> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, २४ जून, २०१४

न्यूज एक्स्प्रेस मराठीचे चॅनल हेड म्हणून देवदास मटाले जॉईन..

मुंबई - न्यूज एक्स्प्रेस मराठीचे चॅनल हेड म्हणून देवदास मटाले जॉईन... एडिटर इन चिफ विनोद कापरी यांच्या उपस्थितीत मटाले यांनी सुत्रे हाती घेतली...लवकरच न्यूज एक्स्प्रेस मराठी सुरू होणार...मटाले यांचे बेरक्याकडून अभिनंदन...

रविवार, २२ जून, २०१४

'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा यांचा कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न

'इंडिया टीव्ही'च्या तनु शर्मा हिने कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने काहीतरी आैषध-गोळ्या घेतल्या होत्या. अगोदर सहकारी वर्गाने तिच्या आत्महत्येच्या धमकीकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. नंतर तिला जानकबाद कार्यालयाच्या गेटवर जेव्हा रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा सुरक्षारक्षकाने वरिष्ठांना हा प्रकार कळविला. त्यानंतर खळबळ माजली. तनू शर्माला तातडीने चॅनलच्या गाडीतून तात्काळ कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तिला लवकर स्वास्थ्य लाभो; हीच 'बेरक्या'ची प्रार्थना. इश्वर तिला नंतर सत्य सांगण्याची ताकद देवो.
तनु शर्माने आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी 'फेसबुक'वर स्टेट्स अपडेट केले होते. ते असे -
"सर्वांना अखेरचा गुडबाय. मी आत्महत्या करीत आहे. इंडिया टीव्हीचे प्रशांत एमएन, अनिता शर्मा आणि रितू धवन यांना धन्यवाद. मी खूप मजबूत आहे; पण आता मजबूर झालीय. इंडिया टीव्हीने माझ्याबाबत जे केलेय ते भयानक आहे. प्रसाद सरांनी माझे जीवन उद्ध्वस्त केलेय. अनिता शर्मासाठी तर शब्द नाहीत. एक महिला असून ती अशी वागू शकते? भयानक षडयंत्री, विश्वासघातकी आहेत हे लोक. मृत्यूनंतरही मला इंडिया टीव्ही जॉईन केल्याचा पश्चाताप राहील!"

शुक्रवार, २० जून, २०१४

'दिव्य मराठी'विरोधात जळगावच्या सहाय्यक कामगार आयुक्ताकडे पुन्हा तक्रार

'दिव्य मराठी'च्या विरोधात जळगावच्या सहाय्यक कामगार आयुक्तांकडे पुन्हा एक तक्रार दाखल झाली आहे. आज, 20 जून रोजी टेलिफोन ऑपरेटर चेतना वामन चव्हाण  (9923728593) हिने ही तक्रार दाखल केली आहे. असिस्टन्ट एच आर मॅनेजर राजवंती काैर आणि अॅडमिन एक्झीक्युटीव्ह प्रमोद वाघ यांच्याविरोधात ही तक्रार आहे.
तक्रारीनुसार, काैर व वाघ हे दोघेही चेतना चव्हाण हिला त्रास देवून तिचा छळ करीत आहेत. आपल्या मर्जीतील, नातेवाईक उमेदवाराची संबंधित पदावर वर्णी लावून घेण्यासाठी प्रमोद वाघ हे राजवंती काैर हिच्या मदतीने राजीनामा द्यावा म्हणून चेतना चव्हाण हिच्यावर दबाव आणीत आहेत, धमक्या देत आहेत. राजीनामा दिला नाही तर करिअर उद्ध्वस्त करु, टर्मिनेट करु, दूरवर बदली करु; अशा धमक्या तिला दिल्या जात आहेत. तिला काम करण्यापासून रोखले जात आहे व कामावर येवू नको; आलीस तर सुरक्षारक्षकाकडून धक्के मारून बाहेर काढू, अशा अमानवीय पद्धतीने अपमानित केले जात आहे.
चेतना चव्हाण हिच्याकडे छळाचे व धमक्यांचे बरेचसे डिजीटल रेकॉर्डेड पुरावे आहेत. ती महिला हक्क संरक्षण समिती, राज्य महिला आयोग; तसेच मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागणार आहे. यापुढेही 'दिव्य मराठी'च्या एचआर विभागाकडून काम करण्यापासून रोखले गेले किंवा राजीनाम्यासाठी दबाव, धमक्या सुरू राहिल्या तर राजवंती काैर व प्रमोद वाघ यांच्याविरोधात पोलिसांत फाैजदारी गुन्हा दाखल करण्याचीही चेतना चव्हाण हिची तयारी आहे.बुधवार, १८ जून, २०१४

बेळगावच्या तरुण भारतला अनेक समस्यांनी ग्रासले

सध्या बेळगावच्या तरुण भारतला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अनेक चांगले पत्रकार सोडून गेल्याने नवख्यांना पत्रकार करतो म्हणण्याची वेळ या पेपरवर आली आहे. तशी जाहिरातही त्यांनी प्रसिद्ध केली आहे . तर या पेपरच्या चिकोडी आवृत्तीची यापेक्षाही खराब परिस्थिती झाली आहे. निपाणी कार्यालयात चांगला उपसंपादक आणि वार्ताहर नसल्याने अनेक चुकीच्या बातम्या लागत आहेत. कधी अवैध वाहतूक करणार्यांना शासन मान्यता द्या म्हणून अर्धे पण लावले जात आहे, अग्निशामाक दलाची आलेली गाडी केवळ निवडणुकीपुरतीच म्हणून सांगून लोकांची दिशाभूल केली गेली, या पेपरने बालकामगार दिन ११ जुन रोजीच साजरा केला, तर युपीएससी च्या परीक्षेत ३५४ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवक कधी आय ए एस झाला म्हणून तर कधी आय पी एस झाला म्हणून छापले जात आहे . मुळात तो युवक न आय ए एस आहे न आय पी एस . काही महिन्यापूर्वी एका अंगणवाडी शिक्षिकेच्या विरोधात शहानिशा न करताच चुकीची बातमी लावल्याने त्या शिक्षिकेला निलंबित व्हावे लागले . अनेकदा बातम्यांची शहानिशा न करताच चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या लावल्या जात आहेत . न्यूज व्याल्यू नसलेल्या बातम्यांना पान १ वर प्रसिद्धी देण्यात येत असल्याने वाचकातून या पेपरचे हसे होत आहे . याकडे ठाकुरजी वेळीच लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे . अन्यथा अशा चुकीच्या बातम्या सारख्या लागत गेल्यास या पेपरचा खप उतरणार यात तिळमात्र शंका नाही

विदर्भात दिव्य मराठीचे दिव्य दिवाळे

अकोला - मोठा गाजावाजा करून वर्षभरापूर्वी विदर्भात आलेल्या दिव्य मराठी चे दिव्य दिवाळे निघाले असल्याचे चित्र आहे. या दैनिकाचे वर्धा ब्युरो बंद करण्यात आले. वर्धा ऑफिसचे प्रमुख महेश मुन्जेवार आणि त्यांचे सहकारी आनंद इंगोले यांना अकोला येथे रुजू व्हा नाहीतर राजीनामा द्या असे आदेश देण्यात आले.
अखेर दोघांनीही राजीनामा दिला आहे आणि तो राजीनामा मंजूर करण्यात आला आहे .तर अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा येथील सर्व छायाचित्राकाराना कुठलीही पूर्व सूचना न देता नारळ देण्यात आले. अजून सहा लोकांना
कॉस्ट कटिंग च्या नावाखाली काढून टाकले जाणार आहे. यात नागपूर आणि अमरावती ब्युरो मधील कर्मचाऱ्यांचा समावेश असू शकतो.

बेरक्या से-
गुणवत्ता तपासण्यापेक्षा केवळ आडनाव पाहून आपल्या पहिल्या ठिकाणी २ ते ३ हजारांवर काम करणाऱ्या 'आंडू-पांडू' ना २५ ते ३० हजार असा भरगच्च पगार देण्यात आला. त्यामुळे दिव्य 'देशो'धडीला लागणारच होते.

खरे तर वर्‍हाडातील स्थानिक असलेल्या देशोन्नतीपुढे दिव्य मराठीचेच मोठे आव्हान होते. देशोन्नतीचा मोठा जाहिरातदारवर्ग, मारवाडी, व्यापारी दिव्यच्या गोटात गेले होते. दिव्यच्या संपादकपदी प्रेमदास राठोडऐवजी अविनाश राऊतला संधी दिली असती तर दिव्यवर आजची ही बिकट परिस्थिती आली नसती. परंतु, अभिलाष खांडेकर यांनी पेशवाई भूमिका घेतली. प्रेमदास राठोड हे लोकमतची सुपारी घेऊन दिव्यमध्ये आले होते. राठोड यांनी दिव्यचे दिव्य दिवाळे वाजून पुन्हा लोकमतमध्ये गेले … दिव्य मराठी अपयशी ठरणे ही देशोन्नती अन् लोकमतसाठी फायद्याची बाब ठरली…

जाता जाता
आणखी महत्वाचे म्हणजे, दिव्यमराठीने अलिकडेच शहरातील बिल्डरांच्याविरोधात भूमिका घेतली. हे बिल्डर बहुतांश मारवाडीमंडळी आहेत. कुर्‍हाडीचा दांडा गोत्यास काळ ठरतो, त्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली. देशोन्नती, लोकमतने सावध भूमिका घेतल्याने या मंडळीला दिलासा मिळाला. दोन्ही पेपरने आपले जाहिरातदार तर कायम ठेवलेच परंतु त्यांचे गुडविलही मिळवले. दिव्यचे तेलही गेले तुपही गेले... बरं या बातमीचा रिझल्ट काय? अद्याप आयुक्तांनी या बांधकामांना हात लावला नाही, मुळात ते अवैध नाहीत, दंडात्मक कारवाई करून नियमित करता येणारे आहेत...

मंगळवार, १७ जून, २०१४

महाराष्ट्रनामा

मुंबई - टी.व्ही.9 मध्ये पुन्हा एकदा पडझड सुरू... असोशिएट एडिटर विलास आठवले यांचा राजीनामा...आणखी दोघे राजीनाम्याच्या तयारीत...

अभिलाष खांडेकर यांची भोपाळवरून दिल्लीला बदली....आता महाराष्ट्राची दिव्य मराठीचे सर्व सुत्रे प्रशांत दीक्षित यांच्याकडे....

सकाळमध्ये मजीठिया वेतन आयोगाची अंमलवजावणी...पहिला हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा...
कर्मचाऱ्यांनी केले अभिजीत पवार यांचे अभिनंदन... बेरक्याकडूनही अभिनंदन...

पुढारीची नाशिक आवृत्ती 1 ऑगस्टपासून सुरू होणार...

दैनिक पुढारीची नाशिक आवृत्ती 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.संपादकपदासाठी काल नाशिकात मुलाखती पार पडली.त्यात पुण्यनगरी,लोकमत,सकाळ आणि म.टा.चा प्रत्येकी एक आणि बाहेरचे तीन असे सातजण हजर होते.आता संपादकपदी कोणाची नियुक्ती होणार,याकडे लक्ष वेधले आहे.
त्याचबरोबर कोल्हापूरात ऑल पेज कलरची प्रिंटीग मशिन बसविण्यात आली असून,कोल्हापूरची जुनी मशिन औरंगाबादेत शेंद्रा एमआयडीसीमध्ये बसविण्यात आली आहे.त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेली औरंगाबाद आवृत्ती लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिक आवृत्तीची छपाई औरंगाबादमधून होणार की नाशिकमधून याबाबत अधिकृतरित्या कळू शकतले नाही....


..........................

कोल्हापूर - दैनिक पुढारीने ३ ते ५ टक्के पगारवाढ दिली आहे. मात्र ती फारच तुटपुंजी आहे. कोल्हापूरच्या उपसम्पादकांसाठी हसावे कि रडावे असा प्रश्न पडला आहे.
कोल्हापुरात राजारामपुरी केसरी पै दिलीप लोंढे आणि भवानी मंडप केसरी पै सुरेश पवार यांच्यातील सामना सर्वश्रुत आहे. त्यात पद्मश्रीच्या जवळचा कोण याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे भवानी मंडप केसरीनी आपण फारच सक्रिय असल्याचे दाखवण्यासाठी बंद पडलेली सर्व आवृत्त्यांच्या उपसंपादकांची सकाळची बैठक पुन्हा सुरु केली आहे. त्यामुळे उपसंपादक सकाळी ११ वाजता आणि पुन्हा संध्याकाळी ४ वाजता येत आहेत. त्यामुळे वाढलेले ५००-६०० रुपये पेट्रोलमध्येच जात आहेत.
दरम्यान पुढारीला मुंबईत माणसांचा तीव्र दुष्काळ भासत आहे, सानपाडा कार्यालयातील अभिषेक कांबळे या उपसम्पादकापाठोपाठ एकमेव मुद्रित शोधक अमर वाणी यांनीही राम राम ठोकला आहे. कांबळे कृषीवलमध्ये तर अमर वाणी लोकसत्तेत गेले आहेत..

शनिवार, १४ जून, २०१४

महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या वसुली अधिका-यांची वार्ताहराकडून धुलाई

महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या नांदेड आवृत्तीचा वर्धापन दिन जवळ आला आहे.यानिमित्त नांदेड,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील वार्ताहरांची बैठक काल शनिवार दि.१४ जून रोजी नांदेडात पार पडली.यावेळी जवळपास १०० वार्ताहर उपस्थित होते.
यावेळी प्रत्येक वार्ताहरास जाहिरातीचे टार्गेट देण्यात आले.नंतर जाहिरात वसुलीचा विषय निघाला.यावेळी परभणी जिल्ह्यातील एक वार्ताहर उभा राहिलाअसता वसुली अधिका-यांने त्यास दोन हजार रूपये वसुली केव्हा भरणार म्हणून विचारले.तेव्हा तो म्हणाला,सर मी लाखो रूपये भरले,आता दोन हजार रूपये तर राहिले आहेत,लवकरच भरतो म्हणून सांगितले.पण हा वसुली अधिकारी म्हणाला,लवकर म्हणजे कधी ? तेव्हा तो वार्ताहर म्हणाला,भरतो लवकरच...पण हा हरामखोर वसुली अधिकारी म्हणाला,त्यात काय...बायकोला पाठवायचे आणि दोन हजार रूपये मिळवायचे,आणि तेच भरायचे...
वसुली अधिका-याचे हे वाक्य ऐकताच वातावरण गरम झाले.यावेळी तो वार्ताहर उठला आणि संतापाच्या भरात त्या वसुली अधिका-याची गच्ची पकडली.इतकेच नव्हे तर त्यास मारहाण सुरू केली.नांदेडच्या दरबारातील हे 'धर्म'संकट आणि 'हल्ला'गुल्ला पाहून  आवृत्ती प्रमुख उठले आणि वसुली अधिका-याला वार्ताहराच्या तावडीतून सोडविले.नंतर या वसुली अधिका-यांने सर्वासमक्ष अनावधाने बोललो म्हणून जाहीर माफी मागितली.पण चक्क बायको पाठव म्हणणा-या या वसुली अधिका-यास शेठजी आता नारळ देणार काय ?

लोकमत अमरावती एडिशनच्या हालचाली सुरु

लोकमतच्या अमरावती एडिशनच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या अमरावतीची छपाई नागपूर येथून होत आहे. अमरावती येथे प्रिंटींग युनिट सुरु झाल्यावर अमरावती, वर्धा, यवतमाळ या तीन ठिकाणची छपाई अमरावतीलाच होणार आहे. शहर एडिशननंतर आता दिव्य मराठी लवकरच अमरावती विभागात ग्रामीण अंक सुरु करणार आहे. त्याला तोड देण्यासाठी लोकमत अमरावती छपाई सुरु करणार आहे. दिव्य नागपुरात आल्यास त्याला टक्कर देण्यासाठी छपाईचा ताण कमी व्हावा म्हणून हे सुरु आहे.
इतकेच नाही तर कधी न कधी दिव्य अमरावतीतून छपाई सुरु करेल हि बाब लोकमतला कळली आहे. त्यामुळे दिव्यचे चांगले लोक आधीच ओढून घेण्याची तयारीहि लोकमतने सुरु केली आहे. त्यासाठी लोकमतने दिव्यच्या चांगल्या रिपोर्टरची यादी तयार केली आहे. त्यात यवतमाळचे बालाजी देवार्जनकर, अश्विन सवालाखे, वर्धाचे महेश मुंजेवार, अमरावतीतून अनुप गाडगे, प्रेमदास वाडकर, प्रसन्न जकाते, मनीष जगताप यांची नावे आहेत. लोकमत अमरावतीची जबाबदारी सहाय्यक संपादक गजानन जानभोर यांच्याकडे येऊ शकते. चांगले लोक घेण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी लोकमत करत आहे. प्रसंगी लोकमतची अमरावती एडिशन सगळ्यात जास्त पगार देणारी एडिशनहि असू शकते.

शुक्रवार, १३ जून, २०१४

मजीठिया वेतन आयोग लागू करण्यास दर्डाशेठचा नकार

नागपूर - लोकमतच्या दर्डाशेठनेही मजीठिया वेतन आयोग लागू करण्यास नकार दिला आहे.हा वेतन आयोग लागू झाल्यास लोकमत मीडिया ग्रुपमधील जवळपास 600 कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट होणार आहे.मात्र दर्डाशेठकडून नकार येत असल्यामुळे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
सर्वोच्य न्यायालयाने वृत्तपत्र कर्मचाऱ्यांना एप्रिलअखेर मजीठिया वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याचे निर्देश दिले होते.मात्र मे संपला तरी हा वेतन आयोग दर्डाशेठनी लागू केलेला नाही.
लोकमतमध्ये संपादकीय विभागातील जवळपास 350 आणि इतर विभागातील 250 असे 600 कर्मचारीच कायम नियुक्त आहेत.बाकी सर्व कर्मचारी कंत्राटदार पध्दतीने घेण्यात आले आहेत.जे कायम नियुक्त कर्मचारी आहेत,त्यांनाच या वेतन आयोगाचा लाभ होवू शकतो.मात्र दर्डाशेठ हा वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
त्यामुळे लोकमत कर्मचारी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.त्यांची नुकतीच जळगाव आणि नागपूरमध्ये बैठक झाली आणि पुढील दिशा ठरविण्यात आली.काहीजण न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा विचार करीत आहेत.

गुरुवार, १२ जून, २०१४

अखेर 'जागरण' यंदा महाराष्ट्रात येतोय...

अखेर 'जागरण' यंदा महाराष्ट्रात येतोय

होय हे खरं आहे...अखेर जागरण येतोय...महाराष्ट्रातील पत्रकारांना अच्छे दिन येणार...एका बड्या कंपनीस जागरण ने दिले कंत्राट...प्रिंटीगसाठी जागा,हॉकर्स,जाहिराती आणि चांगले माणसे शोधण्याचे दिले काम...लवकरच सुरू होणार महाराष्ट्रात जागरण...जागते रहो..


...............................

'दिव्य मराठी'चा नवी मुंबईत, पुण्याजवळ छापखाना; विस्तारप्रक्रियेत पहिली आवृत्ती कोल्हापूर/कोंकण/गोवा

.........................................

मुंबई तरुण भारत पुण्यातून आवृत्ती सुरू करतोय, समूहाचे अच्छे दिन आ गए

सर्व तरुण भारत मिळून (बेळगाव वगळता) काढताहेत 'नमो' कॉफी टेबल बुक. प्रीमिअम कव्हर पोझिशन जाहिरात दर एक कोटी रुपये प्रति कव्हर फुल पेज

...................................................

'पुढारी'ची नाशकात संपादकासाठी शोधाशोध सुरू; याक्षणी तडाखेबंद फलंदाजीसाठी जाधवांना नाशिकमध्ये कुणी 'सचिन' मिळेल का?

................................................................................

'जनशक्ति' च्या संचालनासाठी 'सिद्धीविनायक मल्टीमीडिया लिमिटेड' कंपनीची स्थापना, मुंबईत नरिमन पॉईंट या पंचतारांकीत भागातील एम्बसी सेंटर इमारतीत कार्यालय; भुसावळ शहरातील मध्यवर्ती भागात पांडुरंग टॉकीजजवळ प्रशस्त, तीन मजली इमारतीत कार्यालय

सोमवार, ९ जून, २०१४

राजीनाम्याच्या चर्चेने अस्वस्थ दिलीप तिवारी यांनी सोडली पातळी!


'देशदूत'चे जळगावमधील सहाय्यक संपादक दिलीप तिवारी यांनी पदाच्या राजीनाम्याची एक महिन्याची नोटीस दिल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे व्यवस्थापनाने त्यांच्यासह आणखी एकाचा राजीनामा घेतल्याची चर्चा पत्रकारांमध्ये दबक्या आवाजात सुरु झाली. अर्थातच दोन-चार दिवसांपूर्वी नाशिकहून मालक विक्रमभाऊ सारडा व प्रशासनाच्या कुलकर्णी बाई आल्या होत्या, त्यावेळी जे काही असेल ते नाट्य घडले. ही सारी अंतर्गत भानगड कुणीतरी 'इनसायडर'नेच मुद्दाम लीक केल्यानेच त्याची खमंग चर्चा सुरु झालॆ. खरेतर अशा गॉसिप गावगप्पांकडे बड्या पदावरील, ज्येष्ठ मंडळींनी दुर्लक्ष करायचे तर दिलीप तिवारी यांचा संयम व तोल सुटला. त्यांनी संपादकपदालाच काय कोणत्याही सामान्य, सभ्य माणसाला जाहीर चर्चेत वापरायला योग्य नाही, अशी हीन पातळीची भाषा जळगावातील पत्रकारांच्या व्हॉटस अप ग्रुपवर वापरली आहे. आश्चर्य म्हणजे ते जळगावात लोकमत किंवा सकळ किंवा 'महाराष्ट्र टाईम्स'चे संपादक होणार, अशी चर्चा असताना त्यांच्या या गावगुंड पद्धतीच्या शिवराळ, पातळी सोडून, हीन भाषेच्या वापरामुळे सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला आहे.

दिलीप तिवारी यांचे  पत्रकारांच्या व्हॉटस अप ग्रुपवरील लिखाण असे -


मित्रहो, नमस्कार। माझ्या संदर्भात काही मंडळी नवनवी माहिती इतरांना पुरवत आहेत। त्यात काहीही अफवा, फसवणूक वाटली तर माझ्याशी थेट बोला 9552585088। कोणता मादरचोद म्हणतो, माझा राजीनामा घेतला?  माझ्या राजीनाम्याविषयी फार चौकशा करू नका। जास्त माहिती हवी असेल तर माझ्याशी बोला। मी 'संपादक फोरम'चा सदस्य नाही,  त्यामुळे अफवा पसरवणा-या हरामखोरांना थेट उत्तर देवू शकतो, मग ते बिभीषण असोत की शत्रू पक्षाचे असोत....दिलीप तिवारी
..............................................

मित्रहो, 'गोलाणी'तील काही भामटे पत्रकार वरील चर्चा करतात, अशी विश्वसनीय माहिती मला मिळाली आहे. प्रसंगी संबंधिताचे नाव येथे जाहिर करेन. ही बदनामी करणारी पैदास कोण आहे, हे शोधण्यासाठी मला तातडीने त्यांचे नाव कळवा.- दिलीप तिवारी
........................................


इंटरनेटवर काही शिखंडी, भामटे, नपुंसक पत्रकार दुस-याविषयी मनघडत कहाण्या लिहीतात. ते सुद्धा  छक्के आहेत, ओळख लपवून इंटरनेटवर लिहिणारे हे तथाकथित कधीही पेपरात लिहीत नव्हते बर का!!!
.......................................


आमच्यातला एक भडवा दुस-या दलालाला खोटी माहिती द्यायचा आणि तो दलाल इंटरनेटवर काहीही लिहायचा. ही पिलावळ नावाने का लिहीत नाही? कारण फोरम मधील दुबळे उत्तर देत नाहीत. मी मात्र या शिखंडीना आव्हान देतो, माझे आणि तुमचेही नाव घेवून लिहा...कळू दे  कोण मर्द कोण षंढ...????(बहुधा असे गृपमध्ये कोणीही नसेल)
......................................

कृपया खालील शब्दांची अर्थ सांगावेत -

नपुंसक
नामर्द
हिजडा
छक्का
शिखंडी
गे

मित्रहो, पत्रकारात हे पंथ वाढले आहेत. दुस-यांच्या नावाने तिसरा-याची निनावी बदनामी करणारी ही मंडळी तुमच्या अवती भोवती असू शकते. नाव न घेता प्रचार, बदनामी, अफवा निर्माण करणा-यांना ओळखा. ऐकीव माहितीवर बदनामी करणारे वरील बहाद्दर ज्येष्ठ ही असू शकतात. या शिखंडीना माझे जाहिर आव्हान आहे, एक बापाची औलाद असाल आणि डब्याचे नाहीतर तुमच्या आईचे दूध प्याला असालतर माझ्यावर थेट वार करा...आहे का हिंमत...


'संपादक फोरम'चा उल्लेख तिवारी यांनी वारंवार त्यांच्या शिवीगाळ, वैताग व त्राग्यात केला आहे. चर्चा अशी आहे की, जिल्ह्यातील आघाडीच्या दैनिकातील पाचोरा येथील पाच पत्रकारांनी आयपीएल सट्टा बेटींगची मालिका चालवून तेथील पेढीवाल्या एका व्यक्तीकडून पाच लाखांची खंडणी मागितली. पेढीवाली व्यक्ती सर्व पुरावे घेवून पोलिसांकडे तक्रार करायला निघाली होती. मात्र, वर्तमान नव्हे तर भविष्याचे पत्र काढणारया व 'एमआयडीसी'मध्ये छापखाना असलेल्या एका प्रकाशनाच्या स्थानिक संपादकाने त्याच्या कार्यालयातच खंडणीबहाद्दर पत्रकार, तक्रारदार यांची 'सेटलमेण्ट' घडवून आणली व प्रकरण मिटविले. या प्रकाशनाचा वार्ताहरही खंडणी प्रकरणात अडकलेला होता. या 'सेटलमेण्ट' नाट्याची जिल्हाभरात खमंग चर्चा सुरु होती. पत्रकारांच्या व्हॉटस अप ग्रुपवरही ही चर्चा रंगली होती. तिवारी हे संपादक असल्याने त्यांनी राजीनाम्याच्या चर्चेचा अर्थ खंडणी प्रकरणाशी जोडला. आपण 'संपादक फोरम'चे सदस्य नाही, असा अनावश्यक खुलासाही त्यांनी केला.

तिवारी यांच्या त्रागा, वैताग व शिवीगाळावर व्हॉटस अप ग्रुपवरच आलेली ही एक प्रतिक्रिया -  "तिवारी साहेब नमस्कार, सर्व पोष्ट वाचल्या.तुमचा संबंध कोठेच नसताना तुम्ही एकदम आक्रमक झालात. का ते समजले नाही?"

मुंबई ब्युरो चीफ उद्धव ढगे-पाटील यांचा 'देशदूत'ला रामराम!

नवा धंदा नवी लोकं

रविवार, ८ जून, २०१४

'मजीठिया'चे 'दिव्य' कारस्थान!

"आम्हाला मजीठिया वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतनवाढ किंवा इतर कोणतेही लाभ नको आहेत. आम्ही हे कोणत्याही दबावाशिवाय, स्वखुशीने आणि आमच्या मर्जीने घोषित करीत आहोत. आम्ही संस्थेकडून मिळणारे मानधन व इतर लाभांनी खूष आहोत. आम्हाला आमच्या कामाच्या तुलनेत पुरेसा मोबदला मिळत असल्याने आमची व्यवस्थापनाविरुद्ध काहीही तक्रार नाही"
तुम्ही म्हणाल, हे काय? हे आहे एका दैनिकातील संपादकीय विभागातील सर्वांनी लिहून दिलेले 'सेल्फ डिक्लेरेशन'! काय "दिव्य" आहे नाही? मूळ डिक्लेरेशन इंग्रजीत आहे. सर्वांनी राजीखुशीने लिहून दिलेय, मग सर्वांचा फॉर्म एकच कसा; मजकूर सारखाच कसा आणि सर्वांना एकाच दिवशी इच्छा झाली? सर्वांची तारिखही एकच!
या सर्व होयबांनी मुंड्या हलवत लिहून दिलेय. काय लिहीलेय, आपण काय भरून देतोय; एव्हढा चाैकसपणाही नाही दाखविला कुणी. हे असले पळपुटे, गांडू, शेपूटघाले जगाच्या लढाया लढणार? जगाला न्याय मिळवून देणार? जे आपली स्वत:ची लढाई लढू शकत नाहीत ते कातडी बचाव फक्त बाताच मारणार आणि त्यांचे शेळपट, फद्या फदफदे नेतृत्व? नेतृत्व कसले हे तर दलाल! 'एचआर'ला सामील होऊन आपल्याच ज्युनिअर्सला मिळू पाहणारे लाभ हिरावून घेणारे हे दलाल! 100% सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरवून घेतले म्हणून या दलालांना स्पेशल पर्क्सची दलाली मिळाली आणि ज्युनिअर्सना धत्तुरा!
'सेल्फ डिक्लरेशन'मधून तुम्हाला कोणत्याही क्षणी विनाअट, कोणत्याही मोबदल्याविना नोकरीतून काढून टाकण्याचा परवानाच दोन अटी मान्य करून तुम्ही देऊन टाकलात रे कातडीबचाऊंनो!

नवा धंदा नवी लोकं

आशा आणि दिशा सारेच हरपल्याची नाशिकमधील एका दैनिकाची जळगावातील स्थिती आहे. भाऊंनी नवा धंदा नवी लोकं असा नवा फतवा काढला आहे. मात्र, त्यात विकेट धंदा देणारयाचीच जात असून 'धंदे करणारे' आलबेल आहेत. आता अशी माहिती मिळतेय की तमाम जैन मग ते जामनेरवाले असोत की टेकडीवाले, यांच्याशी 'दूत' बनून यशस्वी संबंध प्रस्थापित करण्यात संपादकाच्या 'सहाय्यक' कार्याची जाणच राखली गेली नाही. भाऊ म्हणाले, "आपल्या वाटा वेगळ्या; तुम्ही दुसरीकडे बघा. नोटीस द्या, महिना आहे अजून!" बरे जळगावात सुरुवातीपासून संगणककार्य सांभाळलेल्या व्यक्तीचीही कदर केली गेली नाही. ज्येष्ठ 'शुक्ल' 4 या दिवशीच त्यालाही सांगितले गेले, "आपणही रामराम घ्यावा, दुसरीकडे बघावे!" त्यांना खरेतर येवून-जावून, उठसूट "पाथ्री" खाण्याची सवय होती. तुम्ही काहीही आणि कुणालाही खावू लागलात की इतरांना उचक्या लागतातच. स्वत: काहीही खा-खा; पण इतरांनी कष्टाने खाल्ले तरी काहींना पोटदुखी होते व मग ते वेळ साधतात. अशीच वेळ साधून जुन्या खोडांनी दोन विकेट्स घेतल्या. आता कसली आली नवी आशा आणि कसली घेवून बसलाय नवी दिशा?

'रंगीला'चा पोपट झाला रे!

'रंगीला आैरंगाबादी'ची खबर आलीय मंडळी! रंगीला म्हणजे जबरदस्त प्रयोग'शील' व्यक्तिमत्त्व.  रात्रीचे त्यांचे एकेक प्रयोग म्हणजे भन्नाटच! भाजपाने 16 मे रोजी दिल्ली जिंकली तेव्हा 'रंगीला'ला प्रयोगाची व काहीतरी वेगळे करुन दाखविण्याची झिंग चढली. दिवसभर एका खासगी आर्टिस्टच्या अपार्टमेंटचे जिने चढ-उतरुन, पदरचे 25-30 हजार खर्चून 'नमों'चे फुल, ब्रॉडशीट, 8 कॉलम स्केच बनवून घेतले. स्केचवर फिगर, पॉईंटर्स सुपरइम्पोज करुन  'दिव्य'ला लाजवेल असे फ्रंट पेज जॅकेट तयार केल्याची घोषणा 'रंगीला'ने केली. ऑल एडिशनला ते घ्यावे म्हणून मुख्यालयी पाठविले. मात्र, महालक्ष्मी जणू कोपली. 'साहेबां'नी ते जॅकेट नाकारले. 'साहेब' फक्त नको बोलले; पण निरोप पुढे जाता-जाता 'पर्वती'मार्गे गेला- "छे! काय हा फालतूपणा? फेका ते, 'दादां'ना तिथे छान बनवून देताहेत म्हणे. ते नक्कीच 'सारस' ठरेल! तेच वापरा सगळीकडे" याला म्हणतात कोल्हापुरी धोबीपछाड अन् जोडीला सोलापुरी चटणीचा तडका! कुठे प्रयोगशीलता दाखवायचे याचे भान न राहिल्याने 'रंगीला'चे हसे झाले. त्यापेक्षा आपले 'शील'चे प्रयोगच बरे, असे रंगीला म्हणत असेल!


रंगिला औरंगाबादीची अशीही चाल...
मागच्या आठवड्यात आम्ही रंगिला औरंगाबादीने राजीनामा दिल्याचे वृत्त दिले होते.हे वृत्त खोटे असल्याचे मेसेस आम्हाला येत आहेत...त्याबद्दल बेरक्या दिलगिर आहे...
मंडळी त्याचे काय झाले, रंगिला औरंगाबादीला सध्या पद्श्री विचारत नाहीत.संपादक असूनही त्याला उपसंपादकाचे काम करावे लागते.दर्डा शेठच्या दारात चकरा मारूनही दर्डा शेठ पुसायला तयार नाहीत...मग रंगिलाने स्वत:च्या फायद्यासाठी उल्लू बनविले..त्याने त्याच्या जळगावमधील एका जुन्या सहकाऱ्यांला मी राजीनामा दिल्याचा मेसेस पाठविला.मग पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या एका मित्राने ही खबर आम्हाला पाठविली.आम्ही विश्वास ठेवायला तयार नव्हतो...मग आम्ही त्यांच्या कार्यालयात झेंडे लावणाऱ्यास विचारणा केली तर हो खरे आहे म्हणून पुष्टी दिली...म्हणून आम्ही ती बातमी दिली...
आता कळले की,ती बातमी चुकीची आहे...रंगिलाच हा डबल गेम होता...
1.पद्श्रीने आपल्याकडे विचारणा करावी,जावू नको म्हणून आग्रह करावा
2. दर्डा शेठने परत बोलवावे...
असो त्याची बातमी चुकली,त्याबद्दल जाहीर दिलगिरी... रंगिला औंरगाबादी विधानसभा आहे तिथेच काम करणार असून निवडणुका होईपर्यंत उपसंपादकाचेच काम करणार आहे...त्याला शुभेच्छा...आम्हाला उल्लूत काढले त्याबद्दल त्याचे अभिनंदन...

फेसबुक वर शेअर करा

Facebook