फेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी यास अटक
मुंबई -  एबीपी माझाचा फेक न्यूज देणारा रिपोर्टर राहुल कुलकर्णी  याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा दाखल करून उस्मानाबादेतून  अटक केली आहे.

. 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एबीपी माझावर मंगळवारी सकाळी रेल्वे सुरु होणार असल्याची फेक न्यूज दिल्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात मंगळवारी दुपारी मोठी गर्दी उसळली होती, पोलिसांना ही गर्दी हटवताना नाकी नऊ आले होते. गर्दी पांगवताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता.

 ही गर्दी केवळ एबीपी माझाच्या फेक न्यूज मुळे उसळल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी एबीपी माझाचा रिपोर्टर  राहुल कुलकर्णी यांच्याविरोधात एफआयआर (अजामीनपात्र गुन्हा...  लावलेले कलम-117, 188, 261, 270, 505 B 3 epidemic act.1897 (CR 291/20 ) दाखल केला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक उस्मानाबादकडे रवाना झाले आणि कुलकर्णी यास बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याच्या उस्मानाबादच्या घरातून उचलण्यात आले.

राहुल कुलकर्णी याने यापूर्वीही अनेक फेक न्यूज दिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी नांदेड लोकसभा मतदारसंघातून, शिवराज सिंह चौहान उस्मानाबादेतून निवडणूक लढणार  असल्याची फेक न्यूज  चांगलीच चर्चिली गेली होती.  तसेच विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे उस्मानाबादमधून लढणार ही  बातमीही फेक ठरली होती.
 • लातूरमधून दरवर्षी 600 महिला-मुली गायब होतात...त्यांची विक्री होऊन सोनाघाची, ग्रँट रोड व बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले होते. मराठवाड्यातील स्त्रियांचे चारित्र्यहनन करणारी ती बातमी सुद्धा  या राहूल कुलकर्णी याने दिली होती.
 •  ठग्स ऑफ हिंदूस्थान चित्रपटातील लुटारू नळदूर्ग किल्ल्यांवर वास्तव्याला होते, ही पण बोगस बातमी याच पठ्ठ्याने दिली होती.

 ही बघा कुलकर्णी याची हास्यास्पद बातमी ...


मराठवाडयाच्या एका कोपऱ्यात बसून देशातच्या नव्हे जगाच्या बातम्या देणाऱ्या  राहुल कुलकर्णीबद्दल  अनेक तक्रारी आहेत. इतर रिपोर्टरच्या बातम्या स्वतःच्या नावावर खपवने, इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्राच्या  स्क्रिप्ट    चोरून त्याच्या बातम्या देणे, घटना दुसरीकडील असताना, घराच्या छतावर बसून पिटूसी देणे हे नित्याचे झाले होते.

अखेर फेक न्यूज देणाऱ्या राहुल कुलकर्णी याच्या पोलिसांनीच मुसक्या आवळल्या आहेत.

राहुल कुलकर्णी याच्या अटकेबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्विट 


हेही वाचा 

राहुल कुलकर्णी याची आणखी एक फेक न्यूज

Post a Comment

5 Comments

 1. बातमी ही फेक न्यूज नसतेच मुळी ती असते फक्त माहिती आणि ती देखील चुकीची. त्यामुळे सवर्य पत्रकारांना विनंती आहे की फेक न्यूज न म्हणता फेक इन्फॉर्मेशन असे म्हणणे संयुक्तिक वाटते का पहा.

  ReplyDelete
  Replies
  1. चल आला मोठा...तो पत्रकार म्हणून फेक इन्फॉर्मेशन.. दुसरा एखादा सामान्य माणूस हे बोलला असता तर याच पत्रकार लोकांनी त्याला सळो की पळो करून सोडलं असतं. आणि तुला रे लै पुळका...

   Delete
 2. खोटि बातमि देतात त्याना चांगलि सजा झालिच पाहीजे,,काही हींदि न्यूज ही आहेत

  ReplyDelete
 3. या सर्व प्रकारात राहुलचं एकट्याचं नुकसान नाही. नुकसान चांगल्या पत्रकारितेचं होणार आहे, समाजाचं होणार आहे, सर्वसामान्य जनतेचं होणार आहे. राहुल लढतोय ती लढाई आपली सर्वांची आहे हे आज ना उद्या आपल्या सर्वांच्या लक्षात येईल असा विश्वास आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. का रे त्यांनी कोणती खरी बातमी सांगितली trp साठी मिडीया वाले आजकाल कोणत्याही थराला जातील

   Delete