मुंबई - एका फेक न्यूज प्रकरणी अटक होवून सुटका झाली तोच राहुल कुलकर्णी याची आणखी एक फेक न्यूज समोर आली आहे. एबीपी माझावर राहुल कुलकर्णी याने १३ एप्रिल रोजी 'कामगारांना मिळणार दोन टप्प्यात पाच हजार रुपये' अशी न्यूज दिली होती, पण ही न्यूज फेक निघाली आहे.
माहिती विभागाचे अजय जाधव यांनी, ही बातमी फेक असल्याचा मेसेज सर्व चॅनल्स, पत्रकार यांना पाठवला आहे.
काय आहे खुलासा ...
खांडेकर आणखी किती चुका पदरात घालणार ?
राहुल कुलकर्णी याच्या अनेक फेक न्यूज समोर आल्या आहेत. फेक न्यूज प्रकरणी नुकतीच त्यास अटक होऊन जामिनावर सुटका झाली आहे, तोच याच कुलकर्णी याची आणखी एक फेक न्यूज समोर आली आहे. संपादक असलेले राजीव खांडेकर या राहुल कुलकर्णी याच्या चुका किती दिवस पदरात घालणार आहेत? खांडेकर आता तरी डोळे उघडा ,नाही तर माझाचे डोळे बंद होतील.
राहुल कुलकर्णी संपादक की प्रतिनिधी ?
राहुल कुलकर्णी हा मराठवाड्यात संपादक म्हणून मिरवतो. त्याने आपल्या ट्यूटर अकौंटवर संपादक म्हणून लिहिले आहे. काल एबीपी माझाने कुलकर्णी याच्या अटकेचे वृत्त देताना उस्मानाबाद प्रतिनिधी म्हणून उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ खोटे कोण बोलतंय? चॅनल की राहुल कुलकर्णी ?
1 टिप्पण्या
तुमचा उद्देश पाहता तुम्ही योग्य काम करत आहात
उत्तर द्याहटवा