पद्मश्रींच्या कार्यालयात धाकट्या मालकाच्या कानात जादूटोणा करणाऱ्या टिकली चोराने पुन्हा एकदा डाव साधला

मास्तर व नगराच्या प्रमुखाला हाताशी धरून स्वतःचीच थोपटून घेतली पाठ


टिकलीकडून होतेय भगव्याची धुलाई, पद्मश्रींच्या डोळ्यात अंजनाची भुलाई





कोल्हापूर : पद्मश्रींचे कार्यालय वेगवेगळ्या घटनांनी बरबटले आहे. हे सर्वश्रुत असतानाच एक नवीन घटना समोर आली. दहा वर्षांपूर्वी लाल कागदाची भीती घालून तीन लाख रुपये उकळलेल्या टिकली चोर वरिष्ठाने स्वतःचे हात ओले करत पुन्हा एकदा डाव साधत एका पत्रकार कर्मचार्‍याला आपली मर्दानगी दाखवून दिली.


एखाद्या देवाला कोंबड्याचा किंवा बकर्‍याचा बळी देऊन सण साजरा करतात. त्याच पद्धतीने सप्टेंबर महिन्यातील अमेरिका टूर यशस्वी व्हावी आणि समाधान मिळावे यासाठी कर्मचार्‍याचा बळी देण्याचे षडयंत्र टिकली चोर पाटलांनी केल्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली. धाकट्या मालकाचे अज्ञानपण आणि तोंडपाटलांची हुकूमशाही यामुळे सर्वांनीच कानात बोळे घालून तोंडावर बोट ठेवल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, या तोंडपाटिलकी करणार्‍या चोराने नगरच्या एका माजी 'निवासी'ला पाच लाख दे, तुझ्याविरुद्धचे षडयंत्र हाणून पाडतो, अशी बोळवण करण्याचा प्रयत्न केला होता. 


त्या 'निवासी'ने तोंडावर 'नाही' म्हणून सांगितल्यानंतर, या टिकली चोराने त्या 'निवासी'चा बळी घेण्याचा प्रयत्न केला. अखेर वैतागून त्या 'निवासी'ने त्याच्या तोंडावरच राजीनामा फेकून पद्मश्रींना न भेटताच नगरची वाट धरली होती. त्यानंतर नगर आवृत्तीची सुरु झालेली घसरण अजूनही सावरली गेली नाही. आता तर वर्धापन दिनदेखील तुटपुंजा झाला असून, एकही दिग्गज राजकारणी त्यांच्या वर्धापनाकडे फिरकला नाही. शिवाय, कोट्यवधीच्या गमजा काही लाखावर आल्या.


या टिकलीचोरामुळे कार्यालयातील सर्व विभागात गटबाजी बोकाळली आहे. इथे राजकारणाचा धबधबा वाहतोय त्याच पद्धतीने पत्रकारांच्यातही राजकारण सुरू आहे. घात करण्यासाठी ' महान ' षडयंत्र केले 'जयसिंग' राजाच्या नगरातील कार्यालयाची खुर्ची कायम राहावी म्हणून ऐन श्रावण महिन्यात 'शंकराला' बेलाची पाने वाहून 'अमर ' त्वाचे नवस केले. आणि त्यातच 'संतोष' मानण्यात आला. उगाचच 'विजय' मिळाला म्हणून काळू'बाळू'च्या वगनाट्यातून प्रचार केला. या 'विनोदा'चा फायदा त्या टिकलीचोराने उचलला आणि डाव ठेवून घात केला. याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.


हा टिकलीचोर 'पद्मश्रीं'समोर प्रामाणिकपणाचा आव आणत असला तरी, 'पद्मश्री' त्याला पुरते ओळखून आहे. तिथे डाळ शिजत नाही म्हणून, तो 'धाकट्या मालका'च्या कानाला लागत असतो. नगर, सोलापूर, पुण्यातही या टिकलीचोराने आपली खास माणसे पेरली असून, एखाद्याला मुद्दाम वादात अडकवायचे, त्याच्याविरोधात राजकारण पेटवायचे आणि नंतर तुला पाठीशी घालतो म्हणून, त्याला लुटायचे, असा गोरखधंदा हा टिकलीचोर करत असल्याने पद्मश्रींच्या कार्यालयात या टिकलीचोराची तोंडपालिटली जोरात सुरु आहे. व त्याला अनेकजण आर्थिक बळी पडत आहेत.

Post a Comment

0 Comments