी संचालक करण दर्डा, संपादक विकास मिश्र, प्रॉडक्ट हेड मतीन खान, स्थानिक संपादक देवेश ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर मंडळी उपस्थिती होती.
समाजात समानता प्रदान करण्याचे प्रयत्न राजकारणातून होत आहेत. प्रसिद्धी माध्यमे या कार्यात सेतूप्रमाणे भूमिका निभावत आहेत. या कार्यात मीडिया आणि राजकीय नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
मीडिया व राजकारण यांना पुढे यावे लागेल- आशुतोष
१९५0 नंतर देशात गतीने परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन तंत्रज्ञानाने नव्हे तर लोकांच्या विचाराने शक्य झाले आहे, असे आयबीएन-७ चे मॅनेजिंग एडिटर आशुतोष म्हणाले. हिंदी भाषेला महत्त्व द्यावे लागेल -विजय दर्डा
 
■ लोकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे हे प्रसिद्धी माध्यमांचे मुख्य ध्येय आहे. देशाला जोडण्यासाठी हिंदी भाषेला महत्त्व द्यावे लागेल. हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मध्यप्रदेशात पहिली आवृत्ती छिंदवाडा येथून सुरू करण्यात आली, असे लोकमत मीडिया प्रा. लि.चे एडिटर-इन-चीफ विजय दर्डा म्हणाले.
दोन दशकांत परिवर्तन- राजेंद्र दर्डा
■ गेल्या दोन दशकांत राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतात राजकारण आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्यात सामंजस्य होते. ते आता दिसत नाही, असे महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले.
देशाप्रति जनतेत नैराश्य नाही - रविशंकर प्रसाद
 
■ प्रसिद्धी माध्यमे जोपर्यंत लोकांचे दु:ख, वेदना, उत्कंठा समजणार नाही तोपर्यंत सामान्य जनतेत आपले स्थान निर्माण करू शकणार नाही. देशाप्रति प्रसिद्धी माध्यमे आणि राजकीय पुढार्‍यांमध्ये नैराश्य आहे; पण जनतेत ते दिसत नाही, असे राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर प्रसाद म्हणाले. मीडियाने निष्पक्ष राहावे - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

जनतेशी संपर्क तुटला -पुण्यप्रसून वाजपेयी
सहकार्याचे राजकारण संपले आहे. राजकीय नेते आणि जनतेचा संपर्क तुटला आहे. नेते नेहमी जनतेचा वापर करीत असतात, असे आज तकचे कार्यकारी संपादक पुण्यप्रसून वाजपेयी म्हणाले.

अकोल्यात वृत्तपत्रांचा रणसंग्राम

अकोला ( सुधाकर खुमकर) - येणार ... येणार म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या एका नव्या वर्तमान पत्राचे अकोल्यात आगमन झाले असून १३ जुलै रोजी अधिकृत सोहळा पार पडल्यानंतर १४ जुलैपासून या मराठी वर्तमान पत्राचा अंक वाचकां'या हातात पडणार आहे. या वर्तमान पत्राने सुरू केलेल्या किंमत युद्घाचा लाभ वाचकांना होणार असून वेतना'या बाबतीत पत्रकारांचेही चांगभले होत आहे.
दैनिक भास्कर समुहाचे मराठी वृत्तपत्र दैनिक दिव्य मराठी'या आगमनाने वर्तमानपत्र सृष्टीत चांगलीच उलथापालथ झाली आहे. या समुहाने जवळपास तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठी पाउल टाकले. औरंगाबादपासून शुभारंभाची मुहुर्तमेढ रोवत नाशिक, जळगाव, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये स्वतंत्र आवृत्या सुरू करून या समुहाने आता विदर्भात पाय ठेवला आहे. 'जाऊ तेथे क्रमांक १ होऊ' असा दावा करणा:या या मराठी वृत्तपत्राने प्रत्येक ठिकाणी दैनिक लोकमतला लक्ष केले. अकोल्यातही दिव्य मराठी विरूद्घ लोकमत असा सामना रंगणार असून १३ जुलै रोजी या सामन्याचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. प्रमिलाताई ओक सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित या समारंभाला भास्कर समुहाचे चेअरमन श्री रमेशचंद्र अग्रवाल उपस्थित राहणार असून विशेष अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.अनिल देशमुख, रोजगार हमी योजना मंत्री ना.नितिन राऊत, खा.आनंदराव अडसूळ, खा.संजय धोत्रे आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे. पाच पक्षांचे पाच नेते उद्घाटनासाठी बोलावून या नव्या वृत्तपत्राने आपल्याला सर्व पक्ष सारखे असल्याचा संदेश दिला असून कार्यक्रमाची नावाप्रमाणे दिव्य पत्रिका आकर्षण ठरत आहे. निवासी संपादक प्रेमदास राठोड आणि युनिट हेड संजयकुमार यादव यांची पत्रिके'या शेवटी विनित म्हणून नावे असून १४ जुलैपासून वाचकां'या हातात प्रत्यक्ष अंक पडणार आहे.
या वृत्तपत्राची अकोला आगमनाची चाहूल लागताच महिनाभरापूर्वीच लोकमतने जोरदार मोर्चे बांधणी केली. लोकमतनेही आपली किंमत शहरात दोन रूपये केली असून वेगवेगळ्या योजनाही सुरू केल्या आहेत. परिणामी लोकमतचे दहा ते पंधरा हजार अंक वाढले असून त्यां'यापेक्षा जास्त आकडा गाठण्यासाठी दिव्य मराठीची कसरत सुरू आहे. लोकमत'या निवासी संपादकपदी या क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुभवी रवि टाले रूजू झाल्याने लोकमत व्यवस्थापन निश्चिंत असले तरी ही लढाई जोरदार होण्याचे संकेत आहेत. दिव्य मराठीने दोन महिन्यांपासून संपूर्ण शहर पिंजून काढत आपल्या अंकासाठी वार्षिक बुकींग केले. शंभर रूपयात बुकींग करताना दर महिन्याला वितरका'या हातात वाचकाला ६० रूपये द्यावे लागतील. लोकमतचेही बील ६० रूपयेच होणार असल्याने या दोन वर्तमानपत्रांमधील लढत पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. वाचकांना भरपूर पानांचे हे अंक दोन रूपयांत उपलब्ध होणार असल्याने अन्य वर्तमान पत्रांची स्थिती काय होईल हे सांगणे सध्या कठिण असले तरी १४ जुलै पासून आकडेवारीचा खेळ सुरू होणार आहे.
किंमत युद्घात वाचकांचा फायदा होण्याबरोबरच पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचा:यांचेही भाग्य उजळले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शोषण झालेल्या कर्मचा:यांना या युद्घात आपल्या कामाचे दाम मिळत असल्याने त्यां'यातही आनंदाचे वातावरण आहे. काहींनी माणसे ओढण्यात, फोडण्यात बाजी मारली असून आपली माणसे थांबवून ठेवण्यासाठी काहींची कसरत होत आहे. काहींनी तर युद्घापूर्वी शस्त्रे खाली ठेवली असून या लढाईत आपण पासंगालाही पुरणार नसल्याचे दाखवून दिले आहे.


( सिटीन्यूज सुपरफास्ट)

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला...

जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टरचे मानधन थकविल्याची बातमी बेरक्याने दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून रिपोर्टंरना धनादेश येण्यास सुरूवात झाली आहे.तरीही अजून बहुतांश रिपोर्टरना धनादेश मिळाले नाहीत.
संतापजनक बाब म्हणजे, त्यांना अत्यंत कमी मानधन देण्यात आले आहे.खान्देशातील एक रिपोर्टर चांगली नोकरी सोडून जय महाराष्ट्रमध्ये आला.त्याला 45 स्टोरीचे बिल केवळ 8500 मिळाले.याचा अर्थ एका स्टोरीला 200 रूपये सुध्दा मिळाले नाहीत.हीच अवस्था सर्व रिपोर्टरची आहे.100 ते 150 किलो मीटर रास्ता कापून, काम करायचे आणि हातात तोकडे मानधन पाहून हे काय,आपण कशासाठी काम करीत आहोत,असा प्रश्न त्यांना पडला आहे.जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा मालक करोडपती आहे म्हणे...दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी दिल्याचा उदो उदो त्यांनी केला होता.मात्र कष्ट करणाऱ्या रिपोर्टरना मानधन देत नाही,दिले तर किती देतो,हे म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला,असे आहे.
मानधन कमी मिळाल्यामुळे स्ट्रिंजर रिपोर्टरमध्ये संताप व्यक्त केला जात असून,अनेक स्ट्रिंजर दुसऱ्या चॅनलच्या शोधात आहेत.

मंगळवार, ९ जुलै, २०१३

देवदास मटाले यांचे अभिनंदन...

मुंबई - अखिल भारतीय राठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी.शेख यांनी आज (०९ जुलै रोजी) मुंबई येथील आजाद पत्रकार भवनात जाऊन मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाह प्रमोद तेंडुलकर, संयुक्त कार्यवाह रविंद्र खांडेकर, कोषाध्यक्ष दीपक म्हात्रे आणि कार्यकारिणी सदस्य दीपक परब आदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी दै.बंधुप्रेमचे पुणे आवृत्तीचे संपादक इर्फान एम.शेख हेही उपस्थित होते. हाजी एम.डी.शेख यांनी यावेळी श्री.मटाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतानाच मुंबई मराठी पत्रकार संघाला अखिल भारतीय राठी पत्रकार परिषदेचे संपूर्ण सहकार्य देण्याचे मान्य केले.

सोमवार, ८ जुलै, २०१३

‘दिव्य मराठी’ औरंगाबाद, नाशिक, जळगावचा शासनमान्य जाहिरात यादीत ‘अ’ श्रेणीत समावेश


पुणे, कोल्हापूर, औरांगाबाद, लातूर, नाशिक, नागपूर, अमरावती व कोकण विभागातील 95 वृत्तपत्रे/ नियतकालिके यांचा नव्याने शासनाच्या जाहिरात यादीत समावेश करण्यास शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार, 95 पैकी राज्यातील फक्त चार वृत्तपत्रे ‘अ’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यात ‘दिव्य मराठी’च्या औरंगाबाद, नाशिक आणि जळगाव आवृत्त्यांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील लाईफ-365 या इंग्रजी दैनिकाचा समावेश आहे. फारशा परिचित नसलेल्या या दैनिकाचा खप सरकारी मान्यतेनुसार, 51,000 आहे. तर ‘दिव्य मराठी’चा खप औरंगाबादेत 1,02,000 नाशिकमध्ये 73,450 तर जळगावात 54,000 मान्य करण्यात आला आहे.

गुरुवार, ४ जुलै, २०१३

महाराष्ट्र टाइम्स जळगावात! वृत्तपत्रातूनच केली अधिकृत घोषणा...


महाराष्ट्र टाइम्स अर्थात ‘मटा’ने अखेर जळगावात पदार्पण केले आहे. वृत्तपत्रातील बातमीतूनच ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 100 वर्षांपूर्वी जळगावच्या पहिल्या कलेक्टरनी टाइम्स आॅफ इंडिया वाचल्याचा उल्लेखही या बातमीत आहे. वृत्तपत्राची घोषणा केली तरी संपादकीय जागा भरण्याबाबत ‘मटा’चा घोळ सुरूच आहे. ‘मटा’शी बोलणी करणारे अनेकजण अकोल्यात ‘दिव्य मराठी’ला जॉईन झाले आहेत; तर जळगावातील ‘दिव्य मराठी’वाल्यांनी ‘मटा’ला नकार कळविल्याने आता दुय्यम माणसांच्या जोरावरच सचिन अहिरराव यांना कसरत करावी लागेलसे दिसतेय. पन्नास रुपयात पाच महिने अशी ‘मटा’ने बुकिंग आॅफर दिली आहे. शिवाय वर एक पैसाही द्यायचा नाही. त्यामुळे ही ‘दिव्य’पेक्षा वाचकांनासाठी अधिक चांगली आॅफर आहे. 50 हजार कॉपीजचे बुकिंग टार्गेट आहे. सध्या जळगावात 700 अंक येतात. अर्थात 50 रुपयांच्या धनादेशाच्या बदल्यात 190 रुपये कमिशनमुळे विक्रेते/हॉकर्सची चांदी झाली आहे. सध्या ज्यांच्याकडे ‘मटा’ येतो त्यांच्याकडे सध्याचाच हॉकर पेपर टाकेल असे विक्रेता बैठकीत ठरलेय.

बुधवार, ३ जुलै, २०१३

बेरक्या इफेक्ट ...

लोकमतच्या मुंबई आवृत्तीच्या स्ट्रींजर रिपोर्टरचे चार महिन्यापासून मानधन थकले,हे वृत्त बेरक्याने देताच, निवासी संपादक विनायक पाथ्रुडकर हादरले...सर्व स्ट्रींजरला गोड बोलू लागले...मानधनही देण्यास तयार...पण चार महिन्याचे नव्हे दोन महिन्याचे....


बेरक्या गौप्यस्फोट
पुढारीच्या ठाणे कार्यालयातील दिलीप शिंदे लोकमतच्या वाटेवर होते...शिंदे हे पाथु्रडकरांच्या जवळचे...कारण पाथ्रुडकर पुर्वी पुढारीत होते.शिंदेची मुलाखतही झाली होती...तसे वृत्तही बेरक्याने कोणाचे नाव न घेता दिले होते.मात्र दिलीप शिंदेचे दुर्देव म्हणावे लागेल...
कारण त्यांची परवा एक बातमी चुकली...पुढारींच्या साहेबांनी लगेच दिलीप शिंदेचे नाव घालून खुलासा दिला.जेणे करून शिंदेची बदनामी होईल आणि लोकमत घेणार नाही...
या सर्व पार्श्वभूमीवर दिलीप शिंदेंना लोकमत घेणार का,याकडे ठाणेकरांचे लक्ष...

मंगळवार, २ जुलै, २०१३

अकोला अपडेट...

1) प्रकाश पोहरे यांनी अकोला आवृत्तीच्या संपादकीय विभागाची बैठक घेतली. माणसं नसल्याने आवृत्तीची झालेली दयनीय अवस्था पाहून पोहरेंनी कपाळावर हात मारून घेतला. गणेश मापारी पाच ते सहा दिवसांपासून का येत नाही, याचीही विचारणा केली. मापारींकडून ग्रूप सिमकार्ड परत घेत ते पोहरेंनी स्वतःकडे घेऊन ठेवले.
२) प्रकाश पोहरे हे कान्हेरी सरप येथील फार्महाऊसवर राहतात. छोटे मालक ऋषी पोहरे यांच्याकडे देशोन्नतीचा कारभार आला आहे.
छोटे मालक निशांत टॉवरवरील एसी कॅबिनमधून बाहेर पडतच नाही. त्यामुळे तब्बल दहा आवृत्यांचा कारभार स्थानिक आवृत्तीप्रमुखांच्या हाती गेला. बातम्या मिसिंग, सर्क्युलेशन घसरले तरी त्यांना जाब विचारणारा खमक्या संपादकच आता देशोन्नतीकडे नाही.
३) देशोन्नती प्रेसवर माणसांचा नुसता तुटवडा निर्माण झालेला आहे. मेन डेस्कवरील माणसे बातम्या भाषांतरित न करता ई-सकाळ, महाराष्ट्र टाईम्स, एबीपी माझा, प्रहार, लोकमत, लोकसत्ता, तरुण भारत यांच्या संकेतस्थळावरून बातम्या कॉपी-पेस्ट करत आहेत. हेडिंग-एण्ट्रो बदलून बातम्या चोरायच्या व दिवस साजरा करायचा, असा दिनक्रम सुरु आहे.
४) बेरक्याच्या देधडक वृत्तामुळे देशोन्नती व्यवस्थापन हादरले. कोण बेरक्याला इत्यंभूत माहिती देत आहे, याचा शोध सुरु.
५) रवी टाले मुंबई, औरंगाबाद येथील लोकमत व्यवस्थापनाच्या कामकाजाचे प्रशिक्षण घेऊन उद्या अकोला कार्यालयात येणार असल्याचे कळते.

अश्विनी सातव- डोके पुण्यनगरीत जॉईन

पिंपरी - चिंचवडमधील डॅशिंग महिला रिपोर्टर अश्विनी सातव - डोके तब्बल साडेचार वर्षानंतर पुन्हा पत्रकारितेत सक्रिय झाल्या आहेत. दैनिक पुण्यनगरीमध्ये त्या क्राईम रिपोर्टर म्हणून जॉईन झाल्या आहेत.
युवा सकाळ,सामना आणि नंतर पुढारीत सलग चार वर्षे काम केल्यानंतर त्यांचा 13 डिसेंबर 2008
रोजी भीषण अपघात झाला होता.अपघातांनतर त्या तब्बल तीन वर्षे बेडवर होत्या.नतर त्यांची तब्बत सुधारली.गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अलिबागच्या कृषीवलमध्ये स्तंभ लिहिण्यास सुरू केला होता.मात्र आता पुण्यनगरीत पुर्णवेळ क्राईम रिपोर्टर म्हणून जॉईन झाल्या आहेत.
अश्विनीताईच्या नव्या इनिंगला बेरक्याच्या शुभेच्छा...

फेसबुक वर शेअर करा

Facebook