महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा समारोप

जळगाव -समाज माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्रांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना मदत आणि वृत्तपत्रात क्षेत्रात काम करणार्‍या पत्रकारांसह इतर घटकांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन व्हावे या मागणीसाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बंद पडलेल्या पतसंस्थांसाठी आम्ही फेडरेशन उभा केले असुन त्यात विम्याची हमी दिली. याच धर्तीवर प्रसारमाध्यमांसाठीचे महामंडळ असावे अशी पुष्ठीही त्यांनी जोडली.

जळगाव येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे 14 वे राज्य अधिवेशनाचा समारोप कांताई सभागृहात रविवार दि. 9 जून रोजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्‍वास आरोटे उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव पाटील  यांनी पत्रकार संघाच्या मागणीला आपला पाठिंबा असुन शासन दरबारी यावर प्रयत्न करू तसेच  पत्रकार संरक्षण कायद्याला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल अशी ग्वाही दिली.

राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय पत्रकार संघाचे पुरस्कार  वितरण
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात  राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण करण्यात आले असून या वर्षीचा पुरस्कार उत्कृष्ट कार्याचा प्रथम पुरस्कार ठाणे जिल्हा पत्रकार संघ भगवान चंदे, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मराठवाडा विभागातुन बिड जिल्हा पत्रकार संघ वैभव स्वामी, तृतीय क्रमांकाचा विर्दभ पुर्व महेश पानसे यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र गौरव पुरस्कार समाजभुषण प्रमोद अण्णा लबडे, उद्योजक सुरेश भागवत, डॉ भुषण मगर, आरोग्य, रविंद भादाले शिक्षण, डॉ स्वामी शिरकुल समाजभुषण या राज्यस्तरीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.
.