महाराष्ट्रनामा...






कोल्हापुरात 'पद्मश्री'चे वार सुरूच...
लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचा आज 11 वा वर्धापनदिन..
म्हणाले,आमचा आज 'वाढ' दिवस...
'हंसा'चा दाखला दाखवून म्हणाले,आम्हीच नंबर 1
आज दर्डा कंपनी कोल्हापुरात हजेरी लावणार...
नेमक्या आजच्या दिवशी पद्मश्रींनी 'कोळसा 'दाखवला...
काहीही हां पद्म'श्री'...



 .....................................................


राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नागपूरातील काही वरिष्ठ संघ (RSS) कव्हर करणाऱ्या पत्रकारांचा एक संघ शिक्षा वर्ग घेतला.... यात १८-२० पत्रकारांचा समावेश होता. संघाची भुमिका काय, संघ कशा पद्धतीनं काम करतो, त्यासोबतच संघाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. आतापर्यंत संघ माध्यमांपासून लांब रहायचा, पण आता संघाच्या प्रसार आणि प्रचारासाठी संघ माध्यमांशी जवळीक साधत आहे. येत्या काळात नागपूर मध्ये माध्यमांसमोर संघाची भुमिका मांडण्यासाठी एक प्रतिनिधी देण्याच्या विचारातही संघ असल्याचं, यावेळच्या बैठकीत सांगण्यात आलं. विदर्भाचे प्रसिद्धी प्रमुख पिंगळे आणि नागपूर महानगर संघचालक यांनी पत्रकारांचा हा वर्ग घेतला. सर्व चानल आणि प्रमुख वृत्तपत्रांचे RSS कव्हर करणारे पत्रकार यावेळी उपस्थित होते.

...................

संपादकांना गोळ्या घालण्याची धमकी.
....................................................
दबंग दुनिया या हिंदी दैनिकाचे संपादक सत्यनारायण तिवारी यांना 18 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता जिवे मारण्याची धमकी देणारा फोन आला होता.'तुम्ही सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात बातम्या देण्याचे थांबविले नाही तर तुमच्यासह संपूर्ण स्टाफला कार्यालयात येऊन गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी दिली आहे.तुम्ही किती वाजता कार्यालयात येता आणि परत जाता याची पूर्ण खबर आम्हाला आहे' असेही फोन कर्त्याने म्हटले आहे.या धमकीच्या फोनची तक्रार कफ परेड पोलिसांत नोंदविण्यात आली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या धमकीचा निषेध केला असून पोलिसांनी तातडीने आरोपीला शोधून काढावे आणि त्यांना अटक करावी अशी मागणी देखील केलेय. एवढेच नाही तर अशी मागणी करणारे एक पत्रही समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.