पुणे - न्यूज चॅनल म्हटलं की ब्रेकिंग न्यूजचा गोंगाट, स्टुडिओतील आरडाओरडा, फिल्डवरील धावपळ आणि न्यूजरूममधील कायमचा ‘हाय व्होल्टेज’ माहोल — हेच चित्र डोळ्यासमोर येतं. पण याच गोंगाटाला एक दिवसासाठी ब्रेक देत एलएस मराठीनं होळी आणि धुलीवंदनाचा सण रंगतदार पद्धतीनं साजरा केला.
इतर चॅनल्स ‘ब्रेकिंग’च्या स्पर्धेत गुंतलेले असताना, एलएस मराठीच्या संपूर्ण स्टाफनं एक दिवसाची सुट्टी घेत परंपरेला आणि आनंदाला प्राधान्य दिलं. रोज बातम्यांच्या रणांगणात झुंज देणाऱ्या पत्रकारांसाठी खास सेलिब्रेशनचं आयोजन करण्यात आलं.
विशेष म्हणजे, पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये या होळी सेलिब्रेशनचं बुकिंग स्वतः चॅनलकडून करण्यात आलं होतं. रंग, गुलाल, हास्य आणि एकोप्याच्या वातावरणात स्टाफनं सणाचा मनमुराद आनंद लुटला.
साधारणपणे पत्रकारांचा सणही ‘लाईव्ह कव्हरेज’मध्येच जातो — कुणाचा मोर्चा, कुठली दुर्घटना, कुठला राजकीय ट्विस्ट… पण यावेळी मात्र एलएस मराठीनं न्यूजरूमचा राडा बाजूला ठेवत “पहिले आपले” हा मंत्र जपला.
रंगांच्या उधळणीतून एक वेगळा संदेशही देण्यात आला — ब्रेकिंग न्यूज महत्त्वाचीच, पण टीमचं बंधन आणि सणांचा आनंदही तितकाच गरजेचा!
न्यूजच्या रणधुमाळीतही रंग जपणारा हा एलएस मराठीचा हटके अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
0 टिप्पण्या