> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत अपेक्षेप्रमाणे मोठे फेरबदल...

राजेश क्षीरसागर यांच्या आगमनाने कात टाकायला सुरुवात केलेल्या जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत अपेक्षे प्रमाणे मोठे फेर बदल होउ लागले आहेत.
बहुतांश वशीलेबाज आणि रिकामटेकड्या कळलाव्या नारदाना नारळ मिळणार असून फ़क्त मेहनती आणि रिज़ल्ट ओरिएंटेड कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.
प्रा्माणिक काम कारणाऱ्यांची पत्रकारितेत नेहमीच गळचेपी होते आणि कान भरणारे ,लाळ घोटे ,लोणी थाप बाता मारणारे विनाकारंण मोठे असल्याचा आव आनणार्यांची दुकाने मोठी होतात.. चॅनेल पत्रकारितेत तर हा प्रकार आता खुप वाढलाय त्यातूनच मग राजकारण्यांच्या आशीर्वादाने मुख्य पदावर बसणाऱ्यांची यादी वाढली आहे. त्यात मग बातम्या दाखवण्यातले फेवरटिजम लक्षात येते असो पण किमान जय महाराष्ट्र ने हे टाळल आहे. आधीच्या अनुभवांतुंन ताउन सुलाखूंन निघाल्याने असेल पण अण्णा सुधारले राव
राजेश क्षीरसागर यांनी अवघ्या दोन आठवड्यात चॅनेल चा रेवेन्यू वाढवला आज जय महाराष्ट्र नम्बर गेम मधे मागे असले तरी ते वेगाने पुढे जात असल्याचे दिसत आहे महाराष्ट्रात 90टक्के डिस्ट्रीब्यूशन पूर्ण करुन राजेशनी आल्या आल्या चॅनेलची वितरण व्यवस्था सुधारली आहे
राजेश क्षिरसागर स्वतः सकाळी 11 पासून रात्री उशीरा पर्यन्त काम करत असतात सर्व पक्षातील राजकारणी त्याना फोनवर संपर्कात असल्यामुळे राजकीय बातम्या घडामोडी यांची त्याना थेट माहिती मिळते
अनेक जुने जाणते पत्रकार त्यांच्या 09821046910 या जुन्या फोन वर संपर्क करुन त्याना योग्य त्या महत्वाच्या बातम्या पुरवत असतात .जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीतील संपादकीय विभाग या नव्या सीईओ वर अधिक खुश आहे कारण हा सीईओ ''मी मी ''करत नाही तर आपण सारे मिळून करुया म्हणतो.
सीईओ सारख्या सर्वोच्च पदावर बसुनही याला पदाची गुर्मी नाही.. संपादकाला पूर्ण अधिकार, त्याच्या कामात अजिबात लुड़बुड न करता राजेशनी संपादकीय विभागावरही वचक निर्माण केलाय. रिपोर्टर ने संपादकाशीच बोलावे संपादकीय निर्णय संपादकाशिवाय कोणी घेऊ नयेत असे ठाम निर्णय जय मजराष्ट्र वाहिनीत होउ लागल्यामुळे बातम्यांचा स्तर ही सुधारला आहे.
राज्यातल्या दुष्काळाची भीषणता मराठवाड्यातील असलेल्या शैलेश लांबे या संपादकाने अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने अंगावर शहारे आंनणारी पद्धत वापरून मांडली..
एखादी चांगली टीम कार्यरत झाली की काम करणाऱ्याना कसा हुरुप येतो ते सध्या जय महाराष्ट्र वाहिनी अनुभवतेय ...

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

अहो आश्चर्यम् ....

'शब्दाला सत्याची धार' ( आणि राजकारणात हार ) पेपरचे माजी संपादक बाहेरून अग्रलेख (संपादकीय) आणि लेख मागवत होते.त्याचे बिल नव्या संपादकांच्या हातात पडताच,ते चक्रावले...
बिल देण्यास नकार...मागील अनेक लेखकांचे बिल थकले ...आता माजी संपादकाच्या गुणवत्तेवर शंका ...
आता बोंबला....काय काय घडेल सांगता येत नाही बुवा ...

भावेंचा मनोभाव पहिला प्रहार
 शब्‍दाला सत्‍यांची धार असे सांगणा-या दैनिकात मनोभाव प्रहार होण्‍यास सुरूवात झाली आहे. दोन संपादकांच्‍या उदंड यशानंतर मालकांनी आता मनोभावे प्रयोग करायचा ठरवला आणि जुन्‍या संपादकांचे  कारभार उघड होऊ लागले आहेत. भावेंनी त्‍यावर प्रहार करण्‍यास सुरूवात केली आहे.

जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत आता राजेश क्षीरसागर यांचा दरारा....

मराठी वृत्त वाहिन्या आता हळू हळू मराठी सिनेमांप्रमाणे कात टाकू लागल्या आहेत.झी 24 तास ने ज्या प्रमाणे उच्च विद्या विभूषित डॉ उदय निर्गुड़कर याना आणून एक नविन पायंडा पाडला त्या प्रमाणे आता 'थेट -अचूक -बिनधास्त' वाल्या 'जय महाराष्ट्र' वाहिनीनेही उच्च विद्याविभूषित सीईओ आणून कात टाकण्याचा प्रयत्न केलाय.
जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीत सीईओ म्हणून रुजू झालेत राजेश क्षीरसागर हे उच्च विद्याविभूषित असून मेक्यानिकल इंजिनीअरिंग करून त्यानी बिज़नेस मैनेजमेंट केले.  त्यानंतर बरीच वर्ष विविध मोठ्या कंपन्यांमधे महत्वाच्या जबाबदारी पार पाडल्यावर त्यानी सहारा वाहिनी मध्ये उपाध्यक्षपदी आपली सेवा दिली.
सहारा वृत्त वहिनीला स्वतःची वेगळी ओळख (एकाच व्यक्तिच्या टॉक शो च्या जोखडातून मुक्त करुन) देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहारातुन बाहेर पडल्यावर त्यानी स्वतः ची सल्लागार संस्था सुरु केली आणि अनेक वाहिन्याना आकार देण्याच् काम केले
जय महाराष्ट्र वृत्त वाहिनित त्यांच्या येण्यामुळे एका नविन पर्वाला सुरुवात झाली आहे. नवनवीन कल्पनांना मोकळे आकाश मिळाले आहे
सर्व राजकीय पक्षात व्यक्तिगत संबंध् असलेले राजेश सर्वानाच् आपले वाटत आहेत. व्यवसाय वृद्धी हे धेय समोर ठेऊन सहारात काम केल्यामुळे पूर्वी नरेंद्र मोदी पासून उद्धव ठाकरेंन पर्यन्त सर्वानीच त्याना वेळोवेळी भेटीच्या वेळा देऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली आहे
नविन कल्पनांचे भंडार असलेले राजेश जय महाराष्ट्र मधे अनेक बदल करत आहेत.
प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला माणूस ही त्यांची कार्यपद्धती असल्यामुळे कर्मचार्यांमधे उत्साहाचे वातावरण आहे
स्वतः बद्दल अतिशय कमी बोलणारी मात्र कामाने उत्तुंग शिखर निर्माण करणारी माणसे प्रसार माध्यमात अभावानेच सापड़तात राजेश क्षीरसागर हे त्यातलेच एक नावआता ते जय महाराष्ट्र वाहिनीला कसे उच्च शिखरावर नेतात त्याची प्रतीक्षा आहे.

बुधवार, १९ नोव्हेंबर, २०१४

ठाण्‍यातील पत्रकारांचे 'लोंढे' आता विधानभवनात

ठाण्‍यातील जनादेश, जनमुद्रा आणि नवाकाळ या दैनिकांसह राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते डावखरे यांनी सन्‍मानने हाकलपट्टी केलेला एक  पत्रकार शिवसेनेच्‍या आश्रयाने सध्‍या विधानभवनात दाखल झाला आहे. विरोधी पक्षनेत्‍यांचा खाजगी स्विय सहाय्यक असल्‍याचे तो सांगतो आहे.   
याच महाशयाने यापुर्वी मंत्रालयात  दोन प्रतिष्‍ठीत दैनिकाच्‍या पत्रकारांना हाताशी धरून महसूल खात्‍यातील दोन अधिकारी आपले नातेवाईक आहेत असे सांगून बदल्‍या करून घेतल्‍या व त्‍याचे लाखो रूपये परस्‍पर हडप केले. हा पत्रकार ठाण्‍यातून गेला याचा आनंद साजरा करण्‍यासाठी ठाण्‍यातील प्रेसरूमध्‍ये काही पत्रकारांनी पेढे वाटून आनंद साजरा केल्‍याचेही वृत्त आहे. ठाण्‍यातील पत्रकारांचे लोंढे आता विधानभवनात वावरू लागल्यामुळे अनेकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे…

पत्रकारांवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी समिती

नवी दिल्ली - वादग्रस्त स्वयंघोषित संत बाबा रामपाल याच्या "सतलोक‘ आश्रमाबाहेरील घटनांचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.
नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही शासनाची स्वायत्त संस्था असून माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काम करते. याबाबत बोलताना कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू म्हणाले की, मंगळवारी पोलिसांनी काही पत्रकारांना मारहाण केली तसेच त्यांच्या वस्तूही फोडल्या. प्रथमदर्शनी ही बाब म्हणजे घटनेतील मुलभूत स्वातंत्र्याचा हक्क भंग असून कलम 19(1) भंग केल्याचे दिसून येत आहे. घटनेतील सत्यता तपासण्यासाठी सोंदिप शंकर (संयोजक), कोसुरी अमरनाथ, राजीव रंजन नाग आणि कृष्णा प्रसाद यांची चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ही समिती हल्ला झालेले पत्रकार, माध्यम संस्था, माध्यम व्यवस्थापन तसेच संपादकांनाही भेट देईल. याशिवाय पोलिस प्रशासन आणि संबंधितांचीही समिती भेट घेईल. यासाठी हरियाना आणि चंदिगड प्रशासनाने समितीला सहकार्य करण्याचीही काटजू यांनी सूचना केली आहे.
मंगळवारी हिसार जिल्ह्यातील बारवाला येथे पोलिस आणि रामपाल यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केली होती. तसेच त्यांचे कॅमेराही तोडण्यात आले होते.

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

सरकारी "दूरदर्शन'चा चेहरा बदलणार

नवी दिल्ली - देशातील सर्वांत मोठी वृत्तवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दूरदर्शनचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार सरकारने केला आहे. देशाचे स्वत:चे चॅनेल म्हणून दूरदर्शनचे प्रमोशन केले जाणार आहे. ताज्या मजकुराबरोबरच मनोरंजनाचा खजिना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. "देश का अपना चॅनेल‘ या नव्या पंचलाईनसह सोमवारपासून या वाहिनीचे प्रमोशन केले जाणार आहे.

कार्यक्रमांचे स्वरूप बदलण्याबरोबरच रंगसंहितेमध्येही आकर्षक फेरबदल घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांना अधिक सुखद अनुभव येईल. खासगी वृत्तवाहिन्यांना टक्‍कर देण्यासाठीच दूरदर्शनचे स्वरूप बदलण्यात आल्याचे बोलले जाते. दूरदर्शनला लोकांची वाहिनी बनविण्यासाठी जाणीवपूर्वक बदल घडवून आणले जात आहेत. सोमवारपासून हे बदल घडविले जातील. नवा फ्रेश कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दूरदर्शनवरील प्राईमटाईममध्ये आठ नवे शो दाखविले जातील. सुरवातीला दर्जेदार मजकूर प्राप्त करण्यात अनेक अडचणी होत्या; पण आता तो प्रश्‍न मिटला आहे. नव्याने जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे स्पर्धात्मक वातावरणाला पोषक ठरणारी आहेत. सर्वोत्कृष्ट सेवा देण्याची क्षमता दूरदर्शनकडे आहे असे आम्हाला वाटते. कौटुंबिक मूल्ये, विश्‍वासार्हता, राष्ट्रउभारणीस दूरदर्शन प्राधान्य देईल, असेही सांगण्यात आले.
लोकांना निखळ मनोरंजन देण्याच्या हेतूनेच आम्ही हे बदल घडवून आणले आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आम्ही हा मनोरंजनाचा नजराणा लोकांसमोर सादर करणार आहोत. लोकांचा याला भरपूर प्रतिसाद मिळेल, याची आम्हास पूर्ण खात्री आहे.
विजयालक्ष्मी छाब्रा, दूरदर्शनच्या महासंचालक

बुधवार, १२ नोव्हेंबर, २०१४

दैनिक भास्करच्या नागपूर कार्यालयावर हल्ला

दैनिक भास्करच्या नागपूर आवृत्तीत न्यूज एजन्सीकडून आलेली लंडनची एक बातमी प्रसिध्द झाल्यानंतर ख्रिश्चन समुदायाच्या 20 ते 25 जणांच्या टोळक्याने आज बुधवारी सायंकाळी भास्करच्या कार्यालयावर हल्ला करून कॉम्प्युटर आणि फर्निचरची तोडफोड केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच माध्यमावर हल्ला झाला आहे.या हल्ल्याचा सर्वत्र तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.


The Nagpur Union of Working Journalists (NUWJ) and Tilak Patrakar Bhavan Trust (TPBT) have strongly condemned the unwarranted and cowardly attack on the office of Hindi daily ‘Dainik Bhaskar’ on Wednesday.
An unruly mob of around 50 youths thronged and ransacked its city office located at Great Nag road also injuring many mediapersons in the process.
NUWJ President Bramha Shankar Tripathi, General Secretary Anupam Soni, TPBT President Pradipkumar Maitra, Secretary Shirish Borkar and other office bearers have condemned the incident which has further strengthened the need of stepping up security to mediapersons and media houses. They all also called for quick identification and arrest of culprits, who have been in caught on CCTV cameras installed at the Bhaskar office.

सोमवार, १० नोव्हेंबर, २०१४

जागृती News चॅनल लवकरच सुरू होण्याची चिन्हे...

पुणे - जागृती News चॅनल लवकरच सुरू होण्याची चिन्हे... अनेक शहरात सिग्नल दिसू लागले...डिश टीव्हीवर 879 वर सिग्नल दिसू लागले....

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

आकाशवाणी औरंगाबाद केंद्रामध्ये पत्रकारितेची संधी


आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात एक वर्षाच्या करार तत्वावर वृत्तसंपादक आणि वृत्तनिवेदक तथा भाषांतरकाराची पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वृत्तसंपादक पदासाठी उमेदवार पत्रकारितेतील पदविकाधारक असावा. त्याला जनसंवाद, रेडिओ, दूरचित्रवाणीमध्ये पत्रकारीतेचा अनुभव असावा. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना प्रतिमाह २५ हजार रूपये एकत्रित मोबदला दिला जाईल.
वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार पदासाठी इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी तसंच पदवीला मराठी विषय अनिवार्य असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना आवाजाची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना प्रतिमाह २३ हजार रूपये मोबदला दिला जाईल.
या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचं वय दि. १ जानेवारी २०१५ रोजी २१ ते ५० वर्षांदरम्या न असावं. निवड होणाऱ्या उमेदवारांना एकत्रित मोबदल्याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते देय असणार नाहीत.
इच्छूक उमेदवार या भरतीबाबतची अधिक माहिती आमच्याnewsonair.nic.in/vacancy.asp किंवा newsonair.com/ vaccancy.asp वर पाहू शकतात. अथवा आकाशवाणी औरंगाबाद केंद्राशी देखील संपर्क करू शकतात.
या पदासाठी अर्ज पाठवितांना उमेदवारांनी लिफाफ्यावर ‘वृत्त संपादक किंवा वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार पदासाठी अर्ज’ असे लिहीण्यास विसरू नये. अर्ज पाठविण्याचा पत्ता असा - कार्यालय प्रमुख, आकाशवाणी केंद्र, जालना रोड, औरंगाबाद ४३१००५
पत्ता पुन्हा एकदा ऐका- कार्यालय प्रमुख, आकाशवाणी केंद्र, जालना रोड, औरंगाबाद ४३१००५

निवेदन
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याकरीता लघुलेखक (स्टेनो) आणि डाटा इन्ट्री ऑपरेटर्स पुरविण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थाकडून निविदा मागविण्यात येत आहेत.
दि. २३ डिसेंबर २०१४ दुपारी ३ वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील, त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता या निविदा उघडण्यात येतील.
अधिकृत नोंदणी असलेल्या संस्थांच्याच निविदा स्वीकारण्यात येतील, पात्र संस्थेसोबत औपचारिक करार केला जाईल, याबाबतची अधिक माहिती आमच्याhttp://www.newsonair.nic.in/disptenders.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा इच्छूक संस्था आकाशवाणी केंद्राशी संपर्क साधू शकतात.

पनवेल येथे महिला पत्रकारावर जीवघेणा हल्ला

पनवेल येथील कर्नाळा टीव्हीच्या रिपोर्टर चेतना वावेकर यांच्यावर आज सकाळी पनवेल येथे प्राणघातक हल्ला कऱण्यात आला. वावेकर आपल्या गाडीतून कामावर जात असताना एक तरूण गाडीला आडवा आला. त्याने चेतना वावेकर यांच्या केशाला धरून त्यांना बाहेर काढले. अश्लिल शिव्या देत त्यांना मारायला सुरूवात केली. तेवढ्यात मारहाण कऱणाऱ्या तरूणाचा मित्र आला त्याने मग बाबूच्या काठीने वावेकर यांच्या डोक्यावर वार केले आहेत. त्यात वावेकर गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार कऱण्यात येत आहेत. वावेकर यांनी खांदेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मारहाण करणारे तरूण पनवेल नजिकच्या आकुर्ली गावचे रहिवाशी असून हा हल्ला कशामुळे झाला ते अद्याप स्पष्ठ झालेले नाही. कर्नाळा टीव्ही शेकापचे नेते विवेक पाटील यांच्या वतीने चालविला जातो.
चेनता वावेकर यांच्यावरील हल्ल्याचा रायगड प्रेस क्लब तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने तीव्र शब्दात धिक्कार केला असून तातडीने आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे.

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

'पुढारी'ला कार्यकारी संपादक हवाय....

'पुढारी'च्या पुणे आवृत्तीला 'कार्यकारी संपादक' हवाय.गेल्या एक महिन्यापासून पद्मश्रींशी अनेकांनी संपर्क साधला असला तरी  तेच ते चेहरे त्यांना नको आहेत.पद्मश्रींना आता नवा चेहरा हवाय आणि त्यासाठी प्रतिक्षा सुरू आहे.
दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय आवटे सकाळमध्ये गेल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून पुढारीचे कार्यकारी संपादकपद रिक्त आहे.सध्या आवटेंचा पदभार अनिल टाकळकर यांच्याकडे देण्यात आला असला तरी पुढारीचे मालक नव्या कार्यकारी संपादकाच्या शोधात आहेत. पुढारीला नवा चेहरा नाही सापडल्यास कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक मुकूंद फडके यांची पुणे आवृत्तीसाठी नियुक्ती होवू शकते.

''जागृती'' येतोय...

होय,जागृती येतोय...पण वृत्तपत्र नव्हे न्यूज चॅनल येतोय.तेही मराठीत.येत्या १५ दिवसांत हे चॅनल सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.पुण्याच्या एका पॉश एरियामध्ये जागृती चॅनलच्या स्टुडिओचे काम पुर्ण झाले असून,यंत्रसामुग्री बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जागरण ग्रुपचा या चॅनलशी कसलाही संबंध नाही.पुण्याच्या एका उद्योगपतीचे हे चॅनल आहे.पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये मारीगोल्ड बिल्डींगमध्ये या चॅनलचे स्टुडिओ आहे.मुंबईत ब्युरो ऑफीस करण्यात आले आहे.
प्रिंट मीडियात अनेक वर्षे काम केलेले संजीव शाळगावकर हे चॅनलचे संपादक आहेत.सहारा,मुंबईची जुनी टीम या चॅनलमध्ये जॉईन झाली असून,राज्यात अनेक ठिकाणी रिपोर्टर नेमण्यात आले आहेत.मंगळवारी सर्व रिपोर्टरची बैठक पार पडल्याचे एका रिपोर्टरने कळविले आहे.येत्या दहा दिवसांत काम पुर्ण करा,असा आदेश मालकाने दिला आहे.खरे तर हे चॅनल दिवाळीपुर्वीच सुरू होणार होते,पण यंत्रसामुग्री वेळेत न आल्यामुळे चॅनलचे लॉचिंग लांबणीवर पडले आहे.राज्यातील अनेक केबल ऑपरेटरशी या चॅनलने करार केला असून,डिश टीव्हीवर प्रक्षेपण होणार असल्याचेही हा रिपोटरने कळविले आहे.याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मराठी वृत्तपत्रांमध्ये "सकाळ'' अव्वल

प्रादेशिक वृत्तपत्रांतही "टॉप फाईव्ह'मध्ये समावेश
देशातील प्रादेशिक वृत्तपत्रांतील एकाच आवृत्तीचा सर्वाधिक खप असणाऱ्या "टॉप फाईव्ह' वृत्तपत्रांमध्ये "सकाळ' पुणेने (रोज साडेपाच लाखांहून जास्त प्रती) स्थान पटकावले आहे. "आरएनआय'च्या 2013-14 च्या अहवालानुसार सर्वाधिक खपाच्या 10 वृत्तपत्रांत मराठीतील "सकाळ'हे एकमेव दैनिक आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे असूनही देशात वृत्तपत्रांची वाढ 9.99 टक्के या वेगाने होत असल्याचे व दरवर्षी त्यात किमान साडेपाच हजार वृत्तपत्रांची भर पडत असल्याचेही हा अहवाल सांगतो. त्याचप्रमाणे सर्वांत जास्त प्रकाशने प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ठरले आहे. दैनंदिन वृत्तपत्र वितरणात आघाडीवर असलेल्या सहा भाषांत मराठीने पाचवे स्थान पटकावले आहे.
देशातील वृत्तपत्रांच्या नोंदणीचे सर्वाधिकार असलेल्या "आरएनआय' म्हणजेच "रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स इन इंडिया'च्या "प्रेस इन इंडिया' या ताज्या अहवालातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. "आरएनआय'च्या 2013-14 च्या अहवालानुसार हिंदी व इंग्रजी वृत्तपत्रे वगळता मराठीतील एकमेव "सकाळ'चा क्रमांक (रोज 5 लाख 51 हजार 465 प्रती) पहिल्या पाचांत आहे. आनंदबाझार पत्रिका (11, 81, 112), अहमदाबादमधील "गुजरात समाचार' (5, 62, 405) ही वृत्तपत्रे आघाडीवर आहेत. वर्तमान (कोलकता) व "सकाळ'पाठोपाठ तमिळनाडूतील तंती, हैदराबादचे इनाडू, जालंधरचे अजित, भुवनेश्‍वरचा संवाद, मल्याळम मनोरमाची कोची आवृत्ती, बंगळूरूतील प्रजावाणी कन्नडा व जम्मूच्या उडान (उर्दू) या वृत्तपत्रांचा क्रमांक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
या अहवालानुसार गेल्या वर्षात नोंदणीकृत हिंदी-इंग्रजी वृत्तपत्रांची संख्या 13,761; तर नियतकालिकांची संख्या 85, 899 पर्यंत वाढली आहे. राज्यवार माहितीनुसार उत्तर प्रदेश (15,209) पाठोपाठ महाराष्ट्रात (13 375) सर्वाधिक वृत्तपत्रे व नियतकालिके प्रकाशित होतात. भाषक वृत्तपत्रांबाबत हिंदी व इंग्रजी पाठोपाठ मराठीने (7155) क्रमांक राखला आहे.
सर्वाधिक आवृत्त्या व सर्वाधिक खप याबाबतीत हिंदीतील भास्कर (35 आवृत्त्या) व इंग्रजीतील "टाईम्स ऑफ इंडिया' (29 आवृत्त्या) ही दोन वृत्तपत्रे अग्रस्थानी आहेत. आनंदबाझार पत्रिकेने देशातील सर्व भाषांत सर्वाधिक प्रती असलेल्या दैनिकांत अव्वल स्थान पटकावताना "टाईम्स' (मुंबई-दिल्ली आवृत्त्या) व हिंदुस्तान टाईम्स (दिल्ली) यांना मागे टाकले आहे. हिंदीत पंजाब केसरी व नवभारत टाईम्स ही सर्वाधिक खपाची दैनिके ठरली आहेत. एकूण दैनिकांपैकी हिंदी वृत्तपत्रांचे दैनिक वितरण 12 कोटी 66 लाख 09, 253 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्रजी दैनिकांचा खप जवळपास सव्वातीन कोटी व उर्दू दैनिकांचे वितरण पावणेतीन कोटींच्या आसपास आहे. मराठी दैनिकांनी या यादीतही 1 कोटी 28 लाख 11, 512 इतका खप नोंदवून पाचवा क्रमांक मिळविला आहे.
'आरएनआय'च्या अहवालाचे प्रकाशन माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. "आरएनआय'चे संचालक एस. एम. खान यांच्या म्हणण्यानुसार देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांची ही यादी त्या वृत्तपत्रांनी सादर केलेला वार्षिक लेखाजोखा (ऍन्युअल रिटर्न) आधार मानून तयार करण्यात आली आहे.
वाढ आनंददायी
वृत्तपत्रांच्या त्यातही भाषिक वृत्तपत्रांच्या वितरणात होणारी वाढ अत्यंत आनंददायी असल्याचे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "सकाळ'ला सांगितले. वृत्तवाहिन्यांचा प्रभाव जास्त वाटत असला तरी विश्‍वासार्हतेबाबत वृत्तपत्रांचेच स्थान अबाधित असल्याचे निरीक्षण नोंदवून जावडेकर म्हणाले, ""काही वृत्तवाहिन्या एकच दृश्‍य 500-500 वेळा दाखवतात हे लोकांच्या लक्षात येऊ लागले आहे. वृत्तपत्रे नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शी व ऑनलाइन करण्यात येणार असून, "आरओएनआय' संकेतस्थळही अधिक अत्याधुनिक बनविण्यात येईल.'

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

प्रहारच्या संपादकपदी मधुकर भावे

मुंबईः बेरक्याचे भाकीत खरे ठरले...प्रहारच्या संपादकपदाची सुत्रे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आज (बुधवारी) स्विकारली. मंगळवारीच ते प्रहारचे संपादकीय सल्लागार नारायण राणे आणि छोटे मालक नितेश राणे यांच्या बरोबर प्रहारच्या कार्यालयात येवून गेले होते. त्यावेळी छोट्या मालकांनी त्यांना काही कानपिचक्याही दिल्या. बाहेर जसे समाजकारण आणि राजकारण चालते तसे प्रहारमध्ये देखील सुरु आहे, त्यावर इलाज करण्यासाठी तुम्हीच आता गोळ्या किंवा इंजेक्शन द्या! असे ते म्हणाले होते. भावे आता कोणाकोनावर इलाज करतात ते पाहूयात. मंगळवारी जाता त्यांनी अँकरला नाथा भाऊंची स्टोरी दिली होती. तेंव्हाच भावे लवकरच जॉईन होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते.

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

देवेंद्रपर्व सुरू होताच नागपूरच्या पत्रकारांची दुकानदारी सुरू

नागपूरचे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले,याचा सर्वाधिक आनंद नागपूरच्या पत्रकारांना झाला आहे.मुख्यमंत्र्यासोबतचे जुने फोटो काढून ते फेसबुकवर अपलोड केले जात आहेत.अश्या किती पत्रकारांना मुख्यमंत्री ओळखतात,हा भाग वेगळा परंतु गेल्या काही दिवसांपासून विपरीत ऐकावयास मिळत आहे.
नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनसंपर्क दांडगा होता,यात शंका नाही.त्यांचे पत्रकाराबरोबरचे संबंधही मित्रत्वाचे होते,मात्र मुख्यमंत्र्यासोबत जुने संबंध असलेल्या काही पत्रकारांनी आता दुकानदारी सुरू केली आहे.मुख्यमंत्र्यासोबत आपले थेट संबंध असून,आपले काही काम असेल तर सांगा,असे ते लोेकांना सांगू लागले आहेत.मुंबईत दुकानदारी करणारे पत्रकार आणि नागपूरात दुकानदारी करणा-या पत्रकारांंचे सूत जमले असून,ते आता जनतेला टोप्या घालण्याचे काम करू शकतात.अश्या पत्रकारांपासून मुख्यमंत्र्यांनी दूर राहण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर दौरा करून अनेक ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या आहेत.यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांच्यासोबत फोटो काढले आहेत.यात नाविण्य काहीच नाही. आमदार असताना फडणवीस यांचे फोटो अनेक पत्रकारांजवळ असू शकतात.याचा अर्थ मुख्यमंत्री त्यांना ओळखतात,असे नव्हे.
पत्रकार मुख्यमंत्र्यांना ओळखणारे असले तरी,मुख्यमंत्री किती पत्रकारांना ओळखतात,हा प्रश्नच आहे.
मुख्यमंत्र्यासोबत आपले संबंध आहेत,असे सांगून जर कोणी जनतेला गंडवत असेल तर बेरक्याला थेट berkya2011@gmail.com मेल करा...अश्या पत्रकारांना उघडे करण्याची जबाबदारी बेरक्याची राहील.

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

'लोकमत'मध्ये मंत्र्यांचा परिचय करून देताना,त्यांच्या जातीचा उल्लेख ...

जात नाही ती जात...!
पण पेपरवाले सुद्धा जात सांगत असतील तर?

'लोकमत'मध्ये मंत्र्यांचा परिचय करून देताना,त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.
हे `जात गणित` का प्रकाशित केले असावे?
या पुढच्या टप्प्यात शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांचा सुद्धा
ते `असाच` परिचय करून देणार आहेत का? 

मराठी माणसांचा जातीचा उल्लेख. पण प्रकाश मेहता - गुजराती भाषक, विद्या ठाकूर - उत्तर भारतीय. आणि मागासवर्गीय आणि आदिवासी असे बाकी दोघांचे उल्लेख... असे अर्धवट कशामुळे? 
तो का आणि कशासाठी ? यातून काय साधायचे आहे ? तरूण पिढीने याचा काय अर्थ काढावा ? आपण 17 व्या शतकात नाही,हे दर्डांना कोण तरी समजावून सांगा रे...
मंत्र्यांच्या जातीचा उल्लेख केल्याबद्दल लोकमतचा मी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे.
'लोकमत'मध्येही जातीपातीचे राजकारण चालते का ?


Dainik Lokmat

फेसबुक वर शेअर करा

Facebook