बारामतीच्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम बंद आंदोलन

बारामती - बारामती येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी 14 आॅगस्ट पासून काम बंदचा पवित्रा घेत अंक उचलले नाहीत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी देखील अंक वाचकांपर्यंत पोचू शकला नाही. त्यामुळे सकाळ, लोकमत, पुढारी च्या वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
 वर्तमानपत्राची किंमती कमी केली जाते तेव्हा विक्रेत्यांचे कमीशन कमी केले जाते.  आता या तीनही  वर्तमानपत्रांनी
किंमती वाढवल्या असल्या तरी कमीशन वाढवले नाही. महिनाभर वितरण प्रतिनिधीनी चालढकल करत वरिष्ठांपर्यंत चुकीची माहिती दिल्याने वर्तमानपत्राच्या सांभाव्य नुकसानाला त्यांचे संम्बधीत वितरण प्रतिनिधीच जबाबदार आहेत. असा सुरू वृत्तपत्र विक्रेत्यांमधून होत आहे.    
   बारामती शहर वेगाने वाढत आहे. त्यामुळे वृत्तपत्रविक्रेते पहाटेपासून पेपरचे ओझे वाहतात. सध्या बारामती शहरात सकाळ चा सर्वाधिक खप आहे. त्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रोज बारामती शहरात खपणारा 11000 सकाळ 3000 च्या आसपास येऊन पोचला. तर बर्याच ठिकाणी सकाळ फुकट वाटला गेला.  लोकमत ची तर दांडीच उडाली.
लोकमतने  नेमलेले पंटर वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप  रोखू शकले नाहीत.अगोदर तिसर्या क्रमावर असलेला लोकमतचे बरेच अंक परत गेले. लोकमतच्या ब्युरो चीफने काही पोरटोर गोळा करून प्रत्येकी दोनशे रूपये देऊन अंक वाटण्याचा प्रयत्न केला. मात्र भल्या पहाटेच काम करण्याची सवय नसलेल्या पंटरांनी काढता पाय घेतला.
सकाळने आपली उच्च व्यवस्थापन कौशल्य दाखवत चक्क बातमीदार मंडळींना भल्या पहाटे ताणलं. त्यांच्या दोन चारचाकी गाड्या बारामतीत घिरट्या घालत होत्या. त्यामुळे गाड्या खर्च व  इतर खर्च याचा ताळमेळ घातला तर विक्रेते वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला न  परवडणारे ठरत आहे. आम्ही दुसरी टीम तयार करू असे बळेच आव आणून बोलत होते.
पुढारीचा वितरण प्रतिनिधी आपल्या पैलवानकीच्या जोरावर वृत्तपत्र विक्रेत्यांना दमदाटी करत होता. पण त्याला कोणी भिक घातली नाही. पुढारी, लोकमतच्या कंपनी वितरकांनी सकाळी दहा वाजता घाशा गुंडाळला. पुण्यात प्रत्येक पुरवनी पाठीमागे दहा पैसे वृत्तपत्र विक्रेतांना मिळतात. तर बारामतीतील वृत्तपत्र विक्रेत्यांचे शोषण वर्तमानपत्र का करत आहेत. ज्यांनी अन्यायाला वाचा फोडायची तेच अन्याय करत आहेत असा प्रश्न विक्रेतांचा आहे.

Post a Comment

0 Comments