> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, ३० मार्च, २०१५

मी मराठी लाईव्ह लवकरच पुण्यात

पुणे - मुंबईनंतर मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्राची दुसरी आवृत्ती पुणे येथून लवकरच सुरु होत आहे. त्यासाठी संपादक माचकर यांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस शंकरशेठ रोडवरील वेगा सेंटर या इमारतीतील दुसर्‍या मजल्यावरील कार्यालयात या मुलाखती पार पडल्या.  पुढील आठवड्यात आणखी काही जणांच्या मुलाखती पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीत एक-दोन सिनिअर सोडले तर बहुतांश प्रशिक्षणार्थी व शिकाऊ उमेदवारांनीच हजेरी लावली.
मुंबई येथून प्रकाशित होणारे मी मराठी लाईव्ह या वृत्ताचा अंक सेम टू सेम मटाचाच कॉपी वाटतो. पुण्यात जेव्हा सकाळ, लोकमत अन् पुढारीची चलती असताना महाराष्ट्र टाईम्स हा पूर्णपणे अपयशी ठरला. पुणेकरांनी मटाला स्वीकारले नाही. मुळात तेथे नवीन प्रयोग करायला काही संधी नसतानाच निवासी संपादक पराग करंदीकरदेखील काही चुणूक दाखवू शकले नाहीत.  त्यात मुंबईतीलच मटाची कॉपी असलेला अंक मी मराठी लाईव्हचे संपादक माचकर पुण्यात देतील, की सकाळ, लोकमत, पुढारीसारखे काही नवे प्रयोग करून पुणेकरांना आपलेसे करतील, याबाबत उत्सुकता आहे. पुण्याबाहेरील काही प्रयोगशील लोकांना आवर्जुन सोबत घेण्याची भूमिका माचकर यांनी घेतली असल्याचे दिसत असले तरी पुण्यातील ज्येष्ठांना हेरण्याचे कामदेखील त्यांच्याकडून सुरु असल्याचे कळते. साधारणतः मेपूर्वी हे वृत्तपत्र पुण्यात पदार्पण करेल, असा अंदाज आहे.

गुरुवार, २६ मार्च, २०१५

वारे, चांगल्या समाजासाठी...

चांगल्या समाजासाठीच्या चॅनलवर सध्या एक अर्धनग्न मुलींचा प्रोमो दाखवला जातोय..
डीश टी.व्हीवर आणि एरटेलवर टी.व्ही.9 दिसायला लागल्यानं अण्णा चांगलेच खूश झालेत.. त्यामुळे थेट या मिनीस्कर्टमधल्या पोरींना घेऊन आमचा चॅनल कोणत्या नंबरवर दिसतो. हे सांगणारा प्रोमो सारखा दाखवला जातोय.. प्रोमोचा शेवटही मजेशीर आहे.. एका मुलाच्या खांद्यावर हात ठेवणा-या या मुली चांगल्या समाजासाठी असंही म्हणतात...
भोजपुरी चॅनेलच्या हिरोईन्सही लाजल्या हा प्रोमो पाहून.. चॅनेलला चेहराच नसल्यानं हे असे उद्योग करावे लागतात..

बुधवार, २५ मार्च, २०१५

नगरच्या नानासाहेब लोखंडे यांना Tv 24 ने फसवले

सर
 टी.व्ही. २४ ने ३ सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यासाठी करस्पॉन्डंट म्हणून नियुक्ती केली. तत्पुर्वी माझेकडून सेक्युरिटी डिपॉझीट ५० हजार रूपये घेतले. २० हजार रूपये फिक्स पेमेंट व प्रती स्टोरी 1000 रूपये देऊ, असे सांगितले. एक महिना पुर्ण झाला. मी पगार मागितला. त्यावर मला सांगितले कि आपला चँनल नवीन आहे तुमचे पगार प्रोसेस चालू आहे. दुसरा महिना पुर्ण झाला, मी परत पगाराची मागणी केली. त्यावर मला सांगितले, तुमच्या न्यूजची लिस्ट तयार करून पाठवा. मी लिस्ट पाठवली. परत तीन- चार दिवसांनी मँनेजमेंटला कॉल केला, त्यांनी सांगितले कि तुमची न्यूज लिस्ट पेमेंट मंजुरीसाठी पाठली आहे. त्यानंतर मी परत कॉल केला. मात्र माझे कॉल उचलण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात झाली. माझे आय.डी. कार्ड व नियुक्तीपत्र वर्ष बदलल्यानंतर नुतनीकरण करून दिले नाही. त्यामुळे मी काम बंद करत असल्याचे सांगत डिपॉझीट व पेमेंटची मागणी केली मगं मात्र माझा कॉल कट केला. आता माझा कॉल सुद्धा घेत नाहीत. मला टी.व्ही.२४ कडून चार महिन्यात एक रूपया सुद्धा पगार मिळाला नाही. काल समजले कि त्यांनी नवीन प्रतिनिधी नेमला आहे. त्याला पण माझ्यासारखेच आश्वासन दिले आहे. आज वकिल मित्राला भेटलो. त्यांनी सांगितले तुम्हाला चंदिगढ कोर्टात केस दाखल करावी लागेल. चार महिन्यात जवळपास दिड लाखाला चुना लागला आहे. चंदिगढला जाऊन केस दाखल करणे शक्य वाटत नाही. पगाराच्या भरोशावर उसनवारी केली. दाद मागण्याच्या दृष्टीने जर काही पर्याय असेल तर कृपया सुचवा, मी ते करिन. मी पोळलो तेथे जाऊन अजून कोणी पोळू नये. हे भामटे सांगतात आम्ही काढून टाकले. काही त्यावर विश्वास ठेवतात. माझ्या बाबतीतही तेच घडले. मला काढून टाकले असल्याचे दुसर्यास सांगितले. पण, पगार न मिळाल्याने मीच टी.व्ही. २४ सोडला आहे. मी टी.व्ही.२४ ला धडा शिकवू इच्छितो. मित्रांनो कृपया मला कायदेशीर मार्गदर्शन करा.
आपला विश्वासू
नानासाहेब लोखंडे

९६२३१७६६१५/७०४०२८२०५१

नगर अपडेट ...


नगर पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक रामदास ढमाले येत्या मेपासून स्वतःचे दैनिक सुरु करणार आहेत . पुण्यनगरीचे एक निवासी संपादक, देशदूतचे एक माजी कार्यकारी संपादक यांच्यासह स्थानिक चांगल्या पत्रकारांची टीम सोबत घेऊन हे दैनिक बाजारपेठेत येणार आहे.

नगर उत्तर जिल्ह्यातील अग्रगण्य दैनिक असलेल्या सार्वमतला अद्यापही दक्षिणेत पाय रोवता आले नाहीत. त्यामुळे आता हे दैनिक दक्षिणेत स्वतंत्र आवृत्ती काढत आहे. एकाच जिल्ह्यात या दैनिकाच्या प्रती दोन वेगवेगळ्या किमतीत विकल्या जात आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासून सार्वमत आता स्वतःच्या जागेत बोल्हेगाव एमआयडीसी येथे जाणार असून, त्यामुळे कमी पगारात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे.  दक्षिणेत जम बसविण्यासाठी चांगल्या निवासी संपादकाचा संपादक नंदकुमार सोनार यांच्याकडून शोध सुरु आहे.

शास्तेंच्या वाड्यावरून

आघाडीच्या मराठी पेपरांची सध्या पीछे हाट सुरु आहे आणि ती कशामुळे हे काही केल्या कळत नाही. मालक परेशान म्हणून संपादक देखील चेहऱ्यावर वैचारिक टेन्शन दाखवण्याचा अभिनय करण्यात एव्हाना तरबेज झालेच आहेत. काही तरी बदल केला पाहिजे असे रोज म्हणायचे
आणि रोज बैठका, जोर बैठका घेवून घाण पेपर काढायचा असे सुरु आहे.
थोडक्यात मालक अन संपादक मिळून आपापले पेपर बुडवताहेत… आपल्याला काय शेठजींच्या कुरणात अनेक बैल चरून गेले, आजदेखील चरत आहेत… त्यात आपण देखील अंमळ पुढे सरकून चरून घ्यावं…
हेकु सुपारी कातरत सांगत होते.त्यांची सुपारी एकदाची फुटली असे म्हणतात. पाच सहा महिन्यात ते समूह संपादक होतील. मुंबईचेच संपादक व्हायचे होते तर थेट समूहाची सुपारी फुटली ….
नाशिक क्षेत्र तसे दहावे तेरावे घालण्यासाठी प्रसिद्ध.तेरावे घालणारे हेकु समूहाला कुठला अभिषेक घडवतात याचा अंदाज नाही. पण त्यांच्या अडकित्त्यात एकाचवेळी अनेक सुपार्या असतात. समूह सम्पादक पदाची सुपारी तर त्यांनी फोडलीच आणि आणखी एक सुपारी कातरली ती अशी- तसे हे सिक्रेट ऑफ स्माल थिंग्ज म्हणा.…
पुण्याला जाते म्हणून ऑफिसातली साहित्य अकादमी फेम अल्टो संध्याकाळी निघाली आणि नाशकातल्याच ताजला जावून थांबली. अगदी पहाटेपर्यंत. ताजला म्हणे मालक होते मोठे मुक्vकामाला. सुपारी कातरून झाली तसे सांगून झाले हेकुंचे.त्यांच्या दुधात जितके पाणी असायचे तितकेच लिखाणात, पण सुपारी हेच हेकुंचे बलस्थान. आता हेच बघा ना, सुपारी कातरत ताज उभा करतांना एकाच अडकित्त्यात किती सुपार्या वाजवल्या हेकुंनी. मालकाची अन आल्टोची पण…

आता आपण फक्त लढ म्हणा...


आय.टी.अ‍ॅक्ट ६६ अ रद्द झाल्यामुळं बेरक्याच्या लेखणीला आणखी धार येणार आहे.आमचा गेल्या चार वर्षापासून जो लढा सुरू आहे,तो अधिक यशस्वी होणार आहे.आता आपण फक्त लढ म्हणा...
जगाला शहाणपण शिकवणारे आणि उपदेशाचे डोस पाजणारे तथाकथित पत्रपंडित प्रत्यक्षात कसे आहेत,हे सांगण्याचे धाडस फक्त बेरक्याने केले आहे.त्याचा बुरखा टराटरा फाडला आहे.आता हे काम अधिक धाडसाने होणार आहे.
बेरक्या कोणाला घाबरत नाही,किंवा घाबरला नाही.परंतु पोलीसांना हाताशी धरून किंवा त्यांच्यावर दबाब आणून बेरक्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात आला.पोलीस दबाबावला बळी पडून आय.टी.अ‍ॅक्टचा दुरूपयोग करतील,अशी नकळत कुठे तरी किंचित भीती होती.आम्हाला जेलमध्ये जाण्याची भीती नव्हती,पण बेरक्या ब्लॉग पोलीस बंद करतील,अशी भीती होती.त्याचबरोबर बेरक्याला माहिती देणारेही यामुळं घाबरत होते.
आता घाबरण्याचे कारण नाही.आता बिनधास्त माहिती कळवा.आपले नाव नेहमीप्रमाणे गुप्त ठेवले जाईल.
चला मीडियातील घाण साफ करू या....
चांगल्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू या...
बेरक्या सदैव आपल्या पाठीशी आणि सोबत आहे...

- बेरक्या उर्फ नारद

मंगळवार, २४ मार्च, २०१५

कोरडकर यांची हकालपट्टी की राजीनामा...

मुंबई -जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे नागपूर ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर यांची चॅनलमधून हकालपट्टी...
चॅनलने माझी हकालपट्टी केली नाही,मी स्वत:हून राजीनामा दिलाय..
.नागपूरचे प्रशांत कोरडकर यांचा लेखी खुलासा...
- मी स्वत:ची मीडिया सव्र्हीस सुरू केली - कोरटकरलोकसत्ता नव्हे फेकसत्ता


आजचा कुबेराचा लोकसत्ता पाहिला का ? कसे पाहणार ? खपच कमी झाला आहे तर पाहणार कुठून...
असो,आजच्या लोकसत्तामध्ये पान एकवर बॅनर बातमी प्रकाशित झाली आहे.
> गृहराज्यमंत्र्यांच्या मालमत्तेची गुप्त चौकशी...
त्यात गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या ऐवजी चक्क आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचा फोटो छापण्यात आलाय...
आता बिचा-या सावंतांनी कुबेराचे काय घोडे मारले ?
आता लोकसत्ता खराच फेकसत्ता झालाय राव ...
...
http://epaper.loksatta.com/465488/indian-express/25-03-2015…

"सुनील जाधव यांची व्यथा त्यांचाच शब्दात ''


सर मी "सुनील जाधव "

जय महाराष्ट्र वाहिनी मध्ये गेली दोन अडीच वर्षे पासून ठाणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. गेले तीन वर्षा पासून मी ठाण्यासह कल्याण,डोंबिवली, भिवंडी , उल्हास नगर अबरनाथ या ठीकानच्या हि बातम्या माझ्या ऑफिसला पाठवत आहे .मात्र या ठिकाणी जाण्यासाठी मला गाडी देण्याचे सागितले होते मात्र नवीन चैनल असल्याने मला गाडी देऊ शकले नाही त्यांही मला प्रवास खर्च देणार असल्याचे सागितले होते २ वर्ष त्यांही मला प्रवास खर्च व पगार नियमित दिला त्या नंतर कार्यालयात बदल झाल्याने नवीन टीम आली सुरवातीला जाती वाचक अडचणी त्यांही निर्माण केल्या मला मुद्दामून त्रास देणे सुरु केले मात्र तरीही मी माझे काम नियमित करत राहिलो शेवटी वयक्तिक राग काढण्य साठी मी ऑफिसला पाठवलेली बिले इनपुट हेड आनद गायकवाड हे माझे पाठवलेले बिल त्याचे कडे ठेवत व माझा प्रवास खर्च देत नसत कधी करी एखाद्या महिन्याचे बिल जिथे ५ हजारचे आहे तिथे २ हजार देत असे त्या नंतर कार्यालयातून गेल्या काही महिन्या पासून पूर्ण पाने हा प्रवास खर्च थांबण्यात आला हे प्रवास खर्च मिळत नसल्याने मला बातमी घटनास्थळी जाऊन बातमी कवर करणे शक्य होत नसायचे त्याच बरोबर बातमी पाठवण्यास लागणारे नेट बंद असल्याने मला बातमी पाठवणे आवगड जात होते तरी मी या परिस्थितीवर मात करत ९ महिने माझ्या स्वताच्या खर्चाने काम केले ९ महिन्या नंतर माझी आर्थिक परीस्थिती अत्यंत हालाकीची झाली त्या मुळे मला माझे काम बंद करण्यास भाग पडले आहे . याबाबत मी मैलच्या माध्यमातून वेळोवेळी ऑफिस मध्ये माहिती दिली या विषयी मी वरिष्ठांशी वेळोवेळी फोन वर हि बोललो त्या माझ्या ऑफिस कडून कोणत्याच प्रकारे मदत मिळाली नाही अखेरीस मी नोव्हेबर मध्ये पूर्ण महिना काम करून शेव्च्या दिवशी मध्ये माझे काम बंद केले त्या नंतर व काम सोडनार असल्याचे ऑफिसला कळवले जसे ऑफिसला मी काम सोडण्याचे समजले त्यांही मी मेहनत केलेल्या नोव्हेबर पासून आज गत मला पगार दिला नाही , नाही माझा प्रवास खर्च दिला pf सुद्धा दिला नाही मी गेले तीन महिन्या पासून अनेख मैल केले फोन वर बोललो ऑफिस मध्ये जाऊन हाथ जोडले तरी मला कोणत्याच प्रकारची मदत माझ्या कार्यालयातून मिळाली नाही आता मी सर्व प्रयत्न करून थकलो कोर्टात जाण्याचा विचार केला मात्र आता वकिलाची फीज देण्या करिता सुद्धा माझ्या कडे पेंसे उरले नाही कारण मी गेले ३ महिन्या पासून बेरोजगार आहे मला दुसर्या चैनल मध्ये कामास बोलवले होते मात्र जय महाराष्ट्र चैनल मधून मला लागणारे दस्तावेद देण्यात आले नसल्याने मला त्या ठिकाणी काम मिळाले नाही म्हणून मी आता येत्या १५ दिवसात जय महाराष्ट्रच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यास बसणार आहे तरी आपल्या कडून मला सहकार्य व मार्गदर्शन दयावा हि विनंती सोबत मी कश्या प्रकारे काम केले आहे त्याचा फोटो देखील पाठवत आहे
आपला विश्वासू
सुनील जाधव

09324373320 09664747470

अरेरे, 'मटा'कडून बातम्यांची चोरी-मारी, उचलेगिरी!

जळगावात 'महाराष्ट्र टाईम्स'चे काही खरे राहिलेले नाही. तुमचा पेपर फुकटातही नको, असे सांगत अनेक वाचकांनी कन्नी काटली आहे. वर्गणी स्कीम संपल्यानंतर तर आता 'मटा' शहरात दिसेनासा झाला आहे. बातम्यांचा सुमार दर्जा अन शहराशी, जिल्ह्याशी कनेक्ट नसलेला अंक यामुळे 'मटा' कधी खान्देशच्या मातीशी नाळ जुळवूच शकला नाही. अंक सुरू झाल्यापासून एकदाही हे दैनिक शहरात चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेले नाही.
 
'मटा'चे जळगावातील संपादकीय प्रमुख हे उपरे असून बाहेरगावहून (मनमाड) रेल्वेने अप-डाउन करतात तर महत्त्वाचा भाग असलेले क्राईम रिपोर्टर हेही बाहेरगावचेच(अमळनेर)! संपादकीय प्रमुखांची सारी शक्ती ही ये-जा करण्यातच वाया जाते. त्यात घरी लवकर परतायचे म्हणून त्यांची नोकरी ही जणू सरकारी नोकरीच!! 11 ते 7!!! सातच्या आत रेल्वे स्टेशन!! त्यात सागवान घोटाळा, घरकुल घोटाळा, पालिका घोटाळा अशा सर्व शहरातील वाचकांच्या मागणीचा भाग असलेल्या बातम्यात 'जैन'नगरीबाहेरचे (जळगावला 'जैन'नगरीही गमतीने म्हटले जाते!) प्रमुख कमी पडतात. या बातम्या 'मटा'त अगदी किरकोळ पद्धतीने छापून येतात. त्यात ही 'सेटिंग' वाचकांना काही पसंद पडत नाही. (सेटिंग म्हणजे ले-आऊट व रचना; गैरसमज नको!)  'मटा'चे निवासी संपादक हे जळगावचे जावई असूनही या दैनिकाला स्थानिक चेहरा-मोहरा मिळता मिळत नाहीये!!
 
अलीकडे तर चक्क इतर वर्तमानपत्रात आदल्या दिवशी प्रसिद्ध झालेल्या बातम्या 'मटा'मध्ये नंतर प्रसिद्ध होतात!! ठीक आहे कदाचित डेडलाईन लवकर असेल रात्री दहाची ... पण आदल्या दिवशी इतर वृतपत्रांनी आतील पानात छापलेली बातमी 'मटा' दुसऱ्या दिवशी चक्क स्पेशल एंकर म्हणून छापतेय ...
 
जावईबुवा, पाहा जरा... आणि हे 'अपडाऊन' जरा थांबवा... तिकडे 'भास्कर'वाल्यांचा नियम आहे; ज्या ठिकाणी नोकरीचे स्थान असेल त्याच मुख्यालयी घर, अप-डाउन वैगेरे असेल तर त्यांचे 'शटर डाउन'!! कशी कराल बाबा स्पर्धा?? 
 
मूळ 'सकाळ'ची बातमी : १९ मार्च - http://epaper.esakal.com/sakal/19Mar2015/Enlarge/Jalgaon/JalgaonToday/page4.htm
'मटा'ने केलेली कॉपी : २० मार्च - http://epaperbeta.timesofindia.com/index.aspx?EID=31831&dt=20150320

नाशिकमधील माध्यमांनी दाबला शिवसेना नेत्याचा 204 एकर जमीन घोटाळा

नाशिकचे  शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी मातोरी गावातील शेतकऱ्यांची,  गावातील 204 एकर जमीन खोटे कागदपत्र तयार करून लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत काल, 23 मार्च रोजी नाशकात मोठे आंदोलन झाले. मात्र, नाशिकमधील माध्यमांनी हे महत्त्वाचे प्रकरण चक्क दडपून टाकले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी कॅमेरा व बूम घेवून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातोरी गावातील शेतकऱ्यांनी कुटुंबासह केलेल्या ठिय्या आंदोलनाला उपस्थित होते. त्यांनी सारे शूटिंगही केले, बाईटस घेतले. मात्र, बातमीचे 'दर्शन' काही कोणत्याच वाहिनीवर झाले नाही. एव्हढे महत्त्वाचे प्रकरण देशदूत, सकाळ, लोकसत्ता आदी स्थानिक वृत्तपत्रांनी उचलून धरले. मात्र, मुंबईच्या एका 'स्मार्ट' दैनिकाने त्याची एकही ओळ छापली नाही. या दैनिकाचे कार्यकारी संपादक पूर्वी 'सेने'चे शिलेदार असल्याने त्यांचे सर्वच सेनापतींशी अत्यंत 'सौहार्दपूर्ण' संबंध आहेत. त्यामुळे ते अनेकदा लोकहिताच्या, महत्त्वाच्या बातम्यांनाही 'जय महाराष्ट्र' करून मोकळे होतात. या 'स्मार्ट' वृत्तपत्राची बांधिलकी वाचकांशी आहे की सेनापतींशी ?? 
 
१५० शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून जमीन बळजबरीने लाटण्याच्या प्रकाराचा विरोध केला, ही टीव्हीवाल्यांसाठी बातमी होवू शकत नाही? 'सेटिंग' किती असावी याला काही मर्यादा? बरे खालची मंडळी 'सेट' होत असतील; पण 'वरची' मुंबईतील धोरण ठरविणारी आणि नियोजन करणारी मंडळी मात्र 'कोरडे' राहूनही 'बदनाम' होतात.  बाजारभावाने 200 कोटींची जमीन फक्त दोन कोटीत लाटली गेली. 2 टक्के म्हटले तरी 'सबखूष' व्यवहारांवर चार कोटी उधळणे सहज शक्य आहे!! अरे पण तुम्ही वाचकांना, दर्शकांना कधी खूष करणार? 
 
एका दिवसात 300 शेतकऱ्यांची सब-रजिस्ट्रार कार्यालयात व्यवहार नोंद शक्य आहे का? तसा चमत्कार या व्यवहारात घडलाय. एकाच दिवसात 300 शेतकरी 'रेकॉर्ड' केले गेले. एरव्ही सामान्य खरेदीसाठी कुणी सर्वसामान्य नागरिक गेला तर त्याला संपूर्ण दिवसभर ताटकळत ठेवले जाते. सब-रजिस्ट्रार कार्यालयात कसेबसे रोज 20-25 व्यवहार नोंद होतात. तिथे 300 व्यवहारांची एकाच दिवसात नोंद अशी दहा पट धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नाशिक सब-रजिस्ट्रार कार्यालयाचा तर मुख्यमंत्र्यांनी सत्कार करायला हवा. त्यांच्या कार्याक्षमतेच्या टीव्ही मीडियाने बातम्या करायला हव्यात.. 
 
शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि माजी खासदार प्रताप दादा सोनावणे यांची मुलगी सोनिया सोनावणे यांच्यावर जमीन बळकावण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला तरीही टीव्हीवाल्यांसाठी बातमी होत नाही. अरेरे, या 'महाराष्ट्र'च्या पत्रकारितेचा 'टाईम्स'च खराब आलाय!!!
 
 

कृषीवलची चोरी उघड

अलिबाग - एम.एम.देशमुख पाठोपाठ संजय आवटे गेल्यापासून कृषीवल दैनिकाला उतरती कळा लागली आहे.इतर दैनिकात आलेले लेख चक्क अग्रलेख म्हणून छापण्यात येत आहेत.लाखभर पगार घेणारे संपादक असे चोरून अग्रलेख छापत असतील तर वाचक या दैनिकास 'केरा'ची टोपली दाखवत असतील तर वाचकांचे चुकले कुठे ?
केरकर साहेब,कृषीवलाचा असा केर करू नका....

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे बेरक्याकडून स्वागत

नवी दिल्ली: सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे बेरक्याने स्वागत केले आहे.यामुळे बेरक्याला आता आणखी धडाकेबाज कामगिरी करता येणार आहे.
फेसबूक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भातील आयटी अॅक्टचं कलम 66 अ कोर्टानं रद्द ठरवलं आहे. या अक्टनुसार आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर त्वरीत अटकेची कारवाई केली जात होती.
आता हे कलम कोर्टाने रद्द करत, नेटिझन्सचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवलं आहे. तसंच कोणत्याही पोस्टबाबत पोलिसांना तातडीने अटक करता येणार नाही.

सोमवार, २३ मार्च, २०१५

गौर से देखिये इस शख्स को...

औरंगाबाद :गौर से देखिये इस शख्स को... इसे कहते हैँ स्वयंघोषित संपादक. नागपुर के सेठ ध्यान दीजिये नहीं तो एक दिन साहब खुद की मालिक समझकर बैठेंगे...

रविवार, २२ मार्च, २०१५

बेरक्याचे पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण

मित्रानो,,२१ मार्च रोजी गुढी पाडवा होता.याच दिवशी बेरक्या सुरू होवून चार वर्षे पुर्ण झाली.
काय योगायोग होता...२१ मार्च रोजी गुढी पाडवा येणे,हा दुग्धशर्करा योग होता.त्या दिवशी मी गावाकडे गेलो होतो,त्यामुळं अपडेट करता आले नाही.परंतु त्याची कल्पना अगोदरच दिली होती.
असो,बेरक्याने अगोदरच मराठी मीडियात उंच गुढी उभा केली आहे.आता ही गुढी इतकी उंच गेली आहे की,विरोधकांना तिथंपर्यंत पोहचणे अशक्य आहे.बेरक्याला अडचणीत आणण्याचा अनेकांनी प्रयत्न गेले,परंतु त्यांचे हे प्रयत्न वाया गेला.बेरक्या सर्व अडचणीवर मात करून आपल्या सेवेत हजर आहे.
बेरक्या चांगल्यांचा मित्र आणि वाईटांचा कर्दनकाळ आहे.बेरक्याने या चार वर्षात अनेक चांगले आणि वाईट अनुभव घेतले.यातून बरेच काही शिकता आले.
स्वत:ची लढाई ही स्वत: लढाईची असते,हे आम्हाला माहित आहे,ज्यांनी मदत केली त्यांचे आभार,जे आम्हाला विसरले त्यांना देव सद्बुध्दी देवो...
पाचव्या वर्षात पदार्पण करताना एकच संकल्प...
बेरक्या आम्ही जिवंत असेपर्यंत सुरू राहणार...

होय,बातमी खरी आहे....

एबीपी माझाच्या निलेश खरे यांचा राजीनामा...मी मराठीच्या वाटेवर...
कंपनीचे धोरण...मासिक ३५ ते ४० हजार पगारच्या पुढे असणा-यास नारळ देणार...
फक्त संपादकास एक लाख, बाकीचे ३५ ते ४० हजारच्या आत...
त्याची सुरूवात खरेपासून...
अँकर प्रसन्न जोशी यास पण राजीनामा देण्यास सांगिण्यात आल्याचे वृत्त...अद्याप दुजोरा नाही....

.................................

मुंबई -जय महाराष्ट्रमध्ये गळती सुरूच...पगार होताच तिघांनी दिला राजीनामा...पगार वेळेवर होत नाही,हेच दिले कारण...

शनिवार, २१ मार्च, २०१५

अरे कुठे नेवून ठेवला आहे,बेळगाव तरूण भारत माझा ?

बातमीत 'बात' असावी 'मी' पणा नसावा,असे विद्याथ्र्यांना उपदेशाचे धडे देणा-या किरण ठाकूर यांच्या बेळगाव तरूण भारतमध्ये काहीही घडू शकते.पहिल्या पानावरील एका क्राईम बातमीत एक महिला चिफ रिपोर्टर स्वत: पोलीस अधिका-यासारखे चौकशी करीत असल्याचा फोटो प्रसिध्द करण्यात आला आहे. आता याला आपण काय म्हणाल ? अरे कुठे नेवून ठेवला आहे,बेळगाव तरूण भारत माझा ?
ज्यात "बात" असते आणि "मी" नसतो त्याला "बातमी" असे म्हणतात हे पत्रकारितेचे बेसिक आहे. पण अलीकडे अनेक पत्रकारांना त्याचा विसर पडला आहे. बातमी कसलीही घडो बातमीला मूल्य कमी आपला फोटो कसा छापून येईल याची प्रत्येकाला पडलेली. परवा बेळगावात सोनसाखळी चोरीची घटना घडली. सगळ्या वृत्तपत्रांनी हि बातमी प्रसिद्ध केली. पण "तरुण भारत"ने काय केले बघा. ज्या महिलेची सोनसाखळी चोरीला गेली तिचा फोटो आपल्या चीफ रिपोर्टरच्या फोटोसकट पहिल्या पानावर छापला. या लिंक मध्ये रडणाऱ्या स्त्रीच्या मागे ज्या गोगल लावलेल्या म्याडम दिसत आहेत त्याच त्या चीफ रिपोर्टर. बातमीपेक्षा फोटोच जास्त हायलाईट कसा होतो ते बघा. हा घ्या पुरावा..
http://epaper.tarunbharat.com/
शुक्रवार दि.20 मार्च 2015, पान 1

बेळगाव तरूण भारत 

गुरुवार, १९ मार्च, २०१५

धक्कादायक आणि आश्चर्यकारक!


"जग जिंकायला निघालेल्या" मोहिमेतील; राजकीय बित्तमबातमीची धुरा जणू आपणच फक्त सांभाळतो अशा भ्रमातील; फुटीरतावादी-संत्र्याच्या प्रदेशातील एका गोऱ्या-गोमट्या आशिकवीराची ही कहाणी!
हे महोदय पूर्वी कोठेतरी 'बाळ गंगाधर टिळक लोकशक्ति'त होते. जग जिंकतांना मध्ये एकदा भरकटून पुन्हा जग जिंकायला आले. आता त्यांना जणू 'फणसा'चे काटे बोचायला लागले आहेत. त्यांना "जय जय महाराष्ट्र" अशी साद घालावीशी वाटतेय. त्यासाठी त्यांनी त्यांच्यासारख्याच देखण्या, गोऱ्या-गोमट्या व "राष्टवादी" विचारांच्या ठाण्यातील "संघर्ष"वीराला प्रथम साद घातली. ठाणेकरांनी डायरेक्ट "बारामतीच्या राजा"शी संपर्क साधला. काकांनी स्वतः डान्सबारवाल्या शेठला फोन केला व "जग जिंकायला निघालेल्या" विदर्भवीराला "जय महाराष्ट्र" गौरवगान म्हणू द्यावे, असे सांगितले. त्याला राजकीय फडात दौडू द्यावे, असेही फर्मान "साहेबां"नी सोडले. मात्र "जगन्नाथ"भक्त असलेले डान्सबारवाले शेट्टी (सॉरी शेठ!) फ़क्त बघतो म्हणून निसटले. कुणालाही कसे "जय महाराष्ट्र"गान म्हणू द्यायचे? आणि "आशि" कशी ही शि"ष"टाई? "जाधवी" (सॉरी यादवी!) माजलीय का कुणीही कुणाचीही कुठेही शिफारस करायला? प्रत्यक्ष काकांनी फोन करून फर्मान सोडले तरी शेठ बधले नसल्याने विदर्भवीराचे अरमान मात्र चूर-चूर झालेत!


जाता - जाता :
 20 तारीख उजाडली तरी जय महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत...सर्व कर्मचारी आर्थिक अडचणीत....तरीही लांबे गेल्यामुळे अनेक जण जय महाराष्ट्रमध्ये जाण्यास इच्छुक

बुधवार, १८ मार्च, २०१५

शैलेश लांबे यांना जय महाराष्ट्रमधून डच्चू...

मुंबई - जय महाराष्ट्र चॅनलमधून कार्यकारी संपादक शैलेश लांबे यांना अखेर डच्चू....
> लांबेला जय महाराष्ट्रमधून डच्चू मिळताच सर्वच विभागातील कर्मचा-यांनी केला आनंदोत्सव...काहींनी तर केक कापला... 
> विलास आठवले सर्वेसर्वा...
> विलास आठवले जय महाराष्ट्रमधे रुजू झाल्यापासून लांबे गटाचे बुरे दिन सुरु झाले होते.
> जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर' या ओळींप्रमाणे लांबेला मिळाले फळ...

मंगळवार, १७ मार्च, २०१५

महाराष्ट्रनामा

> सकाळ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक भूषण देशपांडे; संजीव साबडे यांना नारळ

> 'सकाळ'च्या खान्देश आवृत्तीतही मोठे फेरफार; व्यवस्थापक अनिल जोशी राजीनाम्यानंतर 'देशदूत'चे महाव्यवस्थापक. मुंबई 'लोकमत'चे बालचंदर 'सकाळ' खान्देश आवृत्तीचे महाव्यवस्थापक म्हणून रुजू...

> धुळे 'सकाळ'चे जाहिरात व्यवस्थापक कैलास सोनवणे यांचा तडकाफड़की राजीनामा घेतला...


> 'जय महाराष्ट्र न्युज'चे अहमदनगरचे जिल्हा प्रतिनीधी राजेन्द्र त्रिमुखे यांचा चॅनल'ला 'जय महाराष्ट्र..'

दै. सांजवातच्या निवासी संपादकपदी प्रफुल्ल फडके

पनवेल येथून प्रकाशित होणार्‍या कर्नाळाचे स्थापनेपासून संपादक राहिलेल्या प्रफुल्ल फडके यांनी सातारा येथून प्रकाशित होणार्‍या सांजवात या दैनिकाच्या निवासी संपादकपदाची सूत्र हाती घेतली आहेत.

दिलीप तिवारी यांच्या विषयी लोकमतचा खुलासा आणि तिवारी याचं निवेदनदिलगिरी व्यक्त करायची लाज का वाटली ???
मित्राहो !
काल लोकमतने प्रसिध्द केलेल्या एका बातमीत माझा नामोल्लेख होता. त्याविषयी मी तीव्र आक्षेप घेतल्यावर संपादक मिलिंद कुळकर्णी यांनी वरील खुलासा प्रसिध्द केला आहे. माझे व्यक्तिगत या खुलाशाने समाधान नाही. माझा मुद्दा आहे की, संघटना किंवा झुंडशाही करून कोणी काहीही निवेदन कलेक्टर, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना दिले तर छापणार का ? मला अटक व्हावी, मला हद्दपार करावे असे कोणते कृत्य मी केले ? ते सिध्द झाले आहे का ? मिलिंद कुळकर्णीकडे त्याची माहिती आहे का ? या प्रश्नांची उत्तरे न शोधता संपादक जेव्हा उथळपणे जबाबदारी निभावतो आणि त्याला आपण केलेल्या कृत्याची दिलगिरी व्यक्त करायची लाज वाटते तेव्हा त्या माध्यमाचे पतन होते असे मी एमसीजे अभ्यासक्रमात शिकलो. मला तेथे गोल्डमेडल मिळाले आहे. आणि हो, मी तो अभ्यासक्रम उमवीतून केला आहे. मिलिंद कुळकर्णीचा खुलासाही हा असाच आहे. मी हा विषय लोकमत व्यवस्थापना पर्यंत पोहचवला असून मी सुध्दा संधी मिळेल तेव्हा निनावी पत्राचा आधार घेवून संबंधित संपादकाविषयी बातमी छापणार आहे. नंतर वरील भाषेत खुलासा करुन दिलगिरी व्यक्त करायचा विचार करु...
(टीप - काल निवेदन न घेता मिलिंद कुळकर्णी लोकमतच्या शहर कार्यालयातून निघून गेल्यानंतर मी श्री चोपडासाहेब (जळगाव), श्री हेमंत कुळकर्णी (नाशिक), विजय बाविस्कर (औरंगाबाद), श्री रूषीबाबू दर्डा यांना सर्व प्रकिर कळवला आहे)

Dainik Lokmat 

शनिवार, १४ मार्च, २०१५

फेसबुकवरून केशव कुलकर्णी गायब

मुंबई - फेसबुकवर केशव कुलकर्णी नावाने बोगस अकौंट काढून महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील मंडळीची बदनामी करणारा रंंगिला औरंगाबादी अखेर उघडा आहे.हा केशव कुलकर्णी म्हणजे पद्मश्रीच्या पेपरमध्ये काम करणारा रंगिला औरंगाबादी असल्याचही उघड झाले आहे.
रंगिला औरंगाबादी अगोदरच मनोरूण्ण.त्यात महाराष्ट्राच्या मानबिंदूतून हकालपट्टी झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर आणखीच परिणाम झाला आहे.दोन दोन दिवस एका बंद खोलीत स्वत:ला कोडवून घेणे,फेसबुकवर बोगस अकौंट काढून सहकार्याची बदनामी करणे,असे उद्योग रंगिलाचे सुरू आहेत.
गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर केशव कुलकर्णी नावाच्या बोगस अकौंटवर महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या सुर्यदेवसह अनेकांची बदनामी सुरू होती.त्यामुळे त्याची सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली होती.मात्र त्यापुर्वीच रंगिलाने केशव कुलकर्णी नावाचे अकौंट बंद केले.
हे अकौंट रंगिलाच चालवत असल्याचे आता उघड झाले असून,महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील सर्व मंडळी रंगिलाविरूध्द एकवटली आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मराठा दैनिक काढणार आहेत.या दैनिकाच्या संपादकपदासाठी रंगिला कृष्णकुंजवर जावून आला.परंतु रंगिलाच्या कृष्णलिला राज ठाकरे यांना समजल्यामुळे त्याचा पत्ता कट झाला.हा पत्ता सुर्यदेवामुळे कट झाल्यामुळे रंगिला अधिकच चिडला आहे आणि त्याने बदनामीची ही मोहीम आखली होती.मात्र त्याच्याच अंगलट आले आहे.
आता रंगिलाने व्हॉटस् अ‍ॅपवर एक पोस्ट लिहिली असून,ती दिवसेंदिवस व्हायरल होत आहे.बेरक्याच्या हातातही ही पोस्ट लागली आहे.परंतु त्यात बदनामीकारक मजकूर असल्यामुळे प्रसिध्द करण्यात आलेला नाही.

मंगळवार, १० मार्च, २०१५

मनोज सांगळे सांजवार्ताच्या निवासी संपादकपदी रूजू

औरंगाबाद - सागर प्रकाशनच्या औरंगाबाद आणि जालना येथून प्रसिद्ध होणाèया सायंदैनिक सांजवार्ताच्या निवासी संपादकपदी अपेक्षेप्रमाणे मनोज सांगळे यांची नियुक्ती झाली असून, बेरक्याने सहा दिवसांपूर्वीच तसा अंदाज वर्तवला होता. सांजवार्तात उपसंपादक, मुख्य उपसंपादक आणि आता निवासी संपादक म्हणून त्यांची तिसरी इqनंग सुरू झाली आहे. याचबरोबर ते सर्वांत तरुण संपादक ठरले आहेत. ते सकाळ, लोकमतचे उपसंपादक राहिले आहेत. सांजवार्तात येण्यापूर्वी त्यांनी जळगाव सकाळमध्ये शहर टूडेची एकखांबी जबाबदारी गेले काही महिने सांभाळली होती. मराठवाड्यातील अग्रगण्य फिचर-न्यूज एजन्सी मीडिया प्लसचे ते कार्यकारी संचालक राहिले आहेत.

रविवार, ८ मार्च, २०१५

महाराष्ट्रनामा... ( Update 13/3/2015 Time 9.25 pm )

> चांगल्या समाजासाठी मराठी चॅनल सध्या कनिष्ठ कर्मचा-यांसाठी पिळवणुकीचं केंद्र बनलाय. चॅनलमध्ये सीनियर प्रोड्युसर पदावरचे त्रिमूर्ती काहीही काम न करता फक्त उंटावरून शेळ्या हाकतात. कर्मचा-यांची मानसिक पिळवणूकही केली जाते. नाममात्र पगारात अनेक कर्मचा-यांना हा त्रास सहन करत काम करावं लागतं. चॅनलमध्ये उच्चपदावर अजून अमराठी लोकांचं वर्चस्व आहे. लाखोंचा पगार घेणारी ही मंडळी काम मात्र कवडीचंही करत नाही.. त्यामुळे कर्मचा-यांनी रामराम ठोकायला सुरूवात केली आहे.. गेल्या 2 महिन्यात किमान 10 जणांनी चांगल्या समाजासाठी मराठी चॅनलला सोडणं पसंत केलंय.


> जालना येथील टीव्ही-9 चे प्रतिनिधी गणेश जाधव यांच्यावर वालूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला.जिल्हयातील तीर्थपुरूजवळ ही घटना घडली.तीर्थपुरी येथे बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर गणेश जाधव तीर्थपुरीला गेले.उत्खननाची बातमी कव्हर करीत असताना ही पत्रकारावर हल्ला केला गेला.नव्या वर्षात पत्रकारावर झालेला हा 21 वा हल्ला आहे.हल्लयाचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.

> मुंबई - टी.व्ही.9 ला जोरदार झटका, रमेश जोशी जय महाराष्ट्रमध्ये senior producer म्हणून जॉईन....

> जय महाराष्ट्र अपडेट
* अखेर आनंद गायकवाडाला पदावरून डच्चू
* विलास आठवले इनपूट हेड म्हणून ज्वॉइन
* लांबे गटाला मोठा धक्का.


>  पुणे - नव जागृती चॅनलमध्ये समीरण वाळवेकर सल्लागार संपादक म्हणून जॉईन...


> मनोज सांगळे सांजवार्ताच्या निवासी संपादकपदी रूजू> कोल्हापूर म. टा. साठी चर्चेचे गुर्हाळ.... विजय जाधव,मुकुंद फडकेंचे नाव आघाडीवर...


> मी मराठी सुरू झाल्यामुळे मुंबई पुढारी आणि प्रहारला गळती...पुढारीचे सहा तर प्रहार अर्धा खाली झाला...


> कोल्हापूर पुढारीत पुन्हा दिलीप लोंढे रूजू...वर्चस्वाची कुस्ती पुन्हा सुरु...बैठकांचे सत्र....


> कोल्हापूरचे पत्रकार दिव्य मराठीच्या प्रतीक्षेत..दिव्य मराठी येताच बड्या दैनिकांना बसणार धक्के.. शहाण्यांनी तजवीज केली...


> बेळगाव तरुण भारत मुंबई आवृत्ती निवासी संपादकपद रिक्तच..

> गोव्यात लवकरच आणखी एक मराठी आणि इंग्रजी दैनिक

शनिवार, ७ मार्च, २०१५

गांवकरीची नवी मुंबई आवृत्ती बंद

मुंबई - गांवकरीने सानपाड्यातील प्रिंटीग युनिट  काही दिवसांपुर्वी बंद केले होते.आता संपादकीय विभागही बंद केला आहे. त्यामुळे अनेक कामगार ,डी.पी.पी.करणारे कर्मचारी आणि उपसंपादक बेकार झाले आहेत.
संतापाची बाब म्हणजे त्यांचा गेल्या सात महिन्यापासून पगार थकलेला आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारी बुडवून तसेच युनिटच बंद करून पोतनीसांनी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.

पोतनीस साहेब,हे वागणं बरं नव्हं...

आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा ‘प्रादेशिक वृत्त विभाग’ देशात सर्वोकृष्ट

औरंगाबाद :- आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची २०१३ च्या ‘सर्वोत्कृष्ट वृत विभाग’ ;k पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाचे महासंचालक श्री. मोहन चांडक यांनी एका पत्राद्वारे ही निवड झाल्याचे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राला कळविले आहे. देशभरातील ४८ प्रादेशिक वृत्त विभागातून ही निवड करण्यात आली आहे, असे औरंगाबाद आकाशवाणी कार्यालयाचे प्रादेशिक वृत्तविभाग प्रमुख रमेश जायभाये यांनी सांगितले.

       १ सप्टेंबर १९८० मध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्रामध्ये सु्रू झालेला हा प्रादेशिक विभाग सुरूवातीला केवळ पाच मिनिटांचे मराठी बातमीपत्र आणि पाच मिनिटांचे उर्दू बातमीपत्र प्रसारित करीत असे. मात्र २००८ मध्ये देशभरातील बातमीपत्रांचे मोठ्या प्रमाणावर विस्तारीकरण झाले. त्यामध्ये आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने आणखी तीन बातमीपत्रे सु्रू केली. या विस्तारीकरणानंतर आता दररोज पाच बातमीपत्रे आाकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहेत.

विस्तारीकरणापाठोपाठ २०१३ मध्ये या वृत्तविभागाने आपले अत्याधुनिकीकरण करून वृत्त विभागाला कार्पोरेट चेहरा मिळवून दिला. गेली ३३ वर्षे एका खोलीत चालणारा हा विभाग दुसऱ्या मजल्यावर एका सुसज्ज अशा वातानुकूलित हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आला. विभागातील सर्व संगणक, फर्निचर बदलण्यात आले असून पायाभूत सुविधांबरोबरच आकाशवाणीने देशभरात ४८ केंद्रामध्ये स्थापित केलेल्या नेटिया सॉफ्टवेअर प्रणालीचीही अंमलबजावणी केली आहे. या प्रणालीचा यशस्वीपणे वापर करणारा हा विभाग देशातील पहिला विभाग ठरला असून सध्या देशात फक्त एकमेव आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचाच प्रादेशिक वृत्त विभाग या प्रणालीच्या माध्यमातून बातम्याचं प्रसारण करीत आहे. या प्रणालीच्या वापरामुळे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचे सर्व मराठी बातमीपत्र जवळपास कागदविरहित-  पेपरलेस बनले आहे. सर्व मराठी बातम्या दूरचित्रवाणीप्रमाणे प्रॉम्पटरवर वाचण्यात येतात. याचबरोबर प्रादेशिक बातम्यांची श्रवणव्याप्ती वाढविण्यासाठी आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी प्रसारीत होणारे बातमीपत्र मराठवाड्यातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून प्रसारीत करण्याची व्यवस्थाही केली आहे. बातमीपत्रांमध्ये राज्यातील आकाशवाणीचे वार्ताहर निवेदकांप्रमाणे थेट बातमी सांगण्याची त्याचबरोबर विविध कार्यक्रमातील वक्त्यांचे भाषणही या नवीन प्रणालीत भ्रमणध्वनींवरून थेट वृत्तविभागाच्या कक्षात रेकॉर्ड करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांमध्ये विविधता, रंजकता तसेच विश्वासार्हता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.

औरंगाबादची मराठी आणि उर्दू अशा दोन्ही भाषेतील सर्व बातमीपत्रे लिखित आणि श्राव्य अशा दोन्ही प्रकारात दररोज इंटरनेटवरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर ही बातमीपत्रे उपलब्ध आहेत. आकाशवाणीच्या श्रोता संशोधन केंद्राच्यावतीने वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत प्रादेशिक बातम्यांना श्रोत्यांनी सर्वाधिक पसंती दर्शविली आहे. यापूर्वी या विभागातील  पुरूषोत्तम कोरडे यांना उत्कृष्ट वार्ताहरचा पुरस्कार मिळाला होता, त्यानंतर आता २० वर्षानंतर या विभागाला उत्कृष्ट विभाग म्हणून गौरविण्यात येत आहे.

सध्या बातमीपत्रांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून यात बातम्यांच्या भाषांतराबरोबरच बातम्यांची निवड आणि मराठवाड्यातील बातम्यांना विशेष प्राधान्य देण्यावर जोर दिला जात आहे.  समाजातील सर्व घटकांना सामोरे जावे लागणाऱ्या ज्वलंत समस्यांचे प्रतिबिंब बातमीपत्रात पडेल याची खबरदारी घेणे, अशा समस्यांचे निराकरण करणारे कार्यक्रम वेळोवेळी प्रसारित करणे, कृषी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसारित करणे इत्यादि बाबींचा यात समावेश आहे.

प्रादेशिक वृत्त विभागानं उचललेल्या अशा पावलांमुळं विभागाची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. विकासविषयक घडामोडींची प्रासंगिकता समोर ठेऊन त्यावर आधारित ऑडिओ इन्सर्टचा वापर आपल्या बातमीपत्रांमध्ये व्हावा त्याचप्रमाणं विविध क्षेत्रातील लोकांचा त्यातील सहभाग वाढावा यासाठी या विभागानं खास प्रयत्न केले आहेत. समाजातल्या दुर्लक्षित आणि व्ंचित घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची योग्यप्रकारे जाणीव व्हावी यासाठी हा वृत्तविभाग अशा विविध विकासविषयक घडामोडींवर आधारित वृत्त आपल्या बातमीपत्रांमध्ये समाविष्ट करण्यासाठी सतत लक्ष केंद्रित करत असतो.

 गेल्या कित्येक पिढ्यांपासून जनमानसात रुजलेल्या खुळचट तर्कविसंगत, शास्त्रविसंगत आणि समाजाच्या वैचारिक प्रगल्भतेच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या कालबाह्य धारणा जाऊन समाजाच्या प्रत्येक घटकात विज्ञानाशी आणि तर्काशी सुसंगत ठरतील अशा धारणा रुजाव्यात यासाठी हा विभाग आपल्या प्रासंगिक आणि ध्वनिचित्र या कार्यक्रमांचा योग्य उपयोग करून घेतो.

हा वृत्त विभाग कालानुरूप अधिक सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी या विभागाशी निगडित यंत्रणा आतापर्यंतच्या उपलब्धीवर समाधान न मानता अधिक नेटानं आणि उत्साहानं पुढं जाण्यास कृतसंकल्प आहे. भविष्यातही या विभागाची वाटचाल अशीच उत्साहवर्धक सुरू राहावी, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असं वृत्त विभाग प्रमुख जायभाये यांनी सांगितले.

गुरुवार, ५ मार्च, २०१५

पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल ...

मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील घाटकोपर येथील एका रुग्णालयाची दुरावस्था दाखवली म्हणून तेथील नगर सेवक जो स्वतःला साई भक्त म्हणवतो आणि यावरच निवडून आला आहे) यांनी दोन पत्रकारांना प्रशांत बढे ( मुंबई सकाळ ) प्रशांत अंकुशराव ( झी २४ तास ) शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली यावर पत्रकारांनी पोलिसात तक्रार करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला , तर पिसाळलेल्या नगरसेवकाने आपल्या कार्यकर्त्याला आणि त्याच्या पत्नीला या दोन्ही पत्रकारान विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल केली ( एक मंत्री आणि एक शिक्षक आमदार यांच्या दबाव तंत्रामुळे ) आणि कळस म्हणजे आपल्या कार्याकार्यान मार्फत फेसबुक आणि व्होट्स अप वर बदनामी करून घाणेरडे राजकारण करीत पत्रकारितेचा अपमान केला आहे , आज ह्या दोन पत्रकारांवर असे घाणेरडे आरोप करण्यात आले उद्या असेच आरोप कोणत्याही निष्पाप पत्रकारावर होऊ शकतात त्यामुळे खरच पत्रकारिता धोक्यात आली आहे असा प्रश्न निर्माण होत आहे .या प्रकारचे प्रेस क्लब मुंबई , टी व्ही जे ए , आणि बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोसिएशन याच्या काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे ,

विजय चोरमारे म.टा.मध्येच...

महाराष्ट्र टाइम्सचे कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय चोरमारे हे मुंबईत मी मराठी लाइव्हला जॉईन झाल्याची चर्चा होती.परंतु ही चर्चा फोल ठरली आहे.
याबाबत बेरक्याने माहिती घेतली असता,असे सांगण्यात आले की,चोरमारे यांना मुंबई हवे होते आणि म.टा.ने मुंबई देण्यास नकार दिला होता.त्यामुळे ते मी मराठी लाइव्ह जॉईन करणार होते.परंतु म.टा.ने चोरमारे यांची मागणी मान्य करत मुंबईत जॉईन करून घेतले.
दरम्यान,चोरमारे मुंबईत गेल्याने कोल्हापूर म.टा.ची जबाबदारी आता कोणाकडे येणार,याकडे लक्ष वेधले आहे.

बुधवार, ४ मार्च, २०१५

२१ मार्च रोजी पाचव्या वर्षात पदार्पण

मित्रानो,बरेच दिवस झाले,बेरक्याकडे काही अपडेटस् नाहीत.त्यामुळे बेरक्या शांत झाला की काय,असा प्रश्न आमच्या हितचिंतकांना पडणे साहजिक आहे.बेरक्या शांत नाही,त्याचे मराठी मीडियावर संपूर्णपणे लक्ष आहे.परंतु सध्या काही घडतच नाही किंवा नविन काही हालचाली नाहीत,त्यामुळे आम्ही ब्लॉग किंवा फेसबुक वॉलवर अपडेटस् देवू शकलो नाही, हे खरे आहे.
मित्रानो,बेरक्या सुरू होवून येत्या २१ मार्च रोजी चार वर्षे पुर्ण होत आहेत.आम्ही २१ मार्च रोजी पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत.बेरक्या कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवणे,हा आमचा प्रथम संकल्प आहे.गेल्या चार वर्षात आम्हाला अनेक संकटाचा सामना करावा लागला.पण आम्ही हरलो नाहीत किंवा पळून गेलो नाहीत.आमची जिद्द आणि चिकाटी कायम आहे.
बेरक्याविरूध्द सायबर सेलकडे अनेक तक्रारी दाखल होत्या,त्यावर आम्ही यशस्वीरित्या मात केली.दुसरे असे की,सोर्सचे नाव कधी जाहीर केले नाहीत.माहिती देणा-यांचे नाव गुप्त ठेवले.काही लोकांनी आमचा वापर करण्याचा प्रयत्न केला,परंतु आम्ही कोणाच्या दावणीला बांधलो गेलो नाहीत.
बेरक्या खंबीरपणे आणि दमदारपणे अखंड चालू ठेवणे,हा संकल्प हाती घेवून आम्ही पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहोत.काही अपडेटस् दिले नाहीत म्हणून बेरक्या शांत झाला,बेरक्या बंद पडला असा ग्रह कोणी करून घेवू नये.
बेरक्या सज्जनांचा मित्र आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे.तो कोणाच्या दावणीला कधी बांधला गेला नाही किंवा कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही.बेरक्याच्या माध्यमातून अनेकांना मदत करता आली,हेच बेरक्याचे खरे यश आहे.
आपल्या शुभेच्छा आणि सहकार्य कायम राहील,ही अपेक्षा..
पत्रकारांचा पाठीराखा
बेरक्या उर्फ नारद

फेसबुक वर शेअर करा

Facebook