> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

एबीपी माझा नंबर १ तर साम नंबर २

मुंबई - आज गुरुवार. मागील आठवड्याचा टीआरपी आज प्रसिद्ध झाला. एबीपी माझा नंबर १ तर साम टीव्ही नंबर २ ठरले. पण दोघांत फक्त पॉईंट सहाचा फरक आहे. 


रविवार, २६ ऑगस्ट, २०१८

डिजिटल मीडियावर विशेष चर्चासत्र

पुणे -  प्रिंट, टीव्ही मीडियानंतर आता वेब मीडियाचा उगम झाला आहे. डिजिटल मीडिया, न्यू मीडिया, सोशल मीडिया हे त्याचे वेगवेगळे अंग आहेत. वेबसाईट, अँपवर बातम्या अपलोड  कश्या कराव्यात ? युट्युब चॅनल कसे करावे ? त्याचे नियम आणि अटी काय आहेत ?   गुगल AdSense settings कशी करावी ? वेबसाईट, अँप, युट्युब, सोशल मीडियातून पैसे कसे मिळवावेत   या सर्व बाबीवर तीन तास मागर्दर्शन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असलेले आणि डिजिटल मीडियाचा १० वर्षाचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे ( संपादक महाराष्ट्र लाइव्ह आणि उस्मानाबाद लाइव्ह ) हे मार्गदर्शन करणार आहेत. पुणे येथील कॅलिड्स अकॅडमी, नळ स्टॉप, पुणे येथे हे चर्चासत्र लवकरच होणार आहे. त्याची नावनोंदणी सुरु आहे. ( वेळ सकाळी ११ ते दुपारी २ ) प्रतिव्यक्ती शुल्क ८०० रुपये ...
संपर्क -7387994411

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

राजा माने लोकमतचे राजकीय संपादक

सचिन जवळकोटे सोलापूरचे निवासी संपादक
 
 औरंगाबाद -  राजा माने यांच्या पदाचा आणि ठिकाणाचा घोळ अखेर मिटला आहे.  माने यांना बाबूजीनी लोकमतचे राजकीय संपादक म्हणून मान्यता दिली आहे. 15 दिवस औरंगाबाद आणि 15 दिवस मुंबई असा प्रवास राहणार आहे.

काल औरंगाबादेत बाबूजींनी लोकमतच्या सर्व आवृत्तीच्या संपादकांची बैठक घेतली, त्यात ही घोषणा करण्यात आली.

राजा माने गेले काही वर्षे सोलापूर आवृत्तीचे संपादक होते, त्यांची बदली करण्यात  आल्यानंतर कोणते पद मिळणार आणि आणि कोणते ठिकाण राहणार ? याबाबत मानबिंदूमध्ये उत्सुकता होती.


सचिन जवळकोटे निवासी संपादक 

सोलापूरात राजा माने यांच्या जागी आलेल्या सचिन जवळकोटे यांना निवासी  संपादक करण्यात आले आहे, त्यांच्यावर संपादक म्हणून कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांचे नियंत्रण राहणार आहे. 

जवळकोटे हे सातारा आवृत्तीत  गेल्या 5 वर्षांपासून आवृत्ती प्रमुख होते, ते मूळचे  सोलापूरचे आहेत .तेव्हा आणि आताही संपादक म्हणून वसंत भोसले यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. जवळकोटे यांना थोडीफार पदोन्नती मिळाली आहे. 

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन

नवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. नय्यर यांना 2015 मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता. ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संपादकपद भूषविलेले नय्यर पत्रकारितेच्या आणीबाणीविरोधातील लढाईचे प्रतीक बनले होते. त्यावेळच्या सरकारी हस्तक्षेपाविरोधात निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.
जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ता, लेखक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी जवळपास 14 भाषेतील 80 वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले आहे. तसेच, आणीबाणी आणि भारत-पाकिस्तानवर पुस्तकही लिहिले आहे. कुलदीप नय्यर यांचा जन्म पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये झाला होता. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी उर्दू रिपोर्टर म्हणून काम केले.
पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात कुलदीप नय्यर हे उर्दू वर्तमानपत्रासाठी काम करायचे. दिल्लीतील ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्राचे ते संपादक होते. मानवाधिकार कार्यकर्ते आणि शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जायचे. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट १९९७ ते राज्यसभेत खासदार म्हणून गेले होते. १९९० मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मानव हक्क चळवळीचे कार्यकर्ते असणारे कुलदीप नय्यर 1996 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य होते. याशिवाय, त्यांना 1990 मध्ये ब्रिटनमध्ये त्यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, 1997 मध्ये राज्यसभेत खासदार म्हणूनही त्यांना पाठविण्यात आले होते.
कुलदीप नय्यर यांनी डेक्कन हेराल्ड, द डेली स्टाल, द संडे गार्डियन, द न्यूज, द स्टेट्समन, पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्युन, डॉन आदी वृत्तपत्रांमध्ये लेखन केले आहे. तसेच, बियाँड द लाइन्स, विदाऊट फिअर: द लाइफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग, डिस्टंट नेबर्स, सप्रेशन ऑफ जजेस, इंडिया आफ्टर नेहरू, इंडिया-द क्रिटिकल इयर्स, द जजमेंट-इनसाइड स्टोरी ऑफ द इमर्जन्सी इन इंडिया, वॉल अॅट वाघा यासारख्या विविध पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे.

पत्रकार संरक्षण कायदा गेला कुणीकडे ?

नाशिक - झी २४ तासचा रिपोर्टर किरण ताजणे यास परवा काही गुंडानी बेदम मारहाण केली. या प्रकरणी  किरण ताजणे हा पोलीस स्टेशनमध्ये जाण्याअगोदरच गुंड पोलीस स्टेशनमध्ये हजर होते. तेथील पोलीस निरीक्षक  किरण ताजणे याची फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल झाला पण मुख्य आरोपीस अदयाप अटक नाही.

राज्यात पत्रकार / रिपोर्टर यांना काम करताना जीव मुठीत धरून काम करावं लागत आहे. विरोधात बातमी आली की पत्रकारांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होवून दोन वर्ष होत आली तरी त्याची अंमलबजावणी झाली नाही. श्रेय घेणारे मात्र आता तोंड लपवून फिरत आहेत,

जबाब दो ?

> पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होवून दोन वर्ष झाली तरी अंमलबजावणी का  नाही ?

> शिवशाही बसमधून पत्रकारांना मोफत प्रवास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती म्हणे ? त्याचे काय झाले ?

> पत्रकारांना पेन्शन मिळणार होती ? घोडे कुठे पेंड खात आहे ?

#  फक्त घोषणा आणि घोषणा ... अंमलबजावणीच्या नावाने शिमगा !

श्रेय लागणारे अधिस्वीकृती पत्रिका समितीचा राजीनामा देणार की  पदाला चिटकून राहणार ?

सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

चांगल्या समाजासाठी चॅनलची का होते दुर्दशा ?

मुंबई - काही लोकांना यश पचत नाही.  चांगल्या समाजासाठीच्या लोकांचेही असेच आहे. चॅनेल सुरू होऊन १० वर्षे झाली. पण नंबर वन वर पोचता आणि पोचले तर टिकता येत नाही. गेल्या आठवड्यात चॅनेल नंबर वन वर आला आणि स्टाफने लंडन टॅक्सी हॉटेलमध्ये पार्टी केली. बहुतेक पार्टीची धुंदी  उतरायला वेळ लागला. धुंदी उतरेपर्यंत चॅनेल पुढच्या आठवड्यात १ नंबर पोजिशनवरून घसरलेला होता.

चांगल्या समाजासाठी कडे सर्व काही आहे. चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, चांगला पगार, चांगले नेटवर्क. एकच गोष्ट चांगली नाही. तिथला स्टाफ. खास करून आउटपुटचा. मीडियातले काहीही न कळणारा बेदम तिथे नागोबासारखा बसला आहे. आला नविन बॉस, लाव त्याला मस्का. प्रत्येक नविन बॉसच्या कानाला लागून त्याच्या मर्जीत राहण्याचे धंदे बेदम करतो. आउटपुटचा सर्व स्टाफ त्याला त्रस्त आहे. बरे हा काही आउटपुटचा हेडपण नाही. त्याची पोजिशन आउटपुट हेड अशी नाहीच. तो  स्वघोषित आउटपुट हेड आहे. चिलेश बरे तिथे लागल्यानंतर तो बेदमला काढणार होता. एरवी चिलेश आणि कमकुवत यांच्यात विस्तव पण जात नाही. पण बेदम हा खायला काळ आहे, यावर मात्र चिलेश आणि कमकुवत दोघांचेही एकमत होते. कमकुवत चांगल्या समाजासाठीचा मेन होता तेव्हा बेदमला कायम नाइट शिफ्टला ठेवा, असे म्हणायचा. बेदमच्या नशिबाने दोघेही तिथून गेले. 

त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार विनोद  यांनी मोठे निर्णय घेतले. मीडियातला अमिताभ बच्चन अशी ओळख असलेल्या गुणी पण प्रचंड तापट जरबला चॅनेलमध्ये आणले आणि त्याला मोठी पोजिशनल दिली. खूप वर्षापूर्वी अजित साही यांना दिलेली पोजिशन त्यांनी बच्चनला दिली.  टीव्हीच्या पहिल्या फळीचा जुना पत्रकार असलेला जरब उर्फ बच्चन आल्यानंतर चॅनेलमध्ये सुधारणा दिसायला लागली. पण बच्चनने बेदम आणि नंतर आलेल्या टकलू हैवानचे काळे कारनामे कापडींपर्यंत न पोचवणे त्याला महागात पडले. वेळप्रसंगी चॅनेलच्या भल्यासाठी रेड्डी यांनाही नडणाऱ्या बच्चनला त्याचा अतिप्रामाणिकपणा आणि तत्वनिष्ठा नडली.  अंतर्गत राजकारणाची किळस बाळगणाऱ्या बच्चनने तडकाफडकी संपादकपदाचा राजीनामा टाकला. त्याच्याबरोबर येऊ पाहणाऱ्या अनेकांना त्यांनी चॅनेलमध्ये थांबवून ठेवले. तरीही इनपुट आणि आउटपुटमधली चांगली माणसे आता  चांगल्या समाजासाठी ला बायबाय करीत आहेत. 

दोन ओळी धड लिहिता न येणारा, दोन चमचे आणि सिरीयसली काम करणारे  दोनतीन असाइनमेंटवाले यांच्या जीवावर उड्या मारणारा, इनपुट टीममध्ये स्वतःला मोठा समजणारा सोहन लाळखोटे हा बेदम आणि  टकलू हैवानच्या ग्रुपमध्ये गेला आणि कारस्थाने सुरू केली. दिवसरात्र मरमर मरणाऱ्या रिपोर्टरना तो वाटेल तसं बोलतो. इनपुटला वाली नसल्यामुळे आणि रिपोर्टर लोकांच्या नाराजीमुळे शेवटी कर्मा यांना इनपुटची तात्पुरती जबाबदारी (हेडची पोस्ट नाही) सोहन लाळघोटे सांभाळत आहे, असा मेसेज टाकावा लागला. त्यातल्या तात्पुरत्या शब्दामुळे रिपोर्टर समाधानी झाले आहेत. बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आणि विविध कार्यक्रमाच्या आयोजकांना बातम्यांसाठी सोहन लाळघोटेला संपर्क करा, असे सांगणेही रिपोर्टरच्या जिवावर येते.  सोहन लाळघोटे हा असाइनमेंटमध्ये कमी आणि आउटपुटमध्ये जास्त असतो. काही ठिकाणी स्ट्रिंजरकडून त्याने पाकिटंही मागितली आहेत. याबाबतीत काही स्ट्रिंजर लोकांनी सोहन लाळघोटेची तक्रारसुद्धा केली आहे.   

आउटपुटमधल्या टकलू हैवानने स्वतःची सवय इथेही सोडली नाही. आपण फार टॅलेंटेट आहोत असे तो भासवतो. पण या माणसाकडे बेसीक नॉलेजपण नाही. गंभीर म्हणजे सहकारी महिलांकडे तो कायम वाईट नजरेने पाहतो. आधी काम केलेल्या प्रत्येक चॅनेलमध्ये त्याने हेच धंदे केले. त्यानेही बेदमला सतावून सोडले आहे. लोकांना दाखवण्यापुरते बेदम आणि टकलू हैवान तुझ्या गळा माझ्या गळा गातात. पण खाजगीत दोघेही एकमेकांची वाट कशी लावायची, याचे प्लान आखत असतात. बेदम हा त्याचा खास विदेशपांडेला खाजगीत टकलू हैवानची वाट कशी लावायची, हे सांगत असतो. तर टकलू हैवान हा नविन बॉस कर्मा यांच्या नजरेत बेदमच्या चूुका त्याच्या नकळत आणून देतो. एका प्रतिस्पर्धी चॅनलच्या प्रोड्युसरशी नाजूक संबंध असलेला टकलू हैवान चांगल्या समाजासाठी ची स्ट्रॅटेजी तिच्याशी शेयर करतो. 

बाकीचे म्हणजे बापू, टुमीत, चिल्लास विसरले, कमळाबाई  बेरड  वगैरे मंडळी असून नसल्यासारखी आहेत. बापू स्टाफचं वेळापत्रक कसेही लावतो. सुट्ट्या देत नाही. एकदा या बापूला रोहीत विश्वकर्मा यांनी नाइट शिफ्टमध्ये झोपलेले पकडले. टुमीतकडे काही दिवसांसाठी इनपुटचे काम सोपवले. पण त्याने तिथे बावळटपणा दाखवला.  
सध्या  चांगल्या समाजासाठीचे मायबाप कर्मा आहेत. त्यांनी अमराठी असून मराठी चॅनलची प्रतिष्ठा वाढवायचा प्रयत्न केला. पण त्यांना स्टाफची साथ मिळेना झाली आहे. बेकामच्या बेदममुळे लोक चांगल्या समाजासाठी मध्ये यायला नकार देत आहेत. माणसं पाहिजे अशी जाहिरात देण्याची वेळ चॅनलवर आली ती बेदममुळे हे विनोद यांनाही पटले आहे. उशीरापगार देणाऱ्या जय महाराष्ट्रमध्ये जाऊ, पण  चांगल्या समाजासाठी नको असं मीडियातले नवे आणि जुने लोक बोलत असतात. 

महत्त्वाचे म्हणजे चांगल्या समाजासाठीच्या या चॅनलने बातम्या दाखवण्यात खूप घोळ घालूनसुद्धा चॅनेलचे मालक रवी प्रकाश यांनी सर्वांना पगारवाढ दिली. पण पगारवाढ झाल्यानंतर लगेच स्टाफने अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनाच्या महत्त्वाच्या बातमीत घोळ घालून मालकाला तोंडात बोटे घालायला लावली. 

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

उतावीळ मराठी वृत्तवाहिन्यांची गांजेकस बातमीदारी

मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये नेमके कोणते पत्रमहर्षी काम करतात,ते कोणत्या गुरूंचे चेले असतात आणि त्यांची मराठी मायबोली नेमकी कोणत्या 'आळी'त राहते ? असे घनघोर प्रश्न पडून डोके चक्रावून जावे आणि स्वतःच्याच हाताने स्वतःचे केस उपटावेत असे एकाहून एक अकलेचे तारे सध्या विविध मराठी वृत्त वाहिन्यांवरून तोडले जात आहेत.मराठी भाषेची तर अक्षरशः ऐशी तैशीच केली जाते.शिव सेनेचा उल्लेख चक्क 'शव सेना' करण्यापासून बलात्कार-खुनासारख्या घटनांमध्ये पीडित महिलेचे फोटो प्रकशित करू नयेत असा दंडक असताना पीडित महिलेच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा विकृतपणा तर राजरोस केला जातोच,त्याहून हद्द म्हणजे घटनेशी दुरान्वयाने संबंध नसलेल्या नामसाधर्म्य असलेल्या दुसऱ्याच महिलेचे फोटो फ्लॅश करण्याच्या गाढवचुका करून पुन्हा त्या बद्दल निर्ल्लजपणे हसत ' दिलगिरी'ची जिलेबी घोटवण्याचा बेशरमपणा ,वाहिन्यांचे ' समालोचट'करतात तेव्हा या 'पिंडीवर चढलेल्या विंचवांना वहाणेनेनेच बडवायला पाहिजे.दुसरा उपायच नाही याची खात्री पटल्याशिवाय राहत नाही.
     मराठी वृत्तवाहिन्या म्हणजे निव्वळ बेशरमाची बागाईतदारी आहे.कशी ? त्याचा प्रत्यय परवा माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधन वार्तेच्या निमित्ताने आला.वाजपेयी गेल्या सात ते आठ वर्षांपासून दुर्धर अशा मधुमेह,स्मृतीभंश यां सह आणखीही काही व्याधी आणि आजारांनी ग्रस्त होते.स्वतःचीच ओळख विसरलेल्या वाजपेयी यांची स्थिती जवळपास मरणासन्नच होती.असे असतानाही त्यांचे जेष्ठत्व आणि त्यांच्याबद्दलच्या श्रद्धा सद्भावना म्हणून फक्त त्यांचा पक्षच नव्हे तर अवघा देश त्यांच्या जीवितासाठी प्रार्थना करीत होत्या.काय होणार ? किंवा काय झाले असेल ? याचा सर्वानाच अंदाज आला होता.पण मढ्याच्या टाळूवरचेही लोणी चाटण्याची एक हापापलेली बुभुक्षित वृत्ती असते.नागड्याना औचित्याचे भान कोठून येणार ? त्यात पुन्हा कमरेची सोडलेली कुणाची लंगोटी वेशीच्या वरच्या टोकाला सर्वात आधी पोहचते या साठी अहमहमिका.त्यातून  मग एम्स रुग्णालयाकडून वाजपेयींच्या निधनाची अधिकृत सूचना जारी होण्याआधीच काही वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींच्या निधनाची बातमी झळकावून टाकली.फक्त एबीपी माझा,सारख्या व्यावसायिक वृत्तवाहिन्यांनीच नाही तर सह्याद्री सारख्या सरकारी वाहिन्यांनी देखील ही " श्रावणी" केली.त्याहून कहर म्हणजे टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मुखातून स्वतःच्याच मृत्यूचे शोक प्रगटन करण्याचा धक्कादायक प्रकार केला.
      दिवंगत माजी पंतप्रधान आणि जिवंत आजी पंतप्रधान यांचे बाबतीत झालेल्या या चुका केवळ तांत्रिक आणि कंपोझीट मिष्टेक म्हणून कशी खपवून घ्यायची हा प्रश्न आहे.मराठी वृत्तवाहिन्यांच्या या असल्या सवंग प्रसिद्धीसाठी बेभान झालेल्या धंदेवाईक बेजबाबदार उतावीळ आणि गांजेकस पत्रकारितेला फक्त आळा-चापच नाही तर जाब देखील विचारला गेला पाहिजे,आणि त्यानेही नाही सुधारले तर प्रेक्षकांनी त्यांचेवर सामूहिक बहिष्कार घालायला पाहिजे.त्या शिवाय हा  उठवळपणा थांबणार नाही.

----रवींद्र तहकिक
कार्यकारी संपादक,दैनिक लोकपत्र

टीव्ही ९ मराठी , भानावर या !

मुंबई - काल अटलजींच्या निधनाचे वृत्त चार तास अगोदर देणाऱ्या टीव्ही ९ मराठीने पुन्हा माती खाल्ली आहे. आज त्यांनी चक्क मोदीचे नाव लिहून अक्कलेचे तारे तोडले आहेत. बेदमचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे.

बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

एबीपी माझाला नेटिझन्सने धुतले

मुंबई - भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एबीपी माझाने अँकरच्या पाठीमागील  ग्राफिक्स दाखवताना , त्यात अनेक थोर विभूतींचे फोटो मिक्स केले पण घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो वगळून वि. दा.  सावरकर यांचा फोटो मिक्स केला होता.
त्यावर नेटिझन्सने शिव्यांची लाखोली वाहिली आणि धो - धुतले.त्यानंतर  एबीपी माझा ताळ्यावर आले आणि त्यांनी वि.दा. सावरकर यांचा फोटो काढून  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ऍड केला. तसेच शिव्या डिलीट केल्या.
एका नेटिझन्सने  बेरक्याकडे स्क्रिन शॉट पाठवला आहे.


राजा माने यांची मुंबईला बदलीसचिन जवळकोटे नवे प्रमुख


सविस्तर बातमी वाचा


शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत (वय ६९) यांचे गुरुवारी पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.
महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेची धुरा चार दशके सांभाळताना त्यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना, भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघ यांच्या विविध पदांवर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आशियाई क्रॉस कंट्री, आशियाई अ‍ॅथलेटिक्स, आशियाई ग्रां.प्रि. अ‍ॅथलेटिक्स तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले होते. ‘दै. सकाळ’ वृत्तपत्रात क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असताना सावंत यांनी ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धाचे वार्ताकन केले.

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

झी 24 तास आणि न्यूज 18 लोकमत तोंडावर आपटले

मुंबई : चेंबूर येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) हायड्रोजन टँकमध्ये आज (बुधवार) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे काही किलोमीटरच्या परीसराला हादरे बसले. या स्फोटात 21 जण जखमी झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या दुर्दैवी घटनेची ब्रेकिंग न्यूज चालवताना राहा एक पाऊल पुढे म्हणणारे  झी 24 तास आणि महाराष्ट्राचं महाचॅनल म्हणणारे न्यूज 18 लोकमत चॅनल चक्क तोंडावर आपटले. त्यांनी या घटनेचा Exclusive म्हणून चक्क  फेक व्हिडीओ वापरला , खरं तो व्हिडीओ बाहेरच्या देशातील  सन 2013 मधील घटनेचा असल्याचं समोर आलं आहे.

 
ही  गंभीर चूक लक्षात येताच  झी 24 तासने माफी मागितली आहे  पण न्यूज 18 लोकमतने अजून तरी माफी मागितली नाही. ब्रेकिंग न्यूज सर्वात अगोदर देण्याच्या नादात झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत चॅनल फेक व्हिडीओ वापरत असल्याने त्यांची विश्वासहर्ता लोप पावत चालली आहे.

सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

एबीपीवर मास्टर स्ट्रोक !

एबीपी चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांचा तडकाफडकी राजीनामा का घेण्यात आला तसेच या चॅनलवरील मास्टर स्ट्रोक कार्यक्रम बंद का करण्यात आला ? याचा लेखाजोखा...

ही बातमी वाचा बेरक्या अँपवर 
 

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

एबीपीचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांचा राजीनामा

नवी दिल्ली - एबीपी  न्यूज चॅनलचे व्यवस्थापकीय संपादक तथा मुख्य संपादक मिलिंद खांडेकर यांनी अचानक राजीनामा दिल्याने एबीपी ग्रुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला की त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नवे व्यवस्थापकीय संपादक  म्हणून सहायक व्यवस्थापकीय संपादक  असलेले रजनीश आहुजा यांना पदोन्नती देण्यात आली आहे.

मिलिंद खांडेकर  हे मागील १४ वर्षापासून एबीपी ग्रुपमध्ये कार्यरत होते. हिंदी, मराठी, गुजराथी, बंगाली या चारही चॅनलचे ते  व्यवस्थापकीय संपादक तथा मुख्य संपादक  होते. डिजिटल संपादक पदाचा चार्ज देखील त्यांच्याकडे होता. एबीपी ग्रुप टॉपवर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, पण अलीकडे एबीपीची घसरण सुरु झाली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे एबीपी ग्रुपमध्ये आज भूकंप झाला आहे.

मिलिंद खांडेकर गेल्यामुळे त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले असून, अनेक विकेट पडण्याची शक्यता आहेत. त्यात एबीपी ( हिंदी) महाराष्ट्र ब्युरो आणि एबीपी माझामधील काही लोकांची विकेट जाईल, अशी शक्यता आहे.

महाराष्ट्र नामा

पद्मश्रीच्या पेपरमध्ये फायटिंग !

जागरणची पुन्हा चर्चा ! 

टाइम्स नाऊची मराठी वेबसाईट 

इनाडू वेबसाईटचे रिलॉन्चिंग 

बेदममुळेच चांगल्या समाजात निघाल्या जागा !

आदी बातम्या वाचा बेरक्या अँपवर

Berkya App फेसबुक वर शेअर करा

Facebook