> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

मटका आकडे छापणाऱ्या सहा दैनिकांवर गुन्हे दाखल

सोलापूर - मटका आकडे छापून जुगार खेळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी सोलापुरातील सहा दैनिके आणि त्यांच्या संपादकांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुराज दिलीप पोरे (वय 34, रा.नीलम नगर, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली. दैनिक संचार, सुराज्य, केसरी, दैनिक जनप्रवास, तरुण भारत अशी गुन्हा दाखल झालेल्या दैनिकांची नावे आहेत. या दैनिकांनी मुंबई आणि कल्याण मटक्याचे आकडे छापून नागरिकांना मटका खेळण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास फौजदार डी. बी. लिगाडे करीत आहेत.
तत्पूर्वी मटक्याचे आकडे छापणाऱ्या दैनिक तरुण भारत व दैनिक पुढारी या गोव्यातील वृत्तपत्रांना गुन्हा अन्वेषण विभागाने (क्राईम ब्रँच) गुरुवारी नोटीस बजावून लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने 31 आॅगस्ट 2016ला दिलेल्या आदेशानुसार, राजरोसपणे मटका चालविणाऱ्या 1100 बुकींसह मटक्याचे आकडे छापणाऱ्या पुढारी व तरुण भारत या वृत्तपत्रांवर पोलिसांनी 8 आॅक्टोबर रोजी गुन्हे दाखल केले आहेत.

पत्रकारावर गुंडांचा जीवघेणा हल्ला

पनवेल- शहरातील प्रतिष्ठितांची सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'कल्पतरू' सोसायटीच्या अंतर्गत वादातून सोसायटीचे चेअरमन, वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी व त्यांचे शेजारी संतोष फटाके यांच्यावर खारघर येथे एका पक्षाच्या गुंड कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर आमदार अनंत गाडगीळ यांनीही अधिवेशनात याप्रकरणी आवाज उठवला. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनीही सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता खारघर येथील सेक्टर १२ मधील शिल्प चौकातील चतुर्भुज इमारतीजवळ सूर्यवंशी व फटाके हे दोघे त्यांच्याकडील स्विफ्ट मोटारगाडी उभी करून समोरील कार्यालयात खासगी कामासाठी गेले होते. त्यांनंतर त्यांना विधानभवनात कव्हरेजसाठी जायचे होते. त्यांनी संतोष यांना बेलापूर स्टेशनला ड्रॉप करण्यास सांगितले, मात्र काम उरकून ते दोघे परतल्यानंतर त्यांच्या गाडीच्या पुढच्या दोन चाकांची हवा काढल्याचे निदर्शनास आले. उन्हाळा असल्यामुळे अतिहिटमुळे हा प्रकार घडल्याचे वाटल्यामुळे ते आजूबाजूला चाक दुरुस्तीसाठी शोध घेत असतानाच तेथे दबा धरून बसलेल्या चार - पाच जणांच्या टोळक्याने हातात असलेल्या बेस बॉल बॅट व  हॉकी स्टिकने त्यांच्यात क्षणार्धातच प्राणघातक  हल्ला चढवला. त्यावेळी सूर्यवंशी हे 'आम्हाला का मारत आहात', असे किंचाळून वारंवार विचारात होते. मात्र हल्लेखोर त्यांचे काहीही न ऐकता त्यांना मारहाण करतच होते. हे सर्व हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून आले होते. 

हल्लेखोरांच्या हातून संतोष निसटण्यात यशस्वी झाले. तरीही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, सूर्यवंशी याना ठार मारण्याच्या हेतूनेच हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यांना खारघर येथील जवळच्याच मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताचे हाड तुटले आहे. त्यावर शस्त्रक्रिया केली आहे. पायाला देखील जबर मार बसला आहे. 

हल्लेखोर त्यांनी आणलेल्या मोटारसायकलवरून पळून जाण्यात यशस्वी ठरले. या हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे आदेश सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश निलेवाड यांनी दिले आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, अतिरिक्त आयुक्त मधुकर पांडे, परिमंडळ २ चे उपायुक्त डॉ राजेंद्र माने यांनी स्वतः उपस्थित राहुन सूर्यवंशी यांची भेट घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसून पनवेल महानगरपालिकेच्या रणसंग्रामात दहशत माजवण्याचा हेतूनेच हे कृत्य केलं असण्याची शक्यताही  पोलिसांनी वर्तवली आहे. 

या हल्ल्याच्या पाठीमागे कल्पतरू सोसायटीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे समजते, मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत सूर्यवंशी चेअरमन म्हणून निवडून आले होते. विरोधकांचा केलेला दणदणीत पराभव  झोंबल्यामुळे, त्यांनी हा भ्याड हल्ला चढविला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे,
 याप्रकरणाची सीसीटीव्ही कव्हरेज ताब्यात घेतले असून लवकरच सखोल तपासणी करून एफआयआर दाखल केला जाईल, असेही नगराळे यांनी सांगितले. पत्रकारांना मिळणाऱ्या धमकीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुंबई :- झी 24 तासचे संपादक डाँ. उदय निरगुडकर आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे ज्येष्ठ सदस्य व दै. भास्करचे राजकीय पत्रकार विनोद यादव यांना मिळालेल्या जिवे मारण्याच्या धमकीची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात संबंधीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.

डाँ निरगुडकर यांनी मार्डच्या संपासंदर्भात वृत्तवाहिनीच्या माध्यमातून वास्तववादी भूमिका मांडली होती. त्यानंतर त्यांना समाज माध्यमातून धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्राबाहेरशिकणाऱ्या त्यांच्या मुलीला ही धमक्या येऊ लागल्या आहेत. तर विनोद यादव यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांचा राग धरुन युवक काँग्रेसचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रामआसरे चौहान यांनी यादव यांना जिवे मारण्याची धमकी दिली. जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक यांनी यादव यांच्या तक्रारी नुसारएफ. आय. आर. दाखल करुन न घेता अदखलपात्र ( N. C. )नोंद घेतली.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ तसेच पत्रकार हल्लविरोधी कृती समिती यांच्यावतीने आज दिनांक 31/03/2017 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. निरगुडकर आणि विनोद यादव यांनी त्यांना मिळत असलेल्या धमकीबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

डाँ निरगुडकर प्रकरणात तीन दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे तर विनोद यादव प्रकरणात पोलिस ठाण्यात एफ. आय. आर. नोंदविण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह विवेक भावसार, पत्रकार हल्लविरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, किरण नाईक, राज्य अधिस्किृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांच्यासह विनोद जगदाळे, विजय सिंह आदी सदस्य उपस्थित होते.


टी. व्ही. जर्नलिस्ट असोसिएशन

गेल्या काही दिवसात पत्रकार आणि व्हिडीओ जर्नलिस्ट यांच्यावर हल्ले आणि धमक्या देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. झी चोवीस तासचे संपादक डॉ.. उदय निरगुडकर,पत्रकार संजय गिरी, विनोद यादव,संदीप भारती,  स्वाती नाईक, सुधीर सुर्यवंशी यांच्या बाबतीत या घटना घडल्या आहेत. सुर्यवंशी, नाईक, भारती  आणि  गिरी यांच्यावर तर जीवघेणा हल्ला झाला. टी. व्ही. जर्नलिस्ट असोसिएशन या सर्व घटनांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते.  संबधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही सरकारकडे करत आहे. माध्यमांचा प्रभाव वाढत असताना पत्रकारांना त्यांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यानुसार काम करू न देणे हे लोकशाहीला घातक ठरणारे आहे. लोकशाही अधिक सक्षमपणे राबवली जावी याची जबाबदारी सरकारची आहे. म्हणूनच पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा लवकरात लवकर आणून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक मजबूत करावा अशी अपेक्षा सरकार कडून करत आहोत. सरकारने वेळोवेळी पत्रकारांसाठी कायदा आणू असे आश्वासन दिले आहेत त्याची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणीही टी. व्ही. जर्नलिस्ट असोसिएशन करत आहे.

गुरुवार, ३० मार्च, २०१७

हायकोर्टातील पत्रकारांना ड्रेस कोड आहे का?

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारांना उपदेशाचे बोल सुनावले आहेत. हायकोर्टातील पत्रकारांच्या पेहरावावर आक्षेप घेत पत्रकारांसाठी ड्रेस कोड आहे का? असा सवाल यावेळी विचारला आहे. तसचे हायकोर्टातील खटल्याच्या वार्तांकनावरुनही न्यायालयाने पत्रकारांची कानउघाडणी केली आहे.
निवासी डॉक्टरांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टात टी- शर्ट आणि जीन्स घालून उपस्थित असलेल्या एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या पेहरावावर आक्षेप घेत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी पत्रकारांसाठी काही ठराविक पेहराव आहे की नाही? असा सवाल केला. त्यानंतर पुरुष पत्रकारांनी शर्ट आणि पॅन्ट घालून वावरायला हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
याशिवाय, मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारीतेवरही उपस्थितांना काही धडे दिले. मुख्य न्यायमूर्तींच्या मते पत्रकारांनी कोर्टात होणाऱ्या सुनावणीचं वार्तांकन करताना भान बाळगण गरजेचं आहे. तसंच केवळ हायकोर्ट आपल्या आदेशात जे नोंदवत तेवढच माध्यमांनी प्रसिद्ध करावं, असाही सल्ला दिलाय.
माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा समाजावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे माध्यमांनी एखाद्या खटल्याचं वार्तांकन करताना जवाबदारीनं वागायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. अन्यथा हायकोर्ट संवेदनशील खटल्यांची सुनावणी इन कॅमेरा घेईल, ज्यात पत्रकारांना प्रवेश मिळणार नाही असही त्या पुढे म्हणाल्या.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

जवान आत्महत्या : पत्रकार पूनम अग्रवाल यांच्यावर गुन्हा

नाशिक : जवान रॉय मॅथ्यू यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल आणि सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकमधील आर्टिलरी सेंटरमध्ये 2 मार्च 2017 रोजी रॉय मॅथ्यू यांचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकमध्ये आढळला होता. 25 फेब्रुवारीपासून ते बेपत्ता होते.
काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅथ्यू यांनी बडीज ड्युटीच्या नावाखाली जवानांची अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणुकीबद्दल तक्रार केली होती. याच घटनेनंतर तणावात असलेल्या मॅथ्यूने आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.

पत्रकार पूनम अग्रवाल यांनी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्या मदतीने आर्टिलकी क्षेत्रात शूटिंगला मनाई असतानाही, तिथे शूटिंग करुन व्हिडीओ क्लिप्स व्हायरल केल्या. या व्हिडीओ क्लिपमुळे तणावात असलेल्या रॉय मॅथ्यू यांनी आत्महत्या केल्याचा आरोप दोघांवर आहे.
डीएस रॉय मॅथ्यू हा भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात अर्थात आर्टिलरीत गनर या पोस्टवर होते.
...
कैसे “The Quint” की पत्रकार पूनम अग्रवाल ने सेना के जवान रॉय मैथ्यू की हत्या कर दी
पूनम अग्रवाल नामक पत्रकार जसूसी कैमरा पहनकर महाराष्ट्र के आर्मी कैंटोनेन्ट में घुसती है, और चुपके से सिपाही रॉय मैथ्यू के साथ हुई अनौपचारिक वार्तालाप रिकॉर्ड कर लेती है,
सिपाही स्पष्ट कहता है की जो भी काम दिया जाता है उससे उसे कोई परेशानी व् आपत्ति नहीं है,
किंतु पूनम अग्रवाल उस वीडियो को एडिट कर सनसनीखेज बना देती है, और ये दर्शाने का प्रयास करती है कि सेना में जवानों पर जुल्म ढाये जाते है, और बिना उस जवान की जानकारी के वो वीडियो विभिन्न सोशल मीडिया प्लेटफ़ॉर्मस पर पूनम अग्रवाल द्वारा फैला दिया जाता है,
पूनम अग्रवाल का प्रयास था कि जैसे खाने की गुणवत्ता को लेकर आये जवान के वीडियो ने हंगामा खड़ा किया था व् सेना की छवि धूमिल की थी उसी प्रकार इस वीडियो से उससे भी बड़ा हंगामा खड़ा किया जाए, सेना की छवि जनता के बीच और खराब की जाए और फिर स्टिंग का श्रेय लेकर प्रसिद्धि व् शौहरत कमाई जाए,
किन्तु एडिट किया हुआ वीडियो सामने आने के बाद सिपाही रॉय मैथ्यू बड़े दबाव में था और 25 फरवरी 2017 को अपने रहने के स्थान से भाग गया और 2 मार्च 2017 को एक निर्जन स्थान पे जवान रॉय मैथ्यू का शव मिला, रॉय ने आत्महत्या कर ली थी, रॉय मैथ्यू की एक पत्नी और छोटा बच्चा है जिनका रो रोकर बुरा हाल है,
हमारे जवानों को केवल आतंकवादी या प्राकृतिक आपदाएं ही नहीं मारती हैं बल्कि ये पत्रकार रुपी गिद्ध भी उनके प्राण लेने में पीछे नहीं हैं, एक निर्दोष जवान का खून और उसकी पत्नी और बच्चे के जीवन को नष्ट करने का अपराध पत्रकार पूनम अग्रवाल के सर है,
ध्यान देने योग्य बात ये हैं कि सर्जिकल स्ट्राइक्स के बाद से ही मिडिया व् नेता मिलकर सेना को नीचा दिखाने व् छवि खराब करने का प्रयास कर रहे हैं, सोचने की बात ये भी है कि कहीं ये किसी षडयंत्र के तहत तो नहीं किया जा रहा जिसमे देश के दुश्मन भी मिले हुए हों ?
https://twitter.com/poonamjourno

गुरुवार, २३ मार्च, २०१७

आमचा ‘बादशहा’ गेला !

गोविंद तळवलकर नावाची एक व्यासंगी पत्रकार संस्था काल बंद झाली. अर्थात ती लिखाण भांडाराच्या रूपातून तशी जिवंतच राहणार आहे. आज कोणतेही दैनिक त्या संपादकाच्या नावाने ओळखले जात नाही! अतिव्यावसायिकतेच्या नवअवतरणात संपादक म्हणून नेतृत्व करणारा ‘ज्येष्ठ’ म्हणावा असा पत्रकार काळाच्या पडद्याआड जाऊ लागला आहे. काही प्रमाणात तो अधूनमधून डोकावतो हे नक्की. त्यामुळं सगळाच काळाकुट्ट अंधार पडलेला नाही हेही सत्य. प्रसार माध्यमांना आलेल्या आधुनिक वातावरणात एकूणच निःपक्ष, निर्भीड आणि अनेक अर्थाने व्यासंगी, असे दर्शन घडणे अवघड होत असल्याच्या काळात महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ आपल्या लेखणीद्वारे प्रभाव टाकणार्‍या गोविंद तळवलकरांचा वियोग हा अस्वस्थ करणारा आहे. किमान 70 वर्षे अखंडपणे लिहीत असलेल्या तळवलकरांनी 
चौफेर लिखाण केले. आम्हा पत्रकारांसाठी ते अनेक अर्थांनी बादशहाच होते. या बादशहाकडे म्हणे उत्कृष्ट वाक्चातुर्य नव्हते. तो कमी बोलला असेल; परंतु नेमका बोलला असेल. स्वभावाने तो शिष्टही वाटला असेल; पण तो वैशिष्ट्य जपण्यासाठी काही वेळी अबोल राहिला असेल.   तेही अतिशय अभ्यासपूर्ण. त्यांनी गेल्यावर्षी विल्यम शेक्सपिअरच्या 400 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये दोन स्तंभ लिहिले होते. या स्तंभांमध्ये त्यांनी ते बी. ए. चे शिक्षण घेत असताना ज्या प्राध्यापकाने जीव ओतून शेक्सपिअर शिकविला, ते प्राध्यापक त्यांना नंतरच्या काळात बसमध्ये दिसले. त्यांना बसायला जागा दिली. त्यासंबंधी तळवलकरांनी किंग लिअरच्या आयुष्याची कहाणी सांगताना या प्राध्यापकांच्या डोळ्यांत आसवं जमली, तेव्हा माझेही डोळे भरून आले होते, हे तळवलकरांनी त्या प्राध्यापकांना सांगितले. तळवलकरांचा थांबा आल्यानंतर ते उतरू लागले. तेव्हा ते प्राध्यापक तळवलकरांना म्हणाले, ‘तू ज्या रितीने वागलास आणि जुनी आठवण जागी केलीस, ते सर्व मीही कधी विसरणार नाही’! असा एक भावुक प्रसंग त्यांनी शेक्सपिअरच्या आठवणी मांडताना केला आहे. म्हणजे एखादा स्तंभ हा किती प्राण ओतून तळवलकर लिहायचे हे त्यातून दिसते. सत्तांतरासारखे राजकीय लिखाण असो की शेक्सपिअर असो, तो पट उभा करण्याचे सामर्थ्य तळवलकरांच्या लिखाणात होते. म्हणूनच आम्ही येथे तळवलकरांना संस्था असे जाणीवपूर्वक म्हटले आहे. विद्यमान पिढीतील अनेक संपादकांनी गोविंद तळवलकर प्रत्यक्ष अनुभवलेले नाहीत. तसे नसले तर आधीच्या पिढीनं या ना त्या प्रकारे तळवलकरांना पाहिलेले आहे. नुसतेच पाहिलेले नाही तर अनेकांनी प्रत्यक्ष कामही केलेले आहे. मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर हे ‘महाराष्ट्र टाईम्स’चे मराठवाडा प्रतिनिधी म्हणून काम पाहात होते. त्यावेळी त्यांच्या तोंडून तळवलकरांची कार्यशैली ऐकायला मिळालेली आहे. आता साक्रीकरही निवृत्त झाले आहेत. मुंबईत बसून संपूर्ण महाराष्ट्रातील स्थितीचे, घडामोडींचे अवलोकन करणार्‍या अनेक पत्रकारांना आजही मराठवाडा दिसत नाही, तसा तो तळवलकरांच्या काळातही दिसत नव्हता; परंतु तळवलकर हे पत्रकार महर्षी अनंत भालेरावांकडून मराठवाडा समजावून घेत असत, असे ज्येष्ठ पत्रकार संतोष महाजन यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविताना म्हटलेले आहे. ते महत्त्वाचे वाटते. आज एकूणच माध्यमांचा वेग हा सेकंदावर मोजला जातो. जे घडते आहे ते तत्काळ ‘लाइव्ह’ पाहण्याचा हा काळ. या काळात कोणती बातमी कोणत्या क्षणाला शिळी होऊन जाईल किंवा तिचा प्राधान्यक्रम बदलेल, हे सांगणं बरेचदा अवघड होऊन बसतं. याही स्थितीत वर्तमानपत्रांनी आपले लोकशाही यंत्रणेवर ठेवलेले वजन आहे तसेच आहे हे आल्हाददायक म्हणावे. ऑनलाइन आवृत्त्यांमुळे टीव्ही चॅनेलप्रमाणे तत्काळ माहिती प्रसारित केली जात असली तरी दुसर्‍या दिवशी विश्‍लेषणापासून ते अग्रलेखापर्यंत प्रत्यक्ष काय छापून येते? हे तितकेच महत्त्वाचे मानले जाते. वर्तमानपत्र हातात घेऊन वाचल्याशिवाय चैन पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा एकूण स्थितीत गोंविद तळवलकरांनी आपली लेखणी कधीच बाजूला ठेवली नाही, हे त्यांच्याकडून शिकण्या-घेण्यासारखे आहे. 1925 साली डोंबिवली येथे जन्म झालेल्या तळवलकरांनी वयाच्या 91 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आजच्या भाषेत सांगायचे तर आपले पत्रकार म्हणून करिअर त्यांनी शेवटपर्यंत चढत्या भाजणीनं समृद्ध कसे राहील? याचा विचार केला. काही वर्षांपूर्वी ते अमेरिकेत स्थायिक झाले; परंतु, आपले मराठी भाषेतील लिखाण त्यांनी कधी थांबविले नाही. सातत्याने भाष्य करत राहिले. मुळातच, स्वातंत्र्यापूर्वी आणि त्यानंतरच्या कालखंडात विचारसरणी हा पत्रकारितेचा आधार होता. आता तो किती आहे? हा चर्चेचा विषय आहे! तो संपूर्ण काळ गोविंद तळवलकरांनी अनुभवलेला. त्यांच्यादृष्टीने लोकमान्य टिळक आणि डॉ. एम. एन. रॉय या थोर विभूतींचा त्यांच्यावर प्रभाव होता. तळवलकरांना महाराष्ट्र शासनाने लोकमान्य टिळकांच्या नावाने दिल्या जाणार्‍या गौरव पुरस्काराने सन्मानित करणे असो किंवा तळवलकरांच्या हातून रॉय यांच्या विचारसरणीनुसार चालणारे जिथे जिथे जथ्थे आहेत त्याविषयीचे लिखाण असो, हे त्यांच्या मूळ वैचारिक बैठकीमुळे आलेले योग समजावेत. राजकारण, साहित्य, संस्कृती, शिक्षण अशा प्रांताविषयी लिहिण्यात तळवलकरांचा हातखंडा होता. ‘अग्रलेखांचा बादशहा’ अशी उपाधी त्यांना मिळालेली होती. कोणत्याही क्षेत्रातील गुंता मांडताना पत्रकाराने कधीही सामान्यांना समजणार नाहीत असे शब्द वापरावयाचे नसतात, हे कळणार्‍या संपादकांपैकी तळवलकर होते. त्यामुळेच ते ज्या काळात ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांचे संपादक होते, त्यावेळेला मोठा वाचक वर्ग तळवलकर काय लिहितात? हे पाहात असे. आपल्या प्रतिक्रिया नोंदवित असे. तळवलकरांनी केलेले विश्‍लेषण हे अनेक वाचकांना म्हणजेच लोकांना भावते म्हणून तळवलकरांच्या लिखाणाकडे राजकारणीही तितक्याच काळजीत असायचे. ज्येष्ठ लोकनेते शरद पवार व त्यांचे गुरू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी तळवलकरांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातूनच लिहिले असे म्हणतात; परंतु या दोन्ही नेत्यांविषयी लिहिताना राज्याचे नुकसान त्यामुळे कुठे होणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतल्याशिवाय तटस्थतेचे प्रमाणपत्र त्यांना कुणी दिले नसते. तळवलकर हे आपल्या सर्वदूर लिखाणामुळे स्वत: एक संस्था बनले होते, हे त्यांच्याविषयी विकीपिडियावर लिहिलेले आहे. एखाद्या व्यक्तिविषयी माहिती लिहिताना इतक्या समर्पक; परंतु एकाच वाक्यात ज्याचे संस्था म्हणून वर्णन उमटते, ते पुरेसे बोलके असते. ‘लोकसत्ता’ मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी ते रुजू झाले त्या पहिल्याच दिवशी त्यांनी अग्रलेख लिहिला होता. येथून तळवलकरांच्या लिखाणाचा प्रवास जो सुरू झाला, तो कधी थांबलाच नाही. दोन दैनिकांशिवाय इंग्लिश दैनिके, नियतकालिके यामधून तळवलकरांनी अनेक प्रकारचे स्तंभलेखन केले. रोजच्या रोज त्या त्या विषयाचा ताळेबंद ठोकून देताना तितकीच मोठी जरब बसविणे हे तळवलकरांसारख्यांना जमते. त्याचे कारण त्यांचे वाचन, चिंतन आणि त्यानंतर वेळोवेळी होणार्‍या सामूहिक चर्चांमध्ये सहभाग यामुळे ते शक्य होत असते. तळवलकरांनी तीन पिढ्यांमध्ये आपल्या लेखनाला मुक्तपणे वाव दिला. अनेक नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेले प्रकाशझोत, जागतिक घडामोडी, साहित्य व इतर क्षेत्रांसंबंधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्या 25 आहे. यावरून त्यांनी केवळ आवश्यक त्या शाब्दिक धावा काढून संपादक म्हणून कार्य केले, असे नाही तर या धावा वाचकांनी कायम जपून ठेवाव्यात अशाप्रकारे लेखक म्हणून मोठी कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना पत्रकार ‘संस्था’ म्हणून त्यांना आदरांजली वाहतो.
डॉ. अनिल फळे 
संचालक-संपादक
दैनिक गांवकरी (मराठवाडा आवृत्ती)
9822337582
 साभार - दैनिक गावकरी, औरंगाबाद 

मंगळवार, २१ मार्च, २०१७

ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचं निधन


ज्येष्ठ पत्रकार, लेखक, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचं ह्यूस्टन (अमेरिका) येथे निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रातही सहाय्यक संपादक म्हणून काम पाहिले. त्यांची एकूण २५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी वेळोवेळी केलेले सडेतोड लिखाण आजही वाचकांच्या स्मरणात आहे. तळवलकर यांना पत्रकारिकेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार, बी.डी.गोयंका, दुर्गारतन अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
www.berkya.com

गोविंद तळवलकरांचा जन्म डोंबिवली येथे २२ जुलै १९२५ रोजी झाला. शंकरराव देव यांच्या नवभारत या नियतकालिकापासून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला असला तरी त्यांची दै. लोकसत्ता व दै.महाराष्ट्र टाइम्समधील कारकिर्द खऱ्या अर्थाने गाजली. दै.लोकसत्तामध्ये ते बारा वर्षे उपसंपादक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र टाइम्सचे ते २७ वर्षे संपादक होते. गोविंद तळवलकर यांच्यावर एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रारंभी विलक्षण प्रभाव होता. त्याचप्रमाणे नेहरुवादाचेही ते पाईक होते. उदारमतवादी विचारसरणीवर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यांच्या लिखाणात ही सारी सूत्रे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाल्यानंतर ते अतिशय प्रखर वैचारिक वृत्तपत्र बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. गोविंद तळवलकरांनी लिहिलेले अग्रलेख हे त्यातील लेखनशैली, विश्लेषण व मांडणीच्या दृष्टीने अप्रतिम असत. त्यांनी आपल्या लेखनाने वाचकांच्या दोन पिढ्यांचे वैचारिक भरणपोषण केले.

तळवलकर हे व्यासंगी वाचक होते. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींविषयी कोणतेही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले असो ते गोविंद तळवलकर आवर्जून मिळवून वाचत. त्या पुस्तकांचा आपल्या लेख, अग्रलेखांतून वाचकांनाही ते परिचय करुन देत असत. महाराष्ट्राला व्यासंगी संपादकांची जी परंपरा आहे त्यामध्ये तळवलकर हे अग्रस्थानी होते. ह. रा. महाजनी यांच्या संपादकत्वाखाली लोकसत्तामध्ये काम करीत असताना तळवलकरांच्या विचार व लेखनाची बैठक अजून मजबूत झाली. त्यानंतर त्यांची महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून असलेली कारकिर्द विलक्षण गाजली. अंतुलेंनी केलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण असो किंवा शिवाजीराव निलंगेकरांचे प्रकरण त्यावेळी गोविंद तळवलकरांनी लिहिलेल्या अग्रलेखाने राज्याच्या राजकारणात बदल घडून आले. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून पुलोदचे सरकार स्थापन करण्याचा केलेला प्रयोग केला होता. त्याआधी तळवलकरांनी लिहिलेला `ही तो श्रींची इच्छा' हा अग्रलेख गाजला होता.

गोविंद तळवलकर यांनी आपले लेखन मराठीपुरते मर्यादित न ठेवता अनेक इंग्रजी नियतकालिके,वृत्तपत्रातही ते लेखन करीत असत.अगदी सात-आठ महिन्यांपूर्वीपर्यंत ते टाइम्स ऑफ इंडिया, एशियन एज, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द हिंदू, द डेक्कन हेरॉल्ड, रॅडिकल ह्युमनिस्ट, फ्रंटलाइन मॅगझिन यांसारखी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांत लिहित होते. इतके सातत्याने व आशयगर्भ लिहिणारे संपादक म्हणूनही गोविंद तळवलकर अग्रस्थानी होते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. 


गोविंद तळवलकर यांचं प्रकाशित साहित्य
अग्निकांड :- “युद्धाच्या छायेत” ह्या स्तंभलेखनाचा पुस्तकरूपी संग्रह
इराक दहन :- सद्दाम हुसेन यांच्या पाडावाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेने पुकारलेल्या लढ्याची सखोल चिकित्सा
अफगाणिस्तान
नौरोजी ते नेहरू (1969)
बाळ गंगाधर टिळक (1970)
वाचता वाचता (पुस्तक परीक्षणांचा संग्रह, खंड 1 आणि 2) (अनुक्रमे 1979 आणि 1992)
परिक्रमा (1987)
अभिजात (1990)
बदलता युरोप (1991)
अक्षय (1995)
ग्रंथ सांगाती (1992)
डॉ. झिवागोचा इतिहास (लेख ललित दिवाळी अंक, 2015)
नेक नामदार गोखले
पुष्पांजली (व्यक्तिचित्रे, मृत्युलेख संग्रह)
प्रासंगिक
बहार
मंथन
शेक्सपियर – वेगळा अभ्यास (लेख – ललित मासिक, जानेवारी 2016)
सत्तांतर (खंड 1-1977 , 2-1983, व 3-1997)
सोव्हियत साम्राज्याचा उदय आणि अस्त (खंड 1 आणि 2)

गोविंद तळवलकर यांना मिळालेले पुरस्कार
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी “दुर्गा रतन” व “रामनाथ गोयंका” पुरस्कार
लातूर येथील दैनिक एकमत पुरस्कार
न.चिं केळकर पुरस्कार (“सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त” पुस्तकासाठी)
इ.स. 2007 चा जीवनगौरव पुरस्कार
लोकमान्य टिळक पुरस्कार
सामजिक न्यायाबद्दल रामशास्त्री पुरस्कार

नेरुळ येथे पत्रकाराचाी गळफास घेऊन आत्महत्या

कामाचा ताण आणि कौटुंबिक प्रश्‍नांमुळे तरूण पत्रकार राहुल शुक्ल यांनी 18 मार्च रोजीच नेरूळ येथील आपल्या घराच्या फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.गेली काही दिवस कौटुंबिक प्रश्‍नांनी त्रेस्त असलेल्या शुक्ल यांना अर्धांगवायुचा झटका देखील येऊन गेला होता.अतिमतः त्यांनी टोकाचा मार्ग अवलंबित आत्महत्या केली.दुःखाची गोष्ट अशी की,राहुल मिडियात काम करीत असताना देखील त्याच्या आत्महत्येची बातमी पत्रकारांना दोन दिवसांनी उशिरा समजली.आपण परस्परांपासून किती दुरावलो आहोत याचं हे उत्तम उदाहरण आहे.
राहुल शुक्ल यांना भावपूर्ण श्रध्दांजली.--

सोमवार, २० मार्च, २०१७

सोलापुरातील पाच वृत्तपत्रावर जुगार कायद्यान्वये कारवाई करण्याचा आदेश

सोलापूरमधील पाच वर्तमानपत्रांनी मटक्याचे आकडे छापू नये म्हणून उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेत सोलापूर पोलीस आयुक्तानी सदर आकडे अंकशास्त्र भाग्यांक असून तो गुन्हा होत नाही असे प्रतिज्ञापत्र दिल्याने यावर नाराज़ होऊन मुख्य न्यायमूर्तिंनी पोलीस आयुक्तांच्या भूमिकेवर ताशेरे ओढून सर्व वृत्तपत्रांवर जुगार कायद्यान्वये कारवाई करण्याचा आदेश दिला...
# ऑर्डर सोबत दिलेली आहे.वागळे टीव्ही ९ च्या वाटेवर

मुंबई - टीव्ही 9 मराठीमध्ये निखिल वागळे येण्याच्या बातमीने दाणादाण उडाली आहे. इनपूटच्या असोसिएट एडिटरचे रंग उडाले आहेत. भाजपचा प्रवक्ता असलेला रिपोर्टर हुशार आणि भुसभुसे हवालदिल झाले आहेत. सर्व सिनीअर प्रोड्युसरही चिंतेत पडले आहेत. तर सर्व बुलेटिन प्रोड्युसरला धडकी भरली आहे. एका असोसिएट एडिटरने भरती केलेले अँकर आपला पत्ता कट होणार या विचारानेच चिंताग्रस्त झाले आहेत. हरिकथा सांगणारा मजनू भाई, आपल्याच मस्तीत राहणारी लैला, भसाड्या आवाजाची पाघवी पावंत (ही ऑन एअर असल्यावर टीव्ही म्यूट करतात), बातमीचा गंध नसलेला धारावीचा हिरो यांच्या चिंता वाढल्या आहेत. आता प्रत्यक्ष वागळे आल्यावर काय कहर होणार, याची सगळ्यांना चिंता पडली आहे.

बेरक्याचे सातव्या वर्षात पदार्पण

बेरक्या ब्लॉग सुरू होवून आज बरोबर सहा वर्षे पुर्ण झाली.21 मार्च 2011 सुरू झालेल्या बेरक्या ब्लॉगने सहा वर्षात 45 लाख 18 हजार 833 हिटस् चा टप्पा पार करून मराठी ब्लॉग विश्‍वात इतिहास रचला आहे.बेरक्या ब्लॉगचे सातव्या वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण झाले आहे.
मराठी मीडियाचे गॅझेट, मराठी मीडियाचे पीटीआय म्हणून बेरक्याचा अनेकांनी गौरव केला आहे. बेरक्यावर आलेली बातमी शंभर टक्के सत्य असते हे सांगण्यासाठी आता कोण्या भविष्याकाराची गरज नाही.बेरक्याचे वाचक न्यूज पेपर,न्यूज चॅनल आणि बेव मीडियातील सर्व कर्मचारी तसेच वृत्तपत्रांचे मालक सुध्दा आहेत.इतकेच काय तर पत्रकारितेचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, पोलीस आणि प्रशासनातील कर्मचारी हे पत्रकारितेच्या दुनियेत नेमके काय चालले आहे म्हणून बेरक्या ब्लॉग वाचत असतात.
बेरक्या हा कोणत्याही पत्रकाराचा शत्रू नाही,प्रवृत्तीच्या विरोधात आहे.चांगल्या पत्रकारांच्या बाजूने बेरक्या नेहमीच उभा राहिला आहे.कोणी कोणावर विनाकारण अन्याय करू नये,ही बेरक्याची भूमिका आहे.तसेच मराठी मीडियातील चालू घडामोडी,नविन काय येत आहे याची माहिती बेरक्याने जलदगतीने वाचकांपर्यत पोहचवली आहे.
बेरक्याला बातम्या कश्या कळतात हा संशोधनाचा विषय झाला आहे.बेरक्या नेमका कोण आहे,याचीही चर्चा होत असते,पण बेरक्याने नावापेक्षा कामाला नेहमी महत्व दिले आहे.
असो, बेरक्याला सहकार्य करणार्‍या सर्व पत्रकारांचे मनःपुर्वक आभार...वाचकांचेही आभार...आपण आहात म्हणून बेरक्या आहे...
सर्वांचे आभार....

बेेरक्या उर्फ नारद...

रविवार, १९ मार्च, २०१७

महाराष्ट्र १ ला घरघर सुरु


दीड वर्षांपूर्वी सुरु झालेल्या महाराष्ट्र १ ला शेवटची घरघर सुरु झाली आहे, IBN लोकमतमधून आलेले निखिल वागळेसह चंद्रकांत पाटील, विनायक गायकवाड, प्राजक्ता धुळप, शरद बडेसह सर्व आघाडीचे खेळाडू आता बाहेर पडले आहेत.. सीईओ संजय शर्मा यांचा भाऊ अनिल शर्मा यांनी सूत्रे हातात घेतल्यामुळे चॅनेलमध्ये खटके उडू लागले आहेत...
मुंबई,पुणे सह सर्व लाईव्ह यंत्रणा बंद आहे, नागपूरच्या गजानन उमाटे यांनी IPHONE घेवून एका अँपद्वारे लाईव्ह काम करत आहे, बाकीचे सर्व रिपोर्टर थंड पडले आहेत..
लाईव्ह यंत्रणा नसल्यामुळे कोणताही बातमी लाईव्ह होवू शकत नाही, किंवा डिबेटसाठी कोणताही गेस्ट लाईव्ह बसू शकत नाही,,,
अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी यंत्रणा, जे कर्मचारी आहेत ते नॉन टेक्निकल आणि अनपरफेक्ट आहेत, त्यामुळे चॅनेलचा TRP पार घसरला आहे,,,
अनिल शर्मा यांना अपेक्षा खूप आहेत आणि यंत्रणा अपुरी असल्यामुळे सर्वजण हाताश झाले आहेत...


काय आहे BBC मराठी ?

BBC मराठी हे सॅटेलाईट न्यूज चँनेल नाही, तर हे डिजिटल मीडिया आहे,एखाद्या घटनेवर फिचर स्टोरी करून ते इतर चँनेलला स्टोरी विकू शकतात, किंवा BBC मराठी वेबसाईटवर प्रसारीत करू शकतात, तसेच रोजचे बातमीपत्र BBC मराठी या न्यूज पोर्टलवर प्रसारित करू शकतात,
थोडक्यात आपण यास ऑनलाईन न्यूज पोर्टल, युट्युब चॅनेल म्हणू शकता, फक्त नाव BBC असल्यामुळे याला मोठे वलय आहे..
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस ही २९ भाषांमध्ये बातम्या देणारी जगातली सर्वात मोठी रेडियो कम वेब सर्व्हिस आहे. पत्रकारितेचं विद्यापीठ मानलं जातं त्या बीबीसीनं मराठी सेवा सुरू करणं हे मराठी भाषेच्या दृष्टीनं चांगलंच आहे.
महत्वाचे म्हणजे याचे हेड ऑफिस दिल्ली मध्ये राहणार असून BBC मराठीसाठी जॉईन झालेल्या सर्व लोकांना दिल्ली मध्ये राहावे लागणार आहे...

कोण कोण जॉईन झाले
आशिष दीक्षित
विनायक गायकवाड
प्राजक्ता धुळप
शरद बडे
आरती कुलकर्णी

अजून कोणाची निवड झाली ?
जान्हवी मुळे ( ABP माझा )
प्रसन्न जोशी ( जय महाराष्ट्र )
मयुरेश कोन्नूर ( ABP माझा )
अभिजीत कांबळे ( टीव्ही ९ )
सम्राट फडणीस ( सकाळ )

शरद बडे आणि जान्हवी मुळे
मुंबई मध्ये बसणार
बाकीचे दिल्ली

शनिवार, १८ मार्च, २०१७

गोपाळ साक्रीकर यांना"अरविंद वैद्य स्मृती पुरस्कार' जाहीर

शर्मिष्ठा भोसले यांना युवा पत्रकारिता पुरस्कार 

औरगाबाद -  पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठेचा "अरविंद आत्माराम वैद्य स्मृती पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पत्रकार गोपाळ साक्रीकर यांना; तर युवा पत्रकारिता पुरस्कार मुक्‍त पत्रकार शर्मिष्ठा भोसले यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती नीरज वैद्य यांनी शनिवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत दिली. 
वैद्य म्हणाले, ""गेल्या पाच वर्षांपासून वैद्य यांच्या स्मृतिदिनी पत्रकारितेतील ज्येष्ठ व्यक्‍तीला वैद्य स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदा हा पुरस्कार येथूनच पत्रकारिता सुरू केलेले ज्येष्ठ पत्रकार श्री. साक्रीकर यांना देण्यात येत आहे. तसेच यंदापासून ज्येष्ठांसोबतच युवा पत्रकारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी युवा पत्रकारिता पुरस्कार मुक्‍त पत्रकार, शर्मिष्ठा शशांक भोसले यांना दिला जाईल. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 5 हजार रुपये या पुरस्कारचे स्वरुप असेल,'' अशी माहिती त्यांनी दिली. श्री. साक्रीकर यांनी दैनिक अंजिठापासून पत्रकारितेस सुरवात केली. मराठवाडा, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ या वृत्तपत्रामधून त्यांनी निष्ठेनी आपली लेखणी चालवली. आणीबाणीच्या काळ, नामांतर आंदोलन, मराठवाडा विकासाचे आंदोलन, विविध सामाजिक समस्या आपल्या लेखनीतून निर्भिडपणे मांडल्या. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला व साहित्य क्षेत्रात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच विविध सामाजिक विषयांवर भाष्य करीत विचार करण्यास भाग पाडायला लावणारे लेखन शर्मिष्ठा यांच्याकडून केले जात आहे. त्यांना यापूर्वी प्रियांका डहाळे युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्या सध्या "मीडिया वॉच' या त्रैमासिकांच्या कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. 29 मार्चला मराठवाडा महसूल प्रबोधीनीचे सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल. यापूर्वी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर, निळू दामले, शांतारामबापू जोशी, विद्याभाऊ सदावर्ते, जीवनधर शहरकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पत्रकार परिषदेस ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, प्रमोद माने, संजय वरकड उपस्थित होते.

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

मी मराठीचा डब्बाबंद होणार !

लंगडत सुरु राहुन का होइना पण नावापुरत उरलेल्या मी मराठीचा काही दिवसात डब्बाबंद होउ शकतो. काही दिवसांपुर्वी 3 मार्च रोजी दिल्लीच्या एमसीआरच्या कर्मचाऱ्यांनी कित्येक महिने पगार न मिळाल्यामुळे संप पुकारला होता. त्यामुळे गेले अनेक आठवडे मी मराठीवर एकही फ्रेश बुलेटीन जात नव्हता. त्याऐवजी मी मराठीचे काही जुने शो चालवून कसा बसा स्लॉट भरवून काढण्याचे काम सुरू होते. बुलेटीनच जात नसल्याने मी मराठीच्या उरल्या सुरल्या कर्मचारी फक्त ऑफीसमध्ये बसून आहेत. त्यातच आता काही दिवसांपुर्वी कर्मचाऱ्यांचे पीएफ कॉन्ट्रीब्युशन गिळंकृत करणाऱ्या मी मराठीच्या गळ्याभोवती क्षेत्रीय कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने फास आवळला आहे. मी मराठी सोडून गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा केले गेले नाही. यासाठी पीएफ कार्यालयाचे अधिकारी मी मराठीच्या ऑफीसमध्ये धडकले. त्यावेळी विजय शेखर उपस्थित नसल्याने पीएफ अधिकाऱ्यांनी मी मराठीच्या ऑफीसबाहेरील भिंतीवरच नोटीस लावून गेले आहेत. नोटीसची दखल न घेतल्यास शेवटच्या घटका मोजत असलेल्या मी मराठी चॅनलवर टाच येऊ शकते. असं ऐकविण्यात येतंय की, यातल्या बाऊल वॉरकरने त्याला न विचारता एका दुसऱ्या सिनीयरला विचारून सुट्टी घेतल्याच्या कारणावरून शिकाऊ पत्रकाराला ऑफीसमध्ये आलास तर बघुन घेतो, अशी दमदाटीही केली होती. तेव्हापासून अनेक शिकाऊ पत्रकारांनी रामराम ठोकला. कित्येक आठवड्यापासून जुने शो लावून लंगडी वाटचाल करणाऱ्या या चॅनलवर तर आता जुने शो देखील गायब झाले आणि फक्त काळ्या मुंग्या दिसून येत आहेत. इतकं सगळं घडल्यानंतर मी मराठीचा डब्बाबंद काही दिवसात होणार हे निश्चीत,
 

गुरुवार, १६ मार्च, २०१७

धनंजय लांबे लोकमतच्या वाटेवर

औरंगाबाद - सामना, दिव्य मराठी करून  महाराष्ट्र टाइम्स मध्ये काही काळ घालवल्यानंतर धनंजय लांबे लोकमतच्या वाटेवर आहेत. ते आज सायंकाळी लोकमतचे औरंगाबाद सिटी एडिटर म्हणून पदभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.
दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये निवासी संपादक म्हणून काम केलेल्या  धनंजय लांबे यांना  लोकमतमध्ये सिटी एडिटर पदावर काम करावे  लागत आहे, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लांबे पुढारीच्या कार्यकारी संपादक पदासाठी इच्छूक होते, परंतु तेथे संधी न मिळाल्यामुळे लोकमतमध्ये सिटी एडिटर म्हणून जॉईन होत  आहेत.
औरंगाबादेत पुढारी सुरु होताच लोकमतने विनोद काकडे यांना चीफ रिपोर्टर पदावरून हाटवून नजीर शेख यांना पुन्हा संधी दिली होती,त्यामुळे काकडे पुढारीत सिटी एडिटर म्हणून जॉईन झाले, आता नजीर शेख यांच्या डोक्यावर लांबे याना सिटी एडिटर म्हणून बसवण्यात येत असल्यामुळे नजीर शेख नाराज झाले असून नाराज नजीरची काय भूमिका राहणार, याकडे लक्ष वेधले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र टाइम्सची औरंगाबाद आवृत्ती  जळगाव प्रमाणे बंद होणार असल्याची अफवा पसरली असून, त्यामुळेच लांबे एक पाऊल  मागे येत असल्याची  चर्चा आहे, अन्य १८ ते २० कर्मचारीही   दुसरीकडे संधी शोधत असल्याची चर्चा पसरली आहे .

मला प्रश्‍न विचारणारा तू कोण?- मंत्री रामदास कदम

मुंबई - शेतकऱ्याची पहिली आत्महत्या नेमकी कधी झाली आणि त्यासाठी आंदोलन होतेय हे तुम्हाला माहीत आहे काय? त्या अन्नत्याग आंदोलनात तुम्हीही सहभागी होणार का? असे साधे प्रश्न विचारल्यानंतर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्‍न विचारणारा?, असे उत्तर दिले. त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनात, प्रसारमाध्यमांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी कळकळीने बोलणाऱ्या नेत्यांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ "ब्लेम गेम' आहे की काय, अशी शंका येते.

सकाळचे पत्रकार ब्रह्मदेव चट्टे यांनी रामदास कदम यांना दूरध्वनीवरून प्रतिक्रियेसाठी संपर्क केला असता ते म्हणाले, "सकाळ'ला दोन वेळा बातम्या आल्या की, एकनाथ शिंदे यांचे सोडून सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या. अशी आमदारांची मागणी होती? कोणत्या आमदाराची मागणी होती ही, ते सांगा आधी, तोपर्यंत मी तुमच्यासोबत बोलणार नाही. तुम्ही मला प्रश्‍न विचारणारे कोण? तुम्हाला प्रश्‍न विचारण्याचा अधिकार कोणी दिला? शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विरोधी पक्षनेता असताना मी केलेली भाषणे वाच, मग तुला कळेल. तू कोण मला प्रश्‍न विचारणारा?

बुधवार, १५ मार्च, २०१७

गावकरीची नगर आवृत्ती बंद

नगर - गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली गावकरीची नगर  आवृत्ती मालक वंदन पोतनीस यांनी कसलेही पूर्वसूचना न देता बंद केल्याने नगर जिल्ह्यातील अनेक पत्रकार बेकार झाले आहेत, त्याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबार आवृत्तीहि बंद करण्याचा निर्णय झाल्याने अनेकावर संक्रांत कोसळली आहे.
नोटबंदी, घटलेला जाहिरात व्यवसाय आणि थकबाकी यामुळे नगर आवृत्ती बंद  केल्याचे मालक वंदन पोतनीस यांचे म्हणणे आहे, परंतु नगर आवृत्तीचा वर्धापन दिन विशेषांक किमान १५० असायचा, जाहिरात व्यवसाय चांगला होता, वसुलीही चांगली होती, पण पोतनीस यांना घ्यायचे माहित आहे,द्यायचे माहित नाही, असा टोला पत्रकारानी मारला आहे. गेल्या ६ महिन्यापासूनच्या  थकीत पगारी  द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे..

मधुकर भावे यांना 'प्रहार'मधून निरोप

मुंबई - बेरक्याचे भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे. मधुकर भावे यांना अखेर प्रहारमधून निरोप देण्यात आलाय तर संपादक म्हणून विजय बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बाबर  यांच्या पत्रकारितेची सुरुवात नवाकाळ मधून झाली, नंतर केसरी, लोकमत असा प्रवास करून नाशिकमध्ये पुण्यनगरीमध्ये 3 वर्ष निवासी संपादक म्हणून काम पाहिल्यानंतर पुढारीच्या ठाणे आवृत्तीत 1 वर्षांपासून बाबर कार्यरत होते, बाबर यांच्या नियुक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रहार आता आर्थिक डबघाईस आला आहे, कर्मचाऱ्याच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारी नाहीत, अपुरा कर्मचारी वर्ग आणि जे कर्मचारी आहेत  त्यांच्यात अजिबात  उत्साह नसल्यामुळे बाबर यांच्यापुढे एक कसोटी आहे. बाबर हार न मानता प्रहार कश्याप्रकारे चालवतात याकडे लक्ष वेधले आहे.

कंत्राटदाराना ब्लँकमेल करणारे पत्रकार कोण ?

गडचिरोली  जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात  नदीपात्रातून वाळूचा उपसा नियम आणि शर्थीचा भंग करून सुरु होता,त्याचे चित्रीकरण करून काही पत्रकार वाळू कंत्राटदाराना ब्लँकमेल करत  होते,त्यात एका चॅनलचा रिपोर्टर  आघाडीवर होता, काही पत्रकाराना घरपोहच पाकिटे दिली जात होती, परंतु या पत्रकाराची हाव  वाढत गेली आणि  कंत्राटदारानी  पाकिटे देण्यास नकार देताच बातम्यांच्या मालिका सुरु झाल्या,काही पत्रकारानी प्रशासकीय अधिकाऱ्यावर दबाब आणून वाळूचे परवाने रद्द केले,
त्यामुळे संतप्त झालेल्या वाळू कंत्राटदारानी ५०० हून अधिक वाळू उपसा मजुरांना घेवून  गडचिरोली गाठले आणि जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकाना निवेदन देवून ब्लँकमेल करणाऱ्या पत्रकारावर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली... इतकेच  काय तर एक पत्रकार परिषद घेऊन ब्लँकमेल करणाऱ्या पत्रकाराची नावे जाहीररीत्या सांगून ते कसे ब्लँकमेल करत होते याचा पाढा वाचला...
यात वाळू कंत्राटदार जसे दोषी आहेत तसेच त्यांना ब्लँकमेल करणारे पत्रकारही दोषी आहेत, या पत्रकारांवर संबधित पेपर आणि चॅनल संपादक  कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे ...

मंगळवार, १४ मार्च, २०१७

'दर्डा परिवाराकडून नऊ भूखंडांचा गैरव्यवहार '

मुंबई  - ""लोकमत समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा माजी खासदार विजय दर्डा व त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय पदाचा गैरवापर करत सरकारी नियम धाब्यावर बसवून नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात तब्बल नऊ भूखंड गिळंकृत केले आहेत. धक्कादायक म्हणजे, अपंग व मतिमंदांसाठी राखीव असलेलाही एक भूखंड त्यांनी घशात घातला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या गैरव्यवहाराच्या तक्रारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूर एमआयडीसी विभागीय अधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करूनही साधी चौकशीही करण्याचे सौजन्य सरकारी यंत्रणेने दाखविलेले नाही. राज्य सरकारने 15 दिवसांत कारवाईचा "पारदर्शी' निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू,'' असे सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी या नऊ भूखंडांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रेच सादर केली.
""विजय दर्डा हे 1998 ते 2016 या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. सत्तेचा गैरवापर करून दर्डा यांनी अनेक भूखंड बेकायदा मिळविले. त्यांनी जनतेची कामे मार्गी लावण्यापेक्षा दर्डा परिवाराच्या फायद्याची कामे करण्याकडे अधिक लक्ष दिले,'' असा आरोप ठाकरे यांनी केला.
""भूखंडाचा लाभ मिळविण्यासाठी दर्डा यांनी अनेक उलटसुलट खटाटोप केले. प्रिंटिंग व्यवसाय औद्योगिक विभागात मोडतो. त्यामुळे वाणिज्य विभागातून महामंडळाच्या नियमानुसार भूखंड देता येत नाही. पण त्यांनी लोकमतच्या प्रिंटिंग व्यवसायासाठी वाणिज्य विभागाचा भूखंड पदरात पाडून घेतला. पण त्यासाठीचे शुल्क मात्र औद्योगिक दराप्रमाणे मोजले. कारण वाणिज्य क्षेत्रातील भूखंडाचा दर औद्योगिक दरापेक्षा जवळपास दुप्पट असतो. सवलत मिळविण्यासाठी त्यांनी तब्बल 40 हजार चौरस मीटर आकाराचा वाणिज्य विभागातील "बी-192' हा भूखंड औद्योगिक क्षेत्रातील अवघ्या शंभर रुपये प्रति चौरस मीटर या कमी दरात पदरात पाडून घेतला. यामुळे राज्य सरकारला मोठ्या महसुलाला मुकावे लागले,'' असा आरोप ठाकरे यांनी केला.
""विना इन्फोसिस या बनावट कंपनीच्या नावे बी-208 हे दोन भूखंड 28 मार्च 2001 रोजी ताब्यात घेतले. विना इन्फोसिस या बनावट कंपनीचा जन्म फक्त भूखंड हडप करण्यासाठी झाला होता की काय, कारण विजय दर्डा यांनी 7 मे 2002 रोजी एमआयडीसीच्या उपकार्यकारी अधिकारी यांना पहिले पत्र लिहिले, तर दुसरे पत्र दर्डा यांच्या कार्यालयामार्फत 18 एप्रिल 2002 रोजी नागपूर प्रादेशिक अधिकाऱ्यांना पाठविले. त्यात विना इन्फोसिसला मिळालेला भूखंड लोकमत न्यूज पेपर प्रा. लि.च्या नावे करण्याची मागणी केली गेली. त्यानुसार 29 मे 2002 रोजी हा भूखंड लोकमत न्यूज पेपरच्या नावे अल्पावधीत हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर विना इन्फोसिसचे काय झाले हा एक संशोधनाचा विषय असून, त्याची चौकशी करण्यात यावी,'' अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
भूखंडांचे एकत्रीकरण 
""बुटीबोरी येथे बी- 192, बी -207, बी - 208 या तिन्ही भूखंडाचे एकत्रीकरण केले गेले. एमआयडीसीच्या तीन नोव्हेंबर 1991 च्या परिपत्रकानुसार जर अपरिहार्य असेल तरच जास्तीत जास्त दोन भूखंडांचे एकत्रीकरण करण्यास परवानगी दिली जाते. पण संबंधित दोन्ही भूखंडांवर मान्य बांधकाम क्षेत्रांपेक्षा 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बांधकाम झाले असेल, तरच भूखंड एकत्रीकरणासाठी परवानगी दिली जाते. दर्डा यांच्या तिन्ही भूखंडांवर कोणतेही बांधकाम नव्हते. नियमात बसविण्यासाठी महामंडळाने त्यासाठी नवे परिपत्रक काढले व एमआयडीसीच्या 10 फेब्रुवारी 2003 च्या पत्रानुसार भूखंडावर कोणतेही बांधकाम नसताना तिन्ही भूखंडाच्या एकीकरणास मान्यता देऊन टाकली,'' असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
""एकत्रीकरण केलेल्या भूखंडांचा दर्शनी भाग राष्ट्रीय महामार्ग क्र. 7 ला लागून असल्याने महामंडळाच्या नियमानुसार तिन्ही भूखंडांना 15 टक्के अधिक दर लागू करणे गरजेचे होते. परंतु बी 207 या एकाच भूखंडाची 10 टक्के रक्कम घेऊन तिन्ही भूखंडाचे एकत्रीकरण केल्याचे दिसते. 28 एप्रिल 2003 रोजी अंतिम भाडेपट्टा करार करून 48 हजार 590 चौरस मीटर क्षेत्रफळ एवढा मोठा वाणिज्य क्षेत्रातील भूखंड असतानाही औद्योगिक दराने फक्त 50 लाख 18 हजार एवढ्या नाममात्र किमतीत मिळविला,'' असे ठाकरे यांचे म्हणणे आहे.
""विजय दर्डा यांनी आपली सून रचना दर्डा आणि भागीदार शीतल जैन यांच्या नावावर वाणिज्य विभागाचा आणखी एक भूखंड मिळविण्यासाठी मे. मीडिया वर्ल्ड इन्टरप्राइजेस ही कंपनी उघडली. या कंपनीची औद्योगिक केंद्रात तसेच फॅक्‍ट्री ऍक्‍ट अंतर्गत नोंदणी नसताना 16 हजार चौरस मीटर भूखंडाचे वाटप 24 एप्रिल 2007 रोजी करण्यात आले. हा भूखंड वाणिज्य क्षेत्रात मोडत असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र लिहून औद्योगिक दर लागू करून द्यावेत. तसेच विशेष बाब म्हणून सवलतीचे दर लागू करण्यात यावे, अशी विनंती रचना दर्डा यांनी केली होती. तत्पूर्वी, रचना दर्डा यांनी त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 25 जून 2005रोजी पत्र लिहिले होते. रचना दर्डा यांनी पत्रात म्हटले आहे, की लोकमत वृत्तसमूहाला सरकारने व्यापारी तत्त्वावरील जागा औद्योगिक दराने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांनाही उपलब्ध करून द्यावी. एकाच कुटुंबातील सदस्य असतानाही सरकारी लाभ उठविण्यासाठी जणू आमचा परस्पर काही संबंध नाही, असे सरकारला भासविण्याचा प्रयत्न केला,'' असा आरोप ठाकरे यांनी केला.
अपंगांसाठीचा भूखंडही घशात 
""अपंग आणि मतिमंद मुलांच्या नावावर नाममात्र दराने ताब्यात घेतलेल्या भूखंडाचा वापर विजय दर्डा यांच्या परिवाराकडून व्यावसायिक वापरासाठी करून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. अपंग व मतिमंद मुलांसाठी शैक्षणिक काम करणाऱ्या संस्थेसाठी एमआयडीसीतील पी- 60 हा चार हजार चौरस मीटर भूखंड शासनाने नाममात्र एक रुपये चौरस मीटर दराने जैन सहेली मंडळाला दिला. या जागेत खासदार फंड व लोकवर्गणी निधीही वापरण्यात आला. त्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या अलिशान सभागृहाचा वापर लग्न, वाढदिवस, स्वागत समारंभ व कंपनी कार्यक्रमासाठी व्यावसायिक पद्धतीने होत आहे. या भूखंडाचा वापर अपंग व मतिमंद मुलांच्या शाळेसाठी करण्यात येईल व दुसऱ्या कोणत्याही उद्देशासाठी करता येणार नाही, असे संस्थेला महामंडळाने दिलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले होते. मात्र या भूखंडावर शाळा चालविली जात नाही, '' असा आरोप ठाकरे यांनी केला आहे.
""पी - 60 या भूखंडावर 2008 - 2009 मध्ये खासदार दत्ता मेघे यांचा खासदार निधी अपंग व मतिमंद मुलांच्या आश्रम भवनासाठी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक विकास निधी अंतर्गत एखाद्या वास्तूचे काम पूर्ण झाले की तेथे तसा जागेवर फलक लावला जातो. परंतु खासदार निधीचा वापर केल्यानंतरही या ठिकाणी फलक आढळून आलेला नाही. उलट, जैन सहेली मंडळाने ही भव्य वास्तू चार कोटी रुपयांच्या लोकसहभागातून निर्माण केल्याचे पत्र 2013 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई यांना पाठविले होते. 25 फेब्रुवारी 2013 मध्ये या वास्तूचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मोठ्या राजकीय मंडळीच्या उपस्थितीत केले. त्या वेळी नागपूरचे आमदार म्हणून देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. अपंग व मतिमंद मुलांच्या नावाखाली ही मोठी लूट नाही का,'' असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
""जो भूखंड अपंग व मतिमंद मुलांच्या निवासी शाळेसाठी राखीव होता. त्या भूखंडावरील वास्तूला ज्योत्स्ना दर्डा स्मारक केंद्र असे नाव देण्यात आले. ज्योत्स्ना दर्डा यांच्या नावाखाली वर्षातून एखादे शिबिर व एखादा सखी मंचचा कार्यक्रम केला जातो. महिलांच्या शिक्षणासाठी कोणतेही साहित्य संस्थेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आजच्या बाजार मूल्यानुसार अपंग व मतिमंद मुलांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा भूखंड दर्डा परिवाराने आपल्या पदरात पाडून घेतला आहे,'' असा आरोप ठाकरे यांनी केला.
घरांसाठी भूखंड 
""एमआयडीसीतील पी. एल -7 हा 16 हजार चौ. मी.चा भूखंड लोकमत समूहाच्या शंभर कामगारांसाठी विजय दर्डा यांनी मिळविला. त्यानंतर आर.एच. -18 हा 51750 चौरस मीटर आकाराचा भूखंडही 141 कामगारांसाठी मिळविला. त्यासाठी लोकमत गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून घरकुल योजना साकारण्यात आली. जे कामगार लाभार्थी असतील त्यांचे नागपूर जिल्ह्यात कोठेही घर नसावे अशी सरकारची अट होती. त्यानुसार एक जून 2005 रोजी 141 कामगारांची यादी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा 30 मे 2011 रोजी दुसरी नवीन यादी देण्यात आली. या यादीनंतर 2013 मध्ये असोसिएट सभासदांच्या नावाखाली काही जणांना घरे देण्यात आली. परंतु सरकारनेच हे असोसिएट सभासद सुयोग्य सदरात मोडत नसल्याने त्यांना पात्र करता येत नाही, असा आक्षेप घेतला होता. तरीही त्यांना कशीकाय घरे देण्यात आली. विशेष म्हणजे, यांत बऱ्याच प्रमाणात दर्डा कुटुंबीय व नातेवाइकांनाही घरे दिली आहेत. या घरांची किंमत सुमारे 20 ते 80 लाख रुपये आहे,'' या मुद्द्याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
""यापूर्वीही आर.एक्‍स. - 1 हा 6 हजार चौ.मी. आकाराचा भूखंड 2006 मध्ये देण्यात आला होता. त्या ठिकाणी दर्डा परिवारासाठी भव्य गेस्ट हाउस बांधण्यात आले आहे,'' असेही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
करभरणा नाही 
""हे सर्व भूखंड बुटीबोरी ग्रामपंचायत अंतर्गत येतात. बुटीबोरी ग्रामपंचायत व लोकमत समूह यांच्यात करवसुलीवरून 2004 पासून वादविवाद सुरू आहे. कर भरणे अनिवार्य आहे असे ग्रामपंचायतीने लोकमत समूहाला कळविले आहे. तरीही ग्रामपंचायतीचा कर अद्याप भरलेला नाही,'' अशी माहिती ठाकरे यांनी दिली.
भूखंडांचे श्रीखंड (एकूण 40 एकरांचा गैरव्यवहार
1) भूखंड क्र. बी -192 ... 40,000 चौ.मी.चे (10 एकर) में. लोकमत मीडिया लि.ला वाटप
2) भूखंड क्र. बी-192/1 ... 16,000.88 चौ.मी. (4 एकर) रचना दर्डा यांच्या मे. मीडिया वल्ड एंटरप्रायझेसच्या नावे
3) भूखंड क्र. 192 पार्ट... 16,000 चौ.मी.चे (4 एकर) लोकमत न्यूज पेपरच्या नावे
4) भूखंड क्र. बी 207 ... 6790 चौ.मी.चे (1.69 एकर) वाटप लोकमत न्यूज पेपर लि.
5) भूखंड क्र. बी-208 ...1800 चौ.मी.चे (अर्धा एकर) वाटप विना इन्फोसिस या नावे
6) भूखंड क्र. आरएच -18 ... 51750 चौ.मी. (सुमारे 13 एकर) वाटप लोकमत कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था यांच्या नावे निवासी प्रयोजनासाठी
7) भूखंड क्र. पी -60..... 3997.30 चौ. मी चे (एक एकर) वाटप जैन सहेली मंडळाला.
8) भूखंड क्र. पी एल 7 - 16 हजार चौ.मी.चे (चार एकर) वाटप लोकमत समूहाच्या कामगारांसाठी
9) भूखंड आर. एक्‍स. 1- 6 हजार चौ.मी. (दीड एकर) वर दर्डा परिवाराचे भव्य गेस्ट हाउस आहे.

महाराष्ट्रनामा

मुंबई - महाराष्ट्र १ ला गळती सुरूच ... डेप्युटी न्यूज एडिटर तथा अँकर विनायक गायकवाड याचा राजीनामा ... ओपन हाऊस आता बंद .. वागळे समर्थकांचा आणखी एक पत्ता कट ..


मुंबई - महाराष्ट्र १ ला गळती सुरूच ... पीसिआर हेड दीपक शितोळे यांचा महाराष्ट्र १ ला राम राम ...अर्णबच्या 'रिपब्लिक' मध्ये उद्यापासून सिनिअर पदावर होणार जॉईन..मुंबई - बेरक्याचे भाकीत अखेर खरे ठरले, मधुकर भावे यांना 'प्रहार' मधून अखेर सुट्टी, नवे संपादक उद्या १५ मार्च रोजी जॉईन होणार ...

सोमवार, १३ मार्च, २०१७

पंढरीत अधिकारी आणि पत्रकारांची होळीपूर्वीच ' धुळवड'

पंढरपूर -
पंढरीत अधिकारी आणि पत्रकारांची होळीपूर्वीच ' धुळवड'
बेळगाव  तरुण भारतने फोडली वाचा
(मंगळवार , दि . 14 मार्च 2017)
अरे अरे,
कुठे नेवून ठेवली माझी पत्रकारिता ?

सोमवार, ६ मार्च, २०१७

The Times of India ला साक्षात्कार की जावईशोध !


निलेश खरे यांना आचार्य अत्रे 'युवा संपादक'' पुरस्कार जाहीर

रायगड प्रेस क्लबच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार यंदा जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक निलेश खरे यांना जाहीर करण्यात आला आहे.पाच हजार रूपये रोख,मानपत्र ,सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 22 तारखेला प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आज ही माहिती देण्यात आली आहे.

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात


मुंबईच्या टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद
धर्मादाय आयुक्त कार्यालर्यात पोहचला आहे, त्यावर विद्यमान कार्यकारिणीने खुलासा करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे.
काय आहे खुलासा...
माननीय सदस्य
आपणास माहिती देणे आणि वस्तुस्थिती सांगणे आमचे कर्तव्य आहे.आपण आपली  संघटना वाढवण्यासाठी खुप परिश्रम घेतले आहेत.मोठ्या मेहनतीने ही संघटना आपण या टप्पयापर्यंत आणून ठेवली आहे. टीव्ही जर्नलिस्ट ही संघटना आता चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि पारदर्शकही काम करते आहे. मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात ही संघटना लोकप्रिय झाली आहे. सगळ्या वरिष्ठांशी बोलून,त्यांचे मार्गदर्शन घेउन ही संघटना आपण पुढे नेत आहोत.
आपल्या संघटनेच्या निवडणुकीचा वाद धर्मादाय आयुक्त यांच्या समोर सुनावनीसाठी आला आहे. कमलेश सुतार यांनी हा वाद कोर्टात नेला आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे आपणा पर्यंत पोहचवणं हे आम्ही कार्यकारिणी म्हणून आमचं कर्तव्य समजतो.
2 ऑक्टोबर 2016 रोजी मागच्या कार्यकारिणीने संस्थेची निवडणुक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), 17 ऑक्टोबर 2016 रोज़ी घ्यायच्या ठरवून निवडणुकीसाठी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून नियुक्त केला. निवडणुक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) या नियमानुसार घ्या अशा स्पष्ट सूचना त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी 12 ऑक्टोबर 2016 रोजी निवडणुक घोषित केली आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही 17 तारखेला घ्या असे सांगितले. निवडणुका घोषित करून नियमाप्रमाणे  कार्यकारणीने  सगळे अधिकार त्यांना दिले. पण निवडणुक अधिका-यांनी निवडणुका घेताना अत्यंत बायस आणि गैरप्रकार करून निवडणुक घडवून आणली.
1 उमेदवारांचे अर्ज केवळ मधले नाव नाही म्हणून बाद केले
2 उमेदवारी अर्ज दरवाजा बंद करून ते सर्वांसमोर स्कुटीनी न करता बाद केले
3 उमेदवारी अर्ज किरकोळ कारणासाठी बाद केले
4 उमेदवारांच्या प्रश्नांना किंवा त्यांना हवी असलेली माहीती देण्यासाठी उपलब्ध राहीले नाहीत
5 उमेदवारी अर्ज बाद करून ते कुणालाही न सांगता स्वत:च्या घरी नेले अक्षरश: पळवून नेले ( उमेदवार त्यांना प्रश्नं विचारत होते तेव्हा ते पळून गेले )
5 तब्बल 27 अर्ज बाद करून केवळ त्यांना हव्या असलेल्या काही लोकांचे अर्ज ग्राह्य धरून त्यांना हव्या त्या पदावर निवडुन आल्याचे जाहीर केले
6 एका झी न्युजच्या रिपोर्टरला तु तीन फॉर्म भर, एक भरून दे आणि बाकी दोन वर सह्या कर आम्ही पद टाकतो असे सांगून निवडणुक धडवून आणली. ( त्या उमेदवारांने ही माहीती आपले जेष्ठ निमंत्रित सदस्यांच्या कानावरही, ही माहीती दिली आहे)
7 कार्यालयीन कर्मचारी याला सदस्यांकडून धमक्या येत आहेत असे सांगून कोणत्याही धमक्या किंवा कोणताही तणाव नसताना अर्ज घरी घेउन गेले
10 माजी महासचिव यांच्यावर दबाब आणून त्यांना हवे त्या पद्धतीने निवडणुक पार पडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्नं केला.
11 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारखेच्या दिवशी कार्यालय उघडे न ठेवता परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतले
हा सर्व प्रकार अत्यंत चुकीचा आणि घटनेनुसार नाही. निवडणुक अधिकारी हे आपल्या संस्थेचे अनेक वर्ष महासचिव राहीले आहेत. ते प्रत्येक सदस्याला ओळखतात, तरीही हा प्रकार झाला. 
ही सर्व प्रक्रीया झाल्यानंतर ज्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले त्यांनी रितसर त्यांच्याकडे तक्रार केली. पण त्याला निवडणुक अधिका-यांनी योग्य उत्तर दिले नाही. त्यामुळे अनेक सदस्यांनी ही निवडणुक रद्द व्हावी अशी मागणी केली. त्यानुसार एजीएम मध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला. आपल्या संघटनेच्या एजीएममध्ये या बाबत सविस्तर चर्चा झाली. अर्ज कसे बाद झाले, कोणते घोळ झाले, निवडणुक कशी बायस झाली यावर सर्वांनी आपली मते ठेवली. मुख्यनिवडणुक अधिकारी यांनाही त्यांची बाजू मांडू देण्यात आली. मुख्यनिवडणुक अधिकारी यांनी बाकी इतर सहाय्यक निवडणुक अधिकारी यांकडेही चुकीची माहीती देऊन निवडणुका पार पडल्याचे एजीएम बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीत आपले माननीय निमंत्रित सदस्य साहील जोशी, जितेंद्र दिक्षित हे ही उपस्थित होते, सर्वांच्या समोर चर्चा झाली. दिक्षित यांनीही तांत्रिक चुका महत्वाच्या न मानता निवडणुकीत प्रत्येकाला त्याचा हक्क मिळायला हवा होता, त्याचा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे सांगून ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात असे सांगितले. एजीएम मध्ये यावर मतदानही झाले. त्यात बहुमतांने पुन्हा निवडणुका घेण्याचे ठरवण्यात आले. माननीय जितेंद्र दिक्षित यांनी एजीएम समोर निवडणुक अधिकारी म्हणून संघटनेचा सदस्य नको बाहेरच्या तटस्थ व्यक्तिला मुख्यनिव़डणुक अधिकारी म्हणून नेमावे असा प्रस्ताव ठेवला तो सर्वानुमते मान्य करण्यात आला. दिक्षित यांनी शिवदासानी आणि जतीन देसाई यांची नावे सुचवली, त्यानुसार महिन्याभरात  पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. त्यात सर्वांना भाग घेण्याचा अधिकार होता. पण कमलेश सुतार आणि काही लोकांनी यात भाग घेतला नाही आणि इतरांनाही भाग घेउ नका असे सांगितले असे समजते आणि संस्थेची बदनामी इतर वॉटस अँप ग्रुपवर करत राहीले. आम्ही त्या प्रकाराकडे बिलकुल लक्ष दिले नाही कारण आपण सर्व कायदेशीर बाजू पाहुन प्रक्रीया केली आहे.
मित्रांनो संघटनेच्या कारभार अत्यंत खेळीमेळीने चालला असताना काही लोकांनी विनाकारण संघटनेच्या दारात पोलिसांना पाचारण केले, संघटनेला कोर्टात नेले. ही बाब अत्यंत दुख:दायक आहे. आपण संस्थेचे सन्माननीय सदस्य आहात, आपणाकडेही ही मंडळी येतील आणि खोटी माहीती सांगून तुमच्या कडून कोर्टात सादर करण्यासाठी अफिडेव्हीटवर सह्या मागतील. तुम्ही सह्या करू नका असे आमचे बिलकुल म्हणणे नाही, पण सही करताना आपण ही सर्व बाजू लक्षात घ्या. जी निवडणुक बायस आणि बेकायदेशीर रित्या झाली तीचे सर्मथन करू नये असे आम्हाला वाटते. 
आपणास आणखी काही माहीती हवी असल्यास आपण जरूर संपर्क करा सर्व माहीती द्यायची आमची तयारी आहे, नव्हे माहीती घेण्याचा तुमचा अधिकार आहे...कुणी तुम्हाला खोटी माहीती देउन फसवू नये यासाठी हा पत्रप्रपंच.
कारण तुम्ही चुकीचे अफीडेव्हीट सादर केले तर तो बेकायदेशीर कामाला सहकार्य केले असा त्याचा अर्थ होईल, तुम्ही सविस्तर सर्व माहीती घ्या आणि निर्णय घ्या ही विनंती.

आपले स्नेहांकित
टीव्हीजेए कार्यकारिणी

फेसबुक वर शेअर करा

Facebook