> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

बोगस पत्रकार अमजद सय्यद यास चार दिवसांची पोलीस कोठडी

उस्मानाबाद - शहरातील भीमनगरमधील एका दलित मुलीच्या विनयभंग प्रकरणी अटकेत असलेला बोगस आणि भंंपक पत्रकार अमजद सय्यद यास न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्याचबरोबर सय्यदविरूध्द  अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टचा  गुन्हा दाखल दाखल झाल्याने त्याचा पोलीस कोठडी आणि जेलचा मुक्काम वाढणार आहे.
आरोपी अमजद सय्यद याने दारूच्या नशेत बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील भीमनगरमधील एका दलित मुलीस फोन करून शरीर सुखाची मागणी केली,त्यास सदर मुलीने नकार देताच तिला अश्‍लिल आणि जातीवाचक शिवीगाळ करून, मी पत्रकार आहे,तुला कधीही संपवू शकतो,अशी धमकी दिली होती.
याप्रकरणी पीडीत मुलीने गुरूवारी सकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून,घडलेली हकीगत सांगितली असता,पोलीसांनी कोणत्याही मुलाहिजा न ठेवता बोगस आणि भंपक पत्रकार अमजद सय्यद विरूध्द भादंवि 354, 354 (ड),509,504,507 अनुसार गुन्हा दाखल केला.त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास त्याच्या घराजवळ अटक करून मुसक्या आवळल्या,त्यानंतर रात्रभर त्यास लॉकअपमध्ये बंद केले.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास स्त्रीलंपट आरोपी अमजद सय्यद यास हातात बेड्या ठोकून जिल्हा न्यायालयात उभे केले,तत्पुर्वी आरोपीविरूध्द जातीवाचक शिविगाळ केल्याचा पुरावा मिळताच,त्याच्याविरूध्द अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टचा नविन गुन्हा दाखल केला.पोलीसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केल्यामुळे न्यायधिशांनी आरोपीस चार दिवसांची म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.न्यायाधिशांनी पोलीस कोठडी सुनावताच आरोपी न्यायालयातच ढसाढसा रडू लागला.पोलीसांनी कोणतेही दयामाया न दाखवा पुन्हा त्यास शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीत बंद केले आहे.
जनमानसात आरोपीविरूध्द चीड
आरोपी अमजद सय्यद हा कोणत्याही वृत्तपत्र किंवा चॅनलचा पत्रकार नाही.पाचवी नापास असणारा हा आरोपी केबल जोडण्याचे काम करतो.मटका आणि दारू व्यवसायात त्याची भागिदारी असल्याचे पुरावेही पोलीसांना मिळाले आहेत.
काही मोजक्या पत्रकारांंमध्ये उठबस करून तो लोकांना पत्रकार असल्याचे भासवत होता,तो मराठी पत्रकार संघाचा जिल्हा संघटक असल्याचेही सांगत होता.त्याने अनेकांवर खोट्या केसेस करून जीवनातून उठविले होते. 6 सप्टेेंबर 2016 रोजी उस्मानाबाद गावकरी कार्यालयावर झालेल्या हल्लामध्ये तो प्रमुख आरोपी होता.त्याचबरोबर इंदिरानगरममधील एका तरूणावर खोटी केस करून त्याच्या कुटुंबाचा छळ केला होता.त्या तरूणाने जेलमध्ये केेलेल्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला होता.
मटका आणि दारू व्यवसायात असूनही उजळ माथ्याने तो फिरत होता.त्यामुळे त्याच्याविरूध्द जनमानसात प्रचंड चीड होती.त्याच्या अटकेची वार्ता समजताच अनेकांनी समाधान व्यक्त केले.फेसबुक आणि व्हाटस् अ‍ॅपवर त्याच्याविरूध्द अनेक वाईट कमेंट पडल्या आहेत.त्याचा सर्वत्र धिक्कार आणि निषेध केला जात आहे.
मुलीवर दबाब
पीडीत मुलगी मोठ्या धाडसाने आरोेपीविरूध्द फिर्याद देवून इनकॅमेरा जबाब दिलेला आहे.मात्र तिने केस परत घ्यावी,यासाठी अमजद सय्यद याचा एक भाऊ आणि दारू आणताना सापडलेला एक नातेवाईक  मुलीवर ऐनकेन मार्गाने दबाब आणीत असल्याचे दिसून येत आहे.मुलीवर दबाब येवू नये यासाठी तिला संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी आहे.
दलित संघटना आक्रमक
आरोपीविरूध्द पोलीसांनी योग्य भूमिका घेत सर्व कलमे लावली आहेत.मात्र त्याच्याविरूध्द कडक कारवाई व्हावी आणि त्यास जामिन मिळू नये यासाठी विविध दलित संघटना पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत आहेत.
सोशल मीडियावर आरोपीकडून बदनामी
आरोपी अमजद सय्यद हा बुधवारी रात्री दारूच्या नशेत होता..त्याने दारूच्या नशेतच त्या दलित मुलीस फोन करून अश्‍लिल आणि जातीवाचक शिविगाळ केली,त्याचबरोबर त्याने  कोंडचा हुकमत मुलानी याच्या उस्मानाबाद चौफेर तसेच अन्य काही व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप वर अनेकांची नाहक बदनामी केली.त्याचबरोबर त्याच्या फेसबुक वॉलवरही अनेकांविरूध्द आक्षेपार्ह लिखाण केले आहे.ते सर्व लिखाण तपासण्यात यावे तसेेच आरोपीविरूध्द आयटी अ‍ॅक्ट आणि अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करावा,अशी मागणी होत आहे.

सौजन्य - उस्मानाबाद लाइव्ह  

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

रत्नागिरीच्या ब्लॅकमेलर पत्रकारास हाकलले

रत्नागिरी / सिंधुदुर्ग
मूळ रत्नागिरीचा असलेल्या  एका  ब्लॅकमेलर पत्रकारास एका  टिव्ही चॅनेलने   त्याच्या  ढुंगणावर लाथ मारत हाकलून लावले आहे. रत्नागिरीत बसून हा सिंधुदुर्गचे काम करीत होता.आठवड्यात एकदा जावून स्टोऱ्या करीत होता. जे पैसे  देतील त्याचे बाईट घेवून खिसे भरत होता.अधिकाऱ्याला धमकावून ब्लॅकमेल करीत होता.
केवळ माहिती कार्यालयात अंक देण्यापुरते तो साप्ताहिक काढत होता. चॅनलचे नाव सांगून स्वतःच्या साप्ताहिकास जाहिराती घेत होता. अनेक चांगल्या आणि काम करणाऱ्या पत्रकारास विनाकारण बदनाम करीत होता. त्याच्यामुळे अनेक पत्रकार त्रस्त झाले होते. त्याच्याविरुद्ध चॅनेलकडे तक्रारीचा ढीग लागला होता, अखेर या चॅनलने त्याला हाकलून लावले आहे.
तो सध्या कोणत्याही चॅनेलला कार्यरत नाही. तो बोगस आणि ब्लॅकमेलर पत्रकार आहे. या झोलर बद्दल काही तक्रारी असल्यास बेरल्याला नक्की मेल करा...
berkya2011@gmail.com
(सोर्सचे नाव गुप्त ठेवण्यात येईल)

हा झोलर पत्रकार शेमच्या संघटनेचे काम करतो. बेरक्याने शेम आणि त्यांच्या पंटरचा बाजार उठवला म्हणून या झोलरच्या बुडाखाली आग लागली आहे.याला मुळव्याध  झाला असून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्याची वेळ आलेली आहे.
बेरक्या कोणत्याही चांगल्या पत्रकाराविरुद्ध कधीच काम करीत नाही. पण कोणी उलट्या बोंबा मारत असेल तर त्याचा नक्कीच पायबंद करतो...

रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

पत्रकार संरक्षण कायदा कुठे अडकला ?

चमकोगिरी करणारे गेले कुठे?

नगर  जिल्ह्यातून काही दिवसापूर्वी एका पत्रकाराचा फोन आला होता. साहेब आमच्या  दैनिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला आहे, आरोपीविरुद्ध कोणती कलमे लावता येतील ?  पोलीस निरीक्षक साहेब पण समोर  आहेत, त्यांच्याशी बोला आणि ते समोरचे पोलीस निरीक्षक माझ्याशी बोलू लागले...
त्यांनी कोणती कलमे लावता येतील हे मला  विचारले असता,  मी ४५२,३२३,४२७,५०४,५०६,१४३ ही  कलमे पटापट सांगितली...
समोरचा पोलीस निरीक्षक म्हणाला, साहेब ही  कलमे तर आम्हाला तोंडपाठ आहेत... अजून कोणते कलमे आहेत,  ते सांगा...
मी म्हणालो, मला इतकेच माहित आहेत ...
आमच्या उस्मानाबादच्या गावकरी कार्यालयावर हल्ला झाल्यावर  पाच आरोपीविरुद्ध हीच कलमे लागली होती आणि कोर्टात  चार्जशीटही दाखल झाल्याचे सांगितलं.
समोरचे साहेब, हसून म्हणाले, तुमचा पत्रकार संरक्षण कायदा कलम सांगा...
मी स्पष्ट सांगितले, अजून राज्यपाल महोदय यांची सही  झालेली नाही... जीआर अजून  निघाला नाही,
लगेच ते साहेब म्हणाले., समोरचे तुमचे पत्रकार बांधव यांना समजावून सांगा . ते पत्रकार संरक्षण कायदा कलम लावा, म्हणून अडून बसलेत...
मग मी त्या पत्रकाराची नंतर समजूत घातली आणि   पत्रकार संरक्षण कायदा कुठे पेंड खात आहे हे सांगितले.
सांगायचा मुद्दा असा की, राज्यात अजून पत्रकार संरक्षण कायदाची अंमलबजावणी झालेली नाही..... उन्हाळी अधिवेशनात मंजूर झालेला हा कायदा पावसाळी अधिवेशन संपले तरी अजून राज्यपाल यांच्या समोर सहीसाठी अडला आहे..
पण सर्व पत्रकारांना वाटते कि, चला आता कायदा झाला, आपणास संरक्षण मिळाले... पण हा मोठा गैरसमज आहे..
दुसरीकडे हा कायदा पास झाल्यापासून रोज हल्ले सुरु आहेत.. अमरावतीचे प्रशांत कांबळे असो की पालघर येथील न्यूज 24 चे पत्रकार संजय सिंह यांच्यावर झालेल्या भ्याड असो... रोज कोणावर ना कोणावर हल्ला सुरु आहे. पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणे सुरूच आहे..
मला हसू याचे येते, पत्रकार संरक्षण कायदा केवळ आणि केवळ माझ्यामुळे मंजूर झाला, हे जे सांगत सुटले होते आणि रोज कुठे ना कुठे सत्कार आणि हारतुरे स्वीकारत फिरत होते, ते गेले कुठे ?
मुळात  यांच्याकडे कुठला पेपर नाही.. यांच्या चौकडीकडे सुद्धा  कुठला पेपर नाही... पत्रकार संघटनेच्या नावाखाली केवळ आणि केवळ दुकानदारी सुरु आहे...
माझे प्रकरण असो की अमरावतीचे प्रशांत कांबळे यांचे प्रकरण असो.. यांच्या पायातील  भिंगरी कुठे गेली होती ? हे अश्यावेळी शेपूट घालून का बसतात ?
यांना  केवळ भाट हवेत आहेत...  यांनी लिहिलेली खोटी पोस्ट फॉरवर्ड करणारे चमचे हवेत..
केवळ झुंडशाही करून यांनी किती लोकांना संपवले आहे ? लोक बदनामी करीता घाबरतात म्हणून यांची मजल दरमजल वाढतच चालली होती..
याना आता हवा आहे जश्यास तसा ठोका ...
दुसरे असे की,
केवळ फेसबुक आणि व्हाट्स अँप वर निषेध करून पत्रकारांना संरक्षण मिळणार आहे का ?
मुळात या कायद्याचा लाभ कोणाला होणार आहे ? ग्रामीण पत्रकार रोज जीव मुठीत धरून काम करतात, त्यांच्यासाठी हा कायदा काहीही कामाचा नाही..
या कायदयाची जरी अंमलबजावणी झाली तरी हा कायदा निव्वळ वांझोटा आहे...
अधिस्वीकृती कार्डहि कोणाला मिळते ? जे खरे पत्रकार आहेत, त्या किती पत्रकाराला हे कार्ड मिळाले आहे ?
पत्रकाराना पेन्शन मिळणार हे केवळ गाजर आहे...
त्यांचे  दुकान मोठे व्हावे, यासाठी आपला उपयोग केला जातोय... संघटनेच्या नावाखाली खिसे भरणे सुरु आहे..
आपण त्यांच्या मागे फिरले की यांना वाटते, आपण नेते झालो...
मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याजवळ यांची दलाली अधिक वाढत आहे... .
तेव्हा जरा सावधच राहा ...


- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह

 9420477111

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

५१ लाखाकडे वाटचाल

बेरक्या ब्लॉग सुरु होवून सहा  वर्ष पूर्ण झाली ... सातवे वर्ष सुरु आहे. नवीन लूक सुरु होवून पाच वर्ष  झाली... पाच वर्षात नव्या लूकची व्हिजिटर संख्या ४९ लाख ५१ हजार झाली आहे. लवकरच आम्ही ५१ लाखाचा टप्पा पार करू..
बेरक्या ब्लॉगला आपण दिवसातून कितीही वेळाही  भेट द्या,  मात्र एका आयपी ऍड्रेस वरून एकच नंबर काउन्ट होतो... तेही कॉम्पुटर आणि लॅपटॉप वरून वाचल्यास... तसेच मोबाईल वरून वेबसाईट वाचल्यास नंबर काउंट होत नाही... तरी आम्ही ४९ लाख ५१ हजार चा टप्पा पार केला आहे.
बेरक्या ब्लॉग हा पत्रकारितेतील सर्व घटक, पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थी , चॅनल आणि पेपरचेमालक, संपादक, राजकीय नेते, पोलीस आणि जनता वाचते.. त्याची संख्या लाखोंच्या घरात आहे...
पण याचा आम्हाला कधी गर्व नाही.. आमचे पाय नेहमी जमिनीवर आहेत..

बेरक्यावर जळणारे काही महाभाग असले तरी प्रेम करणारे असंख्य आहेत.. त्यामुळे आम्ही कोणाची पर्वा करीत नाही... दुकान मांडून  दुकानदारी करणाऱ्या पादरे पावटे यांचा नक्कीच आम्ही बिमोड करू...
काहीजण स्वतःला नेता समजतात, मुखवटे घालून फिरतात , त्यांची दुसरी बाजू लोकांना  माहीत नसते,,, ती बाजू बेरक्याला इतंभूत माहिती असते... मोका बघून आम्ही चौका मारतो...
असो, आपले प्रेम असेच असू द्या...
पुन्हा भेटू..
- बेरक्या टीम 
 ......

जाता जाता 

उन्हाळी अधिवेशनात मंजूर झालेला पत्रकार संरक्षण कायदा, पावसाळी अधिवेशन संपले तरी अद्याप जारी झालेला नाही..
यावर राज्यपालांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही आणि जीआर सुद्धा निघालेला नाही...
मात्र स्वयंघोषित पत्रकार नेते पत्रकार संरक्षण कायदा केवळ आणि केवळ माझ्यामुळे मंजूर झाला, असा डांगोरा पिटत फिरले आणि हारतुरे आणि सत्कार स्वीकारून स्वतःला धन्यता मानून घेतले...
त्यांच्या या शेमफुल कृतीचा धिक्कार !
बाबांनो, कायदा मंजूर झाला म्हणजे हल्ला थांबणार आहे का ? स्वतः चे संरक्षण स्वतः करा , कोणाची अपेक्षा न करता आणि कोणाची तळी न उचलता आपले काम प्रामाणिक करा...
मी तुमच्या सोबत आहे ....


- बेरक्या टीम


महाराष्ट्रनामा ...

नागेश खंडागळे यांची आरोटे यांनी घेतली भेट

दैनिक गांवकरीच्या नाशिक आवृत्तीचे उपसंपादक नागेश खंडागळे हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसापासून उपोषणास बसले आहेत. उपोषणस्थळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे भेट देवून भेट खंडागळे यांची बाजू समजावून घेतली. त्यांचा गावकरीने जवळपास तीन लाख पगार थकवला असल्याची माहिती मिळाली. ती मिळावी यासाठी काय करता येईल यासाठी आरोटे यांनी खंडागळे यांच्याशी चर्चा केली.
खंडागळे रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत उभे राहून उपोषण करतात, सायंकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देतात आणि  घरी जातात . त्याचे हे अनोखे आंदोलन सहा दिवसापासून सुरु आहे.

एकीकडे शेमची संघटना अमुक करणार , तमुक करणार अशी फेसबुक आणि व्हाट्स अँप वर नुसत्या घोषणा करते. मात्र आरोटे कोणतेही घोषणा न करता कृती करीत असल्याने त्यांची संघटना जोर पकडत आहे.  खंडागळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोटे प्रयत्नशील आहेत.
 ...................

लोकसत्ताच्या संपादकीय विभागात नाराजी

मुंबई - महाराष्ट्र टाईम्समधून लोकसत्तात गेलेले राजीव काळे यांनी वर्ष पूर्ण व्हायच्या आतच घर वापसी करायचा निर्णय घेतला आहे, तर चीफसब विनय उपासनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
त्यामुळे लोकसत्ताच्या संपादकीय विभागात नाराजी व अस्वस्थता अाहे.
......

मानबिंदूतील कर्मचार्‍यांना नव्या कंपनीची ऑर्डर

पुणे- पत्रकारितेतून केवळ अापणच अन्यायाला वाचा फोडतो, असा दावा करणार्‍या मानबिंदूच्या बुडाखालचा अंधार वाढतच चालला असून, यंदा संस्थेतील  कर्मचार्‍यांना पगार वाढ सोडाच करारही वाढवून मिळणार नाही. त्यांना दुसर्‍याच कंपनीच्या नावाने अाॅर्डर वाटपास सुरूवात झाली आहे. या नव्या करारानुसार पीएफ कपात होणार नाही. तसेच दर महिन्याला दिली जाणारी पेस्लीप देखील यापुढे मिळणार नाही. याचाच अर्थ कर्मचारी म्हणून त्यांची नोंद नसेल. यापूर्वी मानबिंदूने परीक्षा घेऊन मोठी कपात केली होती. त्या पाठोपाठ हा दुसरा मोठा अन्यायकारक निर्णय घेतला अाहे. त्यामुळे कर्मचारी अस्वस्थ झाले असून, ज्यांना नव्या कंपनीच्या नावाने करार नको अाहे त्यांनी सरळ घरी बसावे, असे फर्मानही मालकाने काढले आहे.
केवळ मालकाची चाटूगिरी करणार्‍या मोजक्याच कर्मचार्‍यांना मानबिंदुचे अॅप्रुअल मिळणार अाहे. यवतमाळच्या भाषेत सांगायचे झाल्यास इतरांच्या हाती फक्त धतूरा दिला अाहे.

मालकाला भीती मजिठिया वेतन आयोगाची... 
ही सगळी उठाठेव मजिठिया  वेतन आयोग लागू न करण्यासाठी असल्याचे सूत्रांकडून कळते. चार वर्षांपूर्वी मानबिंदूनेच प्रत्येकालाच असिस्टंट हे पद देऊन पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात यश अाले नसल्याने आता नवा फॉर्म्युला काढण्यात आला आहे.

बेरक्या नेमका आहे तरी कोण ?

बेरक्या ब्लॉग  म्हणजे मराठी  मीडियातील बित्तंबातमी देणारे न्यूज पोर्टल... मराठी मीडियात जे घडते, जे  घडणार आहे किंवा नवीन काय येत आहे? कोण कोठे जॉईन झाला किंवा  जॉईन  होणार ? कोण राजीनामा दिला ? याची माहिती देणारे पोर्टल.बेरक्याची बातमी १०० टक्के खरी असते, हे आम्ही नव्हे आमचे वाचक म्हणतात. आम्ही दिलेले सर्व अंदाज अचूक ठरले आहेत. म्हणून बेरक्याला मराठी मीडियाचे पीटीआय, गॅझेट म्हणून संबोधले जाते. आम्ही हा ब्लॉग सुरु केला नसता तर मीडियातील घडामोडी कळल्या असत्या का ?
बेरक्याला कोणी मित्र नाही किंवा कोणी शत्रू नाही... सात वर्ष झाले बेरक्या अखंडीत चालू आहे. बेरक्याला वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा तिटकारा आहे. जे मुखवटे घालून फिरतात त्यांच्या विरोधात आहे. जे पत्रकार ब्लॅकमेल करतात, जे बोगस आहेत, पत्रकार संघटना काढून दुकानदारी करतात त्यांच्या विरुद्ध बेरक्या आहे. जे पत्रकार चांगले आहेत, चांगले काम करतात त्याच्या बाजूने बेरक्या आहे.
जे  वरिष्ठ कनिष्ठ कर्मचाऱ्याला त्रास देतात, , जे मालक आपल्या कर्मचाऱ्याचा त्रास करतात त्यांच्या विरुद्ध बेरक्या आहे.बेरक्या अन्यायग्रस्त पत्रकारांची बाजू घेऊन आजपर्यंत लढला आहे.
बेरक्या ब्लॉग आणि फेसबुक पेज चालवणारा अमुक आमुक आहे, अशी चर्चा नेहमीच  केली जाते. पण बेरक्या हा कोणी एकटा व्यक्ती नाही. बेरक्याची टीम आहे. दिल्ली २, मुंबई ४, पुणे ३, मराठवाडा  ५, विदर्भ ३, कोल्हापूर २, कोकण १० अशी अनेक पत्रकारांची टीम आहे. विदेशात एक जण आहे. त्याच बरोबर प्रत्येक चॅनल, वृत्तपत्र मध्ये बेरक्याचे सोर्स आहेत. ते सोर्स बेरक्या कधी जाहीर करीत नाही.
बेरक्याला आलेल्या मेलची चार वेळा खात्री केली जाते, क्रॉस चेक अनेक वेळा केले  जाते,त्यानंतर बातमी अपलोड  केली जाते..
हा खुलासा करण्याचे कारण असे की, काही दुकान मांडून बसलेल्या पत्रकार संघटना आणि कुठेच काम करीत नसलेले त्याचे पादरे -पावटे बेरक्या अमुक अमुक आहे म्हणून सांगत सुटले आहेत. बर आपण सांगा बेरक्या गुन्हेगार आहे का ? बेरक्याने चांगल्या पत्रकारास त्रास दिला का ? असे असेल तर हा ब्लॉग आम्ही आता बंद करतो.
पत्रकार संघटनेच्या नावाखाली सुरु असलेला दुकानाचा बाजार बेरक्याने उठविला, यांचे काळे धंदे उघडकीस आणले, याचा खरा चेहरा समोर आणला म्हणून यांच्या बुडाखाली मोठी आग लागली आहे. कोकणातील अलिबाग मध्ये मनमानसींचा मुका घेवून पुण्यात आलेले पार्सल, त्याचा खास चमचा असलेला परळचा बारावी नापास असलेला दारुडा,सिंधुदुर्गचा एका चॅनलने हाकलून लावलेला ब्लॅकमेलर आणि कोकणातील रोहामध्ये  बूट पॉलिश करीत शेमचे बूट चाटणारा दुसरा चमच्या तर खूप बोंबलत आहे. असे  पादरे- पावटे आम्ही गेली ७ वर्ष कोळून पेली आहेत. पत्रकार संघटना काढून दुकान मांडलेल्या लोकांचा बाजार वेळोवेळी उठवतच  राहू...
बेरक्या अमुक -अमुक आहे असे कोणी सांगितले तर आपण अजिबात विश्वास ठेवू नका.. आपण सारेच बेरके आहोत... चला वाईट प्रवूत्ती ठेचू या ! पत्रकारितेतील घाण साफ करू या !
बेरक्या टीम


बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

निलेश खरे यांचा अखेर टीव्ही ९ ला रामराम

मुंबई - बेरक्याचे भाकीत पुन्हा एकदा खरे ठरले आहे. टीव्ही ९ ( मराठी) चे संपादक निलेश खरे यांनी अखेर आज राजीनामा दिला आहे. ते लवकरच साममध्ये संपादक म्हणून जॉईन होतील...
एबीपी माझा, मी मराठी, जय महाराष्ट्र करून निलेश खरे यांनी टीव्ही ९ मध्ये प्रवेश केला होता, मात्र अवघ्या तीन महिन्यात ते टीव्ही ९ मधून बाहेर पडले आहेत.  टीव्ही ९ चे सल्लागार विनोद कापरी यांच्या कार्यपद्धतीला वैतागून खरे बाहेर पडले आहेत. कापरीमुळेच यापुर्वी  निखिल वागळे, उमेश कुमावत बाहेर पडले होते. खरे यांची जागा ND टीव्ही इंडिया चे अभिषेक शर्मा घेतील.
दुसरीकडे टीव्ही ९ मध्ये 'देशमुखगिरी' वाढली आहे. यांच्यापेक्षा वयाने सिनियर असलेल्या रिपोर्टरला अपमानजनक शब्दाचा वापर करणे, अधिकार नसताना "घरी बस, अशी धमकी देणं या सगळ्या गोष्टीं वाढल्या आहेत, त्यामुळे आता अभिषेक शर्मा कधी येतात आणि ही देशमुखी वतनदारी कधी बंद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

साम पुन्हा स्वतंत्र
साम चॅनल विकण्यात आले, अशी अफवा मागे पसरली होती. मात्र ते विकण्यात आले नव्हते. ( म्हणून बेरक्याने न्यूज दिली नव्हती ) एका कंपनीला काही हक्क देण्यात आले होते, पण ते हक्क काढून घेण्यात आले आहेत. या कंपनीबरोबर असलेला करार रद्द करण्यात आला आहे. सामचे सर्व हक्क सकाळ मीडियाकडेच आहेत.चॅनल चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी निलेश खरे यांच्या सह काही जण जॉईन होत आहेत.

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०१७

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना !

पत्रकारांच्या सर्व व्हाट्स ग्रुप, फेसबुक आणि सोशल मीडियावर मराठी पत्रकार परिषद आणि एस एम देशमुख यांची चमकोगिरी याबद्दल ज्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत त्या आम्ही शेअर करीत आहोत.,,

1.
बस्स झाले ! आता दूर व्हा !

मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची मातृसंस्था आहे, या परिषदेला मोठी परंपरा आहे, अनेक ख्यातनाम पत्रकार परिषदेचे अध्यक्ष झाले, 
पहिले कार्याध्यक्ष म्हणून  निवडून येवून नंतर अध्यक्ष होता येते, परंतु 75 वर्षाच्या इतिहासात ही परंपरा स्वतः ला ज्येष्ठ म्हणणारे एस.एम. देशमुख यांनी मोडून टाकली, त्यांची निवडच मुळात अनधिकृत होती ...

परिषदेचा कारभार पारदर्शक नाही, असला असता तर पुण्याच्या न्यास कार्यालयात ऑडिट रिपोर्ट दिला गेला असता....

परिषदेला जास्त उत्पन्न नाही, असे सांगणारे एस.एम. बँकेत तीन खाते कश्यासाठी उघडतात ?

शेगाव अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला, त्यामुळे अनेक मान्यवर पत्रकारांनी पाठ फिरवली, 
निखिल वागळे, श्रीमंत माने, गजानन जनभोर, रवी टाले सह अनेक पत्रकार जाण्याचे टाळले ..

शेगाव अधिवेशनास मुख्यमंत्री फडणवीस येणार म्हणून दोन महिने अगोदर घोषणा करण्यात आली होती, मुख्यमंत्री आले नाही, त्याचा खुलासा एस एम यांनी मुख्यमंत्री विदेशी गेलेत म्हणून आले नाहीत, असा केला पण मुख्यमंत्री 19 आणि 20 ऑगस्ट रोजी मुंबई मध्येच  होते...मुख्यमंत्री जाणीवपूर्वक आले नाहीत...

गिरे तो भी टांग याप्रमाणे शेगाव अधिवेशन प्रचंड यशस्वी झाले, असे एस एम यांनी लिहिले आहे, त्याला 2500 पत्रकार आले होते, असा शोध लावला आहे, 
मुळात या हॉलची क्षमता 750 आहे, सकाळी पालकमंत्री, सदाभाऊ यांच्यामुळे हॉल भरला होता, भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, नंतर मात्र हॉल रिकामा झाला, दुपारी निम्मे लोक दिसले,
250 ते 300 लोक असताना 2500 आले कुठून ?
बर यात लिहिणारे पत्रकार किती ? साप्ताहिक काढणाऱ्या लोकांचा भरणा अधिक...जे फक्त माहिती कार्यालयात अंक देतात ते आले होते... श्रमिक पत्रकार किती ? एस एम यांनी 2500 लोकांची यादी नाव, पत्ता आणि मोबाइल नंबरसह जाहीर करावी ...

पत्रकारांनी आगे बढो अश्या घोषणा दिल्या, सेल्फी काढली असे म्हणणे म्हणजे स्वतः च स्वतःची स्तुती करणे आहे, उलट लोकांनी खासगीत शेम शेम म्हंटले...

पत्रकार संरक्षण कायदा माझ्यामुळे झाला याचे श्रेय घेणाऱ्या एस एम यांनी , कायदा झाल्यानंतर किती पत्रकारांवर हल्ला झाला, हे जाहीर करावे, या कायद्या अंतर्गत किती आरोपीवर गुन्हा दाखल झाला, हे जाहीर करावे...हा कायदा वांझोटा  आहे...

शेगाव अधिवेशन सर्वात अयशस्वी ठरले आहे..या अधिवेशनाचे फलित काय ?
लोक गजानन महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आले होते, सकाळी हजेरी लावून दुपारी गायब झाले...

आता पुढचे अधिवेशन शिर्डीला होणार म्हणून जाहीर करण्यात आले, 
त्यापुढील पंढरपूर, तुळजापूर, नाशिक करा, 
अरे हे पत्रकार अधिवेशन आहे की कुंभमेळा ?
किमान दर्शन निमित्त लोक यावेत, म्हणून हे सुरू आहे का ?


आता माझी 31 ऑगस्ट रोजी मुदत संपत आहे, मी समाधानी आहे, वगैरे वगैरे लिहिले आहे, मुळात एस एम यांची निवडच अनधिकृत आहे, यापूर्वीचे अध्यक्ष किरण नाईक यांचे शिक्षण बारावी पण नाही, त्यांच्याकडे कोणते पेपर नाही, एस एम कडेही कोणते पेपर नाही, या कार्यकारिणी मधील अनेका कडे पेपर नाही, फक्त संघटनेच्या नावाखाली झुंडशाही सुरू आहे...

एस एम आणि त्यांचे पँटर परिषदेचे संस्थानिक होऊ पहात आहेत...
रायगड मध्ये मराठी पत्रकार संघ मोजत नाही म्हणून रायगड प्रेस क्लब स्थापन केला, जिथे जे सोयीचे आहे ते केले...

अनेक पत्रकार संघांनी मराठी पत्रकार परिषदेशी संपर्क तोडून टाकला आहे..
औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील किती पत्रकार हजर होते ?
एकही पत्रकार गेला नाही ...

अनेक मान्यवर पत्रकारांनी परिषदेकडे पाठ फिरवली आहे, उस्मानाबाद, नांदेडसह अनेक ठिकाणी तुकडे पडले आहेत, याचे कारण एस एम आणि त्यांच्या पँटरचे सुरू असलेले गलिच्छ राजकारण...

एस एम मुळेच परिषद गाळात रुतत आहे, त्यांनी तात्काळ बाजूला व्हावे....
.........................
2.
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना !


शेगावला पत्रकारांचे अधिवेशन आयोजित करणारे संयोजक राजेंद्र काळे यांचा आता  फोन आला होता, त्यांचा हा पहिलाच फोन...

त्यांनी दिलेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ स्वतंत्र असून, आमची गेल्या दोन वर्षांपासून पत्रकार अधिवेशन घेण्याची इच्छा होती, म्हणून अधिवेधन घेतले, त्याला आम्ही एस एम देशमुख यांना निमंत्रित केले तसेच अनेक पत्रकारांनाही निमंत्रित केले होते, 

आम्हाला महाराष्ट्रात किती पत्रकार संघटना आहेत, हे माहीत नाही, आता हळू हळू कळत आहे...


मुळात हे आधिवेशन बुलढाणा  जिल्हा पत्रकार संघाचे होते, पूर्ण मेहनत या संघाचे पत्रकार घेत होते, मात्र या अधिवेशनात एस एम यांनी, जणू हे अधिवेशन स्वतः आयोजित केल्याचे सांगत स्वतःची टिमकी वाजवली आहे,

बुलढाणा जिल्हा पत्रकार स्वतंत्र आहे, त्याची न्यास मध्ये स्वतंत्र नोंदणी आहे. हे अधिवेशन मुळात बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे होते, पण एस एम आणि त्यांच्या पंटरनि स्वतःची बॅनरबाजी करीत चमकोगिरी केली... खरे श्रेय बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे... एस एम यांचा काय संबंध ? तुम्हाला बोलावले म्हणून अधिवेशन तुमचे झाले का ? हे तर  बेगानी शादी  में अब्दुल्ला दीवाना ! झाले

एस एम याना बुलढाणा वाले निमंत्रीत केले नसते तर हे अधिवेशन प्रचंड यशस्वी झाले असते, आता त्यांना पश्चाताप होतोय...

बुलढाणा वाले तुमची काहीच चूक नाही, तुम्ही फक्त तुमचे काम केले,पण दुकानदारी चालवणाऱ्याना बोलावले म्हणून तुमच्या अधिवेशनाला ग्रहण लागले..

बुलढाणा वाल्याना आता जसा पश्चताप झालात तसा होवू देऊ नका..

आपल्या संघाची न्यास मध्ये स्वतंत्र नोंदणी करा, ऑडिट रिपोर्ट वेळीवेळी सादर करा, 
परिषदेवर संस्थानिक होऊ पाहणाऱ्याला धडा शिकवा...

एस एम हा पत्रकारामध्ये आपापसात भांडणे लावून स्वतःची पोळी शेकून घेतो, तेव्हा जागृत व्हा,यांची बडदास्त ठेवण्याची काही गरज नाही...


किरण नाईक याचे शिक्षण बारावी सुद्धा नाही, तो कोणत्या पेपरचे काम सुध्दा करीत नाही, तो विनाकारण लुडबुड करतो..
असे लुडबुडे दूर ठेवा ...


तुम्हाला शुभेच्छा पण सतर्क राहा, हीच अपेक्षा !

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

निलेश खरे सामच्या वाटेवर...

मुंबई - टीव्ही 9 मराठी मध्ये सल्लागार म्हणून विनोद कापरी आल्यापासून मराठी संपादक  संपवण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे ...

विनोद कापरी यांच्या विक्षिप्त स्वभावामुळे सल्लागार संपादक निखिल वागळे यांनी अवघ्या तीन महिन्यात राजीनामा दिला, पाठोपाठ व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी अवघ्या एक महिन्यात राजीनामा दिला, आता संपादक निलेश खरे यांनाही अवघ्या तीन महिन्यात राजीनामा द्यावा लागला ...
इनपुट हेड प्रीती सोमपुरा, आऊटपुट हेड अभिजित कांबळे यापूर्वीच राजीनामे दिले आहेत.. 

निखिल वागळे सध्या फ्री आहेत, उमेश कुमावत पुन्हा ABP न्यूज ला गेले तर निलेश खरे सामला संपादक म्हणून लवकरच जॉईन होत आहेत ...

निलेश खरे अनेक वर्षे एबीपी माझा ला होते, तेथून मी मराठी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 करून साम जॉईन करीत आहेत...

इकडे टीव्ही 9 मध्ये संपादक म्हणून ND टीव्ही इंडियाचे अभिषेक शर्मा जॉईन होत आहेत..एका मराठी चॅनेलमध्ये अमराठी लोकांची सत्ता चालणार आहे...
मराठी  मीडियातील अमराठी लोकांबद्दल आवाज कोण उठवणार ?

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०१७

"महाराष्ट्राचं महाचॅनल" मध्ये परिवर्तनाचे वारे

मुंबई - "चला जग जिंकू या ! स्वारी  "महाराष्ट्राचं महाचॅनल" मध्ये नवे संपादक आल्यापासून  परिवर्तनाला सुरुवात झालीय. , नव्या संपादकांनी अनेकांच्या अधिकारावर हातोडा चालवलाय.गेले चार महिने चॅनेलची धुरा संभाळण्याऱ्या आणि प्रकर्षाने   चॅनेलला खड्यात घालणाऱ्या  टोळीला नव्या संपादकांनी तडीपार केलय. तर फर्स्ट पोस्टमधून आईबीएनमध्ये आलेलं पार्सल सुद्धा पहिल्याच फटक्यात परत पाठवलं गेलं.
सत्ता मिळाल्यावर हत्तीसारख्या माजलेल्या माणिक मोतीची आउटपुट विभागप्रमूख या पदावरून हकालपट्टी झाली असून आता माणिक मोतीची बदली इनपुट विभागात करण्यात आली आहे.  सध्या मोतीला शिफ्ट इन्चार्जच्या हाताखाली निमूटपणे काम करावं लागतंय, ज्या सहकाऱ्यांना ऑर्डर द्यायचा,त्यांच्याच हाताखाली काम करण्याची पाळी मोतीवर आली आहे. दुसऱ्या चॅनेल मध्ये माणिक मोतीने खूप हात - पाय मारून बघितले, मात्र त्याचा कपटी इतिहास बघता कुणी त्याला थारा द्यायला तयार नाही.
चॅनल  महिने हातात असतांना या माणिक मोतीने  चॅनेलला   TRP मध्ये पार गाळात नेवून  पोहोचवलय. दुसरीकडे लायकी नसतांना सत्ता मिळाल्यावर गावातल्या वळू सारखा पिसाळलेल्या तोडक - मोडकची हवा आता चांगलीच टाईट झाली आहे. कॉन्फरन्स कॉल मध्ये महिला रिपोर्टसोबत कमरेखालची भाषा वापरल्यामुळे तोडक - मोडक अगोदरच  संकटात सापडलाय, चॅनेलच्या सर्व महिला रिपोर्टनी तोडक मोडक विरुद्ध वरपर्यंत कम्प्लेन्ट ठोकल्यात. तोडक मोडक अनेक रीपोर्टर कडून तोडपाणी करायचा ही  बाब नव्या संपादकापर्यंत अगोदरच पोहोचली होती. म्हणून आल्या - आल्या तोडक मोडकचे पंख छाटण्यात आलेत. त्याला विभागप्रमुख म्हणून काढून टाकण्यात आलाय, आता तो केवळ शिफ्ट ईंचार्ज म्हणून काम करतो.कदाचित माणिक मोती आणि तोडक मोडकला कामावरून काढून टाकण्याचा विचार मॅनेजमेंटचा आहे असं कळतंय.
यस बॉस ,यस बॉस करत चॅनलमध्ये प्रवेश करणारा लबाड लांडगा उर्फ संजय याला मध्येच कार्यकारी संपादक होण्याचे स्वप्न पडायला लागले होते, मात्र आता बॉस गेल्यावर या लबाड लांडग्याला त्याच्या मूळ जागेवर परत धाडण्यात आलाय. चॅनेलचा TRP येवो न येवो मात्र या तिघांवर केलेल्या कारवाईमुळे चॅनेलचे कर्मचारी खूप खुश झालेत.

लोकमतचे वार्ताहर विश्वास पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

कोल्हापूर - कोल्हापूर  प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आणि लोकमतचे मुख्य वार्ताहर विश्वास शामराव पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी  अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून  पोलिसांनी पाटील यांना अटक केली आहे.   न्यायालयाने पाटील यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सर्जेराव पोवार  (आंबा ता. शाहूवाडी) या दलित युवकाची 17 एकर जमीन हडप करण्यासाठी विश्वास पाटील यांनी त्याला घरातून बाहेर काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. यापुर्वीही 2015 ला त्यांनी व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा विश्वास पाटील यांनी असा प्रकार केला होता.
पोवार यांच्या नावावर 7 /12 उतारा असतानाही विश्वास पाटील यांनी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला.

यापुर्वीही सामना या दैनिकामध्ये बलात्काराचा गुन्हा दखल झाला अशी बातमी आली होती.यावेळी त्यांच्याबाबत माध्यमांमध्ये जोरात चर्चा सुरु होती. मात्र पाटील यांनी राजकीय लोकांच्या मध्यस्थीने ते प्रकरण राजा मकोटे नावाच्या पत्रकारावर शेकवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला.  त्यांच्या अशा कारनाम्यामुळे पाटलांची  सकाळमधून  उचलबांगडी करण्यात  आली  होती.

त्यांच्या कारनाम्याला घाबरुन कोणतेही  दैनिक त्यांना घेण्याचे धाडस करीत नव्हते..  शेवटी एका  खासदाराच्या  मध्यस्थीने दर्डा यांना सांगून लोकमतला ते जॉईन झाले झाले होते.
अॅट्रॉसिटी  अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूवाडी पोलिसानी  विश्वास शामराव पाटील यास अटक केली. याप्रकरणी दोन दिवसाची कोठडी मिळाली आहे.20 आॅगस्टला लोकमत कोल्हापुरचा वर्धापन दिन आहे, त्यासाठी ते बाहेर येण्यासाठी  प्रयत्नशील आहेत.


काय आहे प्रकरण ?
http://www.spsnews.in/2017/08/14/parivne/

मीडियाची 'दुकानदारी' आणि पक्षातील 'पादरे पावटे'..

काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना आणि मीडिया हाऊसमधून सरकार विरोधात बातम्या रंगवणाऱ्या समस्त पत्रकारांना दुकानदारी असे संबोधून एक काम चांगले केले,आता प्रत्येकांनी आत्मपरीक्षण करावे आणि आपल्या दुकानात माल पुरवणारे फडणवीस यांच्या पक्षाचे पादरे पावटे कोण आहेत याचा विचार करावा.फडणवीस यांनी पक्षांतर्गत काहीच बंडाळी नाही त्यामुळे दिल्लीचे बोलावणे आल्याशिवाय मी आणि पक्षाध्यक्ष दानवे इथेच आहोत आणि आमची दोघांचीही पदे कायम आहेत असे सांगून टाकले.याचा अर्थ फडणवीस यांचे भवितव्य दिल्लीश्वरावर अवलंबून आहे.फडणवीस यांनी मीडियाला दुकानदारी बोलताना थोडेसे इतिहासात जायला हवे होते,आपण कोण होतो?इथपर्यंत आपल्याला कोण पोचवले ?नागपूर टू मुंबई या प्रवासातील आपल्याला मोठे केलेले दुकानदार कोण आहेत?छोट्या छोटया गोष्टीवर आपल्याला अमाप प्रसिद्धीच्या झोतात कोणकोणत्या दुकानदाराने आणले,आपण फायली घेऊन कुण्या दुकानदाराच्या पायऱ्या झिजवल्या,कोण कोण आपल्याला कच्चा माल पुरवत होते आणि कुणाच्या भरवश्यावर आपण काँग्रेस राष्ट्रवादीच्या अंगावर तुटून पडत होतो याचा विचार करायला पाहिले होता.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणत्या दुकानदाराला आपण माल भरण्यासाठी मदत केली आणि कोण आपले डमरू वाजवत सुटले त्यांना तरी यातून वगळायला हवे होते.जेव्हा एखादे बुमऱ्यांग अंगावर येत असते तेव्हा पत्रकार आणि मीडिया दुकानदार वाटायला लागतात.मेहता आणि देसाईंच्या भ्रष्टाचारामुळे हैराण झालेले फडणवीस यांनी मीडियाला दुकानदारी म्हणून हिनवण्याचे काम केले आहे,जे मीडिया हाऊस फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे बटीक आहेत त्यांनी शांत बसावे आणि खाजगीत जाऊन त्यांना प्रश्न विचारावा आम्ही तुमचे काय घोडे मारले,सब घोडे बारा टक्के असे म्हणून मीडियाला बोलण्याचा अधिकार कोण दिला?फडणवीस यांनी पक्षातील पादरे पावटे काढून बाहेर फेकावेत,जे पत्रकारांना बातम्या पुरवतात त्यांचा नायनाट करावा,आज पक्षात प्रचंड खदखद सुरु आहे,दानवे आणि त्यांचा गट बिथरलेला आहे,खडसे आणि त्यांचे समर्थक हैराण आहेत,तावडेंचे कार्यकर्ते एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत,पंकजा मुंडे आणि त्यांचा वंजारा समाज आपण त्यांच्यावर अन्याय करताय म्हणून राग धरून आहे,मेहताना आपण वाचवण्याच्या प्रयत्नामुळे खडसे आणि मराठा समाजाच्या मनात प्रचंड असंतोष आहे,हेच सगळे बदलाचे वारे वाहत आहेत असे संकेत बाहेर पत्रकारांना देत आहेत,त्यात या अधिवेशनात विरोधकांनी आपल्याला पहिल्यांदाच शांत करून टाकले आहे,आपण किती जणांना झाकत फिरणार आहात,60%मंत्र्यांवर कसले ना कसले आरोप आहेत,आपण स्वतः क्लीन असून उपयोग काय?पक्षातील पादऱ्या पावट्यांनी कुठेतरी ओकल्याशिवाय बातम्या बाहेर फुटल्या काय?शेलार याना मध्येच डोहाळे कुठून लागले?संजय धोत्रेचे नाव पक्षाध्यक्ष पदासाठी कुठून आले?काही मंत्र्यांना हकालणार या काही बनी बनाया स्टोरीज नाहीत हे फडणवीस साहेब आपण लक्षात घेतले पाहिजे,आपण थोडेसे  पक्षातील ज्येष्ठाना विश्वासात घेऊन बसा,आपल्या नावावर कोण कुठे पट्ट्या फाडतय यांच्यावर लक्ष ठेवा,विरोधक अश्या बातम्या पेरत असावेत असे आपल्याला वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाका,ते आजही त्यांच्या चौकशीतच हैराण आहेत,मीडिया बोलली नसती तर आपले अधिवेशन शांततेत पार पडले असते,मेहता,देसाई वादात सापडलेच नसते,मीडियाला कमी लेखू नका,तुमच्या आयुष्याचे शिल्पकार मीडियावालेच आहेत,आणि तेव्हाही त्यांनी दुकानदारी केली असेल तर ते दुकानदार कोण होते ज्यांनी आपल्याला मुख्यमंत्री पदापर्यंत आणण्याची सुपारी घेतली होती,त्याचाही खुलासा करावा.आपल्या कर्तुत्वाला मीडियाने मोठे केले आहे,आपण प्रामाणिक प्रयत्न करत होतात त्याला मीडियाने साथ दिलेली आहे,आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात उभारला होतात म्हणून तुम्हाला मीडियाने मदत केलेली होती.आम्ही आपली विधानसभेतील धडपड बघितली होती म्हणून मदत केली,जर मीडियाने आपली दखलच घेतली नसती तर आजही आपण नागपूर ते मुंबई अश्या चकरा मारत राहिला असतात,आजही हातात फायली घेऊन मंत्रालयाच्या परिसरात मीडियावाल्याना कॅन्टीनमध्यें बोलावून कोण किती भ्रष्टाचारी आहे हे सांगत राहिला असतात.मीडियाची दुकानदारी बोलण्यापूर्वी थोडासा विचार आपण करायला हवा होता,मीडियाने अनेक मुख्यमंत्री बनवले आहेत आणि अनेकांना पायउतार होतानाही पाहिलं आहे.आपण दुकानदारी शब्द परत घेऊन मीडियाची जाहीर माफी मागायला हवी,जे रोज देवेंद्रभाऊंना बातम्या पुरवतात त्यांनी काहीकाळ आपली दुकानदारी थांबवून समाचार घ्यायला हवा.कोणीही उठाव आणि मीडियाला दुकानदार म्हणावं हे बरोबर नाही आणि फडणवीस यांच्याकडून तरी हे अपेक्षित नाही,आज अनेक पुढारी मीडियाने बनवले आहेत त्यात आपणही एक आहेत हे विसरून चालणार नाही,त्यापेक्षा पक्षातील अंतर्गत बातम्या पुरवणाऱ्या सप्लायरला रोखण्याचे काम करा,पादरे पावटे बाहेर फेकले सगळे सुरळीत होईल.एका बातमीमुळे विलासराव देशमुख घरी आले,शरद पवार शांत बसले त्यामुळे मीडिया ट्रायलमध्ये अडकून पडू नका,कोणतीही मीडिया सुगावा लागल्याशिवाय बातमी देत नाही हे आपल्यालाही माहित आहे,आपण कोंबडे किती दिवस झाकणार आहात.

- संजय जेवरीकर, ज्येष्ठ पत्रकार, औरंगाबाद


............................................................ 

"जे रोज देवेंद्रभाऊंना "बातम्या पुरवतात" त्यांनी "काही काळ आपली दुकानदारी थांबवून" समाचार घ्यायला हवा!

● दुकानदारी शब्द मागे घेऊन जाहीर माफी मागायला हवी...

... आहे, एक तरी "माई का लाल" आहे... संजयराव जेवरीकर... अभिनंदन! आम्हा सर्व षंढ, नपुसंक, बिनकण्याच्या, दुकानदार पत्रकारांच्या फौजेत आपण एक मर्द शिलेदार निघालात...

💐💐 अभिनंदन!! 👍🏻👍🏻

जे मीडिया हाऊस फडणवीस आणि त्यांच्या पक्षाचे बटीक आहे...?

- हे समजला नाय जेवरीकर गुरुजी; कोण नाय ती यादी छोटी होईल!!
 ......


● आज दुकानंदारांकडे लंपट, लोचटपणे आलेले राजकीय ग्राहक कोण-कोण आहेत?

*आजच्या दुकानदार परिषदांचा तपशील काय आहे? कोण-कोणत्या दुकानदारांना किती माल वाटप करण्यात आला?*

● मुंबईत तिघे दुकानंदारांकडे आलेत, एक पक्ष आणि दोन व्यक्ती. पक्ष मॉल सम्राटासह सत्तेत सामील, व्यक्ती मॉलवाल्याच्या पार्टीतील... 

● राज्यभरातील दुकानंदारांचा आजचा काही तपशील?

*एकातरी पत्रकार संघटनेने,  अधिकृत पत्रक काढून, "दुकानदारी"च्या वक्तव्याचा निषेध केला का? या कसल्या संघटना मग? एकतर हे दुकानदारी करतात म्हणजे नाहीतर मग शेपूट घालून मूग गिळण्याचे कारण काय? पत्रकार संघटनांचे हे नंपुसक वर्तन संतापजनक व चीड आणणारे आहे... आम्ही सारे पत्रकार एकतर दुकानदार आहोत; नाहीतर मग षंढ तरी!*

● असेल लाज तर काढा निषेधपत्रके, मॉलवाला जाहीर माफी मागेपर्यंत मॉलवाल्यांचा माल आपल्या दुकानातून खपविणे बंद करा... *न पेक्षा या षंढांच्या संघटनांना टाळे ठोका; बंद करा दुकाने आणि दुकानदारी!*

● लाज वाटतेय आता पत्रकार असल्याची!!
- विक्रांत पाटील, कार्यकारी संपादक, जनशक्ती, मुंबई
Vikrant@Journalist.Com

 

मराठी पत्रकार परिषदेला स्वकीयांचाच धोका?

मराठी पत्रकार परिषद हि आपणा सर्व पत्रकारांसाठी एक मानाची संस्था. परिषदेचे हित जपणे हि खरे तर सर्व पत्रकारांची जवाबदरीच आहे.
आपल्या परिषदेचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक असावेत हि रास्त अपेक्षा आम्हा पत्रकारांची विद्यमान पदाधिकाऱ्यांकडून, आजीव सदस्यांकडून व ज्यांना आम्ही परिषदेचे संरक्षक समजत होतो अश्या लोकांकडून नक्कीच होती. 
परिषदेचे अनेक वर्षांचे ऑडिट केलेले हिशोब धर्मादाय आयुक्त कार्यालयास सादर झालेले नाहीत असे माहिती अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. हि खरे तर एक धक्कादायक व क्लेषदायकच बाब आहे. आपल्या परिषदेचा वापर कोणालाही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाकरिता करू न देण्याची जवाबदरीही आपणा पत्रकारांचीच आहे.
परिषदेच्या अधिवेशनांकरिताच्या देणग्या, सभासद वर्गणी व इतर देणग्यातून  आमच्या कष्टाच्या पैस्यातुन जमा झालेल्या निधीचा हिशोब दिला गेलाच पाहिजे.
जर व्यवहार पारदर्शक असतील तर अनेक वर्षे ऑडिट न करण्याचे कारण काय? एका कार्याध्यक्षांनी हा विषय उचलून धरला होता, हि खरेतर परिषदेकरिता चांगलीच बाब होती. पण सदर कार्याध्यक्षांना विरोध करण्यात आला, त्यांना अध्यक्ष होऊ दिले गेले नाही. कदाचित अध्यक्ष झाल्यावर त्यांनी ऑडिट करून घेतल्यास कोणी अडचणीत येणार होते कि काय अशी शंकाच आमच्या मनात निर्माण होतीये. खरे तर हा हिशोब मागण्याचा पूर्ण अधिकार व जवाबदारी प्रत्येक सभासदांची आहे. 

ज्यांच्या बद्दल आम्हाला नितांत आदर होता व ज्यांना आम्ही परिषदेचे रक्षणकर्ता समजत होतो ते खरेतर भक्षणकरताच आहेत व परिषदेचा वापर स्वतःच्या स्वार्थाकरिता करीत आहेत हे स्पष्ट होऊ लागले आहे. अनेक ज्येष्ठ व सन्माननीय सभासद परिषदेपासून दूर जाणे हि बाब वरील परिस्थितीस दुजोराच देते.
हे सर्व बघता परिषदेबद्दलचे आपले कर्तव्य म्हणून सर्व पत्रकारांनी मिळून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना व आजीव पदे उपभोगणाऱ्यांना जाब विचारणे आवश्यकच झाले आहे. "परिषदेचे कार्य" ह्या गोंडस नावा आड स्वतःचा वैयक्तिक हेतू साध्य करण्याचा डाव आता आमच्या ध्यानात आला आहे. परिषदेच्या पदाचा मनाप्रमाणे व स्वतःच्या फायद्याकरिता वापर करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अश्यां स्वकीय म्हणवणाऱ्यांपासून परिषदेस असलेला मोठा धोका वेळीच ओळखणे आपल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अस्तित्वाकरिता गरजेचे आहे.
 
... नारायण तांबोळी.

बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

पुन्हा तेच ! शेम..शेम.. नसत्या बडबडी ऐवजी आधी हिशेब द्या!

मराठी पत्रकार परिषदेतील आर्थिक अनागोंदीवरून मोठ्या घोटाळ्याचा संशय बळावतो आहे. यावरून विविध पत्रकारांकडून हिशेब सादर करण्याची मागणी होत आहे. पण परिषदेवर ताबा मिळवलेल्या एस. एम. देशमुख यांच्याकडून विविध कारणे पुढे करत सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. याचसंबंधीच्या विविध पोस्ट सध्या राज्यातील पत्रकारांच्या विविध ग्रुपवर फिरत आहेत. त्यापैकीच ही आणखी एक पोस्ट....

----------------------------

एकीकडे साळसूदपणाचा, प्रामाणिकपणाचा आव आणायचा आणि दुसरीकडे पत्रकारांची दिशाभूल करत लाखों रुपये फस्त करायचे, असा धंदा गेली अनेक वर्षे शेम..शेम.. देशमुख आणि कंपूकडून सुरू आहे. कधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या, कधी मराठी पत्रकार परिषदेच्या, कधी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या, कधी रायगड प्रेस क्लबच्या, कधी कशाच्या तर कधी कशाच्या नावे हे धंदे सुरू आहेत.

पडताळणी करूनच गुन्हा दाखल करण्याची तरतूद असणारा डॉक्टरांच्या कायद्याप्रमाणेच पत्रकारांसाठी कायदा व्हावा अशी मागणी होती. पण तसा कायदा न होता अत्यंत वांझोटा असा पत्रकार संरक्षण कायदा झालेला आहे, हे मुद्देसूदपणे मांडले गेले. त्यावर उत्तर न देता दुसऱ्याच विषयावर लिहून मूळ विषयावरील लक्ष विचलित करण्याचा जुनाच धंदा यावेळीही केला गेला. आता हिशेबाच्या बाबतीतही असेच सुरू आहे. आम्ही कोण आहोत यावर चर्चा करण्याऐवजी आम्ही उपस्थित करत असलेले मुद्दे योग्य आहेत की नाही ते सांगा! पण तसे होताना दिसत नाही. जिल्हा संघांशिवाय इतरत्र कुठूनही पैसा येत नाही असा अगदी खोटारडा दावा शेम..शेम..च्या चेल्याने केला आहे. मग शासन आणि खाजगी लोकांकडून घेतलेला पैसा कुठे गेला.

काही दिवस गेले ले रे गेले की लगेचच कुठेतरी अधिवेशन, संमेलन, राज्य- विभागीय किंवा आणखी कुठली तरी बैठक, मेळावा असे काही तरी घेतले जात असते. यासाठी पैसा काय हवेतून येतो का? वास्तविक वरील कारणांसाठी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात निधी जमा गेला जात असतो. त्याचा हिशेब कुठेच नाही. अर्थातच हा पैसा फस्त केला जातो. त्यामुळेच तर या शेम..शेम.. ने सातत्याने अनेक वर्षांपासून खर्चाचा ताळेबंदच धर्मादाय कार्यालयात सादर केलेला नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ना नोकरी, ना कुठचा व्यवसाय! मग यांचे घर- दार, गाड्या, एसीचे प्रवास, थाटामाटाचे दौरे आदी आदी आदी सर्व कसे भागते?

याविषयी एखाद्याने सवाल उठवले, की दुसऱ्याच कुठल्या तरी मुद्यावर विषय नेऊन त्यावर वाद- विवाद घातला जातो आणि हिशेबाच्या मुद्याला बगल देत बोलण्याचे टाळले जाते. आताही असेच होत आहे. चंद्रशेखर बेहेरे असतील किंवा इतर काही पत्रकार, ते काही सवाल उपस्थित करत आहेत, त्याचे उत्तर देण्याचे हे सतत टाळत असतात, यातूनच बेईमानी उघड होते. 

मराठी पत्रकार परिषदेचा काही कार्यक्रम असला की अशी विघ्न आणली जातात अशी ओरड करून
नेहमीप्रमाणे आर्थिक घोटाळ्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न शेम..शेम.. आणि कंपूकडून होत आहे. पण आमचे म्हणणे आहे, की मग तुम्ही सरळ सरळ छापील हिशेब सर्वांना देऊन मोकळे का होत नाही. राज्यातील पत्रकारांच्या नावे लाखों रुपये जमा करून नंतर हाच पैसा खिशात घालायचे धंदे हे करतात. म्हणूनच तर ऐनवेळी उत्तर देता- देता यांच्या तोंडी फेस येतो. आम्हाला कुणीही हिशेब विचारावा तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे असे हास्यास्पदपणे सांगितले जात आहे. चोरी पकडली जाण्याच्या भीतीने छापील हिशेब देण्याचे मात्र टाळलेच जाते. यापूर्वी मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात, बैठकीत वार्षिक हिशेब अगदी छापील स्वरूपात सर्वांना दिले जात, पण आता बंद झाले आहे. शेम..शेम.. आता तरी वठणीवर या आणि मराठी पत्रकार परिषदेच्या परंपरेप्रमाणे सर्वांना छापील हिशेब द्या, अन्यथा सच्चे पत्रकार तुम्हाला पळता भूई थोडी पाडतील.

- एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)

दारूच्या अड्डयावर काम करणारा झाला पत्रकार


मुंबई - शेमचा खास चमचा म्हणून ओळखला जाणारा किरण्या एकेकाळी परळच्या दारूच्या अड्डयावर दारूड्यांना दारू देण्याचे काम करीत होता.त्याच्या अड्डयावर काही पत्रकार जात होते,त्यातून त्याची आणि काही पत्रकारांशी ओळख झाली.
एका पत्रकाराच्या ओळखीमुळे त्याला इंडियन एक्स्प्रेस मध्ये प्यूनची नोकरी मिळाली.रात्री पेपरचे गठ्ठे बांधण्याचे काम त्याला मिळाले.तो प्यून असताना दत्ता सामंत यांच्या कामगार युनियनने इंडियन एक्स्प्रेसमध्ये संप पुकारला होता.त्यावेळी संपाची कोंडी फोडण्यासाठी मालकाने किरण्याचा वापर केला.संपाची कोंडी फोडण्यात किरण्या यशस्वी झाला आणि मालकाने त्याना बक्षिस म्हणून वसुली क्लर्क म्हणूून प्रमोशन दिले.
जाहिरात बिलाची वसुली करण्यासाठी तो मंत्रालयात जावू लागला.मंत्रालयात तो पत्रकार म्हणून सांगू लागला.तो वसुली क्लर्क असताना पत्रकार म्हणून सांगत असल्याचे संपादक अरूण टिकेकर यांना कळताच त्यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून किरण्याला हाकलून लावले.
त्यानंतर त्याने इचलकरंजीहून प्रसिध्द होणार्‍या एका स्थानिक दैनिकाचे मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्ड आणले.वास्तविक इचलकरंजीच्या त्या पेपरचे चार अंकही मुंबईत येत नाहीत.त्याचे शिक्षण बारावी पण नाही.त्याला चार ओळीची बातमीही लिहिता येत नाही,दुसर्‍याच्या बातम्या कॉपी पेस्ट करून तो पत्रकारिता करतो.कार्डचा उपयोग मंत्रालयात दलाली करण्यासाठी तो करीत आहे.
शेम अलिबागमध्ये असताना त्याची आणि किरण्याची ओळख झाली,शेमचा मालकाची मंत्रालयातील कामे करण्यासाठी दलाल हवाच होता.त्याने किरण्याला हाताशी धरले.मग काय किरण्या शेमचा खास चमच्या बनला.शेमची सगळी कामे करू लागल्याने त्यास बक्षिस म्हणून अधिस्वीकृती मिळवून दिली.बारावी शिक्षण नसताना त्यास अधिस्वीकृती कशी काय मिळाली,हा संशोधनाचा विषय आहे.शेमने त्याला परिषदेचा अध्यक्षही करून टाकले होते.वास्तविक किरण्याचे अडनाव वेगळे आहे.त्याचा एक भाऊ परळचा गुंड होेता,म्हणून त्याने चक्क अडनावच बदलले आणि लोकांची दिशाभूल करून,वावरू लागला आहे.त्याने परळमधील एकाचे घर हडप केल्याचीही चर्चा आहे.
दारूच्या अड्डयावर काम करणारा किरण्या शेमचा खास चमचा आणि मंत्रालयातील दलाल म्हणून सध्या कुप्रसिध्द आहे.त्याच्या बाकी भानगडी लवकरच ....

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

शेम -शेम !

बीडच पार्सल सोलापुरात एका पोरीला पटवून अलिबागला गेलं...तिथं बायको असताना मनमानसीचा मुका घ्यायला गेला आणि चांगलाच मुखभंग झाला, मालकाने प्रकरण मिटवले नसते तर मराठवाड्यातुन कोकणात गेललं हे पार्सल जेलात गेलं असतं ! 
वास्तविक हे पार्सल ज्या पेपरमध्ये काम करत होता, त्याचा खप फार फार तर 3 हजार! पण मालकाचे इतर व्यवहार संभाळन्यासाठी त्याचा उपयोग होत होता, पण मालकाला चुना लावत याने पुण्यात अलिशान फ्लॅट घेतला, लाखो रुपयांचे फर्निचर केले ...
मालकाला या पार्सलची सर्व धंदे कळाल्यानंतर त्याने एकेदिवशी हाकलून लावले तर तो मालकाच्या विरोधी दैनिकात पाय चाटत गेला, पण एक वर्षाच्या आतच त्याही  मालकाने हाकलून लावले !
त्यानंतर याला कोणी विचारत नाही ! जिकडे तिकडे नो एन्ट्रीचा बोर्ड ! म्हणून हा  पत्रकाराचा स्वयंघोषित नेता बनलाय !
पहिले कार्याध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष ही परंपरा याने मोडून  खाल्ली ! आणि संस्थेचा मालक होवू पाहतोय ..
याच्याकडे कोणता पेपर नाही, म्हणून संघटनेच्या नावावर दुकानदारी सुरू केली  आहे, 
त्याच्या उजव्या चमच्याकडेही कोणताच पेपर नाही, तो मंत्रालयात दलाली करतो, कोकणातील डाव्या  चमच्याकडेही कोणता पेपर नाही तरी तोही संघटनेच्या नावाखाली दुकानदारी करतो !

याचे सभासद कोण तर जे कुठंच काम करत नाहीत असे पत्रकार ! ज्यांचा पेपर फक्त माहिती कार्यालयात दिसतो, असे पत्रकार ! पत्रकार कसले दलाल !! 
किती श्रमिक पत्रकार याचे सभासद आहेत  ?
कोकणातील हाकलून लावल्यावर हे पार्सल आता  पुण्यात आले आहे! कमाईचे कोणते साधन नसताना फिरायला कुठून येतो पैसा ? आणि म्हणे मी खिश्यातुन खर्च करतो ? हे कोणाला खरं वाटते का ?
फक्त चमकोगिरी करणे, संघटनेेच्या नावाने देणग्या उकळणे इतकेच काम सुरू आहे,
याने न्यास ऑफिसला ऑडिट रिपोर्ट सुद्धा दिला नाही, व्यवहार चोख होता तर का दिला नाही ? याला का दिला नाही म्हणून विचारले तर प्रश्न विचारणाऱ्यावर तोंडसुख घेतो !
याला दुसर्याचे बघायचे वाकून आणि स्वतःचे ठेवायचे झाकून अशी सवय आहे ! 
याच्या विरुद्ध कोण काही बोलले की, मुद्द्याचे सोडून दुसरेच उत्तरे देतो ! 
याची ही जुनी सवय आहे ! याने अनेकांना नाहक बदनाम केले आहे ! 
माहिती संचालक मानकर साहेब यांनी याच्या दिवाळी अंकास जाहिराती बंद केल्या म्हणून याने त्यांची बदनामी केली,मुख्यमंत्री यांचे माध्यम सल्लागार रविकिरण देशमुख याना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, अधिस्वीकृती कमिटीच्या निवडणुकीत तोंडावर पडला म्हणून यदु जोशी  विरुद्ध गरळ ओकला , मुंबई मराठी पत्रकार संघ मोजत नाही म्हणून देवदत्त मटाले यांच्याविरुद्ध मोहीम चालवली !  आजतकचे साहिल जोशी, टीव्ही मीडियाचे विलास आठवले यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला ...
निवडून आलेल्या चंद्रशेखर बहिरे यांना बदनाम करून राजीनामा देण्यास भाग पाडून स्वतः अनधिकृत पदावर बसला ! नांदेड मध्ये पत्रकार विरोधात गेले म्हणून केशव घोणसे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला ! 
 अशी किती तरी उदाहरणे आहेत ! 
कोकणात तर याने अनेकांना बदनाम केले आहे ! पत्रकारांत आपापसात भांडणे लावून हा स्वतःची पोळी शेकून घेतो !
हा पत्रकार नेता नव्हे पत्रकारांचा कर्दनकाळ आहे !

शेम शेम !!

पत्रकारांचा कर्दनकाळ; पत्रकारांचा नेता कसा असू शकतो?

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शेगावी होणार्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जर शेमफूल आर्थिक घोटाळ्यांवर चर्चा झाली असेल तर शेमफुल ऊत्तरही त्याच आर्थिक घोटाळ्यांबाबत असायला पाहिजे होते.... पण सराईत राजकारण्याप्रमाणे शेमने यावेळी पत्रकारांचा गट किवा पत्रकारांचा आडनावावरून ऊपहास करून जो ऊत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे; तो पाहता त्याचे चमचे तेवढेच पत्रकार आणि जे समर्थक होण्यास तयार नसतील, त्याचा शेमने कायमचा काटा काढावा असे वर्तन त्याने नेहमीच केलेय... अनेकदा अशा प्रयत्नांचा तो मूळ सुत्रधार असल्याचेही ऊघड झालेय.... रायगडमध्ये शेमने संपवलेले पत्रकार हे पत्रकारितेतून नव्हे तर पत्रकारांसाठी काही करून दाखविण्याच्या प्रयत्नांतून बाजूला झालेले दिसतात. पण शेमसमर्थक पत्रकार हे लिहिणार्या पत्रकाराची बातमी स्वतःच्या नांवे खपवताहेत हेच चित्र रायगडकर वाचकांना रोज पाहायला लागतंय... 
एनडीटिव्हिचे प्रसाद काथे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी अलिबागला गेले तेव्हा शेमचम्मच आष्टीकर त्यांची हारतुरे शालश्रीफळाची थैली सांभाळण्याच्या निमित्ताने हमाली करून मागेपुढे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे अलिबाग प्रेस असोसिएशनच्या पदाधिकारी पत्रकारांनी फार गंमतीने अनुभवले... आता रायगडात शेमसमर्थक दबक्या आवाजात मीपण अशी एकमेकांना ओळख दाखवतात ही परिस्थिती ते पदाने मोठे आणि पत्रकारितेत खुपच छोटे झाल्यानेच निर्माण झाली आहे... पेरण्याने क्लबी कार्याध्यक्ष होण्यासाठी धरलेला हट्ट आणि खंबाटा की पवार महाराष्ट्र परिषद निवडणुकीचे विघ्न आणून संतोष पावलेले  ऊमेदवार हे किस्से चर्चेत असतानाच कार्याध्यक्ष असूनही पदसिध्द क्लबी अध्यक्षपदापासून दूर राहिलेल्या सहकारी रांजणकरानी मोकल कार्याध्यक्ष नसतानाही क्लबी अध्यक्षपदावर बसवले आणि शेमच्या पापाचा घडाच रांजणकरानी फोडलाय....
आधी साप्ताहिक आणि रायगड टाईम्स नावाने ओळखल्या जाणार्या रत्नागिरी टाईम्सच्या आवृत्तीला सतत विरोध करणारा शेम त्या आवृत्तीचे पत्रकारही हाताशी धरून संख्याबळ वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे... आष्टीकरला अधिस्विकृती कधी मिळाली आणि किती अल्पावधीत तो अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी निवडून गेला..... ही निवडणूक होते कशी आणि मतदान कोण करतं? हे समजण्याआधीच तो कोकण अध्यक्ष झाला..... माझ्याकडे प्रकरणं पाठवा असे मेसेजही तो या संदर्भातील जीआर पायदळी तुडवून वायरल करू लागलाय.. रांजणकर जिला नजरेसमोरही धरत नसे अशी कधीच्यामधी पत्रकारिता करणारी महिला अधिस्वीकृती यादीत आली तिला  कल्याण निधीतून शेमफूल मदतही दिली गेली.... 
मग खरे पत्रकार या शेमला स्वाभिमानाने काम करताना नकोच असतील तर....
शोलेतला गब्बरसिंग यालाच म्हणालाय हे नक्की....

शेमफूलने xxx फौज बनायी है..

मनमानसीचा मुका घ्या मुका !

मनमानसी आंध्रतील एका चॅनेलची रायगड प्रतिनिधी.... बिनधास्तपणा अंगात होता.... पत्रकारांचे गुरूजी तिला लेकीच्या मायेने कुरवाळायचे...  तीही गुरूजीच्यासाठी स्वागतास सज्ज असायची कधी रेस्टहाऊस बुकींग तर कधी मच्छी फ्रायकुकींग करून गुरूजीना द्यायची... गुरूजीच्या आज्ञेनुसार कधी रम तर कधी  व्हिस्की?यचीपण!
एकदा शेमच्या कानावर हे आदरातिथ्य गेलं आणि त्याने तिला रायगडच्या मुखपत्राच्या ऑफीसात तातडीनं बोलवलं... तिचं कौतुक केलं... आदरातिथ्याचंही कौतुक केलं... करता करता तो तिला आलींगन देऊन "मुका घ्या मुका" करू लागला.... मनमानसीने मुका तर घेतला नाहीच पण शेमचा मुखभंग मात्र जोरात केला... आता काही वर्ष ऊलटली या घटनेला आणि आरपी क्लबाचा महिला पत्रकार पुरस्कार देऊन मनमानसीचं मन वळवलंय खरं... पाहू या या खेळात पुढे काय काय घडतंय ते.! मालकांनी हे प्रकरण मिटवले नसते तर शेम जेलात जाऊन बसला असता.
.
...

रायगड जिल्ह्यात पन्नाशीच्या आतला आणि तरीही पाचपन्नास वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर बातम्या देण्याचं सातत्य ठेवणारा संपादकीय विभागाची खुर्ची सोडून खेडोपाडी फिरणारा तब्बल 29 वर्षे पत्रकारिता करणारा अवलीया आहे.... शेम जेव्हा रायगडमध्ये स्थिरावण्याआधीच फेकला जाईल असं वाटत होतं त्यावेळी तो कृषीवल या जिल्हा दैनिकाचा चेहरा बदलत असल्याने त्या अवलियाने त्याची साथ द्यायचं ठरवलं.... 
शेमचा सत्कार चक्क पुरोगामी विचारवंत अभिनेते निळूभाऊ फुले याच्याहस्ते दहाएक हजार लोकाच्या ऊपस्थितीत केल्याने शेमच्या मनीमानसीचा मुका घ्या मुका वृत्तीमुळे कृषीवलकारांची लाथ बसायच्याऐवजी विश्वासच बसला आणि शेम रायगडात स्थिरावला...पुढे शेमने आरपी क्लब काढला... चमचे गोळा करून त्याना स्वतःचे विश्वासू केले अन् विश्वासू झाले शेम खुशमस्करे!!!
शेमचा निरोप्या बनलेल्या एका खुशमस्कर्याने अवलिया पत्रकाराला क्लबात येण्याच आवतण दिलं.... पण तेही कसं.... तुम्हाला शेमसायबानी सांगावा धाडलाय पण महाडचे पत्रकार नकोत.... साले महाडचे चोर हैत लईच श्याने हैत... अवलिया भडकला.... तुझा शेम साहेब चोर आहे... सांग भडव्याला महाड माझी जन्मभूमी आहे... आले तर दोन्ही तालुक्यातले येतील पण कुणाला कमी लेखण्याचे काम नाही...
चमच्याला निमित्त भेटलं.... तो तसा बोलला तो असा बोलला... खुपच मीठमसाला लावून सांगितलं शेमला... शेमनं अवलियाला फोन लावला असं का बोललात? 
अवलिया तडकलाच.... निरोप सांगायचा तर सांगितला पण कुणाची निंदा का करायची त्या चमच्याने? अवलिया पत्रकार सतत तडकफडक राहिला आणि त्यामुळे तोच ताठ राहिला... शेम स्वतःला नेता म्हणता म्हणता चमच्यांच्याच हातातलं बाहुलं झालाय... कधी पदं कधी पुरस्कार तर कधी व्यासपीठावर घेऊन अनेकाना आपलंस करणारा शेम अधूनमधून पत्रकार असल्याचं भासविण्यासाठी एका तरूण संपादकाच्या दैनिकात लिहितोय आणि या संधीच्या बदल्यात त्यालाही पुरस्कार मिळवून दिलाच की!!!!!
...
शेमला नडणारा रायगड जिल्ह्यातला जेष्ठ पत्रकार कुठं तरी बदनाम झाला पाहिजे अन् त्याचे विरोधक आपलेसे होऊन आरपी क्लब वाढला पाहिजे... असा डाव खेळला गेला. कोण्या अंध सेटलमेन्ट्यानं महाडला विश्वरूप बघितलं अन् मांडीवर पुढारीपण घेतलं. सेटलमेन्ट्याच्या हाताशी पत्रकाराचा ठेकेदार अन् मांडीवर पुढारीचं गेंगाणं चकणं बाळ अन् झालंच तर गेगाणं लंगडं चम्मचं सोबतीला म्हैसल्याचं ढापणं... या सगळ्याची शेमनं मोट बांधली.... सिंधूदूर्गातून ढूंगणावर लत्ताप्रहार होताच पुनश्च पुढारीच्या पायावर नाक घासणार्या सावन्ताचो शशि कलाकार.... नेतृत्व करायचा आणि सहकारीच दडपायचा ही वृत्ती की विकृती... पण शेम आणि शशि कलाकारात सारखीच भिनलेली... शशि कलाकाराच्या तावडीतही माथेरानच्या हाटेलचा कार्यानुभव असल्याने त्याने जणू तावडीत पुढारी गिरिधारीही खोवला.... आता कटाचा बेत चांगलाच तयार होऊन शिजला...
आता रायगडात कधी पाटील कधी ठाकूर करताना बेघर झालेला शेम छोट्या वेलीवरचा राजन झालाय. अष्टीकर पक्का एकही सहारा झालाय... आता नडणारा पोहोचवायचाच अशा बेताने जमिनमाफियाना हाताशी घेऊन गेंगाणं बाळपण ठेकेदाराला *पटेल* तसा वापरू लागला. ज्येष्ठ पत्रकाराविरूध्द कट फिक्स झाला... कुणाला *पटेल* अथवा न *पटेल* रायगडच्या जेष्ठ पत्रकाराला कोणी खोट्या आरोपाच्या जाळ्यात पकडेल हे तरी .पटेल* काय?
कटाच्या दिवशी ज्येष्ठ पत्रकाराने ज्याच्याकडे खंडणी मागितली तर तोच फिर्यादीच पत्रकाराला दिवसातून दोनवेळा फोन करून *ओ घ्या ना होऽऽऽ* अशा विनवण्या करू लागला.. ज्येष्ठ पत्रकाराने पुन्हा मला फोन करशील तर लाच देण्याचा प्रयत्न करतोस म्हणून गुन्हा दाखल करीन असे सुनावले. हा फोन होताच अमराठी माणसाने पाचच मिनीटात ज्येष्ठ पत्रकाराविरूध्द खंडणी मागितल्याची खोटी तक्रार करून पत्रकाराच्या प्रेशरचा पोलीसावर ऊपयोग करून गुन्हा दाखल केला. 
पण सत्याची बाजू लंगडी पडू द्यायची नाही म्हणून ज्येष्ठ पत्रकाराने वस्तुस्थिती दाखवून मुंबई हायकोर्टातून अटकपूर्व जामिन आणला. पण इकडे सावन्त्या शशि कलाकारानं शेमच्या सांगण्यावरून एका हायस्कूलच्या शिपायाला पुढारीपण देत ज्याने रायगडात पुढारी आणला त्या ज्येष्ठ पत्रकारासमोर ऊभं केलं.... वर्ष दोन वर्षे ते शिपुर्ड माजलं... दारू पिऊन ओकू लागलं... जय गोपाळ जय श्रीकृष्ण स्टेटस व्हाटस अपवर ठेऊन ते शिपुर्ड ज्येष्ठ पत्रकाराला आडवं जाऊ लागलं... शाळेची घंटा वाजवण्याचा निमसरकारी पगार घेणारं ते शिपुर्ड यंदा शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत विद्यार्थी नसतानाही घंटा बडवताना ज्येष्ठ पत्रकाराला दिसला.... आणि मग पत्रकारितेतील ऊपरं ते शिपुर्ड त्याच ज्येष्ठ पत्रकाराने एका लाथेत पत्रकारितेबाहेर घालवलं. हे बघा ते शिपुर्ड शैक्षणिक संस्थेकडून हे पत्र मिळताच ज्येष्ठ पत्रकारानं मारलं असं कोकलंत सुटलंय... पण यावेळी फक्त ढूंगणावर लाथ मारलेय पुन्हा पत्रकारितेत ते शिपुर्ड दिसलं तर त्याच्या पोटावरच बसेल. हे समजून असलेला शेम अन् शशि कलाकाराचा एकोपा ज्येष्ठ पत्रकार आता कुणावर नेम धरणार याचा अंदाज बांधत आहेत.

मराठी पत्रकार परिषदेतील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला

पोस्ट क्र. १

पत्रकारांसाठीचा वांझोटा कायदा: चमकोगिरी झाली, हुजरेगिरीही झाली!

शेम..शेम..देशमुख आता तरी पत्रकारांची दिशाभूल थांबवा!

मुंबईसह राज्यभरातील सर्व पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे पत्रकारांच्या संरक्षणार्थ एक कायदा राज्य सरकारने संमत केला आहे. पण या कायदावरून राज्यातील आणि एकूणच सर्व पत्रकारांची दिशाभूल करण्याचा निर्लज्ज प्रकार सध्या सुरु आहे. आणि हा प्रयत्न होतो आहे तो चमकोगिरी करणारे पत्रकारांचे(?) कथित नेते शेम...शेम..अर्थात एस.एम. देशमुख यांच्याकडून!

पत्रकारांसाठी नव्याने झालेला कायदा म्हणजे जणू पत्रकारांच्या आयुष्याचा उद्धार करणाराच असल्याचे भासवले जात आहे. पण प्रत्यक्षात हा कायदा अत्यंत वांझोटा असा आहे. या कायद्याच्या मंजुरीनंतर तर या कायद्याच्या नाकावर टिच्चून पत्रकारांवर हल्ले सुरूच असून यात दिवसेंदिवस वाढच होत आहेत. यावरून या कायद्याचा  वांझोटेपणा लक्षात येतो. या कायद्यामुळे पत्रकारांचे कसलेही संरक्षण होत नाही. केवळ प्रचलित कायदा काहीसा कडक झाला आहे इतकेच. बाकी यातून पत्रकारांचे खास संरक्षण करणारे असे काहीही नाही. मुळात पत्रकारांसाठी नेमक्या कोणत्या कायद्याची मागणी होती, यावर चर्चाच होऊ नये असा जोरकस प्रयत्न केला आहे. आणि दुर्दैवाने आपण पत्रकार याला बळी पडत आहोत. पण आता तरी यावर चर्चा व्हायलाच हवी.

पत्रकारांनी विरोधात लिखाण केले की, त्यांच्याविरुद्ध विविध खोट्या तक्रारी विविध पातळ्यांवर केल्या जातात. यात प्रामुख्याने पोलिसांकडे तक्रारी करून पत्रकारांवर खंडणी, महिला-मुलींची छेडछाड अशाप्रकारच्या खोट्या तक्रारी करून गंभीर गुन्ह्यात अडकवले जाते. खोटे गुन्हे दाखल करणे हा प्रकार पत्रकारांवर होणाऱ्या शारिरीक हल्ल्यांइतकाच किंबहुना त्याहीपेक्षा गंभीर हल्ला आहे. पत्रकारांना अशा प्रकारे हल्ल्यांपासून, खोट्या गुन्ह्यांपासून संरक्षित केले जावे अशी खरी मागणी होती. यासाठी डॉक्टरांसाठीच्या कायद्याच्या धर्तीवर पत्रकारांसाठी कायदा करावा अशी मूळ मागणी होती. डॉक्टरांसाठी बनवण्यात आलेल्या खास अशा कायद्यानुसार राज्यातील कोणत्याही डॉक्टरांविरुद्ध एखाद्याने तक्रार केली तरी थेट गुन्हा दाखल होत नाही. डॉक्टरविरुद्ध तक्रार आली की, एका समितीमार्फत त्या तक्रारीची शहानिशा केली जाते. आणि तक्रार खोटी असल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल केला जात नाही. काही रुग्णांच्या नातेवाईकांकडून खोट्या तक्रारी करण्याच्या वाढत्या प्रकारानंतर डॉक्टरांनी मोठे आंदोलनं करून हा कायदा पदरात पाडून घेतला. या कायद्यामुळे डॉक्टरांना एक मोठे संरक्षण मिळालेले आहे.

पत्रकार हे सार्वजनिक जीवनात काम करत असल्याने असेच संरक्षण पत्रकारांनाही देण्यात यावे अशी मूळ मागणी होती. तशाप्रकारच्या कायद्याची मागणी मान्य झालेलीच नाही. पत्रकारांच्या तोंडाला पानं पुसत निव्वळ थातूर-मातुर कायदा पत्रकारांच्या माथी मारण्यात आला आहे. त्यावर चर्चा करून सुधारणांबाबत प्रयत्न करण्याऐवजी हे उपटसुंभ शेम...शेम...देशमुख, या कायद्यावरून सर्व पत्रकारांची दिशाभूल करून स्वत:ची टिमकी वाजवून घेण्यातच धन्यता मानत आहेत. हे शेम..शेम.. आता मुळात पत्रकारच राहिलेले नसल्याने यांना पत्रकारांची नेमकी मागणी काय होती याचा विसर पडलेला आहे. त्यातच त्यांना सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करीत त्यांच्यासमोर चमकोगिरी करण्यातच जास्त रस असल्याने त्यांनी पत्रकारांची दिशाभूल सुरुच ठेवली आहे. निव्वळ हारे- तुरे घालून घेण्याची हौस भागवून घेण्यासाठी आपल्या चेल्या-चपाट्यामार्फत स्वत:च स्वतःचे कौतुक सोहळे यांनी घडवून आणले. यातून त्यांची पत्रकार संघटनेची दुकानदारी आणखी जास्त तेजीत आलीही असेल. पण पत्रकारांना खऱ्या अर्थाने संरक्षण कायदा मिळण्याच्या अपेक्षांवर मात्र पाणी फेरले जात आहे. 

डॉक्टरांच्या कायद्याच्या धर्तीवर पत्रकारांसाठी कायदा का केला नाही, याचा जाहीर जाब आता या चमकोगिरी करणाऱ्या नेत्याला(?) विचारयास हवा.
तसे काही पत्रकार खाजगीत या कायद्याच्या वांझोटेपणाबद्दल प्रश्न उपस्थित करीत आहेत. पण, ‘आमच्यामुळे हा कायदा तरी झाला, तुम्ही काय केले?’ असा उलट दम भरणारा सवाल करून पुढच्यास गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे तर म्हणणे आहे की, “तुम्ही नेते म्हणून दुकानदारी करता, पत्रकारांच्या नावे दशकानुदशकांपासून विविध शासकीय पदं लाटता, लाखों रुपयांचा शासकीय निधी लाटता, सर्व चरितार्थ केवळ संघटनेच्या नावावरच चालविता, त्याचबरोबर नसलेले श्रेयही लाटत फिरत असता, त्यामुळे उत्तर देण्याची सर्वाधिक जबाबदारी ही तुमचीच आहे”. पत्रकारांना अपेक्षित असणारा कायदा झालेला नसल्याने त्यासाठी आता पाठपुरावा करण्याऐवजी हे चमकोगिरी करणारे स्वत:ची लाल म्हणवून घेण्यातच गर्क आहेत, हे त्यांच्या चमच्यांना कळत नसले तरी इतर खऱ्या पत्रकारांना ते कळत नाही, अशा भ्रमात शेम..शेम..ने राहू नये.

तूर्त इतकेच...

-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)

11. 08. 2017
------------------------------------पोस्ट क्र. २

पत्रकार संघटना म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान असेच झाले आहे

एक पत्र...

शेम..शेम..च्या नेतृत्वाखाली मराठी पत्रकार परिषदेत आर्थिक अनागोंदी

मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनास येण्याचे रद्द केले


मराठी पत्रकार परिषदेचे स्वंयघोषित अध्यक्ष तथा मुख्य विश्वस्त शेम..शेम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आर्थिक अनागोंदी सुरू असल्याचा आरोप अनेक पत्रकारांकडून आतार्यंत करण्यात येत होता. आता, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या एका पत्रामुळे याला दुजोराही मिळाला आहे. या पत्रानुसार, शेम..शेम..देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आल्यापासून मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने अनेक वर्षे आपला हिशेबच सादर केलेला नाही. सार्वजनिक न्यास नोंदणी झालेल्या कोणत्याही संस्थेस दरवर्षी हिशेब सादर करणे बंधनकारक असते. मराठी पत्रकार परिषद तर शासनाकडून विविध कारणे पुढे करून लाखो रुपये निधी घेत असते, त्याचप्रमाणे विविध जिल्हा शाखांकडून, सभासद शुल्काच्या नावे याचबरोबर विविध कार्यक्रम, संमेलन या नावे लाखो रुपयांचा निधी दरवर्षी जमा करीत असते. पण या पैशांत मोठे घोटाळे होत असल्याच्या आरोपास आणि शंकेस आता बळ मिळत आहे. या पैशांमध्ये केलेले घोटाळे झाकण्यासाठी हिशेबच सादर न करण्याचा हातखंडा शेम..शेम.. आणि कंपूने वापरला असल्याचे स्पष्ट होत आहे.

साधारणतः दर दोन वर्षांनी मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन भरवले जाते. आणि या अधिवेशनास उपस्थित पत्रकारांसमोर मागील दोनही वर्षाच्या हिशेबाचा लेखाजोखा अगदी छापील स्वरूपात सादर केला जात असे. पण शेम..शेम..ने परिषदेवर ताबा मिळवल्यापासून अशाप्रकारे छापील हिशेब देणे बंदच करण्यात आले आहेत. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडे तर हिशेब सादर केला गेला नाहीच; पण सभासद पत्रकारांपासूनही हिशेब दडवून ठेवला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून याद्वारे लाखों रुपयांचा घोटाळा केला गेला असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे माजी कार्याध्यक्ष तथा राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रशेखर बेहेरे यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या महितीनंतर हा खळबळजनक प्रकार पुढे आला आहे. ही माहिती हाती येताच बेहेरे यांनी, या धक्कादायक प्रकाराची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून सखोल चौकशीची मागणी केल्याचे समजते. आणि एकंदर या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या शेगाव येथील अधिवेशनास जाण्याचे टाळल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूरप्रमाणेच शेगावलाही मुख्यमंत्री अधिवेशनास येणार असल्याचे सांगत गर्दी जमविण्याचा शेम..शेम.. आणि कंपुचा प्रयत्न होता. अनेक जिल्ह्यात तर अधिवेशनाच्या तयारीचे आणि जाण्याचे निमित्त करून अनेक कथित नेत्यांनी हात धुवून घेण्यास सुरुवात केली होती. पण मुख्यमंत्री या अधिवेशनास येणारच नसल्याने यांच्या चमकोगिरीचा प्रयत्न उधळला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनास येण्याचे तर टाळले आहे, पण यानिमित्ताने शेम..शेम..ने चालवलेली आर्थिक अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.

एकाच बँकेत खाते ठेऊन सुरळीत व्यवहार करण्याऐवजी अत्यंत संशयास्पदरीत्या विविध बँकांच्या विविध खात्यांमधून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे. मुंबै बँकेतील खाते क्र. 1006000015
या खात्याबरोबरच बँक ऑफ महाराष्ट्रच्या फोर्ट शाखेतील खाते क्र. 20106604970, बँक ऑफ इंडियाच्या खाते क्र. 001720110001005 अशा विविध बँकांत विविध खाती या परिषदेच्या नावावर असून यात अत्यंत संशयास्पद व्यवहार करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेच्या या खात्यातून किरण नाईक आणि विनायक चौगुले यांच्या नावे मोठ्या नगदी रकमा उचलण्यात आल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या नावाशी आमचा काहीही संबंध नाही असे सोयीनुसार सांगणाऱ्या शेम..शेम.. आणि कंपूने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि मराठी पत्रकार परिषद अशा दोन्ही संस्थांच्या नावे हे लाखों रुपयांचे व्यवहार केले आहेत. या घोटाळ्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी आता दुसरेच काहीतरी तुणतुणे वाजवून बनवाबनवी न करता, शेम..शेम..ने लाखो रुपयांचे नेमके काय काय केले याचा इत्यंभूत हिशेब देणे अपेक्षित आहे.

-एक सच्चा पत्रकार
14. 08. 2017
------------------------------------------

पोस्ट क्र. ३ 
(एस. एम. देशमुखच्यावतीने देण्यात आलेले उत्तर)विनम्र निवेदन

मित्रांनो,

मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन तसेच इतर कार्यक्रम असले की काहीतरी करून अपशकून करण्यासाठी काही नतद्रष्टांच्या विध्वंसक शक्ती  सक्रीय होत असतात , त्या यावेळी ही झाल्या आहेत.

विविध कपोलकल्पित आरोप करून बुध्दीभेद करण्याचा या मंडळींचा प्रयत्न आहे. यामध्ये जसे काही 'लुच्चे' पत्रकार आहेत तसेच काही विविध गंभीर गुन्हे केल्याने तडीपारीची कारवाई झालेले गुन्हेगार, आणि जातीयवादी पत्रकार देखील आहेत . दररोज वेगवेगळ्या पोस्ट टाकून सभ्रंम निर्माण करण्याचं कारस्थान यामागं आहे. ही सारी मंडळी विविध स्वार्थी आणि मतलबी कारणांनी दुखावलेली असल्याने ती संस्थेवर सूड उगवायचा प्रयत्न करते आहे. मात्र होणार्‍या आरोपात कोणतेही तथ्य नसल्यानं ती उघडी पडणार आहेत यात शंकाच नाही.

ताजी पोस्ट ही परिषदेमध्ये आर्थिक गोंधळ असल्याबद्दलची आहे. या निवेदनाव्दारे 
मी स्पष्ट करू इच्छितो की, परिषदेचा आर्थिक व्यवहार अत्यंत चोख आणि पारदर्शक आहे. परिषदेचे ऑडिट देखील नियमितपणे केले जाते. परिषदेचा सारा कारभार केवळ जिल्हा संघांकडून येणार्‍या वर्गणीवरच चालतो. त्यामुळं फार उलाढाल नसतेच. गेल्या दोन वर्षात कोणाकडूनही कवडीचीही देणगी घेतलेली नाही. काही वर्षापूर्वी तीन दात्यांनी देणगी पोटी तीन लाख रूपये दिले होते. त्यातून भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार, प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार आणि दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार दिला जातो. परिषदेने पुरस्कार सुरू करावेत यासाठीच या देणग्या होत्या आणि त्यानुसार नियमित पुरस्कार दिले जातात. यंदाचा सोहळा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि मा,नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपुरात पार पडला. त्या अगोदर ठाण्यात मा.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार वितऱण सोहळा पार पडला होता. या व्यतिरिक्त परिषदेला कोणीही देणगी दिलेली नाही. परिषदेने ती घेतलेली नाही. त्यामुळं परिषदेला भरपूर देणग्या मिळतात हा जावईशोध या गणंगांनी कोठून आणि कसा लावला माहिती नाही.

पुणे येथिल एका सीए फर्मकडून नियमित ऑडीट करून घेतले जाते.. त्यासंबधी चार्टर्ड अकौन्टंट फर्मचे पत्रही आणि ऑडीट रिपोर्ट परिषदेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. . शिवाय हे हिशोब प्रत्येक अधिवेशनात होणार्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादरही केले जातात. ज्यां सदस्यांना हे हिशोब पाहायचे आहेत त्यांच्यासाठी ते शेगाव अधिवेशनात उपलब्ध करून दिले जातील. धर्मदाय आयुक्तांकडं काही विषय प्रलंबित असल्यानं त्यांच्याकडून माहितीच्या अधिकारात ते पत्र दिलेले असू शकते. त्यामुळं अधिवेशनाच्या काळात जाणीवपूर्वक 80 वर्षाच्या संंस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय तो हाणून पाडला पाहिजे. मा. मुख्यमंत्र्यांच्या नावानं चार ओळीचं पत्र पाठविलं म्हणजे आरोप खरे आहेत असं होत नाही. प्रचार करण्यापुरतं ते ठीकय पण आरोप कोण करतोय याचीही दखल लोक घेत असतात. ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे अशा आणि ज्यांच्यावर दंगली घडविणे,जातीयवाद पसरविणे आदि गंभीर आरोप आहेत अशा कथित पत्रकाराच्या  पत्रावरून सरकार परिषदेच्या कारभाराची चौकशी करणार असेल तर आमची त्यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारी आहे.

आपले नेतृत्व एवढे पारदर्शक आणि स्वच्छ आहे की, जेथे एस. एम. देशमुख आहेत तेथे भ्रष्टाचाराला थारा नाही हे राज्यातील सर्व पत्रकारांना माहिती आहे. तरी ज्यांच्यावर तडीपारीची कारवाई झालेली आहे , ज्यांच्यावर दंगली घडविणे, जातीयवाद पसरविणे आदि गंभीर आरोप आहेत अशा स्वार्थी आणि मतलबी लोकांच्या रिकामटेकदया पोस्ट ने विचलित होण्याचे  कोणते कारण नाही. धन्यवाद.


मिलिंद सिताराम अष्टीवकर,
कोषाध्यक्ष
मराठी पत्रकार परिषद मुंबई 
Cell 9422071100
14.08.2017.

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

पत्रकारांनी समाजातील चुकीच्या बाजूंवर प्रहार करावा -फडणवीस

मुंबई-   पत्रकारांनी समाजातील चुकीच्या बाजूंवर प्रहार करत त्यात दुरुस्ती करण्याचे काम केले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

 मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार दै. पुण्यनगरीच्या मुख्य संपादक श्रीमती राही भिडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर उपस्थित होते.

 आचार्य अत्रे यांच्याविषयी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, अत्रे यांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे कोणत्याही गोष्टीत त्यांचे स्वत:चे मत असायचे. एखाद्या विषयावर ठामपणे,नीडरपणे मत मांडण्याचे काम करणारी माणसेच समाजामध्ये परिवर्तन करु शकतात. आचार्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात चालवली. 

मुख्यमंत्री म्हणाले, राही भिडे यादेखील पत्रकारितेमध्ये बेधडकपणे काम करतात.  त्यांनी नेहमीच सामान्य माणसाचा आवाज आपल्या लेखनीने ताकदीने शासनापर्यंत, समाजापर्यंत नेण्याचे काम केले. त्यांनी ज्या- ज्या ठिकाणी काम केले तेथे ठसा उमटवण्याचे काम केले. आज पत्रकारितेच्या क्षेत्रात बदल होत आहे. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आज बातमीदारी गतिमान झाली आहे. पत्रकारितेतून समाजाचे प्रतिबिंब तयार झाले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

  राही भिडे यांनी आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, सर्व सामान्यांची बाजू घेऊन लेखनी चालवल्यास पत्रकारिता फुलत जाते. आपल्या राज्यात सर्वसामान्य माणसाला नेहमीच पत्रकारांचा आधार वाटत आला आहे. शासनावर अंकुश ठेवण्याचे कामही पत्रकारितेने केले आहे. पत्रकारितेत आता बदल होत आहेत. चिंतनशील, वैचारिक पत्रकारिता आता राहिली नाही अशी खंत व्यक्त करुन श्रीमती भिडे म्हणाल्या, सेकंदा सेकंदाला अपडेट्स देणारी इन्स्टन्ट पत्रकारिता असे आज पत्रकारितेचे स्वरुप झाले आहे. स्वरुप बदलले तरी सर्वच घटकांनी समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले पाहिजे.

   पत्रकारिता प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झालेला विद्यार्थी तन्मय प्रमोद शिंदे यास ज्येष्ठ पत्रकार दिनकर साक्रीकर पारितोषिक (दिनू रणदिवे यांच्या देणगीतून) आणि ज्येष्ठ पत्रकार मनोहर देवधर पारितोषिक (मनोहर देवधर यांच्या पत्नी सुलभा मनोहर देवधर यांच्या देणगीतून) वेब जर्नालिझम परीक्षेत‍ द्वितीय श्रेणी प्राप्त झालेली विद्यार्थिनी कविता नागवेकर यांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपयांचे पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच पत्रकार संघाच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

   संघाचे अध्यक्ष श्री. वाबळे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यवाह श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. श्री. वाबळे आणि श्री. चव्हाण यांचाही माधव रानडे यांच्या देणगीतून सत्कार करण्यात आला.

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

उघडा डोळे , बघा नीट !

मुलींची 'तस्करी' लातूरची 'मस्करी'  लातूरच्या बदनामीला जबाबदार कोण?

आज लातूरच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. शैक्षणिक पंढरी असलेल्या लातूरला काळिमा फासण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणाऱ्या मंडळींना थोडीशीही लाज वाटली नाही, बिनधोकपणे मिसिंग केसेसला तस्करी नाव देऊन स्वतःची लाल करून घेणाऱ्या एकालाही बातमीची सत्यता तपासावी वाटू नये हे लातूरचे दुर्दैव आहे. घटना घडते काय?आम्ही सुतावरून स्वर्ग गाठतो काय?पाठीमागे काय होत आहे यामुळे कोणाची बदनामी होईल याची कसलीही तमा न बाळगता लातूरची बदनामी करण्याचा अधिकार कोणी दिला?आज शांत असलेल्या लातूरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून महाराष्ट्रभर 300 मुलींची तस्करी झालीय असा आरोप करताना डोळे उघडे का राहिले नाहीत,की उगाच पुढे पळायच्या नादात ढुंगणाचे सुटून रस्त्यावर पडलेलेही त्यांना दिसले नाही,काय म्हणावे अशाा बदनामी करणाऱ्या महाभागांना हा प्रश्न सतत मनामध्ये येत आहे.सत्य ऐकल्यानंतर रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही,शांत लातूरला अशांत करण्याचा ठेका उचललेल्या या सगळ्यांवर लातूरकरांनी केसेस दाखल केल्या पाहिजेत.

      ३०० हा जादुई आकडा शोधून ढोलकी वाजवणाऱ्या या ढोलकी पटूने थोडा तरी लातूरचा विचार करायला हवा होता.उचलली जीभ आणि लावली टाळाला जे म्हणतात ते अगदी खरे आहे.खोटे पचवून वरून करपलेली ढेकर देणाऱ्या अजीर्ण पोटयाला लातूरकरांची बदनामी करताना हगवण का लागली नाही असे वाटू लागले आहे.
घटना घडली अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्न लावून दिल्याची,त्यामध्ये पोलिसांनी 10 लोकांना अटक केले,यातली सूत्रधार जी पूर्वाश्रमीची काँग्रेसची आणि आता भाजपची असलेल्या पूनम शहाणेसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले,ही महिला वधुवर सूचक मंडळ चालवते.तिने केलेल्या चुकीला तर माफी नाहीच पण काही जणांची ही बातमी मिसिंग झाली आणि त्यांनी,डोळे उघडे न ठेवता पोलिसांना आपल्याकडे किती मिसिंग आहेत हे आकडा विचारला,कुठल्यातरी अर्धवटरावानी 300 चा आकडा मिसिंगचा सांगितला,याने चक्क मिसिंगला तस्करीचे रूप देऊन मागच्या घटनेशी अर्थ लावून सगळीकडे गाजावाजा केला आणि 300 महिलांची तस्करी सांगून टाकली. पोलीस सांगतात हे मिसिंग आहे,तेही 300 नसून 180 महिला मिसिंग आहेत.त्यातील 154 महिला सापडल्या असून 26 महिला मिसिंग आहेत.तस्करी किंवा गायब हे शब्द ऐकूण लातूरकरांची झोप उडाली आहे,पोलीस हैराण झाले आहेत,विधानसभेत रणकंदन माजले आहे,आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यात श्रेयवादाची चढाओढ लागली आहे, किमान जिल्ह्याची इतकी बदनामी होताना पोलिसांचा विचार घेण्याचे सौजन्य कुणालाच वाटू नये याचेच नवल वाटत आहे.
हा जिल्हा शांत आहे,शैक्षणिक परंपरा आहे,बाहेरून मुली येथे शिकायला येतात,अनेक पालक चिंतीत होणार याची थोडीही चिंता असू नये,याचीच कमाल वाटत आहे.बिनधास्तपणे 300 मुली गायब सांगताना तुमची जीभ का झडली नाही,जर या शहरात इतक्या मुली गायब झाल्या असत्या तर किती गजहब माजला असता पण ही लातूरची बदनामी होताना आम्ही मात्र निमूटपणे पाहत बसलो आहोत,अनेक गोष्टीची चर्चा करून सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या महावीरांनी लातूरची खोटी बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,आणि पोलिसांनी कसलीही तमा ना बाळगता लातूरची बदनामी थांबवली पाहिजे,आज जिल्हाभर लोक भयभीत आहेत मुली घरातून बाहेर पडावे की नाही या दहशतीखाली आहेत,अश्यावेळी महाराष्ट्रभर होणारी बदनामी थांबायला हवी,या शहरात मुली देणारे विचार करतील,येणाऱ्या मुलीही विचार करतील,या सगळ्यांना दिलासा मिळायला हवा,खोट्या प्रतिष्टेसाठी,प्रसिद्धीसाठी,अथवा बातम्यांच्या वॉरमध्ये लातूरला वेठीस धरू नका आणि बदनामी थांबवा...
- संजय जेवरीकर, ज्येष्ठ पत्रकार 
 .....
 पाहा व्हिडीओ

 

फेसबुक वर शेअर करा

Facebook