मी मराठीचा डब्बाबंद होणार !

लंगडत सुरु राहुन का होइना पण नावापुरत उरलेल्या मी मराठीचा काही दिवसात डब्बाबंद होउ शकतो. काही दिवसांपुर्वी 3 मार्च रोजी दिल्लीच्या एमसीआरच्या कर्मचाऱ्यांनी कित्येक महिने पगार न मिळाल्यामुळे संप पुकारला होता. त्यामुळे गेले अनेक आठवडे मी मराठीवर एकही फ्रेश बुलेटीन जात नव्हता. त्याऐवजी मी मराठीचे काही जुने शो चालवून कसा बसा स्लॉट भरवून काढण्याचे काम सुरू होते. बुलेटीनच जात नसल्याने मी मराठीच्या उरल्या सुरल्या कर्मचारी फक्त ऑफीसमध्ये बसून आहेत. त्यातच आता काही दिवसांपुर्वी कर्मचाऱ्यांचे पीएफ कॉन्ट्रीब्युशन गिळंकृत करणाऱ्या मी मराठीच्या गळ्याभोवती क्षेत्रीय कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने फास आवळला आहे. मी मराठी सोडून गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा केले गेले नाही. यासाठी पीएफ कार्यालयाचे अधिकारी मी मराठीच्या ऑफीसमध्ये धडकले. त्यावेळी विजय शेखर उपस्थित नसल्याने पीएफ अधिकाऱ्यांनी मी मराठीच्या ऑफीसबाहेरील भिंतीवरच नोटीस लावून गेले आहेत. नोटीसची दखल न घेतल्यास शेवटच्या घटका मोजत असलेल्या मी मराठी चॅनलवर टाच येऊ शकते. असं ऐकविण्यात येतंय की, यातल्या बाऊल वॉरकरने त्याला न विचारता एका दुसऱ्या सिनीयरला विचारून सुट्टी घेतल्याच्या कारणावरून शिकाऊ पत्रकाराला ऑफीसमध्ये आलास तर बघुन घेतो, अशी दमदाटीही केली होती. तेव्हापासून अनेक शिकाऊ पत्रकारांनी रामराम ठोकला. कित्येक आठवड्यापासून जुने शो लावून लंगडी वाटचाल करणाऱ्या या चॅनलवर तर आता जुने शो देखील गायब झाले आणि फक्त काळ्या मुंग्या दिसून येत आहेत. इतकं सगळं घडल्यानंतर मी मराठीचा डब्बाबंद काही दिवसात होणार हे निश्चीत,