> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

लेखण्या बोथट झाल्यामुळे पत्रकार संघाचे पीक

बीड - वृत्तपत्रांच्या वाढत्या संख्येबरोबरच पत्रकारांचीही संख्या वाढली असतांना लेखण्या बोथट झाल्या की काय? असे होऊन पत्रकार संघांना शहरात उदंड पीक आल्याचे दिसत असुन त्या माध्यमातून नेतागिरी करण्याचा प्रकार वाढला आहे. पत्रकारांचे कोणतेही प्रश्न न सोडवता केवळ नेतागिरी करण्यासाठीच पत्रकार संघ स्थापन केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले असून एकट्या बीड शहरात सहाव्या जिल्हा पत्रकार संघाची स्थापना होऊ घातली जात असल्याचे वृत्त आहे. वृत्तपत्रेच आपली नेतागिरी टिकवण्यासाठी पत्रकार संघ स्थापन करू लागल्याने हे स्पष्ट झाले आहे.
या बाबत वृत्त असे की, सध्या बीड जिल्ह्यात वृत्तपत्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली त्याबरोबरच पत्रकारांची संख्या चांगलीच वाढली आहे. अनेक ठिकाणी तर या पत्रकारांनाच अनेकजण घाबरून असल्याचे चित्र पहावयास मिळते. त्याचवेळी बीड जिल्ह्यात पत्रकारांच्या संघटनाही वाढत आहे. यापुर्वीच बीड शहरात सध्या जिल्हा मराठी पत्रकार संघ म्हणुन चार संघटना अस्तित्वात आहेत. तर मुस्लिम पत्रकारांचा वेगळाच संघ असुन प्रेस क्लब नावानेही एका संघाची न्यास नोंदणीकडे नोंदणी करून ठेवल्याचे समजते. या सर्वच पत्रकार संघटनांकडून न्याय मिळत नाही अशी भावना व्यक्त करत शहरातील काही पत्रकारांनी पुन्हा युवक पत्रकार संघाच्या नावाखाली वेगळ्या संघाची स्थापना करण्याचे घाटत आहे. याबाबत एक बैठक झाली असुन स्थापनेसाठी लवकरच दुसरी बैठक होणार असल्याचे समजते. प्रत्येक पत्रकार संघात इकड तिकडच्या पत्रकार संघातून सदस्यत्व किंवा पदाधिकारी पद उपभोगणारेच दुसर्‍या पत्रकार संघात पदे स्विकारत असल्याने ते पुन्हा अन्य लोकांना किंवा पत्रकरांच्या प्रश्नांना काय न्याय देणार? हे मात्र समजु शकत नाही.
विशेष म्हणजे कोणताही पत्रकार संघ स्थापन करतांना शहरातील एखाद्या वृत्तपत्राने त्यात पुढाकार घेतल्याचे दिसुन येते व पुढे कंसात का असेना पण त्या वृत्तपत्राचा पत्रकार संघ म्हणुनच तो पत्रकार संघ आणि त्याचे पदाधिकारी मिरवतांना दिसतात. त्यामुळे आगामी काही काळात शहरात आणखी काही वृत्तपत्रांचे वेगवेगळे पत्रकार संघ स्थापन झाले तर आश्चर्य वाटायला नको. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे कोणताही पत्रकार संघ स्थापन होतांना जे पदाधिकारी होतात ते पुढे पाच किंवा दहा वर्ष झाली तरी पद सोडत नाहीत आणि पदाधिकारी बदलत नाही. होणारे पदाधिकारी तहहयात असल्यासारखेच वावरतात. आणि त्यांच्याच नाराजीतून पुन्हा नविन पत्रकार संघाचा जन्म होतांना दिसतो. पत्रकारांचा एखादा कार्यक्रम आला म्हणजे सर्वच संघातील सदस्यांना बोलावून गृह निर्माण योजनेसारखी लालुच दाखवुन पाठीशी उभे केले जाते. आणि पुन्हा या योजनेची आठवण नविन वर्षाच्या नविन कार्यक्रमात केली जाते.
शासनाच्या मदतीने बीड शहरात पत्रकार भवन तर आहे. पण ते नेमक्या कोणत्या पत्रकार संघाकडे आहे आणि त्याचे आर्थिक व्यवहार कोण पाहतो, पत्रकार भवनाच्या जागा कोणी कशा घेतल्या आणि त्यांचे भाडे कोणत्या खात्यात जमा होते हे कोणत्याच पत्रकार संघाला सांगता येणार नाही. एका पत्रकार संघाचे वाद तर न्यास नोंदणीच्या खेटा मारून उच्च न्यायालयातही  पोहचल्याचे वृत्त आहे. पत्रकारांचे कोणतेही प्रश्न न सुटताही इतके पत्रकार संघ का स्थापन होतात याचे कोडे जिल्ह्यातील भल्या भल्या राजकीय पुढार्‍यांनाही सुटलेले नसले तरी ते प्रत्येक पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍यांना राजाश्रय देत असल्याचे दिसत असल्यामुळे केवळ पदाधिकारी होण्यासाठीच पुन्हा पुन्हा पत्रकार संघ स्थापन होतांना दिसतात. शासनाच्या माहिती खात्यालाही कोणता पत्रकार संघ अधिकृत आणि कोणता खरा याचे उत्तर सापडत नसल्याचे अनेक वेळा दिसुन येते. अनेक वेळा तर आपण पुर्वीच्या कोणत्याही पत्रकार संघाच्या पदाधिकार्‍याला आपला नेता मानत नाही हे दाखवून देण्यासाठीच नवा पत्रकार संघ स्थापन केला जात असल्याचे दिसुन येते. विशेष म्हणजे पत्रकार संघांची संख्या मोठी असल्यामुळे अनेकांची पदाधिकारी होण्याची इच्छा मात्र पुर्ण होते. वेगळा पत्रकार संघ दाखवला तरी अंधारात एकत्र येऊन आपल्या नेतागिरीचे लाभही मिळवता येतात.
पत्रकार संघाचा नेता झाल्यानंतर शासकीय यंत्रनांची आणि राजकीय पुढार्‍यांची संबंध जुळवुन आपण जिल्ह्यातील पत्रकारांचे नेते आहोत हे दाखवत आपल्या खाजगी संस्था/सोसायट्या स्थापन करून लाभ आणि पदेही लाटता येतात. बीड शहरात शहरातील पत्रकारांचे पत्रकार संघ असले तरी हे पत्रकार संघ आपण जिल्ह्याचे असल्याचेच दाखवतात. पत्रकार संघांची संख्या वाढली असली तरी शहरातील आणि जिल्ह्यातीलही अनेक पत्रकार मात्र या कोणत्याही पत्रकार संघाचे साधे सभासदही नसुन आपला या संघाचा संबंध नसल्याचे दाखवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करून या कोणालाच आपण नेते मानत नसल्याचे ते दाखवत असतात. तरीही शहरात पत्रकार संघाची संख्या मात्र वाढतच असते. पुर्वीच्या पत्रकार संघांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवले नसले तरी नविन स्थापन होणार्‍या संघाने तरी पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी अपेक्षा अनेक पत्रकार व्यक्त करत होते.

राज्य पातळीवरही तेच
राज्य पातळीवरही गेली पन्नास वर्षे पत्रकारांच्या प्रश्नावर काम करणारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद काहींनी बाजुला ठेवली असून नविनच महाराष्ट्र पत्रकार संघाची स्थापना केल्याचे वृत्त दोन दिवसांपुर्वीच आले आहे. त्यांनीही केवळ राज्य स्तरीय ज्येष्ठ पत्रकारांना सोबत घेत आपण सर्व महाराष्ट्राचे नेते असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न चालवल्याचे दिसत आहे.

सोमवार, ३० डिसेंबर, २०१३

पत्रकार डॉ. संजय भोकरडोळे यांचे पुस्तक जळगाव विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात!
पत्रकार डॉ. संजय कृष्णाजी भोकरडोळे यांचे "आठवणी स्वातंत्र्यसैनिकांच्या" या पुस्तकाचा जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल डॉ. बोरसे यांनी यासंदर्भात परिपत्रक कास्धून ते खानदेशातील सर्व महाविद्यालयांना पाठविले आहे.

'उमवि'च्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेतील इतिहास विभागाच्या डॉ. सुलोचना पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक अभिप्रायानंतर विद्यापीठाने या पुस्तकाची अभ्यासक्रमासाठी शिफारस केली आहे. एका पत्रकाराचे पुस्तक विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. या पुस्तकातून खानदेशातील स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

डॉ. संजय भोकरडोळे (9370673579) यांनी बीएस्सी, एमए, एमसीजे अशा शिक्षणानंतर पत्रकारितेत पीएचडी प्राप्त केली आहे. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रातून त्यांनी जळगावात दीर्घकाळ काम केले. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेत 'जलस्वराज'साठी जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम केले आहे. दबाव आणून राजीनामा घेणारया 'सकाळ'च्या मालक, संचालक, संपादक, प्रशासनाला त्यांनी न्यायालयात खेचून मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात नमते घ्यायलाही भाग पाडले आहे. त्यांचा हा लढा सध्याच्या पीडित पत्रकारांसाठी विस्तृतपणे मांडणार असल्याचे 'बेरक्या'ने यापूर्वीच जाहीर केले आहे.

राज्यभरातील पत्रकारांना हे पुस्तक निम्म्या किमतीत देण्याचे डॉ. भोकरडोळे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी लेखकाशीच थेट संपर्क साधावा (E-Mail : bhokardolesanjay@gmail.com. डॉ. भोकरडोळे यांनी "यशस्वी वार्ताहर कसे व्हावे?" हे पुस्तकही लिहिले असून त्याच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

शुक्रवार, २७ डिसेंबर, २०१३

बेळगाव 'तरुण भारत’चे मुंबईत शानदार पदार्पण


मुंबई- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा साक्षीदार आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ाचा बुलंद आवाज असलेल्या बेळगाव `तरुण भारत’च्या मुंबई आवृत्तीचा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवारी उत्साही वातावरणात संपन्न झाला. या प्रकाशन सोहळय़ाच्या निमित्ताने गेली पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विश्वासार्ह दैनिक म्हणून लोकमान्य पावलेला `तरुण भारत’ मुंबईत आपली संघर्षाची आणि सडेतोड पत्रकारितेची परंपरा कायम ठेवील, अशी ग्वाही संपादक किरण ठाकुर यांनी यावेळी व्यासपीठावरून दिली.
माटुंगा येथील सिटीलाईट सिनेमागृहातील शानदार समारंभात झालेल्या या प्रकाशन सोहळय़ाप्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते मनोहर जोशी, महापौर सुनील प्रभू, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, `तरुण भारत’चे कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर, संचालिका सई ठाकुर, बाबा धोंड आदी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात `तरुण भारत’चे संकेतस्थळ आणि स्व. बाबुराव ठाकुर यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱया `समरांगण हे जीवन ज्यांचे’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.
बेळगाव महाराष्ट्रात दिसावे
`तरुण भारत’ची आवृत्ती मुंबईत सुरू झाल्याने आता बेळगाव महाराष्ट्रात दिसावे, अशी इच्छा बाबासाहेब पुरंदरे यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी `तरुण भारत’ची नववी आवृत्ती पुण्यातून सुरू करावी, असा प्रेमळ आग्रह बाबासाहेब यांनी धरल्यानंतर सभागृहात उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला. सीमाभागातील जनता महाराष्ट्रात जायचे म्हणते त्यावेळी त्यांच्यावर गोळय़ा घालणे, लाठी हल्ला करणे ही कुठली नीती?, असा संतप्त सवाल पुरंदरे यांनी केला. सीमाप्रश्न समजुतीने सोडविण्याचे प्रयत्न संपू नये आणि त्यापूर्वीच लढय़ाला यश मिळावे. सीमाप्रश्न सामंजस्याने सोडविला नाही तर आपापसातील मतभेदांचा फायदा तिसरे घेतील. त्यामुळे सावध रहा रात्र वैराची आहे, असा इशाराही बाबासाहेबांनी कर्नाटकाला दिला.
`तरुण भारत’ यशस्वी होईल
स्वातंत्र्याची आस आणि समाजसेवेचा ध्यास घेऊन समाजसेवेची साधना ठरलेले `तरुण भारत’ मुंबईत यशस्वी होईल, असा आत्मविश्वास मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. `सीमाभाग हा भीक मागून नव्हे तर आम्ही हक्काने मिळवू. सीमाप्रश्नासाठी पुन्हा आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही’, असेही जोशी यांनी सांगितले. मनोहर जोशी यांनी यावेळी `तरुण भारत’चे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबुरावांना पाहिल्यानंतर मनात मोठय़ाने घोषणा द्यावीशी वाटायची. कारण बाबुरावांनी आपल्या कामाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. बाबुरावांची हीच परंपरा ठाकुर कुटुंबियांच्या तिसऱया पिढीने सुरू ठेवली, त्याबद्दल अभिनंदन. आज उगविणाऱया सूर्याचा कधीही अस्त होणार नाही, अशा सदिच्छाही जोशी यांनी दिल्या. आपल्या राजकारणाची सुरुवात सीमा लढय़ाने झाल्याचे जोशी यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
`तरुण भारत’मुळे महायुतीची सत्ता येणार
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी `सामना’ दैनिक सुरू केल्यानंतर राज्यात युतीची सत्ता आली. आता `तरुण भारत’ची मुंबई आवृत्ती सुरू झाल्याने राज्यात महायुतीची सत्ता येणार, असा दावा रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत केला. `तरुण भारत’ने पँथरच्या चळवळीतील माझ्या बातम्या छापल्या त्यामुळेच मी राजकारणात पुढे आलो, असे आठवले यांनी सांगितले. बेळगावचा सीमाभाग अजून महाराष्ट्रात आलेला नाही, तो महाराष्ट्रात यावा आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरचा अन्याय दूर व्हावा म्हणून आपण सीमालढय़ाबरोबर असू, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.
मराठी माणसाचा अभिमान
गौरवशाली इतिहास असलेला `तरुण भारत’ हा मराठी माणसाचा अभिमान आहे. सामाजिक बांधिलकी लोकप्रिय पुरवण्या, व्यापक जाळे आणि तांत्रिक प्रगती ही `तरुण भारत’ची वैशिष्टय़पूर्ण परंपरा आहे. स्वातंत्र्य लढा, गोवामुक्ती संग्राम आणि सीमालढय़ाची पार्श्वभूमी असलेला `तरुण भारत’बद्दल वाचकांना आदर आहे. आता `तरुण भारत’च्या मुंबई आवृत्तीच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या चांगल्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचतील, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला.
औचित्यपूर्ण सत्कार
या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि `दैनिक नवाकाळ’चे संपादक नीलकंठ खाडिलकर यांना मानपत्राचे वाचन करून गौरविण्यात आले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा सत्कार त्यांच्या चिरंजीवाने स्वीकारला. `रूरल डेव्हलपमेंट’चे संस्थापक प्रदीप लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला.

नरेंद्र कोठेकर निवासी संपादक
संपादक किरण ठाकुर यांनी यावेळी मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक म्हणून नरेंद्र कोठेकर यांच्या नावाची घोषणा केली. या घोषणेनंतर कोठेकर यांचा सत्कार करण्यात आला.

सोमवार, २३ डिसेंबर, २०१३

हिवाळी अधिवेशनात दिव्यचॆ दिव्य कारनामे....

अकोल्यात आलेले दिव्य मराठी हिवाळी अधिवेशनात दणकून गाजवेल असे वाटत होते पण टीम लिडरलच राजकारण आणि एकमेकांची भांडणे अशा अपरिपक्व कामात शक्ती घालवत असल्याने हिवाळी अधिवेशनात दिव्यची काडीचीही चर्चा झाली नाही. उलट घोड चुकाच झाल्या. मराठवाड्यातील व विदर्भातील आमदारांची नावे व फोटो चुकीचे लागले. मुख्यमंत्र्यांच्या बातमीत कच-याचा फोटो लागला. खास बाब म्हणजे हे सर्व काही जण जाणीवपूर्वक करत होतॆ. दिव्यचा एका स्पर्धकाने तशी त्यांना सुपारीच दिली आहे. त्यात चांगले काम करणारे घालवायचे. आगामी लोकसभा निवडणूक दिव्यला कैश करु द्यायची नाही म्हणून दिव्य मध्येच राहून आतल्या आत व्यवस्था हळूहळू पोखरायची अशी ही सुपारी आहे. त्यासाठी त्यांना स्पर्धकाकडून आर्थिक मोबदलाही नियमितपणे मिळत आहे. ईतकॆच नव्हे तर दिव्यपेक्षा अस्तित्वात असलेला हा स्पर्धक आपल्याला घरपोच कसे वेतन, भत्त्याचे चेक आणून देतो हे सांगत अनेकांचे 'मत'परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशा या कारवाया वाढत जातील. अशात दिव्यला घरभेदींमध्ये तग धरायचा आहे. या घरभेदींसोबतच दैनिक जागरणच्या मराठी दैनिकाचे आव्हानही आहे. अलीकडेच जागरणने नाशिकमध्ये आपली ओळख लपवून संपादकीय टीमची भरती सुरू केली आहे. दिव्य मराठी मधील अनेकांना येण्यासाठी निरोपही मिळाले आहेत. 2014 मध्ये दिव्य प्रमाणेच वेगाने महाराष्ट्रभर जागरणची मराठी एडिशन सुरू होणार आहॆ. जागरणने दिव्यपेक्षा दीडपट व प्रसंगी दुप्पट पगार देण्याची तयारीही चालवली आहे. त्यामुळे दिव्यला जरा जपूनच पावले उचलावी लागणार आहेत.

दिव्यतून सहांची हकालपट्टी
अकोला दिव्य मराठी ( Sales and marketing ) मधून सहा जणांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. व्यवस्थापनाने काही घोळ पकडल्यावर ही कारवाई झाली आहॆ म्हणे. यानंतर विदर्भ एडिशनच्या सर्व कार्यालयांची तातडीने तपासणी सुरू झाली आहे. दुसरे म्हणजे आणखी एका नाट्यमय घडामोडीनंतर दिव्य अकोल्याच्या बातम्यांच्या प्लेसमेंटच्या अंतिम अधिकारातही बदल करण्यात आला आहे.

मुंबई में दबंग दुनिया का चिरकुट शुरू किया राजनीति ,खाई एक की नौकरी

मुंबई - मेट्रो -७ की असफलता के बाद अब दबंग दुनिया अखबार की कमान संभाले नीलकंठ पराड़कर ने नवभारत और हमारा महानगर को अपना कंपटीटर मानते हुए मुंबई में अखबार को जोर शोर से आगे ले जाने में लगे है | इस के लिए विशेष कर  इन दोनों अखबारों के कर्मचारियों को तोड़कर लाने का कार्य कर रहे है |तो वही दबंग दुनिया के चिंदी पत्रकार नीलकंठ पराड़कर के इस मेहनत पर पानी फेरने का कार्य कर रहे है | अखबार शुरू होकर अभी वर्ष भी नही हुआ की अखबार के अन्दर अपने आप को बड़ा बताने के लिए राजनीति शुरू कर दिए | मुंबई से प्रकाशित होने वाले चिंदी खबरे ..... अखबर में काम करने वाले पर नीलकंठ ने विश्वास कर दबंग में जगह दिया लेकिन आखरी कुत्ते दूम  यह चिरकुट दबंग में आने के बाद भी राजनीति शुरू कर दिया और चिंदी खबरों से अपना दुकान शुरू कर दिया | बताया जा रहा है बताया जा रहा है की अभी इसी सप्ताह हमारा महानगर और दबंग दुनिया में सेम स्टोरी लगी थी जिस के बाद सुबह सुबह इस चिरकुट ने इस की शिकायत नीलकंठ पराड़कर से किया जिस के बाद दबंग के रिपोर्टर की नौकरी छीन लिया गया | इस के पीछे का कारन बताया जा रहा है की हमारा महानगर से इस्तीफा देकर दबंग दुनिया ज्वाइन किये एस पि यादव को नीलकंठ ने चीफ सिटी सब एडिटर बना दिया है और यह उस रिपोर्टर को मदत करते थे इस के लिए पहले से पद जाने से बवखलाये इस चिरकुट ने यह मौका देखकर उस नए रिपोर्टर की गलत शिकायत कर नौकरी खा गयी | बताया जा रहा है की दबंग दुनिया में कार्यरत सभी कमर्चारी विशेष कर नए लडके और लडकिय इस चिरकुट से परेशान है आखिर कब तक नीलकंठ पराड़कर इस पर ध्यान देते है इस तरफ सब की नजर लगी है | यह चिरकुट इस तरह की शिकायत के लिए मध्य प्रदेश से आये तथाकथित अपने आप को बड़ा बताने वाले रिपोर्टर अमित देशमुख का सहारा ले रहा है और पराड़कर जी इसी देशमुख के बोलने पर कार्य कर रहे है | इस के लिए कुछ रिपोर्टर दुसरे अखबारों में अभी से जाने की कोशिस करने लगे है | 

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१३

महाराष्ट्रात पत्रकारावरील हल्ले वाढले

 मुंबई - पत्रकारांच्या हक्कासाटी लढणाऱ्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने संकिलत केलेल्या माहितीमध्ये पत्रकारांवरील अन्याय-अत्याचाराच्या अनेक  गोष्टी समोर आल्या असून पुरोगामीत्वाचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्रात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ संबोधल्या जाणाऱ्या माध्यमांना काम करणे किती कठिण झाले आहे हे सप्रमाण सिध्द झाले आहे.महाराष्ट्रात 2013 मध्ये दोन पत्रकारांच्या हत्त्या झाल्या आहेत,एका महिला पत्रकारावर सामुहिक बलात्कार केला गेला आहे,चार पत्रकार-छायाचित्रकारावर आत्महत्त्या करण्याची वेळ आली किंवा आणली गेली,तीन पत्रकार तरूणपणीच ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडले आहेत,राज्यात 71 पत्रकारांवर जीवघेणे शारीरिक हल्ले केले गेेले आहेत, तीन दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले केले गेले तर खंडणी,ऍट्रॉसिटी,विनयभंग आणि देशद्रोहाच्या खटल्याना राज्यातील अनेक पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी ही सारी माहिती आज एका पत्रकाव्दारे प्रसिध्दीस दिली आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे पत्रकात नमुद करण्यात आलं आहे.,अनेक प्रकरणाची माहिती समितीपर्यत पोहचली  नसल्याने हल्ल्याच्या घटनांची संख्या दिसते त्यापेक्षा अधिक असल्याचेही पत्रकात स्पष्ट कऱण्यात आले आहे.
    - पत्रकारांवरील हल्यांच्या घटनांमध्ये जगभर वाढ झाल्याची माहिती नुकतीच  पॅरिस येथील ङ्गरिपोर्टर्स विदाऊट बॉर्डरङ्घ  या संस्थेने प्रसिध्द केलेल्या आपल्या अहवालात दिली आहे.जगभरात चालू वर्षात 71 पत्रकारांच्या हत्त्या झाल्या आहेत,त्यात भारतातील 8 पत्रकारांच्या हत्त्यांचा समावेश आहे.छत्तीसगढ,जम्मू-काश्मीरमध्
ये पत्रकारांच्या हत्त्या आणि हल्ले जास्त होत असले तरी विविध फंडे वापरून पत्रकारांचा आवाज बंद करण्याच्या ङ्गकार्यात  पुरोगामी महाराष्ट्र देखील  मागे नाही हे वास्तव आकडेवारीवरून समोर आलं आहे.महाराष्ट्रात वर्षभरात साधनाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट रोजी पुण्यात गोळ्या घालून हत्या कऱण्यात आली.त्यांच्या मारेकऱ्यांचा चार महिन्यानंतरही ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नाही.जळगाव जिल्हयातील चाळीसगाव येथील पत्रकार नरेश सोनार यांची दादर-अमृतसर एक्स्प्रेसमधून खाली फेकून 14 नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्त्या केली गेली . या प्रकरणातील आरोपी पकडले गेले आहेत.मुंबईमध्ये एका महिला पत्रकारावर एका निर्जन ठिकाणी नेऊन सामुहिक बलात्कार केला गेला.या प्रकरणातही आरोपी पकडले गेले.याची सुनावणी जलदगती न्यायालयामार्फत सुरू आहे.
    - राज्यात पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनामध्ये सातत्यानं वाढ होत आहे.गेल्या वर्षी 62 पत्रकारांवर हल्ले केले गेले होते यंदा ही संख्या 71 पर्यत पोहचली आहे.अनेक ठिकाणी पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत.पूर्णा येथील पत्रकार दि ऩेश चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीवर ऍसिड हल्ला केला गेल्याने साऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारांचा थरकाप उडाला होता.त्याच्या निषेधार्थ पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने परभणीत भव्या मोर्चाही काढला होता.
      पत्रकारांवरील हल्ल्याच्या अन्य घटनांमध्ये सातारा येथील विशाल कदम यांच्यावरील हल्ला,गंगाखेड येथील गंगाधर कांबळे,उमापूर येथील कृष्णा देशमुख,मुंबई येथील टीव्ही-9 चे चरण मरगम, ताडकळस येथील पत्रकार त्र्यंबक खंदारे आणि दोन दिवसांपूर्वीच हल्ला झालेले मदन अंभोरे,मुंबई येथील न्यूज नेशनचे सोनू कनोजिया आणि इम्रान यांना निलंबित उपायुक्ताकडून झालेली मारहाण,नेवासा फाटा येथील बाळासाहेब देवखिडे यांना पीआयकडून झालेली मारहाण,सोनपेेठ येथील सुधीर बिंदू यांच्यावर झालेला हल्ला,गंगाखेड येथील संजीव सुपेकर यांच्यावर हल्ला करून त्यांचे दोन्ही पाय निकामी केले गेले,इचलकरंजी येथील ज्येष्ट पत्रकार बाळ मकवाना याच्यावर आवाडे कॉग्रेसच्या लोकांनी हल्ला केला,माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील अऱविंद वाव्हळ यांच्यावर जीवघेणा हल्ला,पूर्णा येथील अनिल अहिरे,मंगळवेढा नजिकच्या दहिवड येथील प्रमोद बनसोडे,परभणीचे दिलीप बनकर,मुंबई येथील जय महाराष्ट्रचे विलास बढे,मुंबई येथील टीव्ही-9 चे रामराजे शिंदे,सागर कुळकर्णी,हदगाव येथील शिवाजी देशमुख,सातारा येथील रोहित बुधकर,उस्मानाबादचे शिवप्रसाद बियाणी,बीड जिल्हयातील चौसाळा येथील बळीराम बाजीराव राऊत,सेलू येथील दिलीप डासाळकर,आदि घटनांचा उल्लेख करावा लागेल.या घटनातील काही प्रकरणात चाकू कि वा अन्य तीक्ष्ण हत्त्यारांचा वापर केला गेला.यंदा पत्रकारांवरील हल्लयाच्या सर्वाधिक 11 घटना परभणी जिल्हयात घडल्या.त्या पाठोपाठ 7 प्रकार साताऱ्यात घडले आहेत.नागपूरपासून रत्नागिरी आणि नंदूरबारपासून लातूरपर्यत सर्वत्र पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रकार घडले आहेत.अर्थातच ही आकडेवारी परिपूर्ण नाही.अनेक ठिकाणची माहिती समितीपर्यत आली नसल्याने हल्ल्याचा यापेक्षा जास्त घटना राज्यात घडल्या आहेत.
      - फेब्रुवारीत नांदेड येथील गावकरीच्या कार्यालयावर हल्ला केला गेला,ऑगस्टमध्ये न गर येथील ए का दैनिकाच्या कार्यालयात एका आमदारपुत्राने गोंधळ घातला,ऑक्टोबरमध्ये वणी येथील पुण्यनगरीच्या कार्यालयावर हल्ला केला गेला.पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल कऱणे,त्यांना विविध प्रकारे छळ कऱणे असे प्रकार राज्यात सर्वत्रच घडले आहेत.गंगापूरचे जमिल पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली.ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनाही त्यांनी सकाळमध्ये लिहिलेल्या एका लेखामुळे काही धर्मांध शक्तींक डून धमक्या दिल्या गेल्या.विटा येथील पत्रकार विजय लोळे आणि सतीश भिंगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचाङ्घ बंदोबस्तङ्घ  करण्याचा प्रय़त्न झाला,लातूर येथील झी-न्यूजचे शशिकांत पाटील यांना धमकी,सोनपेठ येथील सय्यद कादिर,कृष्णा पिंगळे यांच्यावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल,आदित्या पोंचोलीची मुंबईतील झी न्यूजच्या महिला पत्रकारास असभ्या वागणूक,चंद्रपूर येथे एका पत्रकाराच्या विरोधात पोस्टरबाजी,कुत्रे अशा शब्दात उल्लेख,आळंदी येथेही विलास काटे यांच्याविरोधात नाहक पत्रकबाजी. असे अनेक प्रकार घडले आहेत.कधी  बळाचा ,कधी कायद्याचा तर कधी झुंडशाहीचा वापर करून पत्रकारांना ङ्गअद्दलङ्घ  घडविण्याचे अनेक प्रकार राज्यात घडले आहेत.विशेष म्हणजे हल्ले असोत किंवा धमक्या असोत हे केवळ बातम्या दिल्यामुळेच घडलेले आहे,याकडे दुर्लक्ष करता येणार नाही असेही पत्रकात नमुद केले आहे.
    म हाराष्ट्रात जेथे जेथे पत्रकारांवर हल्ले झाले तेथे तेथ संबंधित आरोपींवर किरकोळ कलमं लावली गेली,त्यामुळे आरोपींना लगेच जामिन मिळणे शक्य झाले.पुर्णेच्या ऍसिड हल्ला प्रकऱणात मुख्य आरोपी अनेक दिवस फरार असल्याचे दाखविले गेले,प्रत्यक्षात त्याचा सर्वत्र वावर होता.नंतर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर तो पकडला गेला.तो शहर कॉग्रेसचा अध्यक्ष होता.जे हल्ले झाले किंवा जे धमक्याचे प्रकार घडले त्यातील आरोपी बहुतेक वेळा  कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यानंतर पोलिसांकडूनच पत्रकारांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत.त्यापाठोपाठ स्थानिक गुंडांनी पत्रकारांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत.राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनच पत्रकारांवर जास्त हल्ले झालेले असल्याने पत्रकार संरक्षण कायदा करून राज्यात माध्यमांना मुक्तपणे काम करता येईल असे वातावरण तयार होऊ देण्यात कोणताच पक्ष तयार नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाल ेआहे.
    - पत्रकारांवरील हे हल्ले थांबवायचे असतील तर पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरवावा आणि पत्रकारांवरील हल्ल्याची प्रकरणं जलदगती न्यायालयामार्फत चालवावित या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने गेल्या तीन वर्षात तेरा वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली,दोन वेळा राष्ट्रपतींची भेट घेतली,प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या.मार्कन्डेय काटजू यांची दोन वेळा भेट घेतली,राज्याचे गृहमंत्री,विरोधी पक्ष नेेते, गट नेते याचंीही समितीने वारंवार भेट घेतली पण प्रत्ेयक वेळी आश्वासनं देऊनही कायद्याबाबत कोणताच नि र्णय घेतला गेला नाही.इचलकरंजीचे आमदार सुरेश हळणकर यांचे एक खाजगी विधेयक पडून आहे.ते चर्चेला येणार नाही याची काळजी घेतली जातेय.तरीही समितीचा लढा सुरूच आहे.8 मे रोजी पनवेल ते वर्षा अशी रॅली काढली गेली,16 नोव्हेंबरचा पत्रकार दिन काळा दिवस म्हणून पाळला गेला,नागपूर अधिवेशनात आठवण आंदोलन केलं गेलं. ग तवर्षी  12 आणि 13 डिसेंबर रोजी नागपुरात एस.एम.देशमुख आणि किरण नाईक यांनी आमरण उपोषण केलं,बीड आणि परभणी येथे पत्रकारांचे मोर्चे काढले गेले,2 ऑक्टोबर रोजी पुण्यात पत्रकारांचा भव्य मोर्चा काढला गेला,अन्य मार्गानेही समिती पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी लावून धरत असल्यााचेही समितीच्या पत्रकार नमुद कऱण्यात आले आहे.महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षा कायदा आणि पेन्शची मागणी समितीने केल्यानंतर अन्य राज्यातूनही अशा प्रकारच्या मागण्या पत्रकार संघटना करू लागल्या आहेत समितीच्या कार्याची ही मोठी उपलब्धी आहे असे समितीला वाटते.सततच्या पाठपुराव्यामुळे ज्या पध्दतीने लोकपाल आले,जादूटोणा विरोधा कायदा केला गेला त्याच प्रमाणे  एक दिवस सरकारला पत्रकार संरक्षण कायदा करावाच लागेल असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.  हा कायदा होईपर्यत राज्यातील ज्येष्ट पत्रकारांना निवृत्तीवेतन मिळेपर्यत समिती  सनदशीर मार्गाने  आपला लढा चालूच ठेवणार असल्याचेही देशमुख ायंनी स्पष्ट केले आहे.

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१३

नव्या वर्षात इलेक्ट्रॉनिक्स मीडियात भूकंप होणार

मुंबई - न्यूज एक्स्पेस (मराठी) चॅनल 26 जानेवारी 2014 रोजी सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.या चॅनलची टीम फायनल झाली असून,दि.2 जानेवारी रोजी अनेकजण जॉईन होणार आहेत,त्यामुळे अन्य चॅनलला त्याचा फटका बसणार आहे.
न्यूज एक्स्प्रेस चॅनलच्या स्टुडिओचे काम संपत नसल्यामुळे उशिर झाल्याचे कळते.आता काम जवळपास पुर्ण झाले असून,नव्या जागेत ऑफीस या महिन्याअखेर शिफ्ट होणार आहे.
राज्यातील स्ट्रींजर रिपोर्टर नुकतेच फायनल करण्यात आले असून,या स्ट्रींजर रिपोर्टरना ऑफर लेटर देण्यात आले आहे.या चॅनलचे स्ट्रींजर रिपोर्टर नामवंत आणि अनुभवी आहेत.त्यामुळे एक दमदार चॅनल म्हणून न्यूज एक्स्प्रेस उभारी घेईल,असे अनेकांचे मत आहे.दुरदर्शनच्या सविता सातपुते, एबीपी माझाचा समीर सावंत,झी 24 तासचा पंकज इंगोले हे अँकर म्हणून जॉईन झालेले आहेत.अनेक नामवंत अँकर 2 जानेवारी रोजी जॉईन होणार असल्याचे समजते.सर्वाधिक फटका झी 24 तासला बसणार आहे.
राज्यात पुणे,औरंगाबाद,नाशिक आणि नागपूर येथे ब्युरो ऑफीस राहणार असून,या ब्युरोसाठी नावे फिक्स झाले आहेत.नागपुरात ब्युरोमध्ये जो वाद सुरू आहे,तो न्यूज एक्स्प्रेस (हिंदी)मधील आहे.मराठीसाठी अजूनही कोणीही नेमण्यात आलेला नाही.मराठीसाठी वेगळा ब्युरो राहणार असल्याचे कळते.नागपुरात सध्या मराठीसाठी एक रिपोर्टर नेमण्यात आलेला आहे.
जय महाराष्ट्रचे रिलॉंचिंग
रवी आंबेकर, मंदार फणसे, तुळशीदास भोईटे हे त्रिकुट गेल्यानंतर जय महाराष्ट्रचे कसे होणार,असे अनेकांना वाटत होते,मात्र शैलेश लांबे यांनी कचरा साफ करून नव्या दमाने काम सुरू केले आहे.सध्या या चॅनलचा लूक बदलण्यात आला आहे,तसेच दि.1 जानेवारी रोजी हे चॅनल रिलॉंचिंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जे त्रिकुटास जमले नाही,ते शैलेश लांबे यांनी करून दाखविले आहे.यापुर्वी केवळ नाव मोठे होते,पण काम छोटे होते.आता लांबेंनी खऱ्या अर्थाने कामास सुरूवात केल्याने या चॅनलबद्दल पुन्हा अपेक्षा उंचावल्या आहेत.

मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

पत्रकार सुरक्षा कानून की मांग को लेकर सीएम से मिले पत्रकार

पत्रकार हमला विरोधी कृती समिति के निमंत्रक एस.एम. देशमुख के नेतृत्व में एक प्रतिनिधि मंडल ने नागपुर में राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण से मुलाकात करके राज्य में शीघ्र पत्रकार सुरक्षा कानून लाने की अपील की. मुख्यमंत्री के साथ बातचीत करते देशमुख ने कहा कि राज्य में 2013 में दो पत्रकारों की हत्याएं हुईं, एक महिला पत्रकार के साथ बलात्कार किया गया, तीन मीडिया हाउसेस पर हमले किये गये और 68 पत्रकारों के उपर हमले किये गए. महाराष्ट्र जैसे प्रगतिशील राज्य के लिए यह स्थिति अच्छी नहीं है. महाराष्ट्र ने विचार, वृत्तपत्र, स्वातंत्र्य के लिए हमेशा ही अपना योगदान दिया है लेकिन आज इस स्वातंत्र्यका ही गला दबाने की कोशिश की जा रही है. इसलिए पत्रकार सुरक्षा कानून की महाराष्ट्र मे सख्त जरूरत है.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ने कानून बनाये जाने के बारे में कोई भी ठोस आश्वासन नहीं दिया लेकिन पत्रकार पेंशन योजना के बारे मे उन्होंने प्रतिनिधि मंडल को आश्वस्त किया. अन्य राज्यों में किस प्रकार पत्रकार पेन्शन योजना अमल में लाई जा रही है, इसका अध्ययन करके महाराष्ट्र में पत्रकार पेन्शन योजना के बारे मे लागू करने की बात मुख्यमंत्री ने कही है.
मुख्यमंत्री के आश्वासन के बाद भी प्रतिनिधि मंडल संतुष्ट नहीं हुआ. पत्रकार हमला विरोधी कृति समिति ने कहा है कि जब तक कानून नहीं आ जाता और पेन्शन योजना लागू नहीं की जाती तब तक आंदोलन चलता रहेगा. मुख्यमंत्री यहां नागपुर में महाराष्ट्र विधान सभा के शीतकालीन सत्र में भाग लेने नागपुर आए हुए थे.

http://smdeshmukh.blogspot.in/2013/12/blog-post_17.html

नागपूर फेरफटका

भरती-ओहटी
एका वृत्तपत्रातून दुस-या वृत्तपत्रात जादा पगारांवर जाणा-यांची संख्या सध्या वाढली आहे. महाराष्ट्राचा मानबिन्दू असलेल्या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीतून ६० कर्मचा-यांना नारळ दिल्यानंतर नवी पदभरती सुरू करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात जाहीरात प्रकाशित करून अनुभवी पत्रकारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यातही उपसंपादक/वार्ताहर पदभरतीची जाहीरात काढण्यात आली. सध्या सकाळ, देशोन्नती आणि इतर दैनिकाचे पत्रकार लोकमतमध्ये रुजू होण्यास इच्छूक असून, अर्ज पाठवू लागले आहेत. या पदभरतीमुळे एकाच दैनिकात काम करून थकलेले आणि पगारवाढीच्या अपेक्षितील कर्मचा-यांना नक्कीच  फायदा होईल.

मधुबन मे वसंत डोले रे

नागपूर - आपल्या सहकारी शहर बातमीदाराला सेवेतून कमी केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तालुका बातमीदाराने गावातील काही निवडक वृत्तपत्राच्या पत्रकारांसाठी खास पार्टी आयोजित केली होती. पार्टीत सहभागी पत्रकारांच्या मर्जीनुसार ऑर्डर देण्यात आले. मग, एका मागून एक मद्याचे पेग पोटात रिचविले.  त्यानंतर जेवणाचा मेणू सांगण्यात आला. त्यात खास मेणू म्हणजे मांसाहारी भाजी. भाजीयेईपर्यंत स्नॅक्स सुरुच होते आणि विदेशी मद्यजलही. तासाभराने पार्टी जोरात रंगू लागली असताना मांसाहारी भाजी वेटरने टेबलावर ठेवली. ताटात भाजी पडताच सर्वांनी तंदूरी पोळी अन् मटनाचा आस्वाद सुरू केला. मात्र, ही भाजी आयोजकालाच आवडली नाही. आधीच पोटात भूक आणि मद्याचा डोज असल्याने पारा चांगलाच भडकला. वेटरला बोलावून चांगलीच कानउघडणी केली. वेटर सांगू लागला की, ही चूक माझी नाही. भाजी आवडली नसेल तर स्वयंपाकीकडून परत बनवून आणतो. मात्र, बातमीदार महोदय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. चल, तुझ्या मॅनेजरला बोलवं. कोण आहे, या हॉटेलचा मालक, असे म्हणत बातमीदाराने टेबलावरच दारुचे ग्लॉस खाली आपटणे सुरू केले. मग, काय तर पुढे तोलच गेला. सहकारी पत्रकारांनी जाऊ द्या, म्हणत समजावित होते. मात्र, मधुबनात वसंत डोलू लागला. हा किस्सा आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील. उदय भविष्यपत्रात हा बातमीदार गत १० वर्षांपासून कार्यरत आहे. शिवाय दीड वर्षांपूर्वी एका शहर बातमीदाराची नियुक्ती करण्यात आली. या बातमीदाराकडे पेपरची एजन्सी आहे. पेपरवाढ व्हावी, या उद्देशाने नवनव्या बातम्या तो कार्यालयात पाठवू लागला. दुसरीकडे तालुका बातमीदार महाविद्यालयात प्राध्यापक असल्याने त्यांच्या बातम्याचा ओघ नवख्या बातमीदाराच्या तुलनेत कमी पडला. नव्या बातमीदाराच्या बातम्या आणि शहरात त्याने प्रस्थापित केलेली ओळख तालुका बातमीदाराला खटकली आणि त्याला कमी करण्यासाठी सुनियोजित बेत आखला. गावातील एका रंगेल प्रकरणात बातमी प्रकाशित न करण्यासाठी काही निवडक वृत्तपत्राच्या पत्रकारांनी दिवाळी साजरी केली. त्यात स्वत:  हात धुतले असतानाही शहर बातमीदाराविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली. त्याचदिवशी जिल्हास्थळी संपादक महोदयांनी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामुळे या तक्रारीची खबर संपादकांना मिळाली. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपला गणवीरचक्र चालविला आणि एका बालक बातमीदार माणसाची लेखणीच कापली. उद्यापासून काही दिवस लिहू नका, असे सांगण्यात आले. त्यामुळे शहर बातमीदार सेवेतून कमी झाला. याच आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी तालुका बातमीदाराने मधूबन हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. आपण शहर बातमीदाराचा कसा पत्ता कट केला, हे सांगताना आनंदाचा तोल घसरला आणि मधुबनात वसंत डोलू लागला होता. या घटनेची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या बातमीदाराने सोडलेला संयम आणि गावभर झालेली बदनामी ही शिक्षकीपेशसह उदय भविष्यपत्रालाही मान खाली घालायला लावणरी आहे. विशेष म्हणजे सदर बातमीदार विदर्भ ज्युनिअर प्राध्यापक संघाचे जिल्हा सचिव म्हणून नुकतेच नियुक्त झाले आहेत.

सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

"भास्कर" समूहाताही "तहलका"!; वरिष्ठ अधिकारयावर लैंगिक शोषणाचे आरोप


भास्कर समूहातही "तहलका" उघडकीस आला आहे. भास्कर समूहाचा रेडियो 'माय एफएम'चे सीईओ हरीश भाटिया याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर हे संपूर्ण प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.  एका महिला कर्मचारयाशी पदाचा गैरवापर करून तिचा शारीरिक छळ केल्याने भाटिया अडचणीत आला आहे. तरीही नैतिकतेचा आणि उच्च आदर्शांचा डांगोरा पिटणारया "भास्कर"ने त्याची हकालपट्टी न करता त्याची पाठराखण केली आहे. अन्य दोन महिला कर्मचारयांनीही "भास्कर"मधील वरिष्ठांकडून होत असलेल्या शोषणाच्या आरोपांचे समर्थन केले आहे. भाटियाला अटक करण्यात आली असून तो आता जामिनावर मोकाट आहे.

ही संपूर्ण बातमी इथे वाचा …


"हिंदू" दैनिकाने उभा केला आदर्श
 

एकीकडे "भास्कर"मध्ये दांभिकपणा सुरू असताना "हिंदू"ने मात्र लैंगिक शोषणाबाबतीत नीती घोषित केली आहे. लैंगिक शोषणाच्या विरोधात प्रत्येक आस्थापनेत अंतर्गत समिती असणे कायद्याने बंधनकारक असूनही दुसरयांना फ़ुकटचे सल्ले देणारया  एकाही माध्यमसंस्थेत तशी व्यवस्था नाही. त्यामुळे "हिंदू"चे पाउल स्वागर्ताह मानले जात आहे.  कस्तूरी एण्ड संस लिमिटेड ने 28 नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करून ही माहिती दिली आहे. लैंगिक शोक्षणविरोधी नीती "हिंदू"मध्ये 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे. त्यानुसार "हिंदू"ची सर्व कार्यालये अथवा कामासाठी बाहेर असतानाही शारीरिक संबंध स्थापण्याची मागणी, छेड-छाड, टोमणे, महिला सहकारयांसमोर अश्लील टिप्पणी, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन, अश्लील हावभाव, अश्लील साहित्य जसे फ़ोटो, वेबसाइटस दाखविणे; तसेच शोषण अथवा हिंसेच्या व्याखेत बसेल अशी कोणतीही केलेली कृती अपराध ठरणार आहे.

कस्तूरी एण्ड संस लिमिटेडची नोटीस इथे वाचा

ता. क. :
महाराष्ट्रातील पत्रकारितेतही लिंगपिसाटांचा धुमाकूळ आहे. नुकतेच एका "रंगीला"विरुद्ध नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाशीनजीकच्या पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार करण्यात आली आहे. एका उच्चशिक्षित; डॉक्टरेट महिला कर्मचारयाने ही तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. "रंगीला" या महिलेवर राजीनाम्यासठीही दबाव आणीत आहे. "रंगीला"च्या रासलीला व "प्रताप" नव्या संस्थेतही सुरू झाल्याची चर्चा आहे. जिथे जाता; तिथे लफडी! "रंगीला"रावांच्या छळाच्या दडपणात पिचलेल्या एकाच्या अपघात झाला असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. दुसरे दोघे राजीनामा देउन बाहेर पडले आहेत. एक तर बिचारा नुकताच मुंबईच्या पश्चिमेकडून नवी मुंबईत आलेला गडी "चौफेर" हैराण झाला आहे. तो पुन्हा जुन्या घरी जाण्यासाठी मालकांना विनवण्या करून आला आहे. 


"मजीठिया"ची सुनावणी पुन्हा 7 जानेवारीपर्यंत लांबली

सुप्रीम कोर्टात सुरू असलेली "मजीठिया वेज बोर्ड" सुनावणी  पुन्हा लांबणी आहे.  पुढील सुनावणी नव्या वर्षात 7 जानेवारी रोजी होईल. त्याही दिवशी कर्मचारी युक्तिवाद सुरू राहणार असल्याने अंतिम निकाल लागण्याची शक्यता फारशी नसल्याचे सांगितले जात आहे.

पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारयांसाठी केंद्र सरकारने "मजीठिया वेज बोर्ड"  2009 मध्ये स्थापन केला. त्याच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी टाईम्स, आनदबझार पत्रिका वैगेरे वृत्तपत्र व्यवस्थापनाने त्यास सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने यापूर्वीच प्रतिज्ञापत्र सादर करून आयोगाच्या सर्व शिफारसी स्वीकारल्याचे नमूद केले आहे. व्यवस्थापनांनीही युक्तिवाद पूर्ण केला असून कर्मचारी युक्तिवाद सुरू आहे. 12 डिसेंबर रोजीच्या सुनावणीत कर्मचारयांनी आपली बाजू मांडली. मात्र, हा  युक्तिवाद सुरूच आहे. वरिष्ठ अधिवक्ता कोलिन गोन्साल्विस यांनी ही बाजू मांडली. 7 जानेवारी रोजीही कर्मचारी युक्तिवाद सुरूच राहील. त्या दिवशी युक्तिवाद पूर्ण झाला तर पुढील तारखेला अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मी मराठीच्या स्ट्रींजरची अल्प मानधन देवून बोळवण

मी मराठी नावाचे चॅनल येत्या काही दिवसातच चोवीस तास बातम्या देणार आहे...या चॅनेलचा प्रोमो मजेशीर आहे...
अब नहीं चलेगा....।।।।
चॅनल मराठी अन प्रोमो हिंदीत... काय म्हणाव या शब्द दरीद्री लोकांना..! मराठीत काय कमी शब्द आहेत का प्रोमो करायला..? 
असो ते जाऊ द्या...या चॅनेलच्या स्ट्रींजरमध्ये सध्या मोठी अस्वथता पसरलीय अन त्याला कारणही तसच आहे...! या चॅनेलला काम करणा-या स्ट्रींजर मंडळींना आधी ब-यापैकी मानधन मिळत असे..! मात्र गेल्या काही महीन्यात स्ट्रींजर मंडळीची कशी बोळवण केल्या जातेय ते पहा..मी मराठी ने आजच प्रलंबीत असलेल्या ऑक्टोंबर अन नोह्वेंबर महीन्याचे पेमेंटची यादीच पहा...! अशाने या चॅनेलमध्ये काम करण्यास कोण उत्सुक ठरेल...? बर मी मराठीच्या सगळ्याच स्ट्रींजरचे गेल्या सहा महीन्याचे पेमेंट थकलेले आहे ते द्यायच तर नावच घेत नाहीत..अन कुणी मागणी केली की त्याला काम बंद करण्याबाबत सांगितल्या जाते...! 
भीक नको पण कुत्रा आवार रे बाबा असाच म्हणायची वेळ या स्ट्रींजरवर आली आहे. स्ट्रींजरबाबत धोरणच नसल्याने अर्थातच चांगले स्ट्रींजर या चॅनेलला राहतील तरी कसे...?


सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

कोल्हापूर प्रेस क्लब चा वाद चव्हाट्यावर

सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी पुढारीचे पत्रकार अनिल देशमुख यांची कोल्हापूर प्रेस क्लब च्या अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्ष पदावर बी-न्यूज च्या बाळासाहेब कोळेकर यांची निवड झाली. मात्र या निवडीतून कोल्हापूर प्रेस क्लब चे सर्वेसर्वा समझणारे दैनिक महाराष्ट्र टाइम्स चे मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी आणि त्यांचे परम मित्र दैनिक लोकमत चे मुख्यप्रतिनिधी विश्वास पाटील हे चांगलेच तोंडावर आपटले.त्यांनी आयत्यावेळी इतर दैनिकांच्या कोट्यातून आलेल्या दैनिक केसरीचे  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विजय पवार यांना शब्द देवून सुद्धा निवडणूक रिंगणातून माघार घ्यायला सांगून त्यांचा पोपट केला आणि नांगी टाकली.
    तर दुसरीकडे दैनिक सकाळ च्या सुधाकर काशीद यांच्या गत दोन वर्षापूर्वी प्रेस क्लब च्याच निवडणुकीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यात सकाळ चे पत्रकार लुमाकांत नलवडे आणि सुनील पाटील हे यशस्वी झाले.परंतु त्यांची ही खेळी मात्र इतर कोणाच्याही लक्ष्यात आली नसल्याने उर्वरित प्रेस क्लब सदस्यांनी सुद्धा नलवडे आणि सुनील पाटील हे ठरवतील त्यावर विश्वास ठेवत निवडणूक प्रक्रिया पार पाडली खरी.परंतु आता दैनिक पुढारी आणि दैनिक सकाळ या दोन पारंपारिक शत्रूंच्या लढाईत कोल्हापूरच्या पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेली प्रेस क्लब बंद तर पडणार नाही ना अशी शंका येवू लागली आहे.
    आता गुरुबाळ माळी आणि विश्वास पाटील यांची जागा सुनील पाटील आणि लुमाकांत नलवडे यांनी घेतली असून ते ठरवतील ती पूर्व दिशा अशी अवस्था होणार आहे.त्यामुळे मात्र कोणतेही पद न देता इतर छोट्या दैनिकांवर फार मोठा अन्याय करण्याचे पातक या दोघांनी केले आहे अशी चर्चा कोल्हापुरातील पत्रकारांमध्ये सध्या सुरु आहे.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

पत्रकारांच्या रासलिला

रत्नागिरी - सीमा भागातील मराठी जनतेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दैनिकाच्या येथील प्रमुखाचे कार्यालयातील एका ऑपरेटर महिलेशी रासलिला सुरू होत्या.वास्तविक दोघेही विवाहित.पण सदर महिलेचा पती दारूडा असल्यामुळे तिचे कार्यालय प्रमुखांशी सूत जमले होते.दोघांच्या रासलिला चक्क कार्यालयातच सुरू होत्या.मग काय,ही भानगड मालकाला समजताच,त्यांनी महिलेला काढून टाकले आणि कार्यालयप्रमुखांना अभय दिले.मात्र दोघांच्या रासलिला अजूनही सुरू असल्याने  मोठ्या चचीने चर्चा सुरू आहे.
.................................................

‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेल्या एका प्रतिष्ठीत दैनिकातील अकोला आवृत्तीमधील अकोट तालुक्याचा प्रतिनिधी युवतीसोबत ‘रासलिला’ खेळताना अकोट पोलिसांनी रंगेहात पकडला. या पत्रकाराला पोलिसांनी रात्रभर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटविण्यात त्या पत्रकाराला ‘विजय’ मिळाल्याची चर्चा अकोट शहरात जोरदार सुरू आहे.

रविवार, १ डिसेंबर, २०१३

नगरमध्ये तरूण तेजपालचा निघाला भाऊ, केला साफसफाई करणाऱ्या दलित महिलेचा विनयभंग

पणजी पाठोपाठ नगरमध्ये तहलका घडला आहे.एका 65 वर्षाच्या ज्येष्ठ पत्रकारांने रविवारी सकाळी साफसफाई काम करणाऱ्या दलित महिलेचा हात ओढून बळजबरी करणाऱ्याचा प्रयत्न केला, यावेळी सदर महिलेने आरडाओरड करताच सदर ज्येष्ठ पत्रकारांने धूम ठोकली.त्यानंतर सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद देताच, पोलिसांनी सदर पत्रकारांच्या पार्श्वभागावर दंडुका मारत आणि लाथा-बुक्क्या घालत पोलीस स्टेशनला नेले.नंतर या ज्येष्ठ पत्रकारांवर विनयभंग,अॅट्रॉसिटी आणि नागरी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरात पत्रकार कॉलनी आहे.या कॉलनीत प्रकाश भंडारे (वय 65) नावाचे ज्येष्ठ पत्रकार राहतात.त्यांच्या घरासमोरील साफसफाई करण्यासाठी एक दलित महिला येत होती.या साफसफाई करणाऱ्या महिलेवर या ज्येष्ठ पत्रकार महाशयांची नजर गेली.त्यांनी तिच्यावर पाळत ठेवून,रविवार दि.1 डिसेंबर रोजी तिचा हात पकडला आणि ओढत स्वत:च्या घरात नेण्याचा प्रयत्न केला.मात्र सदर महिलेने आरडाओरड करताच,या ज्येष्ठ पत्रकाराची बोबडी वळाली आणि घरात धूम ठोकली.नंतर या प्रकरणी सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात प्रकाश भंडारे याच्याविरोधात रितसर तक्रार दिली.पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता विनयभंग,अॅट्रासिटी आणि नागरी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि सायंकाळी अटक केली.अटक करतेवेळी सदर पत्रकाराच्या पार्श्वभागावर दंडुका मारला आणि लाथा-बुक्क्या मारल्या.त्यानंतर सदर पत्रकारांची मस्ती चांगलीच उतरली.
प्रत्येक पत्रकार परिषदेत हा ज्येष्ठ पत्रकार आमची पत्रकारिता अशी होती,असा उपदेश तरूण पत्रकारांना देत होता.त्यांची पत्रकारिता कशी होती,याचा उलघडा आता झाला आहे.एकंदरीत साठी बुध्दी नाठी झाली,असेच म्हणावे लागेल.असे तेजपाल शहरात आणि गावोगावांत आहेत,बेरक्याची त्याच्यावर नजर आहे.पुन्हा भेटू.

लोकमत पत्र समूह ने 60 लोगों को हटाया

लोकमत समाचारपत्र समूह ने नागपुर, अकोला और गोवा के अपने 60 कर्मचारियों को हटा दिया है. 21 नवंबर को तड़काफड़की में हुई इस कार्रवाई में किसी को अपनी बात रखने का मौका भी नहीं दिया गया. इसमें 10 पत्रकार भी हैं. बाकी पेजीनेशन तथा छपाई  विभाग के कर्मचारी हैं. इतना ही नहीं, लोकमत प्रबंधन ने पिछले 17 सालों से चल रहे मान्यताप्राप्त श्रमिक संगठन लोकमत श्रमिक संघटना पर भी अवैध कब्जा कर लिया है. लोकमत प्रबंधन की मांग है कि संघटना कोर्ट में जारी रीक्लासीफिकेशन, ठेका कर्मचारियों को परमानेंट करने का मामला बिना शर्त वापस ले. साथ ही संघटना ठेका कर्मचारियों से अपना नाता तोड़ ले, उनका साथ न दे और नागपुर के बाहर संघटना की शाखा न खोले.
दरअसल संघटना ने इसी साल अगस्त और सितंबर में क्रमश: अकोला और गोवा में संघटना की शाखाएं खोली थी. इसी से बौखलाए प्रबंधन ने 12 नवंबर को गोवा शाखा के अध्यक्ष मनोज इनमुलवार को आननफानन में टर्मिनेट कर दिया. इसी के विरोध में 13 और 14 नवंबर को नागपुर, अकोला और गोवा में असहयोग आंदोलन किया गया. 15 नवंबर को प्रबंधन के साथ हुई बातचीत में प्रबंधन ने उपरोक्त तीन मांगें रखीं. प्रबंधन की मांगें नहीं माने जाने पर बातचीत आगे बढ़ नहीं पाई. उसी दिन रात में नागपुर के 11 कर्मचरियों को टर्मिनेट कर दिया गया. ये कर्मचारी बूटीबोरी स्थित प्रिटिंग प्रेस के थे. 16, 17 और 18 नवंबर को दर्जनों कर्मचारियों को कारण-बताओ नोटिस जारी किया गया और जवाब देने के बावजूद 21 नवंबर को नागपुर में 36, अकोला में 13 तथा गोवा में 11  कर्मचारियों को टर्मिनेट कर दिया गया. गोवा में तो प्रबंधन ने अपना प्रिटिंग यूनिट ही बंद कर दिया है. वहां अन्य स्थानों से छपाई हो रही है. इसके बाद प्रबंधन ने भीतर रह गए कर्मचारियों को दमन और दबाव तंत्र का सहरा लेकर विभिन्न कागजों पर हस्ताक्षर करवाए, जिसमें लोकमत श्रमिक संघटना से कोई संबंध नहीं होने, आंदोलन में हिस्सा नहीं लेने जैसी बातें लिखीं गई थी.
यह विडंबना ही है कि एक तरफ तो लोकमत पत्र समूह के चेयरमैन संसद में बैठकर कानून बताते हैं और उन्हीं के बंधु महाराष्ट्र सरकार में मंत्री हैं, उन्हीं का संस्थान न सिर्फ कानून का खुलेआम मजाक उड़ाता है, बल्कि कर्मचारियों को उनकी अभिव्यक्ति, अपने अधिकारों के लिए आंदोलन करने और यूनियन बनाने जैसे कानूनी और संवैधानिक अधिकारों का इस्तेमाल करने से रोकता भी है.
मजे की बात यह है कि लोकमत प्रबंधन ने अब तक पालेकर, बछावत और मणिसाना सिंह जैसे वेतन आयोगों को भी पूरी तरह से लागू नहीं किया है और रीक्लासीफिकेशन का केस इसी मांग को लेकर पिछले 14 सालों से औद्योगिक न्यायालय में चल रहा है. हाईकोर्ट के आदेश के बावजूद प्रबंधन ने अपनी बैलेंस शीट कोर्ट में पेश नहीं की है. यह केस अपने अंतिम दौर में आ चुका है और कभी भी एकतरफा फैसला हो सकता है.
इसके साथ ही प्रबंधन ने 17 साल पुराने संगठन लोकमत श्रमिक संघटना पर भी अवैध कब्जा कर लिया. पूरी कार्यकारिणी बदल दी गई और संपादक, जनरल मैनेजर, कार्यकारी संपादक, निवासी संपादक स्तर के अधिकारियों को श्रमिक संघ का पदाधिकारी और कार्यकारिणी सदस्य बना दिया गया.

फेसबुक वर शेअर करा

Facebook