महाराष्ट्रनामा ...

बेळगाव तरूण भारतच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक नरेंद्र कोठेकर यांचा राजीनामा
बेळगाव निवासी सीईओ आणि मुंबई डेक्स इन्चार्जच्या त्रासाला कंटाळून दिला राजीनामा
आता कोठेकर समर्थकांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू...
...........


पुणे जिल्ह्यातील माले (मुळशी तालुका) ग्रामपंचायतीने एका चॅनलवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकलाय...
गावाने वाळीत टाकले अशी खोटी न्यूज पैसे घेवून चालवली...
ज्यांनी निवडणुकीत पॅनल लढवले,त्याला गाव कसे वाळीत टाकेल ?
'मी' पणा केला की,असे असे भोगावे लागते...
आता चॅनल त्याचे 'बारसे' करणार की 'नारळ' देणार,याकडे लक्ष...

..............


औरंगाबाद - जालना जिल्हा प्रतिनिधी संतोष धारासूरकर यांना लोकमतमधून नारळ, मकरंद जहागिरदार नवे जिल्हा प्रतिनिधी....
जहागिरदार (जालना)आणि धारासूरकर (परभणी) पुर्वाश्रमीचे सकाळचे...दोघेही मित्र...पण दोस्त,दोस्त ना रहा....प्यार, प्यार न रहा....
...............

टीव्ही 9 व्हाया न्यूज एक्स्प्रेस मार्गे सुनील बोधनकर Sunil Bodhankar जय महाराष्ट्रमध्ये...
जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आऊटपूट हेड म्हणून बोधनकर यांनी मंगळवारी सुत्रे हाती घेतली...
अभिनंदन आणि शुभेच्छा...
...................