> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०१५

इंडियन एक्स्प्रेसने केली कर्मचाऱ्यांची फसवणूक


शनिवार, ७ फेब्रुवारी, २०१५

दैनिक तरुण भारतच्या मालकिणीला काढण्याचे डेस्क इन्चार्जचे प्रयत्न सुरु

बेळगाव येथील दैनिक तरुण भारतच्या मुंबई आवृतीच्या संपादक पदाचा नरेंद्र कोठेकर यानी राजीनामा दिल्यानंतर डेस्क इन्चार्जसह त्याच्या कंपूत आनंदाचे वातावरण आहे। ....
संपूर्ण मुंबई आवृत्ती आपल्या हातात आली याचा गवगवा या डेस्क इन्चार्जने सुरु केला आहे पण त्याच्या या आनंदावर विरजन पडले असून मालक किरण ठाकुर यांची मुलगी सई ठाकुर यानी चार्ज हाती घेतला आहे। .यामुळे आतून नाराज झालेल्या या डेस्क इन्चार्जने मालकीण सई ठाकुर यांचा अपप्रचार बाहेर सुरु केला आहे।
ज्याला पत्रकारितेचा गंध नाही असा बॉस असल्यावर आवृत्ती लवकरच बंद पडणार असा अपप्रचार या डेस्क इन्चार्जने बाहेर सुरु केला आहे। … तसेच बेळगाव येथील सीईओचे देखील कान भरने सुरु आहे.

.................................................


समृद्ध जीवन कंपनी मुंबई से मराठी और हिंदी में अखबार शुरू करने जा रही है। महेश मोतेवार की यह कंपनी लाईव इंडिया और मी मराठी चैनल चला रही है। इस कंपनी का प्रजातंत्र लाईव नामक दैनिक नोएडा से निकलता है। डी एन ए के वाईस प्रेजिडेंट आदर्श मिश्रा ने समृद्ध जीवन पब्लिकेशन में बिज़नेस हेड के रूप में दो फरवरी से कामकाज संभाल लिया है। मार्च के पहले सप्ताह में मिश्रा मराठी दैनिक मराठी बाना लांच करने की योजना बना रहे हैं जबकि हिंदी दैनिक प्रजातंत्र लाइव मार्च के अंत में शुरू होगा। वरली के मी मराठी कार्यालय में इन अख़बारों के लिए साक्षात्कार चल रहे है।
मिश्रा इसके पहले लोकमत ,इंडियन एक्सप्रेस ,आनंद बाजार पत्रिका में वरिष्ठ प्रबंधन में काम कर चुके है।

महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ”सुरु करा..

महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ”सुरु करा - जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र 

मुंबई : पत्रकारितेतील अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी,पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्याना तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये,वृत्तपत्र सृष्ठीचे आध्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने “ पत्रकारिता विद्यापीठ “सुरु झाले पाहिजे अशी मागणी जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

मा. मुंख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात दिलेल्या निवेदनात नारायण पांचाळ यांनी पत्रकारिता विध्यापिठाच्या स्थापनेची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील पत्रकारीतेचे विविध पैलू, संशोधन व प्रशिक्षण या सर्वाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये “ पत्रकारिता विद्यापीठ “स्थापन झाले पाहिजे हि काळाची गरज आहे.अन्य राज्यात पत्रकारिता विध्यापीठे सुरु आहेत, महाराष्ट्र तर सर्व संपन्न असा प्रदेश आहे. मध्यप्रदेशात भोपाळ इथे “माखनलाल चतुर्वेदी “ पत्रकारिता विश्वविध्यालय स्थापन केले आहे,या विश्वविध्यालयाने पत्रकारिता क्षेत्रात आपला नावलौकिक निर्माण केला आहे. सध्या आपल्याकडे अनेक विश्वविध्यालयांमध्ये पत्रकारित!,मास कमुनिकॅषन शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे,परंतु अत्याधुनिक सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे इच्छुक विध्यार्थ्यांना या शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जावे लागते. हि सोय सुविधा इथेच सुरु झाल्यास इथल्या पत्रकारिता विध्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. या विश्वविध्यालयाचे नाव “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर”असेच ठेवले पाहिजे कारण जांभेकर हे मराठी वृतपत्र सृष्ठीचे जनक आहेत असे पांचाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

याचबरोबर, महाराष्ट्रामध्ये “प्रेस अकादमी” स्थापन झाली पाहिजे.अशी मागणी नारायण पांचाळ यांनी मा. मुख्यमत्री महोदयांकडे केली आहे.व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून पत्रकारांना समृद्ध करणे तसेच त्यांना आधुनिक ज्ञानाची माहिती मिळावी याकरिता “प्रेस अकादमी”असणे महत्वाचे आहे.नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यात “प्रेस अकादमी”सुरु आहे.या प्रेस अकादमीच्या माध्यमातून पत्रकारांना अप डेटेड जागतिक स्तरावरील माहिती उपलब्ध होइल. संदर्भ ग्रंथ मिळू शकतात तसेच नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करता येतील.अशा प्रेस अकादमीच्या स्थापनेसाठी आम्ही गेली २-३ वर्षे झगडत आहोत परंतु शासन लक्ष देत नसल्याची खंत श्री नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली आहे. १९९२ मध्ये नासिक येथे शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली “press institute”लाखो रुपये खर्च करून आजपर्यंत पडूनच आहे जनतेचा पैसा वाया जाऊ नये म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात फुढाकार घेण्याची विनंती केली होती पण त्याकडे दुर्लक्ष केले, साधी चौकशी सुद्धा केली नाही, दिवसेंदिवस वृत्तपत्राचे प्रमाण वाढत आहे तशी पत्रकारांची संख्याही वाढत चालली आहे त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न, अडी अडचणी अधिकाधिक निर्माण होत आहेत,कंत्राटी पद्धतीमुळे पत्रकाराच्या भविष्यातील कामाची कोणतीच हमी उरली नाही. राज्य शासनाने अशा वर्गाला “राष्ट्रीय असंघटीत कामगार” कायद्यानुसार लाभधारक ठरवून सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ घेण्यास पात्र म्हणून घोषित करावे अशी विनंती श्री नारायण पांचाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

ई माध्यमांसाठीही पुढील वर्षापासून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-मुख्यमंत्री

मुंबई - विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांची सामाजिक सुरक्षा महत्वाची आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य शासनाने पावले उचलली असून पत्रकारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर पुढील वर्षासाठीच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ई-माध्यमांसाठी स्वतंत्र पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात राज्य शासनाच्या लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार तसेच गेल्या तीन वर्षातील विविध गटातील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संसदीय कार्य मंत्री गिरीष बापट, माहिती व जनसंपर्क विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महासंचालक चंद्रशेखर ओक, लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते लक्ष्मण जोशी, विजय कुवळेकर, दिनकर रायकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे वृत्त संचालक शिवाजी मानकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्याला ज्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो त्यामुळे त्या पुरस्काराची आणि पुरस्कारार्थीची उंची वाढत असते. लोकशाहीला सुदृढ करण्याचे काम माध्यमं करीत असल्याने लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व अधोरेखीत होते. त्यामुळे जबाबदारीतही वाढ होते. हल्लीचा काळ हा बातमी मुल्याचा आहे. मात्र ते करीत असतांना पत्रकारीतेतील शाश्वत मुल्यांची जपणूक करणे महत्वाचे आहे. पत्रकार हा कधीच पुरस्कारासाठी काम करीत नसतो. आपल्याला मिळणारे पुरस्कार हे स्वमुल्यमापनासाठी असतात. आपण ज्या मार्गाने वाटचाल करीत आहोत तो मार्ग योग्य आहे हे मिळालेल्या पुरस्काराने शिक्कामोर्तब होते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
पत्रकारितेचे व्रत जोपासताना पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेची जबाबदारी महत्वाची आहे. त्यासाठी राज्य शासनाने पत्रकारांना पेन्शन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत ज्येष्ठ पत्रकारांच्या सुचना विचारात घेऊन एक समग्र योजना तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले असून आता सोशल मिडीया आणि
ई- माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या नविन माध्यमांनी लोकांपर्यंत पोच वाढविली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांमध्ये ब्लॉग तसेच अन्य ई माध्यमांसाठी एक स्वतंत्र पुरस्कार देण्यात येईल. 2014 या वर्षाचे पुरस्कार आम्ही याच वर्षी प्रदान करू आणि पुढील वर्षापासून पत्रकारिता पुरस्कारासाठी नामनिर्देशनाची सोय देखील करण्यात येईल. याद्वारे एखादा पत्रकार किंवा व्यक्ती अन्य दुसऱ्या पत्रकाराचे पुरस्कारासाठी नामनिर्देशन करु शकेल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार विजेते श्री. जोशी  मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या पुरस्काराला मिळालेला प्रतिसाद पाहून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे नामकरण पुरस्कार महोत्सव केला तर वावगे ठरणार नाही.  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कुठलीही माहिती लपून राहात नाही. माध्यमांनी शासनाच्या विधायक कामांकडे देखील लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून ग्रामीण भागातील पत्रकारांनी विकासात्मक पत्रकारितेकडे लक्ष देण्याचे आवाहनही श्री. जोशी यांनी यावेळी केले.
श्री. कुवळेकर म्हणाले की,  मला मिळालेला हा  जीवनगौरव पुरस्कार माझ्या उर्वरित आयुष्यात अजून गौरवास्पद काम करावे यासाठी आहे असे मला वाटते. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून सगळ्यांचा आहे असे सांगून श्री. कुवळेकर म्हणाले की, आज मराठी माध्यमांमधील मराठी भाषा पाहून चिंता वाटते त्याकडे लक्ष दिले पाहिजे आणि माध्यमांनी आपला वैचारिक  उदारमतवाद वाढवला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. 
श्री. रायकर म्हणाले की, पत्रकारांनी राज्याचे, देशाचे हित सांभाळणारी पत्रकारिता केली पाहिजे. राज्य, देशाविषयी आपुलकी  जोपासणारी पत्रकारिता करावी.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभाचे नामकरण आम्ही पुढील वर्षापासून `पुरस्कार वितरण महोत्सव` असे करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन माहिती विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर म्हणाल्या की, माध्यमांनी शासनाच्या विधायक कार्याची दखल घेऊन  विकास पत्रकारीता जोपासावी. सन 2014 या वर्षातील पुरस्कार येत्या सहा महिन्यात देण्याचे आम्ही नियोजन केले आहे, असेही श्रीमती म्हैसकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक महासंचालक श्री. ओक यांनी केले. ते म्हणाले की,  जनता आणि शासन यांच्यात समनव्यक   म्हणून माहिती व जनसंपर्क विभाग कार्य करत असतो. आज माहिती तंत्रज्ञानाचा काळ आहे. माहिती व जनसंपर्क विभागही अचूक आणि गतीने माहिती देण्याचे कार्य करत असतो परंतु, माहिती तंत्रज्ञानाचा काळात अत्याधुनिक साधनाची गरज आहे त्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार हा शाबासकीची थापच नाही तर एक ऊर्जा, स्फुर्ती, उत्साह देणारा आहे, असे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेत्यांचे प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करतांना
श्री. दाचेवार यांनी सांगितले. यावेळी जान्हवी सराटे यांनाही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य अभिजीत घोरपडे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, अन्य माध्यमांप्रमाणेच सोशल मिडीयाचा विस्तार पाहता त्या माध्यमासंही पुरस्कार देण्यासंदर्भात  सकारात्मक  विचार करावा.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार व लोकशाही वार्ताचे संपादक लक्ष्मण त्र्यंबकराव जोशी (2011), ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (2012) आणि लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर (2013) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्याचबरोबर वर्ष 2011,2012 आणि 2013 चे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. रोख रकमेसह, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2011  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) बीडच्या दै. झुंजार नेताचे विशेष प्रतिनिधी शेख रिजवान शेख खलील यांना (51 हजार रुपये); बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) दै.लोकमत  समाचारचे, जळगांव प्रतिनिधी श्री.मुकेश रामकिशोर शर्मा यांना (41 हजार रुपये);  यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,  मुंबई  येथील उपसंपादक, श्री. इरशाद लतिफ बागवान यांना  (41 हजार रुपये);  पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार तरुण भारतचे मुंबई  ब्युरो चीफ, श्री.नागेश सुदर्शनराव दाचेवार यांना (41 हजार रुपये); तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार दै.सकाळचे कोल्हापूर येथील वरिष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार श्री.भिकाजी ज्ञानू चेचर यांना (41 हजार रुपये);  दादासाहेब पोतनीस पुरस्कार,नाशिक विभाग, दै.लोकसत्ताच्या,नाशिक  प्रतिनिधी,  श्रीमती चारुशीला कुलकर्णी यांना (51 हजार रुपये,यापैकी 10 हजार रुपये दैनिक गावकरी यांनी  (पुरस्कृत); अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), दिव्य मराठी, औरंगाबादचे  विशेष प्रतिनिधी श्री.रवी रामभाऊ गाडेकर यांना (41 हजार रुपये); आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग, ठाणे येथे महाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ उपसंपादक श्रीमती अमिता शैलेश बडे यांना  (41 हजार रुपये); नानासाहेब परूळेकर पुरस्कार,पुणे विभाग, श्री.गणेश बाळासाहेब कोरे, बातमीदार, दै.सकाळ ॲग्रोवन,(41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार,कोकण विभाग, दै.लोकमतचे, रत्नागिरी  तालुका प्रतिनिधी,श्री. शिवाजी नामदेव गोरे (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग,  महाराष्ट्र टाईम्सच्या कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमती जान्हवी आनंद सराटे (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग,अकोला येथील दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक, श्री.नरेंद्र भीमराव बेलसरे यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार,नागपूर विभाग,दै.लोकमतचे, नागपूर येथील  उपसंपादक श्री.मिलिंद किर्ती यांना (41 हजार रुपये).
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2012  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), दै. दिव्य मराठी, सोलापूरचे बातमीदार, श्री.म.युसूफ अ.रहिम शेख, (51 हजार रुपये), अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी), पुणे येथे  दै.सकाळ टाइम्सचे  विशेष प्रतिनिधी, श्री.शाश्वत गुप्ता रे, (41 हजार रुपये), बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी), हिंगोली येथील दै.भास्करचे  जिल्हा प्रतिनिधी, श्री.राकेश सुदामाप्रसाद भट्ट, (41 हजार रुपये), मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार (उर्दू), दै.इन्कलाबचे  मुंबई येथील पत्रकार श्री.जमिर अहमद खाँन जलिल अहमद खाँन, (41 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी)(मा. व ज.), सांगली येथील माहिती अधिकारी, श्री.सखाराम राऊ माने, (41 हजार रुपये), पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, रत्नागिरी येथील टी.व्ही. 9 चे ब्युरो चीफ,  श्री.मनोज प्रभाकर लेले, (41 हजार रुपये),  तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील दै.प्रहारचे छायाचित्रकार, श्री.अतुल मोहन मळेकर, (41 हजार रुपये), केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (मा.व ज.), पुणे, विभागीय माहिती कार्यालयातील छायाचित्रकार, श्री.नितीन उत्तमराव सोनवणे (41 हजार रुपये)
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.भिलाजी दिगंबर जिरे वार्ताहर, दै.सकाळ, धुळे आणि श्री.नवनाथ दिघे, प्रतिनिधी, दै.दिव्य मराठी, अहमदनगर यांना विभागून (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार,औरंगाबाद विभाग (लातूरसह), बीड येथील दै.तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी, श्री.भास्कर लक्ष्मण चोपडे  (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, मुंबई येथील येथे दै.लोकमतचे  वरिष्ठ प्रतिनिधी श्री.जमीर दाऊद काझी, (41 हजार रुपये),नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.मोहन मारुती मस्कर -पाटील,वार्ताहर, दै.लोकमत, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग, उपसंपादक, तरुण भारत, बेळगाव, श्री.रामकृष्ण महिपत खांदारे यांना (41 हजार रुपये), ग.गो.जाधव पुरस्कार,कोल्हापूर विभाग, कोल्हापूर येथील दै.ॲग्रोवनचे बातमीदार,श्री.राजकुमार बापुसाहेब चौगुले यांना  (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती  विभाग, बुलडाणा येथील दै.पुण्यनगरीचे उपसंपादक, श्री.सचिन बलदेव लहाने, (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील  दै.लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक श्री.चंद्रशेखर बोबडे यांना (41 हजार रुपये).
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - 2013  बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी), पुणे येथील दै. सकाळचे विशेष प्रतिनिधी   श्री. ज्ञानेश्वर पांडुरुंग बिजले, (51 हजार रुपये), यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शासकीय गट (मराठी) (मा. व ज.), औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी, श्री. रामचंद्र विठ्ठल देठे यांना  (41 हजार रुपये),  पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार, अमरावती येथील जय महाराष्ट्र न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी श्री.प्रशांत जगनराव कांबळे, (41 हजार रुपये),तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार, मुंबई येथील आफ्टरनूनचे  श्री.सुशील भोरु कदम, (41 हजार रुपये) 
दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग, श्री.अनिकेत वसंत साठे, प्रिन्सिपल करस्पाँन्डंट, लोकसत्ता, नाशिक, (51 हजार रुपये), अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद विभाग (लातूरसह), श्री.हरी रामकृष्ण तुगांवकर, बातमीदार, दै. सकाळ, लातूर, (41 हजार रुपये), आचार्य अत्रे पुरस्कार,मुंबई विभाग, (41 हजार रुपये), मुंबई लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी  श्री. संजय कृष्णा बापट, (41 हजार रुपये), नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग, श्री.शैलेंद्र अशोकराव पाटील, बातमीदार, दै. सकाळ, सातारा यांना (41 हजार रुपये), शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग,श्री. संतोष पेरणे, जिल्हा वार्ताहर, दै. पुण्यनगरी, रायगड, (41 हजार रुपये), ग. गो. जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग, श्रीमती जान्हवी सराटे, प्रतिनिधी, दै.महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर यांना  (41 हजार रुपये), लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग, अमरावती येथील येथे  दै. दिव्य मराठीचे  प्रतिनिधी, श्री.सतीश ज्ञानेश्वर भटकर, यांना (41 हजार रुपये), ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग, नागपूर येथील दै.लोकमतचे उपसंपादक श्री.चंद्रशेखर गिरडकर यांना (41 हजार रुपये)
दीपप्रज्वलन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने समारंभास सुरूवात झाली. सोहळ्यास पुरस्कार निवड समितीचे सदस्य, माध्यम प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच पुरस्कारार्थी पत्रकारांचे कुटुंबिय उपस्थित होते. संचालक शिवाजी मानकर यांनी आभार मानले.  
                                                    0 0 0 0 0

रविवार, १ फेब्रुवारी, २०१५

चाटूगिरीसाठी अमरावतीच्या पत्रकारांना मंत्र्याची फॉरेन ट्रिप, घरांची ऑफर

माझी चाटूगिरी करा. मी पदावर असे पर्यंत विरोधात बातम्याबाजी करू नका. मला काही कळत नसले तरी माझा उदोउदो करा. असे करणाऱ्या पत्रकाराला फॉरेन ट्रिप आणि दरवर्षी पाच पत्रकारांना घरं देण्याची ऑफर एका मंत्र्याने अमरावतीच्या पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे या मंत्र्याची  चाटूगिरी करण्यासाठी अमरावतीचे अनेक पत्रकार सरसावले आहेत . 
मूळात हे मंत्री बिल्डर आहेत. त्यांची इंजिनीयरिंग, मॅनेजमेंट, पॉलिटेक्निक अशी अनेक कॉलेजेस आहेत. बिल्डर मधून मंत्री पदाच्या काळात या मंत्र्याला आपल्या टाऊनशीप साठी आऊट ऑफ द वे जाऊन नकाशे आदी मंजूर करून घ्यायचे आहेत. इतकेच नव्हे तर  मंत्री म्हणूनही एमआयडीसी आदी उद्योगांमध्ये फायदा करून घ्यायचा आहे.
 हे मंत्री आधीपासूनच करोडपती आहेत. लक्ष्मी बळाच्या जारोवरच त्यांनी स्थािनक स्वराज्य संस्था मतदार संघातून निवडणूक लढवली व विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून केले. गडगंज पैसा असल्यानेच त्यांची मंत्री मंडळात वर्णी लागली. मंत्री होण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष आधीपासून फिल्डिंग लाऊन ठेवली होती. आता मंत्री झाल्यानंतर करोडपती वरून अरबपती कसे होता येईल, याचे प्लानिंग हे मंत्री  करीत आहेत
त्याला पत्रकारांची साथ मिळणे गरजेचे आहे. विरोधात बातम्या छापून आल्या नाहीत तर चौकशी, तक्रारी आदी भानगडी होणार नाही म्हणून हे मंत्री पत्रकारांना फॉरेन ट्रिपची खुली ऑफर एका पत्रकार परिषदेत दिली. इतकेच नव्हे तर पत्रकार परिषद आटोपल्यानंतर त्यांनी घरांचीही ऑफर दिली. दरवर्षी पाच पत्रकारांना घर देण्याची ऑफर त्यांनी दिली आहे. या मंत्र्याच्या  सकारात्मक प्रसिद्धीच्या लिस्ट मध्ये काही खास पेपर आहेत. त्यात लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी यांचा समावेश आहे.
अमरावतीच्या तपोवन लैंगिक छळ प्रकरणी अतिउत्साहाच्या भरात बातम्या छापल्याने लाेकमतचा जिल्हा प्रतिनिधी गणेश देशमुख याच्या विरूद्ध बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीची ओळख नाव, गाव, पत्त्यासह उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा खर तर अजामिनपात्र आहे. परंतु देशमुखने मंत्र्यापुढे असे काही लोटांगण घातले की पोलिसांनी समोर असलेल्या गणेशला अटक करणे टाळले. आता या गणेशने कोर्टातून अंतरिम जामिनही मिळवला आहे. गणेश वरील या उपकरामुळे या मंत्र्याचे  लोकमत मधील काम फत्ते झाले आहे. त्यामुळे या मंत्र्याच्या विरोधात लोकमतला बातम्या येण्याचा प्रश्नच नाही.
आता उरला प्रश्न दिव्य मराठीचा तर तेथील एक चाटू पत्रकार सध्या हे मंत्री कसे ग्रेट आहेत याचे गुणगान अख्ख्या गावात गात आहे. त्यामागे ट्रिप व घर हाच उद्देश नाही तर त्यापुढे दोन पावले जाऊन दूरगामी लाभाच्या योजना आहेत. त्याचे पुढच्या पाच वर्षाचे प्लानिंगच त्याने केले आहे.
कमी खप असलेल्या पण स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या हिंदूस्थान, जनमाध्यम, लोकशाही वार्ता, अमरावती मंडल, वृत्त केसरी, प्रतिनिधी अखबार आणि हिंदी भास्करची काळजी घेण्याची ग्वाही या मंत्र्यानि  दिली आहे. त्यामुळे या दैनिकांना आपल्या बाजूने वळवण्याची मोहिमही यांनी फत्ते केली आहे. परंतु यापेक्षाही लोकमत, दिव्य मराठी, आणि पुण्यनगरी या तीन  प्रमुख पेपर मध्ये आपल्या जास्तीत जास्त चांगल्या, कौतूक करणाऱ्या बातम्या छापून आणण्याचे या  मंत्र्याचे मुख्य टार्गेट आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook