> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, २८ मे, २०१५

सोलापुरात सुराज्यची घोडदौड

सोलापुरातील स्थानिक दैनिक सुराज्यने नविन अत्याधुनिक प्रिंटींग युनीट खरेदी केले असून,ते उभारणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.येत्या काही दिवसांत सुराज्य,सोलापूरचा अंक १६ पानी होणार असून सर्वच्या सर्व पाने रंगित राहणार आहेत.

सोलापुरातील सर्वात जुने दैनिक संचार.२० वर्षापुर्वी सोलापूर आणि शेजारच्या उस्मानाबादमध्ये कोणत्याही वृत्तपत्राला संचार संबोधले जात होते.मात्र नंतरच्या स्पर्धेत केसरी आणि तरूण भारत दाखल झाला.सोलापूरातून केसरी लोप पावला असून,या दैनिकांतच वृत्तसंपादक म्हणून काम करणारे राकेश टोळ्ये यांनी केसरीची पोकळी भरून काढली आहे.१३ वर्षापुर्वी सोलापूरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते विष्णुपंत कोठे यांनी सुराज्य सुरू केले.त्याचे पहिले संपादक राजा माने होते.माने आता लोकमतचे संपादक आहेत.माने यांच्यानंतर हरिश कैंची आणि त्यानंतर राकेश टोळ्ये संपादक झाले.टोळ्ये यांची या दैनिकात भागिदारी असून,टोळ्येंनी या दैनिकांचा वटवृक्ष केला आहे.सध्या हे दैनिक १२ पानी असून,पहिले आणि शेवटचे पान रंगित आहे.आता अत्याधुनिक प्रिंटींग युनिटमुळे एकाच वेळी सोळा पाने तेही सर्वच्या सर्व रंगित निघणार आहेत.याबद्दल संपादक राकेश टोळ्ये यांचे अभिनंदन.
सोलापूरात लोकमत,सकाळ,दिव्य मराठी बरोंबर संचार आणि सुराज्य यामध्ये स्पर्धा रंगणार आहे.या स्पर्धेतून वाचकांना दर्जेदार बातम्या वाचण्यास मिळाव्यात ही अपेक्षा.

सावधान....न्यूज चॅनलच्या नावाखाली करोडो रूपयाचा गंडा घालणारी जोडगोळी सक्रिय

महाराष्ट्राच्या मीडीयामध्येही आता गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे.न्यूज चॅनल काढून देतो,असे सांगून बड्या उद्योगपतीला गाठायचे,त्याच्याकडून करोडो रूपये काढायचे आणि दुय्यम आणि निकृष्ट पध्दतीची मशिनरी आणायची आणि ही बाब लक्षात येण्याअगोदरच तेथून पोबारा करायचा आणि नविन उद्योगपती गाठून नविन चॅनल काढण्याचा गोरखधंदा पुण्यातील दोघांनी सुरू केला आहे.आतापर्यंत या जोडगोळीने दोघा उद्योगपतींना फसवले असून आता तिस-या उद्योगपतीला गळाला लावले आहे.
एकाचे नाव राहूल तर दुस-याचे नाव सम्राट असलेल्या या जोडीने पहिल्यांदा महाराष्ट्र माझा नावाचे चॅनल काढले.या चॅनलच्या मालकाकडून करोडो रूपये उकळले आणि त्यास गंडा घातला.त्यानंतर या जोडगोळीने सांगलीच्या जागृती अ‍ॅग्रो फुड्सच्या राज गायकवाड याना फसवले आहे.त्यांना नव जागृती चॅनल काढण्यास भाग पाडले.करोडो रूपये उकळले आणि दुय्यम आणि निकृष्ट पध्दतीची मशिनरी खरेदी करून त्यात करोडो रूपयाचा गैरव्यवहार केला.सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, BMW कारचे पैसे घ्यायचे आणि नॅनो कार द्यायची असा त्यांचा उंद्योग आहे.दुय्यम आणि निकृष्ट पध्दतीच्या मशिनरीमुळं जागृती चॅनलमध्ये वारंवार अडथळे येत आहेत.त्यामुळं या चॅनलमध्ये काम करणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.राज गायकवाड यांना फसवणारेच आता राज गायकवाड यांना अडचणीत आणण्यासाठी विविध षडयंत्र रचत आहेत.त्यामुळे गायकवाड मोठ्या अडचणीत सापडले असून,कर्मचा-यांच्या आणि स्ट्रींजरच्या दोन महिन्यापासून पगारी थकलेल्या आहेत.
महाराष्ट्र माझा,जागृती चॅनलला गंडा घालून पुण्यातील ही भामटेगिरी करणारी जोडगोळी आता नविन चॅनल काढत आहे.त्यासाठी पत्रकारांना ऑफर दिल्या जात आहेत.दर सहा महिन्या
ला चॅनल बदलून गंडा घालणा-या या जोडगोळीपासून सावधान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवार, २६ मे, २०१५

ना 'धार' ! ना 'प्रहार' ! सगळे गार !!

दैनिक प्रहार मोठ्या थाटात सुरु केला तीन संपादक येवून देखील या
वृत्तपत्राचा कारभाराबद्दल काय बोलावे ? सुरुवातीला लट्ठ पगाराच्या
वल्गना करणारा हा पेपर आता कित्येक महिने पगारच देत नाही आणि हे बघणारा
कोणी खमक्या पण वृत्तपत्रात नाही.लॉबिंग आणि पुढे पुढे करणाऱ्यांचे
चांगले दिवस या वृत्तपत्रात सुरु आहेत. कोकणातील जनतेला पर्याय असलेला हा
प्रहार आता धार गमावत आहे.पगार थकविल्या बद्दल व्यवस्थापन आणि संपादकीय
विभागाला जरा देखील खंत वाटत नाही आणि मालक वर्गाला याकडे लक्षच द्यायचे
नाही असे दिसत आहे.न प्रहार ना धार ना पगार अशी सध्याची अवस्था आहे.सगळे
गार आहे.निव्वळ पश्चाताप पदरी पडला आहे.गप्पा मोठ्या आणि ..... असा
प्रकार सुरु असून पगार न देता वृत्तपत्रे पत्रकारितेवर खरा अन्याय करत
आहे.
कार्यालयात बसून स्वताच्या पगाराची रक्कम काढून घेणारे मात्र
वार्ताहरांचे पगार काढण्यास का कुचराई करतात हे गणितच उलगडत
नाही.वृत्तपत्र हा आतबट्ट्याचा व्यवहार असेल तर मग याची जाणीव आधीच असली
पाहिजे अनेक नामवंत वृत्तपत्र नाव मोठे लक्षण खोटे असे आहे वार्ताहर तर
नेमतात पण पगाराच्या नावाने बोंब आणि डेस्क बसलेले दीड शहाणे मात्र अगदी
रुबाबात सकाळी फोन करणार अरे हि बातमी नाही ती बातमी नाही आली आणि हेच
दीड शहाणे चांगल्या बातम्या कश्या दाबतात हे वेगळे सांगायला नको.सगळेच
अंशकालीन वार्ताहर काही भुरटे नसतात.प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा
असते पण डेस्कवर बसलेले टिकोजीराव या वार्ताहरांना काम करू देत नाही.अहो
या वार्ताहराला पगार मिळत नसेल आणि रोजच्या अडचणी येत असतील कुटुंब
व्यवस्था सांभाळायची असेल तर त्याने करावे तरी काय ? पण याचे सोयरसुतक
बाळगायला या टिकोजीरावाना वेळ आहे कुठे संपादक आणि मालक वर्गाच्या
मागेपुढे करून आपले इप्सित साध्य करायचे आणि मी किती काम करतो याचे दर्शन
घडवायचे.चांगली पत्रकारितेची चळवळ हेच नष्ट करत असल्याने अश्यांना
शहाणपणा शिकवायचा अधिकार नाही.पगार वेळेवर नाही.वय सरल्याने आता अन्य
काही करण्याचे पर्याय हळू हळू संपत चालले आहेत.अश्या स्थितीत पत्रकार
मात्र आपले दुखणे घेवून संपत आहेत.अशी खूप उदाहरणे आहेत.यात आता प्रहार
देखील या परंपरेचा भाग झाला आहे.

सोमवार, २५ मे, २०१५

आठवले सर, अपेक्षाभंग करू नका !


विलास आठवलेंसारखा अनुभवी पत्रकार जय महाराष्ट्रमध्ये आल्यापासून चॅनेलची घडी आता बसू लागली आहे. या आधी लांबेंच्या काळात अनेकांना मनमानी पद्धतीने काढण्यात आलं. अपमानास्पद वागणूक देण्यात आली. मात्र आता हे सर्व बदललं आहे. आठवले सरांची कामाची शैली सगळ्यांच्याच पसंतीला पडली आहे. चॅनेलमध्ये वेगवेगळे चर्चात्मक कार्यक्रम होत आहेत. सर्व टीमचा हुरूप वाढला आहे. मात्र याच वाहिनीतून कामचुकार असल्यामुळे काढलेले एक 'ओझे' पुन्हा नोकरीत का घेतले ? असा प्रश्न सर्व विचारत आहेत. बुलेटिन 'वाचणे' आणि सिगरेट फुंकणे यात ते 'ओझे' एक्सपर्ट आहे. तर दुसरीकडे एबीपी माझातून काढून टाकण्यात आलेले 'माणिक' रत्नही मोठ्या पदावर येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेनं सगळ्यांनाच धक्का बसलाय. कारण एका महिला पत्रकाराच्या गंभीर आरोपानंतर या रत्नाची एबीपी माझातून हकालपट्टी करण्यात आली होती. तिथे त्याने व्हिडिओ एडिटर बरोबर मारामारीही केली होती. हे असलं 'कॅरेक्टर' आल्यास जय महाराष्ट्र चॅनेलमधलं वातावरण पुन्हा खराब होण्याची भीती आहे.

मी मराठी लाईव्हची पुणे वाटचाल कासवगतीने!


मुंबई आवृत्तीप्रमाणे आधी प्रकाशन व नंतर प्रमोशन या फंदात न पडता मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्राचे पुणे आवृत्तीचे लॉन्चिग आधी प्रमोशन व नंतर प्रकाशन असे करण्याचे व्यवस्थापनाने ठरविले आहे. त्यामुळे पुणे आवृत्तीचे लॉन्चिग रखडले आहे. पुणे शहरात जोरदार जाहिरातबाजी, वितरणाची व्यवस्था व लाईनपेक्षा स्टॉल विक्रीवर जोर अशी पॉलिसी तूर्ततरी व्यवस्थापनाने आखली आहे. सद्या पुणे शहरात वितरणासंदर्भात सर्व्हेक्षण सुरु झाले असून, त्यासाठी वितरण विभागात काहींना रूजू करून घेण्यात आले आहे. यापूर्वी संपादकीय विभागाच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती पार पडल्या होत्या. आता अंतिम टप्प्यातील मुलाखतीचे शेड्युल तयार केले जात आहे. साधारणतः पुढील दोन महिन्याचा कालावधी पुणे आवृत्तीच्या लॉन्चिगसाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रामदास ढमालेंचा लांडगा आला रे....!
पुण्यनगरीच्या अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक रामदास ढमाले हे नगरी वार्ता हे स्वतःचे दैनिक सुरु करीत असल्याचे त्यांनी स्वतःच जाहीर केले होते. परंतु, नेहमीप्रमाणे त्यांचा हा बारही फुसकाच ठरला आहे. त्यांचे दैनिक अद्याप तरी सुरु झाले नसून, ढमाले यांना अशाप्रकारेस्वतःच्या दैनिकाची वाच्यता करण्याची खोड गत काही वर्षांपासून असल्याची चर्चा नगरमध्ये रंगत आहे.
ढमालेनं पेपर काढला तर तोंड गोड करील : बाबा
रामदास ढमालेनं पेपर काढला तर मी तुमचे तोंड गोड करील, असे उद्गार पुण्यनगरीचे संस्थापक संपादक बाबा शिंगोटे यांनी काढले आहेत. नगरच्या काही पत्रकारांनी याबाबत त्यांना अवगत केलेअसता, उपरोक्त उद्गार त्यांनी काढले. पुण्यनगरीत सद्या बाबा शिंगोटे व ढमाले यांचे बिनसलेले असून, त्यामुळेच ढमाले पुण्यनगरीतून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. पुण्यनगरीतील ढमाले यांचे अधिकारही बर्‍यापैकी कमी करण्यात आले आहेत.

शुक्रवार, २२ मे, २०१५

न्यूज़ एक्सप्रेस चैनल पर लेबर कोर्ट का चला डंडा


साईं प्रसाद मीडिया ग्रुप के न्यूज चैनल न्यूज एक्सप्रेस से खबर है कि आज करीब 123 मीडियाकर्मियों को प्रबंधन ने थ्री प्लस वन के हिसाब से सेलरी देकर फुल एंड फाइनल सेटलमेंट करने पर सहमति जताई है. ऐसा लेबर कोर्ट के आदेश के बाद किया गया. दर्जनों मीडियाकर्मियों ने नोएडा स्थित श्रम विभाग में लिखित शिकायत की थी कि उनका मैनेजमेंट सेलरी नहीं दे रहा जिससे मीडियाकर्मियों की आर्थिक स्थिति बेहद खराब है. पत्र में कई अन्य बातें भी लिखी गई हैं. दर्जनों मीडियाकर्मियों के हस्ताक्षर वाले इस पत्र के मिलने के बाद श्रम विभाग सक्रिय हुआ और न्यूज एक्सप्रेस प्रबंधन को नोटिस जारी किया. कई तारीखों पर सुनवाई के बाद श्रम विभाग ने आदेश सुनाया कि प्रबंधन 5 जून तक इच्छुक मीडियाकर्मियों का फुल एंड फाइनल सेटलमेंट करके सूचित करे.
इसी आदेश के अनुपालन में न्यूज एक्सप्रेस प्रबंधन की तरफ से आज करीब 123 मीडियाकर्मियों को थ्री प्लस वन के हिसाब से चार महीने की सेलरी देकर उनका फुल एंड फाइनल हिसाब करने के लिए नो ड्यूज फॉर्म भरवाया. इस पूरी कार्रवाई के दौरान प्रबंधन की तरफ से महाराष्ट्र से ट्रांसफर लेकर आए संदीप शुक्ला मौजूद रहे.
ज्ञात हो कि चैनल के एडिटर इन चीफ और सीईओ प्रसून शुक्ला ने प्रबंधन की मीडियाकर्मियों के प्रति बेरुखी और ढेर सारे मदों में पैसे लगातार रोके रखकर परेशान प्रताड़ित करने की नीति से नाराज होकर इस्तीफा दे दिया था. इसके बाद प्रबंधन ने संदीप शुक्ला को महाराष्ट्र से नोएडा भेजा. लेकिन संदीप भी बंद पड़े चैनल को चला नहीं पाए. साथ ही लेबर कोर्ट में चल रहे मामले में सक्रिय मीडियाकर्मियों को तोड़ नहीं पाए. अंततः मीडियाकर्मियों ने अपनी एकजुटता के चलते अपना हक हासिल किया और चैनल प्रबंधन से अपना हक़ पाने का आदेश लेबर कोर्ट से पा लिया.
चैनल के भविष्य को लेकर कई तरह के कयास लगाए जा रहे हैं. कुछ लोगों का कहना है कि चैनल लगभग डेड हो गया है. किसी भी डीटीएच या केबल पर नहीं दिख रहा. पैसे न दिए जाने के कारण सैटेलाइट से भी इसे हटा दिया गया है. सिर्फ इन हाउस यह चल रहा है जिसे सिर्फ मालिक और इनके कर्मचारी लोग देख रहे हैं. सूत्रों के मुताबिक प्रबंधन की कोशिश बेहद लो कास्ट में चैनल सीमित तरीके से संचालित करने की है. साथ ही उचित पार्टी मिलते ही बेच देने की है. हालांकि चैनल के उपर कई किस्म की देनदारियां हैं जिससे प्रबंधन को उबरना बाकी है.
चैनल के ठीकठाक संचालन के लिए करोड़ों रुपये खर्च होंगे जिसे देने से प्रबंधन आनाकानी कर रहा है. वहीं कुछ लोगों का कहना है कि चैनल को फ्रेंचाइजी मोड में संचालित किया जाएगा. मतलब ये कि हर प्रदेश हर जिले में चैनल को ठेके पर उठा दिया जाएगा. देखना है कि प्रबंधन चैनल संचालन के लिए क्या रुख अख्तियार करता है. लेकिन मीडिया इंडस्ट्री के लोग इस बात पर जरूर आश्चर्य व्यक्त कर रहे हैं कि एक ठीकठाक चलते हुए नेशनल न्यूज चैनल को प्रबंधन ने किस रणनीति के तहत डेड मोड में डाल कर बंटाधार कर दिया. यह भी कहा जा रहा है कि चिटफंड से जुड़े समूहों का मीडिया से मोहभंग होता जा रहा है. इसी कारण एक के बाद एक न्यूज चैनल बाइंडअप हो रहे हैं.
आज फुल एंड फाइनल सेटलमेंट के लिए नो ड्यूज फॉर्म भरने आने के कारण नोएडा स्थित न्यूज एक्सप्रेस के आफिस के सामने काफी गहमागहमी थी. कई कर्मचारी भावुक भी हुए. कइयों ने ग्रुप फोटो खिंचाकर अंतिम निशानी के तौर पर इसे साथ रखा. चैनल प्रबंधन की तरफ से बाउंसर भी बुला लिए गए थे ताकि कर्मचारियों का गुस्सा भड़कने की स्थिति में उनसे निपटा जा सके. चैनल से जुड़े कुछ मीडियाकर्मियों ने भड़ास को मौके की तस्वीरें भेजकर पूरे हालात के बारे में अवगत कराया. देखना है प्रबंधन 5 जून को पैसे देता है या हमेशा की तरह वादाखिलाफी करता है

आयबीएन आणि लोकमतमध्ये लवकरच घटस्फोट

गेल्या सहा वर्षापासून एकत्रित संसार करणा-या आयबीएन आणि लोकमतमध्ये लवकरच घटस्फोट होणार आहे.सध्या सुरू असलेले चॅनल आयबीएनकडे जाणार आहे तर लोकमतवाले स्वतंत्र चॅनल सुरू करणार आहेत.लोकमतवाल्यांनीच वागळे यांना एडिटर इन चिफ पदाची ऑफर दिली आहे.मात्र वागळेंनी आपल्या काही अटी सांगितल्या असून,या अटी दर्डा शेठ मान्य करणार असल्याची माहिती बेरक्याची हाती लागली आहे.

आयबीएन आणि लोकमतमध्ये पाच वर्षाचा करार होता.तो गतवर्षीत संपला आहे.मात्र एक वर्षाचा करार वाढवून घेण्यात आला होता.आता आयबीएनची मालकी मुकेश अंबानी यांच्याकडे गेली आहे.अंबानी आणि दर्डामध्ये अजिबात जमत नाही.त्यामुळे हा करार आता कायमचा संपणार आहे.त्यामुळे दोघांत लवकरच घटस्फोट होणार आहे.

सध्याचे मुळ चॅनल आयबीएनकडेच राहणार आहे.त्याचे नाव आयबीएन ७ मराठी असे राहण्याची शक्यता आहे.तर लोकमतवाले आपल्या चॅनलचे नाव काय देणार,हे लवकरच स्पष्ट होणार आहे.लोकमतवाल्यांनी आपल्या टीमची जुळवाजुळव सुरू केली असून,त्यासाठी चंद्रकांत आणि संदीप हे आयबीएन - लोकमतचे जुने सवंगडी कामास लागल्याचे समजते.

मध्यंतरी बेरक्यास जे ई - मेल आले होते,ते याच चॅनल संदर्भात आले होते,अशी माहिती प्राप्त झाली आहे.दर्डा शेंठ मराठीबरोबर हिंदीही चॅनल सुरू करणार असून,त्यासाठी बैठका सुरू आहेत. जानेवारी २०१६ पर्यंत दर्डाचे चॅनल सुरू होईल,अशी प्राथमिक माहिती आहे.


  जाता जाता -
व्हीआयपी एक हिंदीत न्यूज चॅनल आहे.हे चॅनल मराठी न्यूज चॅनल सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. या चॅनलसाठीही वागळे यांचे नाव आघाडीवर आहे.आता वागळे हे व्हीआयपी जॉईन करणार की लोकमत,याकडं मीडियाचं लक्ष वेधलं आहे.

सोमवार, १८ मे, २०१५

मराठी पत्रकार परिषदेचं 6 आणि 7 जून रोजी अधिवेशन

पुणे -  पंच्याहत्तर वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं व्दैवार्षिक अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे होत असून मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्‌घाटन होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरद पवार हे समारंभाचं अध्यक्षस्थान भूषविणार आहेत .देशभरातून अडीच हजार मराठी पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न होत असलेल्या या अधिवेशनात दोन दिवस चर्चासत्र,परिसंवाद,मुलाखती असे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहेत.पत्रकारिता,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर अधिवेशनात विविध विषयांवर आपल्या भूमिका मांडणार आहेत अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक एस.एम.देशमुख, यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे.ज्ञानप्रकाशकार काकासाहेब लिमये यांनी स्थापन केलेल्या या संघटनेचं अध्यक्षपद ज.स.करंदीकर,न.र.फाटक,पा.वा.गा

डगीळ,बाळासाहेब भारदे,आचार्य अत्रे,अनंत भालेराव,बाबुराव जक्कल,रंगाअण्णा वैद्य.प्रभाकर पाध्ये,दादासाहेब पोतनीस,नारायण आठवले,अनंतराव पाटील,ह.रा.महाजनी,दा.वि.गोखले,यांच्यासाऱख्या दिग्गज संपादक/पत्रकारांनी भूषविले आहे.महाराष्ट्रातील 35 जिल्हयात आणि 340 तालुक्यात परिषदेच्या शाखा असून दिल्ली,पणजी,हैदराबाद,बेळगाव आदि नजिकच्या राज्यातही परिषद कार्यरत आहे.देशभरात 8,500 पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत.परिषदेचं अधिवेशन दर दोन वर्षांनी होते.2011मध्ये अधिवेशऩ रोहयात झालं होतं,2013मध्ये औरंगाबादला अधिवेशन आयोजित कऱण्यात आलं होतं.परिषदेचं दुसरं अधिवेशन 1941मध्ये पुण्यात झालं होतं.न.र.फाटक हे त्या अधिवेशानचे अध्यक्ष होते.त्यानंतर प्रथमच यंदा पुणे परिसरात हे अधिवेशन होत असल्यानं पत्रकारांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.परिषदेचे विद्यमान अध्यक्ष किऱण नाईक हे या अधिवेशनाचेही अध्यक्ष असणार आहेत.चंद्रशेखर बेहेरे हे विद्यमान कार्याध्यक्ष,संतोष पवार हे सरचिटणीस,सुभाष भारव्दाज आणि बंडू लडके हे उपाध्यक्ष आणि सिध्दार्थ शर्मा हे विद्यमान कोषाध्यक्ष आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय अधिवेशनाचं उद्‌घाटन शनिवार दिनांक 6 जून 2015 रोजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते होत असून उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानीे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे असणार आहेत.उद्‌घाटनाच्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट,ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे,विशेष सरकारी वकील उज्जवल निकम,खा.शिवाजीराव अढळराव पाटील,खा.अमर साबळे,खा.श्रीरंग बारणे,आ.दिलीप वळसे पाटील,आ ,लक्ष्मण जगताप,आ.गौतम चाबूकवार,आ.महेश लांडगे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी परिषदेच्या माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी स्मरणिकेचं प्रकाशनही श्री.शरद पवार यांच्या हस्ते कऱण्यात येणार आहे.
समारोप समारंभ 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजता होत असून ज्येष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे ,जल बिरादरीचे मॅगेसेसे पुरस्कार विजते डॉ.राजेंद्रंसिंहजी,धुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे,झी-24तास वाहिनीचे संपादक डॉ.उदय निरगुडकर,मी मराठी वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईट,शिवसेना नेत्या आमदार निलमताई गोऱ्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी डॉ.राजेंद्रसिंहजी यांचा त्यांना मिळालेल्या स्टॉकहॉल्म पुरस्काराबद्दल अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनात विविध कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहे.उद्‌घाटनानंतर दुपारी 2 ते 4 या वेळात होणाऱ्या पहिल्या सत्रात मी अँकर या विषयावर चर्चासत्र होणार आहे.त्यात टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे अँकर आपले अनुभव, गंमती-जमती आणि अँकर होण्यासाठीच्या पात्रता यावर आपली मतं मांडणार आहेत.या चर्चासत्रात एबीपी माझाचे मिलिंद भागवत,आयबीएन-लोकमतचे अमोल परचुरे,झी-24 तासचे अजित चव्हाण,जय महाराष्ट्रच्या सुवर्णा जोशी,मी मराठीच्या वृषाली यादव आणि टीव्ही-9चे वैभव कुलकर्णी सहभागी होत आहेत.
पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर परिसंवाद 
दुपारच्या सत्रात 4 ते6 या वेळेत पत्रकारांना संरक्षण कायद्याची खरोखरच गरज आहे काय? या विषयावर परिसंवाद होत आहे.ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम,ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार,एनडीटीव्हीचे पत्रकार प्रसाद काथे,विजय भोसले,नवी दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आपल्या भूमिका मांडणार आहेत.
पत्रकारांना दैनंदिन वापराव्या लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकार या विषयावर सकाळ माध्यम समुहातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख दिनेश ओक यांचे व्याख्यान होणार आहे.सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात हा कार्यक्रम होईल.रात्री 9 ते 11.30 या काळात उदय साटम निर्मित प्रिय अमुचा महाराष्ट हा संास्कृतिक कार्यक्रम होईल.
7 जून रोजी सकाळी 9.30 वाजता माध्यमांना सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय काय? या विषयावर परिसंवाद होत आहे.त्यामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे,कॉग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन,भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन,एबीपी माझाचे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी,पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे,पुढारीचे निवासी संपादक अनिल टाकळकर आदि मान्यवर आपली मतं मांडतील.
दुपारच्या सत्रात 11.30 वाजता सोशल मिडियामुळं इलेक्टॉनिक आणि प्रिन्ट मिडियाचं महत्व कमी झालंय काय ? या विषयावर परिसंवाद होत आहे.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे,ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर, माहिती आणि जनसंपर्क विभागातील उपसंचालक डॉ.गणेश मुळे,ज्येष्ठ पत्रकार संजय भुस्कुटे,ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे बोलणार आहेत.या परिसंवादानंतर दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत खुले अधिवेशन होणार आहे.
राजीव खांडेकर यांची मुलाखत
सायंकाळी 3.45 वाजता एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून ते पत्रकारितेतील आपले अनुभव,पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि सभोवतालच्या घडामोडींवर खांडेकर आपली मतं मांडतील.समीरण वाळवेकर राजीव खांडेकर यांची मुलाखत घेतील.
सायंकाळी पाच वाजता समारोप समारंभ सुरू होईल.यावेळी अधिवेशनात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार कऱण्यात येणार आहे.
अधिवेशनास येणा़ऱ्या पत्रकारांची निवास आणि जेवणाच्या व्यवस्था आयोजकाच्यावतीनं कऱण्यात आली आहे.बाहेरून बस किंवा रेल्वेनं येणाऱ्या पत्रकारांसाठी शिवाजी नगर.स्वार गेट आणि पुणे स्टेशन येथून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी वाहन व्यवस्था कऱण्यात आली आहे.या शिवाय भोसरीकडे जाण्यासाठी बस सेवाही उपलब्ध आहे.अधिवेशनासाठी 100 रूपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहितीही एस.एम.देशमुख यांनी दिली.
पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, विभागीय चिटणीस डी.के.वळसे पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हयाचे कार्याध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बापूसाहेब गोरे, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बाळासाहेब ढसाळ ,पुणे शहर अध्यक्ष राजेंद्र कापसे आदि मान्यवर उपस्थित होते.

शनिवार, १६ मे, २०१५

महाराष्ट्रनामा

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये शेठजीकडून मावळते जनरल मँनेजर राजीव अग्रवाल यांना अत्यंत अपमानकारक वागणूक...
संदीप बिष्णाई यांनी शनिवारी जनरल मॅनेजरची सुत्रे घेताच, मावळते जनरल मँनेजर राजीव अग्रवाल यांना कॅबिन सोडण्यास भाग पाडण्यात आले आणि एका कॉन्फरन्स हॉलमध्ये साध्या खुर्चीवर बसवण्यात आले...
एवढा घोर अपमान होताच,अग्रवाल यांच्या डोळ्यात अश्रू तरंगले.......

 ..............................................भोपाळशेठने आपले रंग दाखवण्यास सुरूवात केले...
मजिठिया वेतन आयोग लागू करण्याची वेळ येताच,यवतमाळच्या पाच आणि बुलडाणाच्या चार कर्मचाऱ्यांचा राजीनामा घेवून कॉन्ट्रक्ट फार्म भरून घेतला...
दिव्य मराठीच्या अकोला आवृत्तीच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मराठवाड्यात बदल्या होणार...
हे ऐकूण अनेकांना 'काटा' आला...

...............

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये शेठजीचा महंमद तुघलकी निर्णय...सकाळमधून हाकलून दिलेल्या संदीप बिष्णोईला पुन्हा औरंगाबाद युनिटचे जनरल मँनेजर केले तर जळगावहून मुंबईला उचलबांगडी केलेल्या प्रवीण चोप्रा यांना केवळ दोन महिन्यात पुन्हा जळगावला आणले...
संदीप बिष्णोई उवाच...
..........................
- कुठेच सहा महिने टिकणार नाही...
- कामाला यश नाही...
- अनेक निर्णय कंपनीला अंगलट आणणारे...

रविवार, १० मे, २०१५

लाईव्ह पत्रकारांचा बारामतीत वसुलीचा धंदा..

बारामती – राज्याची राजकीय राजधानी असलेल्या बारामतीत पवारप्रेमी लाईव्ह पत्रकारांनी वसुलीचा धंदा उद्छाद मांडला आहे. चक्क पवारांकडूनच वसुली केल्याने सोमवारी टंचाई बैठकीतून वसुली टोळीला पवारांनी बाहेरचा रस्ता दाखवला. आपल्या हाती समाजाच्या भल्यासाठी पत्रकारितेचं शस्त्र देण्यात आलं आहे. हे विसरलेले लाळघोटे मंडळी एका हाताच आपल्या वृत्तवाहिन्याचा माईक तर घड्याळ असलेल्या दुसर्या हातात पक्षाचा अदृश्य झेंडा घेऊन ही मंडळी मानाने बारामतीत मिरवत बारामतीत फिरतात. पत्रकारितेत वावरणार्या या मंडळींनी आता चक्क दादांनाच दगा दिल्यावर अजित पवारांनी दादागिरीचा नमुना पहायला मिळाला. तुमचं बैठकीत काय काम असा सवाल विचारून बाहेर हाकलले. मात्र घटनेचा निषेध करायला नेमस्त मंडळी व लाईव्ह मंडळींनी फारसी आक्रमक भूमिका घेतली नाही. ही तथाकथित लाईव्ह मंडळींच पत्रकारितेचा गळा घोटत आहेत.
बारामती परिसरातील नुकत्याच झालेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून आपल्या तुंबड्या, झोळ्या फाटेपर्यंत भरगच्च भरल्यावर एका पवारांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची ध्वनीचित्रफित लाईव्ह पत्रकारांच्या हाती आली. याचे भांडवल करून त्यांनी राष्ट्रवादी काग्रेसच्या पदाधिकार्यांकरवी पैसे देखील उकळले. तेवढ्यावर शांत न बसता अजित पवारांच्या आक्षेपार्ह विधानाची मोठ्या वर्तमानपत्रात बातमी छापून आणण्याचे कंत्राट पवार विरोधकांकडून लाईव्ह मंडळींनी घेत रात्रीत लाखो रूपये कमावण्याची योजना आखली. त्यावर काही वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी बातमी न लावल्याबद्दल उलट लाईव्ह पत्रकारांना जाब विचारत, आम्हाला शिळ्या बातम्या देऊ नका असं ठणकावून सांगितल्याने लाळघोट्यांचे लाखो रूपये कमावण्याचे लाईव्ह स्वप्न भंगले. समाजातील कोणताही प्रश्न असो...पैसे द्या असा लाईव्ह मंडळींचा होरा असतो. अत्याचारग्रस्त पिडित महिलांचे लैगिक शोषण करण्यात ही मंडळी मागे नाहीत. बारामती शहरातील भिगवण रोडवरील एका तारांकित हाटेलमध्ये पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पिडितेचा बाईट घेण्याच्या बहाण्याने लाईव्ह मजा ही मारली. पिडीत लाजलज्जेस्तव गप्प बसली.
 तीन हत्ती चौकातील लाईव्ह उर्फ बांधकाम व्यावसायिकाने भारत संचार निगमकडून लाखो रूपयाची लिज लाईन घेत चांगल कार्यालय थाटलं आहे. बारामतीमधील सर्वच लाईव्ह मंडळी येथून आपला कारभार हाकतात. कोणाताही प्रश्न असला की, त्याला या लाईव्ह कार्यालयात बोलवून घेतले जाते. नंतर सुरू होत आर्थिक शोषण.. त्यामुळे बारामतीतील नेमस्त पत्रकार जाम वैतागले आहेत. सांगणार तरी कोणाला आपलेच दात अन् आपलेच ओठ...

शुक्रवार, ८ मे, २०१५

वर्ष २०१४ चे 'समर्थन मानवी हक्क वार्ता पुरस्कार'  मुद्रित माध्यम
श्री. संतोष महादेव मिठारी (दै. लोकमत, कोल्हापूर)
श्री. शैलेश वसंत पालकर (दै. पुढारी, रायगड -पोलादपूर)

  दृक-श्राव्य माध्यम
श्री. राजू सोनावणे (जय महाराष्ट्र - ठाणे )
उत्तेजनार्थ
श्री. अनिल उमाकांत फेकरीकर (दै. तरुण भारत, नागपूर )
श्री. महेश गंगाराम गावडे ( दै. तरुण भारत, कोल्हापूर )
यांना जाहीर झाले आहेत.
सर्व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन

सोमवार, ४ मे, २०१५

सोलापूरचे पाकीटबहाद्दर पत्रकार कोण ?

सोलापूरची शान आणि अस्मिता असलेली लक्ष्मी - विष्णु मिल अखेर जमिनदोस्त करण्यात येत आहे.मात्र ते करताना एक ओळख राहावी म्हणून चिमणी कायम ठेवण्याची अट मालकाला घालण्यात आली होती.मात्र मालकाने चिमणीही मारून टाकण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे.
मालकाची बाजू कशी बरोबर आहे,हे सांगण्यासाठी सोलापुरातील बाळू मामाने नेहमीच्या पध्दतीने फक्त क्राईम रिपोर्टरंना बोलावले.त्याच्या खिशात नोटांचे जड पाकीट घातले,मग काय,पत्रकारांची लेखणी चांगलीच पाझळली....
महाराष्ट्राचा मानबिंदू,पद्मश्रीचा आणि भोपाळशेठच्या पेपरचा क्राईम रिपोर्टर आणि एक केबल चॅनलचा पत्रकार सध्या त्यामुळंच खूप खुशीत दिसत आहे.
मात्र सोलापुरातील दैनिक सुराज्यनेच याचा भांडाफोड केलेला आहे.

रविवार, ३ मे, २०१५

डोंगरधारी उर्फ रंगीला औरंगाबादीने केली पद्मश्रीची अडचण

डोंगरधारी उर्फ रंगीला औरंगाबादी हा पद्मश्रीच्या पेपर मध्ये माणसेच टिकू देत नाही हे सर्वश्रुत आहेच. त्याच्या जाचाला कंटाळून मुंबई - ठाण्याची पूर्ण टीम 'मी मराठीच्'या वाटेला गेली. आता मुंबईत चार-पाच रिपोर्टर आहेत तर ठाण्यात एकच माणूस सर्व बीटचा भार एकहाती पेलतोय. अशा स्थतीत पद्मश्री यांनी पेपरला 'संजीव'नी मिळवण्यासाठी  डोंगरधारीच्या डोक्यावर एक नवा संपादक आणला. आता डोक्यावर एक नवा माणूस आला म्हणाल्यावर हा डोंगरधारी आपणहून पेपर सोडून जाईल असे पद्मश्री यांना वाटले होते पण कसले काय… डोंगरधारीला बाहेर काडीचीही किंमत नाही, कोणी नोकरी द्यायला तयार नाही अशा स्थित हा डोंगरधारी कसला जातोय पेपर सोडून. आता दोन महिने होत आले पण डोंगरधारी काय सानपाडा भवन सोडायला तयार नाही. त्यामुळे आता पेपर व्यवस्थापनाला एकाच ठिकाणी  दोन संपादकांना दीड लाखाच्यावर पगार द्यावा लागतोय. त्यामुळे पद्मश्रीची तर चांगलीच अडचण झालीय आणि दोन संपादक ठेवून देखील उपयोग काय? जर खाली बातम्या आणणारे रिपोर्टरच नाही. दोन संपादकांना दीड दीड लाख पगार देण्यापेक्षा जे पेपरसाठी दिवस रात्र एक करून राबराब राबताहेत, मोठ्या मोठ्या पगाराची ऑफर येवून देखील जे आजही पेपरशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत त्यांना पगारवाढ द्या. राबराब राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली तर ते तन मनाने काम करतील आणि नक्कीच पेपरचा मान उंचावेल. पण आता हे मालकमंडळीना सांगणार कोण ?

शनिवार, २ मे, २०१५

हे 'आं - ऊं' कधी थांबणार ?

जग जिंकायला निघालेल्या वाहिनीत सगळेच जण आपापला चेहरा कसा चमकवता येईल यासाठी धडपडतोय. प्रत्येक गट आणि त्या गटाचे म्होरके त्यात आघाडीवर आहेत. 'बेधडक' नावाचा पुचाट कार्यक्रम करणा-या महाशयांना आं, ऊं या शब्दांचा अनेकदा वापर करावा लागतो. मात्र खाज काही सुटत नाही. त्यातच मग ते अनेक नेत्यांच्या मुलाखती घ्यायला जातात तेथेही त्यांचं आं, ऊं सुरूच असते. दुसरे महाशय तर 'एकला चलो रे' करत मिरवत राहतात. फणसाळलेले गटाचे भक्त, त्यांचा हा म्होरक्या जय महाराष्ट्र आणि साममध्ये असतानाही त्यांच्या निष्ठा जपत होता. त्यामुळे त्या भक्तांना त्याचं फळ मिळालंय. वागळेंच्या दणक्यामुळे गळपटलेला 'उशीर' वाहिन्यांच्या दारो'दार' भटकत होता. बायकोची मदत घेऊन 24 तासमध्येही घुसण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. आता त्या उशीर महाशयाला अँकरिंगची बक्षिसी देण्यात आली. तर प्रत्येक सत्ताधारी गटात फिट बसण्यात नुतन असणा-यांनाही असंच चमकावण्यात आलं. साम टीव्हीत असतानाही फणसावर निष्ठा अर्पण करणा-यालाही असंच प्रफुल्लित करण्यात आलं. 12 वर्ष मीडियात राहून स्क्रिप्ट न करता येणारे हे महाशय आता मुलाखती घेताहेत. जय महाराष्ट्रमध्ये फणसाबरोबर गेलेल्या एका तोडक-मोडक स्पोर्टस् प्रतिनिधीचीही घरवापसी झाली. याच फणसाचा आणखी एक बाबा भक्त इथं जॉईन झालाय. त्याचाही कहर सुरूच आहे. अँकर आणि रिपोर्टर मुलाखती घेत सुटलेत. प्रत्येकाला फक्त चमकायचं आहे. यात काम करणारे बुलेटिन प्रोड्युसर भरडले जात आहेत. पीसीआरचा प्रोडक्शन स्टाफ मदत करत नाही. ते खुशाल बसून असतात. मात्र सर्वच संपादक महाशयांना याच्याशी काही देणंघेणं नाही. चॅनेलकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालं आहे. परिणामी चॅनेलला टीआरपी मिळत नाही. आणि भाषा मात्र जग जिंकण्याची आहे. अशाने जग जिंकता येणं अशक्य आहे.

शुक्रवार, १ मे, २०१५

खबर 'दिव्य' !

महाराष्ट्रात प्रिंट मीडियात वर्चस्व निर्माण करण्यासाठी भोपाळशेठने पाच वर्षी मराठवाड्याची राजधानी औरंगाबादेत बिज रोवले.परंतु या पाच वर्षात भोपाळशेठना मराठवाड्यातील नांदेड,परभणी,हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात 'भोपळा'ही फोडता आला नाही.
औरंगाबादनंतर नाशिक,जळगाव,सोलापूर असा प्रवास करून विदर्भातील अकोल्यात पाय रोवल्यानंतर भोपाळशेठचा भ्रमाचा 'भोपळा' फुटला आहे.अकोला आणि अमरावती आवृत्ती सुरू करताना भरमसाठ माणसे महाराष्ट्राची 'अभिलाषा' असणा-या 'खांडेकरां'नी भरली,परंतु अकोला आवृत्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे.अभिलाषांनी राठोडावर 'प्रेम' करून त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली परंतु त्यांनी 'टांगा पलटी घोडा फरार' या प्रमाणे पुन्हा दर्डाशेठच्या दरबारात हजेरी लावली.त्यानंतर सचिन काटेवर जबाबदारी सोपवण्यात आली परंतु अकोला आवृत्तीचा 'काटा'च निघाला आहे.अकोला आवृत्ती प्रचंड तोट्यात आहे.खप तर नाहीच शिवाय बिझीनेसच्या नावानेही बोंबाबोंब आहे.
महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्या तोट्यात सुरू असल्यामुळे भोपाळशेठ पुरते वैतागले आहेत.खांडेकरांना दिल्लीत हलवल्यानंतर 'शांत' अश्या दीक्षितांवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली पण त्याचां कारभार 'शांत'पणेच सुरू आहे.
काही दिवसांपुर्वी गोदातीरावरच्या नाशकात भोपाळशेठच्या पाचही आवृत्त्यांच्या निवासी संपादकांची बैठक पार पडली.यावेळी नाशकाचे 'जे.पी'.,सोलापूरचे पिंपरकर,बरीच 'पटवा'पटवी करणारे औरंगाबादचे पटवे,अकोल्याचे काटे आदी सर्व मंडळी हजर होती.मुख्य संपादक प्रशांत दीक्षीत आणि साईओ नीशीत जैन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत बरेच विचार मंथन करण्यात आले.
त्यात तोटा कमी करण्यासाठी भरमसाठ पगारी घेवून पाट्या टाकणा-या कर्मचा-यांना नारळ देण्याचा निर्णय घेण्यात आला.त्याचबरोबर अकोला आवृत्तीत झालेली खोगीर भरती कमी करण्यासाठी अनेकांना घरचा रस्ता दाखवण्याचा आणि काही लोकांच्या औंरगाबाद,बीड,उस्मानाबादमध्ये बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान अकोला आवृत्तीचे वृत्तसंपादक मिलींद कुलकर्णी यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
एकीकडे प्रचंड तोटा आणि दुसरीकडे वृत्तपत्र व्यवसायात मंदीचे वातावरण यामुळं भोपळशेठने प्रस्थावित नागपूर,नांदेड आणि कोल्हापूर आवृत्त्या सुरू करण्याचा निर्णय जानेवारी १६ पर्यंत पुढे ढकलला आहे.त्यामुळे या शहरात गुडघ्यांला बाशिंग बांधून बसलेल्या पत्रकारांचा चांगलाच भ्रमनिरास झाला आहे.

फेसबुक वर शेअर करा

Facebook