महाराष्ट्र १ मध्ये राजीनामा सत्र सुरूच

महाराष्ट् १ मध्ये नवे संपादक येताच चॅनलने चांगले चेहरे गमावले. असाईनमेंटला शिव्या हासडून नम्रता निघून गेली..पाठोपाठ असाईनमेंट डेक्सला खिंडार पडलं. संदीप टिव्ही ९ ला गेला तर विशेष स्टोरीज करणारी ज्योती आता हेल्थ वेबसाईटला स्पेशल स्टोरी करु लागली. नुसत्याच ओरडणाऱ्या सिनियरला कंटाळून टीकरचा प्रणय मशीन सोडून जातोय.तर दुसरीकडे आऊटपूटलाही मोठं भगदाड पडलं. म्हणे सुंबरानकर्ता न्यूजरुममध्येच हेडवर चढला. त्याने मीटींगमध्येही सर्वांनाच चांगलं सुनावलं असं बेरक्याच्या सुत्रांनी सांगितलं. 'काम करणाऱ्यांना तुम्ही बोलू देत नाही' म्हणत मीटींगमध्ये कार्यकारी संपादकाची खरडपट्टी काढल्याचही कळतंय. हे होताच दुसऱ्याच दिवशी राजीनामा टाकून सुंबरानकर्ता पुण्याला परतला. दुसरा सुंबरानकर्ताही अस्वस्थ असल्याचं कळतंय. आऊटपूट, इनपूटला म्यानपावर नसल्याची बोंबाबोंब ज्युनियर करत आहेत. दीड वर्ष होऊनही पगारवाढ नाही.. आर्थिक डबघाईला कंटाळून चॅनलमध्ये राजीनामा सत्र सुरु झालंय. जय महाराष्ट्रला जात असलेला वर्ल्ड वनचा एंकर पगारवाढीच्या आश्वासनानंतर थांबलाय. लेटर परत केल्याने जय महाराष्ट्र संतापलाय. दुसरा एंकरही पगारवाढ शोधत फिरतोय. बातम्या फॉरवर्डींग करणारी गेस्ट कोऑडिटनर नाफडेबाई आऊटपूट हेड भडकल्याने निघून गेली. तर तिकडे प्रोडक्शनचंही तेरा वाजलेत. नव्या संपादकासोबत जंत्री न जमल्याने मंत्रीने राजीनामा टाकला तर लोड वाढल्याने भा.लु. नेहि राजीनामा टाकला. तिकडे पुण्यात ब्युरो अस्वस्थ असल्याचं कळतंय. ब्युरो चीफला काढून टाकणार कळाल्याने तिने सहकाऱ्यांना फितूर करायला सुरुवात केली. हे प्रकरण म्यानेजमेंटच्या कानी गेलंय. यावर मैनेजमेंट ठोस कारवाई करणार असल्याचं कळतंय. दिल्ली ब्युरोनंही राजीनामा टाकला आहे. आऊटपूटची आणखी एकजण टिव्ही९ च्या कल्पना रंगवत आहे. पीसीआरमध्येही बोंबाबोंब सुरु आहे. सिनियर नुसते नावापुरते उरलेत. त्यांनी ही जोपर्यंत पगार मिळत नाहीत तोपर्ढीयंत काम न करण्याचा नि्धार केला आहे. ज्युनियर पुरते वैतागले आहेत.याव्यतिरिक्त आणखी  चार-पाच जणांनी राजीनामे टाकलेत. त्यामुळे च्यानल आतातरी तग धरेल का? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

जाता - जाता

महाराष्ट् १ च्या आर्थिक डबघाईला कंटाळून वागळे चक्क न्यूजरुममध्ये मॅनेजमेंटशी भांडून निघून गेले. ५० हजारी सिनीयरच्या पगारी रोखल्या होत्या. त्यामुळे वागळे नाराज होते. मॅनेजमेंटच्या पायधरणीला न जुमानता वागळेंनी राजीनामा फेकला. ऐन धंद्याच्या वेळी (निवडणुका) वागळे गेल्याने मैनेजमेंटचे धाबे दणाणले. अखेर मैनेजमेंटने आधीच बाशींग बांधून असलेल्या जाधवला कार्यकारी संपादक म्हणून रिपोस्ट केलं. जाधव येताच चॅनलमध्ये पदांचं राजकारण सुरु झालं. त्यामुळे काम करणारा मोठा वर्ग जाधववर नाराज असल्याचं कळतंय. परिणामी चॅनलमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं. सवाल हातात आल्याने चॅनलला जाधवने एका विशिष्ठ जातीचे मुखपत्र बनवले. मोर्चे, आरक्षण राजकीय चर्चा यांच्या पलिकडे  विषय जात नसल्याने मैनेजमेंटकडून पर्याय शोधलं जात असल्याची चर्चा आहे. राजकारणाच्या पलिकडे नव्या संपादकाला काही कळत नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे सवालचा टीआरपी कमालीचा घसरलाय. संपादकाला व्यवसायिक धोरण नसल्याचं ऑफीसमध्ये गॉसीप सुरु झालंय. त्यामुळे काही लक्षवेधी चेहऱ्यांकडे बोलणं सुरु झाल्याच्या बातम्या बेरक्याच्या सुत्रांनी दिल्या आहेत. त्यामुळे कुठला आंबा चॅनल प्रसन्न करतो कळेलच.. तोपर्यंत 'चला चॅनल बदलू या'