> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१३

दहिहंडी स्पर्धेत न्यूज चॅनलवाल्यांनी लोणी खाल्ली

काल गुरूवारी मुंबईत करोडो रूपये बक्षियाच्या दहिहंड्या फोडल्या गेल्या.त्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यासाठी बहुतांश मराठी न्यूज चॅनलवाल्यांनी लाखो रूपयाची कमाई केली.
दहिहंडी स्पर्धा भरविणे,हे मुंबईतील काही लोकांचा धंदा झाला.या स्पर्धेच्या नावाखाली लाखो रूपये उकळले जातात.नंतर दहिहंडी फोडण्यासाठी लाखो रूपये बक्षिस ठेवले जाते.ते फोडण्यासाठी अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात.काल झालेल्या दहिहंडी स्पर्धेच्यावेळी दोघांना आपला जीव गमवावा लागला तसेच अनेकांना जखमी व्हावे लागले.या स्पर्धेच्या वेळी पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण होता.
दुसरीकडे न्यूज चॅनलवाल्यांनीही त्यात हात धुवून घेतला.या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दाखविण्यासाठी एका ओ.बी.व्हॅनचा रेट जवळपास ८ लाख होता.तसेच कव्हरेज करण्यासाठीसाठी देणगी उकळण्यात आली.कालचा दिवस संपादकांच्या हातात नव्हता तर मँनेजमेंटच्या हातात होता.
प्रिंट मीडियात पेड न्यूजचा जसा प्रकार चालतो,तसाच आता इलेक्ट्रॉनिक मीडियातही अश्या स्पर्धा आणि कार्यक्रम दाखविण्यासाठी धंदा होवून बसला आहे.येणा-या लोकसभा निवडणुकीत असे प्रकार सर्रास होणार आहेत,त्याचे संकेत मिळत आहेत.अनेक मराठी न्यूज चॅनलने दहिहंडीमध्ये लोणी खाल्याने त्याची खमंग चर्चा चालू आहे.

पी.टी.आय.च्या विश्वासर्हतेला धक्का

मुंबई - मुंबईत महिला प्रेस फोटोग्राफरवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना शुक्रवारी कोर्टात आणण्यात आले होते.यावेळी काही महिलांनी आरोपींवर अंडी फेकून,आपला संताप व्यक्त केला.त्याची बातमी पी.टी.आय.ने सर्व न्यूज पेपर आणि चॅनलला पाठविली.बातमी इंग्रजीत होती.त्यात म्हटले होते,की बलात्कार प्रकरणातील आरोपीवर महिलांनी कुऱ्हाड केकली.लगेच काही न्यूज चॅनलवाल्यांनी तशी बातमी चालविली.नंतर न्यूज चॅनलवाल्यांना आपली चूक लक्षात आली आणि नंतर बातमी फिरविण्यात आली.
स्पेलिंगमुळे झाला गोंधळ
वास्तविक पी.टी.आय.ला अंडीच फेकली असे वृत्तात म्हणायचे होते.मात्र त्यांनी अंडयाचे स्पेलींग Axe असे लिहिले.अंड्याचे  Egg स्पेलींग असे होते.मात्र Axe असे लिहिण्यात आल्यामुळे आरोपींवर कुऱ्हाड फेकली,असे वृत्त चालविण्यात आले.नंतर पी.टी.आय.ने दुरूस्ती पाठविली,पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता आणि त्यांच्या विश्वासर्हतेला धक्का बसला.न्यूज चॅनलनेही पी.टी.आय.वर विश्वास ठेवून खोटी न्यूल दिली,आणि तोंडावर आपटले.

निखिल वागळेंची विकेट पडणार ?

नवी दिल्ली - नेटवर्क 18 ची पुर्णपणे मालकी मुकेश अंबानी यांच्याकडे गेली आहे.आता नेटवर्क 18 मध्ये येणाऱ्या आय.बी.एन.7 आणि आय.बी.एन.-लोकमतमधील काही लोकांवर गंडातर आले आहे.एका सुत्रानुसार आय.बी.एन.लोकमतचे संपादक निखिल वागळे यांची लवकरच विकेट पडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले नसले तरी,तशी फिल्डिंग मोदी यांनी लावली आहे.ते पंतप्रधान व्हावेत,अशी देशातील काही उद्योगपतींची इच्छा आहे.मोदी आणि मुकेश अंबानीचे सलोख्याचे संबंध आहेत.त्यांच्या प्रचारासाठी अंबानी आपल्या नेटवर्क 18 मध्ये येणाऱ्या न्यूज चॅनलचा उपयोग करू शकतात.म्हणूनच या न्यूज चॅनलमध्ये असणाऱ्या मोदी विरोधकांचा पत्ता कापला जात आहे.
निखिल वागळे हे मोदींच्या विरोधात अनेकवेळा बोंब मारली आहे.ही बोंब आता त्यांना महागात पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.वागळेंची लवकरच विकेट पडणार असल्याची बातमी भडासने दिली आहे.काय आहे ही बातमी वाचा...

एक अंग्रेजी वेबसाइट न्यूजलांड्री डाट काम की खबर पर भरोसा करें तो आईबीएन7 के मैनेजिंग एडिटर आशुतोष को भी प्रबंधन ने जाने के लिए कह दिया था लेकिन आशुतोष ने इस्तीफा देने से इनकार कर दिया था. इस बारे में जब वेबसाइट ने आशुतोष से संपर्क किया तो आशुतोष ने कुछ भी कहने से मना कर दिया. हां, उन्होंने यह जरूर बताया कि इस मैटर पर कुछ भी बोलने के लिए वे अथाराइज नहीं हैं.
वेबसाइट के मुताबिक आईबीएन लोकमत के एडिटर निखिल वागले भी भगाए जाने वालों की लिस्ट में हैं. देर सबेर इनकी बलि ले ली जाएगी. करन थापर को भी जाने के लिए कहा गया था लेकिन थापर ने कानूनी कार्रवाई की धमकी दी, तब जाकर प्रबंधन शांत हुआ और थापर बने रहने में कामयाब हुए. थापर ने इस बारे में संपर्क किए जाने पर न इनकार किया और न ही पुष्टि की. बताया जा रहा है कि कंपनी में हिस्सा होने के कारण राजदीप सरदेसाई तो बच गए लेकिन सागरिका घोष की सेलरी घटा दी गई है. वेबसाइट ने इन सारी सूचनाओं को इनसाइडर सोर्सेज के हवाले से प्रकाशित किया है.
हालांकि कहा ये जा रहा है कि मैनेजमेंट जान बूझ कर यह सब फैला रहा है ताकि संदेश यह जाए कि छंटनी के शिकार बड़े लोग भी हो सकते हैं ताकि जो छोटे इंप्लाइज छांटे गए हैं, उन्हें यह भरोसा रहे कि उनके साथ कोई खास गलत इसलिए नहीं हुआ क्योंकि ऐसा बड़ों के साथ भी होना था यो होने जा रहा है या होगा. उधर, कुछ लोगों का कहना है कि अंबानी का मेजारिटी स्टेक हो जाने के बाद लेफ्ट, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक एप्रोच के एडिटर्स व जर्नलिस्ट को इस ग्रुप से देर सबेर बाहर जाना पड़ेगा क्योंकि अंबानी और मोदी में इस बात पर एका है कि यह मीडिया समूह मोदी व भाजपा को मजबूत बनाने के लिए काम करेगा.
सूत्रों के मुताबिक दुबई में इस बाबत एक शीर्ष स्तरीय बैठक भी हो चुकी है जिसमें मोदी को सपोर्ट किए जाने और पीएम बनाने के लिए जुटने के प्रस्ताव का राजदीप सरदेसाई ने विरोध किया था. फिलहाल इतना तो तय है कि आने वाले दिनों में इस ग्रुप में कई बड़े उलटफेर होंगे और न्यूज चैनलों का दशा-दिशा लेफ्ट टू राइट की जाएगा, जिसके साइडइफेक्ट के बतौर बहुत सारे बाहर होंगे और कई नए अंदर लाए जाएंगे.
http://bhadas4media.com 

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३

रवी आंबेकर मी मराठीचे संपादक

मुंबई - मी मराठी चॅनलवर येत्या काही दिवसांत २४ तास बातम्या सुरू होणार आहेत.या न्यूज चॅनलचे एडिटर हेड म्हणून रवी आंबेकर यांची निवड करण्यात आली असून,आंबेकर हे येत्या १ सप्टेंबर रोजी या चॅनलचे एडिटर इन चिफ म्हणून सुत्रे हाती घेण्यात येणार आहे.या चॅनलमध्ये लवकरच आणखी काही बडे पत्रकार जॉईन होणार आहेत.त्यामुळे इलेट्रॉनिक मीडियात मोठ्या उलथा-पालथी होणार आहेत.
मी मराठी या चॅनलची मालकी पुर्वी कांचन अधिकारी यांच्याकडे होती.एक वर्षापुर्वी महेश मोतेवार यांच्याकडे आली.त्यानंतर मी मराठीवर २४ तास बातम्या सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यापासून सुरू होती.जेव्हा २४ तास बातम्या देण्याचे फिक्स झाले,तेव्हा बेरक्याने एक महिन्यापुर्वी तसे वृत्त दिले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अखेर मी मराठी लवकरच २४ तास बातम्या सुरू करणार आहे.रवी आंबेकर यांची एडिटर इन चिफ म्हणून निवड करण्यात आली आहे.आंबेकर अनेक वर्षे आय.बी.एन.७ चे मुंबई ब्युरो चिफ होते.काही महिन्यापुर्वी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये गेले होते.मात्र केवळ चार महिन्यातच त्यांनी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला जय महाराष्ट्र केला आहे.
आंबेकरांनी जय महाराष्ट्र सोडल्यानंतर ते न्यूज एक्स्प्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती,मात्र बेरक्या वार्ताहराने त्यांच्याशी संपर्क साधला असता,त्यात तथ्य नसल्याचे सांगितले होते.त्यानंतर ते मी मराठीत जाणार असल्याची माहिती आमच्याकडे प्राप्त होती,मात्र अधिकृतरित्या त्यांनी जाहीर केल्यानंतर हे वृत्त देण्यात येत आहे.
 
जय महाराष्ट्रला गळती लागणार
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचा अवघ्या चार महिन्यात फुगा फुटला आहे.मंदार फणसे,तुळशीदास भोईटे आणि रवी आंबेकर हे त्रिमुर्ती काही तरी कमाल करेल,अश्या सर्वांच्या अपेक्षा होत्या.मात्र आंबेकरांनी जय महाराष्ट्र सोडल्यामुळे आता या चॅनलला पहिला धक्का बसला आहे.आता आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.त्यानंतर या चॅनलला मोठी गळती लागणार असल्याची माहिती हाती आली आहे.
सुमार दर्जाच्या बातम्या आणि वितरणामध्ये असलेली बोंबाबोंब यामुळे जय महाराष्ट्रला अंद्याप टीआरपी काहीच नाही.संपादकीय टीममध्ये बेबनाव,व्यवस्थापकांची लुडबुड यामुळे वातावरणही बिघडले आहे.मालक सुधाकर शेट्टी करोडो खर्च करीत आहेत,मात्र काहीजण वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत.अनेकांना  अजून पगारी मिळल्या नाहीत.अनेक ठिकाणी ब्युरो ऑफीस सुरू झालेले नाहीत.जेथे सुरू झाले,तेथे यंत्रणा सुरू नाही.त्यामुळे बातम्या लेट लागत आहेत.बातम्याचे सादरीकरणही सुमार दर्जाचे आहे.भोर्इंटेंना टी.व्ही.९ तर फणसेंना आय.बी.एन.-लोकमत टाईप बातम्या हव्या आहेत.संपादकीय टीममध्ये ताळमेळ नाही.जे वर्षभरापासून काम करीत होते,त्यांना तुटपुंजे वेतन आणि नव्याना भरघोस वेतन,ही दरीही हानीकारक ठरली आहे.जय महाराष्ट्रच्या मालकाकडे प्रचंड पैसा आहे,मात्र चॅनलला टीआरपी मिळत नसल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हे चॅनल घाश्या गुंडाळू शकते.त्यामुळे जय महाराष्ट्रमध्ये आतापासून चलबिचल सुरू झाली आहे.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१३

औरंगाबादेत पार पडलेल्या मराठी पत्रकार परिषद अधिवेशनाची छायाचित्रे...
कासिम बंगाली पोलिसांचा खबरी? गँगरेपचे आरोपीचे पोलिसाला ५० कॉल

मुंबई : मुंबई गँगरेपप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. यातील मुख्य आरोपी मोहम्मद कासिम शेख उर्फ कासिम बंगाली हा पोलिसांचा खबरी असल्याची माहिती उघड होत आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने सुत्रांच्या माहितीच्या आधारे ही बातमी छापली आहे.

गेल्या आठवड्यात फोटोग्राफर तरूणीवर गँगरेप झाला. याप्रकरणी कासिमसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मात्र कासिमच्या चौकशीत त्याचे पोलिसांशी कॉन्टॅक्ट असल्याचं समोर येत आहे. त्याचा कॉल डेटा चेक केला असता, गेल्या महिनाभरात त्याने आग्रीपाडा पोलिस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलला तब्बल ५० कॉल केल्याचं उघड झालं आहे. मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी ही माहिती दिली.

कासिमला रविवारी पहाटे नायर हॉस्पिटलच्या टेरेसवरून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली असता, तो खबरी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.

“आम्ही कासिमची चौकशी करत होतो. त्यावेळी त्याचा कॉल डेटा चेक केला असता, त्याने महिनाभरात एकाच नंबरवर ५० हून अधिक कॉल केले आहेत. हा नंबर तपासला असता, तो आग्रीपाडा पोलिस स्टेशनमधील एका पोलिसाचा असल्याचं समजलं. त्यामुळे तो पोलिसांचा खबऱ्या असल्याची माहिती समोर आली”, असं क्राईम ब्रांचच्या एका ऑफिसरने सांगितलं.

तसंच त्या पाशवी कृत्याच्या दुसऱ्या दिवशी, या पोलिसाने कासिमला वैयक्तिक कामानिमित्त भेटण्यासाठी कॉल केला होता. दरम्यान, कासिम हा या गँगरेपमधील संशयित असल्याचं समोर आलं आणि त्याचवेळी तो फरारही झाला होता.

या कृत्यावेळी विजय जाधव आणि सलिम अन्सारी यांनी पीडित तरुणी आणि त्याच्या सहकाऱ्याला, कासिम हा आमचा बॉस असल्याचं सांगितलं होतं. आणि तुम्ही परवानगीशिवाय इथे फोटो काढत आहात. काही दिवसांपूर्वी इथं खून झाला असून तुम्ही त्यातील आरोपी असू शकता. त्यामुळे तुम्ही आमच्या बॉसला भेटा, असं विजय आणि सलिमने पीडितांना सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

 ABP Majha

गैंग रेप पीड़िता पत्रकार ने न्यूड फोटो वीडियो डिलीट करने की मांग की

मुंबई में महिला पत्रकार के साथ हुए गैंगरेप के मामले में पीड़िता और उसके पुरुष मित्र की हत्या भी की जा सकती थी लेकिन, रेप के दौरान बनाए गए वीडियो क्लिप की वजह से उन्हें जिंदा छोड़ दिया गया. अस्‍पताल में भर्ती पीड़िता ने इच्‍छा जताई है कि वह जल्‍द से जल्‍द काम पर लौटना चाहती है. लड़की ने पुलिस से उसके न्यूड फोटो ढूंढ़कर डिलीट करने की गुजारिश की है.

पुलिस सूत्रों के मुताबिक आरोपियों ने वारदात के बाद पीड़िता और उसके पुरुष मित्र को धमकाया था कि अगर उन्होंने पुलिस को बताया तो वीडियो क्लिप को इंटरनेट पर डाल देंगे. इसके अलावा आरोपियों में से एक कासिम बंगाली ने चांद सत्तार को फोन करके कहा था कि 'मेहमान आए हैं खातिरदारी के लिए आ जा'. यह बयान इस बात की ओर भी संकेत करता है कि आरोपियों ने पहले भी इस तरह यौन-शोषण के अपराध को अंजाम दिया हो. आरोपियों से पूछताछ के दौरान यह बात भी सामने आई है कि दोनों की हत्या भी की जा सकती थी ताकि मामले को पुलिस तक पहुंचने से रोका जा सके. लेकिन कासिम ने अन्य साथियों को ऐसा करने से रोका क्योंकि, उन्होंने घटना की वीडियो बना ली थी और उन्हें भरोसा था कि पीड़िता पुलिस के सामने मुंह नहीं खोलेगी.

गैंगरेप पीड़िता 22 वर्षीया फोटो पत्रकार खुद को मिली यातनाओं के बावजूद हिम्मत नहीं हारी है. वह सिर्फ इतना चाहती है कि उसके अपराधियों को ऐसी सजा मिले कि वे दोबारा किसी महिला की ओर बुरी निगाह डालने के काबिल न रहें. जसलोक अस्पताल में पीड़िता से मिलने पहुंचीं मुंबई की पूर्व महापौर निर्मला सावंत प्रभावलकर से उसने दर्द भरी मुस्कान के साथ कहा कि दुष्कर्म के साथ जिंदगी खत्म नहीं हो जाती. ठीक होने के बाद मैं फिर से जिंदगी शुरू करूंगी, पत्रकारिता करूंगी और मैगजीन द्वारा दिया गया अपना काम भी पूरा करूंगी. प्रभावलकर उस तीन सदस्यीय जांच समिति की अध्यक्ष हैं, जिसका गठन राष्ट्रीय महिला आयोग की तरफ से किया गया है. यह समिति पूरी घटना की स्वतंत्र जांच करके अपनी रिपोर्ट 10 दिन के भीतर आयोग को सौंप देगी.

इससे पहले बोलने की स्थिति में आने के बाद सबसे पहले अपनी मां से बात करते हुए भी पीड़ित युवती ने कहा कि मैं नहीं चाहती कि जिस प्रकार की शारीरिक और मानसिक यातना से हमें गुजरना पड़ा है, उससे इस शहर या देश की किसी भी महिला को गुजरना पड़े. मेरा जीवन बरबाद करने वाले अपराधियों को कम से कम उम्रकैद की सजा मिलनी चाहिए. इससे कम की कोई भी सजा मेरा दर्द दूर नहीं कर पाएगी. पीड़ित फोटो पत्रकार से मिलकर लौटे उसके रिश्तेदारों के अनुसार शुक्रवार देर रात तक वह टेलीविजन पर चल रही खुद से संबंधित खबरों को देखती रही. खबरों में अपने साथ खड़े लोगों को देखकर उसकी हिम्मत और बढ़ी है.


http://bhadas4media.com 

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१३

औंरगाबादच्या अधिवेशनाने काय साधले ?

मराठी पत्रकार परिषदेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन, औरंगाबादेत दि.२४ आणि २५ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटामाटात पार पडले. यापुर्वीच्या सर्व अधिवेशनाचे रेकॉर्ड या अधिवेशनाने मोडीत काढले.औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाने या अधिवेशनाचे उत्तम नियोजन केले होते.याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख,विद्यमान अध्यक्ष किरण नाईक,औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सुर्यवंशी,सचिव संजय वरकड,प्रमोद माने व त्यांच्या सर्व सहका-यांचे अभिनंदन...
या अधिवेशनास मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.स्थानिक आमदार आणि खासदारांना निमंत्रण नव्हते.एक निषेध म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते.या अधिवेशनास राज्यभरातून १८०० ते २००० हजार पत्रकार उपस्थित होते.पत्रकारांची एकजूट यानिमित्त दिसून आली.पत्रकारांत एकजूट नसल्यामुळे त्यांचा दबदबा कमी झाला होता.या अधिवेशनाने राजकीय गोटात वेगळा संदेश दिला आहे.आता पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केला किंवा पत्रकारांवर हात उगरला तर सर्व पत्रकार रस्त्यावर येवून,संबंधितांची खुर्ची हालवू शकतात,हे या निमित्ताने स्पष्ट झाले.
या अधिवेशनास आय.बी.एन.-लोकमतचे संपादक निखिल वागळे काही अपरिहार्य कारणामुळे आले नाहीत.पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे का,या चर्चासत्रात वागळेंना काही जणांनी अप्रत्यक्ष धुवून काढले.त्याचवेळी लातूरातही एका पत्रकार पुरस्कार कार्यक्रमात चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनीही वागळेंची जाहीर भाषणात चंपी केली.यावेळी वागळेंची एक समर्थक पत्रकार उपस्थित होती.तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.
वागळे आता तरी शहाणे व्हा...स्वत:ला ग्रेट समजू नका...तुमच्या चॅनलवर आरडा- ओरड जसे करता,तसे अधिवेशनाला येवून पत्रकारांच्या संरक्षणासाठी आरडा - ओरड केली असती तर हे पत्रकार तुम्हाला डोक्यावर घेतले असते.

पुढे काय ?
पत्रकार संरक्षण कायदा होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात जागृती अभियान राबविण्यात येणार आहे.तसेच पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे.त्याचा तपशिल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

आपण काय करायचे ?
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे. या परिषदेचे अध्यक्षपद भोगलेले पद जाताच,त्यांची मती गुंग झाली आहे.त्यांनी सापासारखी गरळ ओकण्यास सुरूवात केली आहे.त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली एकत्र या.हा बेरक्या तुमच्यासोबत आहे.पाहू या तुम्हाला कोण काय करते ?

रेल्वेच्या सर्व महिला डब्यांमध्ये सुरक्षा द्या ...महिला पत्रकारांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई - मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या उपनगरी लोकलसेवेतील महिलांच्या सर्व डब्यांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावे तसेच पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या महिलांची कैफियत तातडीने नोंदवून घेतली पाहिजे , अशा मागण्या न्यूज चॅनेलमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल के . शंकरनारायणन यांच्याकडे केल्या . या प्रश्नी आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू , असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले .
मुंबईत महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत संपूर्ण राज्यात संतापाची लाट असून , महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे . लोकलच्या सर्व महिला डब्यांमध्ये पोलिसांकडून सुरक्षाव्यवस्था पुरविली जात नाही . त्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले जाते . त्यामुळे लोकल गाड्यातील महिला प्रवाशांची सुरक्षेला प्राधान्य द्यावे , अशी मागणी केल्याचे पत्रकार नेहा पुरव यांनी सांगितले . बऱ्याच रेल्वे स्टेशनच्या आवारात गर्दुल्ले व समाजकंटक प्रवृत्ती मोकाट फिरत असून , अशा प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली . या शिष्टमंडळात प्रीती सोमपुरा , प्रणाली कापसे , भारती व अन्य पत्रकार सहभागी झाल्या होत्या , असे पुरव यांनी सांगितले .

रविवार, २५ ऑगस्ट, २०१३

धन्यवाद...धन्यवाद...धन्यवाद...

पत्रकारांचा पाठीराखा बेरक्या उर्फ नारद ब्लॉगने केवळ अडीच वर्षात 10 लाख (जुना आणि नवा ब्लॉग) हिटस् चा टप्पा ओलांडून मराठी ब्लॉग विश्वात नवा इतिहास रचला आहे.अनेक पत्रकार बांधव आपल्या मोबाईलवर हा ब्लॉग वाचतात, त्याची नोंद हिटस्मध्ये होत नाही तसेच फेसबुकवर काहीजण बातम्या वाचतात,त्याचीही येथे नोंद नाही.मात्र एकंदरीत दररोज किमान 10 हजार लोक सर्व माध्यमातून बेरक्याचा ब्लॉग आणि बेरक्याचा फेसबुक वॉल वाचतात...
बेरक्याच्या ब्लॉगला नुसते पत्रकारच नव्हे,पत्रकारिता महाविद्यालयात शिकत असलेले विद्याथी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी,विविध पक्षाचे राजकीय नेते आणि कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,शिक्षक,प्राध्यापक,शासकीय अधिकारीही हा ब्लॉग वाचतात.
बेरक्या ब्लॉग यशस्वी करण्यात अनेक जणांचे योगदान आहे.त्या सर्वांचे जाहीर आभार आणि आपणास धन्यवाद...कारण आपण आमचे वाचक आहात आणि वाचक हाच आमचा मालक आहे...

विवेक जागा ठेवण्यासाठी पत्रकारांनी काम करावे

औरंगाबाद- गरिबांना भेडसावणारे प्रश्‍न समोर येऊ नयेत यासाठी राजकारणी प्रयत्नशील असतात, अशा परिस्थितीत पत्रकारांना मतदार, तसेच सर्वसामान्य जनतेतील विवेक जागा ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल, असे मत प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यक्‍त केले.
मराठी पत्रकार परिषदेतर्फे येथे आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप आज झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रकांत कुलकर्णी बोलत होते. समारोपाला प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अनिल अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती.

चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, की बदलत्या सामाजिक वातावरणात पत्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. आजच्या "पेड न्यूज'च्या संस्कृतीत काही पत्रकार जागरूक आहेत. येणारे दिवस हे निवडणुकांचे असल्याने त्यांना मतदार, सामान्यांचा विवेक जागा ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे लागेल. पत्रकारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून जोपर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडत नाहीत, तोपर्यंत हा विषय लावून धरला पाहिजे, अन्यथा पत्रकारांवर असेच हल्ले होत राहतील, असेही त्यांनी नमूद केले.

पत्रकारांना निवृत्तीवेतन संरक्षण देणार

पत्रकारांच्या मागणीनुसार त्यांना निवृत्तीवेतन देण्याबद्दल शासन विचार करीत असून, मध्यप्रदेशमध्ये पत्रकारांच्या संरक्षणासाठी जसा कायदा अंमलात आला आहे, तसा कायदा महाराष्ट्र राज्यातही करण्याचे आश्‍वासन महाराष्ट्र सरकारने दिले आहे. महिला पत्रकारांच्या संरक्षणासाठी उद्या कायद्यात तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अनिल अग्रवाल यांनी दिली.
मराठी पत्रकार भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अग्रवाल यांनी सांगितले की, आपल्या येथील दौर्‍याचा आणि मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाचा योग जुळून आला. औरंगाबादेत पत्रकारांविषयी आपण जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना भेटून माहिती घेतली असता, येथील पत्रकारांवर कुठल्याही प्रकारचे हल्ले झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रेस कौन्सिलची रचना कशी असते याचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, कौन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आहेत. पत्रकारांच्या सुरक्षेचा कायदा करण्याऐवजी पत्रकारांपासूनच सुरक्षा कशी करता येईल, असे गृहमंत्र्यांनी आपणास विचारले होते. पत्रकारांच्या व्याख्येबद्दलही बराच वाद असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी कायदा करण्याची मागील तीन वर्षांपासून तयारी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांवरील हल्ला प्रतिबंधक समिती स्थापण्याची तरतूद असूनदेखील औरंगाबादेत तशी समिती नाही. या समितीला सक्षम करण्याची व वैधानिक अधिकार देण्याची मागणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष किरण नाईक यांनी सांगितले की, यापुढे पत्रकारांवर हल्ले सहन केले जाणार नाहीत. परिषदेचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी राज्यात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा व खुनाचा तपशील सादर करीत यासंदर्भातील खटले 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालविण्याची मागणी केली. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी करीत असलेल्या पाठपुराव्याबद्दलही त्यांनी तपशील मांडला.
यावेळी अध्यक्षस्थानी बासीत मोहसीन व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी शंकर खंडू बावस्कर यांची उपस्थिती होती.

पत्रकारांच्या मदतीसाठी ट्रस्ट

पत्रकारांच्या पेन्शनसाठी लढा सुरू ठेवण्याबरोबरच गरजू पत्रकारांना मदत देता यावी यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे एस. एम. देशमुख यांनी सांगितले. ट्रस्टमार्फत 1 कोटी रुपयांचा निधी उभा करून त्याच्या व्याजातून पत्रकारांना आर्थिक अडचणीत मदत करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पत्रकाराने वैयक्‍तिकरीत्या किमान 1 हजार रुपये या ट्रस्टकडे आपले योगदान म्हणून योग्य वेळी जमा करण्याचे आवाहन श्री. देशमुख यांनी केले.

भुकेसह संख्या वाढली, मग बेजबाबदार कसे?

औरंगाबाद - प्रसारमाध्यमांची संख्या सातत्याने वाढणे, दररोज नवनवीन वर्तमानपत्रे व वाहिन्यांची संख्या
वाढणे हेच प्रसारमाध्यमे बेजबाबदार नाहीत याचे संकेत आहेत, असे मत प्रा.जयदेव डोळे यांनी व्यक्त केले. माध्यमे बेजबाबदार असती तर ही संख्या वाढलीच नसती, असेही ते म्हणाले. मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात 'प्रसारमाध्यमे बेजबाबदार होत आहेत का' या विषयावर आयोजित परिसंवादात प्रा. डोळे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने, आमदार भाई जगताप, आमदार संजय शिरसाट, शेकापचे नेते एस.व्ही.जाधव, गंगाधर गाडे यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.

डोळे म्हणाले की, आज माध्यमांमुळेच घोटाळे उघडकीस येत आहेत. माहितीची भूक वाढली आहे. माहितीचा साठा वाढल्यामुळे मागणीही वाढली आहे. त्यामुळे मराठी माध्यमे तर अजिबात बेजबाबदार नाहीत. सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे पत्रकार आणि राजकारणी खूप जवळ आले आहेत. मोठमोठय़ा उद्योगपतींनी वर्तमानपत्रे काढली, मात्र ती चालली नाहीत. तसेच माध्यमांमध्ये पेड न्यूज येण्यासाठी पत्रकार जबाबदार नसून मालक जबाबदार आहेत. त्यामुळेच पत्रकारांमध्ये सातत्याने नोकर्‍या बदलण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मतही डोळे यांनी व्यक्त केले.

माध्यमांनी स्वत:च नैतिकतेची आचारसंहिता घालून घेण्याची गरज असल्याचे मत आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, आज पेज थ्री कल्चर वाढले आहे. पानांची संख्या वाढत आहे. नकारात्मकताच बातमीचा विषय होत आहे. आमदार संजय शिरसाट यांनी एका बातमीमुळे काय नुकसान होते, याबाबत त्यांनी स्वत:चे उदाहरण सांगितले. एका बातमीमुळे आमदारकीपर्यंतचा प्रवास 12 वष्रे कसा लांबला याची माहिती दिली. त्यामुळे जबाबदारीने बातमी लिहिण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  अधिवेशनात चर्चेऐवजी वाहिन्यांवर चर्चा

या वेळी राजकारण्यांच्या मतांचा चांगलाच समाचार परिसंवादातील पत्रकारांनी घेतला. आज समाजकारण करणारे हट्टाग्रही झाले आहेत. तर राजकारणी बेपर्वा आणि संस्कार करणार्‍या संस्था असहिष्णू झाल्या आहेत. न्यायव्यवस्थेवर बोलायलाच नको, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बातमीला प्रतिसाद देण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे सनसनाटी वाढत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार र्शीमंत माने यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, जी काही बेजबाबदारी दिसते त्याला राजकारणीच जबाबदार आहेत. प्रशासकीय यंत्रणा हतबल झाल्यामुळे बातमीला प्रतिसादही मिळत नाही. त्यामुळे बातमीमध्ये सनसनाटी निर्माण होते. विधिमंडळ अधिवेशनात चर्चा करण्याऐवजी ते बंद पाडून वाहिन्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. समाजातील बधिरपणा ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत राजकीय पक्षांना आरटीआय लागू करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

लिखाण काळजीपूर्वक करण्याची गरज

सभ्य माणसे बेजबाबदारपणे लिखाण करीत नाहीत. बातमी केल्यानंतर त्याचा पुरावा राहतो. तो अनेक वर्षांनी काढून पाहता येतो. त्यामुळे बातमी लिहिताना माध्यमांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते, असे मत 'दिव्य मराठी'चे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी व्यक्त केले. बातमी, लिखाण हे बंदुकीच्या गोळीसारखे असून मागे घेता येत नाही. त्यामुळे शब्दांनी अचूक माणसाचा वेध घेत निदरेष व्यक्तींना त्याचा फटका बसू नये याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सारंग दर्शने म्हणाले की, तेच ते बोलून अर्थशून्य चर्चेला आता अर्थ उरला नाही. आधुनिक माध्यमांचा प्रभाव झपाट्याने वाढतोय. सामाजिक संकेतस्थळावरून लोक व्यक्त होऊ लागले आहेत. माध्यमे आधुनिक झाल्यामुळे ती बेजबाबदार नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले. एन.व्ही.जाधव आणि गंगाधर गाडे यांनीदेखील माध्यमे जबाबदारीने काम करत असल्याचे सांगितले. 

संपादकांपेक्षा व्यवस्थापनातील लोकांचे महत्त्व वाढले 
पादकांपेक्षा आज व्यवस्थापनातल्या लोकांना जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संपादक केवळ ब्रॅँड मॅनेजर होत आहेत, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांनी व्यक्त केली. 'संपादक नावाची प्रभावी संस्था निस्तेज होत चालली आहे का' या विषयावर मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात परिसंवाद घेण्यात आला होता. कदीर आणि सुशील कुलकर्णी यांनी मते व्यक्त केली. सुशील कुलकर्णी यांनी आज अग्रलेखामधली जागादेखील कमी होत आहे. वाचक संपादकीय वाचत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, ही निस्तेजता कशामुळे आली याचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगत लोक वाचत नाहीत यापेक्षा लोकांनी वाचावे, असे लिखाण करण्याची गरज असल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, बाबा गाडे, प्रमोद माने, एस.एम.देशमुख यांची उपस्थिती होती. 

39 वर्षांतले सर्वोत्कृष्ट अधिवेशन
या अधिवेशनात राज्यातल्या कानाकोपर्‍यातून 1600 पत्रकार सहभागी झाले होते. आतापर्यंत राज्यात अनेक ठिकाणी अधिवेशने झाली. मात्र, आतापर्यंतच्या अधिवेशनात हे अधिवेशन सर्वोत्कृष्ट झाले, असे कौतुक एस.एम.देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले. हे अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल स्वागताध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, संजय वरकड, प्रमोद माने यांचे कौतुक करण्यात आले. या वेळी किरण नाईक यांनी अध्यक्षपदाचा, चंद्रशेखर बेहरे यांनी कार्याध्यक्षपदाचा तर संतोष पवार यांनी सरचिटणीसपदाचा कार्यभार स्वीकारला. 
 दिव्य मराठी

वृत्तपत्रांचे बाजारीकरण होणे दुर्दैवी - नरेंद्र जाधव

औरंगाबाद - अलीकडच्या काळात वृत्तपत्रांचे बाजारीकरण झाले आहे. जाहिरातींमध्ये बातम्या शोधाव्या लागतात. त्यामुळे जाहिरात आणि व्यवस्थापन विभागाचे प्राबल्य वाढून संपादकीय महत्त्व कमी झाले. ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत व्यक्त करून बातमी बातमीच्याच ठिकाणी असायला हवी, असे स्पष्ट मत राष्ट्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

सिडकोतील जगद्गुरू तुकोबाराय नाट्यगृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 39 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. डॉ. जाधव म्हणाले, अलीकडच्या काळात वृत्तपत्रांमध्ये कमालीची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे आपल्याकडे काय सनसनाटी आहे, यावर भर दिला जातो. तेथे तारतम्य पाळले जात नाही, परिणामी लगावबत्ती म्हणजेच सनसनाटी बातम्या दिल्या ेजातात. यामुळे नकारात्मकता वाढली आहे. मात्र, यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते, याकडे दुर्लक्ष केले जाते. चांगल्या लोकांवरच देश चालतो आहे, याचेही भान राहिले नाही.

सुनीता नाईक यांची आर्थिक विवंचना लांच्छनास्पद : महालक्ष्मी नियतकालिकाच्या संपादिका थेट रस्त्यावर राहताना आढळून आल्या. पत्रकारांची अशी आर्थिक विवंचना महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यासाठी लांच्छनास्पद आहे. देशातील अन्य नऊ राज्यांत जर पत्रकारांना निवृत्तिवेतन मिळत असेल तर ते येथे का मिळत नाही? त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि मी वैयक्तिक पातळीवर तसे करेन. दुसरीकडे पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठीही काही केले जात नाही. यात महाराष्ट्र सर्वात मागे आहे.

पत्रकारांना प्रशिक्षणाची गरज : तारतम्य समजण्यासाठी पत्रकारांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज असल्याचे डॉ. जाधव यांनी नमूद केले. ज्या विषयावर आपण प्रश्न विचारतोय, त्याचीच माहिती पत्रकारांकडे असत नाही, अशी टीकाही त्यांनी केली अन् त्यामुळेच मला 'बाइट कल्चर'चा तिरस्कार असल्याचे ते म्हणाले. आकलनशक्ती मोठी असल्यास सनसनाटी होणार नाही.

मंदी येणार म्हणाल तर नक्की येईल : मंदी येणार, असे तुम्ही सातत्याने म्हणत राहिलात तर ती नक्कीच येईल. कारण मंदी येणार असे म्हटल्यानंतर मंदीत होणार्‍या गोष्टी केल्या जातात. खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे ढकलले जातात आणि मंदी येते. त्यामुळे सकारात्मकता महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. 


'माध्यमांमध्ये नकारात्मक व सनसनाटी बातम्या देणे ही आजची मोठी समस्या आहे. माध्यमांवर सेन्सॉरशिप नव्हे तर स्वनियंत्रणाची गरज आहे. पत्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी राज्य पातळीवरच स्वनियंत्रणाची वेगळी संस्था असली पाहिजे. पत्रकारिता जर समाजाचा आरसा असेल तर समाजाचे जसे आहे तसेच सहीसही त्यातून प्रतिबिंबित झाले पाहिजे आणि यासाठी कोणती बाब छोटी, कोणती मोठी हे जोखण्याचे पत्रकारांमध्ये तारतम्य असले पाहिजे. माध्यमांचे व्यापारीकरण होऊन मार्केटिंग व मॅनेजमेंटला अवास्तव महत्त्व आले आहे,'' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

श्री. अंभोरे यांनी पत्रकारांच्या संदर्भातील शासनाच्या धोरणाविरुद्ध टीका केली. ""वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी सत्ताधारी काहीच करीत नाहीत, त्यांच्यात ती इच्छाशक्ती नाही,'' असे ते म्हणाले. 'ग्रामविकासाचा घटक म्हणून पत्रकारितेकडे पाहिले पाहिजे. पत्रकारांच्या सुरक्षेसंदर्भात कायदा झाला पाहिजे,'' अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या कार्याबद्दल व आगामी उपक्रमांबद्दल एस. एम. देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला दिवंगत संपादक बाळासाहेब ठाकरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, छायाचित्रकार गजानन धुर्ये यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रेषित रुद्रावार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल फळे यांनी आभार मानले.

पुरोगामी महाराष्ट्रात पत्रकारांना पेंशन नाही! 'देशातील नऊ राज्यांमध्ये पत्रकारांसाठी निवृत्तिवेतन योजना राबविली जाते. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात मात्र ही योजना अद्याप लागू करण्यात आली नाही,'' याबद्दल नरेंद्र जाधव यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 'पत्रकारांना पेंशन योजना लागू झाली पाहिजे यासाठी माझी सहानुभूती आहे. मी माझ्या परीने त्यासाठी प्रयत्न करीन,'' असे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदारांना पेन्शन कशासाठी? : महाराष्ट्रातील बहुतांश आमदार हे कोटींच्या गाड्यांमध्ये फिरतात, तरीही त्यांच्या निवृत्तिवेतनात अवघ्या 10 वर्षांत तीन वेळा गलेलठ्ठ वाढ कशासाठी केली जाते, असा सवाल एस. एम. देशमुख यांनी केला असून याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार स्वत:साठी सर्वकाही करतात; पण पत्रकारांसाठी काहीही करत नाहीत. गेल्या तीन वर्षांत 290 पत्रकारांवर हल्ले झाले. मात्र, पत्रकार हल्लाविरोधी कायदा झाला नाही, असेही त्यांनी सांगितले. लहान वृत्तपत्रे तसेच पत्रकार संघटना मोडीत काढण्याचा डाव शासनाने रचला असल्याची टीका अंभोरे यांनी केली. 


ग्रामीण बातमीदार जाहिरातींच्या दबावाखाली
चांगल्या बातमीदाराचे कौतुक थांबले असून ग्रामीण भागातील बातमीदार जाहिरातीच्या दबावाखाली दबला गेला असल्याचे मत प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केले आहे. 'ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि उपाय' या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ग्रामीण भागातील पत्रकारांचे वेतन वाढवण्याची गरज असल्याचे मतही या वेळी त्यांनी व्यक्त केले. या परिसंवादामध्ये दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक धनंजय लांबे, ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे, संजय वरकड, नागनाथ फटाले, डॉ. अनिल फळे, दिलीप धारूरकर, सुनील ढेपे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिव्य मराठीचे चीफ रिपोर्टर र्शीकांत सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 
ग्रामीण भागात पाणी, कृषी, रस्ते हे नाळ जोडण्याचे विषय आहेत. मात्र, खड्डे आणि पीकपाणी यापेक्षाही आता वेगळ्या पद्धतीने बातम्या देण्याची गरज असल्याचे मत दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक धनंजय लांबे यांनी व्यक्त केले. आज ग्रामीण भागात स्मार्ट फोन आले आहेत. त्यांना घरबसल्या वृत्तपत्र वाचता येते. त्यामुळे त्यांनी दोन रुपये खर्च करून वृत्तपत्र का वाचावे याचा विचार करण्याची गरज आहे. वर्तमानपत्रे नागरिकांची गरज बनली नाही, तर वृत्तपत्रासमोर समस्या निर्माण होऊ शकते असेही ते म्हणाले.  
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या व्यथा सुनील ढेपे यांनी मांडल्या. ग्रामीण भागातील पत्रकारांना जाहिरातींच्या मागणीसाठी येणारे अनुभव त्यांनी सांगितले. संजय वरकड यांनी ग्रामीण पत्रकारांकडून अपेक्षा जास्त असल्या तरी त्यांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात नसल्याची खंत व्यक्त केली, तर तोकडे मानधन आणि जाहिरातींची अपेक्षा यामुळे ग्रामीण पत्रकारांचा गोंधळ होत असल्याचे मत अनिल फळे यांनी व्यक्त केले. 

Divya Marathi 


शनिवार, २४ ऑगस्ट, २०१३

अत्यंत धक्कादायक! मुंबईतील ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन घुर्ये यांची आत्महत्या


अत्यंत धक्कादायक! 'जीजीपिक्स' (ggpics.com) या नावाने रोजच्या कार्यक्रमांची छायाचित्रे उपलब्ध करून देणारी वेबसाइट चालविणारे, छायाचित्रकार म्हणून दबदबा निर्माण करणारे गजाननराव घुर्ये (वय ५८) गेले; दादरमधील शिवसेना भवनजवळ असलेल्या साईचरण या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर घुर्ये कुटुंबियांसह राहत होते. शनिवारी पहाटे त्यांनी बेडरुममध्ये ओढणी पंख्याला बांधून गळफास घेतला. सकाळी साडेसातला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हलाहल व्यक्त होत आहे. 
३५ वर्ष त्यांनी छायाचित्रकलेची सेवा केली. त्यांनी राजकीय फोटोग्राफीला उंची मिळवून देतानाच महाराष्ट्रभरातील छोट्या दैनिकांची मोठीच सोय केली होती. अनेक फोटोग्राफर, पत्रकार त्यांनी तयार केले. एखाद्या राजकीय वा शासकीय कार्यक्रमाचा फोटो कुठेही नसला तरी हमखास तो घुर्ये यांच्याकडून त्यांना मिळत होता. सगळ्याच राजकीय नेत्यांशी त्यांचे अगदी जवळचे संबंध राहिले. वसंतदादा पाटील यांच्यापासून ते शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे अशा सर्वच मुख्यमंत्र्यांच्या ते खास मर्जीतले होते. 
घुर्ये गेल्या काही दिवसांपासून निराश होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. काही दिवसांपासून ते अज्ञात कारणांमुळे अस्वस्थ होते आणि त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जाते... राजकारणातील जय-पराजय, आनंद, निराशा, जल्लोषाचे अनेक क्षण अचूक टिपणा-या गजानन घुर्येंच्या मनातील ही अस्वस्थता मात्र कोणालाच टिपता आली नाही... 
काळाची गरज ओळखून पत्रकारितेत नवे काय केले पाहिजे, याचे ते एक उत्तम उदाहरण होते... फोटो म्हटले की, महाराष्ट्राच्या प्रत्येक मोठ्या नेत्यांच्या तोंडात पहिले नाव यायचे ते गजानन घुर्येंचे... मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या राजकीय कार्यक्रमात स्वत: घुर्ये किंवा त्यांचा सहकारी फोटोग्राफर आवर्जून उपस्थित असायचे... 
पत्रकार विश्वाचा चांगला मित्र, धडपड्या आणि धाडसी छायाचित्रकार गजानन घुर्ये यांनी आत्महत्या केल्याची दु:खद बातमी म्हणजे आघात!
गजानन घुर्येंना श्रद्धांजली...

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

राजकारण्यांबद्दल तिटकारा नाही तरीही.....

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांचा उल्लेख  केला जातो.आम्ही माध्यमातली मंडळी आपण "फोर्थ इस्टेट" आहोत या कल्पनेनं खूष असतो.प्रत्यक्षात ही फोर्थ इस्टेट "ओसाड गावची पाटीलकी" आहे.याचं कारण असं की,कायदे मंडळ,न्यायपालिका किंवा कार्यपालिका या तीन अन्य स्तंभांना  जे अधिकार आहेत,ज्या सवलती आहेत,जे कायदेशीर संरक्षण आहे त्यापैकी माध्यमांच्या वाट्याला कोणतेही विशेषाधिकार आलेले नाहीत.देशातील सामान्य नागरिकांना जेवढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार माध्यमातील लोकांना असल्यानं प्रसंगानुरूप माध्यमांचं नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतात.लोकशाहीनं विचार,अभिव्यक्ती,आणि लेखन स्वातंत्र्य दिले असले तरी हे स्वातंत्र्य किती तकलादू आहे हे आपण मध्यंतरी पालघर प्रकरणी पाहिले आहे.वृत्तपत्र स्वातंत्र्याचंही असंच आहे.जो पर्यत हे स्वातंत्र्य इतरांचं वस्त्रहरण करीत असते तो पर्यत ते राजकारण्यांना हवं हवंसं वाटतं.जेव्हा या स्वातंत्र्याचे चटके स्वतःला  बसायला लागतात तेव्हा भले भले म्हणायला लागतात,"वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय किंवा माध्यमांना आपल्या जबाबदारीचं भान उरलेलं नाही" .इंदिरा गाधीना जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याची छळ बसायला लागली तेव्हा त्यांनी आणीबाणीत करता येईल तेवढी वृत्तपत्रांची गळचेपी केली,बिहार सरकारने वृत्तपत्रांचे नाकेबंदी करणारे विधेयक आणून वृत्तपत्र स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही हे दाखवून दिले होते. आता मनीष तिवारी पत्रकारांसाठी परवाना राजची अफलातून कल्पना मांडून  अप्रत्यक्षपणे माध्यमांवर नियंत्रणं आणण्याची मनिषा बाळगून आहेत. "आयपीसी"मध्ये किरकोळ  बदल करून पत्रकारांना त्यात कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद करण्याची मागणी पत्रकार करीत असताना त्याकडं दुर्लक्ष करणारे सरकार "पीआरबी" कायद्यात मात्र एका फटक्यात बदल करून माध्यमाच्या मुस्कया आवळण्याचं एक शस्त्र आपल्या हाती घेऊ बघत आहे.एवढंच नव्हे तर  जे पत्रकार आपल्याला अनुकूल ठरत नाहीत त्यांच्यावर हक्कभंगासारख्या वैधानिक अस्त्रांचा वापर करून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्नही या देशात दिल्ली पासून मुंबई आणि बंगलोरपर्यत सर्वत्र सुरू आहे. जी वृत्तपत्रे आपल्या विरोधात आहेत त्यांच्या जाहिराती बंद करणे हा तर राजकीय पक्षांना आपला जन्मसिध्द हक्क वाटतो.अनेक राज्य सरकारे आणि केंद्र सरकारनेही आपल्याला विरोध करणाऱ्या वृत्तपत्रांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर काही वृत्तपत्रे आपल्या विरोधात आहेत म्हटल्यावर अशी वृत्तपत्रे शासकीय ग्रथालयात किंवा सरकारी  कार्यालयात खरेदी करू नयेत असा फतवा काढला आणि तो अंमलातही आणला.मात्र  वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच करणारे हे मार्ग  दीर्घकालिन आहेत ,त्यातून झटपट रिझल्ट मिळत नाही असे अनेकांना  वाटते. पत्रकारांवर किंवा वृत्तपत्रांवर हल्ले करून दहशत निर्माण करायची आणि वृत्तपत्रांचा आवाज बंद करायचा  मार्ग अधिक सोपा, जवळचा,तेवढाच कमी धोक्याचा आणि तात्काळ परिणाम घडवून आणणारा आहे असं  वाटत असल्यानं त्या मार्गाचा अवलंब करण्याचा कल देशभर वाढताना दिसतो आहे

.अन्य साऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्राची दारूण पीछेहाट होत असली तरी माध्यमावर हल्ले करण्याच्या,किंवा माध्यमकर्मीच्या निर्धृण हत्त्या करण्याच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे हे साधनाचे संपादक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात ज्या पध्दतीनं हत्त्या झाली त्यातून पुन्हा एकदा दिसून आलं.महाराष्ट्रात दर चार दिवसाला एक पत्रकार बदडला जातो.हे प्रमाण बिहार किंवा युपी पेक्षा किती तरी अधिक आहे.का होतात हे हल्ले? याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की,पत्रकारांना कायद्यानं कोणतेच विशेषाधिकार नाहीत किंवा कायद्यानं त्यांना कोणतीही विशेष सवलत दिलेली नाही,त्यामुंळं पत्रकारांवर हल्ला केला तरी आपले फारशे नुकसान होत नाही हे वास्तव गुंडप्रवृत्तीना  उमगले आहे.गेल्या तीन वर्षात ज्या 290च्यावर पत्रकारांवर हल्ले झाले किंवा गेल्या दहा वर्षात ज्या 900वर पत्रकारांना हल्ल्याचे शिकार व्हावे लागले त्यापैकी एकाही आरोपीला प्रचलित कायद्यान्वये शिक्षा झाल्याचं उदाहरण आम्हाला तरी माहित नाही.हल्लेखोरांनाही हे माहित आहे.त्यामुळं पत्रकारावर हात उगारताना कोणाला भय राहिलेलं नाही..राज्यात कायद्याचा धाक उरलेला नाही हेच पत्रकारांवरील वाढलेल्या हल्ल्याचं एकमेव कारण आहे.म्हणून आम्ही विशेष तरतूद मागतो आहोत.राज्यात दलितांवर जेव्हा अत्याचार वाढले तेव्हा सरकारनं ऍट्रॉसिटीचा कायदा आणला,महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या तेव्हा त्यांना संरक्षण देणारा "महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा" केला गेला,डॉक्टरांवरील आणि त्यांच्या हॉस्पिटलवरील हल्ले वाढले तेव्हा त्यांना संरक्षण देणारा कायदा केला गेला,लोकप्रतिनिधी,सरकारी कर्मचारी यांना कायदेशीर संरक्षण अगोदरच दिले गेलेले आहे.हे कायदे झाल्यानंतर संबंधित घटकावरील अत्याचाराच्या किंवा हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.पत्रकारांनाही असं वाटतं की,डॉक्टरांना जो कायदा लागू केला गेला तो कायदा आपणासही लागू केला तर हल्ल्याच्या घटना नक्कीच कमी होतील.पण अन्य घटकांना सहजासहजी संरक्षण देणारे सरकार पत्रकारांच्या सरक्षणाचा विषय आला की,वेगवेगळे फाटे फोडत आपल्या जबाबदारीपासून पळ काढताना दिसते.याचं कारण अन्य घटकांसाठीचे कायदे करताना या कायद्याची थेट झळ आपणास बसणार नाही याची पूर्ण खात्री राजकीय नेत्यांना होती.पत्रकारांच्या बाबतीत तसे नाही. पत्रकारांवर जे हल्ले झाले आहेत त्यातील 80 टक्के हल्ले हे राजकीय पक्षांच्या लोकांनीच केले आहेत.म्हणजे कायदा झाला तर त्याची सर्वाधिक झळ राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच बसणार हे सर्वपक्षीय नेत्यांना माहिती आहे.त्यामुळंच आरटीआयचा कायदा राजकीय पक्षांना लागू करू नये म्हणून जसे सारे पक्ष आपसातील मदभेद विसरून दिल्लीत एक आले,आपले पेन्शन वाढवून घेण्यासाठी जसे महाराष्ट्रात सारे राजकीय पक्ष राज्यावर 2लाख40हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे हे विसरून एकत्र आले,किंवा पोलिसांना मारहाण करून पोलिसांच्या विरोधात ज्या पध्दतीची सर्वपक्षीय आघाडी झाली  त्याच ध र्तीवर ही मंडळी पत्रकारांना कायदेशीर संरक्षण देऊ नये या मुद्दावर एकत्र आलेली आहे.जेथे जेथे आपल्या हितसंबंधांचा विषय असतो तेथे तेथे सारे पक्ष एकत्र येतात.राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची आम्ही गेली सात वर्षे मागणी करतो आहोत,त्यासाठी पत्रकारांच्या सोळा संघटना एकत्र आलेल्या आहेत तरी सरकार किंवा विरोधक काही करीत नाहीत याचं कारण यामुद्यावर सर्वपक्ष एक आहेत.बाहेर वृत्तपत्र स्वातंत्र्यांच्या बाजारगप्पा मारणारे जेव्हा माध्यमांसाठी काही करण्याची वेळ येते तेव्हा "माध्यमांपासून आम्हाला संरक्षण मिळविण्यासाठी काय" असा निरर्थक सवाल करून आम्ही माध्यमप्रेमी नाही आहोत हे दाखवून देत आहोत.अशा अभद्र युतीची प्रचिती पत्रकारांना वारंवार आलेली आहे.पत्रकार संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी सनदशीर मार्गानं आम्ही सारं काही केलं.संरक्षण कायदा आणि पेन्शन या मागण्या घेऊन आम्ही म्हणजे "महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं" मुख्यमंत्र्यांची  तब्बल तेरा वेळा भेट घेतली,तीन वेळा राज्यपालांची भेट घेतली.दोन वेळा राष्ट्रपतींना भेटलो,दोन वेळा प्रेस कौन्सिलचे चेअऱमन मार्कन्डेय काटजू याची भेट घेतली,सात वेळा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांची भेट घेतली,तीन वेळा विरोधी पक्ष नेत्यांना भेटलो,दोन वेळा विधानसभेच्या सभापतीचंी भेट घेतली,सर्वपक्षीय गट नेत्यांना एकदा भेटलो,अजित पवार यांच्या हस्ते जेव्हा माझा सत्कार झाला तेव्हा अजित पवार यांनाही आम्ही साकडे घातले,नारायण राणे समितीमधील बहुतेक मंत्र्यांना भेटून आम्ही आमची कैफियत मांडली पण त्याचा उपयोग झाला नाही.मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला कॅबिनेटसमोर मसूदा मांडतो असे आश्वासन देत राहिले  पण कॅबिनेटच्या बैठकांवर बैठका झाल्या पण  कायद्याचा मसुदा कॅबिनेटसमोर आजपर्यत त्यांनी आणला नाही.नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या वेळेस इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हळणकर यांनी एक अशासकीय विधेयक आणले होते.पण ते  माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या सचिवांनी तयार केलेल्या एका नोटचा आधार घेत कॅबिनेटने फेटाळून लावले.कॅबिनेटने त्यावर च र्चाही केली नाही किंवा विषय समजून घेण्याची तयारीही कॅबिनेटने दाखविली नाही.त्यामुळं आमदार हाळणकर याचं अशासकीय विधेयक विधानसभेत चर्चेला आले नाही.एका बाजुला मुख्यमंत्री सरकारी विधेयक आणतो म्हणतात,प्रत्यक्षात ते आणत नाहीत आणि दुसऱ्या बाजुला अशासकीय विधेयक आले तर त्यावर च र्चा होणार नाही याची काळजी घेतात,असा डबलगेम सुरू आहे. यातून सरकारची माध्यम विरोधाची मानसिकता स्पष्ट दिसते.या मानसिकतेच्या विरोधात सनदशीर मार्गानं जी आंदोलनं करता येतील ती सारी आपण केली,गेल्या तीन वर्षात अशी सोळा आंदोलनं केली.त्यात निदर्शनं,मोर्चे,घेराव,चक्री उपोषण,आमरण उपोषण,सत्याग्रह,लॉगंमार्च,कार रॅलीचा समावेश आहे.या अहिंसक किंवा गाधीमार्गाच्या आंदोलनाचा  सरकारवर काही परिणाम होत नाही ,विरोधकही मूग गिळून आहेत आणि दुसरीकडे चौथा स्तंभ मार खातो आहे ही आजची स्थिती आहे.याला सामुहिक आणि प्रातिनिधीक विरोध करण्यासाठीच 24 आणि 25 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या  मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनास कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना उद्घघाटनासाठी किंवा समारोप समारंभासाठी बोलवायचं नाही असा नि र्णय़ मराठी पत्रकार परिषदेनं घेतला आहे. परिषदेच्या अधिवेशनाचं उद्घाघाटन मुख्यमंत्र्यांनी करावं हा प्रघात आहे.ती परंपरा आहे.पण यावेळी हा प्रघात मोडला जात आहे.हा नि र्णय़ आम्ही फार आनंदानं घेतला आहे किंवा असा नि र्णय घेतला की,लगेच कायदा होईल असेही आम्हाला वाटत नाही.पण संताप व्यक्त करण्याचं एक सनदशीर माध्यम म्हणूनच आम्ही या निर्णयाकडं बघतो.असा नि र्णय घेऊन आम्हाला संवादही थांबवायचा नाही.लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो हे आम्ही जाणून आहोत पण जेव्हा जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा तेव्हा गांधीजींनीही बहिष्काराचं हत्त्यार उपसलं होतं.बातम्यांवर आम्ही बहिष्कार टाकला तेव्हा "तुम्ही जनतेचा माहिती जाणून घेण्याच्या हक्कावर अशी ग दा आणू शकत नाही" असे बोधामृत आम्हाला पाजले गेले.काही अंशी आम्हाला ते मान्यही होते.त्यामुळं पुढच्या काळात बातम्यांवरील बहिष्काराचा मार्ग अवलंबिला नाही.आम्ही आत्मपरिक्षण करीत हा नि र्णय घेतला पण सरकारमधील नेते स्वयंसिध्द असल्यानं त्यांना आत्मपरिक्षणाची कधी गरज नसते.आपण वृत्तपत्रांना नि र्भयपण काम करू देण्यात ्‌असमर्थ ठरलो आहोत याबद्दल त्यांना कधी पश्चाताप होत नाही किंवा त्याबाबत आत्मपरिक्षण करावं असंही कधी वाटत नाही.इतरांना बोधामृत पाजणे राजकीय नेत्यांना आपला जन्मसिध्द अधिकार वाटतो.आम्ही मात्र बुध्दीजिवी घटक असल्यानं विचार करण्याची,गरज असेल तेव्हा आत्मपरिक्षण कऱण्याची लोकशाही मुल्यांचं जनत करण्याची सारी पथ्ये पाळतो.घटनाकारांनी लोकशाहीच्या चारही स्तंभांनी आपल्या हातात हात घेऊन लोकशाही बळकट करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली असल्यानं  अन्य तीन स्तंभांशी संघर्ष करावा  असे आम्हालाही वाटत नाही. परंतू सत्ताधाऱ्यांच्या कुलंगडी-भानगडी बाहेर काढल्या,संसदेत किती गुन्हेगार बसले आहेत याचा लेखाजोखा मांडला,आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत आमदार स्वतःची पेन्शनवाढ कशी काय करून घेतात असा प्रश्न विचारला,वृत्तपत्र स्वातंत्र्य जपण्यासाठी जनसामांन्याच्या हितासाठी आवाज उठविला की, कायदेमंडळ आणि कार्यपालिकेत बसलेल्या मंडळीना चौथा स्तंभ आपल्या विरोधात आहे असं वाटायला लागतं आणि मग ते त्याच्या नरडीला नख लावायला निघतात. त्यांना चौथा स्तंभ आपला शत्रू वाटायला लागतो. आणि त्यातून मग "यांना तर ठोकूनच काढलं पाहिजे" यासारखे उदगार काढले जातात.विषय तेवढ्यावरच थांबत नाही. कधी दादागिरी तर कधी उपेक्षा करून चौथ्या स्तंभाला आपल्या कह्यात ठेवण्याचे मनसुबे आखले जातात.  व्यक्तिगत पातळीवर काही पत्रकारांची कामं होतही असतील पण समुह म्हणून यांना अद्‌दल घडविलीच पाहिजे अशी अरेरावीचीच भाषा सर्रास आणि खुलेआम  वापरली जाते.जाहिराती बंद करून माध्यमांचं नाक दाबण्याचा प्रयत्न केला जातो.छोटी वृत्तपत्रं आणि जिल्हा वर्तमानपत्रं आजही लोककल्याणाचं काम करीत आहेत.अनेक मोठी वृत्तपत्रे सरकारची मांडलिक असल्यासारखी वागत असताना जिल्हा वर्तमानं आजही आपलं स्वत्व जपत निर्भयपणे समाजाचा आवाज बुलंद कऱण्याचं काम करतात ,ती सरकारला भिक घालत नाही. अशी वर्तमानपत्रं  सरकारच्या डोळ्यात खुपतात.त्यामुळं या वृत्तपत्रांना दिल्याजाणाऱ्या जाहिरातीना  कात्री लावून ती बंद पडतील अशी व्यवस्था केली जात आहे.दुसरीकडं माध्यमांचे जे प्रश्न आहेत त्याचीही संतापजनक उपेक्षा केली जात आहे.स्वतःच्या पेन्शनचा विषय कोणतीही च र्चा न करता मंजूर करणारे कायदा मंडळातील सद्‌स्य पत्रकारांना पेन्शन द्या म्हटलं की,पोटात गोळा आल्यासारखं वागायला,बोलायला लागतात( गृहलक्ष्मीच्या माजी संपादिका सुनीता नाईक यांचं चार दिवसांपुर्वीच समोर आलेलं उदाहरण सरकारच्या नाक र्तेपणाचं पाप आहे.कधी काळी आपल्या लेखणीनं महिलाच्या सक्षमीकरणाचं भरिव कार्य केलेल्या, पाच भाषा अवगत असलेल्या,उच्चशिक्षित  सुनीता नाईक आज फुटपाथवर आयुष्य जगताहेत.  सरकारनं वेळीच पेन्शन योजना सुरू केली असती तर किमान सुनीता नाईक किंवा त्यांच्या सारख्या अन्य पत्रकारांना आज जे दिवस पहावे लागत आहेत ते पहावे लागले नसते ) ,स्वतःभूखंड घोटाळे करणारे पत्रकारांना गृहनिर्माणसाठी भूखंड देण्याची वेळ आली की हजार कारणांचा पाढा वाचतात,पत्रकारांचे आरोग्य,पत्रकारांचे अपघाती मृत्यू,पत्रकार आरोग्य विमा यासाठी सरकार काही करताना दिसत नाही.महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ,कृषी विद्यापीठ,तंत्रशास्त्र विद्यापीठ,मस्यशास्त्र विद्यापीठाच्या ध र्तीवर महाराष्ट्रात वृत्तपत्रशास्त्र विद्यापीठ सुरू करावे ही मागणीही सरकार पूर्ण करीत नाही.प्रेस कौन्सिलच्या ध र्तीवर महाराष्ट्र प्रेस कौन्सिलचा प्रस्तावही आम्ही वीस वर्षांपूर्वी दिलेला आहे तो ही धुळखात पडून आहे.साधी अधिस्वीकृती समितीही गेली चार वर्षे अस्तित्वात नाही. सरकारी अधिकारी मनमानी पध्दतीनं या समितीचं कामकाज चालवतात. पत्रकारांसाठीच्या विविध पुरस्कारांचे वितरणही दोन-दोन,तीन-तीन वर्षे होत नाही.म्हणजे माध्यमांशी संंबंधित कोणताच विषय मार्गी लागणार नाही याची पुरेपूर क ाळजी घेतली जात आहे.सरकार माध्यमांविषयीच्या  आकसापोटी हे सार करीत असताना माध्यमांचे प्रश्न दररोज वाढत आहेत.विविध वाहिन्यांनी आणि साखळी वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात पत्रकार कपात चालविली असल्यानं अनेकांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.नेटवर्क-18 आणि आउटलुकने पत्रकार कपात केल्यानं पंधरा दिवसात जवळपास 500 पत्रकार रस्त्यावर आले आहेत.पत्रकार संघटना क्षीण झाल्या आहेत आणि ज्या अस्तित्वात आहेत त्यांचे अस्तित्व संपविण्याचे प्रय़त्न सरकारी अधिकारी आणि सरकार प्राणपणाने करीत आहे.त्यामुळं चौथा स्तंभ प्रश्नांच्या जंजाळात अडकला असताना सरकार नकारात्मक भूमिकेतून या प्रश्नक डं बधत आहे.पत्रकारांना अद्दल घडविण्याच्या गावठी मानसिकतेतून आपण लोकशाहीचा भक्कम आधार असलेल्या माध्यमांनाच खिळखिळे करून लोकशाहीच्याच नरडीला नख लावायला नि घालो आहोत हे सरकार आणि अन्य राजकीय पक्षांच्या ध्यानात येत नाही.अशा स्थितीत या सरकारी अरेरावीच्या विरोधात सर्व पत्रकार,पत्रकार संघटनांनी एक आल्याशिवाय पर्याय नाही.आपण बुध्दिजिवी आहोत,अनेक प्रश्नांवर आपली मतभिन्नता असते हे जरी खरं असलं तरी सरकार चौथ्या स्तभाचं अस्तित्वच संपवायचा डाव खेळत असेल तर हा डाव ओळखून व्यापक देशहितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणसाठी तरी एकजुटीची वज्रमुठ दाखविणे गरजेचे आहे.ती दाखविली गेली नाही तर "आज माझी,उद्या तुझी बारी" या न्यायानं सर्वाना आडवं करायचे प्रय़त्न होत राहणार हे नक्की.,मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकारानं राज्यातील सोळा संघटनांनी  एकत्र येत महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली आहे.आपल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी या समितीच्या झेंड्याखाली साऱ्यांनी एकत्र आले पाहिजे एवढीच सर्व पत्रकारांना विनंती.या निमित्तानं जनतेलाही आमची विनंती आहे की,माध्यमांच्या प्रश्नाकडं ते केवळ एका घटकाचे प्रश्न आहेत या भावनेतून न बघ ता ते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे प्रश्न आहेत या व्यापक भूमिकेतून पहावे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी,जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी राज्यात आणि देशात वृत्तपत्रांना निर्भयपणे काम करता यावे असे वातावरण करावे यासाठी जनतेनं सरकारवर दबाव आणावा ही देशवासियांना आणि महाराष्ट्रातील जनतेला विनंती.गेल्या काही वर्षात देशात जे महाघोटाळे झाले,लोकहितविरोधी ज्या कारवाया झाल्या त्याचा पडदाफास माध्मयांनीच केलेला आहे.माध्यमांच्या या कामामुळं अनेकांचे राजकीय जीवन संपुष्टात आले,कित्येकांना तिहारची किंवा एरवड्याची हवा खावी लागली,कित्येक जण होत्याचे नव्हते झाले.ही सारी मंडली किंवा त्यांच्यासारखीच सुपात असलेली मंडळी माध्यमांच्या आरत्या उ तारेल असे तर होणार नाही ते माध्यमांच्या मुळावरच घाव घालण्याचा  प्रयत्न करीत राहणारच.या प्रयत्नात राजकाऱणी यशस्वी झाले तर देशातील सामांन्य जनतेला कोणी वाली उरणार नाही म्हणूनच माध्यमांच्या हक्कासाठीच्या आमच्या लढयाला जनतेचाही पाठिंबा मिळाला पाहिजे अशी  अपेक्षा आहे.

एस.एम.देशमुख
निमंत्रक,    
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मुंबई 

मुंबईत महिला फोटोग्राफरवर गँगरेप

मुंबई: महालक्ष्मीजवळ शक्ती मिल परिसरात एका मासिकाच्या महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्यांचं सांगण्यात येतं आहे. या महिलेवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.

पीडित महिला ही एका मासिकात फोटाग्राफर म्हणून काम करते. ती आपल्या मित्रासोबत शक्ती मिलचे फोटो काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथे आलेल्या दोन तरुणांनी येथे फोटो काढण्यासाठी परवानगीची गरज असल्याचं सांगत महिलेला तिथून आत घेऊन गेले आणि तिच्यावर अत्याचार केला.

यावेळी त्या 2 तरुणांसोबत असलेल्या इतरांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचं सांगण्यात येतंय.

याप्रकरणी एन एम जोशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला असून 10 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गृहमंत्र्यांचं आश्वासन

या सर्व घटनेनंतर गृहमंत्री आर आर पाटील यांनी जसलोक रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. या सर्व प्रकऱणाची गंभीरपणे दखल घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडू असं आश्वासन आर आर पाटील यांनी दिलं आहे.

आर आर, राजीनामा द्या- फडणवीस

दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मुंबई सुरक्षित शहर न होता, ते बलात्कारी शहर होत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तंसच याप्रकरणी आर आर पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडून निषेध
मुंबईत महिला फोटोग्राफरवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
 समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी सांगितले, की औरंगाबाद येथे दि.24 आणि 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशात या घटनेचा निषेध म्हणून पत्रकार काळ्या फिती लावून,अधिवेशनात सहभागी होतील,तसेच या दिवशी उग्र आंदोलन करण्यात करण्यात येणार आहे.
हे उग्र आंदोलन काय असेल,याचा तपशिल देशमुख हे औरंगाबादेत जाहीर करणार आहेत.

मुंबईत महिला फोटोग्राफरवर बलात्कार करणाऱ्या आरोपींचे रेखाचित्रे...
 

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

डॉक्टर, या दिव्याची मशाल होईल!

डॉक्टर, 
 तुम्ही किती संयत, सुसंगत… किती सुरेल, समतोल… झपाटलेलं जाणतेपण तुमच्यात अंगभूत, ओतप्रोत. या मरणासन्न समाजाला जागे करत विचारांचा जागर अहोरात्र करणारे तुम्ही! बाकीचे कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत कोसळत असताना अथवा संधीसाधू दांभिकांच्या पंढरीत विरघळून जात असताना तुम्ही मात्र समकालीन समंजसपणासह पुढे धावत राहिलात. तुम्ही संघटन करत राहिलात, संस्था उभ्या करत राहिलात, एखाद्या कॉर्पोरेट सीईओच्या व्यवस्थापनकुशलतेनं. तर्ककठोर ज्ञानर्षीच्या ज्ञानासक्तीनं. फाटक्या कार्यकर्त्याच्या झपाटलेपणानं! माणसं घडवत आणि त्यांना प्रयोजनासह उभं करत, विवेकाला मस्तकी धरत या महाराष्ट्रभूमीत अवघा हलकल्लोळ केलात तुम्ही!
कारण, तुम्हीच एकदा म्हणाला होता, अंधाराचा बभ्रा जास्त होतो. प्रत्यक्षात अंधार तेवढा घनघोर नसतो. या अंधाराचं मार्केटिंग मुद्दाम केलं जातं. (मार्केटिंगचे तर तुम्ही जाणकारच!) कारण त्यात अनेकांचे हितसंबंध सामावलेले असतात. तुम्ही रस्त्यावर येऊच नये म्हणून ते अंधारवाले जाहिरातबाजी करत राहतात. पण, प्रत्यक्षात मात्र अंधार तेवढा काही शक्तिशाली नसतो. आपण आपली पणती हातात घेऊन धावत राहिलं की अंधाराची सेना आपोआप गारद होते! तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइडही. तुम्ही असं सांगितलं की मलाही ते पटत असे. पण, डॉक्टर, आपला अंदाज चुकला बहुधा. कारण, अंधाराच्या बाजूला नक्की किती सैन्य आहे, याचा अदमासच आपल्याला नाही आला. कळतनकळत आपलंही सैन्य अंधाराला जाऊन मिळाल्याचं लक्षात नाही का आलं आपल्या? लाभार्थी होण्यासाठी जो-तो अंधारशरण होत असताना झाडाझडती अटळ असते, डॉक्टर!
तुम्ही विचार करायला का घाबरता, असा रोकडा सवाल विचारणार्‍या आगरकरांचाही इथे खून नाही झाला. खून ना फुल्यांचा झाला, ना राजा राममोहन रॉय यांचा. अठराव्या, एकोणिसाव्या, विसाव्या शतकातील प्रतिगामी व्यवस्थेत जे घडले नाही, ते एकविसाव्या शतकात, लोकशाही व्यवस्थेत, ज्ञानाधारित समाजात घडावे!
दाभोळकर अनेकांना गैरसोईचे होते हे खरे, कारण ते प्रश्न विचारत होते, आव्हान देत होते. खुलेपणाला आवाहन करत विवेकवादाला अधोरेखित करत होते. तुकारामाचा खरा वारसा सांगत या राज्याला विवेकाचं अधिष्ठान देऊ पाहत होते. पण, ग्यानबातुकारामावर आपली दुकानदारी सांभाळणार्‍यांनातरी हा विवेकाचा जागर कसा आवडेल? विचारांच्या गळचेपीसाठी, अभिव्यक्तीच्या पायमल्लीसाठी व्यवस्था कार्यरत असताना विचारांचा जागर फारच महत्त्वाचा आहे, हे भान डॉक्टरांना होते. विचार ही कोणत्याही कृतीसाठी पूर्वअट असते. मात्र, विचार करायला घाबरणं, हे कोणत्याही समाजाचे लक्षण असते. अशावेळी समाजाला विचारप्रवृत्त करणार्‍या चळवळी महत्त्वाच्या. पण प्रस्थापितांना असं आव्हान कधीच नको असतं. आणि असे सरंजामी मूलतत्त्ववादी सत्तेच्या केंद्रबिंदूजवळ येतात, तेव्हा त्यांची मस्ती आणखी वाढते. त्यांना बहुविधता नको असते, मतमतांतरं नको असतात. समीक्षण नको असतं. म्हणून त्यांना दाभोळकर नको असतात.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या कोणा माथेफिरुनं केलेली नाही आणि ती सुटी, एकटी अशी घटनाही नाही. त्यामागे एक कारणपरंपरा आहे. एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. गेले कित्येक दिवस जे पेरलं जात होतं, त्याचा परिपाक आहे हा! ते पेरलं जात होतं तेव्हा आपण त्याचे साक्षीदार होतो. कधी झोपेचं सोंग घेत, कधी खरोखरीच झोपत, कधी जागे राहून टक्क डोळ्यांनी बघत, तर कधी थेट ती कृती करत आपण त्यात सहभागी झालो. रोम जळत असताना फिडल वाजवणार्‍या नीरोला शिव्या घालत प्रत्यक्षात आपणही त्याच्या पार्टीत सामील झालो. पी. साईनाथ म्हणतात त्याप्रमाणे, नीरोचे गेस्ट आहोत आपण! त्यामुळे आता अचानकपणे आपल्याला धक्का बसण्याचं कारण नाही. इतर कोणाकडे बोट दाखवण्यात हशील नाही. ती जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकाची आहे.
गेल्या काही दिवसांपासून जे सुरु होतं, त्यातून हे असं घडणं अटळ होतं. कधी एखाद्या पुस्तकाचं निमित्त करुन संशोधन संस्थेवर हल्ले चढवले जाणार, कधी जातींचे पुढारी असे मस्तवाल होत जाणार की थेट मंत्रालयात त्यांचा दबदबा वाढावा, कधी आमच्या धर्माला, आमच्या धारणेला आव्हान देतो म्हणून विचारवंतांवर हल्ले होणार, जातपंचायतीच्या बडग्यामुळे एखादी कळी कुस्करली जाणार, धर्म-अध्यात्माच्या नावाखाली बाबाबुवांचे महत्त्व एवढं वाढणार की त्यांचं संस्थीभवन होत जाणार! या अशा वातावरणात डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या कृतिशील विचारवंताची हत्या झाली आहे. जगण्याची सगळी क्षेत्रं आपण अशा लोकांच्या ताब्यात दिली आहेत आणि आता या जगण्यावर आपला हक्क उरलेला नाही. संकुचित लाभासाठी, लोभाच्या हितसंबंधांसाठी आपण सगळेच या व्यवस्थेचे भागीदार झालो आहोत. रोज लोकशाहीचं अपहरण होत असताना ठेकेदारांच्या हातात आपण संपूर्ण व्यवस्था सोपवली आहे. त्यातून भवताल असा आक्रसून गेला आहे आणि मेघांनी नभ काळवंडून गेलं आहे की इथल्या मातीत असं काही पेरलं जाणं आणि ते उगवून येणं अस्वाभाविक नाही.
अशा वळणावर उभे आहोत आपण...! असहिष्णुतेनं असं निर्लज्ज, हिंस्त्र टोक गाठलं आहे की, अवघी आशाच संपून जावी...गुन्हा काय त्याचा, तर त्याने विवेकाचा जागर केला...! गुन्हा काय त्याचा, तर त्यानं तुम्हांला विचार करायला भाग पाडलं! प्रत्ययासे ज्ञान, तेच ते प्रमाण असे मांडत,
सत्य असत्याशी मन केले ग्वाही,
मानियले नाही बहुमता,
या वाटेनं जात त्यानं कैक ठेकेदारांना आव्हान दिलं... अनेकांच्या दुकानांना त्यामुळे कुलुप लागलं! म्हणून, त्याचा खून केला त्यांनी दिवसाढवळ्या?
या मातीत असा विखार वाढू लागला आहे की व्यक्तिगत आणि सामूहिक जगणंच त्यामुळे विकृतीच्या स्तरावर जाऊन पोहोचलं आहे. एखादा माणूस आवडत नाही, पटत नाही, तर त्याला संपवून टाकायला हवं, ही असहिष्णूता सर्वदूर दिसू लागली आहे. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही.
गेल्या काही दिवसांपासून मी हे पोटतिडकीनं मांडतो आहे. 'कृषीवल'च्या दिवाळी अंकातील निबंधात मी म्हटलं होतं - एकविसाव्या शतकात ज्या अंतर्विरोधाचा सामना आपण करत आहोत, त्याकडे मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. एकीकडे आपण अतिशय प्रगत आणि आधुनिक अशा टप्प्यावर प्रवेश केला आहे आणि त्याचवेळी आपले जगणे कमालीचे अविवेकी व्हावे अशी स्थिती उदभवलेली आहे. अभिव्यक्तीची आणि माहितीची साधने एवढ्या झपाट्याने वाढत चालली आहेत, पण विचार करण्याची साधने मात्र आक्रसत आहेत. आपल्यासमोर हा पेच आज उभा आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे, विचार करणे ही माणसाची मूलभूत सवय असली तरी विचार करण्याचे टाळणे हीही त्याची स्वाभाविक, सहज अशी प्रवृत्ती आहे. तुम्ही विचार करायला का घाबरता, असे गोपाळ गणेश आगरकर म्हणाले त्याला अनेक वर्षे उलटून गेली. पण आजतागायत तो प्रश्न कायम आहे. शक्यतो विचार करायचे टाळणे लोकांना आवडते. कारण विचार करायचा म्हणजे सूर्याच्या तेजात, आगीत होरपळून जायचे. त्यापेक्षा अविचाराने वागणे सोपे असते. म्हणून माणसांनी चाकोर्‍या निर्माण केल्या. चाकोरीमध्ये तोचतोचपणा असेल पण सुरक्षितता असते. त्यामुळे विचार करण्याच्या फंदात न पडणे लोकांना आवडते. याचा अर्थ ते अविचार करतात असे नाही, पण न विचार करताना मात्र दिसतात. 'थुंकू नका' असे फलक सर्वत्र रस्त्यांवर दिसतात. पण ते आपण कधी गांभीर्याने घेत नाही. याउलट 'थिंकू नका', असे फलक कुठेही नसतात, पण ते आपण डोक्यात घट्ट मारून घेतले आहेत. अप्रगत समाजात माणसे अशी वागत असतात तेव्हा चालते फारतर, पण समाजाची लौकिक प्रगती होत असताना विचारापासून असे दूर जाणे हे खरे नाही. कारण त्यातून दुभंग समाज जन्माला येत असतो. असा स्किझोफ्रेनिक समाज अनेक समस्या निर्माण करतो. हा अविवेक दूर करण्याऐवजी या अविवेकाचे राजकारण करण्याचा प्रयत्न व्यवस्थेकडून होत असतो. प्रस्थापितांना असा अविवेक हवाच असतो. किंबहुना त्यातच त्यांचे हितसंबंध असतात. हा अविवेक सर्व क्षेत्रात असतो. त्यात केवळ श्रद्धा- अंधश्रद्धा एवढाच मुद्दा असतो, असे नाही. मग तो विकासाचा आराखडा असो वा निवडणुकीचा आखाडा असो, लग्नाचा मंडप असो की घराचा उंबरठा असो, सगळीकडे पायाच अविवेकाचा असेल तर यापेक्षा वेगळे काय होणार! भारतात सध्या ज्या समस्यांना आपण तोंड देत आहोत त्याचे मुख्य कारण हे आहे. विवेकाचे बोट सुटले की कोंडी होते. आपण खापर कधी राजकारणावर फोडतो तर कधी जागतिकीकरणावर. कधी ते भांडवलवादावर फुटते तर कधी माध्यमांवर. पण एकमेव कारण खरे आहे. ते म्हणजे विवेकाचे बोट आपण सोडले आहे. त्याला आणखी एक पदर आहे. व्यक्तिगत जीवनात आपण दांभिक आहोत आणि सामूहिक जीवनात अविवेकी. हा पेच आज आपल्यासमोर आहे.
भारतात लोकशाही प्रगल्भ आहे हे खरं, पण तीही अशा गोष्टींचा आधार कळतनकळत घेते. कधी धर्माचं भय दाखवून, कधी नैतिकतेचा बागुलबुवा उभा करून, तर कधी जातीय समीकरणे मांडून, कधी पैशांचं आमिष दाखवून सामान्य माणसाला फसवण्याची प्रवृत्ती लोकशाही चौकटीतही दिसते. खरंतर आमिष आहे म्हणजे पुढे सापळा असणार हे आमच्या सामान्य आदिवाशाला समजतं. पण, तरीही वारंवार फसत राहतो सामान्य माणूस. मग लक्षात येतं की, त्याचंही ते संकुचित राजकारण असतं. सामान्य माणूस वाटतो तसा भाबडा नसतो. व्यवस्था त्याला जशी वापरून घेते, तसंच सामान्य माणूसही व्यवस्थेला वापरून घेत असतो! कारण त्याला विचार न करता शॉर्टकटचे स्वार्थ हवे असतात. त्यातून होतं ते मात्र दीर्घकालीन नुकसान.
त्या हानीचा अंदाज आतातरी आपल्याला यायला हरकत नाही. जागतिकीकरणानंतरच्या खुलेपणाचं वारे पिऊन सरंजामी शक्ती मस्तवाल होत असताना व्यवस्था अधिकच बंदिस्त करण्यासाठी प्रस्थापितांची धडपड सुरु आहे. या अंतर्विरोधाचं सोदाहरण स्पष्टीकरण म्हणून या भ्याड हल्ल्याकडे पाहिले पाहिजे.
अर्थात, मूलतत्त्ववादी-विभाजनवादी वृत्ती आणि दहशतवादी निर्बुद्ध असतात. किंबहुना निर्बुद्ध असतात म्हणूनच तर त्या मूलतत्त्ववाद, दहशतवाद, विभाजनवाद याकडे वळतात. इतिहासापासून या वृत्ती धडा घेत नाहीत. त्यांना हे समजत नाही की माणसं मेल्यानं अथवा मारल्यानं विचार नष्ट झाल्याचे एकही उदाहरण नाही. ‘वार्‍याहाती दिले माप’, अशा आवेगानं विस्तारलेले विचार ‘की तोडिला तरु फुटे अधिक भराने’, प्रमाणं अधिकच पुष्ट होतात. अधिक रसरशीत आणि समकालीन होत जातात.
विचारांचा जागर घालतो या गुन्ह्यासाठी त्यांनी दाभोळकरांची हत्या केली असेल, तर मग खरे गुन्हेगार त्यांना ठाऊकच नाहीत. नीट पाहिले तर त्यांना जाणवेल, घराघरात असे दाभोळकर आहेत. महाराष्ट्राची मान शरमेनं झुकवणारी, सुन्न करणारी, हादरवून टाकणारी अशी ही हत्या आहे, पण या आघातानं परिवर्तनवादी खचणार नाहीत. उलट अधिक एकसंध, एकात्म आणि सजग होत जातील!
श्रद्धा या संकल्पनेचा अर्थ आणि आशय ज्यांनी आयुष्यभर स्पष्ट केला, त्या दाभोळकरांना श्रद्धांजली वाहताना जबाबदारीची जाणीव ठळक होत चालली आहे.
डॉक्टर, तुम्हांला आज आश्वासन एवढेच. दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न कितीही होवोत, अंधाराचा बभ्रा कितीही वाढो… आमच्या हातात दिवा आहे, तुम्ही दिलेला. तो तेवत राहील, विझणार नाही! आता तर त्या दिव्याची मशाल होईल.
-संजय आवटे

'मायबोली' 

( डॉ.नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीचे प्रणेते होतेच शिवाय ते साने गुरूजींनी सुरू केलेल्या साधना मासिकाचे संपादक होते. ते जसे चळवळीचे नेते होते,तसेच ते एक हाडाचे पत्रकारही होते.त्यांचे प्रबोधनात्मक अनेक लेख विविध वृत्तपत्रांत प्रसिध्द होत असत.त्यांना बेरक्या परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली... )

मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाची जय्यत तयारी

मराठी पत्रकार परिषदेचे ३९ वे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या २४ आणि २५ ऑगस्ट औरंगाबादेत होत आहे. सिडको भागातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज नाट्यगृहात  होणा-या या अधिवेशाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.पत्रकारितेची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद पां.वा.गाडगीळ,आचार्य प्र.के.अत्रे,ह.रा.महाजनी,ज.श्री.टिळक,बाळासाहेब भारदे,अनंतराव भालेराव यांच्यासारख्या थोर पत्रकारांनी भूषविले आहे.
औरंगाबादेत दोन दिवस होणा-या या अधिवेशात दिनांक २४ ऑगस्ट रोजी  पत्रकार संरक्षण कायद्याची गरज आहे का आणि  ग्रामीण पत्रकारांच्या समस्या आणि आणि उपाय या विषयावर तर दि.२५ ऑगस्ट रोजी  संपादक नावाची प्रभावशाली संस्था निस्तेज होत आहे का ? आणि  प्रसारमाध्यमे बेजबाबदार होत आहेत काय ? या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.
या अधिवेशाची अत्यंत आकर्षक निमंत्रण पत्रिका सर्व पत्रकारांना पाठविण्यात आली आहे.ज्यांना मिळाली नसेल त्यांनी हीच निमंत्रण पत्रिका समजून अधिवेशनास येण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषद आणि औंरगाबाद जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

गृहलक्ष्मीच्या माजी संपादिका जगताहेत, फुटपाथवर आयुष्य...

आयुष्यभर जगाची उठाठेव करणाऱ्या पत्रकारांच्या उत्तर आयुष्यात कोणत्या दिव्याला सामोरं जावं लागतंय याचं एक उदाहऱण जनसत्ता एक्स्प्रेस नावाच्या हिंदी वेबसाईटनं समोर आणलं आहे.
सुनीता नाईक नावाच्या महिला पत्रकाराची ही कहानी आहे.सुनीता नाईक या कधी काळी गृहलक्ष्मी या मासिकाच्या मराठी आवृत्तीच्या संपादिका होत्या.नोकरीत असताना त्यांच्याकडं स्वतःाचं घर होतं,पैसे -अडके होते पण आज त्यांच्यावर नयतीनं अशी वेळ आणली आहे की,त्या थेट रस्त्यावर आल्या आहेत,मुंबईतील वर्सेवा भागातल्या जेपी रोडवर असलेल्या एका गुरुव्दाराच्या बाहेर असलेला फुटपाथ हेच त्यांचं घर बनलं आहे.अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्या जीवन जगत आहेत.

लहानपणीच त्यांचे आई-वडिल वारले,पुण्यात त्यांचे शिक्षण झाले.तेथे त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खास महिलांसाठी असलेल्या गृहलक्ष्मी या मासिकाच्या त्या संपादिका झाल्या.80च्या दशकाच्या सुरूवातीचा तो काळ होता.नोकरीच्या काळात त्या प्रभादेवी भागातील जयंत अपार्टमेंटमध्ये स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होत्या.मात्र काही वर्षांपूर्वी गृहलक्ष्मी बंद पडले आणि नाईक बेकार झाल्या.घर, गाडी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली.त्यानंतर त्या ठाण्यात भाड्यानं घेतलेल्या एका बंगल्यात राहू लागल्या.आज-उद्या नवी नोकरी मिळेल या आशेवर राहणाऱ्या नाईक यांच्याजवळचे सर्व पैसे संपत आले आणि एकवेळ अशी आली की,कफल्लक झालेल्या सुनीता नाईक बंगल्यातून थेट रस्त्यावर आल्या.गेल्या दोन महिन्यापासून फुटपाथ हाच त्यांचा आशियाना झाला आहे.सुनीता नाईक आजही स्वाभिमानी आहेत.कधी काळी त्यांच्याबरोबर काम केलेल्या सहकाऱ्यांनी काही मदत देऊ केली तर सविनय ती नाकारतात.पाच भाषांवर प्रभुत्व असलेल्या सुनीता नाईक यांची आज झालेली अवस्था हा पत्रकारितेचा खरा चेहरा आहे असे आम्हाला वाटते. सरकारने सुनीता नाईक यांच्यासाठी त्याचं पुढील आयुष्य तरी सुखानं जाईल असं काही केलं पाहिजे ही आपली मागणी आहे. सुनीता नाईक रस्त्यावर आल्या आहेत अनेक वयोवृध्द पत्रकार भलेही फुटपाथवर आले नसतील पण त्यांची अवस्था सुनीता नाईक पेक्षा कमी नाही.आम्ही पत्रकार पेन्शनची मागणी करतो आहोत ती वृध्दावस्थेत तरी पत्रकारांना सन्मानाने दोन वेळचे जेवण तरी मिळावे.मात्र गरज नसताना स्वतःचे पगार भरमसाठ वाढवून घेणारे आमदार पत्रकारांनी पेन्शन मागितली की,यांना काय गरज आहे असे म्हणत विषय टोलवून लावतात.पत्रकारांना पेन्शनची गरज का आङे हे सरकारला किमान वरील फोटो पाहून तरी कळावे हीच अपेक्षा आहे.सरकारने पत्रकारांना ताबडातोब पेन्शन मंजूर केली पाहिजे.आमदारांना दिल्या गेलेल्या पेन्शनवाढीच्या विरोधात आम्ही याचिका मंगळवारी दाखल करतो आहोतच.

 Batmeedar....गृह गेलं लक्ष्मी रुसली

काळाचं चक्र कधी उलटं फिरेल याचा नेम नाही... कधी रंकाचा राजा होतो... तर कधी राजाचा रंक... अशीच एक कहाणी एका संपादिकेची... पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट....


शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१३

‘पंढरी भूषण’ हे जिल्ह्याचे मुखपत्र बनेल -संजय आवटे

पंढरपूर - विठूरायाच्या पंढरी नगरीत नव्याने सुरु होणारे ‘पंढरी भूषण’  हे दैनिक आपल्या इच्छा, आकांक्षांना आवाज देईल. लोकसहभागातून त्याचा मोठ्याप्रमाणावर विस्तार होईल. प्रत्येकाला हे दैनिक माझे आहे, असे वाटेल आणि काही काळातच ते इथल्या जनतेचे मुखपत्र बनेल, असा विश्वास जेष्ठ पत्रकार आणि दै. कृषीवलचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केला.

साप्ताहिक दीपज्योती परिवाराच्यावतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या ‘दै. पंढरी भूषण’  चा प्रकाशन सोहळा गुरुवारी येथील संत तनपुरे महाराज मठात झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एस.टी. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. भारत भालके, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष सुभाष वारे, निवृत्त माहिती संचालक वसंतराव शिर्के यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आवटे म्हणाले, पंढरी भूषण हे दैनिक माध्यमांच्या विश्वात ख-या अर्थाने पंढरीचे भूषण ठरले आहे. आगामी काळात आणखी उत्तम कार्य करून पंढरपूरकरांचा विश्वास हे दैनिक सार्थ ठरेल. ही माध्यम विश्वात कल्पनेपेक्षा अफाट बदल होत आहेत. पुर्वीसारखी या क्षेत्रात कोणाची मक्तेदारी राहिली नाही. कोणीही आता लिहू शकतो, अशी परिस्थिती आहे. सोशल मिडीया साईटस्वर आपल्याला हे अनुभवास येत आहे.

सध्या अनेक मोठी वृत्तपत्रे स्थानिक जिल्हा पातळीवर येवून आपल्या जिल्हा आवृत्ती काढत आहेत.  त्याचे कारण असे की, येत्या स्पर्धेच्या काळात माध्यमांना टिकून रहावयाचे असल्यास स्थानिक पातळीवर येवून काम करावे लागेल. त्यामुळे स्थानिक छोट्या दैनिकांना येत्या काळात उज्वल भवितव्य आहे. भारताच्या अभ्युदयात महत्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर ती म्हणजे माध्यमांनी. जागतिकीकरणानंतर माध्यम विश्वात पसारा मोठा वाढला असल्याने आता त्यात अनेकांना संधी उपलब्ध झाल्या आहेत. धर्म, जात आणि लिंगाच्या पलीकडे माध्यम पोहोचले आहे. हा बदल माणुसकीच्या दिशेने जाणारा आहे. विचार आणि कृती यात कसलीही तफावत न ठेवता जनसामान्यात हे दैनिक अढळ स्थान निर्माण केले. प्रत्येकाला हे दैनिक माझे आहे, असे वाटेल आणि काही काळातच ते जनतेचे मुखपत्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आ. भारत भालके म्हणाले, २१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्व क्षेत्रात बदल होत आहेत. तसेच वृत्तपत्र क्षेत्रातही बदल होत आहेत. आगामी काळात तर माध्यमांना मोठ्या प्रमाणावर वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे. मोबाईलवर इंटरनेटच्या माध्यमातून बातम्या सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक वृत्तवाहिन्या असल्यामुळे जगाच्या कानाकोप-यातील प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत सहज पोहोतचे. असे असताना वृत्तपत्रांनी नेमकी कोणती भूमिका घ्यायला हवी ? याबाबतचा विचार होणे आवश्यक आहे. आपल्या शक्तीने, बुद्धीने व युक्तीने आपण या सा-यांवर मात करून हे दैनिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वैचारिक, दर्जेदार मजकुरावर आपण अधिकाधिक भर देवून वाचकांना आकर्षित कराल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्र सेवा दलाचे सुभाष वारे म्हणाले, दैनिकांनी व्यापक हिताचे प्रश्न हाताळण्याची आवश्यकता आहे. राजकीय मंडळींचा दांभिकपणा समोर आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. जातीच्या, धर्माच्या नावाने संघटना का चालविल्या जातात, त्यामागचे खरे कारण काय ? याचा शोध घ्यायला हवा. सध्या देशात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. यातील अनेक प्रकरणे ही माध्यमांनी उकरून काढली आहेत. माध्यमांचेच हे यश म्हणावे लागेल. यासा-या प्रक्रियेत विरोधी पक्ष कुठे आहे ? याचाही विचार आपण करायला हवा. यामागची खरी कारणे समोर आणण्यासाठी दैनिकांनी पुढाकार घ्यायला हवा. बहुजनांच्या सांस्कृतिक जिवनाला आयाम देण्याचे काम आजपर्यंत दीपज्योती परिवाराने केले आहे. आगामी काळातही ते अशाच पध्दतीने सुरु राहिल, असा विश्वास मला वाटतो. जनतेच्या प्रश्नांना बांधील असणारे हे वृत्तपत्र असावे. प्रत्येक जनतेने हे आपले वर्तमानपत्र आहे, असे मानले पाहिजे. असे कार्य आपल्या हातून घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वसंतराव शिर्के म्हणाले, समाजवादी विचारांच्या मुशीतून हे दैनिक तयार झाले आहे. त्यामुळे समाजवादी विचार आणखी जोपासला जावून ते अधिक प्रमाणात रुजेल. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची धडपड आपल्या दैनिकाच्या माध्यमातून होईल. शासनाच्यावषतीने पत्रकारांसाठी अनेक सोई-सुविधा देण्यात येतात. त्याचा लाभ सर्व पत्रकारांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपाचे शहराध्यक्ष उमेश वाघुलीकर म्हणाले, संपादक शिवाजीराव शिंदे हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना उत्तमरितीने पत्रकारिताही केली आहे. त्यांचे हे कार्य साप्ताहिक दीपज्योतीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचले आहे. अथक परिश्रमातून व खडतर वाटचालीतून त्यांनी सा. दीपज्योतीला लोकप्रियता मिळवून दिली तशीच दै. पंढरी भूषण या दैनिकाला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी आ. सुधाकरपंत परिचारक म्हणाले, पंढरपूरकरांसाठी ही खरी आनंदाची बाब आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या दैनिकाने करावा. स्थानिक भागातील प्रश्नांना आपल्या दैनिकात उत्तम प्रकारे स्थान द्यावे. जनतेच्या अपेक्षांना बळ देण्याचे काम आपल्या दैनिकाच्या माध्यमातून होईल. आम्हा सर्वांना अभिमान वाटावा असे कार्य आपण दैनिकाच्या माध्यमातून कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपले दैनिक अतिशय दर्जेदारपणे प्रकाशित होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंढरी नगरीत पंढरीभूषणचे प्रकाशन

पंढरपुर - विठूरायाच्या पंढरी नगरीत गुरुवारी शानदार सोहळ्यात दै. पंढरी भुषणचे प्रकाशन करण्यात करण्यात आले. कृषीवलचे संपादक संजय आवटे, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, आ.भारत भालके, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष प्रा. सुभाष वारे यांच्या हस्ते या दैनिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने माध्यमांची सध्यस्थिती आणि आगामी वाटचाल याविषयी संजय आवटे यांनी केलेले आवेशपुर्ण भाष्य सोहळ्याचे खास वैशिष्ट्य ठरले. दैनिकाचा उत्तम लेआऊट, संस्थापक संपादक शिवाजीराव शिंदे यांना माध्यम क्षेत्रातील असलेला अनुभव गेली ११ वर्षे ते दीपज्याती नावाचे साप्ताहिक चालवित आहेत  आणि तरुण, नव्या दमाचे कार्यकारी संपादक रविराज कुचेकर या दैनिकाला लाभल्याने अल्पावधीतच हे दैनिक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचेल, असा विश्वास अनेक मान्ववरांनी व्यक्त केला. रविराज कुचेकर हे शैलिदार लेखणीसाठी ख्यातनाम असेलेले दै. कृषीवलचे संपादक संजय आवटे तसेच जेष्ठ पत्रकार, टेक्नोसेव्ही, आणि लेआउटची खास जाण असलेले विक्रांत पाटील यांच्या मुशीतून तयार झाले आहेत. कृषीवलमध्ये त्यांनी आपल्या कार्याची छाप उमटवली होती. या दोन्ही गुरुंचा हा शिष्य पंढरपूरमध्ये आपली कारकीर्द गाजवेल असा विश्वास संस्थापक संपादकांनी व्यक्त केला. 

मुंबई वृत्तपत्रांचा भुखंड घोटाळा, लोकमत,पुढारी,गांवकरी,सामनाच्या चौकशीचे आदेश तर तरूण भारत आणि विवेककडून वसुलीचे आदेश

मुंबई - वृत्तपत्र प्रिंटीग प्रेस,कार्यालय आणि कार्यालयीन कर्मचा-यांसाठी निवासस्थाने यासाठी राज्य सरकारच्या सिडकोकडून नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी स्वस्तात भुखंड घेवून,ते बिल्डरला महागड्या किंमतीत विकणा-या लोकमत,पुढारी,गांवकरी,सामना,तरूण भारत आणि सा.विवेकला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोठा दणका दिला आहे.ऐवढेच नाही तर तरूण भारतकडून ४ कोटी आणि सा.विवेककडून ९३ लाख रूपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच अन्य चार वृत्तपत्राच्या भुखंड घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकारने वृत्तपत्रासाठी प्रिंटींग प्रेस,कार्यालय,कर्मचा-यांसाठी निवासस्थाने यासाठी स्वस्तात भूखंड दिलेले आहेत.मात्र वृत्तपत्राच्या मालकांनी त्याचे श्रीखंड केले आहे.त्याला आता मुंबई उच्च न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे.

नवी मुंबईत मुख्य रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी राज्य सरकारच्या सिडको विभागाने सन २००४ मध्ये लोकमत,पुढारी,गांवकरी,सामना,तरूण भारत आणि सा.विवेकसाठी १० हजार स्वेअर फुटपेक्षा जास्त आकाराचा भुखंड अत्यंत स्वत:त दिलेला आहे.या भुखंडावर संबंधित वृत्तपत्रांनी स्वत:चे पेपरचे प्रिंटींग युनिट,कार्यालय,कर्मचा-यांसाठी निवासस्थाने बांधण्यासाठी निर्देश दिले होते.मात्र त्यापैकी काही वृत्तपत्रांच्या मालकांनी हे भुखंड बिल्डरला करोडो रूपयाला विकूण टाकले आहेत.तसेच या जागेवर प्रिंटींग युनिटऐवजी मंगल कार्यालय,दुकाने बांधून भाड्याने दिलेली आहेत.

या हेराफेरी संदर्भात संदीप ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.या याचिकेवर निर्णय देताना,उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला.तरूण भारतकडून चार कोटी तर सा.विवेककडून ९३ लाख रूपये वसूलीचे आदेश दिले आहेत.तसेच अन्य चार वृत्तपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

वृत्तपत्रे नेहमीच आदर्श असो अथवा अन्य भुखंड घोटाळा,त्याची भली मोठी देतात,आता वृत्तपत्राच्या या भुखंड घोटाळयाची कोण बातमी देणार,याकडे लक्ष लागले आहे.

बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

अमरावतीचे शशांक चवरे यांचा खुलासा


एबीपी माझाचे अमरावतीचे स्ट्रींजर रिपोर्टर शशांक चवरे यांना एका डॉक्टराच्या मारहाण प्रकरणी एबीपी माझाने तडकाफडकी काढून टाकले. त्यानंतर चवरे यांनी आपले म्हणणे बेरक्याकडे कळविले आहे...काय आहे त्यांचे म्हणणे ...

 ................................................................
पत्रकाराने रुग्णाला केलीली ती मदत योग्य  नव्हती का ?

अमरावती - अपघात मध्ये जखमी झालेला गजानन कितुकले हा  ४५ वर्षीय व्यक्ती हा राजीव गांधी जीवनदायी योजनेत बसत असताना सुद्धा  डॉक्टर  सावदेकर यांनी   या गरीब(  बिपील ) लाभार्थीला या योजनेत बसविन्यास चक्क नकार दिला  ,  रुग्णाच्या पत्नी ने मंगळसूत्र , हातातल्या बांगळया विकून  १ लाख २ ० हजार रुपये खर्च रुग्णावर केले होते  मात्र  पैसे  संपल्याने  या रुगानाचे उपचार डॉक्टर नि थाबविले  म्हणून  abp माझाचे प्रतिनिधी शशांक चवरे यांनी  रुगाना सोबत  कोणतेही संबंध नसताना माणुसकीच्या भावनेतून   डॉक्टरना  उपचार करण्यसाठी  विनंती करीत होते  मात्र डॉक्टरनि राजीव गांधी योजनेत न बसविता उपचार थांबविले या  योजना चा  लाभ या लाभार्थीला मिळावा व रुगणाचे  प्राण वाचावे म्हणून शशांक चवरे प्रयत्न्न करीत होते मात्र डॉक्टर सावदेकर यांनी   ५ दिवस पासून रुग्णाचे उपचार थाबविले होते. अखेर काही पेशंट चे नातेवाईका  नि  शिव सेना जिल्हाप्रमुख  संजय बंड यांच्याकडे धाव घेतली.शिव सैनिकांनी डा .सावदेकर यांना  जाब विचारला त्यावेळी माध्यमाचे अनेक प्रतिनिधी हजर होते,परंतु डा नि उडावाउडवीची उत्तर दिल्याने शिवसैनिकांनी डा सावदेकर यांना चोप दिला, यावेळी  डॉक्टर च्या कक्षात असललेल्या ABP माझा चे प्रतिनिधी शशांक चवरे  सोबत बाचाबाची झाली , अखेर ८  ऑगस्ट ला या पेशंटला   जीवनदायी योजनेत बसविण्यत याले मात्र या रुगनाला  योग्य वेळी उपचार न मिळाल्याने ९  ऑगस्ट ला या रुग्णाचा  डा  नि रात्री १२.३० वा .   मृत्यू (संशयास्पद ) घोषित केला ..या गजानन यांच्या  मृत्यूला डा जबाबदार असल्याची तक्रार गजानन कितुकले यांची पत्नी व भाचा यांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल  केली  … 
 
डॉक्टर ने जर आधीच या रुग्णाला जीवनदायी योजनेत बसविले असते व वेळीच  उपचार केले असते तर  रुग्णाचे प्राण वाचले असते .(गजानन यांच्या   कुटुंबात  पत्नी ,२ लहान मुले व म्हातारी आई आहे , घरात कमविणारा हा एकटा च होता ) .आज मात्र गजानन  कितुकले यांचं कुटुंब निराधार झाले आहे …  
 
abp माझाचे प्रतिनिधी शशांक चवरे चा  उद्देश फक्त रुग्णाला योग्य उपचार मिळवावे व त्याचे  प्राण वाचविणे हाच होता पण डा च्या पैसे कम्विण्याच्या हव्य्साने अखेर एक कुटुंब उघड्यावर  आले आहे.यामुळे शहरत डा .बद्दल चांगलाच रोष  व्यक्त होत आहे ….ABP माझा चे प्रतिनिधी शशांक चवरे यांच्या मुळे शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत डॉक्टर  पेशंट व सरकारला कसे लुबाडतात हे उघडकीस आले …
एखाद्या पत्रकाराने बातमीचा विषय न करता एखाद्या गरीब रुग्णाला मदत करणे आणी अन्याय विरुध्द लढा देणे गुन्हा आहे का ?   

शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

दै. ‘दिव्य मराठी’च्या अमरावती आवृत्तीचे थाटात लोकार्पण

अमरावती - दै. ‘दिव्य मराठी’च्या अमरावती आवृत्तीचे आज (शनिवार) मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह दैनिक भास्करने दै. ‘दिव्य मराठी’च्या रूपाने विदर्भात पाऊल ठेवले असून, अमरावती ही दैनिकाची विदर्भातील अकोल्यानंतरची दुसरी आवृत्ती आहे.

अमरावती आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात थाटात पार पडला. भाजपचे सरचिटणीस खासदार राजीव प्रताप रुडी, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केरळचे माजी राज्यपाल रा. सू. गवई, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, सामाजिक न्याय व व्यसनमुक्ती कार्य मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व औषधी प्रशासनाचे मंत्री मनोहर नाईक, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रावसाहेब शेखावत, दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल आदी या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी पत्रकारितेत नवनवे विक्रम प्रस्थापित करणार्‍या या समूहाच्या महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर आणि अकोला आवृत्त्या आहेत. अमरावतीमधील वाचकांना 11 ऑगस्टपासून दै. ‘दिव्य मराठी’चा अंक मिळणार आहे.

'मटा'ची जळगावातील टीम फायनल

गेले दोन दिवस जळगाव दौऱ्यावर असलेल्या 'महाराष्ट्र टाईम्स'चे संपादक अशोक पानवलकर यांनी 'मटा'ची 'टीम जळगाव' फायनल केली आहे. 'मटा'चे 20 ऑगस्ट रोजी एका शानदार समारंभात जळगाव लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे. यावेळी बहुधा संपादकांसह दिल्लीतील बडी डायरेक्टर मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
 
'मटा'ची फायनल 'टीम जळगाव' अशी - 
विजय पाठक - ज्येष्ठ वार्ताहर (मटा) 
गौतम संचेती - खास वार्ताहर (मटा) 
प्रवीण चौधरी - मुख्य वार्ताहर (देशदूत) 
पंकज पाचपोळ - वरिष्ठ वार्ताहर (दिव्य मराठी)
विजय वाघमारे - वार्ताहर (साईमत)
मुग्धा चव्हाण - वार्ताहर (पुण्यनगरी) 
स्ट्रीन्जर :
गौरी जोशी - वार्ताहर भुसावळ (तरुण भारत) 
महेंद्र रामोशे - वार्ताहर अमळनेर (गांवकरी) 
 
याशिवाय 'मटा'तर्फे 20 ऑगस्टच्या आत चाळीसगाव, रावेर, चोपडा, जामनेर, पाचोरा, पारोळा या तालुक्याच्या ठिकाणीही स्ट्रीन्जर नेमले जाण्याची शक्यता आहे. इच्छुकांनी सचिन अहिरराव(नाशिक), अमित महाबळ(नाशिक) किंवा गौतम संचेती(टाईम्स कार्यालय, एक्सिस बँक एटीएमच्यावर, बळीराम पेठ, जळगाव) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

' झी 24 तास'मध्ये अस्वस्थता!


झी 24 तास हे मराठीतलं पहिल 24 तास न्यूज चॅनेल. मात्र हे चॅनेल आता न्यूज चॅनेल राहणार नाही. घसरता टीआरपी लक्षात घेउन पुढील एक-दोन महिन्यात झी 24 तास इन्फो-एंटरटेन्मेंट चॅनेल होणार आहे. यामुळे अनेक कर्मचारी कमी होण्याची शक्यता असल्यानं सर्वांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्या कोणत्याही मराठी चॅनेलमध्ये कर्मचा-यांची कपात करण्यात आली तेव्ही ती बहुजनांच्याच मुळावर आली आहे. आता 'झी 24 तास'मध्येही बहुजनांचीच कत्तल होणार अशी भीती अनेकांना सतावू लागली आहे. कॉस्ट कटिंगमध्ये सगळी 'अभिजन' मंडळी सुरक्षित राहतील, अशी चिन्हे आहेत. 

गेली 14 वर्षे 'झी न्यूज लिमिटेड' अशी बातमीकेंद्रीत असणारी ही कंपनी गेल्या महिन्यातच 'झी मिडीया कार्पोरेशन लिमिटेड' झालीय. 'वसुधैव कुटुंबकम' हे ब्रीद स्वीकारत कंपनीने वैश्विक चेहराही धारण केलाय. कंपनीचा सर्वाधिक टीआरपी व बिझनेस मनोरंजनातून येतोय. त्यामुळे फक्त बातम्यांची वाहिनी असू नये, हे धोरण कंपनीने मान्य केले आहे. त्याअंतर्गत आता सगळी 'वाट' लागणार आहे. 'अमुक-तमुक इथून-तिथून झी 24 तास साठी' ऐवजी आता हे बातमीदार 'अमुक-तमुक इथून-तिथून झी मिडीयासाठी' म्हणू लागले आहेत. 'एडिटर नीड नॉट टू बी जर्नालीस्ट' हे धोरण 'टाईम्स'ने प्रथमत: भारतात स्वीकारले. ते अलीकडेच 'झी 24 तास'ने लागू केलेय. त्यानंतर या चॅनेलमध्ये जातीयवाद निर्माण झाल्याचा आरोप केला जातोय. याच काळात चॅनेलला उतरती कळा लागली, टीआरपी घसरला, अनेक बहुजन बाहेर पडले व अभिजनांची मक्तेदारी निर्माण झाली, असेही आरोप होत आहेत. 

मराठीतील सर्वात जुन्या वृत्तवाहिनीतील मंडळींनी उपस्थित केलेले हे काही मुद्दे -  
1) पत्रकारितेतला अनूभव शून्य
2) मंत्र्यांशी सलगी असल्याच्या थापा मारणे
3) प्रत्येक सेलिब्रिटीच्या मागे लाळ घोटत फिरणे
4) कोणाच्याही माहितीत नसलेले लोक ऑफिसमध्ये आणून कर्मचा-यांचे डोके खाणे
5) अभिजनांना खास वागणूक आणि प्रगतीच्या संधी देणे
6) बहुजनांनी चॅनेल सोडून जावे अशी परिस्थिती तयार करणे
7) टीआरपीची जबाबदारी स्वत: न स्वीकारता ती कर्मचा-यांच्या माथी मारणे
8) पदाचा उपयोग स्वत:चा पीआर वाढवण्यासाठी करणे.
9) राज ठाकरे मित्र असल्याचे वारंवार सांगणे
10) इतरांच्या कामाचे श्रेय स्वत: घेणे
11) चॅनेलवर आपलीच छाया कशी दिसेल ? याची काळजी घेणे
12) फक्त अभिजनांना चांगली पगारवाढ व बढती देणे
13) वेगळी व रोख-ठोक मते मांडणाकरणा-या बहुजनांना चॅनेलमधून काढणे

असे 13 मुद्दे उपस्थित करून ओळखा पाहू कोण हा संपादक? असा प्रश्न या मंडळींनी केला आहे. अजूनही अनंत कारनामे आहेत. तूर्तास इतकेच... असेही कळविण्यात आले आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook