सोलापूर अपडेट....

सोलापूर लोकमत ने दोन दिवसापूर्वी 2 रूपये चा अंक लॉन्च केला आहे. या अंकाचे खप वाढावे म्हणून लोकमत ने वाचकासाठी जीतो सोना चांदी या लकी ड्रॉ योजना सुरु केली आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही अंक वाढी वर बक्षीस योजना आहे त्यात 5 ग्राम पर्यंत सोने आहे. जानकारांचे मत आहे की याचा फरक फ़क्त लोकमतच्या जास्त किमतीच्या अंकावरच बसणार आहे.
गेल्या 4 - 5 दिवसापासून आवारे , खोत, तावड़े , कदम हे दिवस रात्र एक करुन हा अंक वाढवण्याचा प्रयन्त करीत आहेत पण गेल्या दोन दिवसापासून पाहिजे तसा प्रतिसाद या अंकास मिळत नाही. त्यामुळे विक्रेत्यांच्या घरा पर्यन्त गाडी घेऊन जाऊन त्याना पार्ट्या देत आहेत अंक वाढवावे म्हणून. विक्रेते सध्या जाम खुश आहेत कारण इकडे दिव्य मराठीने बुकिंगवर 40 रुपये तर टार्गेट पूर्ण झाल्यास 50 रुपये कमीशन दिले आहेत. पण विक्रेते काही प्रमाणात दिव्य मराठी वर नाराज आहेत कारण गेल्या 3 वर्षाच्या बुकिंगच्या अनुभवानुसार भेट वस्तु मोठे असेल तर विक्रेत्यांना बुकिंग मिळते नाहीतर दिव्य मराठीने स्वतः बुकिंग करुन घेते. म्हणजेच दिव्य मराठी विक्रेत्यांना हमाल समजते असा समज विक्रेत्यांत पसरला आहे. त्यात येथील 400 विक्रेत्यांत चार -चार संघटनाही यास कारणीभूत आहे.
..........................

दिव्य मराठी सोलपुरच्या ऑफिसमधे आज फ़क्त बेरक्याचीच चर्चा....
अति उत्साही मानव संसाधनचा कल्याण शेटे जोरजोरात ओफ्फिसमधे म्हणतो की हो मी असाच आहे हे सगळ्यांना माहित आहे अन ते बेरक्यावर आल्याने काय फरक फडणार आहे?
गेंड्यांचे कातडे पांघरणाऱ्यास काय फरक पडणार आहे ? आता बोला ? 

................

सोलापुरात  भोपाळ शेठच्या  पेपरचे वितरण व्यवस्थापकाचे मी नाही त्यातला... असे वागणे सुरु आहे. कारणही असेच आहे, दर महिन्याला टॅक्सीचे खर्च कमी केल्याचे दाखवून (संचार बरोबर शेरिंग मध्ये टॅक्सी चालतात) आणि औरंगाबादच्या बरबड़ेशी हात मिळवनी करुन दरमहा वरकमाई सुरु केले आहे. आणि हे कमी की काय म्हणून रात्री पुरवणी भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारीतूनही ह्या दोघानी मिळून कांट्रैक्टरशी गट्टी जमवून मलीदा लाटत आहेत. बिचारे कामगार उपाशी अधिकारी तुपाशी आहेत.
सोलापुरात भोपाळ शेठच्या पेपरचा युनिट हेडच मनमानी करत असेल तर बाकीच्या लोकाचे न विचारणे बरे …