अनंत पाटलांचे तेलही गेले....!

अहमदनगर : भरघोस पगारासाठी लोकमतसारखा चांगला ब्रॅण्ड सोडून अनंत पाटील यांनी सारडाशेठच्या सार्वमतमध्ये संपादकपद स्वीकारले. परंतु, आता तेलही गेले अन् तुपही... अशी अवस्था पाटील यांची झाली आहे. अद्यापही पाटील यांचे प्रेसलाईनमध्ये नाव आले नसून, संपादकांच्या खुर्चीवरही पाटील यांना बसविले गेले नाही. वृत्तसंपादकाच्या शेजारी पाटील यांना बसविण्यात आल्याने, त्यांची बरीच मानसिक कोंडी होत आहे. लोकमतमध्ये पाटील यांना स्वतंत्र कॅबिन आणि संपादकाचा डामडौल होता. तो आता सार्वमतमध्ये मिळत नसल्याने हाताने पायावर धोंडा पाडून घेतला, अशी त्यांची गत झाली आहे.
दैनिक सार्वमतची आर्थिक परिस्थिती सद्या डबघाईस आली आहे. सारडाशेठने वसुलीवर जोर दिला असून, नुकत्याच झालेल्या काही तालुक्यांच्या वर्धापन दिनाच्या वसुलीतून पगार केले जात आहेत. नवीन धंदा अत्यंत कमी आहे. सारडाशेठने हात वर केलेले आहेत. आणखी सहा महिन्यानंतर अनंत पाटील यांना भरघोस पगार मिळेल की नाही, याची खात्री नाही. पाटील ज्वाईन झाले त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचे प्रेसलाईनला नाव येणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही प्रेसलाईनला वसंत देशमुख यांचेच नाव आहे. पाटील हे नावालाच संपादक असून, सर्व संपादकीय सूत्रे वृत्तसंपादक वढणे संभाळतात. त्यांच्याच बाजूला पाटील यांचा टेबल मांडण्यात आला आहे. पूर्वीचे संपादक नंदकुमार सोनार यांना स्वतंत्र कॅबीन होती. त्या संपादकांच्या कॅबीनमध्ये पाटील यांना बसू दिले जात नाही. जाहिरातीसाठी रवींद्र देशपांडे हे चाणाक्ष
यक्तीमत्व पाटील यांनाच पुढे करत असून, धंदा कमी का झाला? याचे खापरही भविष्यात पाटील यांच्याच डोक्यावर फोडण्यासाठी आतापासून रणनीती तयार केली जात आहे. यापूर्वी याच देशपांडे-कुलकर्णी जोडगोळीने देशदूतला कुलूप ठोकण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अनंत पाटील यांचे तेलही गेले अन् तुपही गेले अशी अवस्था झाली आहे.
-----------