जय महाराष्ट्र चॅनेलमध्ये 'आओ जाओ घर तुम्हारा'! कल्पू मॅडम आउट, मुंडे इन; चॅनलचा टीआरपी कधी वाढणार?


मुंबई: माध्यम वर्तुळातून एक लय भारी बातमी समोर आली आहे. कधीकाळी कुठल्याशा 'गोरखधंद्यातून' कमावलेल्या मायावी पैशाच्या जोरावर उभा राहिलेला 'जय महाराष्ट्र' चॅनेल सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलाय. चॅनेल सुरू होऊन तब्बल १० वर्षं झाली, गंगेतून बरंच पाणी वाहून गेलं, पण या बिचाऱ्या चॅनेलचा टीआरपी काही केल्या ४ ते ५ च्या पुढे सरकायला तयार नाही! अनेक नामांकित चेहरे आले, नामी संपादक आले आणि गेले... पण टीआरपीचा आकडा काही हलला नाही, तो नाहीच.

थोडक्यात सांगायचं तर, सध्या हे चॅनेल म्हणजे केवळ 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी धर्मशाळा बनलंय! इंडस्ट्रीत कुठे नोकरी मिळाली नाही की माणसाने थेट 'जय महाराष्ट्र'ची वाट धरावी आणि बाहेर कुठे चांगला पगार-पाणी मिळाला की गुपचूप पळ काढावा, असा इथला खाक्या झालाय.

राणे मॅडमचा 'बॅक टू पॅव्हेलियन' खेळ!

आता ताजं उदाहरण बघा ना! 'एबीपी माझा' सोडून मोठ्या दिमाखात अदानींच्या हायप्रोफाइल 'एनडीटीव्ही' (NDTV) मध्ये गेलेल्या अँकर डॉ. कविता  राणे मॅडम तिथे नेमकं काय शिजलं, हे त्यांचं त्यांनाच ठाऊक! वर्षभरातच त्यांनी एनडीटीव्हीला रामराम ठोकला आणि 'जय महाराष्ट्र'चं छप्पर धरलं. पण नियती बघा, इथेही त्या सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकल्या नाहीत! त्यांनी चॅनेलला अचानक 'बाय-बाय' ठोकल्याने मिडिया गल्लीत चर्चांना उधाण आलंय. आता मॅडम पुढे कोणत्या चॅनेलचं कल्याण करायला जाणार, हे अजून गुलदस्त्यातच आहे.

एनडीटीव्हीमधून मुंडेंची एन्ट्री!

पण थांबायला वेळ कोणाकडे आहे? इकडे कविता  मॅडम बाहेर पडल्या, तिकडे एनडीटीव्ही सोडून माणिक मुंडे यांनी तातडीने 'जय महाराष्ट्र'मध्ये लँडिंग केलंय. विशेष म्हणजे, मुंडे यांच्या एन्ट्रीमुळेच राणे मॅडमनी चॅनेल सोडल्याची जोरदार कुजबूज सध्या चॅनेलच्या गॅलरीत ऐकायला मिळत आहे.

'नॉन-स्टॉप' मुंडेंचा भन्नाट इतिहास!

आता माणिक मुंडे म्हटल्यावर इतिहास तर मोठा असणारच! मुंडे साहेबांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर ते एका जागी जास्त काळ थांबणारे 'आसामी' नाहीत. सुरुवातीला 'एबीपी माझा', तिथून 'साम टीव्ही', पुढे 'न्यूज १८ लोकमत', मग 'न्यूज नेशन', तिथून 'एनडीटीव्ही मराठी' करत करत आता ते 'जय महाराष्ट्र'च्या दारात पोहोचले आहेत. कोणत्याही चॅनेलवर त्यांचा 'टक्केवारी' कालावधी हा फार फार तर १ ते २ वर्षांचा असतो, असा त्यांचा ख्यातीप्राप्त इतिहास आहे.

आता मुंडेंच्या येण्याने चॅनेलचा टीआरपी ४-५ च्या वर जाणार की नेहमीप्रमाणे वर्ष-दोन वर्षांत पुन्हा 'नवा भिडू, नवा राज्य' खेळ सुरू होणार? हे पाहणं मनोरंजक ठरेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या