> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

एस.एम.देशमुख यांच्यापुढील आव्हाने !


 मराठी पत्रकार परिषदेसंदर्भातील एक पोस्ट व्हॉटस् गु्रपवर फिरत आहेत.नवे अध्यक्ष एस.एम.देशमुख हे याची दखल घेवून योग्य तो निर्णय घेतील,अशी अपेक्षा व्यक्त होतोय..
काय आहे ही पोस्ट वाचा...
 ...............
मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे.१९३९ साली स्थापन झालेल्या या संस्थेला ७७ वर्षे पुर्ण झाली आहेत.काकासाहेब लिमये हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते,आता एस.एम.देशमुख आहेत.एस.एम.यांना दुस-यांदा संधी मिळाली आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यात ही संस्था कार्यरत आहे.जवळपास आठ हजार सभासद आहेत.या संस्थेचे पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आल आहेत.आता हे नवे पदाधिकारी काही ठोस निर्णय घेणार का,याकडे संबंध महाराष्ट्रातील पत्रकारांचे लक्ष वेधले आहे.
पुर्वी पत्रकारांची एकच संस्था होती,ती म्हणजे मराठी पत्रकार परिषद.मुंबई मराठी पत्रकार संघ वेगळा झाला आणि त्यांनी परिषदेपासून फारकत घेवून जागा बळकावली.त्यानंतर आज जे ३४ जिल्ह्यात जे पत्रकार भवन उभे आहेत,त्यावर अनेकांनी कब्जा केलेला आहे.तेथे काही पत्रकार संस्थानिक होवून बसले आहेत.
आपल्या मर्जीतील पत्रकारांना लिमिटेड सभासद करायचे,मग ते ऑफीसमध्ये शिपाई काम करत असेल तरी तो सभासद आणि जे खरोखरच पत्रकार आहेत,त्यांना सभासभापासून वंचित ठेवायचे हा त्यांचा डाव.हा डाव गेली अनेक वर्षे खेळला जातोय.एक तर निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि घेतले तर तेच ते पदाधिकारी निवडून येतात,त्यामुळे परिषदेपासून अनेकजण दुरावले असून,त्यांना पुन्हा परिषदेत आणण्याची जबाबदारी नव्या पदाधिका-यांची आहे.
अनेक जिल्हा संघाच्या निवडणुका नाहीत.त्यांना आजपर्यंत कोणी जाब विचारला नाही किंवा विचारला तर बेकिंमत देण्यात आली.त्यामुळे राजकीय लोकांना नावे ठेवणारे पत्रकारच स्वत: संस्थानिक होवून बसले आहेत.
रत्नागिरी,सोलापूर,उस्मानाबादमध्ये नेमके हेच घडतय.सोलापूरमध्ये मराठी पत्रकार परिषद विशिष्ठ लोकांच्या ताब्यात आहे,त्यामुळे तेथे श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जोमाने सुरू आहे.
उस्मानाबादमध्ये एका चौकडीने धुमाकूळ मांडलेला आहे.पत्रकार संघाची डबल मजली इमारत अस्तीत्वात असताना,शासनाकडे पत्रकार भवन अपुरे पडते म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून दहा लाख रूपये मंजूर करण्यात आले.त्यांनी तातडीने दोन लाख रूपये दिले.त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार भारत गजेंद्रगडकर यांनी तक्रार केल्यानंतर आठ लाख रूपये आले नाहीत.त्यावेळी अध्यक्ष असलेले राजेंद्र बहिरे यांनी मुख्यमंत्र्याकडून आलेल्या दोन लाख रूपयात सांजा रोडवर अर्धा एकर जमिन घेतली.या जमिनीचे बाजारमुल्य आता दोन कोटी आहे.त्यानंतर धनंजय रणदिवे यांनी आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून हार्ट ऑफ सिटी जागेत  (आकाशवाणी समोर आणि स्त्री रूग्णालयाच्या बाजूला ) सहा हजार स्वेअर फुट  भूखंड घेतला.त्यावर डबल मजली इमारत बांधण्यासाठी सांजा रोडवरील अर्धा एकर जमिन विकण्याचा डाव विद्यमान पदाधिका-यांनी रचला होता.दोन कोटीचा भुखंड व्यवहार ४० लाख विक्री दाखवून बाकीचे १ कोटी ६० लाख रूपये चौघात वाटून घेण्याचे प्रयत्न सुरू होते.भुखंडाचे श्रीखंड खाण्याचा डाव राजेंद्र बहिरे आणि भारत गजेंद्रगडकर यांनी उधळून लावला.तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण गेडाम यांनी या जमिन विक्रीस तातडीने स्थगिती दिली होती.त्यामुळे ही दोन कोटीची जमिन वाचली.
आता गंमत अशी झाली आहे की,उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाची नोंदणीच राजेंद्र बहिरे यांनी केली आहे.हा संघ पुर्वी नोंदणीकृत नव्हता,तो मराठी  पत्रकार परिषदेशी सलग्न होंता.मराठी पत्रकार परिषदेच्या कागदपत्रावर त्यांना पत्रकार भवन,भुखंड,जागा मिळाली आहे,परंतु त्यांनी परिषदेलाच कोलण्याचे काम केले.त्यांनी परिषदेच्या नियम आणि अटीचे अनुपालन केलेले नाही.नव्या पदाधिका-यांची मुदत जून २०१५ मध्येच संपली आहे.जर निवडणुका घेतल्या नाहीत तर संघ आपोआप बरखास्त होतो,असे उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या घटनेत लिहिले आहे.तरीही या नोदणी नसलेल्या या संघाचा कारभार सुरू आहे.बँकेत दहा ते बारा लाखाच्या ठेवी आहेत.त्या ठेवीही थातूरमाथूर खरेदी दाखवून खर्च केल्या जात आहेत.संघाचा खालचा मजला पुण्यनगरीस देण्यास आला आहे.त्याचे भाडे कुठे जाते,हा एक प्रश्न आहे.गावकरी रेडा स्वत:च्या चुका झाकण्यासाठी टकलू हैवाण आणि बांग्याच्या सल्लाने कारभार हाकतोय.
यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे पत्रकारांचा एक मोठा गट वेगळा झालेला आहे.उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ नोंदणी करण्यात आलेला आहे.त्याचे अध्यक्ष कमलाकर कुलकर्णी,अनंत अडसूळ नंतर आता महेश पोतदार आहेत.
एक तर उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार  संघाची नोंदणी राजेंद्र बहिरे यांच्याकडे आहे.परिषदेला हे पदाधिकारी कोलतात.निवडणुका नाहीत.तेव्हा संघ आपोआप बरखास्त झालेला आहे.तेव्हा सरळ सध्या असलेला  संघ बरखास्त करून मराठी पत्रकार परिषदेचे प्रशासकीस मंडळ तातडीने नियुक्त करावे.तरच आमच्यासारख्या पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेचे सभासद होता येईल आणि पारदर्शक कारभार होईल.
एस.एम.साहेब,या सर्व कारभाराची चौकशी करणार का ? संघ बरखास्त करणार का ? याचे उत्तर देणार का ?
- एक पत्रकार

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६

मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव जाहीर

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे विभागीय सचिवांच्या नियुक्तया जाहीर केल्या आहेत.या नियुक्तया 31 ऑगस्ट 2017 पर्यंत असतील.1 सप्टेंबरपासून या नेमणुका आपोआप रद्द होतील.त्यांची नावे आणि विभाग खालील प्रमाणे आहेत.
1) मुंबई विभाग ः हेमंत बिर्जे ( मुंबई,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी )
2) कोकण विभागः धनश्री पालांडे ( रत्नागिरी,दैनिक रत्नभूमी)
3) पुणे विभागः शरद पाबळे ( पुणे,दैनिक सकाळ)
4) कोल्हापूर विभागः समीर देशपांडे ( कोल्हापूर,दीव्य मराठी )
5) लातूर विभागः विजय जोशी ( नांदेड,सामना )
6) अमरावती विभाग ः राजेंद्र काळे ( बुलढाणा,देशोन्नती)
7) नागपूर विभागः हेमंत डोर्लीकर ( गडचिरोली,भास्कर )
8) नाशिक विभागः मीनाताई मुनोत ( नगर,नगर टाइम्स
उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
असून अन्य पदांच्या नियुक्तयाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत असेही परिषदेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात विभागीय सचिव म्हणून एकाच वेळी दोन महिलांची नियुक्ती केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.मराठी पत्रकार परिषदेने विभागीय सचिवांची नावे निश्‍चित कऱण्यासाठी विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार आणि कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांना अधिकार दिले होते.त्यांनी वरील नावे नक्की केली आहेत.आपआपल्या विभागात संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी विभागीय सचिवांना पार पाडायची आहे.


टीम परिषद...
मराठी पत्रकार परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे मोबाईल नंबर्स हवेत आहेत अशी मागणी परिषदेच्या अनेक सदस्यांनी केली.त्यानुसार सर्वांच्या सोयीसाठी पदाधिकारी तसेच विभागीय सचिवांचे फोन नंबर्स येथे देत आहे.
मुख्य विश्‍वस्त तथा अध्यक्ष -- एस.एम.देशमख 9423377700,9075175924
विश्‍वस्त - किरण नाईक 9820784547
कार्याध्यक्ष - सिध्दार्थ शर्मा 07242438478
सरचिटणीस - यशवंत पवार 9423061100
कोषाध्यक्ष - मिलिंद अष्टीवकर 9422071100
1) मुंबई विभाग हेमंत बिर्जे ( मुंबई,जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी ) 9819714248
2) कोकण विभागः धनश्री पालांडे ( रत्नागिरी,दैनिक रत्नभूमी) 9921879660
3) पुणे विभागः शरद पाबळे ( पुणे,दैनिक सकाळ) 07588945850
4) कोल्हापूर विभागः समीर देशपांडे ( कोल्हापूर,दीव्य मराठी )09765562895
5) लातूर विभागः विजय जोशी ( नांदेड,सामना ) 9923001823
6) अमरावती विभाग ः राजेंद्र काळे ( बुलढाणा,देशोन्नती) 9822593923
7) नागपूर विभागः हेमंत डोर्लीकर ( गडचिरोली,भास्कर ) 9404127325
8) नाशिक विभागः मीनाताई मुनोत ( नगर,नगर टाइम्स 9423593224
9)कार्यकारिणी सदस्य ः सुनील ढेपे. (उस्मानाबाद लाइव्ह) 9404955975
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे.राज्यातील 34 जिल्हयात परिषदेच्या शाखा असून 8 हजार पत्रकार परिषदेचे सदस्य आङेत.1939मध्ये काकासाहेब लिमय संस्थेचे पहिले अध्यक्ष होते.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

मी मराठी LIVE ; कशी नशिबानं थट्टा आज मांडली…

मी मराठी लाइव्ह अर्थात बातमीतला मी आता मी - मी करत शेवटची घटका मोजत आहे.मी मराठी LIVE मधले सगळेच पत्रकार सध्या 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' हेच गाणं गुणगुणत आहेत. जानेवारी २०१६ चे पगार फेब्रुवारी उलटायला आला तरी मिळाले नसल्यामुळे संपादकांपासून ते चहा वाटणाऱ्या ऑफिस बॉयपर्यंत सगळ्यांचेच चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. एकीकडे मालक तुरुंगात असतानाच मालकाची गादी चालवणाऱ्या मोतेवार मंडळींनी संपादक मुकेश माचकर, सर्क्युलेशन प्रमुख रावराणे आणि अन्य मंडळी त्यांना भेटायला गेली असताना त्यांना चक्क दोन दिवस भेटच नाकारली.
फेब्रुवारी २०१५ मध्ये झोकात पदार्पण केलेल्या मी मराठी LIVE ने बाजारात चांगला जम बसवलाय खरा, पण पगार लटकण्याचे या पेपरमधील स्पीड ब्रेकर्स अगदी मार्च २०१५ पासूनच सुरू झालेत. मार्च २०१५ चा पगार तब्बल १५ दिवस लटकला. यानंतर एप्रिलचा पगार अगदी ३० तारखेलाच करून मालकांनी कर्मचाऱ्यांना खूश केले. मग मे महिन्यात फक्त संपादक आणि अन्य एक-दोन जणांचे (ज्यांना एक लाख रुपयांपेक्षा अधिक पगार आहेत, असे प्रमोद गणेशे, प्रदीप म्हापसेकर आणि मंदार जोशी हे तिघे) पगार पुन्हा उशीरा दिले. जून महिन्यात परत पगारावर गदा आली ती सहसंपादक मंडळींच्या.
 १५ हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या मंडळींना फक्त मार्च, जून २०१५ आणि जानेवारी २०१६ मध्ये झळा बसल्या. मात्र १५ हजारपेक्षा जास्त पगार असणाऱ्या सगळ्यांनाच जून महिन्यात पगार उशीरा मिळाले. तीच परिस्थिती ऐन दिवाळीतही. दिवाळीत बोनससकट पगार मिळाला, पण तो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. सगळ्यांच्या घरच्या मंडळींचे तगादे ऐकून झाल्यानंतर.
आता तर परिस्थिती इतकी वाईट आहे की, खुद्द माचकर साहेबांनी आपल्या नव्या कोऱ्या मोटारकारचे हप्ते फेडण्यासाठी पर्सनल लोन घेतले आहे. एवढ्या तरुण, तडफदार (दुर्दैवाने तडफदार फक्त बोलताना, बायलाइन लेखात यांचा अनेकदा पुणेरी पुणेकर होतो…) संपादकावर प्रहारनंतर सलग दुसऱ्यांदा ही वेळ यावी, हे दुर्दैवच.  
मध्यंतरी कॉस्ट कटिंगची पुडी त्यांनीच सोडली. विशेष म्हणजे कोणत्याही कंपनीत अशा घोषणा कंपनीच्या एचआर टीमकडून इमेलवर केल्या जातात. पण इथे एकएक महाभाग आणि महामुनींचे राज्य असल्यामुळे पुणेरी टेचाखेरीज काहीच सिस्टिमॅटिक चालत नाही. माचकरांनी वरिष्ठ संपादकीय मंडळाला जानेवारीच्या पगाराची बोंब असल्याचे सांगताक्षणीच सगळे सावध झाले खरे, पण एखाद-दोन अपवाद वगळता, या मंडळांमध्ये सगळे सदस्य सावरकर, खांडेकर, नानल आदी टाकाऊ मालच असल्यामुळे त्यांना दुसरी नोकरी मिळणार तरी कुठे, अशी परिस्थिती आहे.

सध्या फक्त या मंडळातील संजय सावंत व निनाद सिद्धये या दोघांनी मी मराठी LIVE ला  रामराम करत दुसरी वाट धरली आहे. बाकीच्यांची मात्र खरोखर बोंब आहे. सावरकर-खांडेकर दुक्कल मी मराठीमध्ये आणण्यासाठी राणेंनी माचकरांना “बरे झाले; पीडा गेली” पुरस्कार दिल्याचे समजते. या दोघांवर प्रहारमध्येही अनेकदा चर्चा झाली आहे.

माचकरांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात, पगार २५ फेब्रुवारीला होतील आणि मालकांना पेपर बंद करायचा नाहीए, अशा दोन घोषणा केल्या असल्या तरी, बहुतेक मंडळी पगार मिळाल्यानंतर कल्टी मारण्याच्या बेतात असल्याने माचकर आणि त्यांचे विद्वान लंगोटी मित्र मिळून मी मराठी LIVE ला ALIVE कसा ठेवणार, हाच प्रश्न आहे.

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

भामट्या राज गायकवाडविरूध्द अखेर राज्यात पहिला गुन्हा दाखल

पंढरपूर - शेळी पालनच्या नावाखाली राज्यातील आणि शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक गोरगरीब लोकांना गंडा घालणारा जागृती अ‍ॅग्रो फुडस्चा भामटा राज गायकवाडविरूध्द अखेर राज्यात गुन्हे दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यात राज गायकवाडसह पाच जणांविरूध्द बुधवारी रात्री ११ वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
शेळी पालन उद्योग दाखवून पाच हजार ते १० लाख भरा आणि वर्षभरात दामदुप्पट घ्या,असे आमिष दाखवून जागृती अ‍ॅग्रो फुडस् या चिटफंड कंपनीने राज्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गोरगरीब जनतेची फसवणूक केलेली आहे.या कंपनीचा मालक राज गायकवाड असून,पत्नी जाई गायकवाड,भाऊ भास्कर गायकवाड,सलिम खंडायत आदी संचालक आहेत.
वर्षेभरानंतर जेव्हा दुप्पट रक्कम मिळाली नाही,तेव्हा कर्नाटक राज्यात ७ पोलीस ठाण्यात २७ गुन्हे दाखल झालेले आहेत.राज्यात अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत,परंतु गुन्हे दाखल झालेले नव्हते.पहिला गुन्हा करकंब पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११ वाजता दाखल झालेला आहे.राज गायकवाडसह पाच जणांना आरोपी करण्यात आलेले आहे.भादंवि ४२०,४०६,४६७,४६८,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.त्यापैकी तीन जणांना पोलीसांनी अटक केल्याचे सांगण्यात येतेय.
जागृती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यालय सांगली येथे आहे.तेथे रोज पैसे भरण्यासाठी लोकांची गर्दी होत असे.दीपावलीमध्ये बीदर पोलीसांनी राज गायकवाड यास अटक केली होती.साडेचार ते पाच महिने हा भामटा जेलची हवा खावून जामिनावर बाहेर आलेला आहे.जेलमधून सुटका झाल्यानंतर आपण पोलीसांना कसे मॅनेज केले,आपले लागेबांधे कसे आहेत,असे हा भामटा सांगत सुटला होता.
याच भामट्याने काळे धंदे लपवण्यासाठी जानेवारी २०१५ मध्ये नवजागृती चॅनल काढले होते,मात्र सहा महिन्यातच चॅनल बंद करून,कर्मचा-यांचा तीन महिन्याचा पगार बुडवला होता.त्याविरूध्द येरवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे,परंतु पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
करकंब पोलीसांच्या कारवाईनंतर आता तरी राज्यातील पोलीस राज गायकवाड आणि कंपनीविरूध्द गुन्हा दाखल करून बेड्या ठोकणार का,याकडे लक्ष वेधले आहे.
संपूर्ण बातमी वाचा

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

आजारी 'गांवकरी'ला 'डॉक्टर' मिळाला !

माणूस आजारी पडला की डॉक्टरकडे जातो,तसे पेपर आजारी पडला डॉक्टर अनिल फळे यांच्याकडे जातो.लोकपत्र,तरूणभारत या आजारी वृत्तपत्रांना उर्जितअवस्था प्राप्त करून देणाऱ्या डॉ.अनिल फळे यांच्याकडे आता गांवकरीची सुत्रे...
साधनेला फळ देणाऱ्या डॉ.फळे यांचे पुनश्च अभिनंदन...
गांवकरीची जाहिरात आज लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत प्रसिध्द झाली आहे...
प्रवाहाच्या बाहेर गेलेल्या पत्रकार बंधुसाठी सुवर्णसंधी...
 

अनंत पाटलांचे तेलही गेले....!

अहमदनगर : भरघोस पगारासाठी लोकमतसारखा चांगला ब्रॅण्ड सोडून अनंत पाटील यांनी सारडाशेठच्या सार्वमतमध्ये संपादकपद स्वीकारले. परंतु, आता तेलही गेले अन् तुपही... अशी अवस्था पाटील यांची झाली आहे. अद्यापही पाटील यांचे प्रेसलाईनमध्ये नाव आले नसून, संपादकांच्या खुर्चीवरही पाटील यांना बसविले गेले नाही. वृत्तसंपादकाच्या शेजारी पाटील यांना बसविण्यात आल्याने, त्यांची बरीच मानसिक कोंडी होत आहे. लोकमतमध्ये पाटील यांना स्वतंत्र कॅबिन आणि संपादकाचा डामडौल होता. तो आता सार्वमतमध्ये मिळत नसल्याने हाताने पायावर धोंडा पाडून घेतला, अशी त्यांची गत झाली आहे.
दैनिक सार्वमतची आर्थिक परिस्थिती सद्या डबघाईस आली आहे. सारडाशेठने वसुलीवर जोर दिला असून, नुकत्याच झालेल्या काही तालुक्यांच्या वर्धापन दिनाच्या वसुलीतून पगार केले जात आहेत. नवीन धंदा अत्यंत कमी आहे. सारडाशेठने हात वर केलेले आहेत. आणखी सहा महिन्यानंतर अनंत पाटील यांना भरघोस पगार मिळेल की नाही, याची खात्री नाही. पाटील ज्वाईन झाले त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचे प्रेसलाईनला नाव येणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही प्रेसलाईनला वसंत देशमुख यांचेच नाव आहे. पाटील हे नावालाच संपादक असून, सर्व संपादकीय सूत्रे वृत्तसंपादक वढणे संभाळतात. त्यांच्याच बाजूला पाटील यांचा टेबल मांडण्यात आला आहे. पूर्वीचे संपादक नंदकुमार सोनार यांना स्वतंत्र कॅबीन होती. त्या संपादकांच्या कॅबीनमध्ये पाटील यांना बसू दिले जात नाही. जाहिरातीसाठी रवींद्र देशपांडे हे चाणाक्ष
यक्तीमत्व पाटील यांनाच पुढे करत असून, धंदा कमी का झाला? याचे खापरही भविष्यात पाटील यांच्याच डोक्यावर फोडण्यासाठी आतापासून रणनीती तयार केली जात आहे. यापूर्वी याच देशपांडे-कुलकर्णी जोडगोळीने देशदूतला कुलूप ठोकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अनंत पाटील यांचे तेलही गेले अन् तुपही गेले अशी अवस्था झाली आहे.
-----------

"लोकमत"चे पुन्हा "भाजपमत"


 "महाराष्ट्र टाईम्स", गौतमराव संचेती आणि "टीम मटा"चं अभिनंदन


काल शहरात सर्वाधिक चर्चेचा  विषय ठरलेली "सुरक्षारक्षक गडकरी-फडणवीस" यांच्या बातमीबाबत आज "मटा "ने बाजी मारली आहे. "योग्य बातमी कशी लिहावी", याचे उत्तम उदहरण "महाराष्ट्र टाईम्स"ने पेश केले आहे. याबाबत जळगाव ब्युरो चीफ गौतमराव संचेती आणि "टीम मटा"चं खास अभिनंदन!! नाशिकमधील वृत्तसंपादक अमित महाबळ, महेश पठाडे आणि संपादक शैलेंद्र तनपुरे यांचेही अभिनंदन….
"फेसबुकवरील वादग्रस्त पोस्टमुळे दिवसभर चर्चेचे गुऱ्हाळ" अशा शीर्षकाची बातमी देताना "मटा"ने थेट जसे घडले तसे दिले आहे. मुळात ही वादग्रस्त पोस्ट अशोक लाडवंजारी यांच्याच फेसबुक अकौंटवरून अपलोड झालीय, हे फक्त आणि फक्त "मटा"ने स्पष्टपणे नमूद केलेय. बाकी नंतर प्रकरण अंगाशी आल्यावर हे बनावट, डुप्लिकेट तक्रार वैगेरे सोपस्कार ओघाने आलेच … त्यासाठी दुपारी २ ते रात्री ११ म्हणजे तब्बल ९ तास लागले की लक्षात यायला ….
'महाराष्ट्र टाईम्स'ची बातमी म्हणते, "सध्या फेसुबकवरून पालकमंत्री एकनाथ खडसे यांना धमकी दिल्यावरून दोन तरुणांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असताना अशा प्रकारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची खिल्ली उडवत असल्याने हा मुद्दा दिवसभर चर्चेत राहिला होता. अनेकांच्या टीकेचेही लक्ष्य झाल्याने लाडवंजारी यांनी अखेर ही पोस्ट फेसबुक पेजवरून डीलीट केली." … ही हिंमत फक्त "मटा"ने दाखविली ….
बाकी अडचणीत आलेला माणूस तक्रारी, खुलासे करणारच ….   "माझे अकौंट ब्लॉक करून कुणी तरी फेक अकौंट तयार करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे." हा लाडवंजारी यांचा खुलासा 'मटा'ने छापलाय …. हा खुलासाही हास्यास्पद आहे. "कुणी तरी फेक अकौंट" तयार केलेलेच नाही; त्यांच्याच अकौंटवरून सारा प्रकार झालाय.
'मटा'ने खुलाशाला फार महत्त्व दिलेले नाही; मूळ घटना योग्यरितीने अधिक फोकस केलीय. आणि हीच पत्रकारिता असते. पत्रकारितेच्या शाळांमध्ये हेच शिकविले जाते. आता "लोकमत"ने पुन्हा काय केले पाहा …. पत्रकारितेचा मूलभूत सिद्धांत विसरून त्यांनी "लाडवंजारींच्या नावाने बनावट अकौंट; भाजपा नेत्यांची बदनामी" अशी PRO  देतात तशी बातमी दिली आहे. मूळ घटनेऐवजी त्यांनी खुलासाच छापलाय. जे काम "तरुण भारत"ने करायचे ते भाजपाचे मुखपत्र झाल्यागत "लोकमत"ने केलेय…
यावरून एक नक्की स्पष्ट होतेय की काही नेते म्हणतात तसं पत्रकारितेची शिकवण विसरून पाठविल्या जाणाऱ्या "पाकिटा"नुसार (बातम्यांच्या!) त्या प्रसिद्ध केल्या जातात. "लोकमत"ला पाकीट पोहोचले असणार (अर्थातच बातमीचे, खुलाशाचे) …. त्यामुळे मूळ बातमी सोडून "लोकमत"वाले "पाकीटा"ला जागले; म्हणजे "पाकीटा"तून  आलेल्या बातमी/खुलाशावर विश्वास ठेवून, स्वत: कष्ट न करता; "जे मिळालेय हाती" तेच "छापून मोकळे झाले". हा वाचकांच्या सत्य जाणून घेण्याच्या, मूळ घटना जाणून घेण्याचा अधिकारावर घातलेला घाला आहे… आता संचेती स्वत: कष्ट घेतात, 'मटा'वाले पाकिटे (बातम्यांची, आयती मिळणारी!!) घेत नाहीत …. त्यामुळे त्यांनी हे "पाकिट" घेतले नसावे आणि मूळ घटना प्रसिद्ध करून वाचकांप्रती आपली प्रतिबद्धता सिद्ध केली.
ही 'मटा'ची बातमी (टेक्स्ट लिंक) :
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/ashok-ladwanjari-facebook-post-issue/articleshow/51096792.cms
ही 'मटा'ची बातमी (इमेज लिंक) :
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31831&articlexml=23022016001033
ही 'लोकमत'ची बातमी (इमेज लिंक) :
http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=02/23/2016&pageno=4&edition=46&prntid=17895&bxid=27474294&pgno=4

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

'सकाळ"चे अभिनंदन, "लोकमत"ची आक्षेर्पाह पत्रकारिता

जळगाव - आज खूप दिवसानंतर "सकाळ'ने खुश केले, समाधान दिले. JNU निषेध कार्यक्रमाची एक बातमी आज स्थानिक दैनिकांनी प्रसिद्ध केलीय. "लोकमत"ने अवास्तव सहा कॉलम, फारच अवाजवी प्रसिद्ध केलीय. एरव्ही या दैनिकात लोकोपयोगी बातम्या छापायलाही जागा नसते म्हणतात. "दिव्य मराठी"ने नेटके आणि नेमकेच स्थान दिलेय. दीपक पटवे जावून आमचे मित्र त्र्यंबक कापडे निवासी संपादक व मकरंदराव वृत्तसंपादक असल्यापासून ते बहुतांश वेळी तसे योग्य करतात. त्यांनी योग्य व तटस्थ फोटोओळ (कॅप्शन) दिलीय. ती अतिशय पुरेशी, छोटीशीच आहे. "सकाळ"ने चार कॉलमात बातमी लिहितांना अतिशय संतुलित लिहिलीय. मूळ घटना जशीच्या तशी, पदरचे काही न घुसडता, स्वत:ची "मानसिकता" बातमीत डोकावू न देता वस्तुनिष्ठपणे लिहिलीय... आनंदराव आंबेकर व सचिन जोशी यांच्यासह "टीम सकाळ"चे अभिनंदन ... अशीच तटस्थ व वस्तुनिष्ठ पत्रकारिता यापुढेही घडत राहो.
आता "लोकमत" पाहा... संपूर्ण बायस्ड बातमी... "संघीय" मनोवृत्तीच्या माणसाची मते त्यातून जागोजागी डोकावताहेत. शीर्षक पाहा - "आक्षेर्पाह संदेश लिहिण्याचा प्रयत्न करीत असताना घडली घटना"!! कमाल आहे फारच; "आक्षेर्पाह" हे कोण ठरविणार? "गांधीजींची हत्या करणारा गोडसे....." हे जे काही प्रमोद इंगळे या तरुणाने लिहिलेय त्यात "लोकमत"ला काय आक्षेर्पाह दिसले? गोडसे नावाचा माथेफिरू हा महात्मा गांधी यांचा खुनी आहे, हे सत्य आहे... त्यात "अक्षेर्पाह" काय? वर "लोकमत"च्या बातमीत लिहिलेय की, रामानंदनगर पोलिसांनी युवकाला "समज" देवून सोडून दिले, त्याच्यावर "प्रतिबंधात्मक कारवाई" केली .... हा काय प्रकार आहे? "समज" द्यायचीच होती तर प्रमोद इंगळेला मारहाण करणाऱ्यांना द्यायला हवी होती,  "प्रतिबंधात्मक कारवाई" करायचीच होती तर मारहाण करणाऱ्यांवर करायला हवी होती; त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे होते. एरव्ही "फेसबुक"च्या कॉमेंटवरून गुन्हे दाखल करण्याची तत्परता जळगाव पोलीस दाखवतात मग इथे "नाहक" एका युवकाला मारहाण करणाऱ्यांना ते सोडून कसे देतात. हा तरुण "इंगळे" म्हणजे बहुजन समाजातील असावा... काय त्याने गुन्हा केला, काय त्याने चूक केली, हे पोलिसांनी व चुकीची, दिशाभूल करणारी बातमी देणाऱ्या "लोकमत"नेही सांगावे. इथे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे आणि चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार केलाय पोलिसांनी. मंत्री, आमदार, नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही "दादागिरी" होते आणि "लोकमत" त्यांना जाब विचारण्याऐवजी प्रमोद इंगळे या सत्य मांडणाऱ्या बहुजन समाजातील तरुणाला गुन्हेगार ठरवून एकांगी, विपर्यस्त, दिशाभूल बातमी लिहिते .... काय आहे काय हे? "लोकमत" चा "भाजपमत" झालाय की "संघमत"???
"गांधीजींची हत्या करणारा गोडसे....." हे 100% सत्य आहे... त्यात "आक्षेर्पाह" काहीही नाही. नथूराम गोडसे हा माथेफिरू खुनीच होता. "लोकमत"वाले त्याला "देशभक्त" आणि सत्य मांडणाऱ्या प्रमोद इंगळेला "देशद्रोही" ठरवू पाहत असतील तर "लोकमत"ने सरकार बदलताच दाखविलेले हे रंग व ही "स्वामीनिष्ठ" पत्रकारिताच निषेर्धाह व आक्षेर्पाह आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल...
लोकमत ई-पेपर लिंक :
टॉप सहा कॉलम
http://epaper.lokmat.com/epaperimages/Jal/2222016/22022016-lk-jhj-04/D27538676.JPG
सकाळ ई-पेपर लिंक :
घडीखाली, छोटी दाबून 4 कॉलम चिंचोळी
http://epaper3.esakal.com/22Feb2016/Enlarge/Jalgaon/JalgaonToday/index.htm
दिव्य मराठी ई-पेपर लिंक :
घडीखाली, छोटी दाबून फक्त फोटो ओळीत
http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/22022016/Aurbd-a4892655-large.jpg

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

दिव्य मराठी प्रबंधन से जान को खतरा होने की आशंका।

श्रीमान आयुक्त महोदय
औरंगाबाद, पुलिस कमिशनर, महाराष्ट्र

महोदय,

मैं हेमकांत चौधरी पिता शिवदास चौधरी उम्र ४१ वर्ष, स्थायी पता नागलवाड़ी तालुका चोपड़ा जिल्हा जलगॉव पिन कोड ४२५१०७ में रहता हूं। मैं दिनांक.२०/०४/२०१२ से डीबी कार्प लि. द्वारा औरंगाबाद से प्रकाशित दिव्य मराठी अखबार में बतौर -पेपर एग्जीक्यूटिव पद पर कार्यरत हूँ। सर, भारत सरकार ने प्रिंट मीडिया कर्मचारियों के लिए मजीठिया वेजबोर्ड लागू किया है। अखबार मालिक इसके खिलाफ सुप्रीम कोर्ट में भी केस हार चुके हैं, फिर भी आदेश का पालन नहीं कर रहे।इस मामले में मेरे सहित देशभर के हजारों मीडियाकर्मियों ने अवमानना याचिका लगा रखी है।

    सर, मजीठिया वेजबोर्ड का लाभ देने से बचने के लिए सन २०१४ को दिव्य मराठी प्रबन्धन द्वारा पहले से प्रकाशित घोषणा पत्र पर निवासी संपादक दिपक पटवे ,एच.आर डेपोटी मैनेजर जोगिन्दर सिंघ इन्होने मुझसे जबरन साइन करवा लिए थे जिन पर छपा हुआ था कि मैं अपनी वर्तमान सैलरी से संतुष्ट हूँ और मुझे सरकार द्वारा लागू किए गए मजीठिया वेजबोर्ड का लाभ नहीं चाहिए।इसके बाद मैंने और अन्य कर्मचारियों ने डीबी कॉर्प प्रबन्धन के खिलाफ सुप्रीम कोर्ट में अवमानना याचिका (सिविल) क्रमांक १२८/२०१५ फाइल कर दी थी। इसका पता चलते ही कंपनी के अधिकारियों ने केस वापस लेने के लिए मुझ पर दबाव डाला। मेरे मना कर देने पर उन्होंने प्रताड़ना के उद्देश्य से मुझे डेप्यूटेशन पर रांची ट्रांसफर कर दिया। हालांकि इसके खिलाफ मुझे दिनांक २०/०३/२०१५ को औद्योगिक कोर्ट से स्टे मिल गया।

दिनांक ०२/०७/२०१५ को मैं औरंगाबाद से जलगाँव स्थित अपने गाँव चोपड़ा बाइक से छुट्टी पे आया। और ०३/०७/२०१५ को यहाँ नागलवाड़ी से वराड जाने वाली सड़क पर सुबह १० बजे किसी वाहन ने मेरी बाइक को टक्कर मार कर निकल गया। इससे मैं जमीन पर गिर पड़ा और बेहोश हो गया। होश आया तो परिजन मेरे पास खड़े थे, उन्होंने बताया कि मुझे ऑटो रिक्शा ने टक्कर मारी थी। इस दुर्घटना में मेरे दाएँ पैर के घुटने की कटोरी बुरी तरह टूट गई। चूँकि जब एक्सीडेंट हुआ उस वक्त उस सड़क पर बिलकुल भी ट्राफिक नहीं रहता है इसलिए मुझे शक है कि यह एक्सीडेंट दिव्य मराठी प्रबंधन द्वारा करवाया गया है। यही नहीं, मैंने जब एक्सीडेंट की सूचना कंपनी के एचआर विभाग में ०३/०७/२०१५ को दी तो उन्होंने मुझे ईएसआईसी के डॉ. खड़के एक्सीडेंट अस्पताल में इलाज करवाने को कहा। मैं वहाँ भर्ती हो गया। जाँच के बाद पता चला कि मेरे दाएँ घुटने की कटोरी पूरी तरह डैमेज हो गई है। दिनांक १४/०७/२०१५ को मेरा ऑपेरशन डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज एंड अस्पताल जलगॉव में हुआ। इस दौरान कंपनी की ओर से ना तो कोई मुझसे मिलने आया और ना ही कोई संपर्क किया गया। जब मेरी हालत सुधरी तो मैंने मदद हेतु कंपनी को ईमेल करने के लिए जैसे ही लैपटॉप पर कंपनी का ईमेल खोला तो पता चला कि उन्होंने मुझे 07 जुलाई को ही मेडिकल बीमे की जानकारी भेज दी थी लेकिन फोन पर इस सम्बन्ध में नहीं बताया था। इस कारण मैं समय पर उक्त बीमा योजना में क्लेम नहीं कर पाया और  बीमित होने के बावजूद मुझे उसका लाभ नहीं मिल सका।

कंपनी प्रबंधन ने ऐसा जानबूझकर किया था ताकि मैं आर्थिक रूप से कमजोर हो जाऊँ और समझौता करके केस वापस ले लूँ। इसके बाद दिनांक ०२/११/२०१५ से ०७/१२/२०१५ तक मुझे ईएसआईसी से बीमा वेतन मिला। लेकिन कम्पनी से कोई मदद नहीं मिली उलटा जलगॉव एचआर विभाग के विजय शिंपी और प्रमोद वाघ इन्होने ईएसआईसी में मेरी झूटी शिकायत कर दी कि मेरा कैरेक्टर और रिकॉर्ड ख़राब है और मैं जानबूझकर ड्यूटी नहीं रहा हूँ इसलिए मेडिकल बोर्ड में मेरी जाँच की जाए। ईएसआईसी ने मुझे औरंगाबाद मेडिकल बोर्ड में तलब किया जहाँ जाँच के बाद कंपनी की शिकायत झूटी निकली और बोर्ड ने मुझे 30 दिन की छुट्टी और मंजूर कर दी। यहाँ असफल होने पर कंपनी ने 2015 के नवम्बर और दिसंबर महीने में जानबूझकर मेरे खाते में एक दिन का वेतन डाल दिया, जिसके कारण मुझे ईएसआईसी से मिल रही मदद भी बंद हो गई। जबकि काम करना तो दूर मेरी हालत कंपनी के आफिस जाने लायक भी नहीं थी। यही नहीं जब मैंने ईएसआईसी में मदद के लिए मेडिकल बोर्ड के फॉर्म में आवेदन किया तो उक्त आवेदन लेने वाले वहां के कर्मचारी कैलाश ने मेरा मूल फॉर्म ही गायब कर दिया। मुझे शक है कि उसने ऐसा डीबी कॉर्प के अधिकारीयों के कहने पर किया है। मैंने इस सम्बन्ध में ईएसआईसी के बेनीफिट डिपार्टमेन्ट के डेपुटी डायरेक्टर श्री.बी.बालकृष्ण सर को भी फोन पर शिकायत की है। उन्होंने मुझसे सभी दस्तावेज मांगे हैं।

महोदय, मैं लम्बे समय से दोस्तों और रिश्तेदारों से उधार लेकर जैसे तैसे अपना इलाज करवाते हुए घर खर्च भी चला रहा हूँ, लेकिन अपने आप को देश का सबसे बड़ा अख़बार बताने वाला और समाजसेवा, समाज में बदलाव की बड़ी-बड़ी बातें करने वाला दिव्य मराठी प्रबंधन मेरी मदद करने की जगह मुझे आर्थिक रूप से कमजोर करने की पुरजोर कोशिश कर रहा है। पिछले दिनों दिव्य मराठी जलगॉव में रिपोर्टर के पद पर कार्यरत हेमंत पाटिल की लाश उन्हीं के घर के पास रेलवे पटरी पर संदेहास्पद परिस्थितियों में पड़ी मिली थी और उक्त घटना को आत्महत्या बताया गया था। जबकि हेमंत बहुत ही हिम्मतवाले और मेहनती व्यक्ति थे। उनका आत्महत्या जैसा कदम उठाना असंभव था। ऐसी अफवाह है कि उनका कंपनी प्रबंधन से महानगर पालिका के बिट से हटाके उन्हें कलेक्टर ऑफिस के बिट दिए जाने के मामले को लेकर विवाद भी चल रह था।
हाल ही में लुधियाना में दैनिक जागरण के कर्मचारी अतुल सक्सेना की लाश फांसी पर लटकी मिली है और उसे भी प्राथमिक तौर पर आत्महत्या बताया जा रहा है जबकि इस कर्मचारी ने अपने संसथान के खिलाफ सुप्रीम कोर्ट में अवमानना याचिका लगा रखी है और कंपनी केस वापस लेने के लिए उसे प्रताड़ित करते हुए जबरदस्त दबाव डाल रही थी। ऐसे में उसकी मौत आत्महत्या है या हत्या कहा नहीं जा सकता।

महोदय, पूरे महाराष्ट्र से एकमात्र मैं ही दिव्य मराठी के खिलाफ खुलकर केस लड़ रहा हूँ और कंपनी के तमाम अनैतिक हथकंडों के बावजूद मैंने याचिका वापस नहीं ली है, इसलिए मुझे भय है कि कंपनी का प्रबंधन  मेरी जान लेने की कोशिश भी कर सकता है। अतः निवेदन है कि यदि मेरी मृत्यु अप्राकृतिक रूप से या दुर्घटना में हो जाए या कोई व्यक्ति किसी प्रकार की शारीरिक हानि पहुंचाए तो उसका जिम्मेदार डीबी कॉर्प के चेअरमन श्री. रमेशचन्द्र अग्रवाल, एम.डी. सुधीर अग्रवाल, सी.. श्री. निशित जैन, निवासी संपादक दिपक पटवे ,एच. आर के सिनियर मैनेजर निशिकांत तायडे, एच.आर डेपोटी मैनेजर अजित पती और एच. आर के को-ऑर्डिनेटर संजय मांजी को माना जाये और उनके खिलाफ तत्संबंधी उचित क़ानूनी कार्रवाई की जाए।

धन्यवाद
 
आपका
हेमकांत शि.चौधरी,डी.बी. कॉर्प. लि. (दैनिक दिव्य मराठी )
पद- -पेपर एग्जीक्यूटिव, औरंगाबाद.मोबाइल नंबर ७०३०३७७७७०
 
स्थायी पता : नागलवाड़ी,तालुका चोपड़ा,
जिल्हा जलगॉव ४२५१०७,महाराष्ट्र
 
प्रति लिपि व्हाया मेल

श्री.अमितेश कुमार,भा.पो.से. cp.aurangabad@mahapolice.gov.in,
श्री.नाथा यमाजी जाधव ps.mwadi.abad@mahapolice.gov.in
एडवोकेट श्री. सतीश बी. तळेकर contact@advtalekar.co.in
श्री. रमेशचन्द्र अग्रवाल rameshchandra.agarwal@dbcorp.in
सुधीर अग्रवाल sudhir@dbcorp.in
श्री.निशित जैन nishit.jain@dbcorp.in
निवासी संपादक दिपक पटवे deepak.patwe@dbcorp.in
एच. आर के सिनियर मैनेजर निशिकांत तायडे nishikant.tayade@dbcorp.in
एच.आर डेपोटी मैनेजर अजित पती ajit.pati@dbcorp.in
एच. आर के को-ऑर्डिनेटर संजय मांजी sanjay.majhi@dainikbhaskargroup.com
(श्री.बी. बालकृष्णन ईएसआयसी डेपोटी डायरेक्टर बिनिफिट डिपार्टमेंट)b.balkrishnan@esic.in
हेमकांत चौधरी hemantrajput891@yahoo.com

बाय पोस्ट
 
श्री.अमितेश कुमार,भा.पो.से. cp.aurangabad@mahapolice.gov.in,
श्री.नाथा यमाजी जाधव ps.mwadi.abad@mahapolice.gov.in
एडवोकेट श्री. सतीश बी. तळेकर contact@advtalekar.co.in
श्री.निशित जैन nishit.jain@dbcorp.in
एच. आर के सिनियर मैनेजर निशिकांत तायडे nishikant.tayade@dbcorp.in
(श्री.बी. बालकृष्णन ईएसआयसी डेपोटी डायरेक्टर बिनिफिट डिपार्टमेंट)b.balkrishnan@esic.in


Thanks & Regards
Hemant Choudhari
(All MAHA. E-Paper Executive )
Dainik Divya Marathi (DB Corp. Ltd )
Aurangabad. ( MH ) Voice-- +91 7030377770

बुधवार, १७ फेब्रुवारी, २०१६

महिला पत्रकारास धमकी

देशभक्तीचा आव आणत राजधानी दिल्लीत पत्रकारांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्त आज मुंबईतील पत्रकारांनी प्रेस क्लब ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता. अनेक ज्येष्ठ पत्रकार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चाची काही छायाचित्रे ट्वीट केल्यावर ज्येष्ठ पत्रकार निता कोल्हटकर यांना अमरेंद्र कुमार सिंग या ट्वीटर अकाऊंटवरून तुमच्यावर सामुहिक बलात्कार करू, अशी धमकी देण्यात आली याची तक्रारत आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलिसांनी रात्री उश‌िरा गुन्हा नोंदव‌िला.
मोर्चाची काही छायाचित्रे ज्येष्ठ पत्रकार निता कोल्हटकर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट केल्यावर काही मिनिटांतच, अमरेंदर कुमार सिंग नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांना तू देशद्रोही असून तुझ्यावर दोन दिवसांतच सामुहिक बलात्कार करू, अशी धमकी देण्यात आली. या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेत निता कोल्हटकर यांनी आझाद मैदान पोल‌िस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तातडीने या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, रात्री उश‌िरा पोलिसांनी याविषयी गुन्हा दाखल केला.

ससेहोलपट पत्रकारांचीही...

स्वातंत्र्यपूर्वकाळात जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, ‘काळ’कर्ते शि.म. परांजपे, ‘केसरी’ व ‘मराठा’ चालवणारे लोकमान्य टिळक, गांधीजी यांसारख्या देशभक्तांनी स्वतःचे वृत्तपत्र चालू कले. यांपैकी कित्येकांना ब्रिटीशांनी जेलमध्येही टाकले, मात्र दुर्दैवाने आज जनतेची फसवणूक करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर केला जात आहे. निर्मल सिंह भगू, सुब्रतो रॉय, महेश मोतेवार, वर्षा सत्पाळकर, शशांक भापकर, पी. के. तिवारी यांसारख्या ‘चिटफंड’वाल्यांनी प्रसारमाध्यमांचा सुनियोजित पद्धतीने वापर केला आहे. आजमितीस हे सर्व 420 आरोपी तुरुंगात खडी फोडत आहेत.
सध्या सर्व आरोपी तुरुंगात असून त्यांची प्रसारमाध्यमे केव्हाही बंद होण्याच्या स्थितीत आहेत. मोठे पॅकेज देवून ‘हायर’ केलेल्या सर्वच पत्रकार, अ‍ॅन्कर व कर्मचार्‍यांची अवस्था फारच दयनीय आहे.
सहारा श्री सुब्रतो रॉय यांनी सहारा चॅनेलचा वापर करीत अक्षरशः अब्जावधी रुपये कमावले. ‘पर्ल ग्रुप’चा निर्मल सिंह भगू यानेही पी 7 या चॅनेलचा पद्धतशीर वापर करून चिटफंडाद्वारे सुब्रतो रॉयपेक्षा जास्त पैसा चिटफंडद्वारे कमावला. पर्लने 6 कोटी ठेवीदारांकडून तब्बल 55 हजार कोटी रुपयांहून अधिक माया कमावली. या राष्ट्रीय घोटाळ्याचे धागेदोरे देश-विदेशातही पसरले आहेत. पर्लचे लाभार्थी, क्रिकेटपटू युवराज, हरभजनसिंग, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू व ‘पर्ल’चा ऑस्ट्रेलियातील बॅ्रण्ड अ‍ॅम्बेसेडर ब्रेट ली हाही ‘ईडी’च्या रडावर आहे.
‘साईप्रसाद’चे शशांक भापकर, ‘समृद्ध जीवन’या चिटफंड व मी मराठी, लाईव्ह इंडिया या चॅनेल्सचे मालक महेश मोतेवार अद्याप तुरुंगात आहेत. ‘मैत्रेय ग्रुप’च्या सर्वेसर्वा व ‘भटकंती’, ‘मैत्रिण’च्या सीईओ वर्षा सत्पाळकर यांचा घोटाळाही अब्जावधी रुपयांच्या घरात आहे.  ‘महुआ’ ग्रुप व भोजपुरी चॅनेल्सचे पी. के. तिवारी हे सर्व चिटफंड कंपनीचे मालक असून आज तुरुंगाची हवा खात आहेत.

या सर्वांची सुरुवात अत्यंत अतिसामान्य परिस्थितीतून झाली आहे. ‘पर्ल’चे निर्मलसिंह भगू हे सायकलवर जावून दुधाचा रतिब घालायचे, तर पुण्याचे मोतेवार रिक्षा भाड्याने घेवून चालवायचे. या सर्वांनी प्रसारमाध्यमांचा खुबीने वापर केला. सेलेब्रिटी पत्रकारांना कामाला ठेवून राजकीय नेत्यांशी ‘जवळीक’ साधली. जनतेची फसवणूक करून त्यांची प्रकरणे ‘दाबली.’ मात्र यामध्ये भरडला गेला तो सामान्य स्टाफवरील पत्रकार, कर्मचारी. त्याची सध्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. पाण्यात राहणार्‍या माशांचे अश्रू कोणालाही दिसत नाहीत, अगदी त्याचप्रमाणे जगाचे प्रश्‍न सोडविणारे पत्रकार आज आतून कुठेतरी नैराश्येच्या गर्तेत डुबक्या घेत आहेत. मजिठिया आयोग, व्हेज बोर्ड यांसारख्या प्रश्‍नांवर ‘बॉम्बे युनियन जर्नलिस्ट’सारखी अपवादात्मक संस्था वगळता अन्य कोणत्याही पत्रकार संघटना नाहीत. राजकीय पक्षही पत्रकारांच्या समस्यांकडे दिखावूपणाने बघतात.

मास्टर ऑफ जर्नलिझम करून, पत्रकारितेच्या कथित ग्लॅमरस जगात प्रवेश करणारी अवघे एकवीस, बावीस वर्षांची कोवळी तरुण-तरुणी ‘बूम’ घेवून इलेक्ट्रॉनिक माध्यमांत प्रवेश करतात. मात्र 36 व्या वर्षांत ‘करिअर’च्या नावाखाली चाललेल शोषण त्यांना जाणवते. यापैकी काहीजण नंतर पीआर, प्रिंट मिडीया किंवा इतर ठिकाणी जॉब करतात.

कॉलेजमध्ये मास मिडीयाच्या वर्गात ‘जर्नलिझम’वर पोटतिडकिने बोलण्याचा आव आणणारे कुमार केतकर, भारतकुमार राऊत यांसारखे पत्रकार सामान्यांचा तळतळाट भोगणार्‍या महेश मोतेवारची हुजरेगिरी करतात. ‘दिनविशेष’ सारखे फालतू कार्यक्रमही करतात. हे या विद्यार्थ्यांना पचनी पडत नाही, मग येते ती केवळ निराशा, फ्रस्टेशन आणि त्यातून होणारी ससेहोलपट.


उन्मेष गुजराथी
unmeshgujarathi@gmail.com
9322755 098

पुण्यात ‘पुढारी’ चौथ्या क्रमांकावर ! पद्मश्रींनी झापझाप झापले !!

- पुण्याचे ले-आऊट रद्दड
- नगर, पुणेच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना

पुणे
: पुण्यात महाराष्ट्र टाईम्सने मारलेली मुसंडी, दुसर्‍या क्रमांकावर आलेले लोकमत आणि पुण्यनगरीने ग्रामीण भागात सुरु केलेली घोडदौड पाहाता, पद्मश्रींनी तातडीची बैठक घेऊन संपादकीय धुरिणांना सर्वांसमोर झापझाप झापले. पुण्याचे ले-आऊट रद्दड आहे. पुढारी अवघा 77 हजारांवर आला. परफॉर्मन्स चांगला असेल तरच पगारवाढ मिळेल, असे खडेबोल पद्मश्रींनी सुनावले. नगर आवृत्तीला आलेली मरगळ पाहाता, तेथेही लवकरच बदल करण्याचे संकेत पद्मश्रींनी दिले आहेत.
मंगळवारी पद्मश्रींनी एका खासगी हॉटेलात तातडीची बैठक घेतली. सर्व संपादकीय कर्मचारी, उपनगरांचे वार्ताहर व संपादकीय प्रमुखांना या बैठकीला बोलाविण्यात आले होते. वरिष्ठ कार्यकारी संपादक सुरेश पवार यांनी पुणे आवृत्तीत मोठ्या प्रमाणात बातम्या सुटत असल्याची बाब चव्हाट्यावर आणली. 54 महत्वाच्या बातम्या महिनाभरात सुटल्याचे पवार यांनी सांगितले. पद्मश्रींनी तर 2007 नंतर पहिल्यांदाच अंकाची एवढी मोठी घसरण झाली असल्याचे सांगून, काय पाहिजे ते मागा परंतु, अंक सावरा अशी सूचना केली. चांगली पगारवाढ दिली जाईल. परंतु, परफॉर्मन्स चांगला पाहिजे, असा दट्टाही त्यांनी लावला. एक लाख 30 हजार असलेला अंक एवघा 77 हजारांवर आला. सकाळ, लोकमत आणि महाराष्ट्र टाईम्सनंतर पुढारीचा क्रमांक लागतो, असे वास्तवही त्यांनी मांडले. नगर आवृत्तीला प्रचंड मरगळ आलेली आहे. तेथे बदल करण्याचे संकेतही पद्मश्रींनी दिले. लवकरच तेथे एक ज्येष्ठ संपादक नियुक्त करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जोशीबुवा गैरहजर!
दरम्यान, या महत्वपूर्ण बैठकीला निवासी संपादक असलेले गोपाळ जोशी हे आईच्या आजारपणाचे कारण सांगून गैरहजर होते. परंतु, अपयशाचे खापर आपल्या डोक्यावर फुटणार असल्याचे कळल्यानेच त्यांनी बैठकीला येणे टाळले, अशी चर्चा होती. जोशीबुवांचा राजीनामाही पद्मश्रींना मिळाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. 

फेसबुक वर शेअर करा

Facebook