> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

पत्रकारास पोलीस निरीक्षकांकडून बेदम मारहाण ...

एका प्रादेशिक वृत्तपत्राच्या वार्ताहराला बेमुर्वतपणे वाहनात कोंबून अट्टल गुन्हेगाराची वागणूक देणारे धानोरा ( गडचिरोली) येथील पोलिस उपनिरीक्षक वैभव माळी यांच्या विरोधात जनआक्रोश तीव्र झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी श्री़ माळी यांची आज ३१ आॅगस्ट रोजी तडकाफडकी बदली करून त्यांना सिरोंचा तालुक्यातील असरअली उपपोलिस ठाण्यात पाठविले़
धानोरा येथील एका प्रादेशिक वृत्तपत्राचे वार्ताहर अल्लाउद्दीन लालानी यांच्या विरोधात वृत्तपत्रात बातमी प्रकाशित करुन समाजात बदनामी केल्याची तसेच पैशासाठी तगादा लावत असल्याची तक्रार एका मुख्याध्यापकाने ३० आॅगस्ट रोजी धानोरा पोलिस ठाण्यात केली होती़ या तक्रारीच्या अनुषंगाने प्रभारी पोलिस निरीक्षक वैभव माळी यांनी आज सकाळी १० वाजता पोलिस ताफ्यासह शहरातील बसस्थानकाशेजारी असलेले अल्लाउद्दीन लालानी यांचे दुकान गाठले. यावेळी कोणतीही विचारपूस न करता पोलिसांनी ५० वर्षीय लालानी यांना बेमुर्वतपणे उचलून जनावरासारखे वाहनात कोंबले. त्यानंतर पोलिसांनी लालानी यांना पोलिस ठाण्यात नेले.
घटनेची माहिती होताच बसस्थानकावर हजारो नागरिक गोळा झाले़ त्यांनी पोलिसांच्या अरेरावीचा निषेध करीत बसस्थानकावर चक्काजाम आंदोलन केले. यामुळे गडचिरोली-राजनांदगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर हजारो नागरिकांनी पोलिस ठाण्यावर धडक देऊन ठाणेदार माळी यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी करून त्यांचा पुतळा जाळला़ दुपारी ३ वाजता आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आंदोलनस्थळी पोहचून उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर यांची भेट घेतली. यावेळी काँग्रसेच जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, जि. प. महिला व बाल कल्याण सभापती निरांजनी चंदेल, जि. प. सदस्य मनोहर पोरेटी, चांगदेव फाये, जमीर कुरेशी, मल्लीक बुधवानी, शिवसेना तालुकाध्यक्ष मुन्ना चंदेल, अनंत साळवे, नंदू कुमरे, सरपंच माणिकशहा मडावी, ग्रा. पं. सदस्य गणोरकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नरेश बरगेवार, माधव गोटा, ललीत बरच्छा, पत्रकार सीताराम बडोदे, समीर कुरेशी, अभय इंदूरकर आदी उपस्थित होते.
नागरिकांचा तीव्र असंतोष आणि राजकीय पदाधिकार्‍यांचा दबाव लक्षात घेता पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रकरणाची शहानिशा करून ठाणेदार माळी यांची सिरोंचा तालुक्यातील असरअली पोलिस ठाण्यात तडकाफडकी बदली केली़ काही वेळाने वार्ताहर अल्लाउद्दीन लालानी यांची सुटका करण्यात आली. वैभव माळी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली़ वैभव माळी हे क्षुल्लक कारणावरून नागरिकांना बेदम मारहाण करीत असल्याच्या अनेक तक्रारी तत्कालीन पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या़

शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

महाराष्ट्रनामा ( Update 25/8/2014 )


झी 24 तास अपडेट
.........................
दिल्ली प्रतिनिधी रश्मि पुराणिक यांनी राजीनामा दिल्यामुळे दिल्लीला सुवर्णा दुसाणे यांना पाठवणार
धुपकर - दुसाणे वाद गाजण्याअगोदरच डॉक्टरांनी यावेळी 'डोके' चालवले
आशिष दीक्षित आल्यास मामा सावंत आणि कॉम्रेड पाटील यांना धोका 

....................................

 एक पाऊल मागेच्‍या दिल्‍ली प्रतिनिधी रश्‍मी पुराणिक यांचा राजीनामा; लवकरच बीजेपी माझाच्‍या असाईमेँटला ज्‍वाईन होणार, पण 'भारतमाता' आणि पुराणिकांचं पटणार का हा कळीचा मुद्‍दा...
...........................................

 बेरक्याचे वृत्त नेहमीप्रमाणे तंतोतंत खरे ठरले
........................................................
आयबीएन - लोकमतच्या अलका धुपकर 1 सप्टेंबरपासून झी 24 तासमध्ये दिसणार...
मंदार फणसेंमुळे धसका घेतला...आता आशिष दीक्षीतसाठी प्रयत्न सुरू...
आता सुवर्णा दुसाणे आयबीएन - लोकमतमध्ये जाण्याची शक्यता

..............................

  आयबीएन - लोकमत अपडेट
....................................
महेश म्हात्रे शुक्रवारी तर मंदार फणसे शनिवारी जॉईन...
वागळे पंटरची हवा टाईट...कधी नव्हे ते सक्रिय झाले..


....................मी मराठीचे मालक महेश मोतेवार हे चिटफंड घोटाळ्यातील आरोपी आहेत असे जाहीरपणे न्युजरुममधे म्हणणारे निखिल वागळे 'मी मराठी' मध्ये सल्लागार संपादक म्हणून दाखल

- आता वागळे मोतेवार यांना 'मोती' आहेत म्हणणार 

............................


पुणे - इंग्रजी पेपर DNA ची पुणे आवृत्ती अखेर बंद, 55 कर्मचारी बेकार
....................


नगर बीजेपी माझा साठी पांडुरंग रायकर रुजू 

मंगळवार, १९ ऑगस्ट, २०१४

महाराष्ट्रनामा

मुंबई - बीजेपी माझातून राजीनामा दिलेले माणिक मुंडे आणि टी.व्ही.9 मधून राजीनामा दिलेले विलास आठवले साममध्ये...मुंडे आऊटपूट हेड तर आठवले फ्रिलान्स रिपोर्टर

 मुंबई - मी मराठीला गळती सुरूच... एनटीए अवार्ड विनर कमलेश देवरुखकर यांचीही मी मराठीला सोडचिठ्‍ठी...

नगर : बीजेपी माझाच्या सचिन अग्रवालला नारळ; मुंबईहून नवा माणूस पाठवणार..

नाशिक - बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले....सकाळचे वृत्तसंपादक विजय बुवा यांचा अखेर राजीनामा...पुढारीचे निवासी संपादक म्हणून सुत्रे घेणार...

मुंबई - 'प्रहार'च्या संपादक पदासाठी 'रंगिला औरंगाबादी' इच्छुक,
पण नितेश राणेंकडून नकारघंटा...मधुकर भावे यांची वर्णी लागण्याची शक्यता
 
 


बेरक्या इफेक्ट..
दहा लाख खंडणी प्रकरणी महाराष्ट्राचा मानबिंदू मधुन अखेर खंडणीबहाद्दर आकोट प्रतिनिधी संजय आठवलेची हकालपट्टी....
 

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

बेरक्या इम्पॅक्ट : लोकमत कर्मचा-यांना अखेर मजीठिया वेतन आयोग लागू

नागपूर - मजीठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा आदेश सर्वोच्य न्यायालयाने देवूनही,लोकमतचे दर्डा शेठ गप्प होते.यासंदर्भात बेरक्याने वारंवार बातम्या देवून वस्तुस्थिती मांडली.कर्मचा-यांचा लढा आणि बेरक्याच्या बातम्यापुढे अखेर दर्डा शेठ झुकले असून,त्यांनी मजीठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे पत्र आपल्या नोटीस बोर्डावर लावले आहे.
या वेतन आयोगाचा लाभ लोकमतमधील जवळपास ४८० कर्मचा-यांना मिळू शकतो.नोव्हेबर ११ पासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत.त्यामुळे मागील फरक भत्ता येत्या वर्षभरात चार टप्प्यात मिळणार आहे.एका कर्मचा-यास किमान २ लाख आणि जास्तीत जास्त ८ लाख रूपये फरक मिळू शकतो.तसेच पुढील महिन्यापासून त्यांच्या पगारात घसघसीत वाढ मिळणार आहे.येणा-या पगारात मागील फरक भत्ता सुध्दा मिळणार आहे.
अखेर मजीठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास दर्डा शेठ तयार झाल्यामुळे अनेक कर्मचा-यांनी बेरक्यास धन्यवाद दिले असून आभार मानले आहे.
जाता - जाता :
बेरक्याला कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही.हवी आहे साथ आणि प्रेम...
बेरक्या नेहमी आपल्या सोबत आहे.

एक पाऊल मागेमध्ये रंगणार युध्द

मुंबई : 'आयबीएन - लोकमत'मध्ये आता विकेट पडणार ही शक्यता गृहीत वागळेचे पंटर आता इतर ठिकाणी जॉबची शोधाशोध करीत आहेत.पैकी सदैव 'धुप'णारी एक महिला एक पाऊल मागेच्या डॉक्टरांना नुकतेच भेटली.
डॉक्टर डास चावल्यामुळे काही दिवसांपुर्वी आजारी पडले होते.ते एका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत होते.गेल्या बुधवारी ही महिला डॉक्टरांना हॉस्पीटलमध्ये भेटली.यावेळी डॉक्टरांना चांगलीच तरतरी आली.त्यांनी आजारपण विसरून एक पाऊल मागेच्या 'इनपूट' आणि 'आऊटपूट' हेडला हॉस्पीटलमध्येच बोलावले.त्यांनी सांगितले की,हिला आपणाकडे घ्यायचे आहे.नंतर दोघांचा चेहरा चांगलाच पडला.
'एक पाऊल मागे'मध्ये काही महिन्यापुर्वी एक 'सुवर्ण' पाऊल पडले आहे.कोणतीही डिबेट असो,हे पाऊल मागे हटत नाही.तिला शह देण्यासाठीच नविन शक्कल डॉक्टरांनी शोधली आहे.काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे दिवाकर रावते हे या चॅनलमध्ये गेले होते.तेव्हा या 'सुवर्ण' पाऊलची स्तुती करून,आता डिबेटची सर्व सुत्रे तिच्याकडे सोपवा,असे म्हटल्यापासून डॉक्टर अस्वस्थ झाले असून,सारखेच आजारी पडत आहेत.म्हणूनच त्यांनी एक दगडात दोन पक्षी मारण्याचा निर्णय घेतलाय.पण आऊटपूट आणि इनपूट मंडळी त्यामुळे अस्वस्थ झाली आहे.
एक पाऊल मागे मध्ये जे 'सुवर्ण' पाऊल पडले आहे,ते वागळे आणि वागळे पंटरला कंटाळूनच पडले आहे.आता नव्या बाईसाहेब येत असल्यामुळे त्याही अस्वस्थ झाल्या आहेत.एवढेच नाही तर नव्या बाईसाहेबांनी अजून एक 'दीक्षा' मागितली आहे, ती म्हणजे 'आशिष' हवा.त्यामुळे तर एक पाऊल मागे मधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे अगोदरच वातावरण गढूळ आहे.त्यात वागळेचे पंटर येत असल्यामुळे वातावरण अधिकच गढूळ होत आहे. त्यामुळे नव्या आणि जुन्या मंडळीत युध्द रंगण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांची आयबीएन - लोकमतमध्ये डाळ शिजली नाही म्हणूनच की काय डॉक्टर आता वागळेंचे पंटर आपल्या चॅनलमध्ये घेवून,स्वत:चे चॅनल आयबीएन - लोकमत चॅनल करू पहात आहेत.डॉक्टरांच्या या सुपिक डोक्याला आता काय म्हणावे ?

रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

आयबीएन - लोकमतमध्ये घडामोडींना वेग

आयबीएन - लोकमतमध्ये सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.वागळे गेल्यामुळे त्यांच्या काही समर्थकांची विकेट पडण्याची शक्यता आहे.
असे झाले तर या पाच जणांची विकेट पडू शकते
 
१. आशिष दीक्षीत
२. अलका धुपकर
३. विनायक गायकवाड
४. प्रियंका देसाई
५. शरद बडे

ही शक्यता गृहीत धरूनच वरील पाच जणांनी दुसरीकडे जॉब शोधनाची मोहीम सुरू केलेली आहे.मात्र सर्वत्र नो एन्टीचा बोर्ड झळकलेला आहे.
.............................

सध्या आयबीएन - लोेकमतमध्ये दुसरा गट सक्रिय झालेला आहे.
१. राजेंद्र हुंजे
२. रेणुका रामचंद्रण
३. आशिष जाधव


तसेच खालील ब्युरो चिफना इतर ठिकाणी हलविण्याची शक्यता आहे.
१. सिध्दार्थ गोदाम, औरंगाबाद
त्यांच्या जागी माधव सावरगावे यांची वर्णी लागू शकते
२. प्रवीण मुधोळकर
त्यांच्या जागी प्रशांत कोरटकर यांची वर्णी लागू शकते
तसेच ज्या ब्युरो चिफच्या आणि स्ट्रींजरच्या तक्रारी आहेत,त्यांना कायमचे घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

फणसेच्या एन्ट्रीला ब्रेक लावण्याचा वागळे पंटरचा प्रयत्न

मुंबई - मंदार फणसे यांनी ऑलरेडी 'साम'ला रामराम ठोकला आहे.त्यांची आयबीएन - लोकमतचे डेप्युटी चिफ एडिटर म्हणून निवड झालेली आहे.मात्र फणसे आल्यानंतर आयबीएन - लोकमतमध्ये कसे आभाळ कोसळू शकते,हे पटवण्याचा प्रयत्न वागळे पंटरनी सुरू केलेला आहे.
अगोदरच वागळे गेल्यामुळे या पंटरवर आभाळ कोसळले आहे.त्यात फणसे येणार असल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.कोणी 'धूप'त आहे तर कोणी कुठे 'दीक्षा' मागत आहे.हादरून गेलेली पंटर मंडळी काही दिवसांपुर्वी रिलायन्स मीडिया ग्रुपचे उपाध्यक्ष उमेश उपाध्याय यांची भेट घेतली.त्यांनी असे पटवून देण्याचा प्रयत्न केला की,फणसे हे काहीच कामाचे नाहीत.केवळ पाट्या टाकून जातात.मात्र उपाध्याय यांनी कंपनीचा निर्णय असल्याचे सांगून सर्वांना गप्प केले.त्यात 'धुप'णारी एक महिला,'दीक्षा' मागणारा एकजण,नायक बनण्याचा प्रयत्न करणारा 'विनायक' आणि कोणी 'प्रियंका' आहे म्हणे.या चौघांनी खूप पटवण्याचा प्रयत्न केला पण उपाध्याय साहेबांवर काहीच परिणाम झाला नाही.
दुसरे असे की,जेव्हा वागळे यांनी राजीनामा दिला त्यानंतर उपाध्याय यांनी ऑफीसमध्ये बैठक घेतली होती.त्याचे कोणीतरी शुटींग केले आणि त्याची क्लीप ऑफीसच्या वायफायवरून वागळेंना पाठवली.तेही ट्रेस झाले आहे.मात्र वागळेंचा पंटर असलेल्या एका चॅनल प्रोड्युसरने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
असो,फणसे येण्याअगोदरच आयबीएन - लोकमतमध्ये रामायण आणि महाभारत सुरू झालेले आहे.लवकरच कौरवांचा अंत होणार आहे तर सितेचे हरण होणार आहे.
इति श्री आयबीएन - लोकमत पुराण समाप्त...जाता - जाता : 
चला जग जिंकू या' मध्ये एकाकी पडल्यामुळे 'उघडा डोळे बघा निट'मध्ये 'दीक्षा' मागणास गेलेल्यास नकार घंटा...
म्हणाले, एवढ्या पगारात तर दोन चांगले माणसे मिळू शकतात...
घर फिरले की घराचे वासे फिरू लागतात,हेच खरे....

रविवार, १० ऑगस्ट, २०१४

महेश म्हात्रे आठ दिवसांत आयबीएन - लोकमतमध्ये जॉईन होणार

मुंबई - दैनिक 'प्रहार'चे संपादक महेश म्हात्रे यांनी प्रहारचा राजीनामा दिला असून,येत्या काही दिवसांत ते आयबीएन - लोकमतमध्ये डेप्युटी चिफ एडिटर म्हणून जॉईन होणार आहेत.त्यांच्याकडेच आयबीएन - लोकमतच्या संपादकपदाची सर्व सुत्रे राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महेश म्हात्रे प्रहारमध्ये येण्यापुर्वी 'सह्याद्री' वाहिनीवर अनेक मुलाखतीचे शो करीत होते.त्यामुळे त्यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव आहे.राजकीय,सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय विषयाचा दांडगा आभ्यास म्हात्रे यांना असल्यामुळे वागळेंची उणिव भासणार नाही,असे जाणकारांचे मत आहे.
म्हात्रे हे अत्यंत शांत स्वभावाचे असल्यामुळे वागळेंसारखे ते समोरच्या तुटून पडणार नाहीत.मात्र समोरच्याचे काय म्हणणे आहे,हे दर्शकांना दाखवू शकतात.विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज,उध्दवसमीप अनेक नामवंतांना मुलाखतीसाठी पाचारण करण्याचे वजन त्यांच्याकडेच नक्कीच आहे.
महेश म्हात्रे यांच्या नव्या वाटचालीस 'बेरक्या'च्या शुभेच्छा...

शनिवार, ९ ऑगस्ट, २०१४

महेश म्हात्रे झाले आयबीएन - लोकमतचे डेप्युटी चिफ एडिटर


आयबीएन - लोकमतमध्ये निखील वागळे हे चिफ एडिटर होते.

आता हे पद खाली ठेवून दोन डेप्युटी चिफ एडिटर घेणार...
पैकी प्रहारचे संपादक महेश म्हात्रे यांची एका जागेवर निवड
आता दुसऱ्या जागेसाठी कोणाची निवड होणार ?
मंदार फणसे आणि डॉ.उदय निरगुडकर यांच्या स्वप्नावर पाणी...

रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

सकाळच्या खानदेश आवृत्तीच्या निवासी संपादकपदी भालचंद्र पिंपळवाडकर


जळगाव - सकाळच्या खानदेश आवृत्तीच्या निवासी संपादकपदी भालचंद्र पिंपळवाडकर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सहयोगी संपादक म्हणून खानदेश आवृत्तीचे काम बघायचे. श्री. पिंपळवाडकर यांनी दैनिक तरुण भारतपासून पत्रकारितेची सुरवात केली आहे. नंतर औरंगाबादच्या लोकमत, कोल्हापूरच्या पुढारीत काही वर्षे आणि सकाळमध्ये सहयोगी संपादक म्हणून रूजू होण्यापूर्वी पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे वृत्तसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. खानदेश आवृत्तीची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी दोन वर्षांत आवृत्तीचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सकाळने अधिक जबाबदारी त्यांच्यावर टाकली, असे सांगण्यात येते.
 

अनिल जोशी झाले डेप्युटी जनरल मॅनेजर 
सकाळचे खानदेश युनिट हेड अनिल जोशी यांचीही पदोन्नती झाली असून, ते आता डेप्युटी जनरल मॅनेजर झाले आहेत.

फेसबुक वर शेअर करा

Facebook