एबीपी माझाला दणका , टीआरपी घसरला, चॅनल तिसऱ्या क्रमांकवरमुंबई - वारंवार फेक न्यूज दिल्यामुळे एबीपी माझाला मोठा दणका बसला आहे. विश्वासहर्ता गमावल्यामुळे माझाचा टीआरपी घसरला असून चॅनल चक्क तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहे. तसेच न्यूज १८ लोकमतचा टीआरपी  गेल्या बारा वर्षात प्रथमच 7.5  वर गेला आहे. 

राहुल कुलकर्णी याच्या फेक न्यूज नंतर या चॅनलची  विश्वासहर्ता पार धुळीला मिळाली आहे. तेव्हापासून चॅनलचा टीआरपी पडत चालला आहे. त्यात अँकर प्रसन्न जोशी याचे ... वाक्य, अँकर हर्षदा सकुळ हिने निधनाच्या  बातमीला सकारात्मक बातमी म्हणून दिलेली प्रस्तावना यामुळे हे चॅनल चांगलेच ट्रोल झाले आहे. माझाला अखेर उतरती कळा लागली आहे. 

आज जो टीआरपी  जाहीर झाला आहे, त्यानुसार 
  • टीव्ही ९ मराठी -  27.2
  • साम मराठी - 24.2
  • एबीपी माझा - 22.4
  • झी २४ तास - 17.4
  • न्यूज १८ लोकमत - 7.5
  • जय महाराष्ट्र -  1.2

Post a Comment

0 Comments