जळगाव - दोन वर्षा पूर्वी सकाळ मधून कमी केलेला हा 'ब्लैक कोब्रा' बर्याच वर्षा पासून काही मोजक्या खाउगुल्या फोटोग्राफर चा मुखिया होता. सेटिंग मध्येही त्याचा चांगलाच हातखंड होता. त्याची टीम आणि तो आता कुठल्याही दैनिकात नसताना फोटो पत्रकारांचा अध्यक्ष म्हणून मिरवीत होता मात्र नव्याने आलेल्या फोटो पत्रकारांना हा प्रकार मान्य नव्हता. त्या मुळे दैनिकात सध्या कार्यरत असलेल् या फोटो पत्रकारांनी वेगळी संघटना स्थापन केली. त्या मुळे या 'ब्लैक कोब्रा' चे वर्चस्व कमी झाले. यातच शहरातील एका स्टूडीओ चालकास मारहाण झाली व पोलिसातील हा प्रकार माझ्या मध्यस्तीने मिटवण्यात आला या मुद्याचे भांडवल करून जिल्ह्यातील सर्व प्रेस फोटोग्राफर , स्टूडीओ, इन डोअर, आउट डोअर फोटोग्राफर यांची संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करतोय. संघटनेच्या नवीन कार्यकारणी वर त्याच्या सोबतचे जुने एक दोन सडके आंबे आहेत. 'ब्लैक कोब्रा' व सडक्या आंब्यावर इतर सदस्यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
0 टिप्पण्या