कोकण नाऊ, वाटून खाऊ !

सिंधुदुर्गात सध्या पत्रकारांचेच केबल वॉर रंगलय. कोकण नाऊ या नव्या चॅनलची त्यात दिमाखात सुरुवात झालीय. सिंधुदुर्ग लाईव्ह या धडपड्या ऑनलाईन टिव्ही चॅनलने सध्या चांगलाच जम बसवलाय.. सिंधुदुर्गातल्या डंपर आंदोलनाने सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनेल घराघरात पोहोचले. अर्थात याला सिंधुदुर्गातला इ मिडीयाही जबाबदार होता. प्रस्थापित एकाच नेत्याच्या राजकिय सभा आणि पेड न्युजवर अवलंबून असणा-या या मिडीया बंधूची खास कोकणी पद्धतीत टिका होत होती. पण त्यात सिंधुदुर्ग लाईव्ह चॅनलची गेल्या काहीच दिवसात चांगलीच हवा झालीय. आपलं आता काही खर नाही याच भितीनं ग्रासलेल्या सिंधुदुर्गातील सर्व चॅनलचे प्रतिनिधी एकत्र येत त्यांनी सुमारे 40 लाखाचे फंडीग एकत्र करत एका नव्या चॅनलची घोषणा केली. कोकण नाऊ या चॅनलचे मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरीय इंटरव्ह्युही घेण्यात आले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चॅनलचे लॉचिंग करण्यात आले. आणि चॅनलची हवा व्हावी म्हणून सिंधुदुर्गातील एका राजकिय नेत्याचेच हे चॅनल असल्याचीच ही कुजबूज त्याच्या मैनेजमेंट टिमने व्यवस्थित पेरली. 24 तास, दुरदर्शन, टीव्ही नाईनच्या अधिकृत प्रतिनिधीनी आपणच त्याचे प्रमुख असल्याची हाकाटी पिटल्याने जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचाही जोरदार वर्षाव सुरु आहे. पण एकणूनच हा सगळा प्रकार वाटून खाऊ असल्याची कुजबूज आता जिल्ह्यातल्या प्रिंट मिडीयात रंगू लागलीय. पण एकूणच या सगळ्या स्पर्धेत सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी एकवटले असल्याने लोकल रिपोर्टरकडून कमी पगारात बातम्या घ्यायच्या आणि त्याच बातम्या आपआपल्या चॅनलला पाठवायच्या हा छुपा अजेंडाही राबवला जातोय. आणि त्यासोबतच स्थानिक नगरपंचायतीच्या निवडणुकांना येणारा पैसा दुसरीकडे कुठेच जाऊ नये याचीही जोरदार तयारी घेण्यात आलीय़. पण यासर्वांत कोकण नाऊ, वाटून खाऊ हीच वृत्ती बळावणार असल्याने राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.