'फदया फदफदे'ची सद्दी अखेर संपली

औरंगाबाद - भोपाळशेठच्या दैनिकातील फदया फदफदेची सद्दी अखेर संपली  आहे. खुर्चीमुळे चढलेला 'दिव्य' माज संस्थेने क्षणार्धात उतरवला आहे.  राजीनामा द्यायला तयार नसलेल्या, निर्लज्ज व लोचट 'फदया फदफदे'ला 'मराठी' प्रोजेक्टची वाताहत केल्याबद्दल आर्थिक वसुलीच्या लीगल कारवाईचा इशारा दिल्यानंतर तो ठिकाणावर आला. त्यानंतर  त्याने तात्काळ राजीनामा दिला. कंपनीने त्याचा राजीनामा क्षणार्धात स्वीकृत केला आहे.

● 'फदया फदफदे'ला दोन वर्षांपासून सातत्याने राजीनामा देण्यास सुचविले जात होते. मात्र, फदया काही राजीनामा देण्याचे नाव घेत नव्हता. नव्या बदलानंतर फदयाला राजीनामा देण्यासाठी डिसेंबर 2018 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ती उलटून गेल्यानंतरही हा लंपट खुर्चीला चिकटून होता. त्यामुळे त्याचे सर्व अधिकार गोठवून त्याला 50% वेतन कपातीचा दणका देण्यात आला होता. तरीही निर्लज्ज फद्या बाहेर कुणी कुत्रं विचारत नसल्यामुळे तिथेच शेपटी हलवत पडून होता. अखेर संतप्त MD कार्यालयाने त्याला नुकसानीस जबाबदार धरून कायदेशीर वसुली व बडतर्फीची कारवाई करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली. त्याची कुणकुण लागताच फद्याने नावात श्री *'रामा'* असलेल्या एका *'इंटरनॅशनल'* हॉटेलला जाऊन 'स्टेट कमिटी'चे पाय धरले; पण राष्ट्रीय प्रभारी असलेल्या *'नव'* *'नीत'* प्रयोग करणाऱ्या बॉसने फद्याला अक्षरश: *'गुज्जर'* आरक्षण आंदोलनात घुसलेल्या बोगस समाजकंटकांप्रमाणे हाकलून लावले. तिथे फद्याची खरमरीत खरडपट्टी काढताना त्याचे अकलेचे मोजमाप जाहीरपणे करून त्याला त्याची लायकी व कुवत दाखवून देण्यात आली. त्यानंतरही फद्या सुधारला नाही. अखेर आज सायंकाळी त्याच्याकडून सक्तीने राजीनामा नोटीस लिहून घेतली. त्याला लवकरच कार्यमुक्त केले जाईल.

फद्याच्या बगलबच्च्यांसह अनेकांवर गंडांतर

● 'लेकसिटी' मुख्यालयातून सर्वच विभागात 30% मनुष्यबळ कपातीचा फतवा जारी करण्यात आला आहे. भारतात सर्वत्र, सर्व विभागातील अकार्यक्षम व समाधानकारक कार्य नसलेल्या एकूण 30% मंडळींना 31 मार्चपूर्वी नारळ दिला जाणार आहे. संभाजीनगरात 'मोतीवाला'चा करार 31 मार्च 2019 ला संपणार आहे. त्यानंतर एका बडया मल्टीस्पेशालिटी साखळी हृदयरुग्णालयाजवळील छोट्या जागेत कार्यालय शिफ्ट होणार आहे. सध्याच्या तुलनेत तिथे 30% कमी आसनक्षमता आहे. फदया फदफदेच्या डिपार्टमेंटमधील  संभाजीनगर व खान्देश विभागातील त्याचे एजंटस्, पंटर्स व बगलबच्चे यांचीही यादी तयार करण्यात आली आहे. कोणतेही *पुण्य* पदरी पाडून घेण्याच्या भानगडीत न पडता व्यवस्थापन आधी फद्याच्या सुमार पिल्लावळीची घाण साफ करण्याच्या विचारात आहे. या कारवाईत आता अनेकांच्या अंगावर *कापडे* ही शिल्लक उरणार नाहीत. कुणी कोणत्याही *गणेश* मंदिरात जाऊन ईश्वराचे कितीही *चरण* पकडले तरी उपयोग होणार नाही. कुणी कितीही *प्र* खरतेने *दीप* लावले तरी आता उजेड पडणार नाही कारण सर्व कारनामे, भानगडी व सेटिंग्ज एव्हाना वर ध्यानी आल्या आहेत. या सर्वांना *बॅड* असे *गुजर* आंदोलनातील अनुभव लवकरच येणार आहेत. फद्याने सुमार कुवतीची प्यादी व चमची पुढे धकलण्यासाठी, ज्यांच्या-ज्यांच्यावर नाहक अन्याय केलाय, त्या सर्वांना नक्कीच *आनंदा* चे भरते येईल, एव्हढे नक्की !!