पुणे: म्हणतात ना, "पापाचा घडा कधी ना कधी भरतोच!" पुण्याच्या मीडिया वर्तुळात सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे बड्या उद्योगपतीच्या (अदानींच्या) चॅनलमधील पुणे ब्युरोची झालेली तडकाफडकी हकालपट्टी! ज्यांनी दुसऱ्यांना "उघडा डोळे, बघा नीट" म्हणत शहाणपण शिकवलं, अखेर त्यांच्याच 'काळ्या कारनाम्यां'वर चॅनलने प्रकाश टाकला आहे. हे महाशय दुसरे-तिसरे कोणी नसून शॉर्टफॉर्मने ओळखले जाणारे 'आर. के.' आहेत.
नेमकं काय घडलं?
हे आर. के. महाशय पुण्यात आले, पण आपल्या जुन्या खोडी काही विसरले नाहीत. "गाडी मालकाची, कॅमेरा मालकाचा आणि प्रसिद्धी मात्र स्वतःची," असा यांचा खाक्या होता.
चॅनलच्या हक्काची गाडी आणि कॅमेरा वापरून आर. के.महाशय चक्क स्वतःचं 'युट्युब चॅनल' आणि 'फेसबुक पेज' चालवण्याचा सपाटा लावला होता. कहर म्हणजे, अधिकृत चॅनलवर बातमी 'ऑन एअर' जाण्याआधीच ती आपल्या खासगी सोशल मीडियावर अपलोड करून मोकळे होत असत. म्हणजे पगार घ्यायचा मालकाकडून आणि टीआरपी वळवायचा स्वतःच्या दुकानाकडे!
सरकारी जावई असल्यासारखे उद्योग
फक्त बातम्यांची चोरीच नाही, तर चॅनलची अलिशान गाडी हे महाशय आपल्या फॅमिलीसाठी खासगी टॅक्सीसारखी वापरत होते. पेट्रोल चॅनलचं आणि फिरस्ती महाशयच्या घरच्यांची!
जुनी खोड, नवे ठिकाण
विशेष म्हणजे, मराठवाड्यात असताना 'उघडा डोळे, बघा नीट' म्हणत जे उद्योग त्यांनी तिथे केले होते, तेच उद्योग पुण्यनगरीत आल्यावरही सुरूच ठेवले. पण म्हणतात ना, "शेरास सव्वाशेर भेटतोच." अखेर चॅनलच्या व्यवस्थापनाने डोळे नीट उघडले आणि या 'आर. के.' साहेबांच्या हातात नारळ देत त्यांची कायमची रवानगी केली.
थोडक्यात काय, तर दुसऱ्यांना नीतिमत्ता शिकवणाऱ्यांचेच पितळ उघडे पडले आहे!
पुढील अपडेटसाठी वाचत राहा आपला 'बेरक्या' ब्लॉग!

0 टिप्पण्या