महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ”सुरु करा..

महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता विद्यापीठ”सुरु करा - जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र 

मुंबई : पत्रकारितेतील अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी,पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्याना तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये,वृत्तपत्र सृष्ठीचे आध्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने “ पत्रकारिता विद्यापीठ “सुरु झाले पाहिजे अशी मागणी जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

मा. मुंख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात दिलेल्या निवेदनात नारायण पांचाळ यांनी पत्रकारिता विध्यापिठाच्या स्थापनेची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील पत्रकारीतेचे विविध पैलू, संशोधन व प्रशिक्षण या सर्वाचा विचार करता महाराष्ट्रामध्ये “ पत्रकारिता विद्यापीठ “स्थापन झाले पाहिजे हि काळाची गरज आहे.अन्य राज्यात पत्रकारिता विध्यापीठे सुरु आहेत, महाराष्ट्र तर सर्व संपन्न असा प्रदेश आहे. मध्यप्रदेशात भोपाळ इथे “माखनलाल चतुर्वेदी “ पत्रकारिता विश्वविध्यालय स्थापन केले आहे,या विश्वविध्यालयाने पत्रकारिता क्षेत्रात आपला नावलौकिक निर्माण केला आहे. सध्या आपल्याकडे अनेक विश्वविध्यालयांमध्ये पत्रकारित!,मास कमुनिकॅषन शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे,परंतु अत्याधुनिक सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे इच्छुक विध्यार्थ्यांना या शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जावे लागते. हि सोय सुविधा इथेच सुरु झाल्यास इथल्या पत्रकारिता विध्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. या विश्वविध्यालयाचे नाव “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर”असेच ठेवले पाहिजे कारण जांभेकर हे मराठी वृतपत्र सृष्ठीचे जनक आहेत असे पांचाळ यांनी निवेदनात म्हटले आहे.

याचबरोबर, महाराष्ट्रामध्ये “प्रेस अकादमी” स्थापन झाली पाहिजे.अशी मागणी नारायण पांचाळ यांनी मा. मुख्यमत्री महोदयांकडे केली आहे.व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून पत्रकारांना समृद्ध करणे तसेच त्यांना आधुनिक ज्ञानाची माहिती मिळावी याकरिता “प्रेस अकादमी”असणे महत्वाचे आहे.नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यात “प्रेस अकादमी”सुरु आहे.या प्रेस अकादमीच्या माध्यमातून पत्रकारांना अप डेटेड जागतिक स्तरावरील माहिती उपलब्ध होइल. संदर्भ ग्रंथ मिळू शकतात तसेच नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करता येतील.अशा प्रेस अकादमीच्या स्थापनेसाठी आम्ही गेली २-३ वर्षे झगडत आहोत परंतु शासन लक्ष देत नसल्याची खंत श्री नारायण पांचाळ यांनी व्यक्त केली आहे. १९९२ मध्ये नासिक येथे शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली “press institute”लाखो रुपये खर्च करून आजपर्यंत पडूनच आहे जनतेचा पैसा वाया जाऊ नये म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात फुढाकार घेण्याची विनंती केली होती पण त्याकडे दुर्लक्ष केले, साधी चौकशी सुद्धा केली नाही, दिवसेंदिवस वृत्तपत्राचे प्रमाण वाढत आहे तशी पत्रकारांची संख्याही वाढत चालली आहे त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न, अडी अडचणी अधिकाधिक निर्माण होत आहेत,कंत्राटी पद्धतीमुळे पत्रकाराच्या भविष्यातील कामाची कोणतीच हमी उरली नाही. राज्य शासनाने अशा वर्गाला “राष्ट्रीय असंघटीत कामगार” कायद्यानुसार लाभधारक ठरवून सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ घेण्यास पात्र म्हणून घोषित करावे अशी विनंती श्री नारायण पांचाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.