> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

सोमवार, ३० मे, २०१६

मटकाबंदीनंतरच 'सोलापूर तभा' ला मराठवाडयात परवानगी

'नागपूर तभा' ने मराठवाडयातील कार्यालये गुंडाळली!
औरंगाबाद - संघाला आपल्या मुखपत्रात पाने भरून छापून येणारा मटका आवडलेला नाही. मटका बंद करण्याची अट पूर्ण केल्यानंतरच सोलापूर तरुण भारतला मराठवाडयात पाय ठेवण्यास संघाने परवानगी दिली आहे. त्यानंतरच मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, नांदेड येथील नागपूर तरुण भारतची कार्यालये या महिन्यात गुंडाळण्यात आली आहेत.
रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या 'तरुण भारत'चा गेल्या 10 वर्षापासून मराठवाड्यात टिकाव लागेनासा झाला आहे. देवगिरी, सोलापूर आणि नागपूरच्या 'तरुण भारत'ने मराठवाडयात हातपाय हलविण्याचा काहीवेळा प्रयत्न केला; मात्र तो अपयशी ठरला. मागच्या 10 वर्षात देवगिरी त. भा. दोनवेळा सुरू झाला व पुन्हा बंद पडला. 1990 मध्ये औरंगाबाद येथून देवगिरी प्रतिष्ठानने सुरू केलेला देवगिरी त. भा. डबघाईला आल्यावर 2005 साली लक्की ड्रॉ काढून वाचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, परिवारातील लोकांनीच तिकीटे न घेतल्यामुळे टार्गेट पूर्ण झाले नाही आणि देवगिरी बंद पडला. त्यावेळी अनेक कर्मचार्याँचे पगार, पीएफचे पैसे बुडवून व्यवस्थापन नामनिराळे झाले. त्यानंतर 2007 मध्ये सोलापूरचे जिल्हा दैनिक असलेल्या 'सोलापूर त.भा.' ने  मराठवाड्यात घुसखोरी करून जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे जिल्हा कार्यालये सुरू केली. बहुतेक जुना - अनुभवी कर्मचारी वर्ग मिळाल्याने ही कार्यालये बऱ्यापैकी सुरू होती. त्यातच परिवाराला न जुमानता मोठया प्रमाणात 'मटका' छापल्या जात असल्याने सोलापूर त. भा. ला मागणीही बरी होती.
त्याचदरम्यान, 2009 च्या विधानसभा तोंडावर येताच भाजप नेत्यांनी निवडणुकीत मदत व्हावी म्हणून 4 वर्ष बंद असलेला 'देवगिरी त. भा.' पुन्हा संभाजी राजे मिडिया प्रा. लि. कंपनीच्या अधिपत्याखाली सुरू केला. संभाजी राजे मिडियाच्या मंडळीने मराठवाडयात सुरू असलेली सोलापूर त.भा.ची  कार्यालये बंद करण्याचा खूप अट्टाहास केला. संघाकडूनही दबाव आणण्यात आला. तरीही सोलापूर बंद न झाल्यामुळे कर्मचारी फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले. मराठवाडयात बहुतेक जिल्ह्यात दोन्ही तरुण भारतची दोन -दोन कार्यालये सुरू झाली आणि एकाच नावाची दोन वृत्तपत्र चोखंदळ वाचकाच्या हाती पडू लागली. त्यामुळे सुरुवातीस खूप गोंधळ निर्माण झाला अन् तो लोकांच्या नंतर अंगवळनी पडला. तसे पाहिले तर दोन्ही त.भा.चे सर्क्यूलेशन जेमतेमच! दोन्हीचे गठ्ठे एकत्र केले तर एखाद्या साप्ताहिकाच्या एक दिवसाच्या अंकापेक्शाही कमीच! सोलापूर त.भा. फक्त मट्क्यामुळे ओळखल्या जात होता. त्यातच अक्कलकोट येथून येणारी सरकारी बस बंद झाल्याने जालना, बीड येथे येणाऱ्या अंकावर मोठा परिणाम झाला आणि 2013 ला सोलापूर त. भा. चे जालना कार्यालय बंद झाले. जालना कार्यालयातील कर्मचार्याँचे 4 महिन्याचे पगार सोलापूर त. भा.ने दिलेले नाहीत. त्यांचे धनादेश बाऊन्स झालेले आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणूका झाल्यानंतर औरंगाबादचा देवगिरी त.भा. पुन्हा दुसऱ्यादा बंद पडला. त्यानंतर संधी साधून सोलापूर त.भा.ने औरंगाबादला अलीकडे आपले पुन्हा कार्यालय थाटले आहे.  काही दिवसांनीच नागपूर त.भा.नेही मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व अन्य काही जिल्ह्यात कार्यालये थाटुन मराठवाडयाची स्वंतत्र 4 पाने सुरू केली. गेल्या 6 महिन्यापासून मराठवाड्यात अकोला येथून नागपूर त.भा. येत असतांना महिनाभरापुर्वी सोलापूरच्या 3 विश्वस्तांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संघांच्या पदाधिकार्याँची नागपूर मुक्कामी भेट घेतली. त्यांनी मराठवाड्यात सुरू झालेला नागपूर त.भा. बंद करण्याची आणि सोलापूर त.भा. सुरू ठेवण्याची मागणी मंजूर करवून घेतली. मात्र, यावेळी संघाने सोलापूर त.भा.मधील मट्क्याचे आकडे कायमस्वरूपी बंद करण्याच्या अटीवरच मराठवाडयात सोलापूरकरांना पाय ठेवण्याची परवानगी दिली आहे. संघाच्या अटी आणि शर्थीनुसार सोलापूर त.भा.ने या महिन्यापासून मट्क्याचे आकडे बंद केले आहेत. त्यानंतर नागपूर त.भा.ने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व इतर  सर्व कार्यालये बंद केली आहेत.

शनिवार, २८ मे, २०१६

तरुण भारतचा नाशिकमध्ये आतबट्ट्याचा खेळ !

जळगाव येथून प्रसिध्द होणाऱ्या तरुण भारतने नाशिकमधून स्वतंत्र आवृत्ती काढण्याचा घाट घातला आहे. मात्र, जळगाव आवृत्तीच्या खर्चाचा ताळमेळ अजूनही जमत नसल्यामुळे नाशिकमध्ये आवृत्ती काढून निवडणूक काळात पीएन स्वरुपात मिळविलेली, आहे ती गंगाजळी खर्च न करण्याचा निर्णय व्यवस्थापनाशी संबंधित परिवाराच्या कोअर टीमने घेतला आहे.
तरूण भारतच्या जळगाव आवृत्तीचा मोफत, वार्षिक वर्गणीदार मिळून जेमतेम खप आहे. गेल्या अॉगस्ट 2015 पासून विश्वस्त मंडळात नवे अध्यक्ष असून तेच संपादक संचालक आहेत. त्यांनी स्वतःच्या संपादकत्वाखाली तरुण भारत नाशिक आवृत्ती सुरु करावे असे प्रकरण मांडले आहे. नाशिकच्या डीबी प्रेसमध्ये अंकाची छपाई करायचे नियोजन आहे. यासाठी संपादक संचालकांनी नाशिकचा दौरापण केला आहे. यापूर्वी नाशिकमध्ये मुंबई तरुण भारत येत आहे. तोच अंक नीट सेटल झालेला नसताना नाशिक तरुण भारत तेथे जातो आहे.
जळगाव तरुण भारतची अवस्था सध्या अडचणीची आहे. त्यात पुन्हा नाशिकचा खर्च म्हणजे खर्चाची नवी अडचण. याची जाणिव संबंधित परिवाराला आहे. तरुण भारतचे गृप म्हणून व्यवस्थापन नागपूर तरुण भारतच्या नेतृत्वात असोशिएट करते. जळगाव तरुण भारत आजही 8 पानांचा असून इतर दैनिके त्यापेक्षा जास्त पानांची आहेत. जळगाव जिल्ह्यात तरुण भारतला भाजप, संघ आणि इतर परिवाराने वार्षिक वर्गणी रुपात स्वीकारलेले नसताना नाशिक आवृत्तीचा आतबट्ट्याचा खेळ सध्या सुरु आहे.
नाशिकला तरुण भारतचा अंक काढत असताना तेथे तरुण भारतला माणसे मिळणे अवघड आहे. जळगाव तरुण भारतमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक सध्या चर्चेत असून जळगावात जाहिरातीचा माणूस ग्रामीणचा संपादक म्हणून काम करीत असल्याचे सांगण्यात येते.

मंगळवार, २४ मे, २०१६

दै.भास्करचा वार्ताहर लाच घेताना अटक

उस्मानाबाद - उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून देण्यासाठी व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अर्थसहाय्य तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून मंजूर करून देण्यासाठी म्हणून ५०० रूपयांची लाच स्विकारणारा दैनिक सुराज्य आणि दैनिक भास्करचा पत्रकार विष्णू वसंत उघडे (रा. .वाशी) याला एसीबीने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी वाशी येथे करण्यात आली असून,या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका महिला संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह वाशी तहसील कार्यालयाकडे अर्ज करण्यासाठी गेली होती. तेथे विष्णू उघडे याची त्या महिलेशी भेट झाली. उघडे याने त्या महिलेचा प्रस्ताव दाखल करून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान व त्यासाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र अधिकारी, कर्मचार्‍यांना सांगून मिळवून देतो असे सांगितले. तसेच या कामासाठी त्या महिलेकडून २२०० रूपये घेतले. काही दिवसांनी विष्णू उघडे याने तक्रारदार महिलेला १७०० रूपयांची मागणी करून ती देण्यासाठी तगादा लावला. त्यानंतर त्या महिलेने उस्मानाबादेतील एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.
महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर उपाधीक्षक अश्‍विनी भोसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी वाशी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सापळा रचला. त्यावेळी विष्णू उघडे याने तक्रारदार महिलेकडे तिच्या कामासाठी पैशांची मागणी करून ५०० रूपये स्विकारल्यानंतर कारवाईकरण्यात आली. याबाबत वाशी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोनि आसिफ शेख हे करीत आहेत.


दैनिक सुराज्य (बीड) आणि दैनिक भास्कर (औरंगाबाद) वृत्तपत्राचा वाशी (जि.उस्मानाबाद) येथील वार्ताहर विष्णु उघडे यास पाचशे रूपयाची लाच घेताना अॅन्टी करेप्शन ब्युरोच्या पोलीसांनी रंगेहात पकडून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे..
या वार्ताहरावर कुणाचा वरदहस्त होता,याचा तपास संबंधित वृत्तपत्राचे संपादक करतील का ?


वाचा सविस्तर प्रेसनोट 

शनिवार, २१ मे, २०१६

जालना सहल प्रकरणातील पत्रकाराचा राजीनामा घेतला !

भाजप प्रदेशाध्यक्षाने प्रायोजित केलेल्या जालना येथील ५ पत्रकारांच्या विमान सहलीचा बेरक्याने पर्दाफाश केल्यानंतर या सर्व पत्रकारांच्या दैनिकाच्या व्यवस्थापनाने चौकशा सुरू केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी माफीनाम्यावर दिलासा मिळालेल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाचे जालना येथील पत्रकार संजय देशमुख यांचा आज एच आर विभागाने औरंगाबादला बोलावून राजीनामा घेतला आहे. तर 'मानबिंदु'ने सहलीला गेलेल्या पत्रकाराच्या अधिकारात मोठी कपात केली आहे. त्याच्यावर 'लक्ष' ठेवण्यासाठी औरंगाबाद येथून सोमनाथ खताळ यांना पाठवण्यात आले आहे. त्यांनी जालना कार्यालयात काम सुरू केली असून त्यांच्या २ बायलाईन बातम्याही आल्या आहेत.
औरंगाबादच्या 'पुण्य'च्या मोठया सेठजीनी अद्याप सहल प्रकरणात लक्ष घातलेले नाही. सहलीहून येवून पुन्हा गायब झालेला त्यांचा पत्रकार कधी रुजू होतोय, याची सेठजी वाट पाहत आहेत. विमान सहलीदरम्यान कार्यालयात गैरहजर असतानादेखील 'पुण्य'च्या जिल्हा प्रतिनिधीने हजेरी पुस्तकावर सह्या केल्याचे समजते. त्यामुळे मोठे सेठजी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भोपाळसेठच्या 'भव्य मराठी' च्या जालन्याच्या प्रतिनिधीवर औरंगाबादच्या ब्यूरो चीफ मुळ हुद्दा असलेल्या सॅटेलाईट एडिटरचा वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. 'सॅटेलाईट' ला 'राज्य'चा आशीर्वाद आहे.
'मानबिंदू'ने भोकरदनला नवीन वार्ताहाराचा शोध सुरू केला आहे. त्यामुळे सहलीला गेलेल्या भोकरदन वार्ताहाराची हकालपट्टी नक्की मानल्या जाते.

बेरक्याचे निवेदन

हल्ली बेरक्यावर कधी तरीच अपडेट असते,बेरक्या पुर्वीप्रमाणे आक्रमक नाही,बेरक्या थंड झाला,अशी चर्चा काहीजण करत आहेत.चर्चा करणा-यांच्या तोंडावर आम्ही हात धरू शकत नाही.ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
परंतु आम्ही सांगू इच्छितो की,बेरक्याला माहिती मिळताच,त्याची एकदा नव्हे चारदा खात्री केली जाते,क्रॉस चेक झाल्यानंतर बातमी खरी असेल तर बेरक्यावर प्रकाशित केली जाते.त्यामुळे बेरक्यावर कमी प्रमाणात पण शंभर टक्के ख-या असणा-या बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत.
बेरक्या ब्लॉग सुरू होवून साडेपाच वर्षे झाली.बेरक्यावर आलेली बातमी शंभर टक्के खरी असते,असा पत्रकारांचा आणि लोकांचा  विश्वास आहे,बेरक्या ब्लॉग फक्त पत्रकारच वाचत नाही तर सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी,पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर महाराष्ट्रात तमाम जनता वाचते.मराठी मीडियात बेरक्याने इतिहास घडवला आहे.सर्वाधिक वाचणारा आणि लाखो हिटस् मिळवणारा बेरक्या हा ऐकमेव ब्लॉग आहे.त्यामुळे कोणाच्याही  विश्वासाला तडा जावू द्यायचा नाही.बेरक्याची लोकप्रियता अफाट आहे.त्याने मराठी मीडियाचे एव्हरेस्ट सर केले आहे.त्यामुळे या लोकप्रियतेला गालबोट लागू नये,याची काळजी घेतली जात आहे.यश मिळवणे जेवढे अवघड आहे,तेवढे यश पचवणे अवघड आहे.
यश मिळाले म्हणून कश्याही बातम्या देणे आणि त्या खपवणे हे बेरक्याच्या रक्तात नाही.भले एक बातमी देता आली नाही तरी चालेल परंतु चुकीच्या बातमीमुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर ती बातमी टाळणे योग्य आहे.बेरक्या कोणाच्याही विरूध्द ऊठसुठ बातम्या देत नाही.ज्या बातम्या ख-या असतील किंवा माहिती खरी असेल तरच बातम्या प्रकाशित केल्या जातात.
बेरक्या म्हणजे मराठी मीडियातील पीटीआय किंवा गॅझेट झाला आहे.त्यामुळे बेरक्यावर येणा-या बातम्या या तंतोतंत ख-या असतील.कोणाची दुश्मनी काढण्यासाठी बेरक्या ब्लॉगचा आता वापर होणार नाही.त्यामुळे कोणाला काय चर्चा करायची ती करू द्या,परंतु बेरक्यावर येणारी बातमी सत्यच असेल.
बेरक्याला माहिती देण्यासाठी सोबत पुरावे जोडावे.कोणाच्याही विरूध्द खोट्या बातम्या पाठवू नये,इतकेच यानिमित्त सांगणे.

आपला
बेरक्या उर्फ नारद

प्रवीण बर्दापूरकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार

 झुंझार पत्रकार , साहित्य सम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मरणार्थ आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या यंदाच्या आचार्य अत्रे पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांची निवड करण्यात आली आहे . आचार्य अत्रे यांच्या पुण्यतिथी दिनी, येत्या १३ जूनला सासवड येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात प्रवीण बर्दापूरकर यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे .
     आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विंजय कोलते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी या पुरस्काराची घोषणा केली . कुमार केतकर , प्रकाश पोहोरे , किरण ठाकूर, राजीव खांडेकर , सुधीर भोंगळे , दीपक टिळक , संजय राऊत प्रभृती मान्यवर हे याधीचे, या पुरस्काराचे मानकरी आहेत . 
     गेली सुमारे पावणेचार दशके पत्रकारितेत असणाऱ्या प्रवीण बर्दापूरकर यांनी २६ वर्ष विदर्भात पत्रकारिता केली आहे . ‘लोकसत्ता’च्या विदर्भ आवृतीचे संपादकपद त्यांनी भूषविले आहे तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे राजकीय संपादक म्हणून त्यांनी दिल्ली येथे काम केलेले आहे . नागपूर , मुंबई , दिल्ली , औरंगाबाद येथे एक वार्ताहर म्हणून काम केलेले बर्दापूरकर , महाराष्ट्राच्या राजकीय सांस्कृतिक घड्मोडींचे भाष्यकार म्हणून परिचित आहेत . वृत्त्संकनाच्या निमिताने ४०वर देशांना भेटी दिलेले प्रवीण बर्दापूरकर हे  साल्सबर्ग सेमिनारची अभ्यासवृती मिळवणारे एकमेव मराठी पत्रकार आहेत . पत्रकारिता आणि विविध साहित्यविषयक १२ पुस्तके बर्दापूरकर यांच्या नावावर आहेत . सध्या ते ब्लॉगर आणि मुक्त पत्रकार म्हणून कार्यरत आहेत .

मंगळवार, १७ मे, २०१६

जालना सहल प्रकरण : बेरक्याच्या बातमीची वरिष्ठाकडून दखल

जालना - भाजप प्रदेशाध्यक्षानी प्रायोजित केलेल्या मर्जीतल्या 5 पत्रकारांच्या सहपरिवार विमान सहलीची बातमी 'बेरक्या'ने प्रसिद्ध करताच, 'त्या' दैनिकाचे व्यवस्थापन खडबडुन जागे झाले आहे. या बातमीची जालना शहर व जिल्ह्यात जोरदार चर्चा असून, 'बेरक्या'ची बातमी whatsaap व facebook वरून दोन दिवसापासून फिरत असून ही पोस्ट व्हायलर झाली आहे.
'बेरक्या' च्या बातमीची दखल घेऊन काल रविवारीच महाराष्ट्रातल्या सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या औरंगाबाद येथील संपादकांनी जालना येथील विमानाने सहल केलेल्या बातमीदारास काम थांबविण्याचे आदेश दिले होते. आज सकाळीच 11 वाजता औरंगाबादला जावून या बातमीदाराने संपादकांसमोर हजेरी लावली. पहिले दोन तास तर संपादकांनी त्याला भेट दिली नाही. खूप गयावया केल्यानंतर संपादक त्याला भेटले. यावेळी संपादकांनी त्याची चांगलीच झाडाझडती घेत तासभर खरडपट्टी काढली. यावेळी त्याने रजेचे खोटे कारण सांगून सहलीला गेल्याची कबुली दिली असून, आपण स्व:खर्चाने सहल केल्याचे सांगितले. मात्र संपादकांना त्याचा खोटारडापणा लक्षात आल्याने ते काम थांबविण्याच्या भूमिकेवर ठाम होते. या प्रकरणी सदर बातमीदारावर कडक कारवाई  होण्याची चिन्हे आहेत
 * 'मानबिंदू'ने आपल्या जिल्हा-प्रतिनिधी आणि तालुका वार्ताहाराची अध्याप चौकशी सुरू केल्याचे समजले नाही. 'मानबिंदू'चा जिल्हा प्रतिनिधी तर काल एका पत्र परिषदेत 'मी नाही त्यातली..' असा आव आणून वागत होता. मी मुंबईत पद्मश्रीच्या पेपरमध्ये असताना खूप कमाई केली आहे, माझे मुंबईत 2 फ्लॅट आहेत, मला नोकरीची गरज नाही, असे काही पत्रकारांजवळ बोलत असल्याचे समजते.
* भोपाळशेठच्या 'भव्य मराठी'चा पत्रकार आज दिवसभर कार्यालयात ठाण मांडून होता. तोही बायको पोलीस खात्यात नोकरीला असल्याने 'भव्य'च्या नोकरीची गरज नसल्याच्या तोर्यात वागत आहे. तर 'पुण्य'चा जिल्हाप्रतिनिधी काल रुजू होणार होता मात्र बेरक्यावर बातमी झळकताच आणखी काही दिवसाची रजा वाढवून गायब झाला आहे.
*मानबिंदू, भव्यमराठी व पुण्यच्या या पत्रकारांवर काय कारवाई होते, याकडे जालन्याच्या मीडियाचे लक्ष लागले आहे. बेरक्याने या पत्रकारांचा पर्दाफाश केल्याने त्यांच्या हूकूमशाहीला कंटाळून गेलेले कनिष्ट सहकारी कर्मचारी मात्र खूष असून त्यांच्यापासून कधी कायमची सुटका होईल, याची वाट पाहत आहेत.

रविवार, १५ मे, २०१६

‘मी मराठी’ पेपर अखेर बंद

मुंबई - 13 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून तब्बल 39 हजार कोटी रुपयांची माया बेकायदेशीरपणे गोळा करणारा महेश मोतेवार आज ओडिशा येथील तुरूंगात सडत आहे. त्यांनी गुंतवणूकदारांच्या पैशातून उभारलेला ‘मी मराठी लाईव्ह’ हा पेपर अखेर 13 मे रोजी बंद पडला.
देशभरातील 13 लाख 45 हजार 119 गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीर मार्गाने तब्बल 39 हजार कोटी रुपयांची रक्कम गोळा करणारा महेश मोतेवार (वय 46 रा. धनकवडी) सध्या तुरूंगात आहे.
रिक्षावाले, रस्त्यावर भाजी विकणारे विक्रेते यांसारख्या सामान्य माणसांना मोठ्या लाभाचे आमिष दाखवून मोतेवार व त्यांच्या समृध्द जीवनने अक्षरशः लूट केली. यातून मिळालेली काळी माया त्यांनी मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्रात गुंतविली. या वृत्तपत्राच्या माध्यमातून स्वतःची काळी कृत्ये पडद्यावर येऊ नयेत व समृध्द जीवनद्वारे आखलेल्या खोट्या आमिषांना गुंतवणूकदार बळी पडावेत हे सुप्त हेतू ठेवले. या वृत्तपत्राच्या संचालक पदांवर त्यांनी कुमार केतकर, निखिल वागळे, शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांना कामाला ठेवले. या सर्व कुख्यात पत्रकारांनी 420 मोतेवार व त्यांच्या कंपनीच्या भरभराटीसाठी सहाय्य केले. यामुळे त्यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली होती.
मोेतेवार यांना 31 मार्च रोजी अटक झाली व अवघ्या 2 महिन्यानंतर म्हणजे 13 मे रोजी ‘मी मराठी लाईव्ह’ हे वृत्तपत्र बंद पडले. मोतेवार व त्यांच्या या चांडाळ चौकडीने सामान्यांच्या लुटीतून मिळालेल्या काही कोटी रूपयांच्या रकमेतून ‘मी मराठी’ व ‘लाईव्ह इंडिया’ हे चॅनल्स विकत घेतले. हे चॅनल्सही कोणत्याही क्षणी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोतेवार यांच्या समृध्द जीवनचे हजारो एजण्टस आज प्रचंड मानसिक टेन्शनमध्ये आहेत. बहुतेकांनी त्यांचे नातेवाईक, हितचिंतक यांच्याकडून पैसे गोळा करून ते समृध्द जीवनमध्ये गुंतवले होते. आज याच एजण्टसच्या मागे सर्व गुंतवणूकदार पैशाचा तगादा लावत आहेत. मोतेवारांच्या पत्नी वैशाली मोतेवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला असून त्या सध्या फरार आहेत.
मी मराठीच्या शेकडो कामगारांचे पगार या कंपनीने अद्याप दिलेले नाहीत. कुमार केतकर, भारतकुमार राऊत यासारख्या कुख्यात पत्रकारांनी मोतेवारांची लाचारी करून कोट्यवधी रूपये कमवले. या सर्वांची 'इडी'मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर ‘एमपीआयडी’ अ‍ॅक्ट लावून त्यांना तुरूंगात खडी फोडायला पाठविण्यात यावे अशी मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली आहे.
मी मराठी बंद पडल्यामुळे केतकर, राऊत यांसारख्या कुख्यात पत्रकारांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, त्यांनी आधीपासूनच ‘नव्या मोतेवारांचा’ शोध घेण्यास सुरूवात केली आहे. ज्या स्ट्रींजर्स, सब एडिटर्स, ऑपरेटर्सच्या बळावर मी मराठीने गरूड झेप घेतली, ते सर्वसामान्य कर्मचारी आज हवालदिल झाले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

जामीन अर्ज फेटाळला
* महेश किसन मोतेवार यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश एस.जे.काळे यांनी 6 मे रोजी फेटाळून लावला.मोतेवार यांना 31 मार्चला अटक झाली आहे. या गुन्ह्यात मोतेवार यांनी जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टाकडे केली होती. अतिरिक्त सरकारी वकील सुनिल हांडे यांनी जामीनास विरोध केला. ते म्हणाले आरोपीने गुंतवणूकीच्या बेकायदा योजना तयार केल्याची माहिती आयकर विभागाच्या अहवालात नमूद केली आहे. आरोपीच्या कंपनीचे देशभरात सुमारे 13 लाख 45 हजार 119 एवढे गुंतवणूकदार आहे त्यांना कंपनीकडून सुमारे 135 कोटी रूपये परतावा देणे बाकी आहे.
* आरोपीच्या धनकवडी येथील घरात बायोमेट्रिक पध्दतीचे कपाट असून ते आरोपीची पत्नी लिना मोतेवार याच उघडू शकतात. या कपाटामध्ये महत्वाची कागदपत्रे असू शकतात. गुंतवणूकदारांकडून मिळालेले पैसे आरोपीने वेगवेगळ्या प्रकल्पात गुंतविले आहेत. स्थावर मिळकती, जंगल मालमत्ता त्यांनी खरेदी केलेल्या तपासात आढळून आले आहे. या कंपनीने कर बुडविला आहे. देशभरात आरोपींविरूध्द 12 गुन्हे दाखल आहेत. सध्या तो ओडिशा येथील गुन्ह्यात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहे. या गुन्ह्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नाही.

समृद्ध जीवनने लाटला हजारो कामगारांचा 'पीएफ'
* भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भविष्यनिर्वाह कार्यालयात जमा न करता अपहार केल्याप्रकरणी समृद्ध जीवन चिटफंड कंपनीचा संचालक महेश मोतेवार याच्यासह दोघांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी 15 मे रोजी गुन्हा दाखल केला. भविष्यनिर्वाह निधी कार्यालयातील निरीक्षक सुरेश फाळके यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
* फिर्यादीनुसार महेश मोतेवार आणि राजेंद्र पांडुरंग भंडारे (रा.दमानीनगर,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या वेतनातून भविष्यनिर्वाह निधीचे बारा लाख 34 हजार रुपये कापून घेण्यात आले. ही रक्कम त्यांनी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात भरली नाही. त्यामुळे निरीक्षक फाळके यांनी तक्रार नोंदविली.
* सीबीआयने आतापर्यंत महाराष्ट्र व ओडिशा या राज्यांतील 'समृध्द जीवन'च्या तब्बल 70 शाखांना सील केले आहे.
* ‘इडी’च्या अडथळ्यामुळे महेश मोतेवार यांना संपत्ती विकण्यास अडथळा निर्माण होत आहे.
* सीबीआयच्या मते 'समृध्द जीवन'चा घोटाळा हा 39 हजार कोटींचा आहे.
........
सौजन्य
उन्मेश गुजराथी

स.सो.खंडाळकर लोकमतमधून निवृत्त होणार


औरंगाबाद - दैनिक लोकमतचे विशेष प्रतिनिधी,ज्येष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर हे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर येत्या १ जूनपासून लोेकमतमधून सेवानिवृत्त होत आहेत.औरंगाबादमध्ये दैनिक लोकमत १९८२ ला सुरू झाला.तेव्हापासून आजपर्यंत खंडाळकर दैनिक लोेकमतमध्ये कार्यरत होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील अचलेर गावचे स.सो.उर्फ सदाशिव सोपानराव खंडाळकर यांच्या पत्रकारितेची सुरूवात सन १९८० मध्ये दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत झाली.याचवेळी त्यांनी एका दलित कन्येशी आंतरजातीय विवाह करून समाजापुढे आदर्श घालून दिला.दैनिक लोकमत औरंगाबादेत सुरू झाल्यानंतर ते औरंगाबादेत आले.सुरूवातीस शहर वार्ताहर नंतर चिफ रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केले.सोलापुरात दैनिक लोकमत सुरू झाल्यानंतर त्यांनी काही काळ सोलापुरात काम केले.सोलापुरात असताना रॉकेल विक्री घोटाळा काढून सोलापुरात रॉकेलला लागली आग,ही मालिका त्यांनी गाजवली.तसेच औरंगाबादेत स्व.जवाहरलाल दर्डा अन्न आणि पुरवठा मंत्री असतानाही पुरवठा खात्यातील मोठा घोटाळा काढला होता.त्यांच्या अनेक शोधवार्ता गाजल्या आहेत.त्यांना ५० हून अधिक विविध पुरस्कार मिळाले आहेत.
राजेंद्र दर्डा यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या खंडाळकर यांच्यावर पाच वर्षापुर्वी हृदय धमनी बाईपास सर्जरी होवूनही त्यांनी सेवानिवृत्ती न घेता दैनिक लोकमतशी असलेली नाळ तोडली नाही.लोकमतच्या पडत्या काळात चौकाचौकात पेपर वाटण्याचे कामही खंडाळकर यांनी केले.लोकमतमध्ये अनेक आले आणि गेले परंतु खंडाळकर यांनी  कधीही लोकमत सोडले नाही.प्रतिस्पर्धी दैनिकाची मोठी ऑफर आली असतानाही त्यांनी लोकमतशी गद्दारी केली नाही.लोकमत आणि खंडाळकर असे जणू समिकरण झाले होते.
एक अभ्यासू,व्यासंगी,शैलीदार लेखन करणारा आणि सर्वांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारा पत्रकार म्हणून स.सो.खंडाळकर यांची ख्याती आहे.
औरंगाबादेत काही दिवसापुर्वी मित्रपरिवारांने त्यांचा मोठा जंगी सत्कार केला होता.यावेळी गौरव अंक काढून त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे.ते दैनिक लोकमतमधून सेवानिवृत्त होत असताना,लोकमत मोठा जंगी सत्कार करणार का,याकडे लक्ष वेधले आहे.

औरंगाबादेत झालेल्या जंगी सत्काराची व्हिडीओ क्लीप
जाता -  जाता :
स.सो.खंडाळकर हे लोकमत मधून सेवानिवृत्त होत आहेत तर गणेश खेडकर आणि सुहास अंजनकर यांनी लोकमतचा राजीनामा दिलेला आहे.खेडकर हे दिव्य मराठीत एन्ट्री करणार आहेत तर अंजनकर हे स्वत:चा व्यवसाय सुरू करणार आहेत.
लोकमतमध्ये रिक्त झालेल्या तीन जागांवर विजय देऊळगावकर (म.टा.),मंदार जोशी, (दिव्य मराठी) मनोज साखरे ( सकाळ ) यांची लोकमतमध्ये वर्णी लागली आहे.हे तिघेही १ जूनपासून लोकमतमध्ये ज्वाईन होणार आहेत.

शनिवार, १४ मे, २०१६

जालन्याच्या पाच पत्रकारांची सहपरिवार विमानाने सहल!


भाजप प्रदेशाध्यक्षांनी घडविली सहल!  

वृत्तपत्राच्या मुळ धोरणाला बगल देत वर्षभर भाजप आणि प्रदेशाध्यक्षाच्या बातम्यांना भरभरून प्रसिध्दी देणार्या जालना येथील नामांकित दैनिकांच्या पाच पत्रकारांची सहपरिवार सहल प्रदेशाध्यक्षांनी विमानाने नुकतीच घडवून आणली आहे. या 5 दिवसाच्या सहलीमध्ये जागोजागी फिरण्यासाठी वातानुकुलीत गाड्यांची आणि मुक्कामासाठी फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली होती. या सहलीची अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असली तरीदेखील शहरामध्ये जोरदार चर्चा असून, मुख्य कार्यालयाला आजारपण.. आणि नातेवाईकांच्या लग्नाची खोटी कारणे सांगून रजा मंजूर करून सहलीवर गेलेले पत्रकार चांगलेच गोत्यात आले आहेत. 
या सहलीमध्ये 'मानबिंदू'चा जालना येथील जिल्हा प्रतिनिधी आणि भोकरदन येथील तालुका वार्ताहर, या दोघासह 14 राज्यात 56 आवृत्या असणार्या ग्रुपच्या 'भव्य मराठी', राज्यात सर्वाधिक खपाचा उच्चांक गाठणारे दैनिक आणि 'पुण्य' या दैनिकांचे जिल्हाप्रतिनिधी सहभागी झाले होते. 'मानबिंदु'चा तालुका वार्ताहर हा प्रदेशाध्यक्षांचा खास माणूस असल्याने त्याच्यावरच या चौघा पत्रकारांच्या चोख व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच, या चौघांच्या आवडी-निवडीही चांगल्याच माहिती असल्यामुळे त्याला या सहलीत पाठविण्यात आले होते. या सर्व पत्रकारांना सहपरिवार औरंगाबादहून विमानाने मुंबई येथे पाठविले होते. तेथून विमानाने दिल्ली, आग्रा, वैष्णोदेवी आणि परत मुंबई अशी सहल घडवून आणण्यात आली आहे. 5 दिवसाची सहल आटोपून ही मंडळी नुकतीच जालना शहरात परतली आहे. हे चौघेही आपल्या रजेची वेगवेगळी कारणे सांगत असले तरीही संबधित दैनिकांच्या व्यवस्थापनाला हा सर्व प्रकार समजला आहे. त्यामुळे या पत्रकारांना खुलासे करताना नाकीनऊ येणार आहे.  
राज्य पातळीवर चार प्रमुख दैनिकात मोठी स्पर्धा असतानादेखील या वृत्तपत्राचे प्रतिनिधी मात्र जालना येथे हातमिळवणी करून ग्रुप रिपोर्टींग करून सारख्याच बातम्या छापतात. अशा अनेक सारख्या बातम्या या चौघाच्या नियमित प्रसिध्द होतात. 
जालना शहरात पत्रकारामध्ये खूप मोठी गटबाजी आहे. 'लाॅबी'चे राजकारण करून जातीयवाद केल्या जात आहे. शहरातील 'लाॅबी'चा एक गट मागे सक्रीय झाला होता. एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मार्गदर्शनात दररोज बैठका होत. मात्र या गटातील मोठ्या दैनिकांचे 3 जण वरचढ ठरले आणि त्यांनी स्वतंत्रपणे लाॅबीच्याच नेत्यांना जवळ करून आपली पोळी भाजून घेतली आहे. या 3 जणांनी सोबतीला लाॅबीबाहेरचा सर्वाधिक खपावाला प्रतिनिधी घेतला आहे. या खपावाल्याने एमआयडीसीच्या अनेक बातम्या अनेकदा रिपीट छापून वर्गणी जमा करून मंदिर व घर टोलेजंग बांधले आहे. या चौघांची युती जालना शहरात चांगलाच चर्चेचा विषय आहे.

शुक्रवार, ६ मे, २०१६

‘सकाळ’ चा दररोजचा खप 13,37,901

पुणे - समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना उत्तरे शोधत उद्याच्या जगाचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’वर महाराष्ट्रातल्या वाचकांनी सर्वाधिक खपाचे दैनिक असल्याची मोहोर उमटवली आहे.

‘ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१५ या काळात प्रत्यक्ष विक्री झालेल्या प्रतींच्या आधारे केलेल्या अहवालानुसार ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांचा एकत्रित खप महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मुद्रित माध्यमांच्या संदर्भात जाहिरात आणि प्रकाशन क्षेत्रांमध्ये ‘एबीसी’चे निष्कर्ष आणि आकडेवारी विश्वासार्ह आणि अधिकृत मानली जाते.

नवीन उत्सुक वृत्तपत्रे व घाऊक पुरवण्यांच्या भाऊगर्दीत ‘सकाळ’ने १३ लाख ३७ हजार ९०१ प्रतींचा खप नोंदवला आहे. सकारात्मक परिवर्तनाचे व्यासपीठ बनलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या शिरपेचात या अहवालाने लोकमान्यतेचा आणखी एक तुरा खोवला आहे.

‘एबीसी’च्या आकडेवारीनुसार ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचा दररोजचा खप ६.०४ लाख प्रतींपेक्षा अधिक आहे. पुणे व मुंबई या महानगरांतील ‘सकाळ’चा खप दररोज ७,३०,७७१ प्रति इतका आहे. राज्याच्या अन्य भागांतल्या उदयोन्मुख शहरांमधील वाचकांनाही ‘सकाळ’ला आपलेसे केले आहे, हेसुद्धा ‘एबीसी’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

वृत्तपत्रांच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या ‘सकाळ’ने साडेआठ दशकांच्या वाटचालीत सामाजिक बांधिलकी केवळ जोपासलीच नाही, तर गेल्या काही वर्षांत राज्यभरातील नागरिकांच्या सहभागाने या बांधिलकीच्या जाणीवेला व्यापक स्वरूप दिले आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ या माध्यमांतून वाहतुकीच्या समस्येवर उत्तर शोधणारा ‘पुणे बस डे’, महिलांना सशक्त व्यासपीठ देणारे, ‘तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान’, तरुणाईला नेतृत्वगुणांची ओळख करून देणारे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने जाणारी ‘पाणी परिषद’, ग्रामविकासाच्या स्वप्नांना विचारविनिमयातून प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न करणारी ‘सरपंच परिषद’ असा हा प्रवास आहे. लोकभावनेशी जोडले जाणे, हे ‘सकाळ’च्या सर्व उपक्रमांचे अंगभूत वैशिष्ट्य ठरले आहे. सकाळची समाजबदलासाठीची ही सक्रियता मराठी मनाला भावल्याचेच ‘सकाळ’ महाराष्ट्रात ‘नंबर वन दैनिक’ बनल्याचे सिद्ध होते.
Sakal 

बुधवार, ४ मे, २०१६

वटवागुळमुळे 'कलमनामा' बाहेर


मुंबई - 'आता जग बदलेल'मध्ये 'वटवागुळ'ची नित्तिमत्ता बदलली आहे.त्याने आपला अनेक वर्षापासूनच मित्र 'कलमनामा'चा पदोपदी अपमान केला,त्याची सारी स्टोरी बेरक्याने दिली आहे.अखेर 'कलमनामा'ने 'आता जग बदलेल' सोडून नवं जग शोधनं सुरू केलं आहे.
'कलमनामा' आणि 'वटवागुळ' तसे जुने मित्र.'आता जग बदलेल'च्या निमित्ताने एकत्र आले,परंतु 'वटवागुळ'ने पदोपदी अपमान केल्याने 'कलमनामा' आठ दिवसाच्या रजेवर गेला होता.आठ दिवसानंतर जेव्हा कलमनामा ऑफीसमध्ये आला,तेव्हा वटवागुळ म्हणाला,'तुला काय वाटले,मी तुझी मनधरणी करेन,तू आलाच कश्याला ऑफीसला,तुला काहीच काम जमत नाही,तेव्हा तू येथे न थांबणे योग्य आहे !
त्यानंतर 'कलमनामा'ला काय बोलावे कळेनासे झाले आणि तो आल्या वाटेने परत गेला.चार दिवस झाले,तो ऑफीसला परत आलेला नाही.'कलमनामा'ने 'आता जग बदलेल' सोडल्यात जमा आहे.इतका घोर अपमान आयुष्यात कोणी केला नसेल,तितका अपमान वटवागुळने केला.तरीही 'कलमनामा'चे 'कलम' चालत नाही.इतराने कोणी काय म्हटले असते,तर 'कलमनामा'चा 'कलम' चालला असता.
असो,'कलमनामा'नंतर 'आता जग बदलेल'ला आणखी झटका बसला आहे,अँकर पंकजने चॅनल सोडून पुण्यात टीव्ही मीडियात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

वटवागुळ को गुस्सा क्युं आता है ?
'आता जग बदलेल'मध्ये सकाळी आठ वाजता लाइव्ह विथ ...बरोबरचा अँकरला कोणीच साथ देत नसल्यामुळे त्याने आपला शो बंद केला,तेव्हा वटवागुळचे या अँकरबरोबर 'मला न विचारता शो बंद का केला? म्हणून कडाक्याचे भांडण झाले आणि वटवागुळ रागारागाने आणि तावातावाने घरी निघून गेला होता.
रात्री होणारा आजचा सवाल कार्यक्रमाला सुध्दा तो आला नाही.अखेर तो शो त्याच अँकरने केला .तो अँकर 'वटवागुळ'चा पंटर असल्यामुळे ते वादळ पेल्यातील ठरले.बहुतांश अँकर,रिपोर्टरला छोट्या छोट्या कारणावरून वटवागुळ अपमान करत असल्याने अनेकजण त्रस्त झाले आहेत.त्यामुळे अनेकजण सोडण्याच्या तयारीत आहेत.

मंगळवार, ३ मे, २०१६

'सकाळ' महाराष्ट्रात नंबर 1

मुंबई - ऑडीट ब्युरो सक्र्युलेशनच्या जुलै २०१५ ते डिसेंबर २०१५ च्या अहवालानुसार दैनिक सकाळ वृत्तपत्र महाराष्ट्रात नंबर १ तर लोकमत नंबर २ ठरले आहे.या अहवालानुसार सकाळचा खत  1337901 तर लोकमतचा खत 1302390 जाहीर करण्यात आला आहे.
सकाळला  होम सिटी पुण्यात तोड नाही.सकाळच्या तुलनेत निम्मा खतही इतर सर्व दैनिके एकत्र केली तरी नाही.त्या जोरावर सकाळने बाजी मारली आहे.नागपूर,औरंगाबाद,नाशिकमध्ये लोकमत क्रमांक १ वर आहे.मुंबईत महाराष्ट्र टाइम्स तर कोल्हापूरमध्ये पुढारी नंबर १ वर आहे.मात्र एकत्रित खपात सकाळ नंबर १ वर आहे.नागपूर,औरंगाबाद,नाशिक कोल्हापूरमध्ये सकाळ दुस-या किंवा तिस-या क्रमांकावर आहे.ऑडिट ब्युरो सक्र्युलेशनमध्ये स्कीमचा अंक गृहीत धरला जात नाही.त्याचा फटका लोकमतला बसला आहे.
सकाळ नंबर १ ठरल्यामुळे सकाळची टीम उत्साहाने कामाला लागली आहे.
 


Now Maharashtra No.1 Newspaper is Sakal.
As per ABC norm our PO is 
- Sakal 1337901 
- lokmat PO is 1302390"लोकमत"वाल्यांना कोणते "आरोग्य" दिसतेय?

"लोकमत"च्या पुणे आवृत्तीचा अंक चाळता-चाळता आज छोट्या जाहिरातीत "आरोग्य" या हेडखाली एक जाहिरात दिसली... "टीना देसाई हायप्रोफाईल फीमेल मॉडेल्स विथ एसी रूम सर्व्हीस (24X7)"..... कुणी बिनडोक आणि अडाणी माणूसही सांगेल ही कसली जाहिरात आहे.... यात "लोकमत"वाल्यांना कोणते "आरोग्य" दिसतेय? यांचेच आरोग्य नं डोकी तपासण्याची गरज आहे... मारे "बाबू"वर निवेदन देऊन भूमिका छापली पहिल्या पानावर 2-4 दिवसांपूर्वी... आणि या असल्या जाहिराती छापता?? हेच का तुमचं समाजाप्रती उतरदायित्व... केवळ निवेदने छापून कसे नामानिराळे राहू शकतात वृत्तपत्रे?? मटके अन सट्टा जुगाराचे आकडे छापण्यापेक्षा हे भयानक आहे.... का व्हावे तुमचे वर्गणीदार?? का व्हावे सखी न बालमंच सदस्य? हे असले घाणेरडे सेवांचे नंबर हाती पडले नं कुतूहल म्हणून कोवळ्या पोरांनी "आरोग्य सेवा" घ्यायची ठरविली तर?? थोडा तरी कॉमन सेन्स दाखवा की जाहिराती स्वीकारताना... पोलिसांच्या समाजसेवा शाखा सुद्धा झोपल्यात की काय??  या छोट्या जाहिरातीत पाहिजेत, मोबाईल टॉवर, पंचकर्म, क्विज, आरोग्य, कर्जविषयक यातील 90% जाहिराती प्रथमदर्शनीच बोगस आणि फसव्या दिसताहेत सरळसरळ.... कुणी सखी गेली पंचकर्मला तर?

फेसबुक वर शेअर करा

Facebook