बेरक्याचे अंदाज तंतोतंत खरे ठरतात कसे ?

बेरक्याचे अंदाज जवळपास ९९ टक्के खरे ठरतात, यावर फेसबुकवरील आमचे एक मित्र गंमतीने म्हणाले,राजे तुमचे अंदाज कसे काय बरोबर ठरतात,ज्योतिष्यशास्त्राची पुस्तके वाचता का ? त्यांचा हा प्रश्न वाचून,हासूच आले...विचारात पडलो...आणि भूतकाळात गर्क झालो...
 21 मार्च 2011  रोजी अगदी सहज  म्हणून बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग सुरू केला...फेसबुकवर अकौंट उघडले...या माध्यमातून मराठवाड्यातील मीडियातील बातम्या प्रथमच झळकू लागल्या...हळू - हळू पुणे,नंतर मुंबई करीत संपूर्ण महाराष्ट्रात बेरक्याची व्याप्ती झाली...ज्यांनी बातमी दिली,त्यांचे नाव गुप्त ठेवले...आमच्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही,याची काळजी घेतली,त्यामुळे बेरक्यावर बातमी सांगणा-यांचा प्रचंड विश्वास निर्माण  झाला.या विश्वासातून या बातम्या मिळतात...बेरक्याचे प्रचंड सोर्स निर्माण झाले आहेत...कोणत्याही न्यूज पेपर आणि चॅनलमध्ये खुटकन् वाजले तरी,बेरक्यापर्यंत बातमी येते...जी त्या कार्यालयातही माहित नसते...बातमीची खातरजमा होते,आणि त्यातून बेरक्याच्या बातम्या ख-या ठरतात...
आम्ही ज्योतिष्यशास्त्राची पुस्तके वगैरे वाचत नाही...मात्र थर्ड लेन्स सतत जागृत असतो...हातातील  कंकणाला आरसा लागत नाही,तसेच मीडियाचे बातम्यांचे आहे...मीडियातील बातमी लपून राहत नाही,फक्त लागतो प्रचंड विश्वास,खात्री आणि लिखाणाची शैली...ती बेरक्याने मिळविली आहे...म्हणून सहज म्हणून सुरू केलेले हे अभियान आणि मिशन आमच्या अपेक्षेपेक्षा प्रचंड यशस्वी झाले आहे...अडीच वर्षात दहा लाख हिटस्चा टप्पा पार केलेला आहे...फेसबुकचे ५ हजार मित्र आणि १० हजार  Followed चे एक अकौंट हॅक होवूनही नविन दुस-या अकौंटने  ५ हजार आणि कितीतरी Followed मिळविले आहे...मात्र आम्हाला याचा माज नाही की गर्व नाही....फक्त अभिमान आहे,अभिमान याचा आहे,काही तरी आपल्या बांधवांसाठी केले म्हणून..
बेरक्यावर आपण जो विश्वास टाकला आहे,त्याला तडा जावू नये म्हणून आम्ही काळजी घेतोय...कोठे घसरणार नाही नाही याचाही विचार करतोय...सारखे एकप्रकारचे दडपण येत आहे...आम्ही एक नक्की सांगू, मिळालेल्या या यशाचा आम्ही कधीच दुरूपयोग करणार नाही...कोणाला नाहक बदनाम करणार नाही...जे चांगले आहेत,त्यांना नेहमी साथ देत राहू...जे दुर्जन आहेत,त्यांच्या शाब्दीक फटकारे देवू...बेरक्या कोणत्याही पत्रकार आणि वृत्तपत्र मालकांचा शत्रू नाही.काही चुकले तर त्या दाखविण्यासाठी एक माध्यम आहे...बाकी काही नाही...
बेरक्याने जे गुणवंत आहेत,त्यांच्यावर नेहमीच कौतुकाची,शाब्बासकीची पाठ थोपटली आहे...ज्यांच्यावर अन्याय झाला,त्यांच्यासाठी लेखणी झिजविली आहे..बेरक्या ब्लॉगच्या माध्यमातून कोणाताही वैयक्तीक स्वार्थ साधला नाही...
आम्ही काही वैयक्तीक कामात अडकलो किंवा मीडियात काही घडामोडी नसतील तर बेरक्या शांत झाला का, बेरक्या बंद पडला का अशा शंका काढत बसू नका...बेरक्याने यापुर्वी जाहीर केले आहे,आमचे नाव ओपण झाले तरी,नावासह पुढे येवू पण ब्लॉग बंद करणार नाही...
हा लेखण प्रपंच एवढ्यासाठी आहे की,आपण आपल्या ठिकाणी बेरक्या बना,मीडियातील आपल्या ठिकाणच्या ख-या बातम्या पाठवा,त्याची दखल घेतली जाईल..आपले नाव गुप्त ठेवले जाईल...मात्र एक करा,कृपया करून आपली वैयक्तीक दुश्मनी बेरक्याच्या माध्यमातून काढू नका...सर्वांच्या हिताची बातमी असेल तरच पाठवा नाही तर वैयक्तीक दुश्मनीच्या बातम्या बेरक्यावर स्थान नाही...आपले सहकार्य आहेच,ते कायम ठेवा...बेरक्याला मनापासून साथ द्या,प्रेम करा...बाकी काही अपेक्षा नाही...तुमचे प्रेम हीच आमची शिदोरी आहे...

बेरक्या उर्फ नारद