कोल्हापुरात गेल्या एक महिन्यापासून 'लोकमत'ची पोस्टरबाजी सुरू आहे.'आमच्या गळ्यात कोणी पट्टा बांधू शकत नाही',असा मजकूर लिहून पुढारीला अप्रत्यक्ष खिजवणा-या 'लोकमत'ने आता 'पुढारी'वर थेट हल्ला केला आहे.१,६८,५६७ वाचकांसह 'लोकमत' आता कोल्हापुरात 'पुढारी' असा मजकूर असलेले मोठ-मोठे पोस्टर कोल्हापुरात चौकाचौकात झळकल्याने दर्डाशेठ आणि पद्मश्रीमध्ये चांगलाच आखाडा रंगणार आहे.
कोल्हापूर म्हणजे पुढारीचे माहेरघर.७५ वर्षे पुर्ण करणा-या पुढारीला अजूनही कोल्हापुरात तोड नाही.कोल्हापूर,सांगली आणि सातारामध्ये अजूनही पुढारी क्रमांक एकवर आहे.याच कोल्हापुरात दर्डाशेठच्या लोकमतने बारा वर्षापुर्वी पाय टाकले आणि सुरू झाली प्रचंड जीवघेणी स्पर्धा.पुढारी आणि लोकमतमध्ये असलेली ही स्पर्धा वेळोवेळी चव्हाट्यावर आलेली आहे.आता पुन्हा एकदा त्यांला तोंड फुटले आहे.कोणत्या तरी खासगी संस्थेचा हवाला देवून लोकमतने कोल्हापुरात जोरदार पोस्टरबाजी केली आहे.ही पोस्टरबाजी करताना,पुढारीवर थेट हल्ला करण्यात आलेला आहे.
'लोकमत आता कोल्हापुरात पुढारी' असा मजकूर त्या पोस्टरमध्ये असल्यामुळे कोल्हापुरात एकच चर्चेचा विषय झालेला आहे.या पोस्टरबाजीमुळे 'पद्मश्री' संतप्त झाले आहेत.त्यांनी लोकमतला सडेतोड उत्तर देण्यासाठी आपले पैलवान आता कामाला लावले आहेत.त्यामुळे कोल्हापुरात लोकमत विरूध्द पुढारी असा आखाडा रंगण्याची चिन्हे आहेत.