मुंबई
- फडणवीस सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये चर्चा झडत
असताना, एक पाऊल पुढे टाकणाऱ्या
झी २४ तास मध्ये मोठा
धमाका झालाय.संपादक
डॉ. उदय निरगुडकर यांनी आज सायंकाळी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या
राजीनाम्यामुळे सर्व कर्मचारी अचंबित झाले . त्यानंतर तातडीने ज्येष्ठ
पत्रकार विजय कुवळेकर यांनी संपादकपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
पाच
वर्षांपूर्वी डॉ. उदय निरगुडकर यांनी झी २४ तासच्या संपादक पदाची सूत्रे
हाती घेतली होती. त्यानंतर त्यांनी नंबर दोनवर असलेल्या झी २४ तासला नंबर १
वर आणले होते.
'रोखठोक' हा त्यांचा डिबेट शो बऱ्यापैकी चालत होता. चॅनलला
चांगला बिझनेस देणारा संपादक म्हणून त्यांची ख्याती होती. कॉर्पोरेट
क्षेत्रात त्यांचा चांगला परिचय होता.त्यामुळे झी २४ तास जाहिरातीमध्ये
अव्वल होते.
टीव्ही मीडियाचा कसलाही अनुभव नसताना डॉ. उदय निरगुडकर यांनी झी २४ तासला अव्वल केले होते. त्यापूर्वी ते IBN लोकमतवर एक गेस्ट म्हणून हजेरी लावत होते. निखिल वागळे यांनी डॉ. उदय निरगुडकर यांना टीव्ही मीडियात स्थान दिले होते.
विजय कुवळेकर नवे संपादक
सर्व
काही सुरळीत चालू असताना डॉ. उदय निरगुडकर यांनी आज तडकाफडकी राजीनामा
दिला. राजीनाम्याचे नेमके कारण शोधण्याचा बेरक्याने प्रयत्न केला असता, एक
तर त्यांना IBN लोकमतची ऑफर असावी किंवा दिल्लीत आलेल्या चंद्रामुळे
हवालदिल झाल्यामुळे शेवटी कंटाळून त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फडणवीस
सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून सर्व चॅनलमध्ये आज चर्चा झडत आहे आणि
दुसरीकडे झी २४ तासमध्ये धमाका झाला. डॉ. उदय निरगुडकर यांनी आज सायंकाळी
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची शेवटही मुलाखत घेतली आणि त्यानंतर एडिटर
डेस्कवर त्यांनी स्वतःचे ओळखपत्र ठेवून सर्व कर्मचाऱ्यांना आज माझा शेवटचा
दिवस आहे आणि यापुढे आपली भेट होईल की नाही असे म्हणताच सर्व कर्मचारी
अचंबित झाले. डॉ. उदय निरगुडकर चेष्टा करीत आहेत असे अनेकांना वाटले पण त्यात सत्यता निघाली. त्यानंतर लगेच ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी संपादकपदाची सूत्रे घेतली.
कुवळेकर अनेक वर्ष पुणे सकाळचे संपादक आणि मुख्य संपादक होते. त्यानंतर
लोकमतला संपादक आणि मुख्य संपादक होते,दोन महिन्यापूर्वी ते झी मीडियामध्ये
जॉईन झाले होते. झी मीडिया लवकरच एक मराठी साप्ताहिक काढत असून त्याचे
संपादक म्हणून कुवळेकर जॉईन झाले होते. आता त्यांच्याकडे झी २४ तासचे
संपादकपदही आले आहे. कुवळेकर यांना टीव्ही मीडियाचा कसलाही अनुभव नाही. एक
तर नवा संपादक येईल किंवा कुवळेकर तयार झाले तर त्यांच्याकडेही कायम
सूत्रे राहतील, अशी चर्चा आहे.
कुठे जाणार डॉ. उदय निरगुडकर ?
झी
२४ तासमधून अस्त झाल्यानंतर डॉ. उदय निरगुडकर नेमके कुठे जाणार, याकडे
लक्ष वेधले आहे. लवकरच नामांतर होणाऱ्या IBN लोकमतमध्ये ते जॉईन होतील अशी
शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसाद काथे यांच्या कामावर मॅनेजमेंट समाधानी
नाही. त्यामुळे चॅनलमध्ये
काथ्याकूट सुरु आहे. वृत्तसंपादक असलेल्या
राजेंद्र हुंजे यांचे अधिकार वाढवण्यात आले आहे. तो काथेसाठी धोक्याची घंटा
मानली जात आहे.