> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

करूण निस्तेजपाल ( लोकसत्ताचा दि. 29 नोव्हेंबरचा अग्रलेख)

स्थितीवादी आणि प्रतिगामी पत्रकारितेच्या उत्थानासाठीच आपले अवतारकार्य आहे असे तेजपालांचे आतापर्यंतचे वागणे होते. ही मंडळी आपापला व्यवसाय करीत राहिली असती तरी त्यांना प्रामाणिकपणाचे तरी काही गुण देता आले असते. परंतु माध्यमातून नाव कमवावे आणि त्याचा वापर हा असा भलत्याच उद्योगासाठी करावा ही कोणती नैतिकता?
आपापल्या व्यवसायाची चौकट सोडून समाजाचे नेतृत्व करावयास निघालेल्यांचे पाय मातीचे असले की काय होते ते तरुण तेजपाल या पत्रकाराच्या सध्याच्या अवस्थेवरून समजून घेता येईल. एकेकाळच्या सहकाऱ्याची कन्या आणि आपल्या पोटच्या कन्येची मैत्रीण असलेल्या तरुणीवर जबरदस्ती करण्यापर्यंत या तेजपालाची मजल गेली. हे घृणास्पद कृत्य उघडकीस आणण्याचे धैर्य या तरुणीने दाखविल्यानंतरही तेजपालाने जे उद्योग केले ते त्याचा सराईतपणा दाखवणारे आहे. वास्तविक अध्यात्माच्या क्षेत्रात बुवाबाजी करणाऱ्या आसारामबापू या बदमाशाच्या उचापतींत आणि पुरोगामी बुवाबाजी करणाऱ्या तेजपालाच्या उद्योगांत काहीही फरक नाही. तेव्हा प्रतिगामी आसारामबापूची जी गत झाली आहे तशीच अवस्था या पुरोगामी तेजपालबाबाचीदेखील व्हावयास हवी. परंतु प्रतिगामी आसारामाप्रमाणे हा पुरोगामी तेजपालही कायद्याला घाबरून पळताना दिसतो. स्थितीवादी आणि प्रतिगामी पत्रकारितेच्या उत्थानासाठीच आपले अवतारकार्य आहे असे त्याचे आतापर्यंतचे वागणे होते. पत्रकारितेच्या क्षितिजावरील हा तरुण तारा उगवला तो भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांच्या वस्त्रहरणनाटय़ाने. नोटांची पुडकी स्वीकारतानाचे त्यांचे चित्रीकरण करून या तरुणाने त्या वेळी बराच धुरळा उडवून दिला होता. वास्तविक बंगारूलक्ष्मण यांच्याही आधी राजकीय नेते पैसे घेत नव्हते असे नाही आणि त्यांच्यानंतर ते घेणे बंद झाले आहे असेही नाही. परंतु लक्ष्मण यांना उघडे पाडून आपण मोठे काही थोर कार्य केले असा या तरुण कंपूचा दावा होता. या प्रकरणातून फार फार तर उघड झाला तो बंगारू लक्ष्मण यांचा बावळटपणा. किंबहुना ते इतके बावळट आहेत याची खात्री असल्यामुळेच तरुण आणि मंडळींनी हा उद्योग केला. अन्यथा या तेजपालास नैतिकतेची इतकी चाड असती तर       पी व्ही नरसिंह राव यांचे अल्पमतातील सरकार बहुमतात कसे आले किंवा विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अणुकराराच्या मुद्दय़ावर सरकार टिकविण्यासाठी कोणत्या मायेने अमरसिंग, मुलायमसिंग मंडळींना जिंकले ते उघड करण्याचे धैर्य या तरुण तेजपालाने दाखवले असते. परंतु अशी निवडक नैतिकता हे या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचे वैशिष्टय़. आपल्याकडे पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचे शील हे या तेजपालाइतकेच कचकडय़ाचे आहे. या मंडळींची नैतिकताही सापेक्ष असते. म्हणजे भाजपच्या नेत्याने काही गैरकृत्य केल्यास हे बेंबीच्या देठापासून चॅनेला चॅनेलांवर ओरडणार आणि तेच किंवा त्याहूनही अधिक गैर असे काँग्रेसजनाने केले की मौन बाळगणार. अशा सुमार लबाडांची आपल्या समाजात कमतरता कधीच नव्हती. हाच वर्ग या तेजपालास खांद्यावर घेऊन नाचत होता. असे करताना आपण नक्की काय करीत आहोत याचे भान तेजपाल गुणगान करणाऱ्यांना राहिले नाही आणि खुद्द तेजपालासही याचा विसर पडला. खरे तर राजकारण्यांच्या पैशावर अनेक 'महानगरां'तून असे तेजपाल सोकावले आहेत. काहींनी कपिल सिबल आदींच्या पैशावर आपले पुरोगामीपण मिरवले तर काहींनी स्थानिक बिल्डर वा भुजबळांना हाताशी धरले.
दोघांनीही आपली लेखणी सुपारी घेऊनच चालवली. वास्तविक यांच्या तुलनेत तरुण भारत वा सामना अधिक प्रामाणिक. कारण त्यांनी आपण कोणाचे मुखपत्र आहोत हे कधीही लपवले नाही. परंतु आपल्याकडील या अशा महानगरी तेजपालांनी खरी पत्रकारिता करीत असल्याचा आव आणला आणि लेखणीचे इमान विकले. काही तेजपालांचा हा पुरोगामित्वाचा बुरखा तहलकाच्या निमित्ताने फाटला. काहींचा तो अद्याप तसाच आहे, इतकेच. यानंतरही ही मंडळी आपापला व्यवसाय करीत राहिली असती तरी त्यांना प्रामाणिकपणाचे तरी काही गुण देता आले असते. परंतु यांची लबाडी इतकी की असले उद्योग करून वर हे पुन्हा समाजास उपदेशामृत पाजत राहिले. खरे तर राजकारण्यांनादेखील इतका कोडगेपणा जमत नाही. तो या माध्यमवीरांनी करून दाखवला. आता हे सगळेच अंगाशी आले आहे.
या निमित्ताने आणखी एका मुद्दय़ाचा समाचार घ्यावयास हवा. तेजपाल वा तत्सम मंडळी आपल्या उद्योगांच्या समर्थनार्थ साखळी उद्योगांवर आगपाखड करीत असतात आणि या साखळी वर्तमानपत्रांमुळे पत्रकारितेसमोर आव्हान निर्माण झाल्याचा दावा करतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती बरोबर उलटी आहे. आजमितीला मालक संपादक असलेली अनेक नियतकालिके प्रत्यक्षात खंडणीखोरीसाठी ओळखली जातात, ही वस्तुस्थिती आहे. अशा नियतकालिकांचा दुरुपयोग दुहेरी होतो. एका बाजूला ती पत्रकारितेच्या नावाखाली खंडणीखोरी करीत असतात तर दुसरीकडे त्याच्या जोरावर त्यांचे संपादक म्हणवून घेणारे मालक आपले पुढारीपण जपत असतात. या दोन्हीच्या बेचक्यातून आर्थिक गैरव्यवहार होतात ते वेगळेच. त्याबद्दल सर्वच सोयीस्कर मौन बाळगतात कारण तसे करण्यातच एकमेकांचे हित जपले जात असते. वास्तविक परिस्थिती अशी आहे की ज्या साखळी वर्तमानपत्रांवर या अशा स्वयंभू तेजपालांचा राग असतो त्या साखळी वर्तमानपत्रांनी वर्तमानपत्रांची व्यावसायिकता शाबूत राखली आहे.
त्यामुळे तेजपालाच्या उद्योगाचा आर्थिक आणि नैतिक अशा दोन्ही अंगांनी विचार करावयास हवा. या तेजपालाच्या उद्योगांत कपिल सिबल, तृणमूलचे खासदार केडी सिंग, राम जेठमलानी आदींची गुंतवणूक होती. याचा अर्थ त्याचा कथित निष्पक्ष आणि नि:स्पृह पत्रकारितेचा दिवा हा अशा राजकारण्यांच्या पैशावर मिणमिणत होता. इतकेच काय गुजरात दंगलीबाबतच्या त्याच्या भूमिकेमुळे वॉक्हार्ट कंपनीचे फक्रुद्दिन खोराकीवाला, अभिनेता अमीर खान यांनीही त्यात पैसे गुंतवले होते. हे कमी म्हणून पाँटी छड्डा या अत्यंत वादग्रस्त व्यावसायिकाच्या गुंतवणुकीतून तेजपालास उच्चभ्रूंसाठी क्लबदेखील काढावयाचा होता. देशातील विद्वान आणि पुरोगाम्यांना मुक्तमोकळ्या वातावरणात परस्परांच्या शारीर सलगीत बौद्धिक आनंद लुटता यावा असा या क्लबमागील हेतू. याचा अर्थ काय असू शकतो त्याचा अंदाज तेजपाल गोव्यात जे करू पाहत होता, त्यावरून बांधता येईल. परंतु त्याही पलीकडे मुद्दा असा की, हे असे क्लब आदी सुरू करणे हे पत्रकारितेच्या कोणत्या व्याख्येत बसते? माध्यमातून नाव कमवावे आणि त्याचा वापर हा असा भलत्याच उद्योगासाठी करावा ही कोणती नैतिकता? ज्या वेळी तहलकाच्या कर्मचाऱ्यांना पगारही देता येत नव्हता त्या वेळी या तेजपाल, व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि मंडळींच्या तिजोऱ्या भरभरून वाहत होत्या, ही यांची व्यवसाय बांधीलकी म्हणावयाची काय? तेजपालाच्या तहलकाची सर्व मिजास त्याच्या साधुहूनही सज्जन मिरवण्यात होती. परंतु या प्रकरणातून जी काही लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती पाहता हेच का या तरुणाचे साधुत्व, असा प्रश्न पडावा. अशा वेळी या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तेजपालाच्या खांद्याला खांदा लावून आपले पुरोगामित्व मिरवणाऱ्या मंडळींनी पुढे यावयास हवे. परंतु त्या सर्वाना एकाच वेळी याचा विसर पडला असावा.
अलीकडे सर्वच संस्था आपापले नियत कर्तव्य सोडून भलत्याच उचापती करू लागल्या आहेत. या तेजपालाच्या वागण्यामुळे ही बाब पुन्हा उघड झाली. असे केल्यास सर्वसामान्यांस सहन करावे लागतात तसे कायद्याचे रट्टे तेजपालासही मिळायला हवेत. त्याच्या बेशरम उद्योगांमुळे पत्रकारिता करुण आणि पत्रकार निस्तेजपाल होता कामा नयेत.
लोकसत्ताचा दि. 29 नोव्हेंबरचा अग्रलेख

.............................................

 जाता जाता: लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दि.29 नोव्हेंबर तरूण तेजपाल यांच्यावर जो अग्रलेख लिहिला आहे,तो 'कहीं पे निगाहें कहीं पे निशाना'असा आहे.कुबेर आणि निखिल वागळे यांचे पटत नाही.दोघांत अडवा विस्तव जात नाही,असे आम्ही यापुर्वी लिहिले होते.या अग्रलेखावरून हे स्पष्ट होते की,वागळे आणि कुबेर यांच्यात टोकाचे मतभेद आहेत.

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

प्रतापराव पवार यांना "स. मा. गर्गे पुरस्कार' प्रदान

बीड- "सकाळ' हे केवळ वर्तमानपत्र नसून सामाजिक अभिसरणाचे आणि विधायक चळवळीचे रूप बनले आहे. "तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियान' सुरू करून राज्यातील हजारो महिलांना हक्काचे व्यासपीठ "सकाळ'ने उपलब्ध करून दिले,'' असे प्रतिपादन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी केले.

बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स. मा. गर्गे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी खासदार मुंडे बोलत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) जयदत्त क्षीरसागर, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, पत्रकार संघाचे संस्थापक संतोष मानूरकर, अध्यक्ष वसंत मुंडे आदी उपस्थित होते.

श्री. मुंडे म्हणाले, ""या वर्षीचा हा पुरस्कार प्रतापराव पवार यांना दिल्यामुळे पुरस्काराचा बहुमान वाढला आहे. "सकाळ' वाचल्याशिवाय पुण्यात कुणी चहादेखील घेत नाही. राजकीय पुढाऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रशिक्षणाची गरज होती; त्याचाही प्रयोग "सकाळ'ने यशस्वीपणे केला.''
श्री. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, ""प्रतापराव पवार म्हणजे केवळ पत्रकारितेच्या चौकटीत स्वतःला बांधून न घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतही त्यांच्या कर्तृत्वाच्या पाऊलखुणा दिसतात. सामाजिक क्षेत्राला उभारी, उमेद देण्याचे काम त्यांनी केले. आमच्यासारखी मंडळी कुठे चुकतात, हे दाखविण्याचे काम "सकाळ' करीत आहे. समाजाची स्पंदने टिपणारा "सकाळ' हा टीपकागद आहे.''

श्री. सुरेश धस म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमी लिखाण करणारा "सकाळ' हा एकमेव माध्यम समूह आहे. "ऍग्रोवन'च्या माध्यमातून शेती क्षेत्राशी निगडित अगदी बारीकसारीक गोष्टी वाचायला मिळतात. पत्रकारांनी शक्‍यतो दोन्ही बाजूंचा विचार केला पाहिजे. कांदा महाग झाला त्या वेळी दिवसरात्र टीव्हीवर केवळ कांद्याच्या महागाईच्या बातम्या होत्या; पण आता कांदा 100 रुपयांवरून 18 रुपये किलोपर्यंत खाली आला; याची मात्र चर्चा झाली नाही.''

सत्काराला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, ""व्यक्ती म्हणून मी पुरस्कार स्वीकारत नाही, तर "सकाळ'चा प्रतिनिधी म्हणून स्वीकारत आहे. हा गौरव "सकाळ समूहा'चा आहे. बीडमध्ये पत्रकार संघ एकत्रित येऊन काम करतो, याचा मला आनंद वाटतो. मी राजकारणापासून दूर आहे, याचा अर्थ मी पुढाऱ्यांबद्दल आकस ठेवतो, असा मुळीच नाही. उलट मला त्यांचे कौतुक वाटते. विधायक कामांची इच्छा ही माझ्या मनाला भावणारी गोष्ट आहे.

पुण्यात वेगवेगळ्या दैनिकांमधील पत्रकारांनी एकत्र येऊन चांगल्या कामांची सुरवात केली होती. सामाजिक प्रश्‍नांवर एकत्रितपणे प्रयत्न झाले, तर समस्या लवकर सुटू शकतात. ज्या वेळी आपण एकमेकांतच भांडतो, तेव्हा आपलीच शक्ती विभागली जाते. याशिवाय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनीही एकत्रितपणे काम केल्यास दहा वर्षांमध्ये देश बदलू शकतो. मलेशियामध्ये "पेमांडू'च्या माध्यमातून 30 वर्षांचे नियोजन केले आहे. प्रत्येक समस्या विभागवार सोडविण्यासाठी या संकल्पनेचा वापर केला आहे. हीच संकल्पना राज्यातही साकारण्याचा "सकाळ'चा मानस आहे.''

"सकाळ'मध्ये जातिवाद, भाषावाद किंवा प्रांतवादाला थारा नाही. केवळ माणूस हा केंद्रबिंदू मानून "सकाळ'ची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.
न्यायमूर्ती देशमुख म्हणाले, ""परखडपणा याचाच अर्थ पत्रकारिता आहे. विघातक प्रवृत्तींवर प्रहार करण्याचे प्रमुख काम पत्रकारितेचे आहे.''
""पुढाऱ्यांमध्ये मतभेद असावेत, मनभेद असू नयेत. विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे,'' असे घोळवे म्हणाले.

स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, ""वृत्तपत्र आणि समाज यांच्यात सुसंवाद साधण्याचे काम प्रतापराव पवार करत आहेत. विकासात्मक पत्रकारिता, विविध सामाजिक उपक्रम "सकाळ'ने सुरू केले. जगातील नवीन प्रवाह प्रयोगांच्या प्रगल्भ दृष्टीतून "सकाळ'ची प्रगती होत आहे.'' पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रास्ताविक केले. सुशील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्काराची रक्कम पत्रकार प्रशिक्षणासाठी
एक लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराची रक्कम मला नको, असे सांगून हे एक लाख रुपये पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी खर्च करण्याचे आवाहन प्रतापराव पवार यांनी केले आणि लगेचच धनादेश पत्रकार संघाकडे सुपूर्त केला.

सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३

देशदूतचे सल्लागार संपादक सुरेश अवधूत यांचे निधन

नाशिक - आपल्या लक्षवेधी पत्रकारितेने स्वतंत्र मुद्रा उमटविणारे सिद्धहस्त पत्रकार, दै. ‘देशदूत’चे सल्लागार संपादक सुरेश नारायण अवधूत (७२) यांचे सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
अवधूत यांच्या पार्थिवावर येथील अमरधाममध्ये मंगळवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाभरातून जनसागर उसळला होता.

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१३

सरकारी पत्रकार दिनाचा राज्यात फियास्को

बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे नियतकालिक सुरू केले.मराठीतील या पहिल्याच नियतकालिकाची सुरूवात ज्या दिवशी झाली तो 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रातील पत्रकार पत्रकार दिन म्हणून साजरा करतात.या दिवशी पत्रकारांमध्ये कमालीचा उत्साह आनंद असतो.पत्रकार दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.गुणवंत आणि उत्कृष्ट कार्य क रणाऱ्या पत्रकारांचे विविध पुरस्कार देऊन सत्कार केले जातात.रक्तदानासारखे अनेक सामाजिक उपक्रम देखील पत्रकार या दिवशी करीत असतात.मात्र या साऱ्या उत्साही वातावरणात माहिती आणि जनसंपर्क विभागाची अनुपस्थिती हा खटकण्याचा विषय असतो.अनेक ठिकाणी या दिवशी जिल्हा माहिती अधिकारी कार्यक्रमांकडे फिरकतही नाहीत.जसे त्यांचा या कार्यक्रमाशी संबंधच नसतो.अर्थात हा पत्रकारांसाठी महत्वाचा दिवस असल्यानं त्यात सरकारी सहभाग आहे की नाही याची कोणी चिंता करीत नाही.पत्रकार आणि पत्रकार ंसंघटना उत्साहात कार्यक्रम साजरे करतात.
6 जानेवारी रोजी उदासिन असलेल्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला 16 नोव्हेंबर रोजी कमालीचे चैतन्य आलेले असते.कारण या दिवशी राष्ट्रीय पत्रकार दिन असतो.वस्तुतः 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन का साजरा केला जातो हे जर अधिकाऱ्यांना विचारले तर 90 टक्के अधिकाऱ्यांना त्याचे उत्तर देता येणार नाही.पण सरकारी आदेश आहे,त्यामुळं उपचार म्हणून ते हा दिवस साजरा करतात.गावात ज्या पत्रकार संघटना आङेत त्यांची मिनतवारी करीत त्यांना बोलवायचे आणि हा दिवस साजरा करायचा आणि आम्ही पत्रकारांसाठी फार काही करतो आहोत हे दाखवायचे असा शिरस्ता राज्य सरकारचे माहिती खाते गेली काही वर्षे राबवत आहे.बरं पत्रकार दिन साजरा करायचा म्हणजे काय करायचे, तर एक विषय ठरवायचा आणि त्याविषयावर एखादा फुकटचा वक्ता बोलावून त्याचे भाषण ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या बातम्या काढायच्या.म्हणजे झाला पत्रकार दिन.
यंदा मात्र सरकारी पत्रकार दिनाचा पुरता फियास्को झाला.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने राष्ट्रीय पत्रकार दिन निषेध दिन म्हणून पाळण्याचे आवाहन राज्यातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांना केले होते.पत्रकारांवरील वाढते हल्ले,ते रोखण्यासाठी कायदा करण्यात सरकार करीत असलेली टाळाटाळ,पत्रकार पेन्शन योजना राबविण्यात सरकारची उदासिनता,अधिस्वीकृती समिती गठित कऱण्यात जाणीवपूर्वक क ेली जात असलेली टाळाटाळ या आणि पत्रकारांच्या अन्य प्रश्नांसदर्भात सरकारची भूमिका नकारात्मकच आहे.एकीकडे पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सोडवायचे नाहीत आणि दुसरीकडे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरे करून आम्ही पत्रकारांसाठी फार काही करीत आहोत हे दाखवायचे हा विरोधाभास संतापजनक आणि राज्यातील पत्रकारांना मान्य होणारा नाही.म्हणूनच राज्यातील पत्रकारांनी एकत्र येत राज्यात काल निषेध दिन पाळला.निषेध दिनाच्या निमित्तानं सरकारी पत्रकार दिनावर पत्रकारांनी बहिष्कार टाकला.त्यामुळे सरकारी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे फियोस्को झाले.राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयातच पत्रकार दिन झाले. बहुतेक ठिकाणी भाड्याचय जागेत असलेली माहिती कार्यालयात कर्मचा़ऱ्यांना बसायलाही जागा नाही अशा स्थितीत किती लोकांच्या उपस्थितीत हे सरकारी उपचार पार पडले असतील याची आपण कल्पना करू शकोत.माहिती विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच हे कार्यक्रम झाले.राज्यात कोठेही या सरकारी कार्यक्रमांना दहा पत्रकार देखील उपस्थित नव्हते. काही ठिकाणी कार्यक्रमास पत्रकारांनी यावं म्हणून ज्या पत्रकारांना शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून अनुदान मिळाले त्याच्या चेकचे वितरण करण्याचे कार्यक्रम या कार्यक्रमाच ठेवल्याने काही ठिकाणी असे लाभित पत्रकार उपस्थित होते .पण कोठेही दहाच्या वर पत्रकार या कार्यक्रमांना हजर नव्हते.सर्वच ठिकाणी जनसेवेत माध्यमांची भूमिका असा निरर्थक विषयावर वक्तयांनी आपले चऱ्हाट लावले.पत्रकारितेचा जन्मच मुळात समाज हिताची कामं कऱण्यासाठी झाला हे हा विषय ठेवणाऱ्यांना कळले नसावे.वस्तुतः पत्रकार दिन आहे तर मग पत्रकारांच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होणे अपेक्षित असते.पत्रकारांच्या अडचणी,बदलत्या काळातील पत्रकारितेचे बदलते स्वरूप,वेब,इलेक्टॉनिक पत्रकारितेवर मान्यवरांची व्याख्यानं होणं गरजेचं होती.पत्रकारांवरील हल्ले,पत्रकारांच्या पेन्शन आणि मागण्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका मांडली जायला हवी होती पण असे काही झाले नाही.सरकारच्या माहिती विभागाने एक कर्मकांड उरकले.हे कर्मकांड उरकताना मुंबईत तर माहिती आणि जनसंपर्क विभागाला कार्यक्रमाही घेता आला नाही.कार्यक्रम घेता येत नाही म्हणून पत्रकार कल्याण निधीची बैठक लावली गेली पण मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला अन्य पत्रकारा संघटनांच्याही काही सद्‌स्यांनी बहिष्कार टाकल्याने या बैठकीची हवाही निघून गेली.त्यामुळं कालच्या पत्रकार दिनाचा राज्यात फियास्कोच झाला.एखादं-दुसरा अपवाद वगळता कोणत्याही पत्रकार संघटनांनी काल कोणतेही कार्यक्रम ठेवले नव्हते.त्यामुळे पुढील वर्षी तरी पत्रकार दिनाचे कर्मकांड पार पाडताना माहिती आणि जनसंपर्क विभागाने पुरेशी काळजी घेतली पाहिजे
कालचा पत्रकार दिन निषेध दिन म्हणून पाळून राज्यातील पत्रकारांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आपली एकजूट दाखवून दिली त्याबद्दल तमाम पत्रकार आणि पत्रकार संघटनांचे आम्ही आभारी आहोत.

S.M.Deshmukh 

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

लोकमत कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले

गोवा आवृत्तीतील एका कर्मचाऱ्यास कमी केल्याच्या निषेधार्थ सुरू असलेले लोकमत कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळले आहे.आता लोकमत प्रशासनाने कठोर भूमिका घेत गोवा आवृत्तीतील चार,अकोला आवृत्तीतील 15 आणि नागपूर आवृत्तीतील 11 लोकांना कमी केले आहे.
जे कर्मचारी कंत्राटी पध्दतीवर आहेत आणि संपात सहभागी झाले आहेत,त्यांच्यावर लोकमत प्रशासनाने हातोडा मारला आहे.या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना एक महिनाचा पगार घरपोच पाठवून बाहेर नोटीस बोर्डावर त्यांना कार्यालयात येण्यास मज्जाव केला आहे.त्यामुळे लोकमत कर्मचाऱ्यांत तिव्र संताप निर्माण झाला असून,हे आंदोलन आणखी चिघळले आहे.

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

गोवासह महाराष्ट्रात काही ठिकाणी लोकमत कर्मचाऱ्यांचा संप

पणजी - लोकमतचे प्रिंटीग सुपरवायझर मनोज राजेश इंगुलवार यांना तडकाफडकी कामावरून काढल्याच्या निषेधार्थ गोवा तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर,नागपूर,अकोला आवृत्तीतील संपादकीय सोडून अन्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला आहे.
मनोज राजेश इंगुलवार  हे लोकमत युनियनने मेंबर होते,जे लोकमत युनियनचे मेंबर आहेत,त्यांना कामावरून काढण्याचा निर्णय व्यवस्थापनांने घेतल्याची अफवा पसरली आणि त्याच्या निषेधार्थ गोवा,नागपूर आणि अकोला आवृत्तीतील संपादकीय विभाग सोडून अन्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी संप पुकारला आहे.
या संपामुळे गुरूवारचा अंक निघणार की,नाही याकडे लक्ष वेधले आहे.जोपर्यंत मनोज राजेश इंगुलवार यांना व्यवस्थापन कामावर घेणार नाही,तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा पवित्रा लोकमत कर्मचारी युनियनने घेतला आहे.

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१३

मंदार फणसे यांचा अखेर जय महाराष्ट्र...

मुंबई - सहाच महिन्यापुर्वी सुरू झालेल्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मोठी खळबळ सुरू झाली आहे.अनावश्यक भरती आणि अनावश्यक खर्चामुळे हे चॅनल प्रचंड आर्थिक तोट्यात चालले होते.त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापनाने कामगार कपातीचे धोरण सुरू केले आणि किमान ५० जणांना नारळ देण्याचा निर्णय घेतला.त्याच्या निषेधार्थ संपादक मंदार फणसे यांनी,राजीनामा देण्याचे शस्त्र उगारले पण व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने फणसे आपला राजीनामा अखेर सुपूर्द केला आहे.या राजीनाम्यानंतर मंगळवारी त्यांचा लक्षवेधी हा कार्यक्रमही झाला नाही.
  डान्सबार मालक सुधाकर शेट्टी यांनी सहा महिन्यापुर्वी मोठा गाजावाजा करून जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू केले,पण ढिसाळ व्यवस्थापनामुळे आणि तांत्रिक चुकामुळे हे चॅनल उभारी घेवू शकले नाही.त्यात अनावश्यक भरती,अनावश्यक खर्च यामुळे हे चॅनल प्रचंड आर्थिक तोट्यात चालले होते.अखेर मालकांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला.मात्र संपादक मंदार फणसे यांनी त्यास विरोध केला.काम करणा-यावर अन्याय होणार असेल तर मला संपादकवद मिरवण्यात रस नाही,असे त्यांनी व्यवस्थापनाला ठणकावले मात्र मालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने फणसेंनी अखेर जय महाराष्ट्र केला आहे.
हे चॅनल सुरू झाल्यानंतर केवळ तीन महिन्याच कार्यकारी संपादक रवी आंबेकर यांनी जय महाराष्ट्र केला होता,आता सहा महिन्यानंतर फणसे यांनी जय महाराष्ट्र केला आहे.आता अनेकांना नारळ मिळणार आहे,त्यात कोण जाणार आणि कोण राहणार,याकडे लक्ष वेधले आहे.
गंमत म्हणजे आंबेकर यांच्या जागी शैलेश लांबे काही दिवसांपुर्वी जॉईन झाले होते.आजच त्यांनी काही लोकांना जॉईन झाल्याचे एसएमएस पाठविले होते,आणि दुसरीकडे धक्कादायक बातमी फणसेंचा राजीनाम्याची ठरली.फणसे यांनी कालच व्यवस्थापनाने दिलेली कार व्यवस्थापकाकडे परत करून स्वत:च्या गाडीने गेले होते,आणि आज त्यांचा लक्षवेधी हा कार्यक्रमही झाला नाही.कालपासून फणसेंच्या राजीनाम्याच्या बातम्या बेरक्याकडे येत होत्या,पण आज त्यास दुजोरा मिळाला.
जय महाराष्ट्रमधून किमान ५० लोकांना नारळ मिळणार आहे,त्यापैकी समजलेली नावे.
मंगेश चिवटे (दिल्ली), संदीप काळे (लातूर), राऊत (अमरावती), प्रकाश बेळगोजी (बेळगाव), औरंगाबादचा एक रिपोर्टर, नाशिक ब्युरो कार्यालयातील तीन,नागपूर ब्युरोतून एक.
 ..............................................
जाता - जाता : कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात ब्र शब्दही काढला नाही.त्यांच्यामुळे अनेकजण चांगला जॉब सोडून जय महाराष्ट्रमध्ये आले आहेत,आता त्यांच्यावर अन्याय होताना,भोईटे काय भूमिका घेणार,याकडे लक्ष.

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

बेळगाव तरुण भारतची मुंबई आवृत्ती डिसेंबर मध्ये !

मुंबई - ९५  वर्षांची परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकारितेतील सर्वात जुने वर्तमान पत्र असलेल्या बेळगाव तरुण भारतची मुंबई आवृत्ती डिसेंबर मध्ये सुरु होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  खरेतर तरुण भारत च्या मुंबई आवृत्तीचे लॉन्चिंग दिवाळीच्या मुहूर्तावर होणार होते. मात्र तरूण भारतच्या प्रशासकीय कारभार फारच किचकट आहे. सर्व निर्णय बेळगावातून होत असल्याने मुंबई आवृत्तीला उशीर झाला आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. 
 मुंबईतील गणेशोस्तव काळात तरुण भारत ने मुंबई आवृत्तीचे जोरदार मार्केटिंग केले होते. त्या दरम्यान फारतर दसरा किंवा  दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबई आवृत्तीचे लोन्चींग होणे अपेक्षित होते, तसे काही झाले नाही.  बेळगावात संपादकीय आणि डीटीपीसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जेवढे वेतन तिथे दिले जाते त्याची तुलना करून मुंबई कार्यालात नवीन माणसे भरण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. मुलाखतीही झाल्यात  मात्र मुंबईत कमी पगारात काम करणारे पत्रकार, संपादकीय मंडळी,  डीटीपी सेक्शनसाठी माणसे भेटणे अशक्य आहे. त्यातही मुंबई कार्यालयात राजकारण आहेच पण राजकारण जेव्हा होते कि तिथे मुबलक  कर्मचारी हवेत इथे तर पाच - आठ कर्मचार्यामध्ये राजकारण धुमसतंय.  दोघा तिघात ' जेष्ठ- कनिष्ट ' असा वाद धगधगत असल्याने यामुळे अनेक अडचणी देखील उद्भवत आहेत. तर कार्यालयात मुंबई आवृत्तीचे कामाचे स्वरूप / अंकाची रचना या बाबत असे काही चित्र निर्माण केले आहे कि त्यामुळे सारेच हादरलेत. आधीच एक तर कर्मचाऱ्यांचा तुटवडा , त्यात तुटपुंजे पगार त्यामुळे काही का असेना थोडा फार नाराजीचा सूर तेथे आहेच. 
लढवय्या, जिगरबाज  म्हणून ख्याती असलेले संपादक किरण ठाकूर मोठ्या जिकरीने तरुण भारतवर जीव ओतत आहेत. त्या बद्दल वादच नाही!  सीमावासीय मराठी भाषकांसाठी लढणारं वृत्तपत्र म्हणून बेळगाव तरुण भारतची ओळख आहे. बेळगाव सीमाप्रश्नी मराठी बांधवांच्या बाजूने लढणाऱ्या किरण ठाकूर यांनि कर्नाटक सरकारला  नाकी नऊ आणले होते. जुलै २ ० १ २  कर्नाटक सरकारच्या मध्ये आमदारांची बदनाम केल्याचा ठपका ठेवून विधिमंडळानं या वृत्तपत्रावर कारवाईची मागणी केली होती. कर्नाटक विधिमंडळात या मुद्यावर याची  अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर या वृत्तपत्राचा छपाई परवाना रद्द करून संपादक किरण ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावर चळवळीत अग्रेसर असलेल्या ठाकूर यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. त्यात त्यांचा विजय देखील झाला. त्यांच्या कर्तृत्त्वाला आम्ही देखील सलाम करतो!  पण आता मुंबईत आवृत्ती येत असल्याने त्याचा डोलारा सांभाळणे जरा अवघडच आहे.  तशी मुंबई कार्यालात तरुण भारतला ' यंग ब्रिगेड ' चांगली लाभली आहे. गेल्या एक दोन महिन्यांपासून डमी आवृत्तीसाठी सगळेच झुंजतायत. पण काही नव्या असंतुष्ट आत्म्यांमुळे त्याचा त्रास सगळ्यांना उद्भवू शकतो. त्यामुले  ठाकूरयांनी तेथील कार्यालयीन बाबीवर विशेष लक्ष ठेवले तर जेणेकरून यातून काहीतरी अजून चांगले तथ्य निघेल. असो बेळगाव तरुण भारतच्या मुंबई आवृत्तीसाठी आमच्या शुभेच्छा !

रविवार, १० नोव्हेंबर, २०१३

हदगावच्या पत्रकारावर हल्ला,हल्लेखोरांवर कारवाई ऐवजी उलट पत्रकारांवर गुन्हा

नांदेड - राजकीय बातमी दिल्याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील पत्रकार शिवाजी देशमुख यांच्यावर काल चौघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला होता,पण देशमुख यांनी चाकूचा वार चुकविला आणि बालंबाल बचावले.याप्रकरणी ते हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात गेले असता,संबंधित पोलीस निरीक्षकाने कशाला तक्रार देता,ते अमक्या नेत्याचे कार्यकर्ते आहेत,तुमच्यावर अ‍ॅट्रासिटी दाखल होईल,अशी भिती दाखविली मात्र देशमुख यांनी तक्रार नोंदविता की नाही,का वरिष्ठाकडे तक्रार करू असे सुनावल्यानंतर पोलीस निरीक्षकाने देशमुख यांची तक्रार घेतली,पण करायचे तेच केले.
त्यांनी विरोधी पार्टीकडून एकाची फिर्याद घेवून,देशमुख यांच्याविरोधात दरोडा आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.चाकूहल्ला करणा-यावर कारवाई करण्याऐवजी पत्रकार देशमुख यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे.त्यांना कोणत्याही क्षणी अटक होवू शकते.
या निंद्य प्रकाराचा महाराष्ट्र हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून,देशमुख यांच्या विरोधातील फिर्याद मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३

दासगुप्तांच्या मदतीसाठी मराठी पत्रकार परिषदेचा पुढाकार

नागपूर : पत्रकारितेच्या क्षेत्रात १६ वर्षे सेवा देणारे रवींद्र दासगुप्ता आज कसे हलाखीचे जीवन जगत आहेत यावर लोकमतने प्रकाश टाकल्यानंतर दासगुप्तांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी व्यक्ती आणि संस्था दानवीर पुढे येत आहेत. पत्रकारांच्या हितासाठी सदैव झटणार्‍या मराठी पत्रकार परिषदेनेही यासाठी पुढाकार घेतला आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक व पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी दासगुप्तांना ११ हजारांची तातडीची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही माहिती लोकमतला देताना एस. एम. देशमुख म्हणाले, दासगुप्तांची ही अवस्था बघून फारच वाईट वाटले. मुंबईच्या प्रसिद्ध संपादिका सुनीता नाईक यांच्या अगतिकतेची चर्चा संपलेली नसतानाच आता पुन्हा दासगुप्तांच्या रूपाने तसेच प्रकरण समोर आले आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. मराठी पत्रकार परिषदेतर्फे आम्ही दासगुप्तांना ११ हजारांची मदत तर देतच आहोत. याशिवाय शासनातर्फे शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून एक लाख रुपयांपर्यंतची मदत त्यांना कशी मिळवून देता येईल, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. लवकरच नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होत आहे.
यावेळीही हा मुद्दा आम्ही उचलून धरू, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

साभार - दैनिक लोकमत,नागपूर

जाता -जाता : नागपूरच्या कोणत्याही स्थानिक पत्रकार संघटनेने दासगुप्ता यांना दमडीची मदत केली नाही,पण मराठी पत्रकार परिषदेचे 11 हजार रूपयाची मदत करून,या पत्रकार संघटनांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घातले आहे,आता तरी नागपूर पत्रकार संघटना जागे होणार की असेच झोपणार ?

चूक ऑपरेटरची आणि भोग मालक आणि संपादकांना...

पुण्यनगरीच्या यवतमाळ कार्यालयातील एका बदमाश ऑपरेटरने जाहिरातीमध्ये तेथील महिला खासदार आणि आमदारांच्या फोटोच्याखाली आक्षेपार्ह ओळी लिहिल्या आणि त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले.वणीचे कार्यालय जाळण्यात आले तर यवतमाळच्या कार्यालयावर आगीचे गोळे फेकण्यात आले.गेले काही दिवस पुण्यनगरीचे पार्सल जाळण्यात आले.
चूक ऑपरेटरची आणि मालक,संपादक,कार्यकारी
संपादक,आवृत्तीप्रमुखासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.आवृत्तीप्रमुख नितीन पखाले यांना अडचणीत आणण्यासाठी या ऑपरेटरने गेम केला होता,पण त्याचाच गेम झाला.या हरामखोर ऑपरेटरची पुण्यनगरीने हकालपट्टी केली आहे,पण जे परिणाम आज पुर्ण युनिटला भोगावे लागत आहेत,ते न भरून येणारे आहे,ज्यांनी कार्यालय जाळले,त्यांचा आम्ही निषेध करणार नाही,किंवा समर्थनही करणार नाही,कारण एकंदरीत प्रकार गंभीर होता.
पुण्यनगरीच्या प्रकरणात बेरक्या शांत कसा,म्हणून आपणास विचारणा होत होती,पण नेमक्या याच काळात आम्ही टूरवर असल्यामुळे नेमका काय प्रकार होता,हे कळत नव्हते.त्याबद्दल वाचकांची माफी.
या प्रकरणातून राज्यातील सर्व वृत्तपत्रांनी धडा घ्यावा,ही कळकळीची विनंती.

बेरक्याच्या आवाहनानुसार नागपूरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना मदत सुरू

बेरक्याच्या आवाहनानुसार नागपूरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना मदत सुरू
आकोटचे पत्रकार मित्र संजय आठवले यांनी एक हजार रूपये मदतनिधी दिला,त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
अ.क्र.    देणगीदारचे नाव                       गाव                          रक्कम 
....................................................................................................................
1.      संजय आठवले                            आकोट                           1000
2 .    प्रतिक सोनुले              मूळ नागपूरचे आणि सध्या गुजरात        500
3    अजय जयस्वाल                              मुंबई                                 2500
4    प्रविण नंदागवळी                       नागपूर                                    500
Prashant Bidve,                                  pune                                500धन्यवाद 


गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१३

पत्रकारांत मिठाई आणि पाकीटावरून भांडण

बुलडाणा जिल्हातील नांदूरा तालुक्यातील काही पत्रकारांना पोलीसांच्या वतीने मिठाईचे वाटप व सोबत १५०० रु. पाकीट देऊन आपल्या कडे लक्ष असू देण्याबाबत बुलडाणा दै.देशोन्नतीमध्ये बातमी छापण्यात आली होती. यानंतर दिवसभर नांदु-याची मिठाई काही पत्रकारांच्या गळ्याखाली उतरत नसतांनाचे पाहुन थेट दै.देशोन्नतीला आव्हान देणारे व मिठाई घेणा-या पत्रकारांचे नांवे छापा नाही तर माफी मागा असा सल्ला देशोन्नतीच्या आवृत्ती संपादकाला दै.विदर्भ मतदारने  दिला आहे. दिवाळीची मिठाई मिळाली नाही म्हणुन त्यांनी बातमी छापली असल्याचा उल्लेख करण्यात आला असुन मिठाई घेणा-यांची यादी न छापता व नांदुरा पत्रकारांची जाहिर माफि न मागितल्यास दै.देशोन्नती प्रकाशक,मालक, आवृत्ती संपादक यांच्यावर मानहानी खटला दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दै.विदर्भ मतदारमध्ये बातमी येताच सर्वत्र चर्चांना उत आला आहे. यावर दै. देशोन्नती जिल्हा सुप्रिमो काय करता यावर संपुर्ण जिल्हयातील पत्रकार लक्ष ठेवुन आहेत.मात्र, दिवाळी मिठाई नांदुरा पोलीसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. आणि पुर्वी शमलेले दै.देशोन्नती विरूद्ध दै.विदर्भ मतदार शितयुध्द पुन्हा एकदा सुरू झाले आहे.

http://deshonnati.digitaledition.in/181289/Buldhana/6th-Nov-Buldhana#page/16/1

दासगुप्तांना वेडा ठरविणाऱ्यांची बसली दातखिळ,माहिती देण्याचे आवाहन...

नागपूरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना मदत करण्याणेवजी त्यांना वेडा ठरविणाऱ्यांची दातखिळ आता बसली आहे,
राज्यात सर्वात श्रीमंत असलेला नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि त्याअंतर्गत असणारा ट्रस्ट मनाने किती कंगाल,दळभद्री आहे,हे समोर आले आहे.या संघाच्या काही पदाधिकारी पत्रकारांना जीवनातून उठविण्याचे महापाप केले आहे.जे विरोधात गेले,त्यांच्याबद्दल अफवा पसराविणे,खोटी माहिती देणे,त्यांच्याविरोधात संबंधित पेपरला खोट्या तक्रारी करणे,असे महाउद्योग करीत होते,इमानदारीने काम करणारा नोकर राजेंद्र महाडीक यास लाथा-बुक्या घालून त्यांनी हाकलून लावले आहे.त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणी उघड जात नव्हते,पण बेरक्याने पुढाकार घेतल्यानंतर एक एक सुरस कहाण्या कानावर येत आहेत.
संघात पत्रकार परिषद घेण्याच्या नावाखाली,संबंधितांकडून हे लोक कसे खिसे भरतात,याची सविस्तर माहिती येत आहे.आम्ही आवाहन करीत आहोत की,या संघाची सर्व लफडी आम्हाला बिनधास्त कळवा,आम्ही त्यास नक्की प्रसिध्दी देवू आणि काळजी करू नका,आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.
बेरक्या उर्फ नारद
berkya2011@gmail.com

दासगुप्तांसाठी मदतीचा ओघ

नागपूर : रवींद्र दासगुप्ता नामक एक ज्येष्ठ पत्रकार रस्त्यावरचा कचरा वेचून पोट भरतोय हे वृत्त 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच समाजमन गहिवरले. दासगुप्तांना या दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी अनेकांनी लोकमत कार्यालयात फोन करून मदतीची इच्छा व्यक्त केली. काहींनी तर थेट बँकेत रक्कमही जमा केली.
नागपूर शहरातील काही सहृदयी नागरिकांनी त्यांचा पत्ता मिळवून त्यांना गाठले व मदत दिली. रवींद्र दासगुप्ता हे एकेकाळी नागपूर टाइम्ससारख्या दैनिकात पत्रकार होते. परंतु दुर्दैवाने ते दैनिक बंद पडले अन् त्याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने दासगुप्ता अक्षरश: कोलमडून पडले. त्यांची ही दुर्दैवी कहाणी लोकमतने पुढे आणल्यामुळे सर्व स्तरांतून दासगुप्तांसाठी मदतीचे हात पुढे सरसावले आहेत.
अचानक मदतीचा हा ओघ बघून आतापर्यंत उपेक्षेचे जीवन जगणारे रवींद दासगुप्ता गहिवरले व त्यांनी लोकमतचे आभार व्यक्त केले. 
.............................
 रवींद्र दासगुप्ता यांच्या दयनीय अवस्थेबद्दल 'लोकमत'मध्ये वाचले अन् मनात कालवाकालव सुरू झाली.आपलाच एक सहकारी कचरा वेचून पोट भरतोय, ही गोष्ट समग्र पत्रकारांसाठी अत्यंत धक्कादायक आहे. मी व माझे इतर सहकारी लवकरच दासगुप्तांची भेट घेऊन त्यांना मदत करणार आहोत. अशी वेळ कुणाही पत्रकारावर येऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येईल, त्या दिशेनेही प्रयत्न करायचे आहेत.
उमेशबाबू चौबे,
ज्येष्ठ पत्रकार व समाजसेवी. 
..............................................
मी नेहमी सायंकाळी रामकृष्ण मठात जात असतो. तेथे दासगुप्ता यांचे दर्शन घडायचे. त्यांची ती अवस्था बघून हा माणूस मठात नेमके काय शोधायला येतो याबाबत आश्‍चर्य वाटायचे. आज लोकमतमधील वृत्त बघितले अन् साराच उलगडा झाला. मठात एकदा ते माझ्याशी बोलले व त्यांनी मला तुम्ही डॉक्टर आहात का, असा प्रश्न विचारला. कदाचित तेव्हा त्यांना उपचाराची गरज असेल. लोकमतच्या वृत्तामुळे दासगुप्तांना नक्कीच मदतीचे हात लाभतील. अशाच विधायक पत्रकारितेची आज गरज आहे.
मयुरेश गोखले
(नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे चुलत नातू) 

बेरक्यावर अभिनंदनाचा वर्षाव...

नागपूरचा श्रमिक पत्रकार संघ हा राज्यात सर्वात श्रीमंत पत्रकार संघ आहे.मात्र या पत्रकार संघात दलालाची टोळी बसली आहे.राजकीय नेत्यांची झेलूगिरी करून,अनेकजण गर्भश्रीमंत झाले आहेत.सर्व सदस्य चार चाकी वाहनांतून फिरतात.मात्र मनाने अत्यंत दळभद्री आहेत.
हा पत्रकार संघ पत्रकारांच्या अडचणी आणि समस्या कधी सोडवत नाही.केवळ चाटूगिरी करतो.रविंद्र दासगुप्तांना मदत तर सोडा पण जे मदत करतात,त्यांच्या वाटेत हे काटे झाले होते.बेरक्याने हे काटे पार उद्ध्वस्त केले आहेत.बेरक्याने त्यांचे काळे धंदे उघडकीस आणण्याचे घोषित केल्यानंतर अनेकांची पातळ झाली आहे.त्यांना जेवण गोड लागत नाही.सगळ्यांची चेहरे पडले आहेत.आता आपले खरे नाही म्हणून तोंड लपवून फिरत आहेत.
नागपूर आणि विदर्भात सध्या फक्त बेरक्याची चर्चा सुरू आहे.नागपूरच्या पदाधिकाऱ्यांची बरी मारली म्हणून अनेकजण खूष आहेत.नागपुर आणि विदर्भातील असंख्य पत्रकारांनी आमचे अभिनंदन केले आहे.तसेच अनेकांनी दासगुप्तांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या सर्वांचे आम्ही आभारी आहोत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

दिव्यचा महाराष्ट्रातील विस्तार थांबवला

अकोला एडिशन सुरु झाल्यापासून पेटलेले राजकारण, राठोडांच्या जागी सक्षम संपादक मिळत नसल्याने दिव्यने नागपूर एडिशनचा मुहूर्त लांबणीवर टाकला आहे. दिव्यचे अकोला एडिशन फेल गेले आहे. चांगली टीम असूनही केवळ राजकारणा मुळे चांगल्या बातम्या येत नाही. त्यामुळे लोकांनी अंक बंद करणे सुरू केले आहे. बुलडाण्यातही पकड नाही, वाशीमातही धंदा नाही अशी स्थिति आहे.
 अमरावती एडिशनची  टीम मात्र जोरदार आहे. अकोल्याहून मिळणारी अपमानास्पद वागणूक, तेथील हस्तक्षेप सोडला तर अमरावतीचा खप आता 26 हजारावर गेला आहे. पण अकोल्यात पर्यायी लायक संपादक जोवर मिळत नाही तोवर नागपुरात जायचे नाही असा निर्णय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विस्ताराला ब्रेक देत भास्कर बिहार मध्ये प्रवेश करत आहे. पटणा येथे मुख्यालय असेल. त्याला लागून तीन एडिशन्स असतील. ही गडबड आटोपताच अकोल्यातील 'त्या' वादग्रस्त केबिन बाबत ठाम निर्णय घेऊ असा निरोप अभिलाष खांडेकरांनी आज सर्व असंतुष्टांना धाडला आहे. आपली निवड चुकली अशी प्रांजळ कबुली त्यांनी काहींशी मोबाईलवर बोलताना दिली. नागपूरला एडिशन सुरू करण्यापूर्वी चूक सुधारु. 'त्या' केबिन मधला व्यक्ती एडिशन सुरू होऊन चार महिन्यातच काढला, तर बाजारात चुकीचा संदेश जाईल म्हणून हा कठोर निर्णय थांबवल्याचा निरोप खांडेकरांचा आहे. पण तक्रारींची संख्या अशीच कायम राहिल्यास तातडिने अग्रवालजींशी बोलता यॆईल असेही त्यांच्या संदॆशात नमूद आहे. बेरक्यावर येणारे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोचतात. अनेक वरिष्ठ हे अपडेट एसएमएस करतात. हे सर्व जाणूनच तातडीने अमरावतीसाठी नितीन फलटणकरला पाठवले. अकोल्यातही बदल केले, पण यानंतर दिव्य मधल्या अकोला एडिशन मधील एकानेही राजीनाम्याचा ई-मेल केला तर तातडिने निर्णय घ्यावाच लागेल कारण टीम महत्वाची असे खांडेकरांनी दोघांच्या आणि एसएमएस मधून स्पष्ट केले आहे.
.......................................

दिव्य अमरावतीमधून राजीनाम्याची नोटिस देणारे व्यवस्थापक धनंजय कानबाले यांचे मन वळवणे सुरू.... त्यांचा दुसरा सहकारी कानबालेंच्या निर्णयावर अवलंबून. नाराज असलेल्या एकाची लोकमतच्या वरिष्ठांसोबत चर्चा. संपूर्ण विषयाची माहिती खांडेकरांपर्यंत. बिहार मधील पटणाचे एडिशन सुरु झाल्यानंतर मोठा निर्णय घेण्याचे संकेत....

बेरक्याचे कळकळीचे आवाहन : दासगुप्ता यांना मदत करा

बेरक्याच्या आवाहनानुसार नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना मदतनिधी गोळा करण्याचे काम सुरू आहे.नागपुरचे पत्रकार सुरेश चरदे यांच्या खात्यावर काल दि.7 नोव्हेंबरपर्यंत पाच हजार रूपये जमा झाले आहेत.लोकमत कर्मचाऱ्यांनी त्यांना वेगळा निधी दिला आहे.आपणही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करू शकता,त्यासाठी खालील बँक खात्यावर मदत निधी पाठवावा,ही विनंती.
सुरेश चरदे,
बँक आॅफ इंडिया - खाते क्र.870810110003217 आणि
अ‍ॅक्सिस बँक खाते क्र. 13010021242612
- यात आपण मदतनिधी जमा करू शकता.
- चरदे यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर बँक स्लीपची झेराक्स प्रत बेरक्याला ई - मेल करावा,ही विनंती.
berkya2011@gmail.com

सुरेश चरदे - Mobile .9595529080

नागपूरच्या पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का ?

ज्यावेळी या देशात इंग्रजाचे राज्य होते,तेव्हा इंग्रजांनी या देशातील गरीब जनतेवर अत्याचार सुरू केला होता,तेव्हा लोकमान्य टिळक यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला होता,इंग्रजाचे डोके ठिकाणावर आहे का ? या अग्रलेखाची आठवण पुन्हा एकदा आम्हाला झाली आहे.
निमित्त आहे नागपूरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांची दुर्देवी कहाणी....मित्रानो,नागपूर टाइम्स मध्ये अनेक वर्षे प्रुफ रिडर आणि पत्रकार म्हणून काम केलेले रविंद्र दासगुप्ता यांची वृध्दापकाळात आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्यामुळे ते रस्त्यावर कचरा गोळा करून पोट भरत होते.ते अनेकजण उघड्या डोळयांनी पहात होते.राजकीय नेत्यांच्या पंगतीत सदैव बसणा-या,त्यांच्या खुशमस्करीच्या बातम्या छापून चारचाकीत फिरणा-या पत्रकारांना दासगुप्तांची दुर्देवी कहाणी कधी लिहावी वाटली नाही किंवा त्यांना मदत करावी वाटली नाही.नागपुरात अनेक पत्रकार संघटना आहेत,पत्रकार कल्याण ट्रस्ट आहे,त्यांना कधी दासगुप्तांना मदत करावी वाटली नाही.
दासगुप्तांनी दुर्देवी कहाणी,नागपूरमधल्या आमच्या एका मित्रांना दिसली,त्यांनी छायाचित्रासह ही दुर्देवी कहाणी आमच्यापर्यंत पोहचविली,आम्ही लगेच प्रकाशित केली.ही कहाणी वाचून अवघा महाराष्ट्र हळवळला.अनेकांचे डोळे चिंब झाले,आम्हाला तर चैन पडत नव्हती.ऐन दिपावलीत ही बातमी प्रकाशित झाल्यामुळे दासगुप्तांना मदत करणे,हीच आमची खरी दीपावली राहील,म्हणून आम्ही संकल्प सोडला.आम्ही तातडीने नागपूरचे पत्रकार सुरेश चरदे यांना सांगून दासगुप्तांच्या घरी मिठाई पाठविली आणि त्यांची दीपावली गोड केली.
बेरक्यानंतर आमचे लक्ष नागपूरच्या मीडियाकडे होते.लोकमतनेही हे प्रकरण उचलले.शफी पठाण या तरूण पत्रकाराने दासगुप्तांची स्टोरी प्रकाशित केली.या स्टोरीनंतर तरी नागपूरच्या पत्रकार संघटना दासगुप्तांच्या मदतीला उतरतील,अशी अपेक्षा होती,मात्र घडले उलटेच.
या संघटनांचे पदाधिकारी सांगू लागले,दासगुप्ता हे श्रीमंत आहेत,त्यांना मदतीची काय गरज आहे,ऐवढयावर हे पदाधिकारी थांबले नाहीत,तर दासगुप्ता हे वेडे आहेत,असा जावाईशोध लावला.यासंदर्भात त्यांनी अनेक पत्रकारांना ई-मेलसुध्दा पाठविला.आम्हाला सुध्दा खुलासा प्रसिध्द करा,अन्यथा कोर्टात केस करू,अशी धमकी दिली.अशा पुचाट धमक्यांना बेरक्या कधी घाबरत नाही,किंवा घाबरणारही नाही,हे कदाचित त्यांना माहित नसावे.
नागपूरच्या पदाधिका-यांच्या वळवळीमुळे आमच्यावरच नाही तर लोकमतच्या बातमीवर आणि विश्वासर्हतेवर  प्रश्नचिन्ह निर्माण झाला.लोकमतने काल बुधवार दि.६ नोव्हेंबर रोजी दासगुप्ता यांना लोकमत कार्यालयात आमंत्रित केले.दासगुप्ता आले आणि चक्क दोन तास भरभरून बोलले.त्यांनी सगळ्यांच्या प्रश्नांना अस्सल इंग्रजीत उत्तरे दिली.त्याची सविस्तर बातमी आज दि.७ नोव्हेबर रोजी नागपूर लोकमतमध्ये प्रसिध्द झाली आहे.ती बेरक्यावर साभार घेण्यात आली आहे.
ज्ञानाचे भांडार असलेला हा वयोवृध्द पत्रकार वेडा नाही,त्यांची मानसिक स्थिती अगदी उत्तम आणि ठणठणीत आहे.मग ते वेडा कसे ? त्यांना वेडा कोणी ठरविले,कुठल्या आधारे ठरविले ? एखादा व्यक्ती वेडा नसताना,वेडा म्हणणे,तेही लिखित स्वरूपात हा कायदेशीर गुन्हा होवू शकतो.आता नागपूरच्या पत्रकार संघाच्या पदाधिका-यांवर दासगुप्ता यांना वेडा ठरविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी का,याबाबत आमच्या वकिलांशी चर्चा सुरू आहे.याबाबत आम्ही काय करावे,याचा निर्णय आपण द्यायचा आहे.
मित्रानो,दुर्देवाने म्हणावे वाटत आहे,नागपूरच्या पत्रकार संघटनेच्या पदाधिका-यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असले असते तर दासगुप्तांना ते वेडे ठरविले नसते.आम्ही दासगुप्तांना मदत करा म्हणून त्यांच्या दारात गेलो नव्हतो.अवघा महाराष्ट्र दासगुप्तांना मदत करण्यासाठी सरसावला असताना,त्यात बिबे घालण्याचे काम या लोकांनी केले आहे.यांना संघटनेच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.त्यांनी आता सरळ राजीनामा द्यावा आणि दासगुप्ता यांची माफी मागावी अन्यथा बेरक्या त्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही.
नागपूर पत्रकार कल्याण ट्रस्टचे महाशयाना एका पेपरने हाकलून लावले आहे.त्यांच्याकडे कोणताही पेपर नाही.पत्रकार कल्याण निधीच्या नावाखाली त्यांनी लाखो रूपयाच्या देणग्या उकळल्या आहेत.त्यांच्याकडे म्हणे करोडो रूपयाची मालमत्ता आहे.कोठून आली ही मालमत्ता,त्यांची आयकर कार्यालयाने चौकशी करावी,अशी मागणी आम्ही राज्य सरकारकडे करीत आहोत.या महाशयांना म्हणे चामडीचा खूप नाद आहे.त्यांचे सगळे काळे धंदे आता बेरक्या उघड करणार आहे.तुर्तास ही स्मॉल ट्रीटमेंट आहे.
बाबानो,मदत करायची नसेल तर नका करू,पण एखाद्याला वेडा ठरवून,स्वत: वेडा असल्याची पावती देवू नका,बस्स,सध्या तरी ऐवढेच,पुन्हा भेटू.
बेरक्या उर्फ नारद

नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा लवकरच भांडाफोड
नागपुरात श्रमिक पत्रकार संघाची बिल्डींग आहे.या बिल्डींगमध्ये 15 वर्षापासून अधिक काळ झाडू मारण्यापासून अनेक कामे करणारा तसेच कागदपत्रे आणि व्यवहार पाहणाऱ्या राजेंद्र महाडीक या कर्मचाऱ्यांस सध्याचे पदाधिकारी अत्यंत अपमास्पद वागणूक देत होते.शेवटी त्यास लाथा-बुक्या मारून काढून टाकले.
या निर्दयी पदाधिकाऱ्यांची अशी अनेक लफडी आहेत.दासगुप्तांना वेडा ठरविणारे हे पदाधिकारी किती वेडे आणि निच प्रवृत्तीचे आहेत,याचा भांडाफोड लवकरच...

हा पत्रकार वेडा कसा?

दासगुप्ता 'लोकमत'मध्ये आले अन् भरभरून बोलले 
शफी पठाण ■ नागपूर
घरच्या अठराविश्‍व दारिद्रय़ामुळे कचरा वेचून पोट भरणार्‍या रवींद्र दासगुप्ता या ज्येष्ठ पत्रकाराला वेडा ठरविण्याचा निंदनीय प्रकार काही मंडळींनी सुरू केला आहे. हलाखीचे जीवन जगणार्‍या दासगुप्तांना आर्थिक मदत व्हावी, या भावनेतून 'लोकमत'ने पुढाकार घेतल्यानंतर काही कारण नसताना ही मंडळी दासगुप्तांना वेडा ठरवायचा प्रयत्न करीत आहेत. ते घरचे श्रीमंत असून त्यांना मदतीची गरज नाही, असेही यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर दासगुप्ता यांना आज बुधवारी दुपारी 'लोकमत' कार्यालयात आमंत्रित केले. यावेळी त्यांनी 'लोकमत'च्या संपादकीय विभागातील कर्मचार्‍यांसोबत विविध विषयांवर तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. परंतु या प्रदीर्घ चर्चेत कुठेही कुणाबद्दल तक्रार केली नाही किंवा कुणाला शिव्याही दिल्या नाहीत. अस्खलित इंग्रजीत बोलणारे, जुन्या आठवणी तारीख व संदर्भासह सांगणारे व पत्रकारितेचे अनेक तांत्रिक पदर उलगडून दाखविणारे दासगुप्ता वेडे कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
या चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी जे सांगितले ते खरेच मोलाचे होते. दासगुप्ता म्हणाले, माझी आज जी परिस्थिती झाली आहे, त्याबद्दल माझ्या मनात कुणाबाबतही राग वा द्वेष नाही. १९८0 साली मी पत्रकारितेत आलो तेव्हा माझा पगार अडीचशे रुपये होता.
१९९६ ला जेव्हा आमचे दैनिक बंद पडले तेव्हा मला साडेआठशे रुपये मिळायचे. परंतु दैनिक बंद पडल्यानंतर तो आधारही हिरावला. सहा बहिणी आहेत यातील पाच वेगवेगळया शहरात राहतात. नागपुरात जी बहीण आहे तिच्या आधारानेच मी राहात आहे. परंतु तिचीही आर्थिक परिस्थिती काही चांगली नाही. आर्थिक आधार मी गमावला आहे. परंतु किमान मानसिक आधार तरी कायम असावा म्हणून मी रोज सायंकाळी रामकृष्ण मठात जातो व तेथे ध्यान करतो. जुने दिवस आठवतात तेव्हा डोळ्यात अश्रू उभे राहतात असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

 स्मरणशक्ती शाबूत, संदर्भही मुखपाठ
या संपूर्ण चर्चेदरम्यान दासगुप्ता यांनी पत्रकारितेच्या काळातील अनेक आठवणी सांगितल्या. त्या सांगताना ते अचूक तारीख व नेमका संदर्भही सांगायचे. कित्येक पत्रकारांची नावे तर त्यांना त्यांच्या वडिलांच्या व आडनावासह मुखपाठ होती. पत्रकारितेपासून सुमारे १८ वर्षांपासून अलिप्त असतानाही त्यांना या आठवणी व संदर्भ मुखपाठ असतील तर दासगुप्तांना मानसिक आजार आहे, असा अपप्रचार करणारी ही मंडळी कुठल्या आधारावर असे सांगताहेत हेही स्पष्ट व्हायला हवे.

पत्रकार दासगुप्ता मनाचे श्रीमंत : समाजाच्या आधाराची गरज

लिखाण अन मार्गदर्शन
दासगुप्ता म्हणाले, त्यावेळी मी मुद्रितशोधक असतानाही घोकन दासगुप्ता या टोपण नावाने लिहायचो. फिल्मफेअर, स्टार अँण्ड स्टाईल यासारख्या त्यावेळच्या प्रसिद्ध पत्रिकांमध्ये मी लिखाण केले आहे. माझ्या उत्कृष्ट लिखाणाला अनेक पुरस्कारही मिळाले.
जे केले ते प्रामाणिकपणे केले. या समग्र काळात एक दिवसही अकारण रजा घेतली नाही. परंतु माझ्यात प्रतिभा असतानाही तिला योग्य न्याय मिळाला नाही. आताचे अनेक दिग्गज पत्रकार त्यावेळी एखादा शब्द अडला की मला विचारायचे. पण, मी कधीच मोठेपणाचा आव आणून त्यांना निराश केले नाही. माझ्यापेक्षा कनिष्ठ असलेले लोक माझ्या पुढे गेले. त्यांच्यात नक्कीच प्रतिभा होती म्हणूनच ते हे यश गाठू शकले, असा मनाचा मोठेपणा जपणारे दासगुप्ता खरच वेडे असतील?
'लोकमत' कर्मचार्‍यांनी केली मदत
दासगुप्ता 'लोकमत' कार्यालयात आले तेव्हा त्यांना बघूनच त्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली. अन् ते जेव्हा बोलायला लागले तेव्हा हा माणूस किती 'ग्रेट' आहे हेही कळून चुकले. ध्येयवादी पत्रकारितेसाठी आयुष्य वेचणारा हा प्रामाणिक पत्रकार आज कचरा वेचतोय हे बघून हृदय हेलावले व त्यांना तातडीची मदत व्हावी, या उद्देशाने 'लोकमत'च्या संपादकीय सहकार्‍यांनी एक छोटीशी रक्कम गोळा करून त्यांच्या स्वाधीन केली.
पत्रकार संघटनांनी पुढे यावे
या चर्चेत दासगुप्ता यांनी वैयक्तिक मदत करणार्‍या पत्रकार संघटनांच्या जुन्या सहकार्‍यांचे आभार मानले परंतु त्यासोबतच पत्रकारांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणून मला या संघटनांकडून कोणताच आधार मिळाला नाही, ही खंतही व्यक्त केली. आतापर्यंत दासगुप्तांची व्यथा या संघटनांना कळली नसेलही कदाचित. परंतु आता 'लोकमत'ने ती पुढे आणल्यानंतर तरी दासगुप्तांना मदत लाभावी यासाठी पत्रकार संघटनांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथे साधा संपर्क
दासगुप्ता यांना समाजाने मदती करावी असे आवाहन परत एकदा 'लोकमत'कडून करण्यात येत आहे. रवींद्र दासगुप्ता, राय यांच्या घरी, कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या मागील बाजूस, काचीपुरा, रामदासपेठ या पत्त्यावर ते सहज सापडतील. याशिवाय त्या परिसरात 'घोकन' दासगुप्ता यांच्याबद्दल विचारणा केली तर सहज पत्ता सापडतो. याशिवाय कुसुमताई वानखेडे सभागृहाच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवरदेखील ते दिवसा बसलेले असतात. सायंकाळच्या सुमारास ते रामकृष्ण मठातदेखील हमखास जातात. 
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार दासगुप्ता यांची कर्मकहाणी 'लोकमत'मध्ये प्रकाशित होताच काही मंडळींनी दासगुप्तांची आर्थिक परिस्थिती कशी उत्तम आहे व ते कसे मजेत बंगल्यात राहतात, असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुस्थिती जाणूून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने दासगुप्ता यांच्या घरी भेट दिली असता सर्व चित्रच स्पष्ट झाले. जेथे दासगुप्ता राहतात मुळात तो बंगला नाहीच. ती केवळ एक मोठी पण मोडकळीस आलेली इमारत आहे. दाराच्या डाव्या बाजूला मोडून पडलेला सोफा, पलंगावरची मळकट चादर अन् किचनमधील जुनाट भांडी दासगुप्ता अन् त्यांची बहीण किती 'श्रीमंत' आहे, हे न विचारताच सांगायला लागली.

साभार - दैनिक लोकमत, नागपूर  

मराठी पत्रकार परिषद दासगुप्तांना आर्थिक मदत करणार

नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आर्थिक मदत करण्याचे आश्वासन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम.देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक यांनी आज दिले आहे.आहे.
नागपुरात लवकरच हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे.अधिवेशनाच्या काळात आपण नागपुर मुक्कामी असून,दासगुप्ता यांची आपण आणि परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक प्रत्यक्ष भेट घेवून,त्यांना आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांचे वय 60 वर्षे झाले अशा पत्रकार आणि वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने पेन्शन सुरू करावी,अशी मागणी देशमुख यांनी यापुर्वीच केली आहे.या मागणीचा त्यांनी पुर्नउच्चार केला आहे.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

नागपुरात मानसिक संतुलन कोणाचे बिघडले आहे ?

नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांची दुर्देवी कहाणी बेरक्या आणि लोकमतने प्रकाशित केल्यानंतर नागपुरातील पत्रकार संघटना उघड्या पडल्या आहेत.या संघटना दासगुप्तांना मदत करण्याऐवजी त्यांना वेडा ठरवत आहेत.दासगुप्ता श्रीमंत आहेत,त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,असा जावाईशोध या संघटनांनी लावला आहे.

मित्रानो, दासगुप्ता यांनी नागपूर टाइम्समध्ये प्रुफ रिडर म्हणून सोळा वर्षे काम केले आहे.ऐवढेच नाही तर त्यांनी टोपण नावाने लिखाण केले आहे.असे असताना,दासगुप्ता पत्रकार नाहीत,हे म्हणणे कितपत योग्य आहे.बातम्या लिहिणारा व्यक्ती म्हणजे पत्रकार आणि पत्रकारांनी लिहिलेल्या बातम्या तपासणारा पत्रकार होवू शकत नाही का ?

एक वेळ हा भाग सोडा,आपल्यात काही माणुसकी शिल्लक आहे की नाही? दासगुप्ता हे एक माणूस आहेत,आणि माणसाने माणसाला मदत करू नये का ?

दुसरे असे की,दासगुप्ता यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,
असे सांगणार्याकडे  वैद्यकीय डीग्री आहे का ? कोणत्या आधारे असे ते म्हणतात ? दुसऱ्यास मानसिक संतुलन बिघडले आहे,म्हणणारे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचेही मानसिक संतुलन बिघडले आहे का,असा प्रश्न आहे.


लोकमत प्रतिनिधीने प्रत्यक्ष त्यांची भेट घेवून बातमी दिलेली आहे.नागपुरचे पत्रकार सुरेश चरडे दररोज त्यांची भेट घेत आहेत.त्यांना कधीच दासगुप्तांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,असे दिसून आले नाही.दासगुप्तांनी भेट न घेता,त्याच्याबद्दल
गरळ ओकणाऱ्यास आपण काय म्हणाल ?

मित्रानो,दासगुप्तांना आम्ही एक माणूस म्हणून मदत करण्याचे आवाहन आपणास केले आहे.त्यात आमचा कसलाही स्वार्थ नाही.याबाबत आपणच योग्य निर्णय घ्यावा.

असो,नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि पत्रकार कल्याण ट्रस्टच्या अध्यक्षांनी जो आम्हाला ई-मेल केला आहे,तो जसाचा तसा प्रकाशित करीत आहोत.निर्णय आपण घ्यायचा आहे.

....................................................................................

Apologise or face legal action: NUWJ to Berkya Narad.comThe Nagpur Union of Working Journalists (NUWJ) strongly condemns the shameless and brazen attempt by some disgruntled elements and pseudo journalists of news website Berkya Narad.com to depict or project a specially challenged person and former proof-reader of now-defunct Nagpur Times Shri Rabindra Dasgupta and his family in such a bad light.

Instead of sympathising with Shri Dasgupta and helping him, these pseudo journalists have brought disrepute to the entire journalistic fraternity in central India by making public the disability of a medically unsound former media person, who is battling acute sleep disorder (called ‘Somnipathy’ in medical terms) and memory disorder for nearly four decades now.

First of all, Shri Rabindra Dasgupta is not a rag-picker or beggar or pauper!!!

He comes from a very good and resourceful family. He is the only son of Shri Narayan alias Baabla Dasgupta, who was the secretary of local Bengali Association and a very influential Bengali personality of Nagpur. The Dasguptas have a good house in posh Ramdaspeth area (which is also known as Kuber Nagari of the city). He is living with one of his sisters, who was a lecturer in a Nagpur-based college.

Shri Dasgupta’s act or behaviour of picking rag or begging is an offshoot of his neurological disorder which he is battling for long now.Hitherto, other than Shri Dasgupta’s immediate family, only his former colleagues knew about his disability and always helped him in a manner they considered best.

But now the entire world knows about Shri Dasgupta’s disability, thanks to the news website Berkya Narad.com, which recently posted the news projecting Shri Dasgupta as a rag-picker and beggar sustaining on alms, thus defaming the Dasgupta family as also the entire journalistic fraternity here.

Quite evidently, these pseudo journalists have sought to settle personal scores whatsoever, with the former and present office-bearers of NUWJ and the Tilak Patrakar Bhavan Trust. For, nothing else can explain the uncouth claim of this news website that a non-journalist is heading the Tilak Patrakar Bhavan Trust, which actually is headed by a very senior journalist who is associate editor of one of the leading English dailies of the country.

As for Shri Dasgupta, he was working with Nagpur Times as a proof reader and was never a full-fledged writer. How can a person with such neurological disorder train professional journalists is a million dollar question?????
Therefore, it is quite clear that those at the helm of affairs at Berkya Narad.com do not know who Shri Dasgupta is and what his family background and problems are. They posted the news on their website without verifying facts from any of the former colleagues of Shri Dasgupta.

Also, the NUWJ feels very sorry about these elements, who evidently seem to have entered the profession of journalism long after Nagpur Times had become a history and Shri Dasgupta and many others were left to fend for themselves.

Such acts only expose the mental bankruptcy of these mischievous elements and pseudo journalists.

Therefore, the NUWJ seeks unconditional apology from the news website Berkya Narad.com within 7 days failing which appropriate legal action will be initiated.

As for the former colleagues of Shri Dasgupta, the NUWJ is sure they will continue to help him in the manner they have been doing for over two and a half decades now!!!

B S Tripathi                         Anupam Soni
President, NUWJ.          General Secretary, NUWJ.

...........................................................................................................

I was disturbed to read a news item in Lokmat on Tuesday regarding

Rabindra Dasgupta, who was a proof reader in Nagpur Times, now begs

for livelihood. The news also appeared in a Marathi website along with

a couple of pics of Dasgupta that blamed the Nagpur-based journalists

and journalists association for not helping him.

Dasgupta is the only son of Bhablu Dasgupta, who was the secretary of

local Bengali Association and a very affluent Bengali personality of

Nagpur. The Dasguptas have a good house in posh Ramdaspeth area

(Which is known as Kuber Nagri). He is living with his sister, who

was a lecturer in a Nagpur-based college.

As he is mentally unsound, his family members have almost deserted him

for obvious reasons. Money is not a problem for Dasgupta family. His

being mentally challenged is the real problem. His problem has

aggravated in the past few years.

Even in Nagpur Times, those who have worked with him know quite well

that it were his colleagues because of whom his job was secure. It was

his colleagues who ensured that he remained untouched by the Naresh

Gadre management despite all his physical and mental inabilities.

Moreover, Dasgupta was working as a proof reader and was never a

full-fledged journalist. How can a mentally unsound proof reader train

professional journalists is a million dollar question????? (the

Marathi website claimed that he trained several journalists).

Therefore, only such people and pseudo journalists / media persons can

raise this issue who do not know who Dasgupta is and what is his

background and problems are.

So may God bless such pseudo journalists/ media persons for raising

such an ‘‘insanely non-important, non-issue issue.’’ Probably they

are not aware that Dasgupta had been admitted to mental hospital more

than a couple of times. So what point these elements are trying to

make is something beyond a normal person’s comprehension?????

So God bless these pseudo journalists!!!!!!!!

-Pradip Maitra <pradipmaitra@gmail.com>

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

बेरक्यानंतर लोकमतने घेतली, दासगुप्तांच्या दुर्देवी कहाणीची दखल

कचरा वेचून पोट  भरतोय 'कलम का पुजारी'
झुंजार पत्रकाराची व्यथा : १६ वर्षांच्या साधनेची अशीही परिणती
शफी पठाण ■ नागपूर 

ना तोफ निकालो, ना तलवार निकालो
गर जंग मुखातीब हो, तो अखबार निकालो..

अशा शब्दांत वृत्तपत्राचे सार्मथ्य विशद केले जाते. तोफ आणि तलवारींनी जे शक्य नाही ते वृत्तपत्रातल्या एका बातमीने घडू शकते, असा या शब्दांचा अर्थ आहे. त्यालाही असेच वाटायचे. नव्हे, त्याची निष्ठाच होती या शब्दांवर. एका टोकाला श्रीमंतीचा पाऊस कोसळतोय धो धो अन् दुसर्‍या टोकाला उपाशापोटी मरणार्‍यांना पोटात घेणारे नुसतेच वाळवंट अस्वस्थ करायचे त्याच्या संवेदनशील मनाला. बंगालचा लढवय्या इतिहास त्याच्या रक्तातून सळसळत वाहात होता. परंतुु शस्त्रावर त्याचा विश्‍वास नव्हता म्हणून मग त्याने लेखणी हाती घेतली. गरम रक्ताची ही सळसळ शब्दांत बांधून समाज परिवर्तनाचा बिगुल फुंकण्यासाठी तो अगदी ठरवून पत्रकारितेत आला. ऐन उमेदीची तब्बल १६ वर्षे त्याने या क्षेत्रात घालवली. कर्तव्यनिष्ठेत संसाराची बाधा नको म्हणून लग्नही केले नाही. केवळ पत्रकारितेसाठी असा त्याग स्वीकारणारा कलम का हा पुजारी आज रस्त्यावरचा कचरा वेचून पोट भरतोय. ही विदारक कहाणी आहे एकेकाळी नागपूर टाइम्ससारख्या प्रसिद्ध दैनिकात काम करणार्‍या रवींद्र दासगुप्ता यांची.
दासगुप्ता मूळचे बंगालचे. वडिलांसोबत नागपूरला आले. इंग्रजी माध्यमातून बी.ए. केल्यानंतर हजार पर्याय होते नोकरी-व्यवसायाचे. परंतु समाजात वाढणारी श्रीमंत-गरिबांमधली दरी त्यांना पाहावत नव्हती. हे चित्र बदलले पाहिजे या विचारांनी दासगुप्ता झपाटले होते. तो काळ तसा नक्षल चळवळीच्या उभारणीचा होता. परंतु विचारांनी भरकटलेली सशस्त्र क्रांती त्यांना मान्य नव्हती. म्हणून दासगुप्तांनी १९८0 साली पत्रकारितेची विधायक वाट स्वीकारली. नागपूर टाइम्समध्ये पूर्ण वेळ सेवा देऊनही इतर दैनिकांत ते टोपण नावाने लिहायचे. विविध विषयांवर त्यांनी सडेतोड भाष्य केले. अनेकदा त्याचे वाईट परिणामही त्यांना भोगावे लागले. परंतु तडजोड त्यांना माहीतच नव्हती. एक दिवस दुर्दैवाने दैनिक बंद पडले अन् दागसुप्तांआड दडलेला लढवय्या पत्रकार कोलमडून पडला तो पुन्हा सावरलाच नाही. लग्न केलेच नव्हते. त्यामुळे कुणाच्या आधाराचा प्रश्नच नव्हता. सहा बहिणींचा हा लाडका भाऊ नोकरी गमावल्यानंतर एका क्षणात परका झाला. परंतु यातल्या एका बहिणीने गरीब असूनही मोठय़ा हिमतीने मदतीचा हात समोर केला. परंतु स्वाभिमानी आयुष्य जगणार्‍या दासगुप्तांना ही दया नको होती. म्हणून त्यांनी असा कचरा वेचण्याचा पर्याय स्वीकारला. शंकरनगर मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहाजवळ त्यांचे घर आहे पण त्या संपत्तीवर त्यांचा मोह नाही. त्या घरात त्यांच्या बहिणी राहतात. जी लेखणी मला जीवापाड प्रिय होती ती दुरावली. आता या घराचे मी काय करू, असा त्यांचा सवाल आहे. नोकरी आता राहिली नाही. परंतु शब्दांचा साथ काही सोडवत नाही. रोज सकाळी-सायंकाळी ते शहरातल्या वाचनालयांत शोधत असतात जुने दिवस. परंतु त्यांची अशी बकाल अवस्था बघून कुणी त्यांना आत प्रवेशच देत नाही. काही जण तर तू पढ के क्या करेगा, अशा शब्दांत त्यांची हेटाळणी करतात. परंतु हा माणूस म्हणजे कधीकाळी शब्दांचे विद्यापीठ होता हे त्या पामरांना कोण सांगणार?
नोकरी चाहिये, पर देगा कौन?
दासगुप्ता आज रस्त्यावरचे भणंग आयुष्य जगत असले तरी त्यांच्यात दडलेला पत्रकार मात्र आजही श्रीमंत आहे. इंग्रजीवरचे प्रभुत्व तर केवळ थक्क करणारे आहे. विचारांची प्रखरताही तशीच कायम आहे. त्या विचारांना पुन्हा शब्दांत बांधून वाचकांपुढे ठेवण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. परंतु माझ्यासारख्या अशा औलियाला कोण नोकरी देणार, असा त्यांचा सवाल आहे. आज अनेक मोठय़ा दैनिकांचे सारथ्य करणारे ज्येष्ठ पत्रकार संपादक दासगुप्ता यांचे सहकारी राहिले आहेत. परंतु कधीही दासगुप्तांनी या संबंधांना पोटच्या भुकेवर मात करण्यासाठी वापरले नाही. कधी रामदास पेठ, कधी शंकरनगर तर कधी बर्डी मेनरोडच्या कडेला ते हमखास आढळतील. ध्येयवादी पत्रकारितेचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर या क्षेत्रात नव्याने येणार्‍यांनी एकदा तरी या माणसाला एकट्यात गाठायलाच हवे. कारण माध्यमांच्या झगमगणार्‍या विश्‍वात उद्या अशी पत्रकारिता कोळून पिलेली माणसं भेटतीलच याची काय शास्वती?


दैनिक लोकमत,नागपूर 

..........................................................................

नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांची दुर्देवी कहाणी वाचल्यानंतर अनेकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.रविंद्र दासगुप्ता यांना जे आर्थिक मदत करतील,त्यांची नावे बेरक्या ब्लॉग आणि बेरक्या फेसबुक वॉलवर प्रसिध्द केली जातील.यात कोणताही मोठेपणा नसून,व्यवहार पारदर्शक राहण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.दररोज मदत करणाऱ्यांचे नाव आणि रक्कम प्रसिध्द केली जाईल,नंतर एकूण जमा रक्कम घोषित केली जाईल.
.......................................................................................................

नागपुरचे पत्रकार रविंद्र दासगुप्ता यांना ज्यांना मदत करायची आहे,त्यांनी सुरेश चरदे,पत्रकार,लोकशाही वार्ता ( Mobile .9595529080 ) यांच्याशी संपर्क साधावा तसेच त्यांचे बँक अकौाट नंबर खालील प्रमाणे आहे

*सुरेश चरदे,
बँक आॅफ इंडिया - खाते क्र.870810110003217 आणि
अ‍ॅक्सिस बँक खाते क्र. 13010021242612
- यात आपण मदतनिधी जमा करू शकता.
- चरदे यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केल्यानंतर बँक स्लीपची झेराक्स प्रत बेरक्याला ई - मेल करावी,ही विनंती.
berkya2011@gmail.com

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

नागपुरातील पत्रकारावर भिक मागण्याची वेळ...

  हे पत्रकार आहेत आणि आज ते नागपुरातील रामदासपेठ भागात रस्त्यावर तुम्हाला ते भिक मागताना दिसतील. एकेकाळचे गाजलेले वृत्तपत्र नागपूर टाइम्स या दैनिकात ते पत्रकार होते. अनेकांना त्यांनी पत्रकारितेची बाराखडी शिकविली. अनेकांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. परंतु आपला सहकारी नागपुरातील रस्त्यावर भिक मागतो आहे,
याबद्दल कोणालाही खंत असल्याची दिसून येत नाही. हीच खरी खेदजनक बाब आहे.
नागपुरातील पत्रकारांचे नेतृत्व करणाºयांनी दासगुप्ता यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, तसेच शासनाकडूनही काही मदत मिळवून त्यांची दैनावस्था दूर करायला हवी होती. दासगुप्ता यांच्यावर ही वेळ स्वत:ला ज्ञानयोगी म्हणवून घेणाºया स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी आणली आहे. एसटी व कारच्या अपघातात जिचकार यांचा २ जून २००४ मध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र मोटार व्हेईकल ट्रायब्युनलमध्ये नुकसान भरभाईचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी  १ नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांच्या कुटुंबीयांना ५०.६७ लाख रुपये देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहे. परंतु ज्ञानयोग्यांनी नागपूर टाइम्स हे वृत्तपत्र बंद पाडून अनेकांच्या आयुष्याचे बजेट झिरो करून दासगुप्ता यांच्यावर भिक मागण्याची वेळ आणली. दासगुप्ता यांचे आयुष्यच त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले त्यामुळे जिचकार कुटुंबीयांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु असे होणार नाही आणि पत्रकार बंधूही
त्यांच्या मदतीला धावणार नाही, हे स्पष्ट आहे. बघु
 या याप्रकरणी कोण काय करतात ते?

बेरक्यातर्फे नम्र आवाहन
.................................
नागपुरातील पत्रकार दासगुप्ता यांच्यावर भीक मागण्याची दुर्देवी पाळी आल्याची बातमी वाचून माझे मन गेल्या दोन दिवसांपासून सुन्न झाले आहे.त्यामुळे मी दीपावली अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करीत आहे.तसेच माझ्या वतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच नागपुरातील माझ्या काही सहकाऱ्यांना दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे,ऐवढेच नाही तर दासगुप्ता यांना कायमस्वरूपी काय मदत करता येईल,यासाठी बोलणी सुरू आहे.
मित्रानो,पत्रकारितेत एक वर्षापुर्वी आलेले काही नवखे चार चाकी घेवून फिरत आहेत,आणि दुसरेकडे वर्षेनुवर्षे प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्यावर भीक मागण्याची पाळी येत आहे.हे विरोधाभास पाहिला की,मनाना खूप वेदना होतात.प्रामाणिक पत्रकारितेचे हेच का फळ,असे वाटते...
असो,आपणही आपल्या परिने दासगुप्ता यांना आर्थिक मदत करावी,त्यासाठी आपल्या जवळच्या नागपुरातील पत्रकारांशी संपर्क साधावा किंवा आम्ही नागपुरातील एका वृत्तपत्राच्या माध्यमातून दासगुप्ता यांच्यासाठी मदतनिधीचे आवाहन करीत आहोत,तेथेही आपण मदत करू शकता.

दासगुप्ता यांनी लग्न न केल्यामुळे त्यांना कोणीही वारस नाही.त्यामुळे ते बेवारस होवून भीक मागत आहेत.कृपया सर्वांकडून मदतीची अपेक्षा...
...........................................

नागपुरातील पत्रकार दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्यासाठी नागपुरचे पत्रकार Suresh Charde (मो 9595529080) यांच्याशी संपर्क साधावा...
----बेरक्या उर्फ नारद
 

फेसबुक वर शेअर करा

Facebook