> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

चांगल्या समाजासाठी चॅनेलमध्ये कॉस्ट कटिंगची हवा..

मुंबई-स्वतःला चांगल्या समाजासाठी म्हणवणाऱ्या चॅनेलमध्ये सध्या कॉस्ट कटिंगची हवा सोडली जातेय. टीआरपीमध्ये प्रचंड घट झालीये. "इडली" आणि "ढोकळा" नीट काम करणाऱ्या लोकांच्या नाकी नऊ आणतायत. होय महाराजा म्हणणाऱ्या लोकांचे मात्र अच्छे दिन आलेत. मेहनत करणाऱ्या एका पुणेकर नवं पत्रकार कन्येच्या रोजच्या सर्व स्टोरी आयडिया "ढोकळ्या"कडून नाकारल्या जातात आणि त्या कन्येला रोज आउटपुटमध्ये असलेल्या "बेदम" माणसाकडे पाठवून मानसिक त्रास दिला जातो. आणि हल्ली म्हणे रात्री 9.30 वाजल्यानंतरच संपादकीय बाणा जागा होतो. दिवसभर धावपळ करणाऱ्या राज्यभरातील सर्व जिल्हा प्रतिनिधींना रात्री 9.30 नंतर संपादकीय बाणा दाखवून त्यांना मूर्खात काढलं जातं. "हुशार" आणि "कमळ" या टीव्ही 9 मधील सर्वात जुन्या जाणत्या रिपोर्टर्सना जेरीस आणण्याचे प्रयत्न केले जातात. " हुशार" आणि "कमळ" तिथल्या तिथे सूनवत असल्यामुळे त्यांच्या समोर कोणी पंगा घेत नाही" मात्र धड एक पाऊल पुढे नं टाकता आल्यामुळे तिथून गच्छंती झालेल्याला हाताशी धरून मागून त्यांना त्रास द्यायची संधी सोडत नाही. आउटपुट मधील "बेदम"त्रासाला कंटाळून अनेक जण राजीनामा देतायत. असाइंमेंटवरील "सोहनलाल" मिशीला कोकम लावून पिळ देत बसलेला असतो. एकुणचं काय तर चांगल्या समाजासाठीची वलग्ना करणाऱ्यांची अवस्था सध्या "दुसऱ्याचं पहायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून" अशीच आहे....

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

पुढारीला अखेर मुहूर्त सापडला...


औरंगाबाद - लांडगा आला रे,लांडगा आला... या म्हणीची प्रचिती देणार्‍या पुढारीला अखेर मुहूर्त सापडला आहे.येत्या दर्पण दिनी म्हणजे 6 जानेवारी रोजी पुढारी बाजारात येणार असून,प्रकाशन सोहळा मात्र नंतर करण्यात येणार आहे.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर यंदा कसल्याही परिस्थितीत पुढारी औरंगाबादेत सुरू करण्याचा चंग पद्मश्रीने बांधला होता,परंतु नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने या म्हणीप्रमाणे अनेक अडचणी येत होत्या.
गेल्या तीन महिन्यापासून सर्व तयारी झाली असताना नोटाबंदीमुळे पुढारीला मुहूर्त पुढे ढकलावा लागला होता.त्यामुळे रोज डमी अंक काढून कंटाळलेले कर्मचारी वैतागले होते तर वाचक निराश झाले होते.वितरकामधील उत्साहही निघून गेला होता.
अखेर पुढारीने कोणताही गाजवाजा न करता किंवा प्रकाशन सोहळा न करता येत्या 6 जानेवारी 2017 पासून बाजारात अंक देण्याचा निर्णय घेतला आहे.औरंगाबाद शहर,औरंगाबाद जिल्हा,बीड आणि जालना अश्या चार आवृत्त्या निघणार असून,सिटीचा अंक 12 + 8 तर औरंगाबाद ग्रामीण, बीड आणि जालनाचा अंक 12 + 4 राहणार आहे.
मराठवाड्यात आठ जिल्हे असून फक्त औरंगाबाद,बीड आणि जालनामध्ये पुढारी दिसणार आहे.परभणी,हिंगोली,नांदेेड,लातूर,उस्मानाबाद पाच जिल्ह्यात पुढारी केव्हा सुरू होणार,हे कोडेच आहे.

शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

महाराष्ट्र १ मध्ये राजीनामा सत्र सुरूच

महाराष्ट् १ मध्ये नवे संपादक येताच चॅनलने चांगले चेहरे गमावले. असाईनमेंटला शिव्या हासडून नम्रता निघून गेली..पाठोपाठ असाईनमेंट डेक्सला खिंडार पडलं. संदीप टिव्ही ९ ला गेला तर विशेष स्टोरीज करणारी ज्योती आता हेल्थ वेबसाईटला स्पेशल स्टोरी करु लागली. नुसत्याच ओरडणाऱ्या सिनियरला कंटाळून टीकरचा प्रणय मशीन सोडून जातोय.तर दुसरीकडे आऊटपूटलाही मोठं भगदाड पडलं. म्हणे सुंबरानकर्ता न्यूजरुममध्येच हेडवर चढला. त्याने मीटींगमध्येही सर्वांनाच चांगलं सुनावलं असं बेरक्याच्या सुत्रांनी सांगितलं. 'काम करणाऱ्यांना तुम्ही बोलू देत नाही' म्हणत मीटींगमध्ये कार्यकारी संपादकाची खरडपट्टी काढल्याचही कळतंय. हे होताच दुसऱ्याच दिवशी राजीनामा टाकून सुंबरानकर्ता पुण्याला परतला. दुसरा सुंबरानकर्ताही अस्वस्थ असल्याचं कळतंय. आऊटपूट, इनपूटला म्यानपावर नसल्याची बोंबाबोंब ज्युनियर करत आहेत. दीड वर्ष होऊनही पगारवाढ नाही.. आर्थिक डबघाईला कंटाळून चॅनलमध्ये राजीनामा सत्र सुरु झालंय. जय महाराष्ट्रला जात असलेला वर्ल्ड वनचा एंकर पगारवाढीच्या आश्वासनानंतर थांबलाय. लेटर परत केल्याने जय महाराष्ट्र संतापलाय. दुसरा एंकरही पगारवाढ शोधत फिरतोय. बातम्या फॉरवर्डींग करणारी गेस्ट कोऑडिटनर नाफडेबाई आऊटपूट हेड भडकल्याने निघून गेली. तर तिकडे प्रोडक्शनचंही तेरा वाजलेत. नव्या संपादकासोबत जंत्री न जमल्याने मंत्रीने राजीनामा टाकला तर लोड वाढल्याने भा.लु. नेहि राजीनामा टाकला. तिकडे पुण्यात ब्युरो अस्वस्थ असल्याचं कळतंय. ब्युरो चीफला काढून टाकणार कळाल्याने तिने सहकाऱ्यांना फितूर करायला सुरुवात केली. हे प्रकरण म्यानेजमेंटच्या कानी गेलंय. यावर मैनेजमेंट ठोस कारवाई करणार असल्याचं कळतंय. दिल्ली ब्युरोनंही राजीनामा टाकला आहे. आऊटपूटची आणखी एकजण टिव्ही९ च्या कल्पना रंगवत आहे. पीसीआरमध्येही बोंबाबोंब सुरु आहे. सिनियर नुसते नावापुरते उरलेत. त्यांनी ही जोपर्यंत पगार मिळत नाहीत तोपर्ढीयंत काम न करण्याचा नि्धार केला आहे. ज्युनियर पुरते वैतागले आहेत.याव्यतिरिक्त आणखी  चार-पाच जणांनी राजीनामे टाकलेत. त्यामुळे च्यानल आतातरी तग धरेल का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

जाता - जाता

महाराष्ट् १ च्या आर्थिक डबघाईला कंटाळून वागळे चक्क न्यूजरुममध्ये मॅनेजमेंटशी भांडून निघून गेले. ५० हजारी सिनीयरच्या पगारी रोखल्या होत्या. त्यामुळे वागळे नाराज होते. मॅनेजमेंटच्या पायधरणीला न जुमानता वागळेंनी राजीनामा फेकला. ऐन धंद्याच्या वेळी (निवडणुका) वागळे गेल्याने मैनेजमेंटचे धाबे दणाणले. अखेर मैनेजमेंटने आधीच बाशींग बांधून असलेल्या जाधवला कार्यकारी संपादक म्हणून रिपोस्ट केलं. जाधव येताच चॅनलमध्ये पदांचं राजकारण सुरु झालं. त्यामुळे काम करणारा मोठा वर्ग जाधववर नाराज असल्याचं कळतंय. परिणामी चॅनलमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं. सवाल हातात आल्याने चॅनलला जाधवने एका विशिष्ठ जातीचे मुखपत्र बनवले. मोर्चे, आरक्षण राजकीय चर्चा यांच्या पलिकडे  विषय जात नसल्याने मैनेजमेंटकडून पर्याय शोधलं जात असल्याची चर्चा आहे. राजकारणाच्या पलिकडे नव्या संपादकाला काही कळत नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे सवालचा टीआरपी कमालीचा घसरलाय. संपादकाला व्यवसायिक धोरण नसल्याचं ऑफीसमध्ये गॉसीप सुरु झालंय. त्यामुळे काही लक्षवेधी चेहऱ्यांकडे बोलणं सुरु झाल्याच्या बातम्या बेरक्याच्या सुत्रांनी दिल्या आहेत. त्यामुळे कुठला आंबा चॅनल प्रसन्न करतो कळेलच.. तोपर्यंत 'चला चॅनल बदलू या'गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

बीबीसी मराठी साठी तरूणांना संधी

पुणे - बीबीसी मराठी सेवांसंबंधी रानडेतील कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याचे मुख्यालय दिल्लीत असेल आणि मुंबईतही काही जागा असतील. त्यासंबंधीची माहिती बीबीसीच्या संकेतस्थळावर आहे. १३ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. अर्ज करण्यापूर्वी जाॅब डिस्क्रिप्शन आणि बीबीसी व्हॅल्यूज ही पानं जरूर पहा. संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन असणार आहे. मराठीवर प्रभुत्व आणि इंग्रजीची चांगली जाण, तंत्रज्ञानाला सरावलेपण या किमान आवश्यकता त्यात दिसतात. निवडक उमेदवारांच्या मुलाखती नंतरच्या टप्प्यात होतील. त्यानंतर प्रशिक्षणही दिले जाणार आहे. माध्यम क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय ब्रॅंडसोबत काम करण्याची ही उत्तम संधी आहे.
बीबीसीच्या संकेतस्थळावरून सहज सापडलेल्या पदांची माहिती पुढे आहे. सोबतची लिंकही पहावी.

Broadcast Journalist, Multimedia, BBC Marathi (Delhi)
Broadcast Journalist, Planning, BBC Marathi Service (Delhi)
Translator, Marathi Service (Delhi)
Reporter, BBC Marathi Service (Mumbai)
Field Producer, Marathi Service (Mumbai)
Shoot Edit, BBC Marathi Service (Mumbai)
Broadcast Journalist, Social Media, BBC Marathi Service (Mumbai)

बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

मीडियास नोटाबंदीचा जबरदस्त फटका, 50 टक्के व्यवसाय घटला, कर्मचारी कपातीचे संकट...

मुंबई - मोदी सरकारने 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रूपयाच्या नोटावर बंदी घातल्यानंतर सर्वच क्षेत्रात मंदीची लाट आली आहे.नोटाबंदीमुळे बाजारातील उलाढाल निम्मावर आली असून,यामुुळे अनेकजण त्रस्त झाले आहे.नोटाबंदीचा निर्णय चांगला असला तरी,प्रचंड चलन तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांनी हात आखडता घेतला आहे.दुसरीकडे नोटाबंदीचा जबरदस्त फटका मीडियालाही बसला आहे.
आघाडीचे दैनिक लोकमत,सकाळ,पुण्यनगरी,महाराष्ट्र टाइम्स,दिव्य मराठी,पुढारी,लोकसत्तासह अनेक वृत्तपत्राच्या जाहिरात व्यवसायावर परिणाम झाला असून,सर्वच वृत्तपत्रांनी आपल्या मुख्य अंकाच्या पानाची संख्या कमी केली आहे.पुण्यात सकाळ नंबर  1 असूनही जाहिरात व्यवसाय घटल्याने सकाळने पाने कमी केली आहेत.त्याचबरोबर सरकारनामाचे लॉचिंग पुढे ढकलले आहे.औरंगाबाद,नागपूर,नाशिकमध्ये लोकमत नंबर 1 वर आहे,परंतु  पानाची संख्या कमी करावी लागली आहे,कोल्हापूरात पुढारी नंबर 1 आहे,परंतु पुढारीनेही पाने कमी केली आहेत.त्याचबरोबर पुढारीच्या औरंगाबाद आवृृत्तीचे लॉचिंग पुढे ढकलण्यात आले आहे.अनेक वृत्तपत्रांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून,नव्या वर्षात अनेकांना घरी बसावे लागणार आहे.
नोटाबंदीचा फटका टीव्ही मीडियासही बसला आहेे.50 टक्के जाहिराती कमी झाल्याने अनेक चॅनलनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर अनेक शो बंद केले आहेत.नोटाबंदीमुळे महाराष्ट्र 1 आणि जय महाराष्ट्र चॅनल आर्थिक संंकटात सापडले आहे.

मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

महाराष्ट्र 1 मध्ये गळती सुरू,तिरोडकर याचा राजीनामा

मुंबई - निखिल वागळे गेल्यानंतर महाराष्ट्र 1 मध्ये गळती सुरू झाली आहे.दिल्ली प्रतिनिधी अमेय तिरोडकर याने राजीनामा दिला असून,पुण्याची रिपोर्टर अश्‍विनी सातव - डोके राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.त्याचबरोबर अनेक रिपोर्टर आणि अँकर दुसर्‍या चॅनलच्या शोधात आहेत.21 डिसेंबर उजाडला तरी नोव्हेंबर महिन्याचे पगार न झाल्यामुळे महाराष्ट्र 1 चे सर्व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
महाराष्ट्र  1 चॅनल वर्षपुर्ती होण्याअगोदरच आर्थिक डबघाईस आले आहे.गेल्या काही महिन्यापासून कर्मचार्‍यांंचे पगार वेळेवर होत नाहीत.नोव्हेंबरचा पगार अद्याप झाला नाही.पगार वेळेवर होत नसल्यामुळे सर्व कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.व्यवस्थापन पुर्णपणे ढासाळले आहे.आर्थिक ताणाताण सुरू झाल्याने निखिल वागळे पाठोपाठ आता दिल्ली प्रतिनिधी अमेय तिरोडकर याने राजीनामा दिला आहे.याच कारणामुळे पुण्याची रिर्पाटर अश्‍विनी सातव - डोके राजीनामा देण्याच्या तयारीत आहेे.
महाराष्ट्र 1 चॅनलला आर्थिक पार्टनर हवा आहे.कोल्हापूरच्या एका गुटखा विक्रेत्यास घोड्यावर बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला,परंतु टांगा पलटी करून घोडा पसार झाला आहे.वागळेंच्या जागेवर आलेले कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना दिवसभरात कोणते शो चालावावेत,कोणत्या वेळी कोणत्या बातम्या घ्याव्यात,याचे नियोजन जमत नसल्याचे दिसून येत आहे.आजचा सवाल हा डिबेट शो अत्यंत भंगार होत आहे.या शोचा टीआरपी पार ढासळला आहे.कंटेंन्ट नसल्यामुळे चॅनलचाही टीआरपीही पार घसरला आहे.त्यामुळे महाराष्ट्र 1 चॅनलचे भवितव्य दिवसेंदिवस अंधकारमय होत आहे.

शनिवार, १० डिसेंबर, २०१६

2016 मध्ये 88 पत्रकारांवर हल्ले,22 जणांवर खोटे गुन्हे

मुंबई - महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी 2016 हे वर्ष सर्वात वाईट,धोकादायक ठरले असून या वर्षात राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या 79 घटना घडल्या असून यामध्ये 88 पत्रकार जखमी झाले आहेत.सरासरी दर चार दिवसाला राज्यात एका पत्रकारावर हल्ला झाल्याचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे संकलित झालेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे.1 जानेवारी 2012 ते डिसेंबर 2016 या पाच वर्षांच्या काळात राज्यात थेट 341 पत्रकारांवर  हल्ले झालेले आहेत.हे प्रमाण अन्य कोणत्याही राज्यांच्या तुलनेत जास्त आणि चिंता वाटावी एवढे आहे."आणखी किती पत्रकारांची डोकी फुटल्यावर सरकार पत्रकार संरक्षण कायदा करणार आहे"? असा सवाल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या प्रसिध्दी पत्रकात राज्यातील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांचा सविस्तर तपशील दिला गेला आहे.
2016 मध्ये झालेल्या हल्ल्लयात 88 पत्रकार जखमी तर झाले आहेतच त्याचबरोबर राज्याच्या वेगवेगळ्या भागातील पत्रकारांना धमक्या देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या 24 घटना घडलेल्या आहेत.शिवाय पत्रकारांवर अ‍ॅट्रो्रसिटी,विनयभंग,खंडणी,सारखे गंभीर आणि अजामिनपात्र खोटे गुन्हे दाखल करण्याच्या 22 घटना घडल्याचे समोर आले आहे.याच कालावधीत एका पत्रकाराचे अपहरण झाल्याची घटना घडली असून त्याची नोंद मुलुंड पोलिसात झालेली आहे.वेगवेगळ्या कारणांनी 6 पत्रकारांनी आत्महत्या केल्या असून 14 पत्रकारांचे अकाली निधन झाले आहे.माध्यमातील या सर्व घटना माध्यमात काम कऱणार्‍यसाठी चिंता वाढविणार्‍या असल्याचे समितीच्या पत्रकात नमुद कऱण्यात आले आहे.
समितीने 2012 पासूनची आकडेवारी दिलेली आहे.2012 मध्ये पत्रकारांवरील हल्ल्याच्या 45 घटना घडल्या.2013 मध्ये त्यात मोठीच वाढ होऊन ती संख्या 65 पर्यंत पोहोचली.2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले नाही.उलट ते वाढले.2014 मध्ये 66 पत्रकारांवर हल्ले झाले.2015 मध्ये हा आकडा आणखी वाढला आणि हल्ल्यांची संख्या 77 वर पोहोचली तर 2016 मध्ये 88 पत्रकार जखमी झाले आहेत.गेल्या पाच वर्षात लोकमत,सामना,महाराष्ट्र टाइम्स सारख्या दैनिकांवर ह्ल्ले झाले.पाच वर्षातील दैनिकांवरील हल्लांची संख्या 22 एवढी आहे.यातून वाहिन्यांची कार्यालयही सुटली नाहीत.
पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अऩ्य संघटनांच्या मार्फत गेली दहा वर्षे पाठपुरावा सुरू आहे.त्यासाठी आंदोलनं केली जात आहेत.गेल्या पाच वर्षात अशा केल्या गेलेल्या आंदोलनांची संख्या 187 एवढी आहे.सनदशीर मार्गाने पत्रकार आंदोलनं करीत असतानाही सरकार कायदा करीत नसल्याने हल्लेखोर मोकाट सुटले आहेत.पत्रकारांना संरक्षण देण्याची सरकारची मानसिकता नाही,आणि पत्रकारांवर हल्ले केले तरी काही होत नाही असा संदेश गेल्याने हल्ल्यांची संख्या दरवर्षी वाढत चालली असल्याचा आरोपही एस.एम.देशमुख यांनी केला आहे.
2016 मध्ये पत्रकारांवर जे हल्ले झाले आहेत त्यातील 66टक्के हल्ले हे राजकीय व्यक्तींकडून झालेले आहेत.पत्रकारांना धमक्या देण्यातही हाच घटक आघाडीवर आहे.पोलिंसांकडून पत्रकारांना मारहाण झाल्याचे प्रमाण 15 टक्के आहे.10 टक्के हल्ले विविध माफिया,स्थानिक गुडांकडून झालेले असून 9 टक्के हल्ले इतर घटकांनी केलेले आहेत.पाच वर्षांचा जो तपशील समितीकडे उपलब्ध आहे त्यानुसार 99.99 टक्के प्रकरणातील हल्लेखोरांवर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्याने तक्रार दिल्यानंतर ते लगेच जामिनावर सुटले आहेत.त्यामुळं माजलगावातील एका घटनेत कोर्टाने आरोपीला दिलेली शिक्षा वगळता राज्यात पत्रकारावर हल्ला केल्यानंतर शिक्षा झाल्याचे एकही उदाहरण नाही.
डॉक्टरांना ज्या पध्दतीनं कायदेशीर संरक्षण दिले गेले त्याच धर्तीवर पत्रकारांना संरक्षण मिळावे आणि पत्रकारांवरील हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा ठरवावा आणि हल्ल्याचे खटले हे जलदगती न्यायालयाच्या मार्फत चालवावेत अशी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अन्य संघटनांची मागणी आहे.त्यासाठी राज्यातील पत्रकार सनदशीर मार्गाने आंदोलनं करीत आहेत.त्याला सरकारकडून केवळ आश्‍वासनाशिवाय काहीच मिळत नाही असा अनुभव आहे.'सरकारने आता तरी जास्त अंत न बघता लोकशाहीचा हा चौथा स्तंभ कोलमडून पडणार नाही याची काळजी घेत पत्रकार संरक्षण कायदा .तातडीने करावा' अशी मागणी एस.एम.देशमुख यानी केली आहे  

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

नाकाबंदीत पोलिसांना सापडलं 'मंगळावरचं पाणी'

मुंबईत आक्रितच घडलं आणि पोलिसांना नाकबंदीत चक्क सापडलं 'मंगळावरचं पाणी'... मराठी वृत्त वाहिन्यांच्या जगात 'जग जिंकायला' निघालेल्या कंपूतील एक महिला अँकर  मंगळ ग्रहावरील पाणी मराठवाड्यात आणायला निघाली होती. तेव्हापासून तिची ओळख ' मंगळावरचं पाणी' पाजणारी म्हणून सगळ्यांना ठाऊक.
 तर सांगायचा मुद्या म्हणजे गेल्या महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात ही पाणीवाली अँकर  सकाळच्या शिफ्टला आली आणि संध्याकाळी 4ला दिवस भरून मुंबईच्या दक्षिण टोकाला रवाना झाली. तिथं मनोरंजनाचा कार्यक्रम झाला आणि परतताना नाकाबंदी लागली. यावेळी तिने गाडी नाकाबंदीत घातली तसे पोलिसांना वास आला  असता पोलिसांनी गाडी बाजूला घ्यायला लावली. मग झाली पंचाईत. कारण, तोवर सोबत्यांची परेड सुरु झाली होती. दक्षिण मुंबईत मनोरंजनचा कार्यक्रम करताना नवरा सोबत होता. पण, पोलिसांनी बाजूला घेतले तेव्हा सोबत असलेल्या दोन्ही पुरुषांपैकी कुणीच नवरा नव्हता. मग मंगळावरचं पाणी घाबरले.आणि देवाचा  धाव सुरु झाला तसेच ओळखीच्या रिपोर्टर्सलाही फोनाफोनी  सुरु झाली.  मंगळावरच्या पाणीवालीचे बाबाच आहेत पोलीस...  घरी नवरोबाला सांगितलं तर अजून बोम्बाबोम्ब झाली असती.शेवटी मदत मिळाली ती, आता जग बदलेल असा दावा करणाऱ्यांच्या कंपूतल्या झुरळाकडून. दोस्तीसाठी चॅनेल न पाहता हे झुरळ जोरीनं मदतीसाठी धाऊन गेलं. नमस्कार ,चमत्कार करून, जग बदलायची ताकद लावून 'मंगळावरचं पाणी' अँकरला  'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणामधून सोडवायला झुरळ अखेर उपयोगी पडले. इतकं केल्यावर बॅलन्स गेलेल्यांची डिलीवरी पण करायची जबाबदारी पार पाडली गेली. पण, जे झालं त्यानंतरही मंगळावरचं पाणी नाक वर करून जणू काही घडलंच नाही असे वागत आहे.झुरळ आणि मंगळावरच्या पाण्यात आता चांगेलच पाणी मुरत आहे...

बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

चांगल्या समाजासाठी मध्ये वाईट घडले ...

चांगल्या समाजासाठी काम करणा-या एका वाहिनीतलं अँकर युगुल दुसरंच काम करताना सीसीटीव्हीत कैद झालं. एचआरकडून सीसीटीव्हीतल्या चित्रीकरणाची तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर अँकर युगुलाला एचआरने सक्त ताकीद दिली आहे. सध्या मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक मीडियात या प्रकरणाची जोरदार रसभरीत चर्चा सुरू आहे. नंतर या युगुलावर काय कारवाई झाली हे अजून कळू शकलं नाही.

दिव्य मराठी...मराठी आहे की हिंदी ?

औरंगाबाद - दिव्य मराठीमध्ये 6 डिसेंबरच्या अंकात 'दिव्य' घडले आहे.हे वृत्तपत्र मराठी असताना बातमीमध्ये चक्क हिंदी ओळी वापरण्यात आल्या आहेत.हिंदीमधील बातमी मराठीमध्ये भाषांतर करताना,पान 1 च्या उपसंपादकाने ही घोडचूक केली आहे.भोपाळशेठ आता या उपसंपादकाच्या हातात 'भोपळा' देण्याची शक्यता आहे.
दि.5 डिसेंबर रोजी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता उर्फ अम्मा गेल्या आणि संपूर्ण तामिळनाडू पोरका झाला.त्याची बातमी दिव्य मराठीमध्ये 6 डिसेंबर रोजी पान 1 वर प्रसिध्द झाली आहे.या बातमीममध्ये उपसंपादकाने हिंदी बातमी मराठीमध्ये भाषांतर करताना हिंदी ओळी तशाच सोडून दिल्या.विशेष म्हणजे ही बातमी पान 1 वर फ्लायर आहे.
तसेच आणखी एक मोठी चूक म्हणजे 'प्रतिज्ञा' या हिंदी शब्दाला 'शपथ' हा मराठी शब्द असतानाही प्रतिज्ञाच ठेवला.आता याला दिव्य म्हणावे की आणखी काय ?
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/06122016/0/1/
 

फेसबुक वर शेअर करा

Facebook