शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीत ३ कोटीची वाढ

मुंबई- अडीअडचणीच्या तसेच दु:खाच्या प्रसंगी पत्रकारांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या विश्वस्त संस्थेच्या रकमेत ३ कोटी रुपरांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर या निर्णयाचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी स्वागत करुन राज्यातील व जिल्हयातील समस्त पत्रकार बांधवांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
पत्रकारांचा आकस्मीक मृत्यु झाल्यास किंवा दुर्धर आजार झाल्यास याप्रसंगी त्यांचे कुटुंबिरांना मदत करण्राच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य अधिस्विकृतीचे पदाधिकारी तसेच श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय होवून १ ऑगष्ट २००९ ला शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत २ कोटी रुपयाची तरतुद असलेल्या या निधीच्या रकमेची व्याप्ती वाढवून त्वरीत आणखी ३ कोटीची वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्रमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी स्वागत करुन राज्यातील समस्त पत्रकार बांधवांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
 

Post a Comment

0 Comments