पिंपरी-चिंचवड – पत्रकार संघटनेच्या अधिवेशनाला दोन-अडीच वर्षं झाली, पण त्या वेळचं चविष्ट ‘फायनान्सियल मसाला’ अजूनही ताजाच आहे.
मोठ्या धुमधडाक्यात अधिवेशन झालं. राजकारणी, व्यापारी, उद्योजकांना ‘पत्रकारांची मातृसंस्था ’ असं सांगून डावीकडून डावं, उजवीकडून उजवं गोळा केलं – थेट देणग्यांचं रॉकेट उभं राहिलं. संयोजकांनी काही खर्च दाखवून, उरलेलं खिशात टाकलं – म्हणजे 'पत्रकारिता’ पेक्षा प्रॉफिटकारीता जास्त झाली!
पण अस्सल कथा इथून पुढे सुरू होते...
अधिवेशनात राज्याचे तत्कालीन सीएम स्वतः आले! त्यांनी दिलखुलासपणे १० लाख रुपयांची देणगी दिली… पण ही रक्कम कोणाच्या हाती द्यायची, यावरून जत्रेतील पिठणाऱ्या बैलांसारखी फिरफिराट सुरू झाली.
संघटनेच्या खात्यावर घालायचं?
– प्रशासक आहे… मग तोच पैसे हडप करेल, अशी शंका.
पेड लीडरच्या खात्यात?
– टॅक्सचा फास पडेल.
तेव्हा एका चमच्याने आयडिया फेकली –
“२० लोकांच्या खात्यावर प्रत्येकी ४९ हजार घाला! टॅक्स लागणार नाही!”
पण यावर काही अनुभवी मेंढपाळ पत्रकारांनी म्हटलं –
“ही योजना म्हणजे पत्रकारांच्या नावाने उकळलेल्या देणग्यांचा खासगी गरमागरम शेवभाजी!”
मग काय? पेड लीडरने पैसे थेट नगरच्या भाईकडे दिले!
भाईने पैसे व्याज मार्केटमध्ये फिरवले, कमिशन खाल्ले, आणि वाटलं काही विचारलं तर म्हणायचं – "पत्रकारांचं हित जोपासत होतो!"
एवढं चालू असतानाच एका विद्वानाने नवा प्रस्ताव दिला –
“या १० लाखांतून पेड लीडरला गाडी घेऊन द्या! ते गाडी घेऊन महाराष्ट्रभर फिरतील… संघटना वाढवतील!”
पण सावत्र भाऊ पेड लीडरचा योजनेवर तुटून पडला –
“गाडी घेऊन फिरणार की चहा प्यायला?”
असं म्हणून योजना बारगळवली!
आता गंमत म्हणजे… काही दिवसांपूर्वी पेड लीडरने फेसबुकवर फोटो टाकला –
"शेवटी माझ्या मुलाने मला गाडी घेऊन दिली!"
आणि मग पत्रकार संघटनेतील मंडळींचा प्रश्न –
“मग मुख्यमंत्री दिलेले १० लाख गेले कुठं?”
"मुलाने गाडी दिली तर भाईकडचे पैसे कुठं गेले?”
“भाईचा बिझनेस की शेमचा आशीर्वाद?”
शेवटी...
"शेम शेम" म्हणत संघटनेचे सदस्य दिवाळीच्या फराळासारखे एकमेकांना चघळत बसले आहेत...
पार्ट ३ मध्ये:
"गाडीच्या नंबरप्लेटवर ‘CM10’ का? भाईचा कर्जदार कोण? आणि एक व्हॉट्सअॅप ग्रुप का झाला बंद?"
0 टिप्पण्या