पुणे पत्रकारितेच्या वर्तुळात सध्या एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनुभवी पत्रकार अमोल धर्माधिकारी यांनी आता LS मराठी मध्ये पुणे ब्युरो हेड म्हणून दमदार एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून, चॅनेल व्यवस्थापनाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. इनपूट हेड नयन कारेकर यांच्या हाताखाली अमोल काम करतील.
पत्रकारितेत तब्बल १३ वर्षांचा अनुभव असलेल्या धर्माधिकारी यांनी येताच कामाचा धडाका लावल्याची चर्चा मीडिया सर्कलमध्ये रंगू लागली आहे. पुण्यातील राजकीय घडामोडी आणि क्राईम बीटवर त्यांची मजबूत पकड असल्याने आगामी काळात LS मराठीच्या बातम्यांना अधिक धार येणार असल्याचे बोलले जात आहे.
धर्माधिकारी यांनी यापूर्वी IBN लोकमत, ZEE 24 तास, जय महाराष्ट्र, आणि लोकशाही मराठी यांसारख्या नामांकित वृत्तवाहिन्यांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे ग्राउंडवरील नेटवर्क, राजकीय संपर्क आणि बातमीचा अचूक अंदाज ही त्यांची खास ओळख मानली जाते.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण, गुन्हेगारी आणि स्थानिक घडामोडींवर आता LS मराठी अधिक आक्रमक शैलीत दिसणार का, याकडे मीडिया क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या