> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०१५

झी 24 तास ची नवख्या पत्रकारासोबत दगाबाजी

जानेवारी महिन्यात झी 24 तास वृत्तवाहिनीने पुण्यातील सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील “रानडे”च्या इमारतीत कॅम्पस मुलाखती घेतल्या. DNA व ZEE 24 आणि एका संकेतस्थळासाठी सुमारे शंभर-एक पत्राकारितेच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दिल्या. या तिनही ग्रुपना झी समुहाने कॅम्पसमधे आणले होते. प्रथम तिनही माध्यमासाठी स्वतंत्र मुलाखती घेतल्या. त्यानंतर एकत्रितपणे झी 24 तास साठी साठी ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून विद्यार्थी निवडले. (ही निवड सात मिनीटात उरकली, सात जणांच्या ग्रुपमधून जो जास्त आणि आक्रामक बोलेल त्याची निवड (?) पक्की) अशा मुल्यांकनावरुन निवडलेल्यांची लेखी घेण्यात आली. चार ग्रुप मधे सदर लेखी परिक्षा घेण्यात आली. रानडे इंन्स्टिट्यूटच्या इमारतीत झालेल्या या कॅम्पसमधे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मराठवाडा मित्र मंडळ, गरवारे महाविद्यालय येथील पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते. सदर कॅम्पस उरकून संस्थेची लोकं “कळवतो” म्हणत निघून गेली.
सुमारे दोन आठवड्यानंतर फक्त झी 24 च्या टीमने त्या चारही ग्रुपच्या विद्यार्थ्यांना मुंबई कार्यालयात बोलावले. (बाकी दोन संस्थेची एच आर टीम अजूनही जॉब संदर्भात थांगपत्ता लागू देईनात) मुलाखत घेणारे संपादक कार्यालयात उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना टाईमपास म्हणून कार्यालयातील टीव्ही दाखवून न्यूज स्टोरी लिहण्यास सांगण्यात आले. डॉ. येताच सर्वांना जेवणाच्या टेबलावर डॉक्टरसोबत बसवण्यात आले. जेवता-जेवता अनौपचारिक गप्पा डॉक्टरांनी सुरु केल्या. या गप्पा सुमारे पाच तास चालल्या. त्यानंतर सर्वांना घरी जाण्यास सांगितले.
“तुमची फायनल मुलाखत घेण्यात आली असून त्यात सुमारे दीडशे विषय आपण घेतले आहेत. यावर आधारित तुमची निवड होईल, तुम्हाला लवकरच एच आर कडून लवकर कळवण्यात येईल.” हे ऐकून विद्यार्थी जाम वैतागले. ही कसली मुलाखतीची पद्धत म्हणत स्वत:वरच रागवत व मनस्ताप करत, कुंठत विद्यार्थी पुण्याकडे निघून आले.
विद्यार्थी नोकरीसाठी कॉल येईल म्हणून कॉल लेटरची वाट पाहू लागले. या घटनेला आज सुमारे आठ महिने उलटून गेले आहेत. विद्यार्थी अजुनही “झी 24 तास”चे कॉल लेटर येईल या आशेवर बसले आहेत. मात्र ‘झी समुहा’कडून या संदर्भात काहीच कळविण्यात आले नाही. विचराणा केली असता कसलीच माहिती एच आर वाले देत नाहीत असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. रानडेच्या वरीष्ठाकडून कळविण्यात आले आहे की, किमान झी समुहाकडून काहीतरी कळवणे बाध्य होते. ‘झी’ने असे न करता विद्यार्थ्यांसोबत दगाबाजी नव्हती करायला पाहिजे होती. असा प्रकार ‘रानडे’च्या इतिहासात प्रथमच असे घडला आहे. याबाबत मुलाखती देणारे विद्यार्थी म्हणतात की, “झी समुहा”ला मनुष्यबळासाठी पुणे प्रतिबंधीत करावे. आमच्या बेरोजगारीची थट्टा झी समुहाने केली आहे.

रविवार, ३० ऑगस्ट, २०१५

जय महाराष्ट्र आणि टीव्ही 9ला पुन्हा लागणार गळती

जय महाराष्ट्रमध्ये संपादकांची नवी टीम आली आहे. मात्र इथल्या कर्मचा-यांना त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाही. पगार सातत्यानं जोपर्यंत 1 तारखेला होत नाही, तोपर्यंत काही मजा नाही. त्यामुळे कर्मचा-यांनी आयबीएन लोकमतला प्राधान्य दिलं आहे. डेस्कवरील एकाचं बुलेटिन प्रोड्युसर म्हणून आयबीएनमध्ये काम झालं आहे. तर जवळपास अर्ध्या महिला अँकर आयबीएनच्या संपर्कात आहेत. आयबीएनमधील अँकर निखिल वागळेंच्या चॅनेलमध्ये गेल्यानंतर, जय महाराष्ट्रच्या अँकर्सना बोलावण्यात येणार आहे. तर दोन प्रोड्युसर्स एबीपी माझा आणि झी 24 तासमध्ये प्रयत्न करत आहेत.
टीव्ही9च्या दोन अँकर्स आणि दोन प्रोड्युसर्सचे आयबीएन लोकमतमध्ये इंटरव्ह्यू झाले आहेत. ते ही बोलावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर अजून दोन अँकर झी 24 तास आणि वागळेंच्या चॅनेलच्या संपर्कात आहेत. नातेवाईक, नाट्यकलावंत आणि कॅमेरामन यांना बुलेटिनमध्ये वाव दिला जात असल्यानं अँकर्समध्ये नाराजी पसरल्याचं कळतं.
..........................

झी 24 तास या वाहिनीत अण्णाची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. साधारण चार वर्षापूर्वी इथल्या कुप्रसिद्ध त्रिकुटाने स्वार्थासाठी अण्णाचा बळी घेतला. तसे या त्रिकुट आणि त्यांच्या साथिदारांनी अनेकांचे बळी घेतले, गेम केले. पण अण्णाचा विषय वेगळा आहे. चार वर्षापूर्वी मंदार परब संपादक होते. तर अनंत सोनवणे आऊटपूट एडिटर. परब आणि सोनवणे दोघांचीही अण्णावर मर्जी वाढत चालली होती. त्यामुळे लिचमधून डेस्कवर आलेल्या काम्रेडच्या स्वप्नातलं पद धोक्यात येऊ लागलं होतं. कोकणातला शिवसैनिक असलेल्या काळू मामाला कोणी विचारेनासं झालं. मग काय, एक कॉम्रेड, दुसरा शिवसैनिक यांनी कोल्हापुरातला मुश्रीफ समर्थक एनसीपीवाला गडी बरोबर घेतला. कृष्णकृत्यात हा गडी आघाडीवर असतो. तिघांनी मिळून अण्णाला टिंगलीचं पात्र केलं. अण्णांचा डेस्कवरचा दबदबा कमी करण्यात त्यांना यश येऊ लागलं. तोंड न उघडणारे अण्णासमोर बोलू लागले. अण्णांनीही अधिक वेळ न दवडता मानबिंदू जवळ केला. आज अण्णा 24 तासमध्ये नाहीत. मात्र त्यांच्याविषयी आजही आदर आहे. तर हे त्रिकूट इथंच आहे. आणि सगळ्यांच्या शिव्या खात आहे. अर्थात त्रिकूटाचा फायदाही झाला. कृष्णकृत्यला रिपोर्टिंगची बिदागी मिळाली. कॉम्रेडला शिफ्ट सांभाळायला मिळाली. तर काळू मामाला स्पर्धक राहिला नाही.

'महाराष्ट्रा'त मराठी वृत्तवाहिनी क्षेत्रात 'नव जागृती'!

एका नव्या मराठी वृत्तवाहिनीसाठी सुरू असलेला पत्रकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. वाहिन्यांच्या ग्लॅमरची चमकदार स्वप्ने पाहात बसलेली ताजी ताजी पत्रकारिता प्रशिक्षित मुले. त्यातील अनेकांचा तर हा पहिलाच अनुभव. एकेक मुलगा आत जातोय. आत मी मी म्हणणारे ज्येष्ठ पत्रकार. ते मुलाखत घेताहेत आणि मग मोठय़ा उदारपणे त्या मुलांना सांगताहेत - तुम्हाला वृत्तवाहिनीत काम करण्याची संधी मिळते आहे हीच कितीतरी मोठी गोष्ट. तुम्हाला येथे तीन महिने प्रशिक्षण देण्यात येईल. मात्र त्यासाठी वेतन मिळणार नाही..
बातमीदारीपासून विपणनापर्यंतच्या कामाकरीता असे स्वस्तात गुंडाळता येणारे मनुष्यबळ, त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रारंभी दाखविण्यासाठी जमा केलेले नामवंत चेहरे आणि 'साखळी मार्केटिंग', 'चीट फंड' यांसारख्या व्यवसायातून जमा केलेली माया या बळावर वृत्तवाहिन्या काढण्याचा एक नवा उद्योग महाराष्ट्रात सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे एरवी नाकाने नैतिकतेचे कांदे सोलत जग जिंकण्यास निघालेली पत्रकार मंडळीही या उद्योगात सहभागी असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा मंडळींचा सहभाग असलेल्या वाहिन्यांपैकी काहींचा पाया डळमळू लागलेला असतानाच येत्या काळात सुमारे चार नवीन मराठी वृत्त वाहिन्या दाखल होणार असल्याने या उद्योगाविषयी माध्यमक्षेत्रातही एकंदरच कुतुहलाचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांत सत्ताबदलापासून नव्या सत्तेच्या स्थिरस्थावर होण्यापर्यंत अनेक घटना वेगाने घडत गेल्या. त्यामुळे देशभरात वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या जशी वाढली तसाच वृत्तवाहिन्यांकडे येणाऱ्या जाहिरातींचा टक्काही वाढला. 'फिक्की'च्या अहवालानानुसार प्रादेशिक वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांमध्ये २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये मोठी वाढ झाली होती आणि हे प्रमाण यापुढेही वाढत राहणार आहे. १४.१ टक्के प्रेक्षक सध्या मराठी वाहिन्यांना पसंती देतात. यातही वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. 'ट्राय'चा बारा मिनिटांच्या जाहिरातीचा नियम सगळ्याच वाहिन्यांकडून पाळला जात नाही. त्यामुळे जाहिराती, टेली मार्के टिंगच्या प्रक्षेपणातून मिळणाऱ्या उत्पन्नातही चांगलीच वाढ झाली असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. यामुळेच या व्यवसायाकडे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक यांच्यापासून चीट फंड चालविणाऱ्या कंपन्यांच्या चालकांपर्यंत अनेकांचे लक्ष वळले असल्याचे सांगण्यात येते. किमान ५०० ते ८०० कोटींच्या भांडवलात सुरू केलेली वृत्तवाहिनी जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टिकवणे सहज शक्य असल्याने त्या बळावर वृत्तवाहिन्या काढण्याचा नवा 'फंडा' सुरू झाला असून, हा घाट घालत असताना चार व्यावसायिक पत्रकारांना एकत्र करायचे आणि शिकावू पत्रकारांना कमीतकमी मानधन देऊन वाहिनीचा कारभार सुरू करायचा, अशी नीती अवलंबिली जात असल्याचे जाणकार सांगतात. अर्थात येणारी प्रत्येक वाहिनी हेच करते असे नाही, अशी पुस्तीही ते
जोडतात.
आजघडीला सात मराठी वृत्तवाहिन्या कार्यरत असून, दिल्ली ते बेळगावपर्यंत विविध भागातील काही व्यावसायिक आणखी सुमारे चार वृत्तवाहिन्या घेऊन येत आहेत. यातील एक वाहिनी 'इनाडू' समूहाची असून, हा समूह थेट माध्यमक्षेत्राशी संबंधित आहे. असे अपवाद मात्र कमीच
आहेत.
स्वस्त मनुष्यबळाचे कारखाने
गेल्या काही वर्षांत एकूणच माध्यमांबद्दलचे लोकांचे आणि खासकरून तरूण पिढीचे आक र्षण वाढते आहे. शिवाय, पत्रकारिता या विषयात आता तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमापासून अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. हजारो रूपये भरून 'बीएमएम' किंवा तत्सम पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही तितक्याच वेगाने वाढतो आहे. सध्या फक्त मुंबई विद्यापीठातून दरवर्षी तब्बल पाच ते सहा हजार बीएमएमचे विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. हे मनुष्यबळ सहज स्वस्तात उपलब्ध होते.
साभार : लोकसत्ता

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

महाराष्ट्र लाइव्हला शुभेच्छा...

महाराष्ट्रातील अनेक नामवंत,प्रतिभावंत आणि उमद्या तरूण पत्रकारांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र लाइव्ह http://www.maharashtralive.net/ वेब पोर्टलने केवळ दोन दिवसांत अनेकांची मने जिंकली आहेत.
आकर्षक लूक,दणकेबाज,ठसकेबाज आणि खणखणीत बातम्या यामुळं 'महाराष्ट्र लाइव्ह' हे वेबपोर्टल आणि ऍप बेरक्याप्रमाणे लोकप्रियता संपादन करेल,असा विश्वास अनेकांनी व्यक्त केलाय.
महाराष्ट्र लाइव्ह वेबपोर्टलशी बेरक्याचा कसलाही थेट संबंध नाही.मात्र काही मित्रमंडळी हा प्रयोग करत आहेत,त्यांना शुभेच्छा...


  
महाराष्ट्र लाइव्ह

संजीव शाळगावकर यांचे अभिनंदन

मराठी मीडियामध्ये एखाद्या न्यूज चॅनल मालकांविरूध्द कर्मचा-यांची बाजू घेवून मुख्य संपादकांनेच पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे उदाहरण विरळच. पुण्यात नव जागृती चॅनलच्या मालकांने कर्मचा-यांची घोर फसवणूक केल्यानंतर मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी येरवाडा पोलीस चौकीत रितसर तक्रार दाखल केलेली आहे.राज गायकवाड भविष्यात याच येरवाड्यात जाणार असल्याचा हा पहिला दाखला आहे.
नव जागृती चॅनल जानेवारीमध्ये सुरू झाले आणि अवघ्या सहा महिन्यातच बंद पडले.मालकांने कर्मचा-यांचा पगार कसाबसा दिला,नंतर मात्र टोलवा टोलवी सुरू केली.तारखावर तारखा दिल्या,आश्वासनावर आश्वासने दिली,चेक दिले पण सर्व थोतांड निघाले.त्यांनी कर्मचा-यांच्या पाठीत अक्षर:शा खंजीर खुपसला आहे.तरूण पत्रकारांचे भविष्य त्यांनी उद्ध्वस्त केले आहे.
अनेक तरूण इतर चांगल्या ठिकाणी नोकरी सोडून या चॅनलमध्ये जॉईन झाले होते,आता त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आलेली आहे.अनेक तरूण पुण्यात भाड्याने राहात होते,त्यांच्यावर रूम सोडण्याची पाळी आली.पगार नसल्यामुळे त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.या चॅनलमध्ये काही महिन्यापुर्वी एक वाळवी लागली होती.त्यामुळेच सारे समीकरण बदलले.मालकाच्या डोक्यात हवा घालण्याचे काम त्यांनी करून जय महाराष्ट्र केला.ऐवढेच काय शेळीचे ४२० कलम लिहून दीड लाख रूपये पगार वसूल केला आणि पुढचा भाग लिहिण्याअगोदर शेळपटाप्रमाणे xxx शेपूट घातले.
या माणसाला कधीच स्वत:चा फेस नाही.समोरला बोलू न देणे याची ही सवय.याला दूरदर्शनने हाकलून लावल्यानंतर त्याने एका विद्यापीठातही असाच नंगानाच केला.साम,पुन्हा साम करत आता छम् छम् मध्ये जॉईन झाला आहे.
असो,मुळ विषय आहे,जागृतीच्या मालकास धडा शिकवण्याचा.मराठवाड्यातील एका स्ट्रिंन्जर रिपोर्टरने या मालकांविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे अगोदरच तक्रार दाखल केलेली आहे.त्याची चौकशी सुरू झालेली आहे.मात्र पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होणे महत्वाचे होते.ते स्वत: मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी केले आहे.
संपादक असावा तर असा.नाही तर शेळीचे कलम ४२० लिहून स्वत:ची तुंबडी भरली की,शेळपटाप्रमाणे वागणारे अनेकजण आहेत.शाळगावकर यांना सर्व कर्मचा-यांचा पाठींबा तर आहेच,परंतु त्यांनी कसलीही परवा न करता,जे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन.
शाळगावकर साहेब,तुम्ही आता मागे हटू नका,आम्ही तुमच्या सोबत आहोत.कर्मचा-यांची बाजू घेवून मालकांविरूध्द थेट पोलीस ठाणे गाठणारे शाळगावकर खरेच ग्रेट.

राज गायकवाड आणि त्यांच्या पंटरविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

पुणे - नवजागृती न्यूज चॅनलच्या कर्मचाऱ्यांचा पगार बुडवणाऱ्या आणि त्यांची घोर फसवणूक करणाऱ्या जागृती अॅग्रो फुडस्चे चेअरमन राज गायकवाड,त्यांच्या पत्नी जाई गायकवाड,भाऊ भास्कर गायकवाड,संचालक सलिम खंडायत,अकाऊंट माणिक शिंदे आणि हेच. आर.दीपाली सरोदे यांच्यासह सहा जणांविरूध्द पुण्यातील येरवाडा पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली असून,ही तक्रार दस्तुरखुद्द मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने नोंदवली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी संचालक सलिम खंडायत यांना चौकशीसाठी बोलावले असता,त्यांनी सांगलीकडे धूम ठोकली.दरम्यान सर्व आरोंपीवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जागृती अॅग्रो फुडस्चा मालक राज गायकवाड यांनी अनेकांना टोप्या घालण्याचा धंदा सुरू केलेला आहे.गायकवाड यांनी नव जागृती कर्मचाऱ्यंाची घोर फसवणूक केली असून,वारंवार खोटी आश्वासने दिलेली आहे.त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहे.कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्य संपादक संजीव शाळगावकर यांनीच ही तक्रार नोंदवली आहे.
काय आहे ही नेमकी तक्रार
.....................


प्रति,
    1 मा. पोलीस आयुक्त,
    पुणे शहर.
    2 मा. सहाय्यक पोलीस आयुक्त,
    परिमंडळ
    पुणे शहर.
    3 मा. पोलीस निरीक्षक,
    पोलीस स्टेषन, पुणे.


   
अर्जदार :- संजीव लक्ष्मण शाळगांवकर, वय 57, व्यवसाय रा. सुंदर सहवास, फेज 2, बि. 11,फ्लॅट नं. 503, सनसिटी एरिया, सिहंगड रोड, पुणे-411 051.
   
           
           
           
            विषय :- नवजागृजी टेलिव्हिजन चॅनेलचे संचालक सौ. जाई गायकवाड, श्री. भास्कर गायकवाड व राज गायकवाड यांनी त्यांचे चॅनेलसाठी नेमलेल्या कर्मचा-यांचे वेतन व इतर भत्ते न देऊन सदर टी.व्ही. चॅनेल बंद करून फसवणुक व अपहार केलेबाबत तक्रार.

 महोदय,
  मी वर नमूद अर्जदार संजीव लक्ष्मण शाळगांवकर वर नमूद पत्त्यावर माझे कुटूंबियांसह रहात असून नवजागृती न्युज चॅनेलचा मुख्य संपादक म्हणुन कार्यरत आहे. जागृती मल्टिमेडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रा. लि. या कंपनीचे संचालक सौ. जाई राज गायकवाड व श्री. भास्कर गायकवाड हे आहेत. सदर कंपनीने नवजागृती न्युज चॅनेल या नांवाने टेलिव्हिजन स्पेस सिग्नल दिनांक 1 जानेवारी 2015 रोजी मिळविल्यानंतर या मराठी बातम्यांचे टी. व्ही. चॅनेलचे दिनांक 24 जानेवारी 2015 रोजी उद्घाटन केले. सदर न्यूज चॅनेलचे सर्व कामकाज दोन्ही संचालकांच्या वतीने श्री. राज गायकवाड हे पहातात.
  सदर जागृती मल्टिमेडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय व स्टुडिओ स्थापनेचे काम माहे सप्टेंबर 2014 रोजी सुरू झाले. सदर कंपनीचे एचआर मॅनेजर दिपाली सरोदे असून सलीम खंडायत हे अॅथॉरिटि सिग्नेटरी आहेत. तसेच माणिक शिंदे हे चीफ अकाऊंटंट आहेत. सदर न्यूज चॅनेलचे हेड ऑफिस, स्टुडिओ हे जागृती मल्टिमेडिया अॅण्ड एन्टरटेनमेंट प्रा. लि. या नावाने मेरीसॉफ्ट 3, तिसरा मजला, मारीगोल्ड कॉम्प्लेक्स, मेरीप्लेक्स मॉल, बालाजी मंदिराजवळ, कल्याणी नगर, पुणे-411 014 या ठिकाणी आहे. तसेच सदर न्यूज चॅनेलचे नोंदणीकृत कार्यालय गट क्र.25/1, प्रताप नगर, टाकळी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर येथे आहे. सदर संस्थेमध्ये सुरूवातीस सदर कंपनीमध्ये राहूल भार्गव हे व्हाईस प्रेसिडेंट या पदावर काम करीत होते. त्यांचे ओळखीने वर नमूद संचालक यांनी रानडे इन्स्टिटयुट, मास्क कम्युनिकेषन्स वगैरे संस्थांमधील माझेसह प्रसारमाध्यमाचे विविध कोर्स पुर्ण केलेल्या सुमारे 70 इसमांना त्यांचे सदर न्युज चॅनेलचे कार्यालयात व पत्रकारितेचे काम करण्यांकरितां साधारण 70 इसमांना माहे सप्टेंबर 2014 ते मार्च 2015 या कालावधीमध्ये विविध पदांवर काम करण्याचे ऑफर लेटर दिले.
त्यापैकी काही जणांना त्यांनी वार्षिक मोबदला/वेतन व इतर भत्त्यांचे आमिष दाखविले तर कांही जणांना कोणतीही रक्कम न लिहिता केवळ ऑफर लेटर देऊन आपल्या न्यूज चॅनेलमध्ये काम करण्यांकरितां नेमले. सदर कंपनीचे न्युज चॅनेल हे नवीन असल्याने सर्व कर्मचा-यांनी प्रामाणिकपणे, उत्साहाने व स्वयंस्फुर्तीने सदर न्युज चॅनेलचे काम पुर्ण क्षमतेने व योग्य पध्दतीने सुरू रहाणेकामी ज्या ज्या तांत्रिक व प्रषासकीय बाबींची पूर्तता करणेसाठी आवष्यक त्या सूचना कंपनीच्या संचालकांना वेळोवेळी सबंधीत अॅथॉरिटीमार्फत व स्वत: राज गायकवाड यांना दिल्या. त्यानंतर त्यांनी सुरूवातीस माहे फेब्रुवारी 2015 पर्यंत ठरल्याप्रमाणे सदर कर्मचा-यांना मोबदला/वेतन व इतर भत्ते दिले. सदर कर्मचा-यांना दिलेल्या मोबदल्यातून त्यांनी नियमाप्रमाणे व्यवसाय कर व टीडीएसची कपात केलेली आहे. परंतु माहे मार्च 2015 पासून त्यांनी कर्मचा-यांना मोबदला / वेतन व इतर भत्ते देण्याचे टाळले. कर्मचा-यांनी सुरूवातीस मागणी केल्यानंतर त्यांनी महिन्याच्या 5 तारखेला मोबदला देण्यांत येईल असे आश्वासन दिले. पुन्हा महिन्याच्या 10 तारखेला सदर मोबदला देण्यांत येईल असे सांगितले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे 10 तारखेला मोबदला न देतां 14 तारखेचे आश्वासन कर्मचा-यांना दिले व नंतर 25 तारखेचे आष्वासन दिले. अषा पध्दतीने त्यांनी कर्मचा-यांना खोटी आष्वासने देऊन माहे मार्च महिन्याचा मोबदला/वेतन व इतर भत्ते देण्याचे टाळले. त्यानंतर सर्व कर्मचारी यांनी माहे एप्रिल 2015 मध्ये सदर श्री. सलीम खंडायत यांचेसोबत मिटींग घेतली. परंतु त्यांनी पुन्हा खोटी आष्वासने देऊन कर्मचा-यांना मोबदला /वेतन व इतर भत्ते देण्याचे टाळले.
त्यानंतर माहे 1 मे 2015 मध्ये सांगली येथील जागृती अॅग्रो या कंपनीचीच दूसरी शाखा असलेल्या कार्यालयात पुन्हा सदर कंपनीच्या अधिकृत सिग्नेटरी अॅथॉरिटी, श्री. राज गायकवाड व इतर पदाधिका-यांबरोबर सदर कंपनीच्या कर्मचा-यांनी मिटींग घेऊन माहे मार्च व एप्रिल 2015 चे वेतन व इतर भत्ते देण्याची मागणी केली. सदर वेळेस सदर पदाधिका-यांनी त्यांच्या जागृती अॅग्रो या कंपनीच्या शेततळयांमध्ये 40 कोटींच्या माषांचे उत्पादन होणार असून लवकरच त्याच्या विक्रीतून येणा-या रकमेतून कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आष्वासन दिले. तसेच अत्याधुनिक मषिनरी घेऊन चॅनेलचे काम मोठया जोमात करण्याच्या भुलथापा देऊन कर्मचा-यांची बोळवण केली. अषा पध्दतीने माहे मार्च 2015 ते मे 2015 पर्यंत वेतन न मिळाल्यामुळे कंपनीच्या सर्व कर्मचा-यांची प्रचंड प्रमाणात आर्थिक ओढाताण सुरू झाली. कांही कर्मचारी हे भाडयाच्या घरामध्ये राहत होते, त्यांच्या घरभाडयाची थकबाकी वाढल्यामुळे संबंधीत घरमालकांनी त्यांचे काही मौल्यवान सामान ठेवून घेऊन त्यांना घराबाहेर काढले. तसेच काही कर्मचारी हे खानावळीत जेवत होते, त्यंाचे खाणावळीचे बिल थकल्यामुळे खाणावळ मालकांनी त्यांना जेवणाचे डबे देणे बंद केले. अषा त-हेने बहुतांष कर्मचा-यांची आर्थिक ओढाताण व उपासमार होऊन तसेच रोजगाराचा ज्वलंत प्रष्न निर्माण झाल्यामुळे त्यांचा मानसिक तणाव वाढला. त्यामुळे कर्मचा-यांनी अगदी अगतिक होऊन संचालकांकडे विनंती केल्यानंतर त्यांनी साधारणपणे 50 टक्के कर्मचा-यांना वेतन अदा केले. तथापि वेतनाची अनिष्चितता जाणवल्यामुळे सुमारे 15 ते 20 कर्मचारी सदर कंपनीतून काम सोडून गेले. माहे मे 2015 च्या शेवटच्या आठवडयांत कंपनीचे चीफ अकाऊंटंट श्री. श्री. माणिक शिंदे   यांच्या मोबाईल नं. 9921979090 वर श्री. राज गायकवाड यांनी स्वत त्यांचा मोबाईल फोनवरून माहे मार्च व एप्रिल चे वेतन मे अखेरपर्यंत करण्याचे आष्वासन दिले व माहे मे चे वेतन 5 जून पर्यंत करण्याचे आष्वासन दिले. सदर मोबाईलवरील संभाषण हे श्री. राज गायकवाड यांचे सांगणेवरून चीफ अकाऊंटंट श्री. माणिक षिदंे यांनी कर्मचा-यांना ऐकविले. माहे जून 2015 मध्ये पुन्हा कर्मचा-यांनी माहे 10 तारखेपर्यंत वेतन न मिळाल्यामुळे मी स्वत: व सत्यजित मंडले, योगेष वाघ असे सांगली येथील कंपनीच्या जागृती अॅग्रो या कंपनीच्या कार्यालयात श्री. राज गायकवाड यांची भेट घेतले, तेथे श्री. राज गायकवाड यांनी पगार हा दुय्यम मुद्या असून माझेकडे 10 कोटी रूपये पडुन आहेत. सदर वेळेस आम्ही श्री. राज गायकवाड यांचेबरोबर कंपनीचे कामकाज व्यवस्थित चालणेसंबंधी चर्चा केली. तथापि वेतनाचा मुद्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी नुकतेच शेळीपालनाचे क्लासेस चालु केलेले असून त्याचे माझेकडे 500 कोटी रूपये येणार आहेत, तुम्ही 60 ते 70 कर्मचा-यांचा किरकोळ प्रष्न घेऊन माझेकडे आला आहात, माझे सर्व कंपन्यांचे मिळुन 67 हजार कर्मचारी असून त्यांना मी सांभाळतो, माझेकडे 24 हजार एकर जमीन आहे अश्या  मोठमोठया भुलथापा कर्मचा-यांसमोर ठोकून कर्मचा-यांना वेतनाच्या मुद्यावर अधिक बोलू दिले नाही. तसेच तुम्ही आलाच आहात तर तुम्हांस रिकाम्या हाताने पाठवित नाही, असे म्हणुन वीस लाख रूपये किमंतीचा धनादेष जागृती अॅग्रो या कंपनीच्या खात्यावरील श्री. सलीम खंडायत यांचे वैयक्तिक नावाने दिला.
तथापि सदरील धनादेषाची रक्कम कर्मचा-यांना वेतनापोटी अदा करण्यात आलेली नाही. अषा पध्दतीने वर नमूद सर्व कर्मचा-यांना माहे मे व जून चे वेतन न मिळाल्यामुळे व अनेक कर्मचा-यांना माहे मार्च, एप्रिल चे देखील वेतन न मिळाल्यामुळे कर्मचा-यांचा धीर सूटत चालला. तथापि मी संपादक या नात्याने व माझेसह काही कर्मचा-यांनी इतर सर्व कर्मचा-यांना धीर धरण्याचा सल्ला देऊन यावर काही तरी तोडगा निघेल असे सांगून वाट पहाण्यास सांगितले. दिनांक 4 जूलै 2015 रोजी जागृजी अॅग्रोचे जनरल मॅनेजर श्री. सुजीत चव्हाण यांना श्री. राज गायकवाड यांना पुण्यात कंपनीच्या कार्यालयात पाठवून कर्मचा-यांना 10 जूलै 2015 चे दरम्यान सर्व थकित वेतन अदा करण्याचे आष्वासन दिले. परंतु दिनांक 8 जुलै 2015 रोजी श्री. राज गायकवाड यांनी श्री. सलीम खंडायत, श्री. माणिक षिदंे यांचेकरवी कर्मचा-यांना 10 जूलै 2015 रोजी वेतन होणार नाही, असे सांगुन दिनांक 10 जुलै 2015 रोजी सांगली येथे मिटींगसाठी बोलाविले. त्यानुसार दि. 10 जूलै 2015 रोजी श्री. राज गायकवाड यांचेसह श्री. सलीम खंडायत, श्री. माणिक शिंदे यांचेबरोबर मी व श्री. सत्यजित मंडले यांची मिटींग झाली. सदर मिटींगमध्ये श्री. राज गायकवाड यांनी 10 जूलै पर्यंत वेतन होण्याबाबत मी सुजीत चव्हाण यांस काहीही बोललो नाही, त्याला अक्कल नाही, त्यास फक्त पुण्याच्या कार्यालयात जाऊन परिस्थिती पाहून येण्याबाबत सांगितले होते, परंतु त्याने तुम्हांस चुकीच्या गोष्टी सांगितल्या, असे कथन केले. सदर मिटींगमध्ये कर्मचा-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. परंतु मिटींगमध्ये सुरूवातीस श्री. राज गायकवाड यांनी पाकिस्तानमधुन त्यांना 600 कोटी रूपयांची मटनाची ऑर्डर असून तुम्ही त्याच त्याच पगाराच्या किरकोळ मुद्यावर माझेषी चर्चा काय करतां, असे सांगुन नंतर पगाराच्या मुद्यावर माझे विरोधात बोलत आहात असे मला समजले आहे, परंतु माझेकडे 12 वकीलांची टीम आहे, पोलीस यंत्रणा माझे खिषात आहे, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर यांचेषी माझे घनिष्ठ संबंध असून त्यांना एका फोनवरून मी त्यांचेकडून काहीही करून घेऊ शकतो, असे म्हणुन कर्मचा-यांषी अरेरावीची भाषा केली. तसेच एप्रिल व मे महिन्याचे सर्वांचे वेतन 14 जूलै 2015 पर्यंत व जून महिन्याचे वेतन 25 जूलै 2015 रोजीचे वेतन करण्याचे आष्वासन दिले. वर नमूद केल्याप्रमाणे श्री. राज गायकवाड यांनी एचआर मॅनेजर दिपाली सरोदे यांचे मार्फत पगाराचे आष्वासन देणारा ई-मेल पाठविला. सदर ई-मेलमध्ये दोन ते तीन महिने कंपनीचे कामकाज थांबविण्याबाबतचा मजकूर लिहिला असून त्यानंतर पुन्हा कंपनीचे कामकाज चालू होईल असे आष्वासन दिलेले आहे. सदर ई-मेल मध्ये कर्मचा-यांना दूसरी नोकरी शोधण्याची परवानगी दिलेली आहे. परंतु काही कर्मचा-यांना माहे एप्रिल 2015 चे वेतन दिनांक 17 जूलै 2015 रोजी देऊन बाकीच्या कर्मचा-यांना अद्यापपर्यंत कोणतेही वेतन दिलेले नाही. महोदय, अषा रितीने कर्मचा-यांचे वेतन न देऊन सदर कंपनीच्या संचालकांनी तसेच वर नमूद पदाधिका-यांनी कर्मचा-यांची फसवणूक केलेली आहे तसेच त्यांच्या वेतनाच्या रकमेचा अपहार केलेला आहे. श्री. राज गायकवाड यांनी कंपनीचे चीफ अकाऊंटंट यांचेमार्फत कर्मचारी यांना दिनांक रोजी दादाच्या म्हणजेच राज गायकवाडच्याऋ नादी लागू नका, तो खुप डेंजर माणूस आहे, त्याच्या मोठमोठया राजकारणी, पोलीस व वरिष्ठ प्रषासकीय अधिका-यांषी घनिष्ठ संबंध आहेत अषी दमदाटी केली. श्री. राज गायकवाड यांचा ओंकार पंडीत हा कंपनीच्या आयटी मध्ये काम करणारा मित्र असून दिनांक 4 जूलै 2015 रोजी संध्याकाळी संध्या साधारण 5.30 ते 7.00 वा. चे दरम्यान कंपनीचा डेस्क एडिटर श्री. प्रसाद खेकाळे याला सांगा, दादांबद्यल काही बोलू नको, त्यांच्या नादी लागू नको, आई आणि बायको वरून षिवीगाळ करून अष्लील भाषा योगष वाघ, नितीन रिंढे, गणेष खळदकर यांचेसमोर केली. एव्हढे होऊन देखील सर्व कर्मचारी हे अत्यंत शांतपणे संचालकांसमोर त्यांच्या व्यथा मांडीत राहिले. परंतु त्याची कोणतीही दखल न घेतल्याने दिनांक 17 जूलै 2015 रोजी कंपनीच्या कार्यालयाबाहेर सर्व कर्मचा-यांनी मुक निदर्षन केले. कर्मचारी अषा पध्दतीने मुक निदर्षन करीत आहेत हे पाहून कंपनीने 17 जूलै 2015 पासून कंपनीचा स्टुडिओ, पीसीआर, एमसीआर, एडिटग्रॉफिक्स रूम यांना टाळे ठोकलेले आहे. मा. महोदय कंपनीच्या संचालकांचे व श्री. राज गायकवाड यांचे आजतागायतचे वर्तन व इतिहास पहातां त्यांनी सुरूवातीस पंढरपूर येथे चेन मार्केटिगं पध्दतीचा व्यवसाय सुरू करून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. तसेच जागृजी अॅग्रो या नांवाने कंपनीने अनेक गरीब शेतक-यांना खोटे आष्वासने देऊन फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रातील प्रसारमाध्यम क्षेत्रातील प्रसिध्द आणि विष्वसनीय फेसबुक पेज आणि ब्लॉग बेरक्या उर्फ नारद या ब्लॉगने देखील कंपनीच्या अषा फसवणुकीच्या प्रकारांची दखल घेतलेली आहे. सदर ब्लॉगने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर स्वत श्री राज गायकवाड यांनी त्या पेजवर सर्व कर्मचा-यांचे सर्व थकित वेतन दिनांक 17 जूलै 2015 रोजी बँकेत जमा केले असल्याचे खोटे जाहीर केले व अगदी मोजक्या कर्मचा-यांचे माहे एप्रिल 2015 पर्यंतचे वेतन जमा केले. कर्मचा-यांनी वारंवार सॅलरी स्लीप व टीडीएस कपातीचे प्रमाणपत्र मागून देखील कंपनीने आजतागायत त्याची पूर्तता केलेली नाही. आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवर कंपनीने भेटी लागी जिवा या कार्यक्रमासाठी जवळपास 15 लाखाची जागृती अॅग्रोची जाहिरात दिलेली आहे. तसेच इफ्तार पार्टयाचे आयोजन करून लाखो रूपयांची उधळपट्टी कंपनी करीत आहे. तसेच राज गायकवाड यांनी स्वत:चा वाढदिवस देखील अंदाजे 5000 लोकांना निमंत्रण देऊन सामिष जेवण व गाण्याचा कार्यक्रम आयोजित करून मोठया प्रमाणात पैषाची उधळपट्टी केलेली आहे. अषा प्रकारे कंपनीने स्वत:चे न्यूज चॅनेल बंद करून, कर्मचा-यांकडून आजतागायत कंपनीचे काम करून घेऊन त्यांचे वेतनाची रक्कम अषा प्रकारे उधळून कंपनीचे वर नमूद संचालक, राज गायकवाड, श्री. सलीम खंडायत, श्री. माणिक शिंदे , एचआर मॅनेजर दिपाली सरोदे यांनी कर्मचा-यांची घोर फसवणुक केली व त्यांच्या वेतनाच्या रकमेचा अपहार केलेला आहे, अषी माझी सर्व कर्मचा-यांच्या वतीने तक्रार आहे. तसेच श्री. राज गायकवाड, माणिक शिंदे, ओंकार पंडीत यांनी कर्मचा-यांना दमदाटी व अष्लील भाषेत षिवीगाळ केलेली आहे. सबब वर नमूद सर्व इसमांविरूध्द योग्य ती कायदेषीर कारवाई करावी, ही विनंती.
संजीव लक्ष्मण शाळगांवकर
                               

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

'मी मराठी'मध्ये बोंबाबोंब सुरू

लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेले घर विकत घेण्याच्या बाता मारणाऱ्या 'मी मराठी'ने आपल्या स्ट्रिंन्जरचे पेमेंट गेल्या तीन महिन्यापासून दिले नाही.त्यामुळे मालक महेश मोतेवार आणि मुख्य संपादक रवी आंबेकर यांच्या बाता म्हणजे हवेतील बुडबुडे असल्याची चर्चा खुद्द त्यांचे स्ट्रिंन्जरचे करू लागलेत.
मी मराठीच्या स्ट्रिंन्जर रिपोर्टरला अत्यंत तोकडे मानधन दिले जाते.या स्ट्रिंन्जर रिपोर्टरना फोनवरून अत्यंत त्रास दिला जातो,हे पाहिजे,ते पाहिजे असे सांगितले जाते आणि शेवटी अँकर आणि व्हिज्वल लावून अर्ध्या मिनिटात बातमी संपवले जाते.अर्ध्या मिनिटाच्या बातमीसाठी मात्र स्ट्रिंन्जर रिपोर्टरला दिवसभर पळवले जाते.ऐवढे करूनही त्यांना त्यांच्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे वेळेवर मिळत नाहीत.गेल्या तीन महिन्यापासून त्यांना मानधनच मिळाले नाही.बिलाची वारंवार मागणी करणे आणि बिल मंजूर झाल्यानंतर सातत्याने अकाऊंटकडून बँक डिटेल्स मागितले जाते आणि तारीख पे तारीख दिली जाते.
लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे घर खरेदी करण्याऐवजी मोतेवार आणि त्यांचे प्यादे यांनी पहिले स्ट्रिंन्जरचे बिल वेळेवर द्यावे,कर्मचाऱ्यांना गेल्या अडीच वर्षापासून पगार वाढ झालेली नाही,ती द्यावी,ही मागणी होत आहे.


समृध्द जीवनच्या महेश मोतेवार यांनी मी मराठी,लाइव्ह इंडियाचॅनलबरोबर पाच महिन्यापुर्वी मुुंबईतून मी मराठी लाइव्ह हे दैनिक सुरू केले.
या दैनिकांत काम करणाऱ्या स्ट्रिंजर रिपोर्टरनाही गेल्या पाच महिन्यांत दमडाही मिळाला नाही.लंडनमधील घर खरेदी करणाऱ्या मोतीवारांनी पहिले आपल्या घरातील माणसे सुखी ठेवावीत मग मोठ्या मोठ्या गप्पा मारव्यात...
वारे रे मोतेवार...नुसते हवेतील वार करू नका...यांचे नाव आता हवेवार ठेवा...
........................

बेरक्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब... 
मुंबई... प्रशांत बाग यांचा अखेर जय महाराष्ट्र,..लवकरच IBN नाशिक ब्युरो चिफ म्हणून रुजू होणार,.. बाग यांनी मंगळवारी थेट मुंंबईला येऊन दिला राजीनामा..

....................

तब्बल आठवड्यानंतर महाराष्ट्र वन ने मागील दोन दिवसात किमान १२५ जणांच्या मुलाखती घेतल्या. यात सध्या काम करत असेलेले पत्रकार आणि बहुतांशी चेहरे नवखे होते. नव्या कार्यालयातील मिटिंग रूम मध्ये स्वत: वागळेंच्या उजव्या बाजूला कलमनामा, कोल्हापूरचा गडी, आणि डाव्या बाजूला धुळपांची कन्या , मंत्रालयाचा आशिष मागे होता. यात तरुण भारतच्या २, झी २४ चा १, भविष्य काळाच्या उदयाची १ असे जुने जाणते आणि नवखे तोंडाला रंगरंगोटी करून आले होते. इंडीयन टेलिव्हिजन वर वागळेंची फोने वरून मुलाखत घेणारेही पत्रकार आले होते.याचे नियोजन गायकवाड आणि परचुरे करीत होते. 
...................

एबीपी माझाचा दिल्ली प्रतिनिधी कौस्तुभ फलटणकर यांची अखेर माझाला सोडचिठ्ठी
पण कौस्तुभची गाडी महाराष्ट्र 1 कडे वळता वळता आयबीएन - लोकमतकडे वळली...
दिल्ली प्रतिनिधी म्हणून काम करणार... 

सोमवार, २४ ऑगस्ट, २०१५

स्ट्रिंगर रिपोर्टरच्या समस्या कोण सोडवणार ?


सुधाकर शेट्टी यांच्या जय महाराष्ट्रने एकीकडे मेगा भरती काढली आहे तर दुसरीकडे राज्यातील स्ट्रिंगर रिपोर्टरचे पेमेंट चार महिन्यापासून थकवले आहे.त्यामुळं स्ट्रिंगर रिपोर्टरमध्ये असंतोष खदखदत आहे.स्ट्रिंगर रिपोर्टरच्या व्हॉटस एॅप
ग्रुपवर यावर बरीच चर्चा रंगली होती.
जय महाराष्ट्रचे मुंबईसह राज्यात जवळपास ६८ स्ट्रिंगर रिपोर्टर आहेत.मात्र नव्या साहेंबानी नवी समीकरणे आखाण्यास सुरूवात केलेली आहे.फक्त मेट्रो सिटीवर नव्या साहेबांचा भर आहे.त्यामुळे ही संख्या ४० वर करण्याचा विचार सुरू आहे.
काही इच्छुक रिपोर्टर वागळेंच्या येवू घातलेल्या चॅनलच्या मुलाखतीसाठी मुंबईत गेले असता,जाता-जाता त्यांनी जय महाराष्ट्रकडे चक्कर मारली व मँनेजिंग एडिटरची भेट घेतली असता त्यांना हे स्पष्ट सांगण्यात आलं की,आहे तेच कमी करण्यात येणार आहेत.त्याऐवजी तुम्ही वेबसाईट सुरू करा,असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.
जे या क्षेत्रात आहेत त्यांना अनुभव नसल्यामुळं संधी मिळत नाही.अरे संधी दिली तर अनुभव मिळेल ना...राज्यातील अनेक ठिकाणी एकाच घरात तीन ते चार चॅनल आहेत.त्यामुळं एकच फुटेज आलटून पालटून सर्व चॅनलला पाठवले जाते.अश्यां लोकांना नारळ दिला पाहिजे आणि नविन होतकरू मुलांना संधी दिली पाहिजे.
पत्रकारितेत एकप्रकारचे नैराश्य आले असताना वागळेंच्या चॅनलमुळं एक नवी आशा निर्माण झाली होती.परंतु वागळेंचे चॅनल स्ट्रिंगरना पैसेच देणार नसल्यामुळं एक प्रकारचा भ्रमनिरास झालेला आहे.
झी तास स्ट्रिंगरना वेळेवर पेमेंट देत असले तरी ३० हजाराच्या पुढे बिल जात असेल तर त्यांत कपात करण्याचा निर्णय घेतलाय.एबीपी माझाबद्दल स्ट्रिंगरची तक्रार नाही.आयबीएन - लोकमत आणि टीव्ही ९ मोजक्या स्टो-या लावत असल्यामुळं त्यांचं बिल १० हजाराच्या पुढे जात नाही.मी मराठीचीही तिच बोंब आहे.जेमतेम पाच ते दहा हजार रूपये हातात पडत आहेत.स्टिंगर रिपोर्टरची अवस्था धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी आहे.
तुटपुंज्या मानधनामुळं अनेक स्ट्रिगर रिपोर्टर आर्थिक अडचणीत आहेत.जे लुच्चे आणि लफंगे आहेत,त्यांना मानधनाचे काही वाटत नाही.परंतु जे प्रामाणिकपणे काम करतात,त्यांचे अवघड आहे.मुंबईतील एका स्ट्रिंगर रिपोर्टरने आर्थिक अडचणीमुळंच काही दिवसांपुर्वी आत्महत्त्या केली होती.असे प्रकार थांबवण्याठी स्ट्रिंगर रिपोर्टरना आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे.

वागळेंचे महाराष्ट्र १ चॅनल गांधी जयंतीपासून दिसणार...

निखिल वागळे यांच्या येवू घातलेल्या महाराष्ट्र १ न्यूज चॅनलबद्दल सध्या महाराष्ट्रात चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया येत आहेत.काहींच्या मते चॅनलची चर्चा होईल पण टीआरपी मिळणार नाही,कारण आयबीएन -लोकमत जेव्हा सुरू झाले तेव्हा दोन वर्षे टीआरपी मिळाला नव्हता.तेव्हाही वागळे होतेच.आता तर वागळेंकडे तेवढा पैसाही नाही.काहींच्या मते आर्थिक अडचणीमुळं हे चॅनल लवकरच डबघाईस येईल.या चॅनलच्या निमित्ताने निखिल वागळे यांचा कस लागणार आहे.
महाराष्ट्र १ चॅनलचा परवाना व्हीआयपी ग्रुपचा असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या हिंदीमध्ये व्हीआयपी चॅनल आहे.त्यांचाच हा परवाना आहे.महाराष्ट्र १ ची पडद्यामागील सर्व सुत्रे संदीप चव्हाण हालवत आहे.चॅनलसाठी आर्थिक फंड गोळा करण्यासाठी संदीप चव्हाण,संजय शर्मा,बिरेन कंसारा हे तिघेजण अनेकांशी संपर्क साधत असल्याचे बेरक्या सुत्राकडून सांगण्यात आले.या चॅनलमध्ये कॉन्ट्रक्टर नरेंद्र पाटील,सुनील झव्हर तसेच अनंत कोल्हे यांनी सध्या पैसा गुंतवल्याची माहिती बेरक्याच्या हाती आली आहे.आतापर्यंत १० ते १२ कोटी रूपये जमा झाल्याचे सांगण्यात आले.
या चॅनलच्या स्टुडिओचे काम लोअर परेलमधील सिताराम मिल कंपाऊंडमधील त्याच बिल्डींगमध्ये सुरू आहे.१ सप्टेंबरपासून या चॅनलची चाचणी सुरू होणार असून,२ ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी चॅनल प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पुण्याचे जागृती चॅनल पाच कोटीच्या आत सुरू झाले होते.जागृतीने कोठेही ब्युरो ऑफीस केले नव्हते किंवा ओबी व्हॅन घेतली नव्हती.महाराष्ट्र १ ची वाटचालही तशीच आहे.
महाराष्ट्र १ चॅनल पुणे वगळता कोठेही ब्युरो देणार नाही.सगळीकडे स्ट्रिंगरनियुक्त करणार आहे.तेही फुकट हवे आहेत.स्टुडिओमध्ये १२० माणसांची गरज असताना फक्त ९० माणसे नियुक्त करण्यात येणार आहे.काटकसरीवर भर राहणार आहे.
दुसरे असे की,या चॅनलमध्ये जास्तीत जास्त डिबेट शो होणार आहेत.त्यामुळं सबकुछ वागळे राहणार आहेत.

फोकस न्यूज़ चॅनलचा सामाजिक भान असलेला आगळा वेगळा शो

फोकस नेशनल न्यूज़ चॅनेलवर 15 ऑगस्टपासुन महिला सबलीकरण आणि बेटी बचाओ या संकल्पनेला आणखी मजबूत करणारा 'अबके बरस मोहे बिटियाही दिजो'हा टीव्ही शो सुरु झाला आहे..या चॅनलच्या सोशल एंड जेंडर विभागाच्या संपादिका डॉ मीना शर्मा शोच्या होस्ट आहेत. शारिरिक व्यंगावर मात करत आईएएस ची परीक्षा टॉप करणाऱ्या इरा सिंघल पासून ते उंचच उंच आकाशातून अतीबर्फाळ अंटार्टिका खंडावर स्काय डाइव करणाऱ्या पुण्याच्या पदमश्री शीतल महाजन पर्यन्त साहसी महिलांचा अत्यंत साहसी सफ़र या शोमधुन दाखवला जात आहे..
मुळात नेशनल चॅनेलच्या रोजच्या बातम्यांच्या धबडग्यात आणि क्राइम आणि इतर सवंग शोच्या रांगेत फोकस न्यूज़चा हा शो खुपच सरस ठरतो आहे..टीआरपीचा कोणताही सोस न बाळगता या शोची निर्मिति चांगल्या समाजासाठी केली गेली आहे..किंबहुना अस म्हणता येईल की हा अत्यंत नविन प्रयोग आहे..पुरुषी मक्तेदारी मोडून काढत अनेक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांची ही यशोगाथा म्हणजेच 'अबके बरस मोहे बिटियाही दिजो' तांत्रिक गुणवत्ता सांभाळत नॉएडाच्या भव्यदिव्य स्टुडिओत या शो ची निर्मिति केलि जात आहे.
त्यासाठी देशभरातले फोकस न्यूज़ चे ब्यूरो अत्यंत मेहनतीने रिसर्च करुन अशा महिलांचा शोध घेत त्यांना समाजसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत..
फोकस न्यूज़चे एसोसिएट एडिटर मनोज भोयर यांनीही या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या अशा खास महिलांचा इंटरव्यू घेतला आहे.ज्यात पुरुषी अस्तित्व असणाऱ्या लोकल ट्रेंनच्या चालकांमधे उठून दिसणारी एकमेव महिला लोकल ट्रेन ड्राईवर मुमताज शेख,डिटेक्टिव रजनी पंडित,पुण्याची स्काय डायवर पद्मश्री शीतल महाजन,दलित उद्योजक कल्पना सरोज,पासस्ट हजार डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ रागिणी पारेख, आदी महिला सामिल आहेत..महाराष्ट्रात प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत आपल्या कर्तुत्वाची पताका दाही दिशेला फड़कविणाऱ्या अशा खुप महिला आहेत..त्यांचाही परिचय या चॅनेलवर पुढे केला जाणार आहे.इतकच नव्हे तर तरुण मुलामुलीसोबत या महिलांचा टॉक शो सुद्धा पाहायला मिळणार आहे...
केंद्रीय बाल आणि महिला विकास मंत्री मेनका गांधी यांनी जातीन 10 ऑगस्टच्या लॉन्चिंग कार्यक्रमात हजेरी लावून उपस्थित तरुण पीढ़ीशी संवाद साधला.त्यांच्या मंत्रालयान या कार्यक्रमाची खास दखल घेतली..
त्यासाठी बेरक्याच्या फोकस न्यूजला शुभेच्छा आणि अत्यंत प्रेरणादायी असा समाजपयोगी आणि इतर चॅनललाही मार्ग दाखविनारा कार्यक्रम सुरु केल्याबद्दल धन्यवाद..


शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

आयबीएन - लोकमतची मेगा भरती...


शुक्रवारी मुंबईत IBN लोकमतच्या विविध रिकाम्या जागांसाठी मुलाखती झाल्या. नेटवर्क 18 चे अध्यक्ष उमेश उपाध्याय यांनी स्वत: या मुलाखती घेतल्या. यासाठी ABP माझाच्या चार जणांनी, झीच्या एकानं, TV9 च्या चार जणांनी, जय महाराष्ट्रच्या आठ जणांनी, मी मराठीच्या चौघांनी तर सामच्या एकाने मुलाखत दिली. आठ दिवसांत या मुलाखतीतून निवडलेल्यांची अंतिम यादी करण्यात येणार आहे.


 आयबीएन लोकमतमध्ये कोण कोण मुलाखती दिल्या,याची यादी बेरक्याच्या हाती आली आहे,परंतु या कर्मचाऱ्यांचा भवितव्याचा विचार करून यादी प्रसिध्द करण्यात येणार नाही...

काही तरी 'प्रसन्न' करा रे....

काही असो,जय महाराष्ट्रचे मालक प्रयोगशील दिसताहेत.त्यांनी समीरण वाळवेकर,प्रसन्न जोशी आणि निलेश खरे असे पट्टीचे सेनापती घेवून चॅनलचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे.आता मेगा भरती इव्हेंट काढला आहे.अनेक पदे भरण्यात येणार आहेत,त्याचबरोबर दिल्लीसह राज्यातील मेट्रो सिटी मध्ये ब्युरोही नियुक्त करण्यात येणार आहेत.
नाशिकचे ब्युरो चीफ प्रशांत बाग याने स्वत:हून राजीनामा देवून आयबीएन - लोकमतची वाट धरली आहे.नागपूरच्या ब्युरोला मात्र नारळ देण्यात आलाय.कोल्हापूर आणि पुणे बाबत अधिकृत माहिती नाही.
एकीकडे माणसे काढायची आणि नंतर पुन्हा माणसे भरती करायची ही जय महाराष्ट्रची जुनी खोड आहे.यांचा कोणावरही विश्वास नाही.आहे त्या माणसांना तयार केले आणि त्यांच्यावर विश्वास दाखवला तर ते संधीचे सोने केले असते,पण इथे सर्व अविश्वासाचे वातावरण आहे.
नविन साहेब आला की तो त्याच्या स्टाईलने काम करतो.मंदार फणसे,रविंद्र आंबेकर,तुळशीदास भोईटे गेल्यांनंतर शैलेश लांबे आले.त्यांनी आणि आनंद गायकवाड यांनी चॅनलचे पार वाटोळे केले.नंतर आलेल्या विलास आठवले यांनी चॅनलला पुर्व पदावर आणले पण पुन्हा त्यांच्या डोक्यावर एक नव्हे तर तीन माणसे आणली.आता चॅनलमध्ये असे वातावरण करून ठेवले आहे की विलास आठवले यांनी स्वत:हून राजीनामा द्यावा.त्यांचा रात्रीचा लक्षवेधी काढून घेण्यात आला.कोणतीही बातमी आली की हे नको,ते नको म्हणून आठवलेंना सांगितले जाते.बिचारे आठवले काय करणार ? त्यांना गप्प गुमान एक तर काम करावे लागेल नाही तर राजीनामा देवून दुसरे चॅनल शोधावे लागेल.तसे विलासचेही बरेच काही चुकले म्हणा.त्यांना राम कदम यांचा पंगा खूपच महागात पडला.राम कदमांनीच आठवलेंचा गेम केल्याची चर्चा आहे.
असो,निखिल वागळेंच्या चॅनलकडून पुरता भ्रमनिरास झाल्यानंतर अनेकांना आता जय महाराष्ट्र ऑप्शन दिसू लागले आहे.
पण भरती केल्यानंतर कोणाला काढणार नाहीत आणि कोणावर अन्याय होणार नाही,याची खात्री कोण देईल का ?
जय महाराष्ट्रमध्ये आता कर्मचा-यांना विश्वास देण्याची गरज आहे.असा विश्वास मिळाला तरच चॅनल नक्कीच स्पर्धेत येईल नाही तर असे किती आले आणि गेले पण चॅनल आहे तिथचं असा संदेश जाईल...
काही तरी 'प्रसन्न' करा रे....

"जय महाराष्ट्र" वृत्तवाहिनीसोबत काम करण्याची संधी!!

विविध पदांसाठी अनुभवी किंवा नवोदित व्यक्तींकडून पुढील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदे :
मुंबई (अंधेरी पश्चिम): येथील मुख्यालयात निर्माता, सहाय्यक निर्माता, निर्मिती सहाय्यक, वृत्त उद्घोषक व सूत्रसंचालक (अँकर्स)
उपकेंद्र प्रतिनिधी (ब्युरो): दिल्ली,मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर येथे प्रतिनिधी
पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी, पत्रकारिता किंवा संज्ञापन विषयातील पदवी किंवा पदविका.
उत्तम सर्वसामान्य ज्ञान, मराठी आणि हिंदी भाषेवर उत्तम प्रभुत्व, वक्तृत्व आणि संवाद कौशल्य, इंग्लिशचे ज्ञान, आकर्षक व्यक्तिमत्व, प्रसारण तंत्राची (कॅमेरा, एफटीपी, ओबी, एडिटिंग इ.) माहिती व अनुभव.
२० ते ३५ वर्षे वयाच्या महिला व पुरुष इच्छुकांनी वरील विविध पदांसाठी पात्रतेनुसार फक्त
ई-मेल वर स्वतःची संपूर्ण माहिती, अनुभव आणि छायाचित्रासह दि. ३० ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवावेत. पात्रतेचे नियम शिथिलक्षम. निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येईल. याबाबत वृत्तवाहिनीच्या कुठल्याही व्यक्तीशी थेट संपर्क साधू नये.
अर्ज पाठविण्यासाठी इमेल :
recruitment@jaimaharashtranews.tv
........................
‪#‎Ref‬: prasanna joshi's post

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

माझाच्या अर्धवटरावांची फजितीपरवा बीजेपी सॉरी एबीपी माझावर अर्धवटराव पञकारांची चांगलीच फजिती झाली. पुरंदरेपुराण सुरु होतं. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांची मुलाखत घ्यायला माझाने तीन पञकार बसवले. या पञकांरांनी मोठ्या आवेशात आव्हाडांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण अर्धवट माहिती आणि अतिशहाणणा कशा तोंडावर पाडतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ती मुलाखत होती.
यात आव्हाड तिघांनाही पुरुन उरलेच पण त्यांचा पुरंदरे अजेंडाही उघडा पाडला. मुलाखत घेताना नुसता आवेश असून चालत नाही, थोडा आभ्यास लागतो हे आजच्या नवख्या पोरांना कोणीतरी सांगयची गरज आहे. नाहीतर मग हसू होतं.
महाराजांची समाधी कोणी शोधून काढली हे यांना माहीत नव्हतं. एकजण तर ऑब्जेक्टिव्हवर बोलू नका म्हणत होता. यांच्या बालबुद्धीची कीव येत होती.
मागे ओवेसींनी असाच यांचा सामूहिक समाचार घेतला होता आणि आता आव्हाडांनी पिसं काढली.
माझाचं एक कळत नाही,एकाची मुलाखत घ्यायला तिघे तिघे कशाला लागतात ?
तरीही यांना समोरचा पुरून उरतो...
अवघड आहे बुवा..

सांगलीत रिपोर्टरला बारमालकाने बेदम चोपले

'महाराष्ट्राचा मानबिंदू' सोडून 'पद्मश्रीं'च्या पेपरमध्ये गेलेल्या एका रिपोर्टरला एका बारमालकाने बेदम चोपल्याची चर्चा सांगलीत चांगलीच रंगू लागली आहे.
हा रिपोर्टर एका बारमध्ये 'बस'ण्यास गेला होता.भरपूर तिर्थप्राशन केल्यानंतर त्याने बिलावरून गोंधळ सुरू केला.यावेळी बार मालकांवर दबाब आणण्यासाठी त्याने आपल्या खिशातील ओळखपत्र दाखवले,मग काय बार मालक आणखी संतापला.
बार मालकाने त्यांला एका खोलीत डांबून बेदम चोपले.दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या गुरूच्या सांगण्यावरून सुटका केली.
हा हा म्हणता,ही वार्ता पद्श्रीच्या कानावर गेली.त्यांनी जाब विचारला असता,हा रिपोर्टर बार मालकाकडे गेला आणि हातापाया पडून हा प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचे लिहून घेतले.
पद्मश्रीने त्यांना मोठ्या मनाने माफ केले असले तरी सांगलीत मात्र त्यांची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.
बारमध्ये केव्हाही बसणाऱ्या या रिपोर्टरला आता माफ करावे की एक वेळ सुधारण्याची संधी द्यावी,आता तुम्हीच ठरवा...

दैनिक "जनशक्ति"चे मुख्यालय आता पुण्यात !!

दैनिक 'जनशक्ति'चे मुख्यालय आणि संपादकीय कामकाजाचे मुख्यालय पुढील महिन्यापासून जळगावातून पुण्यात हलविले जाणार आहे. जळगावातील जुनी आवृत्ती व कार्यालय सुरुच राहील. पुण्यातील आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) कार्यालयही आहे तिथेच राहील. मात्र, लवकरच पुणे शहरात फर्गसन कॉलेजसमोर FC रोडवर पुणे कार्यालय कार्यान्वित होईल. जागेसंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर होताच पुणे आवृत्तीही सुरु केली जाईल. याशिवाय लवकरच पुणे-मुंबई हायवेला लागून वाशी (नवी मुंबई) येथे "जनशक्ति"चे कार्यालय सुरु होत आहे. त्यानंतर तेथून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड आवृत्ती सुरु केली जाईल. कार्यकारी संपादक विक्रांत पाटील हे यापुढे जळगावऐवजी पुणे आणि आकुर्डी कार्यालयात बसतील.
याशिवाय रायगडातील एका परंपरा असलेल्या दैनिकात अनेक वर्षे संपादक राहिलेल्या चळवळीतील, लढाऊ पत्रकाराशी "जनशक्ति"ची बोलणी सुरु आहेत. त्यांना सन्मानजनक पद बहाल करून पुणे व मुंबईसह महाराष्ट्रात "जनशक्ति"चा चेहरा म्हणून स्थान दिले जाईल. तेही पुणे तसेच नरिमन पॉईन्ट (मुंबई) कार्यालयात बसतील. दैनंदिन संपादकीय प्रत्यक्ष कामकाजात त्यांना फारसे गुंतवून ठेवू नये, असा व्यवस्थापनाचा आग्रह आहे. नवी मुंबई आणि रायगड या आवृत्त्या विकसित करण्याची जबाबदारी मात्र त्यांना दिली जाईल.
"जनशक्ति"चे मुंबईतील सुरुवातीपासूनचे ब्युरो चीफ नितीन सावंत हेही दुखण्यातून सावरल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू करणार आहेत.
जळगाव कार्यालयातील सोयम अस्वार हे पुणे कार्यालयात सीनीअर सबएडिटर म्हणून रुजू होत आहेत. याशिवाय योगेश चौधरी हे मुंबई-पुण्यात फोटोग्राफर असतील. आनंद सुरवाडे यांना 1 सप्टेंबरपासून जळगाव कार्यालयात सीनीअर सबएडिटर म्हणून पदोन्नती देण्यात येत आहे.
पुण्यातील कामकाजास 1 सप्टेंबरपासून नव्याने जोमात सुरुवात केली जाणार आहे. पुण्यात तसेच नवी मुंबई आणि रायगड आवृत्तीत संपादकीय DTP स्टाफ, स्ट्रीन्जर आणि वार्ताहर म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्यांनी 7767012222 या मोबाईल क्रमांकावर SMS किंवा व्हॉटस-अप करावे. (कृपया कॉल करू नये) यापूर्वी अर्ज केलेल्यांनीही इच्छुक असल्यास संपर्क करावा.
पुणे तसेच जळगावातही जाहिरात, मार्केटिंग, वितरण स्टाफ तसेच टार्गेट ड्रिव्हन काम करू शकेल, अशा व्यवस्थापकाची आवश्यकता आहे. इच्छुकांनी संपर्क करावा.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

चांगल्या समाजासाठीमध्ये धुसफुस सुरू

'माझ्या या प्रितीला बातम्यांची रित'च कळत नसल्यामुळं 'चांगल्या समाजा'साठी चॅनलला गळती सुरू झाली आहे.कोल्हापूरच्या रिपोर्टरने राजीनामा तोंडावर फेकून 'महाराष्ट्र टाइम्स' जॉईन केलाय,तर पुण्यातील दोन स्ट्रींजर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.मावळची एक महिला रिपोर्टरही या मॅडममुळं मेताकुटीस आल्या आहेत.
या तेलगू मॅडम तश्या कामात बाप आहेत.यांची मराठी मोडकी तोडकी आहे.( वास्तविक या मॅडम सिंधी आहेत,परंतु त्यांना सर्व तेलगू म्हणूनच  ओळखतात...) या अमराठी
मॅडम हैद्राबादी आण्णांच्या लाडक्या असल्यामुळं त्यांचा बालकी बाका होवू शकत नाही.त्यांना प्रतिस्पर्धी चॅनलपेक्षा आपल्याकडं लवकर ब्रेकिंग हवी असते.प्रतिस्पर्धी चॅनलला त्यांच्या चॅनलच्या अगोदर ब्रेकिंग सुरू झाली की या जाम भडकतात.डायरेक्ट त्या रिपोर्टरला पुरूषी शिव्या घालतात.मग काय बिचारे स्ट्रींजर गप्प गुमान ऐकूण घेतात.पण प्रतिस्पर्धी चॅनलपेक्षा अगोदर ब्रेकिंग दिली किंवा चांगली स्टोरी दिली तरी त्या कधी कौतुकाची थाप मारत नाहीत,त्यामुळं बिचारे रिपोर्टर तंग आलेत.
हे झाले रिपोर्टरच्या बाततीत.हेड ऑफीसमध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत.चांगले लोक येण्यास तयार नाहीत.या तेलगू मॅडम,सहारातून आलेल्या मॅडम आणि ईटीव्हीतून आलेला 'वक्रतुंड' यांची चांगली गट्टी असल्यामुळं एक त्रिकुट तयार झाले असून या त्रिकुटाला अनेकजण वैतागलेत.
'वक्रतुंड'च्या विरोधात अनेक वर्षापासून 'क्राईम शो' पाहणा-या 'झोपडपट्टी बाबू'ने हैद्राबादी आण्णांकडे थेट तक्रार केली होती.तेव्हा आण्णांनी या वक्रतुंडांची चांगलीच पिसं काढली.वक्रतुंडाला घरच्याकडूनच 'कडू मोदक' मिळू लागल्यामुळं तोही रूष्ठ झालाय.त्यांन वागळेंच्या चॅनलकडे आपली सोंड वळवण्याचा प्रयत्न केला होता पण तिथं बसलेला नंदीनं त्याची सारी मनसुबे पार धुळीला मिळवली.मग काय वक्रतुड सध्या थंडगार झालाय.
असो,चांगल्या समाजासाठी सुरू झालेल्या या चॅनलमध्ये सध्या असंतोष धुमसत आहे.अनेकजण चांगल्या संधीच्या शोधात आहेत.त्यामुळंच या ठिकाणी सध्या खो - खो सुरू आहे.

वाहिन्यांना पत्रकार हवे आहेत की रोजंदारीने काम करणारे तरुण ?

अनुभव कथन -3
मोठ्या मोठ्याने बोलून आपल मत ठामपणे मांडणारे महाराष्ट्रातील मोठ्ठे मराठी पत्रकार निखील वागळे यांनी आपल्या वाहिनीसाठी ३ दिवस डी.टी.सी. इमारतीमध्ये तीन मुलाखतीचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. तीन दिवस उमेदवारांच्या रंगाच्यारांगा लागल्या, जेव्हा याची जाहिरात वाचायला मिळाली त्यात कुठेही कोणत्या पदासाठी ,कोणासाठी म्हणजे स्थानिकांसाठी की बाहेरगावाच्यांसाठी,पत्रकार हवेत म्हणजे फिल्ड मध्ये काम करणारे की डेस्क वर असा कुठलाही उल्लेख नव्हता .त्यातल्या त्यात पत्त्यात कुठला एरिया येतो म्हणजे लोअर परेल असा उल्लेख नव्हता.यामध्ये सर्वात जास्ती मनस्ताप बाहेर गावाच्या उमेदवारांना झाला .
या मुलाखतीमध्ये स्थानिकांचाच जास्त भरणा होता .त्यांच्या जोरावरच मुलाखतीला प्रचंड गर्दी असे सांगण्यात आले यातले बोटावर मोजण्या इतके पत्रकार सोडता बाकी सर्व जनसंवाद विभागाचे विद्यार्थी होते. त्यामुळे यातील बहुतेकांना फुकट ६ ,४, महिने काम करा असे सांगण्यात आले .
मी मुलाखतीच्या दुसर्या दिवशी पोहचलो .बाहेरगावचा असल्याने पहिल्यांदा तर एवढी गर्दी पाहून कुठे आलो अस वाटल.इमारतीचा पत्ता शोधण्यासाठी आधीच १५ तास प्रवासात गेले असताना ही इमारत शोधत एक तास पायी चालत आलो .प्रचंड गर्दी बघून मन खिन्न झाल त्यातल्या त्यात हे ऑफीस म्हणजे कोंडवडा.एवढी मोठी रांग त्यात अजिबात हवा नाही पाणी तर नाहीच पण बाथरूम सुद्धा नव्हत .
एवढी गर्दी पाहून मन खिन्न झाल पण नंतर समोर गेल्यावर विनायक गायकवाड नावाच्या मुलाने बाहेरगावाचा असल्याने घेतो लवकर म्हणून अर्जावर एस अस लिहून दिल.एवढ्या उकाड्यात दोनच पंखे होते ते दोनही पंखे विनायकाच्याजवळ होते बाकी सगळे हात हलवत होते .यातही ज्या सुंदरी anchor साठी आल्या होत्या त्यांच्या मेकअपचा ब्यांड वाजला म्हणून आधीच अस्वथ होत्या .त्यात ३ तास वाट बघितल्यानंतर माझा नंबर लागला .ज्यांच्या अर्जावर एस अस लिहील होत त्यांची मुलाखत दीप्ती राउत या बाई घेत होत्या..
घामाघूम असलेला मी आत गेलो आत कोणी साध पाणी पण विचारलं नाही ..वागळेच्या शिलेदाराना साध पाणी पण उमेदवारांना पुरवता आल नाही .आत केबिन मध्ये गेलो म्याडम ए सी मध्ये बसून आत गेल्यावर वाटल इथेच आराम करावा इतक आरामदायी ठिकाण ! म्याडमनी सी.वी. बघितला आणि ५ मिनिटात तुम्ही आवड म्हणून आले का या क्षेत्रात ..तुमच्या कडली कोणती बातमी द्याल असे प्रश्न विचारले पण बोलू फारसे दिले नाही मग तुम्ही stringer म्हणून काम कराल की पत्रकार म्हणून हा प्रश्न विचारला सरला बाईंचा interview ..
जर यांना अंशकालीन काम करणारे लोक हवे होते ते यांना सी वी वरून भेटले असते त्यासाठी मुलाखतीचा घाट घालण्याची मुळीच गरज नव्हती .स्थानिकांना फुकट काम करा आणि बाहेरच्यांनी अंशकालीन, मग मुलाखती घेतल्याच कशाला? एवढी गर्दी एवढा प्रवास सार फुकट गेल अस वाटायला लागल ..म्हणजे नव्या वाहिनीला प्रचंड लोक काम करण्यासाठी उत्सुक आहेत अस चित्र वागळे यांना तयार करायचं होत .सगळ्यांना एक संधी हवी असते वागळे साहेब ती जर तुम्हाला आय.बी.एन. या वाहिनीने दिली नसती तर तुम्हालाही लोक ओळखत होते पण आमच्यासारख्या तरुणात तुम्ही लोकप्रिय झाले नसते ..
जाता जाता गायकवाडचा आवाज ऐकू आला आजचा मुलाखतीचा कार्यक्रम संपला रांगेत असणार्यांना टोकन देण्यात येईल त्यानी उद्या यावे .मी म्हंटल कोपरापासून नमस्कार..
मनात अनेक विचार येत होते पत्रकारिता करिअर म्हणून निवडून चूक केली का? घरी काय सांगू ? असे अनेक प्रश्न एवढ्या दुरून आलो न जेवता काही खातापिता सरळ मुलाखतीसाठी आलो पण निराश झालो तुम्ही निवडल्या गेले की नाही हे कधी सांगणार हे पण सांगितलं नाही . 
वगळेनी आपला पूर्ण पगारी स्टाफ आधीच निवडला होता आता फुकट काम करण्यासाठी त्यानी हा तीन दिवसीय मुलाखतीचा कार्यक्रम पार पाडला .आमच्यासारख्या तरुणांमध्ये क्रेझ असणाऱ्या वागळेसाहेबानी रोजंदारीवर काम करणारे तरुण हवे अशी जाहिरात द्यायला हवी होती .
पण असो त्यांना आजचा हा आमचा सवाल कोण विचारणार ???

- विदर्भातील एक तरुण

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

महाराष्ट्रनामा...


कोल्हापुरात 'पद्मश्री'चे वार सुरूच...
लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचा आज 11 वा वर्धापनदिन..
म्हणाले,आमचा आज 'वाढ' दिवस...
'हंसा'चा दाखला दाखवून म्हणाले,आम्हीच नंबर 1
आज दर्डा कंपनी कोल्हापुरात हजेरी लावणार...
नेमक्या आजच्या दिवशी पद्मश्रींनी 'कोळसा 'दाखवला...
काहीही हां पद्म'श्री'... .....................................................


राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नागपूरातील काही वरिष्ठ संघ (RSS) कव्हर करणाऱ्या पत्रकारांचा एक संघ शिक्षा वर्ग घेतला.... यात १८-२० पत्रकारांचा समावेश होता. संघाची भुमिका काय, संघ कशा पद्धतीनं काम करतो, त्यासोबतच संघाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आतापर्यंत संघ माध्यमांपासून लांब रहायचा, पण आता संघाच्या प्रसार आणि प्रचारासाठी संघ माध्यमांशी जवळीक साधत आहे. येत्या काळात नागपूर मध्ये माध्यमांसमोर संघाची भुमिका मांडण्यासाठी एक प्रतिनिधी देण्याच्या विचारातही संघ असल्याचं, यावेळच्या बैठकीत सांगण्यात आलं. विदर्भाचे प्रसिद्धी प्रमुख पिंगळे आणि नागपूर महानगर संघचालक यांनी पत्रकारांचा हा वर्ग घेतला. सर्व चानल आणि प्रमुख वृत्तपत्रांचे RSS कव्हर करणारे पत्रकार यावेळी उपस्थित होते.

...................

संपादकांना गोळ्या घालण्याची धमकी.
....................................................
दबंग दुनिया या हिंदी दैनिकाचे संपादक सत्यनारायण तिवारी यांना 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता.'तुम्ही सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात बातम्या देण्याचे थांबविले नाही तर तुमच्यासह संपूर्ण स्टाफला कार्यालयात येऊन गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.तुम्ही किती वाजता कार्यालयात येता आणि परत जाता याची पूर्ण खबर आम्हाला आहे' असेही फोन कर्त्याने म्हटले आहे.या धमकीच्या फोनची तक्रार कफ परेड पोलिसांत नोंदविण्यात आली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या धमकीचा निषेध केला असून पोलिसांनी तातडीने आरोपीला शोधून काढावे आणि त्यांना अटक करावी अशी मागणी देखील केलेय. एवढेच नाही तर अशी मागणी करणारे एक पत्रही समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

विशाल पाटील या तरुणाचा महाराष्ट्र 1 चॅनेलच्या मुलाखतीचा अनुभव....

मुलाखती साठी दिलेल्या वेळेत चॅनेलच्या ऑफिसमध्ये गेलो..प्रचंड प्रमाणात गर्दी सगळ्या पदांसाठी महाराष्ट्रातुन अनेक तरुण - तरूणी आले होते. व्यवस्था तर काहीच नव्हती तरीही सर्वाच्या चेहर्‍यावर आशा दिसत होत्या...मला मुलाखतीसाठी आत मध्ये बोलवून घेतले काही प्रश्न विचारले आणि बोलले की एक वर्ष फुकट काम कर म्हणजेच internship कर... 
मी बाहेर आलो आणि काही जणांना विचारले की काय बोलले तुम्हाला...
प्रत्त्येकाचे उत्तर एकच मला बोलले चार महिने internships कर, 
कोणाला 6 तर कोणाला 1 वर्ष.....
एकंदरीत काय तर फुकट काम करून घेण्यासाठी हा खटाटोप चालू होता हे स्पष्ट दिसत होते....
आशा घेऊन आलेले मात्र निराशा घेऊन परत गेले हे मात्र 100 %......

महाराष्ट्रनामा ...

 'महाराष्ट्र 1' च्या मुलाखती याच बिल्डींगमध्ये सुरू आहेत...
पहिल्याच दिवशी 250 ते 300 लोकांनी लावली हजेरी...
तीन डेक्सवर प्रत्येकी दोघेजण घेताहेत मुलाखती...
युवराज मोहिते,आशिष जाधव आणि दीप्ती राऊत पॅनल प्रमुख
प्रवेश अर्ज घ्यायला प्राची कुलकर्णी, अजय पुरचुरे
मुलाखतीसाठी आलेल्या लोकांना आत पाठवण्याची जबाबदारी विनायक गायकवाड़
 .....................
जय महाराष्ट्रच्या सुधाकर शेट्टीनं परवा समीरण वाळवेकर, प्रसन्न जोशी,निलेश खरे या सेनापतींची नेमणूक केली.आता त्यामुळं चॅनलला रूपडं आलं तरी वितरण मात्र अत्यंत गचाळ आहे.
अनेक डिशीवर हे चॅनल दिसत नाही.अनेक शहरात केबलवर सुध्दा हे चॅनल दिसत नाही.डेन,UCN या केबल नेटवर्कवाल्यांनी पैसे थकले म्हणून चॅनल दाखवणं बंद केलं...
गेल्या अडीच वर्षात एक रूपयाची पगारवाढ नाही,त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई डेक्सवर राजीनामा सत्र सुरू होईल...
एकीकडं सेनावतीची निवड तर दुसरीकडं सैन्य आणि त्यांना मिळणारी रसद तोकडी..
त्यामुळं सेनापती हातबल झालेत...
शेट्टींना या धंद्यातलं गणित काही जमत नाही बुवा...
.............................

मराठीत एकूण 7 न्यूज चॅनल आहेत...
- ABP माझा
- झी 24
- IBN लोकमत
- Tv 9
- मी मराठी
- जय महाराष्ट्र
- साम
आता वागळेंचे आठवे न्यूज चॅनल 
'महाराष्ट्र 1'
सुरू होत आहे...
तेलगूमध्ये एकूण 24 न्यूज चॅनल आहेत आणि तेथे प्रचंड स्पर्धा आहे.
मराठीत किमान 12 ते 15 न्यूज चॅनल आरामात चालू शकतात...
असे झाले तर पत्रकारितेत जे करियर करू इच्छीतात त्यांना संधी मिळेल...

..........................

मुंबई - निखिल वागळे यांचे 'मी मराठी' बरोबरचे कॉन्ट्रक्ट 31 ऑगस्ट रोजी संपणार...
'पॉईंट ब्लँक' शो साठी 'मी मराठी' नव्या चेहऱ्याच्या शोधात....


अभय देशमुख आजारातून पुर्णपणे बरा... मी मराठीमध्येच मुंबईत डेक्सवर जॉईन... 
.................................

आजपासून 'महाराष्ट्र 1' साठी मुलाखती सुरू होणार...
मुलाखतीसाठी तुफान गर्दी होण्याची शक्यता...
महाराष्ट्रात एकच चर्चा....
वागळेंचं चॅनल येतयं...
एखादा बिगबजेट चित्रपट येणार असताना,जशी हवा असते,
तशीच हवा वागळेंच्या चॅनलची सुरू आहे...
मुलाखती येथे होणार... 
Unit No. 203, 2nd Floor, DTC Building, Sitaram Mill Compound, N M Joshi Marg, Mumbai - 400011
कसे पोहचाल ? 
दादर...लोअर परेल....सिताराम मिल कपांऊंड
 ............................

बेरक्या इम्पॅक्ट...

अधिस्वीकृती समितीची फेररचना करून आठ महिला पत्रकारांना स्थान देणार....
जनसंपर्क खात्याची माहिती.... 


.........................

महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना 'बेरक्या'चे आवाहन
मीडिया क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रातील क्षेत्रातील घडामोडी देण्यासाठी आला आहे,
'पोलखोल'..
आपण कोणत्याही पेपर किंवा चॅनलमध्ये काम करत असाल...
तुमची स्फोटक बातमी लागत नसेल तर सरळ आमच्याकडं पाठवा...
आम्ही करू पोलखोल...
मेल आयडी...
polkholweb@gmail.comdisclaimer
...................
कोणतेही नविन चॅनल किंवा पेपर येत असेल तर त्याची आपणास माहिती देणं हे बेरक्याचं काम आहे.घोड्याला पाणी दाखवणं आमचं काम आहे,प्यायचं की नाही,हे स्वत: ठरवावे...
आम्ही काही कोणाला आग्रह करत नाही,तुम्ही जा म्हणून...जे बेकार आहेत,त्यांनी नविन ठिकाणी संधी शोधावी...जे चांगल्या ठिकाणी आहेत,त्यांनी सोडू नये,असा आमचा सल्ला असतो,आणि तोच राहील...
महाराष्ट्र 1 चॅनलमध्ये मुलाखत द्यायची की नाही,ते स्वत: ठरवावे,त्याचा बेरक्याशी काहीही संबंध नाही.
 
 

फेसबुक वर शेअर करा

Facebook